अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 64

In marathi

अनिताने आदल्या दिवशी सांगितल्या प्रमाणे सकाळीच भटजी काका घरात हजर राहिले.. घरी आल्या आल्या ते अनघा आणि विराजची पत्रिका बघू लागले.. विराज ऑफिसला जायच्याच तैयारीतच असतो.. भटजी काका मुहूर्ताविषयी काय बोलतात ते बघायसाठी तो तिथे थांबला असतो..

भटजी काका : पत्रिका अगदी उत्तम जुळतेय.. लग्नासाठी निवडलेली तारीख आणि वेळ दोन्हीही शुभ आहेत..

विराज : मम्मा मग काय करायच??. इव्हीनींगला लग्न चालेलना.??

अनिता : हो चालेल..

विराज : काका तुम्ही लास्ट टाईम शौर्यच्या बाबतीत केलेली एस्ट्रोलॉजी खरी ठरलं..(विराज अस बोलताच शौर्य प्रश्नार्थी चेहऱ्याने विराजकडे बघु लागला..) म्हणजे मला नव्हतं वाटलेलं की हा USA जाईल.. बट खरच तो गेला..

भटजी काका : आता पर्यंत माझी भाकीतं कधी खोटी ठरली नाही..

शौर्य : ए विर तु पण कसल्या गोष्टींवर विश्वास ठेवतोस..

विराज : आधी नव्हतो ठेवत बट काकांची तुझ्या बाबतीतली भविष्यवाणी ऐकुन ठेवु लागलोय विश्वास.. म्हणजे फक्त काकांवर बाकी कोणावर नाही..

ही आमच्या शौर्यची पत्रिका.. ह्याच पुढच शिक्षण वैगेरे कस असेल?? 

अनिता शौर्यची पत्रिका भटजी काकांना देतच बोलते..

शौर्य : मम्मा तु पण.. हे अस काही नसतं ग.. प्लिज स्टॉप दिस..

अनिता : तु जरा शांत बस शरू.. 

शौर्य : काय करायच ते कर.. मला डेकोरेशन वाल्याला भेटुन यायचय...

शौर्य आपल्या मोबाईलमध्ये हॉल डेकोरेटरचा कोंटेक्ट नंबर शोधत तिथेच बसतो..

भटजी काका एक नजर शौर्यकडे फिरवतच त्याची पत्रिका बघतात..

भटजी काका : विश्वास ह्या एका गोष्टीमुळे आयुष्यातली जिवलग अशी नाती तुटलीत.. होऊन गेलेला काळ खुप त्रासदायी होता.. मरण यात्रा ते पुन्हा जीवन यात्रा असा प्रवास ह्याने पाहिला अस म्हटलं तरी चालेलं.. मी बरोबर बोलतोय ना शौर्य..??

भटजी काका अस बोलताच शौर्य विराजकडे बघु लागतो..

विराज भुवया उडवतच त्याच्याकडे बघतो.. शौर्य आता मोबाईल बाजुला ठेवुन भटजी काकांकडे बघु लागतो..

भटजी काका : योग्य गोष्टीतुन योग्य वेळी बाहेर पडणे आवश्यक आहे.. नको असलेली नाती अचानकपणे पुन्हा नजरेसमोर येतील तेव्हा त्यावेळेस आपण पुन्हा मरण यात्रेतून जातोय अस वाटेल.. पण ह्यावेळेला विश्वास आणि त्याच सोबत तुला समजुन घेणारी व्यक्ती तुझ्या सोबत असेल.. येणारा काळ हा खुपच सुखमयी होईल जर ह्या आधी होऊन गेलेल्या चुका परत केल्या नाहीस तर.. फक्त योग्य वेळी योग्य कोण ह्याची निवड करता येणं गरजेच आहे.. ती जर करता आली की ह्या पुढील संपुर्ण आयुष्य आतापर्यंत तु तुझ्या जीवनात कधीही न पाहिलेलं सुख तुझ्याजवळ असेल.. शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर ते उत्तमच आहे.. 

विराज आणि अनिता एकमेकांकडे बघतच शौर्यकडे बघतात..

शौर्यला भटजीकाकांच कोड्यात असलेलं बोलण कळलच नाही.. तो त्यांच्या बोललेल्या गोष्टींचा विचार करत आपल्या हाताच्या पंजावर आपली हनुवटी ठेवत तिथेच बसुन होता.. भटजी काका तिथुन कधी निघुन गेले ते ही त्याला कळलं नाही..

विराज : काय झालं?? तुझा तर विश्वास नाही ना.. मग काय एवढं काकांच्या बोलण्याचा विचार करतोयस..

शौर्य : मी नाही विचार करत.. तु चाललास पण कामावर..??

विराज : हो.. तुझं काही काम होत का??

शौर्य : नाही.. मी पण तैयार होऊन वेडिंग कार्डची ऑर्डर द्यायला चाललोय..

विराज : गाथाला फोन करून कळवलंस??

शौर्य : काय??

विराज : अस काय करतोयस.. त्यांना पण कार्ड प्रिंटिंगला द्यावं लागेलं ना.. तिला मेसेज करून सांगना. फंक्शन आणि टायमिंग ओके आहे..

शौर्य : विर ते तु पण सांगु शकतोस ना वहिनीला मेसेज करून.. मी गाथाला सारख सारख कस मेसेज करू..

विराज : बर मी सांगतो.. बाय

शौर्य : ए विर.. तुझ्यासाठी सरप्राईज पाठवलंय कामावर.. मग मला फोन करून सांग कस वाटलं ते..

शौर्य हसतच विराजला बोलतो..

विराज : सरप्राईज.. काय पाठवलयस??

शौर्य : ते तर तुला तु कामावर गेल्यावर कळेल.. आणि संध्याकाळी जर लवकर निघालास की मला फोन कर.. 

विराज : का??

शौर्य : मी इव्हीनिंगला गाथासोबत तुझ्या प्रिवेडिंग शुटसाठी कॉश्च्युम्स घ्यायला जातोय.. तुझ जर काम लवकर झालं तर बरं होईल.. तिथुन आपण वहिणीसाठी एक छान सरप्राईज पण घेऊयात.. तुझ्याकडुन.. एंगेजमेंट दिवशी तिला दे.. मी एकदा कार्ड वाटायला बिजी झालो मग मला काही वेळ नाही मिळणार तुझ्यासोबत यायला.. आणि तु अस काही प्लॅन केलं नसशील हे पण मला माहिती आहे..

विराज : किती काय काय डोक्यात ठरवलंय शौर्य तु.. मी पण एवढा नाही विचार केला.. बर मी कळवतो तुला.. तस मला नाही वाटत मी 10 शिवाय येईल आज घरी..

शौर्य : मला तर वाटत तु 6 वाजताच येशील आज.. आणि तु आता माझ्याशी बोलत बसुन कामावर जायला उशीर नको करुस.. सरप्राईज वाट बघत असेल तुझी..

विराज थोडं प्रश्नार्थी चेहरा करून शौर्यकडे बघत असतो..

शौर्य : अस नको बघु यार. (विराजची टाय नीट करतच शौर्य बोलतो) एक स्माईल दे.. आणि जा... तुला उशीर होतोय.. सरप्राईज आवडल की फोन कर.. मला काम आहेत खुप.. विराजला बाय करत शौर्य आपल्या रूममध्ये येतो..

विराज गाडीत शौर्यच्या बोलण्याचाच विचार करत असतो..

साहेब ऑफिस आलं.. ड्रायव्हर विराजला लागलेली तंद्री दूर करतच त्याला बोलतो..

तस विराज गाडीतुन उतरून ऑफिसमध्ये शिरतो.. 

विराज ऑफिसमध्ये येताच त्याच्या हाताखाली काम करणारे सगळेच एम्प्लॉयीस उभं राहुन नेहमी प्रमाणे त्याला गुड मॉर्निंग करतात.. सगळयांना गुडमॉर्निंग करत तो आपल्या केबिनमध्ये जातो.. नेहमी सरळ असलेली चेअर आज मात्र त्याच्या विरुद्ध दिशेने तोंड करून असलेली त्याला दिसते.. विराज जस एक पाऊल पुढे टाकतो तस ती चेअर त्याच्याकडे तोंड करत सरळ वळते.. 

तु... अनघाला चेअरवर बसलेलं बघुन विराजला आश्चर्य वाटत..

अनघा : गुडमॉर्निंग सर... 

(अनघा हसतच त्याला बोलते..)

विराज : म्हणजे शौर्य बोलत होता ते सरप्राईज हे आहे तर.. 

अनघा : नाही सर.. सरप्राईज अजुन द्यायच बाकी आहे तुम्हांला..

विराज : तु सर काय बोलतेस..?

अनघा : आता मी तुमच्या हाताखाली काम करायच ठरवलंय मग सर बोलावच लागेल ना तुम्हांला.. अस काय करताय तुम्ही विराज सर..

विराज : तु काय बोलतेस..??

अनघा : एक मिनिट.. तु अस पेनिक नको होऊस.. तु बस बघु इथे.. आणि पाणी पी..

(अनघा विराजला त्याच्या चेअरवर बसवतच त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देतच बोलली.. ) 

अनघा : मी अस ठरवलंय की इतर कुठे जॉब करण्यापेक्षा तुझ्याच कंपनीत जॉब करेल.. मला तुझ्यासोबत पण रहायला मिळेल.. आपल्या दोघांना एकमेकांसाठी वेळ पण देता येईल.. तुझ्या एकट्यावर असलेला कामाचा भार मला थोडं हलका करता येईल.. 

विराज अनघाकडे बघतच रहातो..

अनघा : तु अस काय बघतोयस माझ्याकडे??  तुला चालेल ना मी तुझ्यासोबत काम केलेलं??

विराज : एकच्युअली अनु... मीच तुला हे बोलणार होतो ग.. बट मला नाही जमलं तुझ्याशी ह्या बाबतीत बोलायला.. मला तर आवडेल तुझ्यासोबत काम करायला.. आणि खरच मला ह्या बिजीनेसमध्ये गरज आहे कुणाची तरी.. मला नाही जमत एकट्याला हे सगळं हँडल करायला

अनघा : ग्रेट. मग करूया सुरुवात कामाला आज पासुनच विराज सर??

विराज : ए अनु यार प्लिज स्टॉप टु कॉल मी सर..

अनघा : बर.. पण त्या आधी आपल्या छोट्या बंधुना फोन करून कळवा त्यांनी दिलेलं सरप्राईज कस वाटलं ते?? ते वाट बघत असतील तुमच्या प्रतिक्रियेची..

विराज : तु अगदी शौर्यसारखीच बोलतेस.. (विराज हसतच अनघाला बोलतो).. थांब करतो त्याला फोन..

विराज शौर्यला फोन लावुन फोन स्पीकरवर ठेवतो..

शौर्य : हेय ब्रो.. सरप्राईज कस वाटलं..?? आवडलं म्हणुन सांगायला फोन केलास बरोबर.. आणि नंतर थेंक्स पण बोलणार असशील.. पण हे सगळं करण्यात तु तुझा आणि माझा म्हणजे आपल्या दोघांचा वेळ वाया घालवतोयस.. बिकोज माझ्या मोठ्या भावाच लग्न आहे यार.. मी खुप म्हणजे खुप बिजी आहे.. अस फोन करून प्लिज मला डिस्टरब नको करुस..आय रिक्वेस्ट यु..

(फोन उचलल्या उचलल्या शौर्य विराजच काहीही ऐकुन न घेता बोलतो)

विराज : एक मिनिट तुच मला फोन करायला सांगितलेलास..

शौर्य : ते मी फक्त बघत होतो.. मी सांगितलेलं तु किती ऐकतोस ते.. तस पण पहिल्यांदाच काही तरी ऐकलस माझं अस म्हणायला हरकत नाही..

(अनघा विराजकडे बघुन हसत असते)

विराज : शौर्य मी ऑफिस सुटल्यावर घरी येतो. तु विसरतोयस.. 

शौर्य : काय बोलतोयस.. मग भेटुच घरी.. दुसर सरप्राईज रेडी आहे तुझ्यासाठी..

विराज : आता अजुन काय आहे..??

शौर्य : ते तर तु घरी आल्यावरच कळेलना तुला.. आणि मी खरच बिजी आहे.. मग बोलतो तुझ्याशी.. तस पण तु ऑफिस सुटल्यावर घरीच येतोस.. बरोबर..

विराज : बाय..

शौर्य : बाय...बाय... लव्ह यु... टेक केअर.. 

विराज : लव्ह यु 2..

अनघा : मस्त आहे ना शौर्य.. त्याच बोलणं ऐकलं तरी फ्रेश वाटत..

विराज : हम्मम.. 

अनघा : आपण करूयात कामाला सुरुवात..

विराज आणि अनघा दोघांनी मिळुन आजपासुनच कामाला सुरुवात केली..

शौर्य आपल्या मित्रांना घेऊन डेकोरेशनवाल्याशी बोलुन हॉल डेकोरेशनची ऑर्डर देऊन येता.. तिथुन कार्ड प्रिंट करायला जातो.. एक एक काम जेवढी करता येईल तेवढी तो दिवसभरात करून घेतो..

रॉबिन : अजुन काय बाकी आहे??

शौर्य : अजुन तर खुप काम आहेत यार.. पण आज पुरत एवढंच बस झाल..

नैतिक : डान्सच काय झालं??

शौर्य : ते नेक्स्ट मंथमध्ये बघु.. पण मला एक सांगा तुम्ही लोक मशीन आहात का??

रॉबिन : अस का बोलतोयस??

शौर्य : मला भुक लागलीय.. तुम्हांला दोघांना नाही लागली अजुन म्हणुन बोलतोय..

नैतिक : मला पण लागलीय यार..

शौर्य : मग चला जेवुन घेऊयात..

रॉबिन : ए शौर्य बेंड वैगेरे डीसाईड केलंस का??

शौर्य : अरे हा यार. ते तर माझ्या डोक्यातुन निघूनच गेलं..

रॉबिन : डोन्ट वरी.. मी आणि नैतिक करतो बुक...

शौर्य : थेंक्स यार..आणि तुम्ही दोघ कार्ड पण द्यायला याल का माझ्यासोबत..?? प्लिज.. एक तर मी ठराविक पाहुणे मंडळी सोडली तर कोणाला ओळखत पण नाही.. तुम्ही दोघ आलात तर थोडं बर पडेल मला..

रॉबिन : नाही मी नाही येणार..

नैतिक : मी पण नाही येणार.

शौर्य : बस काय यार... हीच तुमची मैत्री..

नैतिक : हेच आम्ही तुला बोलु शकतो ना.. तु विचारतोस कसलं. फक्त ऑर्डर सोड यार.. कधी आणि कुठे यायच ते.. आपण आपल्या मित्र मंडळींना हेल्प करताना नाही बोलतो का कधी.. फॉरेनला जाऊन इकडे आम्ही तुझ्यावर केलेले संस्कार विसरला की काय तु..

शौर्य : सॉरी यार..

रॉबिन : बघ.. परत तीच चूक.. सॉरी आणि थेंक्स हे दोन इन्सलटिंग वर्ड आपण आपल्या इंडियन संस्कृतीत बोलत नाहीत हे पण तु विसरलास.

शौर्य : बर बाबा. तुम्ही दोघ आज खुपच ज्ञान देतायत मला. चला जेवुन घेऊयात.. मला शॉपिंगला जायचय वहिनीच्या बहिणीसोबत.. तिला पिकअप करायचय कॉलेजमधुन मग तिथुन शॉपिंग करून तिला घरी सोडून परत विर सोबत शॉपिंगला जायचय.. 

नैतिक : तु तुझ्या वहिनीच्या बहिणीसोबत शॉपिंग करतोस.. मज्जा आहे तुझी

शौर्य : त्यात काय मज्जा?? तुम्हां लोकांचं काही तरी वेगळंच असत.. आणि सगळ्यात महत्वाच तिची बहीण कोण आहे माहिती??

रॉबिन : मिस इंडिया??

रॉबिन अस बोलताच नैतिक हसु लागतो..

शौर्य : जॉकी छान होता.. पण मला हसु नाही येत... कारण तिची बहीण दुसरी तिसरी कोणी नसुन.. जिच्या कॅकमध्ये त्यादिवशी तु तुझ्या कारची किल्ली टाकलीसना ती आहे...

रॉबिन : ओहहह.. म्हणजे तुला अस बोलायचंय की जीच्याकडे तु त्यादिवशी प्रेमभऱ्या नजरेने बघत होतास ती का...?

शौर्य : काहीही काय बोलतोयस.

नैतिक : खर तेच तर बोलतोय तो.. एवढ तुला ओरडत होती.. पण तुझ्या चेहऱ्यावर राग कुठे दिसतच नव्हता. एक टक तिच्याकडे बघत बसलेलास.. आम्हाला वाटलं चला आम्हाला नवीन वहिनी मिळाली.. म्हणजे ग्रुपमध्ये ज्यो वहिनी फिक्स आहे ना.. तस वाटलं आता ही..

शौर्य : तुम्ही दोघांनी थोडी जास्त ड्रिंक केलेली म्हणुन तुम्हांला दिसत असेल तस.. आता गप्प जेवुन घ्या.. थंड होतय जेवण.. 

रॉबिन : म्हणजे नाही आवडली का तुला ती..??

शौर्य : एक मिनिट.. पहिली गोष्ट म्हणजे मला परत प्रेम हा चेप्टरच माझ्या लाईफमध्ये परत नकोय.. एकदा सहन केलंय परत नाही सहन होणार.. आणि दुसरी गोष्ट माझ्या वहिनीची बहीण आहे ती.. वहिनी काय विचार करेल माझ्याबद्दल मी अस काही केलं तर..  एक तर एवढ्या विश्वासाने ती माझ्यासोबत तिला शॉपिंगला पाठवते.. अस काही केलं तर कधी विश्वास तरी ठेवेल का ती माझ्यावर?? प्लिज परत गाथा वरून अस चिडवु नका यार..

रॉबिन : ओहह...गाथा नाव आहे तीच.. 

शौर्य : हम्मम..

नैतिक : काय मग शौर्य... गाथा हे नाव छान वाटतना..???

शौर्य रागातच नैतिककडे बघतो..

रॉबिन : हा ना शौर्य..??? गाथा हे नाव छान वाटत.. मी तर पहिल्यांदाच ऐकलं..

शौर्य : तुम्ही दोघ ना सुधारणार नाहीत यार..

रॉबिन : एवढं तुला माहिती तरी तु आता एवढं मोठं लेक्चर देत होतास आम्हाला.. जाऊ दे जेवुन घे.. ती वाट बघत असेल.. शॉपिंगला जायचय तुला शौर्य गाथा सोबत..

शौर्य : अरे यार.. प्लिज ना.. नका ना चिडवु..

नैतिक : बर नाही चिडवत..

तिघेही शांत बसुन जेवुन घेतात..

रॉबिन : आम्ही निघु मग?? बेंडवाल्याशी बोलुन बघतो.. आणि सोबत डीजेवाल्याशी पण. हळदीत डीजे असेल तर मज्जा येईल..

शौर्य : ओके.. चालेल..

नैतिक : फोन करतो तुला मग मी.. किती रेट बोलतो ते बघतो आणि सांगतो..

रॉबिन : अरे पण शौर्य गाथा सोबत असेल यार.. उगाच डिस्टरब होईल त्याला..

शौर्य : ज्यो शीच बोलावं लागेल आता मला.. तु ऐकत नाही म्हटलं तर.. थांब तु..

रॉबिन : बस काय शौर्य.. हीच मैत्री..

शौर्य : नको ना चिडवु मग.. मी ह्या पुढे तुम्हा दोघांना काही सांगणारच नाही..

नैतिक : बर नाही  चिडवत.. ए रॉबिन बस झालं.. आता नाही चिडवायच ह्याला.. आम्ही निघतो.. तुला पण उशीर होत असेल ना..??

शौर्य : हो.. इथेच तीन वाजले.. मला तीन वाजे पर्यंत तिच्या कॉलेजजवळ पोहचायच होत.. मी निघतो.. तुम्ही दोघ कसे जाल..??

रॉबिन : नैतिक तुला अस हवेत उडता वैगेरे येत काय??

नैतिक : नाही रे.. पण चालता येत मला...

रॉबिन : नक्की ना??

नैतिक : हो नक्की..

रॉबिन : शौर्य मग आम्ही चालतच जाऊ.. कारण ह्याला पण उडता नाही येत आणि मला पण..

शौर्य : तुम्ही दोघे ना आज खुपच मस्तीच्या मुडमध्ये आहात.. जाऊदे.. बघतो तुमच्याकडे नंतर. मी निघतो इथुन.. मला उशीर होतोय.. बाय..

नैतिक : सांभाळुन ड्राइव्ह कर.. बाय.. आणि फोन उचल आम्ही केल्यावर...

शौर्य : हो उचलतो..

शौर्य हसतच दोघांना बाय करतो.

इथे गाथाला पण नेमका प्रॅक्टिकलमुळे उशीर झाला असतो.. वारंवार ती हातातील घड्याळ बघत असते.. शौर्यला 3 चा टायमिंग दिलाय.. आत्ता साडे तीन होत आले.. बिचारा वाट बघत असेल माझी.. सरांची नजर चुकवत हळुच आपल्या मैत्रिणीला ती सांगत असते.. फायनली प्रॅक्टिकल संपते.. तशी सगळ्यांना बाय करत पटकन आपली बेग उचलत पळतच कॉलेज बाहेर येते..

शौर्य गाडीबाहेर उभं रहात तिची वाट बघत असतो..

गाथा : रिअली सॉरी मला उशीर झाला.. म्हणजे आज प्रॅक्टिकल पण होती मला नव्हतं माहिती.. काल गेली नाही ना मी त्यामुळे.. आणि त्यात कालच्या गडबडीत मी मैत्रिणीला फोन पण करून विचारलं नाही.. त्यामुळे सगळा गोंधळ झाला.. तुला खुप वेळ वाट बघावी लागली का माझी..

शौर्य : अग उलट मीच तुला येऊन सॉरी बोलणार होतो.. मला पण यायला उशीर झाला.. मला वाटलं की तु रागाने निघुन गेली असशील माझी वाट बघुन.. मी फोन लावत होतो तुला..

गाथा : ते एकच्युअली रेंज इस्यु आहे.. आमची प्रॅक्टिल असते ना त्या क्लासरूममध्ये रेंज नाही मिळत..

शौर्य : ओहह.. बाय दि वे.. निघुयात मग आपण.. अजुन उशीर नको व्हायला..

गाथा : अ...हो..

गाथा शौर्यच्या बाजुच्याच सिटवर बसते.. बेगेतुन पाण्याची बॉटल काढत शौर्यकडे बघते..

गाथा : तुला हवंय पाणी??

शौर्य : नाही नको.. थेंक्स..

हे तर तु घेऊच शकतो.. पार्लेजी बिस्किटचा पुडा काढत ती शौर्यसमोर धरते..

शौर्य : खरच नको..

गाथा : एक तर घेऊच शकतोस ना.. प्लिज..

शौर्यला तिला नाही बोलायला नाही जमत तो एक बिस्कीट त्यातुन घेतो..

शौर्य : तुला भुक लागलीय का?? नाही म्हणजे ह्या टाईमला बिस्कीट खातेस म्हणुन विचारलं..

गाथा : लंच करायला टाईमच नाही मिळाला मला आज.. काल मिस झालेल्या लेक्चरचे नोट्स कम्प्लिट करण्यात रिसेस निघुन गेली माझी.. आणि एकदा लेक्चर सुरू झालं की मग कुठे काय टाईम मिळतो.. आणि मला सवय आहे ह्याची.. 

शौर्य : काही तरी खाऊन घेऊयात??

गाथा : नाही नको.. 

शौर्यला गाडी ड्राइव्ह करताना त्याला स्नॅक्स सेन्टर दिसत असत. तो गाडी साईडलाच पार्क करतो..

गाथा : तु गाडी का थांबवली..

शौर्य : ते मला पण भुक लागलीय.. आपण काही तरी खाऊन घेऊयात.. 

गाथा काही बोलायच्या आत शौर्य गाडीतुन बाहेर पडतो.. गाथा पण गाडीतुन उतरत त्याच्या मागे जाते..

शौर्य : काय खाणार तु??

गाथा : मला काहीही चालेल..

शौर्य : सॅंडवीच घेऊ?? 

गाथा : चालेल..

शौर्य दोघांसाठी सॅंडवीच ऑर्डर करतो..

बाजुलाच ज्यूस सेंटर असत.. तिथुन दोघांनासाठी ज्युस घेऊन येतो..

थेंक्स.. बट खरच मला ह्याची गरज होती.. शौर्यच्या हातातील ज्यूसचा ग्लास स्वतःच्या हातात धरतच गाथा त्याला बोलते..

शौर्य : वेलकम...

तोपर्यंत सॅंडवीच पण येत दोघांच..

शौर्य कसा बसा एक सॅंडवीचचा पिस संपवतो.. आणि मोबाईलमध्ये काही तरी करत बसतो..

गाथा : तु खात का नाहीस??

शौर्य : असच..

गाथा : आवडलं नाही का?? 

शौर्य : तस नाही ग..  प्लिज तु घे ना ह्यातलं..

गाथा : पण तु का खात नाहीस ते..

शौर्य : ते मी जस्ट लंच करूनच निघालेलो.. मला भूक नाही.

गाथा : मगाशी तर बोललास की भुक लागलीय..

शौर्य : जर अस बोललो नसतो तर तु इथे सॅंडवीच खायला नसती आली.. अस उपाशी कस फिरवु तुला माझ्यासोबत.. शॉपिंगला खुप वेळ लागला तर..

शौर्य अस बोलताच गाथा शौर्यकडे बघतच रहाते.. 

शौर्य खिश्यातुन पैसे काढत सॅंडवीच वाल्याला देतो..

शौर्य : तुला अजुन काही हवंय का??

गाथाच शौर्यच्या बोलण्याकडे लक्षच नसत.. 

शौर्य : तुला काही हवंय का??

गाथाच्या डोळ्यांसमोर टिचकी वाजवतच शौर्य तिला विचारतो..

गाथा : नाही नको... थेंक्स..

शौर्य : निघुयात मग..

गाथा : हम्मम

शौर्य गाडी स्टार्ट करणार तोच शौर्यला विराजचा फोन येतो.. हातातील घड्याळात बघतो तर 4.30 झाले असतात..

शौर्य : हा विर बोल..

विराज : आम्ही दोघे पण येतोय शॉपिंगला..

शौर्य : क्या बात हे ब्रो.. काम एवढ्या लवकर झालं तुझं..??

विराज : हो.. तुम्ही लोक कुठे आहात??

शौर्य : गाथाच्या कॉलेज जवळच.. मी येऊ का तुम्हां दोघांना पिकअप करायला?? इथुन  जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिट्स लागतील..

विराज : ओके ये.. मग इथे जवळ असलेल्या मॉलमध्ये जाऊयात..

शौर्य : ओके आलोच..

विर आणि वहिनी पण येतेय शॉपिंगसाठी.. फोन ठेवल्या ठेवल्या शौर्य गाथाला सांगतो..

गाथा : ग्रेट.. म्हणजे शॉपिंग त्यांच्या मर्जीनुसार होईल..

शौर्य : हो ना.. बट तुझं कॉलेज आणि हा लग्नाचा गोंधळ तु कस मॅनेज करशील??

गाथा : माझी वेडनेस डे पासुन एक्साम आहे.. एक्साम संपली की व्हेकेशन..

शौर्य : मग ठिक आहे.. आणि बेस्ट ऑफ लक एक्सामसाठी...

गाथा : थेंक्स.. 

थोड्याच वेळात शौर्य विराजच्या ऑफिसजवळ पोहचतो पण.. विराज आणि अनघा ऑफिसच्या गेटजवळ त्याची वाट बघतच उभे असतात..

गाथा गाडीतुन बाहेर उतरत अनघा सोबत मागे बसते.. विराज गाथाच्या जागेवर जाऊन बसतो..

शौर्य : वहिनी मी तर 6 वाजतील अस गृहीत धरून होतो.. तु तर एक दिड तास आधीच ह्याला फ्री केलंस..

अनघा : विराजने नको ती काम उगाच वाढवून ठेवलेली.. तीच थोडी कमी केली... मग वेळ तर वाचणारच ना..

शौर्य : हम्मम..

चौघेही गप्पा गोष्टी करत मॉलमध्ये जाऊन प्रीवेडिंगसाठी लागणारे कॉश्च्युम खरेदी करतात.. 

विराज : आता बस झालं 9 वाजत आलेत..

अनघा : हो..न आम्हांला निघायला हवं.. घरी वाट बघत असतील..

विराज : मी सोडतो तुम्हांला.. चला

चौघेही गाडीत येऊन बसतात.. 

मी करतो ड्राइव्ह.. अस बोलत विराज ड्रायव्हर सीटवर बसतो..

तोच शौर्यला मोबाईलवर रॉबिनचा फोन येतो.. 

शौर्य : हा रॉबिन बोल.. डन करून टाक मग.. मी डेट तुला व्हाट्सएप करतो त्याच डेट ला हवंय.. ओके.. बाय...

एवढ बोलून शौर्य फोन ठेवुन देतो..

विराज : काय डन केलं..

शौर्य : DJ... हळदीला नाचायला नको का आम्हांला..

पुन्हा शौर्यचा फोन वाजतो.. ह्या वेळेला आयर्नचा असतो.. प्रिवेडिंग शूटच लोकेशन बाबत तो त्याला विचारत असतो..

शौर्य मागे गाथाकडे बघत तिला लोकेशन विचारतो..

गाथा : पुणे..

शौर्य लगेच आर्यनला गाथाने डीसाईड केलेलं लोकेशन सांगतो.. 

विराज : कोणाला सांगतोयस..??

शौर्य : अरे फोटोग्राफर आर्यनच्या ओळखीचा आहे.. त्याला सांगायला नको का.. तीन दिवसांनी आपण प्रीवेडिंग शुटला जातोय. तस फोटोग्राफर पण तैयारीत राहील..

अनघा : सगळ्या मित्र मंडळींना कामाला लावलस वाटत.

शौर्य : हो.. अश्या वेळेला मित्रमंडळीच कामाला येतात.. 

अनघा : छान आहेत मग मित्रमंडळी तुझी.. मदतीला तैयारच असतात..

शौर्य : हम्मम..

शॉपिंगकरून चौघेही दमली असतात.. विराज शांतपणे गाडी ड्राइव्ह करत असतो.. अनघा आणि गाथा खिडकी बाहेर बघत बसले असतात.. शौर्यच मोबाईलमध्ये वेगळं काम चालु असत..

विराज गाडीतील म्युसिक सिस्टिमध्ये FM लावतो... 

(रेड FM 98.3 मिरची सुनने वाले इज अलवेज खुश...)

शौर्य : ट्राफिक आहे यार खुप..

विराज : हम्मम.. ह्यावेळेला असतोच इथे ट्राफिक..

तोच FM वर शौर्यच आवडीच गाणं लागत.. कदाचित जवळपास दोन अडीच वर्षानी तो ते गाणं ऐकतो.. गाण्याची सुरुवात होताच शौर्य एक टक FM कडे बघत राहतो..

हम्मम हम्म्म हम्ममम
तुझसे ही तो मिली है राहत....
तू ही तो मेरी है चाहत.....
तुझसे ही तो जुडी ज़िन्दगी....

असच गाडी ड्राइव्ह करताना त्याने हे गाणं समीरासाठी गाईल असत ते सगळं त्याला आठवत.. त्यांनतर मनवीच्या घरी हातात गिटार घेऊनसुद्धा तो तिच्यासाठी हेच गाणं बोललेला.. सगळे दिवस पुन्हा त्याच्या नजरेसमोरून येऊ लागले.. ते पुन्हा नको आठवायला म्हणुन तो लगेच FM बंद करून टाकतो..

विराज : राहू दे ना.. छान गाणं आहे..

विराज पुन्हा FM चालु करत बोलतो..

शौर्य काहीही न बोलता म्युसिक सिस्टीम परत बंद करतो..

विराज : काय करतोयस..?

शौर्य : प्लिज बंद राहु दे.. 

शौर्य डोकं धरतच त्याला बोलतो...

अनघा : तुला काही होतय का शौर्य..?

शौर्य : कुठे काय.. 

अनघा : नक्की ना??

शौर्य : हम्मम.. 

विराज अनघाच्या घराजवळ गाडी थांबवतो.. 

अनघा : बाय विराज.. शौर्य बाय..

अनघा दोघांना बाय करते.. विराज आणि शौर्य सुद्धा तिला बाय करतात..

गाथा : बाय जिजु

विराज : बाय.. गुड नाईट..

गाथा : बाय शौर्य आणि खुप खुप थेंक्स..

शौर्य : बाय पण थेंक्स कश्याबद्दल??

गाथा : असच... मला बोलवस वाटलं म्हणुन..

आपल्या बोलण्याने शौर्यला अस कोड्यात टाकुन गाथा तिथून निघुन जाते.. शौर्य ती दिसेनाशी होईपर्यंत तिच्याकडे बघतच रहातो..

विराज : गेली ती.. करू मी गाडी स्टार्ट..

शौर्य : काय बोलतोयस??

विराज : अनघा गेली अरे.. निघुयात का आपण इथुन?? अस विचारतोय मी तुला..

शौर्य : ड्राइव्ह तु करतोयस ना मग मला का विचारतोस..??

विराज : अस भडकतोस का?

शौर्य : मी भडकत नाही सांगतोय तुला.. आणि उद्या इव्हीनिंगला जाऊयात आपण वाहिणीसाठी गिफ्ट घ्यायला आज नको.. 

विराज : तुझी तब्येत ठिक आहे ना... आणि मगाशी गाणं का बंद करत होतास सारख..

शौर्य डोळे मिटुन शांत बसतो..

विराज : काय होतय शौर्य??

शौर्य : झोप येतेय..

विराज : आय नो तु दमला आहेस पण तु गाणं का बंद केलंस ते सांग.

शौर्य : विर मी प्रत्येक गोष्ट नाही सांगु शकत तुला.. 

विराज पण शौर्यला जास्त फोर्स नाही करत तो शांतपणे गाडी ड्राइव्ह करत असतो..

★★★★★

इथे दिल्लीवाले मित्रमंडळी गोव्याला बिचच्या किनारी शांत बसून असतात..

रोहन : जवळपास दोन वर्षांनी आपण अस मनमोकळे पणाने हसलो असु ना.. म्हणजे मी तरी आजच मनसोक्त हसतोय

राज : मी पण.. आणि तसही आपण शौर्य गेल्यानंतर पहिल्यांदाच अस बाहेर आलोय फिरायला..

समीरा : हम्मम.. तसही आज तर पहिलाच दिवस होता.. अजुन पूर्ण आठवडा बाकी आहे.. आपण खुप धम्माल करू

वृषभ : पण आपलं काश्मीर जायच राहूनच गेलं ना..

टॉनी : इथुन जाऊयात ना..

समीरा : मला चालेल.. मला तसही घरी जायला बॉर होत.. . 

सीमा : मला पण.. 

वृषभ : आधी गोवा एन्जॉय करू मग बघु..

सगळेच वृषभच्या बोलण्यावर आपली संमत्ती दर्शवतात..

★★★★★

शौर्य रात्री विराजच्या रूममध्ये जातो.. विराज हातात मोबाईल घेऊन असतो..

शौर्य : विर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच नाही बसत. तु चक्क आज मोबाईल घेऊन बसलायस?? आज सूर्य नक्की कुठुन उगवलेला??

विराज : डायलॉग बस कर.. 

This is for you.. अस बोलत आपल्या हातातील एनवलोप शौर्य विराजच्या हातात देतो..

विराज : काय आहे हे??

शौर्य : सरप्राईज... 

(काय सरप्राईज असेल शौर्यने दिलेल्या एनवलोप मध्ये?? guess तर करूच शकता.. आणि आजच्या भागातुन कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा माझा मुळीच हेतु नाही..  हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.. प्रतिक्षा करा पुढील भागाची)

टिप :(ईराच्या फेसबुक पेजवर कथा पब्लिश होते त्या वेळेस मला त्याचे नोटिफिकेशन मिळत नाही.. त्यामुळे काही वेळेस तुम्हां लोकांच्या कमेंट्सचे रिप्लाय द्यायला मला नाही जमत.. कृपया सहकार्य करावे..)


क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all