अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 63

In marathi

शौर्य, गाथा आणि अनघा तिघेही पटापट दुपारच जेवण आटोपुन गाडीत बसुन रिसॉर्टला येतात..

शौर्य रिसॉर्टच्या भोवताली असणार हिरवळ अस गार्डन बघत रहातो..

शौर्य : इथे रिसेप्शन ठेवु शकतो आपण.. खूप मस्त निसर्ग आहे हा.. हिरवळ अस गार्डन, बाजूने असलेलं निळसर अस पाणी.. मध्येच असलेला तो फाउंटन..

गाथा : हो म्हणजे रिसेप्शन साठी हे लोकेशन छानच आहे.. आणि त्या तिथे आपण हळद ठेवुयात.. हळद ही पारंपरिक पद्धतीची असणार.. हळद कुटणार.. दळणार... परत बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आपण तिथे करू शकतो.. म्हणजे अस हिरवळ अश्या निसर्गाच्या सानिध्यात आपण हळद केली की थोडं गावी असल्याचा फील येईल..

शौर्य गाथाकडे बघतच रहातो.. 

अनघा : विराज फोन करतोय.. मी आलेच..

अनघा थोडं बाजुला जाऊन विराजसोबत फोनवर बोलते..

गाथा : तुझं काही वेगळं प्लॅनिंग असेल तर सांग??.. आपण तस पण करूयात..

शौर्य : आपण आधी ह्या दोघांच प्रिवेडिंग शूटच डीसाईड करुयात??

गाथा : बट जिजूंना वेळ नाही ना.. म्हणजे दि बोलली मला तस..

शौर्य : ते मी बघतो.. तुला जर वेळ असेल तर आपण शॉपिंगसाठी जाऊयात.. ह्यांच्या प्रीवेडिंग शुटसाठी कॉस्च्युम लागतील ते आपण घेऊयात.. फोटोग्राफर आहे माझ्या ओळखीचा.. फक्त तु अशीच छानसी प्लेस डीसाईड कर.. हा शनिवार रविवार आपण प्रीवेडिंग शुट डन करूयात.. म्हणजे एक काम तरी होईल..

गाथा : ओके.. ते दि ला वि विचारून सांगते मी तुला.. पण तुला आवडला का हा रिसॉर्ट?? का दुसरा कोणता तरी बघुयात??

शौर्य : दुसरा नको.. हाच छान आहे.. म्हणजे मी जस मनात विचार करून रचलेला अगदी तसाच आहे.. नाही त्या पेक्षा पण छान आहे.. मला तर खुप आवडला.. मुळात दोन गार्डनच्या मधोमध असलेला हा फाउंटन खुप मस्त वाटतो.. एन्ट्रन्सला आपण फुलांनी सजवलेला गेट लाऊयात.. दोघेही जेव्हा स्टेजवर एन्ट्री करतील तेव्हा इथुनच करायला हवी.. मस्त वाटेल.. तसही रिसेप्शन रात्रीच असणार ना... आत जाऊन एकदा हॉल पण बघुयात.. संगितचा प्रोग्राम आपण आत ठेवुयात.. 

(गाथा शौर्यकडे बघतच रहाते) 

तु अस का बघतेयस माझ्याकडे.. हे बघ तु जर वेगळं काही ठरवलं असशील तर आपण तस करूयात.

गाथा :  तु सगळ मी ठरवलेलंच बोलतोयस.. मी पण असच ठरवलेलं.. फुलांचा गेट.. त्यावर हार्टशेप मध्ये दोघांची नावं.. आणि त्यांचा जो एंगेजमेंटचा पिक असेलना एकमेकांच्या हातात अंगठी घातलेला तो आपण गेटवर बरोबर मधोमध लावूयात.. दोघांच्या प्रीवेडिंगचा टीजर असेल ना तो लग्नाच्या वेळेस आणि रिसेप्शनच्या वेळेला आपण जे हॉलवर जे मध्यम असे होम थेअटर असतील ना त्यावर दाखवायचा.. आणि खुप काही प्लॅन आहे माझं.. म्हणजे माझ्या दि च लग्न मला थोडं हटके करायच.. अस कोणीच कोणाच्या बहिणीच केलं नसेल अस..

गाथा अस बोलताच शौर्य तिच्याकडे बघतच रहातो..

अनघा : आवडतोय का हा रिसॉर्ट.. विराजचा फोन होता.. तो बोलतोय की जर आवडत असेल तर एडवांस देऊन बुक करून टाका.. शौर्यला पसंत असेल तर मला पण पसंत.. अस विराजच म्हणणं आहे..

शौर्य : मला तर आवडला.. फक्त एकदा आतला हॉल बघुयात.. मग फायनलाईज करूयात..

तिघेही आत हॉल बघायला जातात.. 

शौर्य : मला अस वाटत की हाच रिसॉर्ट फायनलाईज करूयात.. डेट काय ठरवलीय वेडिंगची..??

अनघा : विराजला वेडिंग ही 10th लाच हवीय.. कारण त्याच्या लाईफमध्ये असलेल्या स्पेसिअल अश्या पर्सनचा बर्थडे असतो..

गाथा : मस्त.. मग 3rd टु 11th  करूयात बुक.. दोन तीन दिवस थोडं आधी डेकोरेशन वैगेरे करावं लागेलना म्हणुन..

अनघा : चालेल ना शौर्य तुला..

शौर्य : हम्मम्म्म.. मला चालेल..

फायनली गाथा ने निवडलेला रिसॉर्ट शौर्य आणि अनघा फायनलाईज करतात.. आणि तिथुन घरी जायला निघतात..

शौर्य : हे वहिनी हा सेटरडे आणि सँडे आपण प्रीवेडिंग शुटला जातोय..

अनघा : विराजला तर वेळ नाही ना.. प्लिज उगाच नको प्रेशराईज करायला त्याला..

शौर्य : ते मी बघतो ग.. तस पण तु उद्या पासुन जाशीलच ना त्याला मदत करायला.

अनघा : तरी पण. शॉपिंग वैगेरे

गाथा : ते आम्ही दोघे उद्या जाऊन बघतो शॉपिंगच... दि तुझी चॉईज तशी पण मला कळते. तु फक्त जिजूंना कामातून फ्री कर बस.. 

शौर्य : हो न.. बघावं तेव्हा काम नि काम.. तु त्याला त्यातुन बाहेर काढ.. बाकी सगळं आम्ही दोघ मिळुन बघतो.. 

अनघा : ओके.. मी प्रयत्न करते..

शौर्य : ग्रेट.. मी तुम्हा दोघींना घरी सोडतो आणि मग वेडिंग कार्ड चॉईज करायला जातो..  तुम्हा लोकांच झालं का वेडिंग कार्ड चॉईज करून???

अनघा : आमचं ते सगळं तर पप्पाच बघतील..

शौर्य : हम्म.. एकदा मला कोणत्यादिवशी कोणते फंक्शन असतील ते सांगा विथ टायमिंग.. मी घरी मम्माला विचारतो.. एकदा का ते फायनल झालं की तस कार्ड पण प्रिंटिंगसाठी देता येतील..

अनघा : आम्ही घरी जाऊन पप्पा मम्मीशी बोलुन काय ते डीसाईड करतो आणि मग तुला रात्री पर्यंत कळवतो.. चालेल??

शौर्य : ओके.. ए वहिनी विर आणि तु एंगेमेंटला एक छानसा डान्स पण करा...

अनघा : हे जरा जास्तच होतय..

गाथा : काही जास्त वैगेरे होत नाही... प्लिज हा दि.. तुम्ही दोघ डान्स करतायत.. मला नाही माहीत काही..

अनघा : बघु.

शौर्य : ए वहिनी कमऑन ग.. हे बघु काय असत??

अनघा : बघु म्हणजे.. लेट्स सी..

अनघा अस बोलताच शौर्य हसु लागतो.. आणि सोबत अनघासुद्धा..

गाथाला मात्र ते दोघे का हसतात ते कळतच नाही..

गाथा : तुम्ही असे हसता का??

अनघा : ते आम्हां दोघांच सिक्रेट आहे.. काय शौर्य..??

शौर्य : हम्मम.. बाय दि वे गाथा माझ्याकडे तुझा नंबर नाही आहे.. आपण कुठे भेटणार उद्या..?? 

मी दि कडुन तुझा नंबर घेते नि रात्रीपर्यंत तुला मेसेज करते.. ओके..

शौर्य : ओके..

शौर्य दोघींना त्यांच्या घराजवळ सोडतो आणि तिथुन पुढे वेडिंग कार्डची डिजाईन फायनलाईज करायला जातो.. डिजाईन फायनलाईज होताच सरळ घरी यायला निघतो.. त्याच्या मित्राकडुन फोटोग्राफरचा नंबर घेऊन त्याच्याशी बोलतच तो घरी येतो.. डायनींग टेबलवर त्याची मम्मा लॅपटॉप घेऊन बसली असते.. 

शौर्यला ती हात दाखवतच तिथे थांबवते..

मी नंतर फोन करतो अस बोलुन शौर्य फोन ठेवुन देतो..

मम्मा तु आज लवकर...??शौर्य हातातील घड्याळात बघतच तिला बोलतो..

अनिता : मला बोलायचय तुझ्याशी बस इथे..

शौर्य : काय झालं?? 

अनिता : तु काल कुठे होतास??

शौर्य : कुठे म्हणजे.. मित्रांबरोबर होतो.. आणि तुला वाटतय तस काही करत नव्हतो.. 

अनिता : नक्की??

शौर्य : हम्मम.. आणि माझं पण काम होत तुझ्याकडे..

अनिता : बोल..

शौर्य : विरच्या लग्नाची तैयारी कुठपर्यंत आलीय??

अनिता : ते तु त्यालाच विचार न.. त्याला हवं तसं त्याला लग्न करू दे.. काही हेल्प हवी असेल तर मी मदत करेल.. आणि मला कामाच्या गडबडीत नाही वेळ देता येत ह्या गोष्टीकडे..

शौर्य : त्याच्या लग्नासाठी तरी सुट्टी काढलीयस ना मम्मा तु?? का तेव्हा पण तुला कुठे बिजीनेस मिटिंग आहे...

अनिता : तुला बोलायच काय आहे..??

शौर्य : तुझ्या सगळ्याच जबाबदाऱ्या त्याच्यावर टाकुन अगदी मोकळी होतेस तु.. तु समजतेस तेवढा मोठा नाही झालाय ग तो.. का अस वागतेस तु..? माझ्यासोबत तर आत्तापर्यंत असच वागत आलीस.. आता विर सोबत पण असच वागतेस तु.. हेच जर माझं लग्न असत तरी तु असच वागली असतीस..?? म्हणजे माझ्यावर सगळं सोपवुन असा लॅपटॉप घेऊन इथे बसली असतीस का?? काय माहित पण मला अस वाटत ना तु असच वागली असतीस..  तुझा काही भरोसा नाही.. तु कधी काहीही करू शकतेस.. नुसत काम नि काम करत राहतेस.. काय करणार आहेस एवढा पैसा कमवून तु?? कोणासाठी करतेस एवढं??

अनिता : तुला बोलायच काय आहे शौर्य.. विरसाठी मी काहीच नाही करत??

शौर्य : करतेस ना.. मी कुठे नाही बोलतोय.. पण आता काय केलंस ते सांग?? दोन महिन्यांवर लग्न आहे त्याच.. तु हॉल बघायला गेलीस त्याच्यासोबत?? किती पाहुणे मंडळी येणार, कोणा कोणाला इनविटेशन द्यायच?? ते डिस्कस केलंस त्याच्यासोबत?? किती खर्च लागेल.. विरकडे पैसे असतील का?? तु विचार केलास ह्या गोष्टीचा?? लग्नाच्या पद्धती वैगेरे पण त्याला माहिती नाही.. तो काय करणार आहे मम्मा?? आणि तु सगळंच त्याच्यावर टाकुन मोकळी होतेस.. अस वागुण तु त्याची सावत्र आई आहेस हे त्याला दाखवुन देतेयस.. तो तुला बोलायला नाही येणार की मला मदत कर.. कारण त्याला तुला त्रास द्यायला नाही आवडणार.. पण एक आई म्हणुन तुझं कर्तव्य आहे की तु त्याला जाऊन विचारावं.. मुळात विचारायची पण गरज नाही.. उलट तु तर तैयारीला लागायला हवं.. तस पण तुमच्या कुलकर्णी घराण्यातील हे पहिलंच लग्न असेल मम्मा...

अनिता :  मला कामाच्या गडबडीत नाही लक्षात आलं हे आणि मी खरच एवढा विचार ही नाही केला..

शौर्य : मग आत्ता कर .. अग मम्मा तो माझ्यासाठी त्याचा बिजीनेस बाजुला ठेवुन एक महिना USA ला येऊ शकतो मग तु का नाही त्याच्यासाठी तुझा बिजीनेस बाजुला ठेवु शकत.. आज जो मी असा तुझ्या समोर आहे ना तो फक्त नि फक्त विर मुळे.. त्याच्या लग्नासाठी तुला वेळ काढायला नाही जमत आहे?? आणि मुळात एवढा पैसा काय कामाचा ज्याच्यामुळे तुला तुझ्या मुलांना वेळ देता येत नाही. बघावं तेव्हा नुसतं लॅपटॉप आणि तु.. दुसर काही येत का ग तुला?? 

अनिता : तु जरा जास्तच बोलतोयस शौर्य.. आणि हे सगळं मी कोणासाठी करतेय?? तुझ्यासाठीच ना..

शौर्य : माझ्यासाठी?? सॉरी मम्मा पण मला तुझ्या ह्या बिजीनेसमध्येना इंटरेसच नाही.. जो आपल्या परिवाराला कधी टाईम देऊ शकत नाही अस प्रोफेशन मला निवडायचंच नाही मम्मा.. मी तुझं प्रेम मिस केलंस ह्या तुझ्या स्टूपिड अश्या बिजीनेसमुळे.. मम्मा असुन पण बिन मम्माच जीवन जगत आलोय मी तुझ्या ह्या बिजीनेसमुळे. कधी स्कुलमधली पेरेन्ट्स मिटींग पण तु अटेंड करायला नाही आलीस.. फक्त माझ्या कम्प्लेन्टि आल्यावर मात्र दुसऱ्यादिवशी शाळेत हजर रहायचीस का कारण तुला तुझ्या कामावरच फस्ट्रेशन माझ्यावर काढायच असायचं.. मम्मा म्हणुन काय केलंस तु माझ्यासाठी?? प्रत्येक गोष्टीत तुझा स्वार्थ असतो.. आणि आता पण तेच करतेयस.. 

अनिता : शौर्य.. बस कर हा.. खुप बोलतोयस तु..

शौर्य : का बस करू मी.. आणि मी बोलणार आज.. लहानपणापासून तुझं हे वागणं सहन करत आलोय. आपल्या माणसांसाठी वेळ काढायला आणि द्यायला शिक मम्मा.. आई फक्त नावाला नको बनुस कर्तव्य पण कर.. जाऊ दे सोड तुझ्याने नाही जमणार कोणतीच गोष्ट.. तु बिजीनेसच सांभाळ.. 10th मे ला लग्न आहे माझ्या भावाच.. वेळात वेळ काढुन अक्षता टाकायला तरी ये.. बर वाटेल मला..

एवढं बोलुन शौर्य सरळ आपल्या रूममध्ये निघुन जातो.. अनिता तिथेच बसुन शौर्यच्या बोलण्याचा विचार करू लागते. शौर्यच्या बोलण्याने ती खुप हर्ट झाली असते.. डोळ्यांतुन तिच्या पाणी येत असत असते.. 

थोड्याच वेळात विर पण तिथे येतो.. 

विराज : मम्मा आज तु पण लवकर आलीस??

अनिताच विराज आला ह्याकडे लक्षच नसत.. 

विराज : तु रडतेयस??? काय झालं??

विराज डायनींग टेबलवरील ग्लासमधून तिला पाणी देतो..

विराज : काय झालं मम्मा?? तु अस रडतेयस का???

अनिता : तु कधी एवढा मोठा झालास तेच कळल नाही मला.. दोन महिन्यांनी लग्न आहे तुझ.. आणि मी मात्र माझं काम घेऊन बसलीय.. 

विराज : इट्स ओके मम्मा.. तु नको वाईट वाटुन घेऊस.. आय नो तु बिजी आहेस.. शौर्य आहेना माझ्या मदतीला..

अनिता : तरीही विर.. दोन महिन्यात कस काय मॅनेज करायच ते बघायला हवं ना.. मी आपले जेवढे पावणे मंडळी आहेत त्यांची यादी करायला घेते..  रीतसर इंनव्हीटेशन त्यांच्या घरी जायला हवी.. ती जबाबदारी माझी. उद्या भटजी काका येतील.. त्यांच्याशी आपण विधी विषयी बोलुन घेऊयात.. बाकीच बघायला शौर्य आहेच.. माझ्या मोठ्या मुलाच लग्न आहे.. थाटामाटात झालं पाहिजे.. काय??

विराज हसतच अनिताला मिठी मारतो...

अनिता : दमुन आला असशील.. फ्रेश हो..

विराज फ्रेश होण्यासाठी रूममध्ये जातो.. आणि अनिता शौर्यच्या रूममध्ये जाते..

शौर्य लॅपटॉपमध्ये काहीतरी करत बसला असतो..

अनिता : शौर्य मला बोलायचय तुझ्याशी..

शौर्य : सॉरी.. मी जास्तच बोललो..

अनिता : तुला सारख अस का वाटत की मी तुला वेळ नाही देत?? सावत्र आई काय असते हे चांगलंच अनुभवलंय मी शौर्य.. विराजच्या बाबतीत तस नको व्हायला म्हणून त्याच्याकडे थोडं जास्त लक्ष देते.. तुझ्यावर जस हक्काने रागवु शकते तस त्याच्यावर रागवायला मला भिती वाटते शौर्य.. कारण तो लांब जाईल माझ्यापासुन..

शौर्य : आणि मी??

अनिता : माझं माझ्या दोन्ही मुलांवर समान प्रेम आहे शौर्य.. बिजीनेस वरून पण तु सारखच मला बोलतोस.. पण ह्यापुढे हा बिजीनेस तुलाच सांभाळायचाय एवढं लक्षात ठेव.. 

शौर्य : मला नाही इंनटरेस्ट त्यात..

अनिता : शेखरच तेच स्वप्न होत तस..

शौर्य : जर बाबा आता असताना आणि त्याला मी बोललो असतो मला नाही ह्या बिजीनेसमध्ये इंटरेस्ट तर त्याने मला फोर्स नसता केला जसा तु करतेयस.. 

अनिता : तुझ्या बाबाने उभारलेला बिजीनेस मी तुझ्याच हातात सोपवणार.. नंतर तुला हवं ते कर.. कंपनी सांभाळ.. नाही सांभाळता आली तर सरळ विकुन टाक.. तो तुझा डिसीजन असेल.. I don't care.. आणि प्लिज ह्या गोष्टीवरून इस्यु नको क्रिएट करुस.. विरच लग्न आहे.. घरात थोडं हसत खेळत वातावरण राहु दे. मी माझा हा लॅपटॉप दोन महिने थोडा बाजुला ठेवुन देतेय.. ओके.. आपल्याला तैयारीला लागायला हवं.. मी पाहुण्यांची लिस्ट काढायला घेते... मला जेवढं जमेल तिथे मी जाईल कार्ड घेऊन. बाकी ठिकाणी तुला जावं लागेल.. एवढं तर तु विर साठी करूच शकतोस ना??

शौर्य : हम्मम्म... मम्मा आम्ही रिसॉर्ट बुक केलाय.. लग्नासाठी.. सगळे फंक्शन तिथेच होतील..

अनिता : गुड... आणि वेडिंग कार्ड??

शौर्य : आज डिजाईन सिलेक्ट केलीय मी.. एकदा कोणत्यादिवशी कोणते फंक्शन असतील हे ठरलं तर मग ते पण आपण लगेच प्रिंटिंगला देऊयात.. दोन दिवसात ते येतील..

अनिता : मग आपण सगळे मिळुन गावी जाऊन आधी कुलदैवतापुढे पत्रिका ठेवुन येऊयात.. मग कार्ड वाटायला घेऊयात.. आज आपण दोघे मिळुन पाहुण्यांची लिस्ट बनवायला घेऊयात.. आणि सोबतच सामानाची यादी.. म्हणजे एक काम आजच होऊन जाईल..

अनिता आणि शौर्य दोघेही मिळुन शौर्यच्याच रूममध्ये बसुन सामानाची आणि पाहुण्यांची यादी बनवु..

शौर्य : मम्मा मला थोडे पैसे पण लागतील.. उद्या मी आणि गाथा विरच्या प्रिवेडिंग शुटसाठी शॉपिंगला चाललोय.. 

अनिता : गाथा??

शौर्य : विहिणीची लहान बहीण आहे ग.. ती आणि मी दोघे चाललोय शॉपिंगला.. मला विरकडे सारखे सारखे पैसे मागायला नाही आवडत.. 

अनिता : क्रेडिट कार्ड देते मी तुला.. आणि ह्यापुढे माझ्याकडुनच पैसे घेत जा.. 

शौर्य : ओके..

शौर्य आणि अनिता मिळुन विराजच्या लग्नाच्या तैयारीला लागले. जेवनाचा टायमिंग होऊन जातो तरी दोघे लिस्ट काढण्यात व्यस्त असतात.. अजुन दोघेही जेवायला आले नाही म्हणुन विराज दोघांना शोधत शौर्यच्या रूममध्ये येतो..

शौर्य : मम्मा किती पावणे आहेत ग अजुन.. मला झोप यायला लागलीय..

तेवढ्यात विराज पण शौर्यच्या रूममध्ये येतो..

विराज : काय करताय तुम्ही लोक..?? 

शौर्य : बर झालं विर तु आलास.. नाव लिहुन माझा हात दुखायला लागला.. तु बस इथेच.. आणि हा घे पेन..

विराज : कसली नाव लिहिताय..

अनिता : लग्नात कोणाला बोलवायचं ते नको का बघायला.. तस मान पान पण बघायला लागेल ना.. काही ठिकाणी शौर्य जाईल पत्रिका घेऊन काही ठिकाणी मी.. आम्ही तेच बघतोय कोण कोणत्या लोकेशनला जाईल..

विराज : जेवुन घेऊयात.. मग बसुयात हवं तर मी पण मदत करतो..

अनिता : बर चालेल.. 

तिघेही जेवुन येतात..आणि पुन्हा कामाला लागतात..

मम्मा आपल्या लग्नात एवढ इंनटरेस्ट घेतेय हे बघुन विराज खुश असतो.. दिवसभरचा त्याचा थकवा कुठे तरी निघुन गेला असतो..

विराज आणि अनिता मिळुन एक एक नाव आणि त्या सोबतच एड्रेस शौर्यला सांगत असतात.. शौर्य नॉटडाऊन करत असतो..  

तोच त्याचा फोन वाजतो. फोन विराज जवळच असतो..

शौर्य : कोणाचा आहे??

विराज : अननॉन नंबर..

शौर्य हातात पेन असल्यामुळे फोन उचलून आपल्या खांद्याला बेलन्स करत कानापाशी धरतो.. एका हाताने पेज पकडत दुसऱ्या हाताने विराजने सांगितलेला एड्रेस लिहीत असतो..

हॅलो..(शौर्य दमलेल्या सुरातच बोलतो)

हॅलो.. शौर्य.. गाथा हिअर.. तु फ्री आहेस का आता..??

गाथाचा आवाज ऐकताच शौर्य थोडं बाचकतो.. कानाला लावलेला त्याचा फोन बेडवरच पडतो..

विराज : काय करतोयस..?? कोणाचा फोन आहे??

शौर्य विराजच्या प्रश्नाच उत्तर न देता उठुन सरळ गेलरीत जातो..

अनिता आणि विराज त्याच्याकडे बघतच रहातात.

शौर्य : हो मी फ्रीच आहे.. बोलणं..

गाथा : मी तुला ह्या नंबरवर लिस्ट पाठवलीय फंक्शनची.. आणि वेळ पण बाजुलाच मेन्शन केलीय.. ओके.. एकदा प्लिज बघून घे. तुझ्या घरी पण विचार टायमिंग ओके आहे का.. आणि काही चेंजेस असतील तर मला कळव तस.. म्हणजे घरी सांगायला.. आणि उद्या आपण माझं कॉलेज सुटलं की शॉपिंगला गेलं तर चालेल का?? का सुट्टी घेऊ??

शौर्य : नाही सुट्टी नको.. कॉलेज सुटल्यावरच जाऊयात. तस पण मॉर्निंगला मला खुप कामं आहेत.. मला तुझ्या कॉलेजचा एड्रेस व्हाट्सएप कर मी तुला तिथुन पीक अप करतो.. ओके.

गाथा : ओके चालेल.. पण तु आठवणीने मला एकदा फंक्शनची लिस्ट बघुन कन्फर्मेशन दे.. म्हणजे पप्पा उद्याच पत्रिका छापायला देतील..

शौर्य : ओके मी मम्माला दाखवुन लगेच मेसेज करतो तुला..

गाथा : बर... मी वाट बघते तुझ्या रिप्लायची. बाय..

शौर्य : हम्मम बाय.

शौर्य व्हाट्सएपवर गाथाने सेंट केलेला मेसेज बघतो.. पण मेसेज ओपन करण्याआधी तो तिने ठेवलेला तिचा डीपी ओपन करून बघतो..

अनिता : शरु तुझं फोनवर बोलुन झालं असेल तर प्लिज इथे येऊन बस..

शौर्य : अग मम्मा ते फंक्शनची लिस्ट पाठवली आहे.. तु एकदा चेक कर तस कन्फर्मेशन द्यायला त्या लोकांना..

शौर्य फोन अनिताकडे देतो..

विराज : कोणाचा फोन होता??

शौर्य : गाथाचा...

विराज एक संशयभरी नजरने शौर्यकडे बघतो... शौर्य त्याला आपली मान हलकीच अशी  वर करत इशाऱ्यानेच काय झालं म्हणुन विचारतो..

विराज मानेनेच काही नाही बोलतो..

शौर्य : मम्मा ओके आहे??

अनिता : लग्न एव्हीनींगला ठेवलय??

शौर्य : का काय झालं त्यात??

अनिता : उद्या भटजी काका येतील तेव्हा त्यांना मुहुर्त विचारून कळवु टायमिंग अस सांग..

शौर्य : ओके... आणि बाकीचे टायमिंग??

अनिता : ते राहु देत..

शौर्य : विर सेटरडे आणि सँडे आपण प्रिवेडिंग शुटला जातोय.. तु तैयार रहा..

विराज : काय?? हे कधी ठरलं

शौर्य : आजच..

विराज : आणि कोणी ठरवलं??

शौर्य : अजुन कोण ठरवणार विर.. मीच.. अस काय करतोस...

विराज : शौर्य मला अजिबात वेळ नाही आहे.. मला नाही जमणार..

अनिता : एवढं काय काम आहे तुझं.?? मला सांग.. मी करते.. पण प्रिवेडिंगला जातोयस तु..

विराज : अग मम्मा पण. 

शौर्य : पण काय.. तुला फक्त गाडीत बसायचय.. आम्हीच ठरवलेल्या जागेवर जाऊन थोडी स्माईल द्यायचीय.. थोडं वहिनिच्या मागे पळायचा.. तिला उचलुन वैगेरे घ्यायला सांगितलं तर ते करायचंय.. बस.. बाकी सगळं आम्ही बघु.. 

शौर्य अस बोलताच अनिता विराजकडे बघुन हसु लागते..

विराज : मला हे सगळं नाही जमणार..

शौर्य : ए विर यार कमऑन.. मी आहे ना सोबत..

विराज : म्हणूनच तर नाही जमणार.. प्लिज हे प्रीवेडिंग वैगेरे नको..

शौर्य : एक मिनिट मी तुला विचारत नाही सांगतोय.. आपण सेटरडेला सकाळीच निघतोय.. आणि अजुन एक हा पेन धर..  आणि ही बुक.. मम्मा सांगतेय ती नाव लिही आणि एड्रेस लिही गप्प.. माझा हात दुखतोय आत्ता.. आणि रात्री जमल्यास हात दाबुन दे माझा.. इट्स माय ऑर्डर विर..

विराज : तु थांब तुझा आत्ताच हात दाबुन देतो.. दे इथे..

शौर्य : ए विर अस काय करतोयस.. खरच हात दुखतोय..

दे ना मग इथे.. खुप ऑर्डर सोडायला लागलायस तु.. अस बोलत विराज शौर्यला पकडायला शौर्यच्या मागे पळु लागला.. शौर्य अनिताच्या मागे बेडवर चढुन त्याच्यापासुन स्वतःला वाचवु लागला..

अनिताला दोघांना अस लहानमुलासारखं मस्ती करताना बघुन हसु यायला लागत..

अनिता : शरू बस... सामानाची यादी लिहायला घे आता..

विराज : दे मी लिहितो.. त्याचा हात दुखला असेल..

शौर्य : राहु दे लिहितो मी.. 

(शौर्य मोबाईलमध्ये गाथाला त्याच्या मम्माने सांगितलेला मेसेज सेंट करतच विराजला बोलतो)

अनिता त्याला एक एक वस्तूंची नाव सांगु लागले.. शौर्य सगळी नाव वहीत उतरवु लागला.. आणि मध्येच मोबाईलमध्ये काही तरी बघत असतो..

विराज : मम्मा ते नवी मुंबईत पण डॅडची कजिन रहाते.. तीचा एड्रेस किंवा कोंटेक्ट नंबर असेल ना तुझ्याकडे??

अनिता : हो.. नंबर मोबाईलमध्ये असेल..

अनिता आणि विराज दोघे मिळुन मोबाईलमध्ये नंबर शोधु लागले..

अनिता : शरु हा एक नंबर आणि नाव लिहुन घे.. (अनिता नंबर सांगु लागते..) लिहिलास का??

शौर्यचा काहीच रिस्पॉन्स येत नाही.. शौर्य हातात पेन पकडत.. बुकवर डोकं ठेवुन असतो..

झोपला की काय हा?? अनिता शौर्यकडे बघतच बोलते..

विराज : हम्मम.. दमलाय खुप तो.. आज सकाळी मी पण जबरदस्ती त्याला उठवुन हॉल बघायला घेऊन गेलेलो.. झोपु दे त्याला मी लिहितो..

विराज हळूच त्याच्या हातातलं पेन आणि बुक काढतो.. आणि बाकीची सगळी यादी स्वतः लिहायला घेतो..

सगळं होताच अनिता आणि विराज आपल्या रूममध्ये जायला निघतात.. तोच विराजच लक्ष शौर्यच्या हाताखाली असलेल्या शौर्यच्या मोबाईलकडे जात.. शौर्यचा मोबाईल उचलून विराज बाजूला असलेल्या टेबलवर ठेवायला जातो तस गाथाचा व्हाट्सएप वरचा प्रोफाइल फोटो ओपन होतो.. जो शौर्य गाथाला मेसेज करून बघत बसला होता..

विराज हसतच शौर्यच्या झोपेत दिसणाऱ्या इनोसेंट अश्या चेहऱ्याकडे बघत मोबाईल बाजुला टेबलवर ठेवत तिथून निघतो..

(खरंच शौर्य पुन्हा नव्याने कुणाच्या तरी प्रेमात पडला असेल?? पुढे कथा काय वळण घेईल?? पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all