अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 62

In marathi

अनघा गाडीत येऊन रागातच गाथाकडे बघते..

गाथा : सॉरी दि.. 

अनघा : विराज आपण शौर्यचा राग शांत झाला की मगच हॉलच काही तरी डीसाईड करूयात.. आम्ही इथुनच आमच्या घरी जातो.. आणि अजुन एक विराज.. तो तुझं नेहमीच ऐकुन घेतो म्हणुन एवढं पण नको वाईट वागुस त्याच्यासोबत.. आपण आपल्या भावाला काय बोलतो?? कोणाच्या पुढ्यात बोलतो?? हे तरी बघ जर.. शौर्य सोबतअस वागून तु त्याला लांब करशील स्वतःपासून.. आणि तो लांब गेला तुझ्यापासुन तेव्हा तुला त्याची किंमत कळेल.. प्लिज अस होऊ नको देऊस.. 

अनघा आणि गाथा दोघीही गाडीतुन उतरून आपल्या घरी निघुन जातात..

विराज पण त्यांना अडवत नाही.. तो गाडी सरळ घराच्या दिशेने वळवतो..

घरी आल्या आल्या शौर्यच्या रूममध्ये शिरतो..

शौर्य डोळे मिटुन झोपला असतो..

विराज : शौर्य...

शौर्य : विर माझं डोकं खुप दुखतंय प्लिज मला झोपु दे.. आणि सॉरी वैगेरे बोलायला आला असशील तर त्याची काही गरज नाही..

विराज शौर्यचा डावा हात आपल्या हातात पकडत आपलं डोकं त्याच्या हातावर ठेवतो.. शौर्य काहीच रिएक्ट होत नसतो.. तोच विराजच लक्ष शौर्यच्या साईड हॅन्डवर काढलेल्या टेट्टू वर जात..  शौर्यने छोटस पण आकर्षित अस गिटारच टेट्टू त्याच्या साईड हॅन्डवर काढलं असत.. आणि त्याच गिटारांच्या तारांवर त्याने अगदी लहान अक्षरात कोणालाही कळणार नाही अश्या डिजाईनमध्ये VIR हे नाव लिहिलं असत.. विराज तो टेट्टू अगदी नीट बघु लागला.. विराजच्या नजरेतून त्याच्या हातावरील आपलं नाव काही सुटलं नाही.. आपलं नाव शौर्यच्या हातावरील गिटारवर बघुन विराजला शौर्यला काय बोलावे तेच कळत नव्हतं.. त्याच्या डोळ्यांतुन पाणी येऊ लागत.. आणि त्याच्या डोळ्यांतुन पडणार पाणी शौर्यच्या हातावर पडत..

शौर्य डोळे उघडुन विराजकडे बघतो तर तो रडत असतो..

शौर्य : ए विर तुला काय झालं??? तु रडतोयस का...??

शौर्य उठुन बसतच त्याला बोलतो..

विराज : खुप बोलतो ना मी तुला.. आणि खुप वाईट वागतो मी तुझ्याशी.. तरी डोकं शांत ठेवायचा प्रयत्न करतोय मी. पण खुप टेन्शन येतंय मला शौर्य.. डॅड असता तर त्याने निदान बिजीनेस तरी सांभाळला असता.. मम्मा पण काहीच हेल्प नाही करत आहे ह्यात माझी. म्हणजे मला खरच मी तिचा सावत्र मुलगा आहे अस वाटतंय सध्या. ऑफिसच काम बघु का स्वतःच्या लग्नाची तैयार करू अस झालंय माझं.. मला अनघाला पण वेळ देता नाही येत आहे रे.. प्रि वेडिंग शुट पण मी केन्सल केलं मी.. काहीच होत नाही आहे माझ्याने.. तरी अनघा एका शब्दाने मला काही बोलली नाही.. सांभाळुन घेते मला ती.. मला एका क्षणाला हे लग्न पण नको वाटतंय.. नंतर पण मी कसा मार्ग काढणार ह्या सगळ्यातुन.. तुझ्या बाबतीत जस वागतो तसच मी अनघाच्या बाबतीत वागलो तर.. खुप विचार चालु आहेत ह्या डोक्यात.  त्यात तु पण मम्माकडे जाऊन माझी कम्प्लेन्ट करतोस.. ती ओरडुन गेली मग मला खुप वाईट वाटलं.. तुम्हा लोकांशिवाय मला कोण आहे यार.. तुच सांग.. पण श्री पेक्षा तुच इम्पोर्टानंत आहेस माझ्यासाठी.. इव्हन अनघापेक्षा पण.. म्हणजे सगळ्यांपेक्षाच.. आणि मला वाईट ह्या गोष्टीच वाटत तुला मला ही गोष्ट सारखी सारखी सांगावी लागते. मला नाही आवडणार शौर्य कोणी माझ्या भावाबद्दल अस येऊन मला सांगितलं तर.. आणि मी तुला आधीही सांगितलंय तु ड्रिंक केलीस तर मी आयुष्यात परत कधी तुझं तोंड नाही बघणार.. काल तुझं सगळं वागणं तसच होत ना शौर्य.. तु रात्री 3 नंतर घरी आलास.. तुला गाडीत मी विचारत होतो ना.. तु कुठे होतास?? काय करत होतास..? तुच मला नीट सांगितलं असतस तर हे सगळं झालं असत का..?? मी त्याच वेळेला गाथाला बोललो असतो ना. माझा भाऊ ड्रिंक वैगेरे करत नाही म्हणुन.. माझ्या भावाबद्दल बोलताना थोडं विचार करून बोल.. बोललो असतो मी तिला.. पण तु खरच खुप वेगळाच वागतोयस काल पासुन.. आणि खर सांगु दोन तीन आठवडे झालेत मी डॅडला खुप मिस करतोय.. मला खुप टेन्शन आहे शौर्य समजून घे मला.. 

(विराज रडु लागतो)

शौर्य : तु अस रडु नको विर.. मी आहे ना.. तुझ्या लग्नाच सगळं मी बघतो सगळं.. तु फक्त तुझ्या ऑफिसच्या कामात लक्ष दे.. ओके.. बाकी सगळी जबाबदारी माझी.. तुला श्रीला पण कार्ड द्यायचय ना दे तु श्री ला कार्ड.. मला त्याच पण नाही काही वाटणार.. तुझं पण बरोबर आहे.. मी अस अजुन किती दिवस लपुन रहाणार त्या लोकांपासून.. तु बोलशील तस करूयात.. पण तु अस रडु नकोस.. तु आज सुट्टी घेतलीस ना. चल मग आपण आजच जाऊन हॉल फायनल करूयात.. अजुन उशीर नको व्हायला.. नाही तर हॉल बुक होऊन जातील..

विराज : हो बट आता अनघाला विचारावं लागेल ना.. अनघाला विचारतो फोन करून तिला वेळ आहे का..??

अनघाच कन्फर्मेशन मिळताच विराज आणि शौर्य परत हॉल बघायला जातात..

शौर्य : विर ते.. लग्नानंतर तुम्ही कुठे फिरायला जाणार ते काही ठरलं आहे का तुमचं??

विराज : नाही अजुन..

शौर्य : ओके.. ग्रेट.. 

शौर्य अस बोलताच विराज शौर्यकडे बघतो..

शौर्य : तु पुढे बघुनच गाडी चालव अस माझ्याकडे का बघतोस.. 

विराज : काल 3 वाजेपर्यंत काय करत होतास तु??

शौर्य : कुठे काय करत होतो.. नेहमीच्या जागेवर जाऊन बसलो होतो.. डोकं शांत करत.. मलाच कळलं नाही 3 कधी वाजले ते..

विराज : जास्तच बोललो ना मी तुला..

शौर्य : इट्स ओके.. पण प्लिज मला ब्लेम नको ना करुस विर तुझ्या डॅडला घेऊन.. मला नाही सहन होत.. आय नो मी नको त्या चुका केल्या माझ्या लाईफमध्ये.. बट ते मी चेंज तर नाही ना करू शकत.. मी कधी बोललो का तुला.. तुझ्या डॅडमुळे मी माझं आत्तापर्यंतच आयुष्य नीट नाही जगलो.. तु थोडं रागावर कंट्रोल ठेवत जा.. मलाच एवढा त्रास होतो तुझ्या बोलण्याचा तुझ्या डॅडला किती झाला असेल.. पण खरंच विर थोडा रागावर कंट्रोल ठेव. बाकी तस माझ्या भावात नाव ठेवण्यासारखं काहीच नाही.. लाखात एक आहे.. लाखात पण नाही करोडोत एक आहे..

शौर्य अस बोलताच विराज हसतच त्याच्याकडे बघतो...

शौर्य : आणि विर यु नो व्हॉट.. अनघा वहिनी इज लकी फॉर मी.. तीची आणि माझी जशी भेट झाली तस सगळंच चांगलं घडत गेलंय माझ्या आयुष्यात.. जस ती लास्ट टाईम मला एअरपोर्टवर बोलली अगदी तसच झालं.. होप सो पुढे पण चांगलं होईल..

विराज : माझ्यासाठी पण लकी आहे ती खूप. मुळात खूप समजुन घेते ती मला.. मला म्हणजे सगळ्यांनाच.. बाय दि वे... तु USA मध्ये कोणाच्या प्रेमात पडलास की नाही..? कोणी भेटली की नाही तिथे??

विराज अस बोलताच शौर्य गालातल्या गालात खोट खोटं हसतो.. आणि त्याच्या प्रश्नाच उत्तर न देता गाडी बाहेर बघू लागतो..

विराज : तु अस हसतोयस म्हणजे नक्कीच प्रेमात पडलायस..

तरीही शौर्य शांतच बसतो..

विराज : आता सांगुन पण टाक.. एवढ पण नको लाजुस...

शौर्य : तुझ्या प्रश्नावर हसु येतंय विर.. पहिलं प्रेम विसरायला मी तिथे गेलेलो.. कोणाच्या प्रेमात वैगेरे पडायला नाही.. 

विराज : शौर्य एक विचारू.. वाईट वाटुन घेणार नसशील तर विचारतो.. नाही तर राहु दे..

शौर्य : हम्मम विचार..

विराज : जर ती समीरा परत तुझ्या समोर आली तर माफ करशील तिला..??

(शौर्य थोडा वेळ शांत बसतो..)

विराज : तुला नाही सांगायच तर राहु दे.. पण तु मनाला लावून नको घेऊस..

(विराज ड्राइव्ह करत त्याच्याकडे बघतच बोलतो..

शौर्य : तु लकी आहेस विर. अनघा सारखी लाईफ पार्टनर तुला भेटली.. किती विश्वास ठेवते ती तुझ्यावर.. आणि तु तिच्यावर. तुला तर ती खुप समजुन घेते.. त्यालाच प्रेम म्हणतात.. मी फक्त सहा सात महिनेच समीराच्या रिलेशनशिपमध्ये असेल.. त्यात प्रेम कमी आणि आरोपच जास्त होते.. तु खोटं बोलतोस, तु ड्रिंक करतोस, ती ज्यो तुला का सारखी सारखी फोन करते, तु तिच्याशी बोललेलं नाही आवडत मला, आणि खुप काही... म्हणजे ती कधी माझ्या बाजुने उभीच नाही रहायची.. मनवीची आणि माझी अशी नॉर्मल भांडण झालीना तर रोहन नेहमी मनवीच्या बाजुने असायचा कारण तो प्रेम करायचा तिच्यावर.. भले ती चुक असेल तर तिची बाजु घ्यायचा.  मला रोहनचा तो स्वभाव खुप आवडायचं.. कारण मनवी बोलते ना त्यावर तो विश्वास ठेवायचा.. उलट तिची बाजु घेऊन माझ्याशी भांडायचा.. पण समीरा फक्त बघत राहायची.. आणि वर मलाच शांत बस बोलायची.. तेव्हा पण अस वाटायच मला.. ही खरच प्रेम करते ना माझ्यावर..?? पण नंतर मी ही विसरून जायचो.. प्रत्येक गोष्ट ऐकायचो मी तिची.. कारण तिच्यासोबत स्वप्न बघितली होती.. मी तिच्यासाठी काहीही करू शकत होतो विर पण ती माझ्यासाठी दिल्ली सोडुन इथे येऊ शकत नव्हती.. मला खुप फोर्स करत होती इथेच रहा प्लिज जाऊ नकोस मुंबईला.. पण मला तिथे राहुन होणारा त्रास तिला दिसत नव्हता.. तरी मी एकदा दोनदा माईंड चेंज केलेलं.. की दिल्लीतच राहतो.. फक्त समीरासाठी.. पण तु सुद्धा ऐकणार नाही म्हटलं तर जाऊ दे मुंबईतच येतो म्हटलं.. एकदा तिला रिक्वेस्ट केली. पण ती नाही यायला तैयार इथे.. मी तेव्हा पण तिच्या डिसीजनला ओके बोललो.. कारण मला माझं डिसीजन तिच्यावर लादन योग्य वाटत नव्हतं.. कारण माझं प्रेम होत तिच्यावर.. मला नव्हतं कळत तिच्याशिवाय मी मुंबईत कसा राहील.. पण ती दिल्लीला माझ्याशिवाय राहु शकत होती.. म्हणजे माझं मन तेव्हा पण मला बोलत होते की ही मुलगी तुझ्याशिवाय अस लांब राहु शकते तर ती तुझ्याविना पण राहील.. पण मीच वेडा.. माझ्या मनाचा कधी विचारच नाही केला..फक्त समीराच्या मनाचा विचार केला.. तिला काय वाटेल.. आणि शेवटी तिने जो आरोप केला त्यावरून तिने खरच प्रुफ केलं.. तीच प्रेम म्हणजे फक्त आकर्षण आहे आणि मी तिच्या आकर्षणाला प्रेम समजत होतो.. समीरा समोर आली की मला नाही माहीत मी काय रिएक्ट करेल..पण ह्या वेळेला मी माझ्या मनाचा विचार करेल..आणि माझं मन आत्ता पण मला तेच बोलतंय जे तेव्हा बोलत होत.. 

विराज गाडी बाजुला थांबवतो..

शौर्य : तु गाडी का थांबवलीस??

विराज : अनघा येतेय.. बट शौर्य तुझ्यासाठी खुप छान कोणी तरी नक्की असेल..

शौर्य विराजच्या बोलण्यावर काहीच रिएक्ट होत नाही..

शौर्य आणि विराज गाडीत बसुनच अनघाची वाट बघत होते..

विराज : तु टेट्टू कधी काढलास हातावर..??

शौर्य : दोन वर्ष झाली त्याला..

विराज : दुखल असेल ना खुप??

शौर्य : तुला पण काढायचाय का??

(तोच अनघा आणि गाथा गाडीत येऊन बसतात)

विराज : अजिबात नाही.. तूच कर नको ते उपद्व्याप..

अनघा : आत्ता काय केलं परत त्याने??

(विराजच अर्धवट बोलणं ऐकतच अनघा बोलते..)

विराज : फॉरेनवरून आलेत सर.. लुक बघितलास सरांचा.. आणि टेट्टू पण बघ हातावर काढलाय.. मी त्याला तेच बोलत होतो.. नको ते उपदव्याप तु करत बस..

अनघा : लुकच बोलशील तर हा लुक पण शौर्यला छान दिसतोय.. आणि जे आवडत आपल्याला ते माणसाने नेहमी करावं.. काय शौर्य बरोबर ना..

विराज : तु ह्याची बाजु घेऊन माझ्याशी भांडायचच ठरवलयस का??

अनघा : विराज तुला पण माहिती तु चुकीच बोलतोयस.. शौर्यला आवडत तर करू दे ना त्याला..

शौर्य : आय एम रिअली सॉरी वहिनी ते मी मगाशी थोडं रागात निघुन गेलो.. तुझं काहीच न ऐकुन घेता..

(शौर्य मध्येच अनघाला तोडत बोलतो)

अनघा : तु का सॉरी बोलतोयस ज्याची चूक आहे तो सॉरी बोलेल.. काय गाथा??

(अनघा रागातच गाथाकडे बघत बोलली..)

गाथा : शौर्य.. आय सॉरी.. मी मला काहीही माहीत नसताना तुला ब्लेम केलं.. प्लिज मला माफ कर. परत अस नाही होणार.. प्लिज...आणि जिजु तुम्हांला पण सॉरी..

(गाथा आपले कान धरतच शौर्यला सॉरी बोलते)

शौर्य : इट्स ओके...

फ्रेंड्स.. गाथा आपला उजवा हात पुढे करतच शौर्यला बोलते..

शौर्यपण ओठांवर गोड स्माईल देत तिला हात मिळवतच आपल्या फ्रेंडशिपची कबुली देतो.. 

विराज : गाथा.. ह्यापुढे माझ्या भावाबद्दल बोलताना प्लिज थोडं विचार करून बोल.. माझा भाऊ कधीच ड्रिंक वैगेरे घेत नाही. आणि शौर्य मी पण तुला मगाशी सगळ्यांच्या पुढ्यात ओरडलो.. तस सगळ्यांच्या पुढ्यात सॉरी बोलतो.. आय एम सॉरी..

शौर्य : विर प्लिज यार.. मला नाही काही वाटलं मी बोललो ना तुला मगाशी.. 

गाडीत गप्पा गोष्टी करत विराज गाडी एका हॉलजवळ पार्क करतो..

शौर्य : साईड लोकेशन बघुन मला आतमध्ये नको जायला वाटत. दुसरा हॉल बघुयात ना..

विराज : ए शौर्य सात आठ तासासाठी हॉल हवाय यार.. त्यात तु लोकेशन काय बघतोयस.. आतमध्ये जाऊन हॉल बघ ना..

गाथा : पण मलाही असच वाटत.. आजु बाजुला थोडं सुंदर असा निसर्ग हवा.. म्हणजे ते सात आठ तास पण सात जन्म लक्षात राहतील

शौर्य : एक्झेटली.. मला पण तेच बोलायचय.

अनघा आणि विराज दोघेही एकमेकांकडे बघत गप्प गाडीत बसतात..

विराज पुन्हा दुसऱ्या लोकेशनला गाडी नेतो..

गाथा : दि हा हॉल डल वाटतोय ग.. किती छोटा आहे.

शौर्य : मी जस डेकोरेशन ठरवलंय तस ह्या हॉल ला सूट पण नाही होणार.. आपण दुसरा हॉल बघुयात..

विर जवळपास दहा बारा हॉल दाखवतो पण शौर्य आणि गाथा.. दोघांनाही हॉल पसंतच पडत नाही..

अनघा : तुम्हा दोघांना झालं काय आहे. एक सुद्धा हॉल पसंत नाही पडत तुम्हांला.. 

विराज : त्यापेक्षा आम्ही कोर्ट मेरिएज करतो.

अनघा : मला पण असच वाटत..

अजिबात नाही.. शौर्य आणि गाथा एकत्रच बोलतात..

तस दोघे एकमेकांकडे बघु लागतात..

विराज : एकही हॉल पसंत नाही पडत तुम्हा लोकांना मग लग्न कुठे करू आम्ही..

शौर्य : आपण रिसॉर्ट बुक करूयात ना..?? एक आठवडयासाठी.. मस्त पैकी मेहेंदी, संगीत, हळद, लग्न मग रिसेप्शन अस सगळंच फ़ंक्शन तिथे करूयात.. 

अनघा गाथाकडे बघते.

गाथा : तु अशी माझ्याकडे काय बघतेस??

अनघा : हे सगळं तु मला काल बोलत होतीस.. तूच सांगितलं असशील ना शौर्यला.

गाथा : काहीही काय.? आणि कधी सांगायला जाऊ.. आज सकाळी तर भेटली मी ह्याला.. तेव्हा पासुन तर तुझ्यासोबतच आहे

अनघा : मग तो पण रिसोर्टच कस बोलला.

शौर्य : अग वहिनी.. मला आधी पासुनच वाटत होत की रिसॉर्ट बुक करूयात.. म्हणजे जेव्हा USA ला जाताना विर बोलला ना तो दोन वर्षांनी लग्न करणार तेव्हाच मी प्लॅन केलेलं हे सगळं..

विराज : तुझं हे सगळं आधी ठरलं होतं मग तु टाईम पास का केलास एवढा.. आपण रिसॉर्टच बघितले असते ना शौर्य.. 

शौर्य : सॉरी बट मला अस वाटलं की वहिनी आणि गाथा ने काही हॉल बघितले असतील मग.. उगाच त्यांचा मुड ऑफ नको व्हायला.. बट तुम्हा दोघांना चालणार असेल तर आपण आजच बुक करूयात ना रिसॉर्ट..

विराज : दोन महिन्यात कुठे अरेंज होणार आहे हे सगळं..

शौर्य : विर मी आहे ना डोन्ट वरी..

गाथा : मी आधीच एक रिसॉर्ट ठरवला आहे.. म्हणजे मी इन्कवायरी पण केलीय.. तुम्हां लोकांना जर चालणार असेल तर आपण आजच म्हणजे आत्ताच जाऊन बघुयात.. आणि जर आवडला तर तोच फायनल करूयात.. नाही आवडला तर मग दुसरा बघुयात..  पण तुम्हांला मी निवडलेला रिसॉर्ट आवडेल ह्याची खात्री आहे मला..

शौर्य : ग्रेट.. मग चल विर जाऊयात..

विराज : बसा गाडीत..

(विराज थकलेल्या सुरातच बोलतो)

गाडीत सगळे शांत असतात.. शौर्य म्युसिक सिस्टीममध्ये गाणी लावत गाणी ऐकत बसतो.. तोच विराजचा फोन वाजतो.. विराज गाडी ड्राइव्ह करतच फोन उचलतो..

शौर्य : विर यार मला खरच तुझं लग्न होईपर्यंत तरी जगायचय.. अस नको वागुस यार...

विराज फोन उचलुन तसाच हातात धरत घाबरतच शौर्यकडे बघतो..

विराज : काय झालं अचानक.. तु अस का बोलतोयस?? आता काय केलं मी तुला..

अनघा आणि गाथा पण समोर असलेल्या मिरर मधुन शौर्यकडे बघत असतात..

शौर्य : तु गाडी बाजुला घे आणि मग फोनवर बोल.. इथे तिथे ठोकशील गाडी.. फोनवर बोलायच्या नादात.. उगाच काही विपरीत घडु नये म्हणुन मी बोलतोय..

अनघा आणि गाथा गालातल्या गालात हसतात..

विराज : नीट सांगु शकतो ना.. मला वाटलं परत तुला काही झालं की काय.. घाबरलो ना मी..

शौर्य : तसही भित्राच आहेस तु..

विराज : काय बोललास.

शौर्य : तुला कधी काही बोलतो का मी विर.. प्लिज तु फोन वर बोल.. फोन चालु आहे..

विराज गाडी बाजुला घेऊन फोनवर बोलु लागतो.. कामावरून फोन असतो त्याच्या.. अचानक फोनवर बोलताना त्याचा आवाज पण खुप वाढतो.. 

शौर्यसोबत अनघा आणि गाथा ही त्याच्याकडे बघत रहातात..

एक मिनिट मी आलोच.. अस बोलत विराज गाडीतुन उतरून बाहेर जाऊनच फोनवर बोलत असतो..

शौर्य खिडकीतूनच त्याच्याकडे बघत रहातो..

शौर्य : वहिनी.. मला तुझ्याशी बोलायचंय.. म्हणजे तुला पटलं तर बघ..

(शौर्य सिटवर बसून मागे वळुन अनघाकडे बघतच बोलतो)

अनघा : काय झालं??

शौर्य : विर बिजीनेसला घेऊन खुप स्ट्रेसमध्ये आहे.. खुप म्हणजे खुप.. त्याला ह्या क्षणाला कोणाची तरी गरज आहे. मला कळत असत तर मीच मदत केली असती ग त्याला.. आणि मला माहिती तो आपले प्रॉब्लेम तुला शेर नाही करणार.. पण खरंच त्याला तुझी गरज आहे.. आज तो पण आपल्यासोबत इथे फिरतोय ना.. आपण घरी जाऊन मस्त पैकी आराम करु पण विर घरी गेल्या गेल्या लॅपटॉप घेऊन बसेल.. भले सकाळ होऊन जाईल तरी तो लॅपटॉपमध्येच असेल.. त्याला स्वतःला सुद्धा वेळ नाही देता येत आहे.. मला अस वाटत त्याला तु बिजीनेस सांभाळायला मदत करावी.. म्हणजे तसही तु एवढं शिकलीस म्हटलं तर तु नक्कीच पुढे जॉब करायचा विचार केला असशील.. किंवा आता करतही असशील.. मला नाही माहीत.. पण इतर कुठे जॉब करण्यापेक्षा माझ्या विरला बिजीनेसमध्ये हेल्प कर ना.. तुम्हा दोघांना एकत्र पण रहाता येईल.. तु विश्वासातली म्हटलं तर तो तुझ्यावर अर्धा बिजीनेस पण सोपवेल..


(गाथा एकटक शौर्यकडे बघतच रहाते)

अनघा : मी बघते बोलुन त्याच्याशी.. त्याला खरच प्रेशर असेल तर मी करेल त्याला मदत..

शौर्य : तु त्याला विचारलंस तर तो नाहीच बोलणार ग... उद्या डायरेक्ट त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तु कामाला सुरुवात करावी अस मला वाटत.. तुमच्या लग्नाची शॉपिंग, हॉल डेकोरेशन, पाहुण्यांची उठ बस.. सगळं सगळं काही मी बघतो.. प्लिज प्लिज.. माझ्यासाठी.. विरला मी अस टेन्समध्ये नाही बघु शकत.. प्लिज वहिनी.. प्लिज..

अनघा खिडकीबाहेर दिसणाऱ्या विराजकडे बघत असते.. तिला पण तो फोनवर बोलताना थोडं अस्वस्थ वाटत असतो..

गाथा : दि.. मला पण अस वाटत तु जिजूंना मदत करावी.. मी पण आहे ना.. मी मला जेवढं जमेल तेवढी मदत करत जाईल..

अनघा : ओके..

अनघा हसतच शौर्यला बोलते..

शौर्य : थेंक्स...

शौर्य गाडीतुन उतरतो 

अनघा : तु कुठे चाललास??

शौर्य : विर दमला असेल गाडी ड्राइव्ह करून.. मी करतो ड्राइव्ह. त्याला आराम करू देत..

शौर्य विराजच्या सिटवर जाऊन बसतो..

थोड्याच वेळात विराज गाडीत येतो..

शौर्य : मागसापासून ड्राइव्ह करतोयस कार. दमला असशील. मी करतो ड्राइव्ह तु बस थोडं आराम कर..

विराज : नीट चालावं म्हणजे झालं..

शौर्य : डोन्ट वरी विर ब्रो.. 

विराज शौर्यच्या बाजुच्या सीटवर येऊन बसतो.. त्याचे कामावरचे फोन चालुच होते..

विराज : शौर्य गाडी बाजुला पार्क कर जरा..

शौर्य : काय झालं??

विराज : अनघा मला अर्जेंटली कामावर जावं लागेल.. आय एम सॉरी.. तुम्ही प्लिज बघुन घाय रिसॉर्टच.. शौर्य आहे ना तुमच्या सोबत..

शौर्य लगेच अनघाकडे बघतो.. अनघा काय रिएक्शन देते ह्यावर..

अनघा : इट्स ओके. सांभाळुन जा.. नाही तर तु कार घेऊन जा. आम्ही टेक्सी करतो..

विराज : नाही मी करेल मॅनेज. शौर्य तुम्ही लोक लंच करून घ्या. लंच टाईम पण होऊन गेलाय..

शौर्य : तु पण लंच करून जा ना आमच्यासोबत.. सकाळपासुन तु पण काहीच खाल्लं नाहीस..

विराज : मी केंटिंगमध्ये खाईल काही तरी...मला लगेच पोहचाव लागेल ऑफीसला.. अनघा रिअली सॉरी.. आणि तुम्हा दोघांना पण..

अनघा : इट्स ओके विराज. तु सांभाळुन जा. आम्ही बघतो हॉलच..

(विराज सगळ्यांना बाय करतच तिथुन निघुन जातो)

शौर्य : आपण लंच करून घेऊयात का.?? रिसॉर्टला पोहचायला अजून 45 मिनिट्स आहेत..

अनघा : ओके चालेल..

शौर्य गाडी एका हॉटेलजवळ पार्क करतच सगळयांसोबत आत शिरतो.

वेटर मेनुकार्ड कार्ड आणुन तिघांच्या पुढ्यात ठेवतो..

तु ऑर्डर कर काही तरी.. अस बोलत अनघा मेनुकार्ड शौर्यकडे देते..

शौर्य : लग्न तुझं आहे.. मग तूच ऑर्डर कर.. मला चालेल काहीही.. फक्त नॉनव्हेज सोडुन काहीही ऑर्डर कर...

अनघा : तु नाही खात नॉनव्हेज??

शौर्य नकारार्थी मान हलवतो..

अनघा : ही गाथा पण नाही खात.. (अस बोलत अनघा मेनुकार्ड बघु लागते)

शौर्य : गुड.. बाय दि वे तु काय करतेस..

गाथा : MBBS...

शौर्य : ग्रेट.. बेस्ट ऑफ लक.. 

गाथा : थेंक्स..तु काय करतोस.??

शौर्य : Business administration of management.. 

गाथा : छान..

शौर्य : बाय दि वे सॉरी वन्स अगेन.. माझ्यामुळे तुझा बर्थ डे नीट नाही झाला..

गाथा : माझा बर्थ डे नव्हताच.. माझ्या मैत्रिणीचा होता.. बट तु सॉरी बोलुन मला लाजवतोयस.. आय नो मी चुकली. म्हणून सॉरी बोलुन एवढ पण नको न हर्ट करुस.. माझ्यामुळे कोणी हर्ट झालेलं मला खरच नाही आवडत..

शौर्य : अग तस नाही मी खरच मनापासुन सॉरी बोलत होतो.. तुल हर्ट नव्हतो करत.. बर जाऊ दे तो टॉपिक.. मी विरला फोन करून बघतो तो पोहचला का??

शौर्य तिथुन उठुन विराजला फोन करायला बाहेर जातो..

तोपर्यंत अनघा तिघांसाठी जेवण ऑर्डर करते..

तिघेही ऑर्डर केलेलं जेवण आटोपुन रिसॉर्ट बघायला जातात...

(आता बघुयात गाथाने निवडलेला रिसॉर्ट अनघा आणि शौर्यला पसंत पडतो का ते.. त्यासाठी प्रतीक्षा करा पुढील भागाची.. आणि हा भाग कसा वाटला ते ही कळवा)

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all