अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 61

In marathi

शौर्य विराजच्या रूममध्ये जातो.. विराज लॅपटॉपमध्येच काही तरी करत असतो.. 

विराज : तुला काही हवंय??

शौर्य : ते.. तु पक्का श्री ला कार्ड नाही ना देणार..??

विराज : तु माझ्यावर डाऊट घेतोयस??

शौर्य : विर I am just asking you...

विराज : नाही देणार.. 

शौर्य : थेंक्स..

(शौर्य विराजला मिठी मारतच बोलतो..)

विराज : तुझं झालं तर तु जाऊ शकतोस.. मला काम आहे.

शौर्य : रागावला आहेस..??

विराज गप्प आपल्या लॅपटॉपमध्ये बघत असतो..

विर मी तुझ्याशी बोलतोय.. बोलणं..

विराज लक्ष देत नाही हे बघुन शौर्य विराज समोरचा लॅपटॉप घेतो...

विराज : शौर्य काय करतोयस.. लॅपटॉप दे तो इथे.. काम आहेत मला..

शौर्य : किती भडकतोस तु विर.. 

विराज : भडकु नाही तर काय करू.. तुझ्यामुळे मम्मा मला ओरडून गेलीय..

शौर्य : एकदाच ओरडली तर तुला एवढं वाईट वाटलं.. मग माझा विचार कर.. मला किती हर्ट व्हायच.. आणि काय सांगायचास तु तेव्हा.. तीला तुझ्यावर रागवायचा अधिकार आहे.. तिला काम असत. कामाच्या गडबडीत होऊन जातं अस.. समजुन घेत जा तिला.. मग आता तु का एवढं मनाला लावुन घेतोस..

विराज : खुप मोठा झालायस.. आज मला शिकवायला लागलास.. तुझं शिकवुन झालं असेल तर जा इथुन..

शौर्य : विर यार मी तुला का शिकवु...? तु मोठा आहेस.. तुला सगळं कळत.. आणि तु अस रागात का बोलतोयस..??

विराज : श्री बेस्ट फ्रेंड आहे माझा.. तु नाही समजु शकत.. प्रत्येक वेळेला त्याने मला मदत केलीय.. त्याला जर मी नाही वेडिंगला बोलवलं तर हर्ट होईल त्याला.. आणि सगळ्यात जास्त मला हर्ट होईल जर तो माझ्या वेडिंगला नाही आला तर.. प्रॉब्लेम तुझा आणि समीराचा आहे ना.. मग त्यात माझ्या मित्राला का तु मध्ये आणतोस.. आणि अजुन एक.. तुझ्यामुळे मी त्याची वेडिंग नाही अटेंड करू शकलो आणि आता तुझ्याचमुळे तो माझी वेडिंग अटेंड नाही करू शकणार.. प्रत्येक गोष्टीत तुझा हट्टी पणा असतो... तुला हवं तेच तु करतोस.. आठवतय ना काय गोंधळ घालुन ठेवलेलास त्याच्या वेडिंगला ते.. त्यानंतर पण काय घडलं आठतय ना.. त्यादिवशी तुला जशी तुझ्या बाबाची आठवण येत होती ना. तस आज मला माझ्या डॅडची आठवण... आणि जेव्हा मला माझ्या डॅडची आठवण येते तेव्हा मला तु माझ्या नजरेसमोर नको वाटतोस.. जसा आता तुझ्यावर भडकलेलो ना तसाच मी त्याच्यावर भडकलेलो त्यादिवशी.. का तर तुझ्यासाठी.. कारण तो तुला त्रास देत होता.. आणि तु मम्माला जाऊन सांगतोस मला तुझ्यापेक्षा तो श्री इंपोर्टन्ट आहे.. अजुन लहान मुलासारखच कम्प्लेन्टि करतोस तु मम्माकडे.. मला नाही आवडत शौर्य मम्माने अस माझ्यावर रागावून गेलेलं.. मी पण किती मूर्ख... हे सगळं कोणाला सांगतोय जो कधीच कोणाचा शेवटपर्यंत  मित्रच नाही बनु शकत त्याला.. सोड.. मला तुझ्याशी बोलायचचं नाही ह्या टॉपिकवर.. अजुन काही बोललो तर परत जाऊन सांगशील मम्माला.. तस पण आज खुप सिम्पथी मिळतेय तुला तिच्याकडुन.. दे तो लॅपटॉप इथे आणि प्लिज जा माझ्या रूममधून.. मला नाही बोलायचंय तुझ्याशी.. उगाच मी घरी राहिलो आज अस वाटतंय मला.. कामावर गेलो असतो तर डोकं तरी शांत राहील असत माझं..

विराज शौर्यच्या हातातला लॅपटॉप घेतच त्याला बोलतो..

शौर्य : विर एवढं हर्ट का करतोयस तु.. अस वागायच होत तुला मग का मला बोलवुन घेतलंस तु USA वरून..  तु हर्ट झालायस म्हटलं तर लगेच मम्मा पण येईल तुझी समजुत काढायला. एकच दिवस मम्मा नीट बोललीय यार माझ्यासोबत.. त्यात तु एवढ ज्वेलसी फील करतोयस..

विराज : ए हॅलो.. तु काय बोलतोयस कळत तुला.. मी का ज्वेलसी फील करू.. काहीही बोलु नकोस हा शौर्य..

शौर्य : चेहऱ्यावरूनच कळतंय तुझ्या.. बोलायची गरज काय आहे.. आणि सारख सारख का मला बोलून दाखवतोयस माझ्यामुळे तुझा डॅड गेला.. तुझा तुझ्या रागावर कंट्रोल आहे का.. तोंडाला येईल ते बोलतोस समोरच्याला..

विराज : शौर्य जास्तच बोलतोयस तु आता..आणि प्लिज इथुन जा.. मला काम आहे..

शौर्य : विर प्लिज नकोना रागवुस अस.. मला नाही आवडत तु अस रागावलेल..

विराज : शौर्य प्लिज जा इथुन

शौर्य : तु नीट बोल मगच मी जाईल..

विराज : शौर्य गेट आउट..

(विराज रागातच शौर्यवर ओरडतो..)

शौर्य विराजकडे बघतच राहतो.. तोच अनिता विराजच्या रूममध्ये येते.

विराज : मम्मा..

विराज अनिताकडे बघतच शौर्यकडे बघतो.. शौर्य एक टक विराजकडेच बघत असतो..

अनिता येऊन विरच्या बाजुला बसते..

विराज : मम्मा तुला काही हवं होतं का??

अनिता : विर आय एम सॉरी... मगाशी मी थोड जास्तच रुडली बोलली तुझ्याशी.. खर तर तु खुप करतोस शौर्यसाठी.. आणि मी पण काहीही विचार न करता तुला बोलली.. तुला जे योग्य वाटत ते तु कर.. आणि शौर्य बर झालंस तु इथे आहेस ते.. रागावर थोडं कंट्रोल ठेवत जा तुझ्या.. विरच लग्न आहे. त्याला ठरवु दे लग्नात कोण हवं नि कोण नको ते.. ओके.. आणि प्लिज तुम्ही दोघ भांडु नका.

शौर्य : विर तुला हवं ते कर.. मी नाही काही बोलणार तुला.. मम्मा मी फ्रेंड सोबत बाहेर जातोय.. 

अनिता : जेवुन जा.. आणि एवढ्या दुपारच कुठे चाललास??

शौर्य : आहे एक काम.. मी लंचला नाही आणि डिनरला पण नाही.. तुम्ही वाट नका बघत बसु माझी जेवुन घ्या..

अनिता : शौर्य जेवुन जा.. तुझ्या आवडीचा मेनु केलाय सगळा..

शौर्य : मला नकोय जेवायला एवढ्यात..

अनिता : शौर्य प्लिज.. एवढ्या दिवसांनी तु आलायस तर आमच्यासोबत लंच करून जा.. प्लिज

तिघेही विराजच्या रूममधुन बाहेर निघतात.. आणि डायनींग टेबलवर बसतात.. 

शौर्य एक टक ताटात बघत बसला असतो..

अनिता : सो शौर्य USA कस वाटतंय??

शौर्य : खूप छान.. यावसच नाही वाटत तिथुन इथे.. पुढील दोन वर्षांनी मी परत इथे येईल अस नाही वाटत मला..

अनिता आणि विराज शौर्यकडे बघतच रहातात..

तोच शौर्यचा फोन वाजतो..

हा मी निघतोय.. तुम्ही लोक थांबा.. एवढं फोन वर बोलून शौर्यने फोन ठेवला..

शौर्य प्लॅट पुढे सरकवतच तिथुन उठु लागला..

अनिता : तु जेवलासच नाहीस.. 

शौर्य : भूक नाही आणि मला काम पण आहे. मित्र वाट बघतायत बाहेर माझी..

अनिता : एक मिनिट जेवण संपव ते ताटातल.. आणि मग जा.. 

शौर्य : भूक नाही आहे मम्मा.. मी बोललो ना तुला.. का फोर्स करतेयस..

(शौर्य थोडं रागातच बोलतो)

विराज : शौर्य..

शौर्य : तुला अजुन काही बोलायच बाकी आहे विर..?? 

(शौर्य अस बोलताच अनिता त्याच्याकडे बघते..)

शौर्य : तु बोललेल्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत माझ्या... नाही विसरणार.. ओके... मम्मा सॉरी आणि बाय..

शौर्य तिथुन निघुन आपल्या रूममध्ये जातो.. हेल्मेट आणि बाईकची किल्ली घेत रूमबाहेर पडतो..

शौर्यला विराज आणि अनघासाठी एक छोटंसं सरप्राईज द्यायच होत. त्याने ह्या दोन वर्षात जेवढे डान्समध्ये पैसे कमवलेले असतात ते सगळे त्याने साठवुन ठेवलेले.. तेच तो इंडियन करेन्सिमध्ये कन्व्हर्ट करायला बॅंकेत जातो.. तिथुन तो दोघांसाठी काही तरी सुंदर अस गिफ्ट देता येईल का ते बघतो.. त्याच्या सोबत नैतिक आणि रॉबिनपण असतात.. 

तिघेही विचार करत मॉलमध्येच बसतात..

नैतिक : मुव्हीला जाऊयात??

शौर्य : काय यार तु. मी तुला कश्यासाठी बोलावलंय आणि तुझं काय चाललंय..

रॉबिन : ए शौर्य अजुन दोन महिने आहेत ना. दोन तीन दिवस तर दे.. थोडं विचार करायला.. 

नैतिक : बाय दि वे तुझा बर्थडे पण येतोय ना दोन महिन्यांनी.. त्याच दिवशी वेडिंग आहे का??

शौर्य : मला नाही माहीत.. आणि मला नाही वाटत मी विरच्या लग्नाला इथे थांबेल.. मला लवकरात लवकर काही तरी सुचवा आणि इथुन जाऊ दे मला..

रॉबिन : अस का बोलतोयस तु.. काय झालं??

शौर्य : ती लोक येतील यार.. मला परत त्रास होतोय.. मला हे सगळं जग माझ्या डोक्याभोवती फिरतय अस वाटतंय.. मला ते आठवल की खुप त्रास होतो रे.. विर नाही समजत.. त्याच पण बरोबर आहे.. श्री त्याचा मित्र आहे ना.. चुक तर माझी आहे..

नैतिक : एक मिनिट.. तु आम्हा लोकांना समजेल अस बोल.. 

शौर्य : मलाच कळत नाही मी काय बोलतोय मी तुम्हां लोकांना काय सांगु.. मेन मुद्दा हा आहे की मला USA ला जायच मला इथे नाही रहायच.. मो वेडा होईल इथे राहुन.. मी परत नाही येणार इंडियात.. मी तिथेच जॉब करणार.. तिथेच सेटल होणार..

रॉबिन : तु बरा आहेस ना..

शौर्य : तो विर कस बोलतो मला.. आज परत बोलला तो. माझ्यामुळे त्याचा डॅड गेला... अस कस बोलु शकतो तो मला.. खुपदा बोललोय मी त्याला मला नाही सहन होत तु अस बोललेलं तरी तो असच बोलतो.. 

नैतिक : शांत हो यार..

शौर्य : मला लवकरात लवकर गिफ्ट सुचवा.. 

नैतिक : तु त्यांना ब्रेसलेट दे ना.

शौर्य : ब्रेसलेट तर अजिबात नको.. लोक हातात काढुन देतात नात तोडायच असेल तर.. आणि सोडुन जातात मग..

रॉबिन : वॉच??

शौर्य : ते तर अजिबात नकी.. वेळ जशी बदलते तस वॉच दिलेली माणस पण बदलतात..

नैतिक : लग्नानंतर ते लोक कुठे तरी फिरायाला जातीलच ना.. तु त्यांना कोणत्या तरी ट्रेव्हेल मधुन छानस पेकेज बुक करून दे.. ऑस्ट्रेलिया, पेरिस वैगेरे..

शौर्य : गुड आयडिया यार.. पण अजुन दोन तीन दिवस थोडं विचार करा.. अजुन काही सुचत का ते सांगा..

नैतिक : हम्मम..

रॉबिन : आत्ता तरी आपण मुव्ही बघायला जाऊयात ना. संध्याकाळ व्हायला भरपुर वेळ आहे..

तिघेही मुव्ही बघायला जातात..

इथे विराज अनघासोबत फोनवर बोलत असतो..

विराज : उद्या आठ - साडे आठ वाजे पर्यंत मी निघतोय इथुन.. मी तुला आपल्या नेहमीच्या रेस्टोरेन्ट जवळुन पिकअप करेल.. म्हणजे तिथे यायला मला 9.15 होतील..

अनघा : तु म्हणजे?? शौर्य नाही येत..

विराज : नाही.. 

अनघा : का??

विराज : बिजी आहे तो..

अनघा : पण तोच हॉल ठरवणार होता ना.. म्हणजे तूच मला अस बोललेलास.. ते काही नाही. दे बघु त्याला फोन. मी बोलते त्याच्याशी.. अस कस नाही येत तो..

विराज : अनु.. तो मित्रांसोबत बाहेर गेलाय... तो घरी नाही आहे.. आणि तो नाही येत आहे आपल्यासोबत.. आणि मी थोड कामात आहे.. नंतर बोलतो तुझ्याशी..

अनघा : काय झालंय विराज?? काही भांडण झालीत का दोघांत..??

विराज : हो तसच काहीस.. 

अनघा : उद्या शौर्य येतोय आपल्यासोबत.. आणि तु त्याला घेऊन येतोयस.. मला काही माहीत नाही..

विराज : अनु प्लिज..

अनघा : उद्या भेटु आपण आपल्या नेहमीच्याच रेस्टोरेन्टजवळ.. आणि शौर्यला नक्की घेऊन ये.. ओके..बाय..

विराज पुढे काही बोलणार पण अनघाने फोन कट केला..

संध्याकाळ होताच शौर्यची सगळी मित्रमंडळी ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेवर भेटतात..सगळेच डिस्कॉमध्ये मस्त एन्जॉय करत असतात.. शौर्यपण मित्र मंडळींसोबत नाचत असतो.. नैतिक बिअरची बॉटल हातात घेऊन येतो..

रॉबिन : शौर्य दिस इज फॉर यु..

असं बोलत नैतिकच्या हातातील बॉटल घेत रॉबिनने जोर जोरात शेक करत बॉटलच झाकण उघडलं.. आणि बिअर शौर्य सोबतच इतरांच्या अंगावर उडवु लागला..

शौर्य : रॉबिन यार कपडे खराब करतोयस तू.. 

ज्योसलिन : ए शौर्य लगेच रडायला चालू झाल तुझं.. आमचे पण कपडे खराब होतायत. आम्ही काही बोलतो का..

आण बघु ती बॉटल असं बोलत आर्यनने जोर जोरात बॉटल हलवत शौर्यवर टाकली..

शौर्य : बस ना यार..

सेगळेच अगदी बेधुंद होऊन नाचत होते.. मध्येच बिअरची बॉटल शेक करत एकमेकांच्या अंगावर उडवण चालु होत.. शौर्यसुद्धा एन्जॉय करत होता.. 

नाचुन जसे दमले तसे सगळेच रेस्टोरेन्टमध्ये जेवायला जाऊ लागले.. रेस्टोरेन्टमध्ये पण नुसती मज्जा मस्तीनी आरडा ओरडा चालु होता.. 

तोच हॉटेल मॅनेजर त्यांच्या टेबलवर येतो..

मॅनेजर : सॉरी टु डिस्टरब यु.. बट बाहेर एक सर आहेत त्यांना तुमच्या कारमुळे त्यांची कार काढता येत नाही.. तुम्ही तुमची कार थोडी बाजुला घेता का..

रॉबिन : what is this yaar.. शौर्य तु कार नीट का नाही पार्क केलीस..

शौर्य : मला जिथे पार्क करायला सांगितली मी तिथेच पार्क केली.. एक मिनिट मी बघुन येतो.. बाजुलाच असलेली किल्ली उचलत शौर्य तिथुन जाऊ लागतो..

ए शौर्य तू तुझ्या बाईकच्या कि ने माझ्या कारचा डॉर कसा ओपन करणार?? रॉबिन असं बोलताच सगळेच शौर्यला हसु लागतात..

नैतिक : बहुतेक शौर्यला बिअरच्या वासाने पण चढली..

शौर्य : बस बस.. की फेक इथे...

रॉबिन जोरातच शौर्यकडे की फेकतो.. शौर्य कारची किल्ली कॅच करणार पण रॉबिन ती इतक्या उंचावरून फेकतो की ती दुसऱ्या टेबलवर ग्रुप करून बसलेल्या लोकांच्या मधोमध असलेल्या केकमध्ये पडते...

ओह्ह्ह शट.... शौर्य मागे वळुन केकमध्ये पडलेल्या किल्लीकडे बघतच बोलतो..

रॉबिन : काय यार शौर्य तुला साधं कॅच पण नाही करता येत...

शौर्य रागातच रॉबिनकडे बघतो आणि त्या टेबलवर बसलेल्या लोकांकडे जातो...

सगळेच शौर्यकडे रागात बघत असतात..

शौर्य : I am really sorry... ते चुकून झालं.. 

असं कसं चुकून झालं??? आता पर्यंत शौर्यकडे पाठ फिरवुन बसलेला चेहरा शौर्यकडे तोंड करत त्याला रागातच बघु लागला... केसांच्या मधोमध पफ काढुन मोकळे सोडलेले केस... डोळ्यांच्या मधोमध लावलेली डायमंडची टिकली.. सोबतच डोळ्यांच्या कड्यांवर लावलेले काजळ.. तिच्या गोऱ्या अश्या रंगावर उठुन दिसत होतं.. आणि मुळात बोलताना तिच्या गुलाबी अश्या ओठांची होणारी हालचाल शौर्य एक मिनिट का होईना तिच्याकडे बघतच राहिला...

मी तुझ्याशी बोलतेय... शौर्यच्या डोळ्यांसमोर टिचकी वाजवतच ती त्याला लागलेली तंद्री दूर करत बोलते

सॉरी... बट ते चुकुन झालं...शौर्य त्याला लागलेली तंद्री दुर करतच तिला बोलला...

ए हॅलो ह्या केकचे पैसे तुझा बाप देणार का.. शौर्यची कॉलर धरतच त्या ग्रुपमधिल एक मुलगा शौर्यच तोंड आपल्याकडे फिरवत बोलतो..

शौर्य : बापावर का जातोयस.. मी शांतपणे बोलतोय ना... आणि कॉलर सोड माझी.. 

हे विवेक प्लिज शांत हो.. सगळेच त्या मुलाला शांत करत बोलत होते..

ज्योसलीन आणि इतर मुली शौर्यज्या मुलीकडे एकटक बघत होता तिला समजवत होते..

नैतिक : हेय SD क्या हुआ... ??

शौर्य : हा कॉलर पकडतोय माझी.. 

नैतिक : ए तू कॉलर का पकडतोय त्याची.. कॉलर सोड..

शौर्यचे सगळेच मित्र मंडळी त्याच्या जवळ येतात..

विवेक : एक तर आमचा केक खराब केला आणि वर तुम्हा लोकांची दादागिरी..

शौर्य : तू कॉलर सोड आधी.. 

शौर्य जोरात धक्का देतच त्याला बोलतो..

शौर्य : ह्या केकचे पैसे मी देतो.. तु दुसरा केक ऑर्डर कर.. आणि परत बापावर वैगेरे नाही हा जायच कोणाच्याच.. 

एक तर दारू पिऊन यायचा आणि वर धिंगाणा घालायचा.. एक काम कर हा कॅकना तुच खा अस बोलत विवेक तो कॅक उचलुन शौर्यच्या अंगावर मारणार तोच शौर्य खाली वाकतो.. आणि कॅक रॉबिनच्या तोंडाला लागतो..

शौर्य रागातच त्या मुलाच्या गालावर एक सनसनीत कानाखाली खेचतो..

तुला तर मी बघतोच अस बोलत विवेक पुन्हा त्याला मारायला जातो तस त्याच्या ग्रुपमधले त्याला पकडतात..

शौर्य : येना मग.. हात तरी लावुन दाखव..

नैतिक : ए शौर्य चल इथुन .

शौर्यच्या ग्रुपमधले शौर्यला पकडत त्याला तिथुन घेऊन परत आपल्या टेबलवर येऊन बसतात..

ए मिस्टर हॅलो...

आता पर्यंत रागात असलेला शौर्य तो आवाज ऐकताच पुन्हा शांत होतो.. 

तोच चेहरा त्याच्या समोर येत त्याच्याकडे रागात बघत असतो..

एक तर अस रेसोरेंटमध्ये दारू पिऊन यायच.. दुसऱ्याचा बर्थ डे कॅक असा मेस करायचा.. आणि वर मारामारी करायची.. छान संस्कार आहेत तुमचे.. किप इट अप..

शौर्य तिच्या बोलण्यावर काहीच रिएक्ट होत नाही.. तो मित्रांनी पकडलेले आपले हात सोडवत शांतपणे त्या रेस्टोरेन्टमधुन बाहेर पडतो.. बाकीची मंडळींपण त्याच्यासोबत तिथुन बाहेर पडतात..

ज्योसलीन : पुर्ण मुडच खराब केलास शौर्य तु..

शौर्य : ए ज्यो.. ह्या रॉबिनने की फेकली त्या कॅकवर.. 

रॉबिन : मग तु बोलायच ना मला कॅच नाही करता येत.. हातात आणुन दिली असती..

शौर्य : मग तु पण सांगायच ना... तुला ड्रिंक केल्यावर नीट थ्रो करता नाही येत ते.. 

रॉबिन : ए शौर्य तुला कॅच पकडता नाही आली हा.. उगाच मला ब्लेम नको करुस..

शौर्य : तु उद्या शुद्धीत आलास की मला प्लिज एकदा येऊन भेट.. तुला शिकवतो मी कस थ्रो करतात ते.. आणि त्यात तो सायको.. मी बोललो ना कॅकचे पैसे देतो.. कॉलर पकडायची काय गरज होती त्याला.. 

रॉबिन : ए बट कॅक छान होता यार..

नैतिक : हो ना.. तुला तर त्याने हातानेच भरवला त्याच्या.

सगळेच तिथुन बोलत बोलत जवळ असलेल्या चौपाटीला येतात.. थंड गार अश्या वाळूत शांत बसतात..

शौर्य कडुन USAच्या गंमती जंमती ऐकत बसतात.. शौर्य USA ला गेल्यावर इथे काय घडलं ते त्याला सांगतात.. नुसती मज्जा मस्ती चालु असते..

11 वाजतात तसे सगळे आपापल्या घरी जायला निघतात.. पण शौर्यला अजुनपण तिथे समुद्रापाशी बसावस वाटत असत.. तो सगळ्यांसोबत निघतो खर पण घरी न जाता तो त्याच्या आवडत्या जागेवर जाऊन बसतो.. रात्रीची शांतता.. निसर्गात सुटलेला गारवा.. समुद्रात उसळणारी लाट.. डोळे बंद करून तो ह्या निसर्गाचा आनंद घेत असतो.. आणि अचानक मगाशी रेस्टोरेन्टमध्ये बघितलेला तो चेहरा त्याच्या नजरेसमोर येतो.. तस घट्ट मिटलेले डोळे तो पटकन उघडतो.. पुन्हा डोळे बंद करून बघतो तर पुन्हा तसच होत..

खिश्यात हात घालुन आपला मोबाईल काढतो.. बघतो तर त्याची मम्मा त्याला फोन करत असते.

अनिता : शौर्य आहेस कुठे 12 वाजुन गेलेत...

शौर्य : येतो थोड्या वेळात.. तु झोप..

अनिता : आहेस कुठे तु..

शौर्य : फ्रेंड्स सोबतच आहे ग.. येतो थोड्या वेळाने.. तु झोप..गुड नाईट

(शौर्य फोन कट करून ठेवुन देतो)

अनिता विराजच्या रूममध्ये जाते.. विराज अजुनही लॅपटॉपमध्येच काम करत असतो..

अनिता : तु झोपला नाहीस अजुन??

विराज : अग ते थोडं काम आहे.. उद्या पण सुट्टी घेतलीयना मी.. म्हणुन थोडं जास्त काम आहे.. तस आता मी झोपणारच होतो.. काही हवंय का तुला??

अनिता : शौर्यच टेन्शन येतंय.. USA ला नीट रहात असेल ना तो.. 

विराज : अस का बोलतेयस तु?

अनिता : 12 वाजुन गेलेत अजुन घरी नाही आलाय.. दुपारी घरातुन निघालाय तो.. 

विराज : थांब मी फोन करून बघतो...

अनिता : मी केलेला फोन... मित्रांसोबत आहे.. तु झोप.. एवढं बोलुन कट केला त्याने.. मला भीती वाटते नको ती व्यसन नको त्याला लागायला..

विराज : तस नाही काही करणार तो.. मी तो आल्यावर बोलतो त्याच्याशी.. तु झोप..

अनिता : बर.. 

अनिता तिथुन निघुन आपल्या रूममध्ये येते.  जवळपास दीड वाजुन जातो.. विराज शौर्य आला का हे बघायला त्याच्या रूममध्ये जातो.. पण शौर्य अजुन काही आला नसतो.. विराज लगेच शौर्यला फोन लावतो.. पण शौर्य त्याचा फोन काही उचलत नाही..

I am busy...will call you back..

शौर्य विराजला मेसेज करतो.. विराज रागातच पुन्हा शौर्यला फोन लावतो पण फोन स्विच ऑफ येत असतो..

विराज आपल्या रूममध्ये जातो.. शौर्यची वाट बघत त्याचा डोळा कधी लागतो हे त्याच त्यालाच कळत नाही..

शौर्य समुद्र ठिकाणी एकदम शांत बसुन एकटक उसळणाऱ्या लाटांकडे बघत असतो.. तो त्याच डोकं शांत करण्याचा प्रयत्न करत असतो.. अक्षरशः डोळे पण थकुन जातात पण त्याच डोकं काही शांत होत नसत.. कालच्या प्रवासाने तो तसही दमुन गेला असतो.. डोळ्यावरची झोप आता काही त्याला कंट्रोल होत नसते.. तस तो घरी निघुन येतो.. रूममध्ये आल्या आल्या घड्याळात बघतो.. रात्रीचे 3 वाजुन गेले असतात.. तो तसाच बेडवर डोळे मिटुन पडतो.. 

विराज : शौर्य... उठ 8 वाजुन गेलेत.. तुला बोललो ना आज जायचय आपल्याला..

डोळ्यांवरची झोप उडवतच तो विराजकडे बघतो..

शौर्य : मला नाही यायच कुठे.. तुझं तु जा.. आणि प्लिज झोपु दे मला.. 

बाजुला असलेली उशी आपल्या कानावर घेतच तो विराजला बोलतो..

एक मिनिट मला पण हौस नाही आलीय तुला न्यायची.. अनघाने बोलावलंय तुला.. धर तिला फोन लावलाय तुझं तु सांग तु येत नाहीस ते.. शौर्यच्या तोंडाजवळील उशी बाजुला करतच तो बोलतो..

शौर्य काहीच रिएक्ट होत नाही..

विराज : आणि रात्री किती वाजता आलास तु..?? शौर्य तुझ्याशी बोलतोय मी..

शौर्य : एक वाजता..

विराज : खोटं बोलु नकोस दिड वाजेपर्यंत तर मी तुझ्याच रूममध्ये होतो.. आणि आपला वॉचमन बोलला मला तु तीन वाजता घरी आलायस.. कुठे होतास एवढा वेळ.. काय करत होतास??

शौर्य : विर झोपु दे मला.. तु जा इथुन...

विराज : उठुन बस आणि बोल माझ्याशी.. आणि तुझ्या अंगाला वास कसला येतोय.. 

शौर्य डोळे बंद करतच उठुन बसतो..

तोच अनघाचा विराजला फोन येतो.. 

विराज : हा आम्ही निघतोच आहे थोड्या टाईमने.. अ.. हो शौर्य पण येतोय..

(विराज अनघाशी फोनवर बोलत होता)

शौर्य डोळे चोळतच बेडवरून उठतो आणि फ्रेश होऊन येतो.. डोळ्यांवर अजुनही झोप असतेच त्याच्या.. विराज त्याची वाट बघत त्याच्याच रूममध्ये असतो..

विराज : मी गाडी काढतो.. लवकर ये तु खाली..

शौर्य तैयार होऊन गाडीत जाऊन बसतो.. सीट बेल्ट लावुन सिटवर डोळे मिटुन तो बसतो..

विराज : कुठे गेलेलास रात्री तु..??आणि  एवढा वेळ काय करत होतास..

शौर्य डोळे मिटुन शांत बसुन असतो..

विराज : शौर्य मी तुझ्याशी बोलतोय..

शौर्य गाडीत असलेली म्युसिक सिस्टिमवर गाणी लावत मोठा आवाज करतो.. विराज आवाज कमी करत रागातच त्याच्याकडे बघतो

विराज : काय लावलयस तु शौर्य.. ?? खर तर मला तुझ्याशीना बोलायचंच नाही आहे.. पण अनघासाठी बोलतोय.. तिला अस वाटत की तु हॉल डीसाईड करावा.. नाही तर तुला नसत आणलं मी सोबत.. कसा वागतोयस तु आल्या पासुन..

शौर्य पुन्हा म्युसिकचा आवाज पुन्हा मोठा करतो..

विराज पुन्हा आवाज कमी करत रागातच त्याच्याकडे बघतो.. स्वतःला शांत करत तो गाडी ड्राइव्ह करतो.. 

ठरल्याप्रमाणे अनघा रेस्टोरेन्टजवळ विराजची वाट बघत असते.. सोबत तिची बहीणपण असते..

विराज गाडीतुनच दोघींना हात दाखवतच गाडीत बसायला सांगतो..

अनघा : हेय शौर्य कसा आहेस??

शौर्यच अनघा गाडीत आलीय ह्याकडे लक्षच नसत.. तो डोळे मिटून शांत बसुन असतो..

विराज : शौर्य... तुझ्याशी बोलतेय ती..

शौर्य : ओहहह.. सॉरी.. माझं लक्ष नव्हत.. कशी आहेस तु???

अनघा : तु शांत शांत का आहेस.. विराज ओरडलाय का तुला..

शौर्य : त्यालाच विचार..

अनघा : बाय दि वे मिट माय सिस्टर.. गाथा... 

विराज : आज नाही जायच हिला हॉस्पिटलमध्ये??

गाथा : आज सुट्टी घेतली..

कालचा आवाज ऐकुन शौर्य मागे वळुन बघतो..

गाथा : तु...???

शौर्य विराजकडे बघतो आणि उजव्या हाताने आपलं तोंड लपवत खाली बघतो..

विराज : तुम्ही ओळखता एकमेकांना??

गाथा : जिजु हा तुमचा भाऊ आहे??

अनघा : हो.. त्यात एवढं शॉक होण्यासारख काय आहे??

गाथा : दि काल तुला बोलली ना विवेकच्या बर्थ डे चा कॅक मेस केला. तो ह्याने केलेला.. हा आणि ह्याचे फ्रेंड्स होते ह्याच्या सोबत.. सगळेच ड्रिंक करून आलेले.. आणि हा पण.. एक तर विवेकचा कॅक खराब करून हा उलट त्यालाच मारत होता..  

शौर्य : काहीही काय बोलतेस.. मी ड्रिंक वैगेरे नव्हती केलेली..

विराज गाडी बाजुला थांबवतो..

विराज : तरी सकाळी मला तुझ्या अंगाला ड्रिंकचा वास येत होता.. मी विचारत होतो तुला.. कसला वास येतोय.. विचारत होतो की नव्हतो??

शौर्य : हा विर.. बट मी ड्रिंक वैगेरे नाही केली.. 

विराज : गेट डाऊन फ्रॉम दि कार..

अनघा : विराज काय करतोयस तु??

शौर्य : विर प्लिज यार.. तु माझा इन्सल्ट करतोयस..

विराज : शौर्य गाडीतुन खाली उतर आत्ताच्या आत्ता... तुला ऐकायला नाही येत मी काय बोललो ते.. खाली उत्तर गाडीतुन..

अनघा : विराज.. एवढं का ओरडतोयस त्याच्यावर.. मे बी गाथाचा काही तरी गैरसमज झाला असेल..

गाथा पण विराजला अस शौर्यवर भडकलेलं बघुन थोडं घाबरून जाते..

विराज : शौर्य गाडीतुन खाली उतर.. 

शौर्य : एक तर मी येत नव्हतो विर... तु जबरदस्ती घेऊन आलायस मला हे अस इन्सल्ट करायला सगळ्यांसमोर.. काल पासुन नुसतं मला हर्ट होईल अस वागतोयस.. नेहमीच माझं ऐकुन न घेता तु माझ्यावर अस ओरडत राहतोस.. 

आणि तु..( शौर्य मागे गाथाकडे तोंड करून बोलतो) 

काल मी बोललो होतो ना.. कॅकचे पैसे देतो म्हणुन. तुम्ही लोक दुसरा कॅक घेऊन पण बर्थडे करून शकत होते ना.. आणि तसही त्या रॉबिनने किल्ली फेकली त्या कॅक वर.. आणि ते ही चुकुन.. तरी मी सॉरी बोलायला आलो ना तुमच्या टेबलवर.. त्या मुलाला मध्येच माझा बाप काढायची काय गरज होती.. त्यानेच कॉलर धरली माझी... वर कॅक उचलुन माझ्या तोंडावर फेकुन मारणार होता.. पण मी खाली वाकलो नि तो कॅक रॉबिनच्या तोंडाला लागला..  म्हणुन मारलं मी त्याला.. इस्यु तो क्रिएट करत होता.. तरी तुला मीच चुकीच वाटतो.. 

अनघा : गाथा हा बोलतोय ते खरं आहे??

गाथा : मी ते ह्याच्या फ्रेंड सोबत बोलत होती.. मे बी माझं लक्ष नसताना हे सगळं झालं असेल..

अनघा :  तु सगळं काही माहीत नसताना कस काय त्याला ब्लेम करतेस?? आणि विराज तु..?? 

विराज : अनघा सकाळी ह्याच्या अंगाला ड्रिंकचा वास येत होता..

शौर्य : विर ते डिस्कॉमध्ये रॉबिनने सगळ्यांच्या अंगावर उडवलेलं ड्रिंक.. म्हणुन तो वास येत होता.. आणि खर सांगु मलाच यायच नाही तुम्हा लोकांसोबत.. सॉरी अनघा वहिनी.. तुम्ही लोक जावा..

शौर्य गाडीतुन बाहेर पडतो.. अनघा त्याची समजुत काढायला बाहेर पडते.. पण शौर्य बाजुने जाणाऱ्या टेक्सिला हात दाखवत टॉक्सित बसून तिथुन निघुन जातो..

(आता पुढे काय?? वाट पहा पुढील भागाची.. आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all