अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 60

In marathi

राज : वृषभ प्लिज लवकर सांग ना.. किती तो सस्पेन्स ठेवतोस तु..

वृषभ : न्यूयॉर्क मधल्या सनी कॉलेजने इंटरनेशनल डान्स कॉपीटीशनमध्ये एक डान्स केलाय त्याचा व्हिडिओ खुप व्हायरल झालाय.. मी तोच तुम्हांला दाखवायला इथे बोलावलंय..

रोहन : तु हाताने मार खाणार.. का.. तो केरम तुझ्या डोक्यात घालु.. हा व्हिडीओ दाखवायसाठी तु माझी झोप मोड केलीस..

राज : एक काम करतो.. मी आणि टॉनी ह्याला पकडत.. तु मार तुला हवं तेवढं.

वृषभ : एक मिनिट.. तुम्ही आधी हा व्हिडिओ बघा.. मग मला मारायच असेल तर मारा.. ठिक आहे.. मी इथेच आहे.. कुठेही जात नाही..

वृषभ मोबाईलमध्ये व्हिडीओ चालु करून मोबाईल रोहनच्या हातात देतो आणि तिथुन बाजुला जाऊन उभं राहतो..

वृषभ : आणि अजुन एक.. नाचणाऱ्यांचे फेस जरा नीट बघा.. 

सगळेच एक संशयी नजर वृषभकडे टाकत व्हिडीओ बघु लागतात..

सुरुवातीला तोंडाला मास्क लावुन 6 जण हॉलिवूडच्या गाण्यावरच स्टेजवर हिप-हॉप करत असतात..

राज : ह्यांनी तर चेहऱ्यावर मास्क लावलय.. कस कळणार..

वृषभ : किती घाई राज.. 23 मिनिट्सचा व्हिडीओ आहे. जरा धीर धर की मित्रा..

सगळे वृषभकडे बघत पुन्हा मोबाईलमध्ये बघु लागले..

म्युसिक मध्येच वाजयची थांबते..  तस स्टेज समोर 4 जण उभी राहतात.. त्याच्या मागे 2.. सगळेच तोंडावर लावलेला मास्क काढत बाजूला फेकतात.. राज आणि रोहन सोबत सगळेच त्या सहा जनांपैकी कोणी ओळखीच दिसत का ते बघतात.. पण कोणीच ओळखीच नसत. 

राज : हे तर सगळे फॉरेनर आहेत यार.. हा वृषभ टाईम वेस्ट करतोय..

राज अस बोलेपर्यंत परत म्युसिक वाजते..  हिप होप बिट्स असतात.. आणि तोच.. मागे आपले हात घेऊन उभे असलेल्या 2 जणांच्या हातावर आपला पाय ठेवत त्यांच्या अंगावरून स्वतःचा शरीराचा बेलेन्स करत एक उंच अशी बेकफ्लिप मारतच बरोबर सगळ्यांच्या मधोमध कोणी तरी येऊन मान खाली घालुन उभ रहातो..

रोहन : ग्रेट यार.. कसली भारी बेकफ्लिप मारलीना..

टॉनी : हो ना..

तोच इंडियनची फेमस शेमरू म्युसिक वाजु लागते.. स्टेजवर असणारे सगळेच डावा हात आपल्या तोंडासमोर धरत उजव्या पायाने बिट्स पकडुन नाचु लागले.. बिट्स चालु असताना मुली स्टेजवर येऊन प्रत्येकाच्या बाजुला येऊन उभे राहिले.. त्या देखील समोर डावा हात धरत उजव्या पायाने बिट्स पकडत नाचु लागले.. रोहन मात्र मधोमध उभा असल्याचे फक्त डोळे बघत होता. चेहऱ्या समोर हात धरल्यामुळे त्याला फक्त त्याचे डोळेच दिसत होते... समोर असेलाल हात बाजुला काढतच आता सगळे नाचु लागतात.. तसा मधोमध असलेला चेहरा सगळ्यांना दिसतो.. रोहनला तो चेहरा ओळखीचा वाटत असतो.. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून शौर्य असतो.. शौर्यने ठेवलेल्या त्याच्या नवीन लुक मुळे तो कोणाला ओळखुच येत नव्हता शिवाय रोहन.. मिडीयम-लॉंग वाढवलेले केस, त्यात त्याने मध्येमध्ये काही केसांना केलेलं ब्राऊनिश अस हायलाईट.. त्यासोबतच त्याने ठेवलेली बिअर्ड दाडी त्यामुळे तो ही इतरांप्रमाणे फॉरेनरच वाटत होता.. आणि डान्स करताना त्याच्या चेहऱ्यावर येणाऱ्या एक्सप्रेशनमुळे त्याला कोणीच ओळखु शकत नव्हत.. रोहन सोडुन बाकीची मंडळी फक्त डान्स बघत होते.. सुंदर अश्या गाण्यावर सुंदर असा डान्स बघतच रहावा अस सगळ्यांना वाटत असते.. 

तोच रोहन व्हिडीओ पॉज करून मोबाईल अगदी डोळ्यांसमोर धरत तो फेस नीट बघु लागतो..

समीरा : तु व्हिडीओ का पॉज केलास..??

टॉनी : काय यार रोहन.. किती छान डान्स चालु होता मुळात फॉरेनला हिंदी गाणी वाजतात...??

पण रोहनच कोणाच्याच बोलण्याकडे लक्ष नसत तो अजुनही मोबाईल अगदी जवळ घेऊन त्यात बघत असतो..

ए रोहन डोळे खराब होतील तुझे.. लांब धरून बघ तो मोबाईल.. आणि मेन म्हणजे व्हिडीओ चालु कर तो अस बोलत राज रोहनच्या हातातुन मोबाईल घेत व्हिडीओ पुन्हा चालु करणार तोच रोहन त्याचा हात पकडतो..

रोहन : ए वृषभ.. If I am not Wrong.. हा आपला शौर्य आहे यार..

रोहन अस बोलताच सगळे एकमेकांकडे बघत मोबाईलमध्ये पॉज केलेल्या त्या फोटोत बघतात.. समीरा तर लगेच रोहनच्या हातातुन फोन घेत शौर्यच्या नवीन लुककडे बघु लागते.. राज, टॉनी आणि सीमा पण समीराच्या जवळ जात नीट बघु लागतात..

वृषभ : You are correct Rohan.. तो शौर्यच आहे

राज : पुर्ण लुकच चेंज केलाय यार ह्याने.. कसला भारी दिसतोय हा लुक ह्याला.. वृषभ तु तरी कस ओळखलंस यार..??

वृषभ : बेस्ट फ्रेंड आहे यार तो. आयुष्यात फक्त एकदाच चुक झाली त्याला ओळखायला.. परत कशी होईल?? 

रोहन : एवढा भारी हा नाचतो पण?? काय बेकफ्लिप मारली मगाशी त्याने..

वृषभ : पूर्ण व्हीडील बघ.. बघतच राहशील त्याचा डान्स.. 

सगळेच व्हिडीओ परत चालु करून बघु लागतात... संपुर्ण व्हिडीओ संपेपर्यंत सगळे शौर्यकडेच बघत असतात..

राज : तिथे मित्र पण झालेत ह्याचे.. 

समीरा : एवढ छान नाचता पण येत ह्याला..

वृषभ : म्हणुन तर सेंटरला आहे तो..

रोहन : मी तर आजच बघतोय.. म्हणजे नॉर्मली डिस्कोमध्ये नाचायचा तो.. पण अस..

वृषभ : म्हणजे फायनली आपल्याला कळलं शौर्य न्यूयॉर्कला आहे ते..

टॉनी : तिथे तो हॉस्टेलमध्येच असेल ना?? आपण त्या हॉस्टेलमध्ये फोन करून तर शौर्यशी काँटेक्ट करू शकतो..

सगळेच गुगलमधुन सनी हॉस्टेलचा नंबर शोधु लागले..

रोहनने लगेच आपल्या मोबाईलवरून फोन लावला..

इथे शौर्यपण नेमकं लेक्चरला जायला निघत असतो.. तोच त्याला सिक्युरिटी आवाज देतच फोन आहे म्हणुन सांगतो..

शौर्य रिसेप्शनजवळ जातो..

शौर्य : गुड मॉर्निंग मॅम.

रिसेप्शनिस्ट : hey SD.. there were call for you..

इथे रोहन आणि इतर मंडळी रिसेप्शनिस्ट सोबत बोलताना त्याचा आवाज ऐकत असतात..

शौर्य : Mam'm I don't want to attend any call.. pls pass my message to them.. and say sorry for that.. and thanks to u..

एवढं बोलून शौर्य तिथुन जातो

रिसेप्शनिस्ट शौर्यकडे बघतच बसते.. शौर्यने सांगितलेला मेसेज सांगायला ती फोन हातात घेते.. पण फोन कट झाला असतो.. कारण शौर्य काय बोलला ते सगळ्यांनीच ऐकलं असत...

सगळे परत नाराज होऊन प्ले हाऊसमध्ये बसतात..

समीरा : एवढं का हा राग करतोय आपला..?? आय नो त्याला नवीन मित्र मंडळी मिळालीत.. म्हणुन आपल्याला अस विसरून कस जाऊ शकतो तो.. एकदा त्याला माझ्याशी पण बोलावसं वाटत नाही का..?

राज : तेव्हा तुला पण त्याच्याशी कुठे बोलावस वाटत होतं. (समीरा रागातच राजकडे बघते) म्हणजे मला म्हणायच आपल्याला पण कुठे त्याच्याशी बोलवस वाटत होतं..

समीरा : I know मी चुकली पण एवढी मोठी शिक्षा नाही देऊ शकत तो.. माझं प्रेम आहे त्याच्यावर.. त्याच्यासोबत मी खुप स्वप्न पाहिलीत.. आणि त्याने पण.. सगळं अस लगेच नाही ना तो संपवु शकत..

रोहन : समीरा प्लिज शांत होत तु..

वृषभ : सॉरी समीरा पण आज जरा स्पष्टच बोलतो.. त्याच्या जागी तु स्वतःला ठेव आणि मग विचार करना एकदा.. त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तु त्याला देत होतीस.. तो तर तुला तु केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देतोय.. आणि नात तु संपवलेलंस.. त्याने नाही.. तो तर शेवट पर्यंत ते नात जोडायचा प्रयत्न करत होता.. आम्ही तर मित्र आहोत ग. तु तर प्रेम करत होतीस ना.. इव्हन तो लास्ट टाईम मला बोलत होता.. समीरा खरच माझ्यावर प्रेम करत असेलना.. कारण समीराला नाही समजत माझं मन.. ती माझ्या फिलींग नाही समजत.. आणि खरच ते तु आज प्रूफ केलंस.. खर तर मगाशी त्या व्हिडीओमध्ये शौर्य आहे हे तुला आधी कळायला हवं होत.. कारण तो तुझा फियांसी होता.. पण ते रोहनला कळलं.. 

समीरा : हे सगळ बोलुन तुला हे प्रूफ करायचय की माझं शौर्यवर प्रेम नाही..रोहनच्या हातात फोन होता.. मी लांबुन बघत होते. मे बी म्हणुन त्याला माझ्या आधी कळलं असेल की तो शौर्य आहे.

रोहन : समीरा... कुल डाऊन.. वृषभ काय आहे तुझं.. काय बोलतोयस कळत तुला??

वृषभ : सॉरी...

एवढ बोलुन वृषभ रूममध्ये निघुन जातो.. राज आणि टॉनी पण त्याच्यासोबत रूममध्ये निघुन जातात..

★★★★★

शौर्य आपलं आयुष्य खूप सुंदर अस जगत होता.. आणि अश्यातच एक वर्ष सहज उलटुन गेलं.. त्याचे व्हेकेशन चालू झाले.. शौर्य व्हेकेशन सुद्धा मस्त एन्जॉय करत होता.. तोच एक दिवस विराज त्याला फोन करतो..

विराज : एक्साम कशी गेली??

शौर्य : एकदम मस्त.. 

विराज : पेकिंग झाली का तुझी??

शौर्य : कसली पेकिंग??

विराज : व्हेकेशनमध्ये तु येतोयस ना इथे. तूच बोललेलास..आठवतय ना तुला?? व्हेकेशनमध्ये लोणावळ्याला फार्म हाऊसला येणार आहेस ते.. 

शौर्य : हा म्हणजे मी बोललो होतो...पण मी नाही येत आहे.. मी इथेच राहतोय.. 

विराज :  शौर्य मी तुझं तिकीट बुक केलंय..

शौर्य : तु मस्ती करतोयस ना..

विराज : एक मिनिट मी सिरियसली बोलतोय.. थांब तुला व्हाट्सएप करतो तुझं तिकीट मग खर वाटेल तुला..

शौर्य : विर यार तु मला न विचारता कस काय बुक केलंस?? मला एकदा विचारायच ना.. मला नाही यायचय. तु तिकीट केन्सल कर... 

विराज : अस कस केन्सल करू.. तु उद्या येतोयस.. पेकिंग करायला घे..

शौर्य : विर प्लिज ना.. मला नाही यायचय.. समजुन घे ना.. आमचा शो आहे यार नेक्स्ट विक.. प्रॅक्टिस पण झालीय..

विराज : ते मला नाही माहीत.. तु उद्याच्या फ्लाईटने इंडियात परत येतोयस... मी तुला फक्त हे सांगायसाठी फोन केलाय की तुझं तिकीट बुक झालय.. पेकिंग नसेल केली असशील तर कर.. ओके..

शौर्य : विर सगळे भडकतील यार माझ्यावर.. मी अस अचानक तो शो स्कीप करून नाही येऊ शकत.. 

विराज : फ्लाईटचे डिटेल्स मी तुला पाठवतो.. ओके..

शौर्य : विर नेहमी तु तुझं तेच खर करतोस.. एकदा तिकीट बुक करताना मला विचारू शकत होता ना तु.. नेहमीच दादागिरी असते तुझी.. 

विराज : तु येतोयस की नाही..

शौर्य फोन वर शांतच बसतो..

विराज : शौर्य मी तुझ्याशी बोलतोय.. तु येतोयस की नाही..

शौर्य : विर मला राग येतोय तुझा.. तुला कितीही बोललं तरी तु तुला हवं तेच करतो.. 

विराज : येतोयस म्हणजे..

शौर्य : पेकिंग करायला घेतो.. ठेव.. बाय..
(शौर्य रागातच बोलतो)

विराज : गुड..

अनघा : विराज बस झालं.. मला अजुन हसु कंट्रोल नाही होत..

शौर्य : विर तुझ्यासोबत..

विराज : अनघापण आहे.. पण सोबत नाही काँफेरेन्स कॉलवर आहे.. आम्ही मस्ती करत होतो तुझी.. तु काय बोललेलास आठवत तुला.. मी व्हेकेशनमध्ये घरी येणार.. मी नाही इथे रहाणार.. आता काय झालं??

शौर्य : हा म्हणजे तेव्हा बोललेलो.. 

अनघा : ए शौर्य डोन्ट वरी... तुझ तिकीट वैगेरे काही बुक नाही केलंय.. ते विराज उगाच तुला त्रास देतोय..

शौर्य : विर खरच ना..

विराज : हम्म खरच... उद्या अनघा इथे येतेय.. कायमची..

शौर्य : खरच.. 

अनघा : हो माझी स्टडी झाली कम्प्लिट..

शौर्य : ग्रेट.. बाय दि वे कशी आहेस तु..

अनघा : मी मस्त.. आणि छान वाटलं तु तिथे रमतोयस हे बघुन.. विराज तु खुप लकी आहेस.. शौर्य सारखा भाऊ तुला मिळाला.. प्रत्येक गोष्ट ऐकतो तुझी..

शौर्य : लकी तर मी आहे.. कारण विर माझा भाऊ आहे.. 

विराज : ए शौर्य तु नेक्स्ट व्हेकेशनला तरी येशील ना इथे..?

शौर्य : बघु...

विराज : बघु म्हणजे..

शौर्य : लेट्स सी.. 

विराज : एक मिनिट तुला माहितीना नेक्स्ट इयर काय आहे ते..

शौर्य : हो बट मी ट्राय करेल..

विराज : शौर्य प्लिज यार हे ट्राय करेल काय असत.. तु नेक्स्ट इयर येतोयस मला माहित नाही.

शौर्य : मग कश्याला विचारतोस एवढं माहिती आहे तर.. आणि तुझ्या लग्नाला मी नसेल अस होईल का?? बाय दि वे लोकेशन कुठे असेल??

अनघा : कुठे म्हणजे?? मुंबईतच असणार...

शौर्य : मुंबई नको ना.. प्लिज...

विराज : शौर्य अजुन एक वर्ष आहे.. तु इथे आल्यावर आपण डीसाईड करूयात.. तु एन्जॉय कर ओके.. 

शौर्य : हम्म पण प्लिज मुंबईत नको हा लग्न.. 

विराज : मी बोललो ना तु इथे आल्यावर बघु.. तु टेन्शन नको घेऊस.. तुझी प्रॅक्टिस असेल ना.. प्रॅक्टिस कर..

शौर्य : बाय.. 

(शौर्य थोडं नाराज होतच फोन ठेवतो..)

★★★★ 1 वर्षानंतर  ★★★★


जवळपास 2 वर्षांनी शौर्य मुंबईला आलेला.. खर तर त्याला परत मुंबईत यायच नसत त्याला लोणावळा येथील फार्म हाऊसवर जायच असत.. पण विराजपुढे त्याच काही चालत नसत.. घरी आल्या आल्या सगळी मित्रमंडळी त्याला भेटुन आपला शेवटचा पेपर द्यायला जातात.. पण जाता जात संध्याकाळी शौर्य USA वरून आलाय आणि एक्साम संपली ह्या दोन गोष्टीच सेलिब्रेशन आहे हे त्याला सांगुन निघतात..

अनिता आणि विराज शौर्य येणार म्हणुन खास त्याच्यासाठी सुट्टी घेऊन आज घरीच थांबतात..

तिघेही डायनींग टेबलवर बसुन गप्पा मारत असतात.. विराज मात्र शौर्यकडे बघतच असतो..

शौर्य : तु अस काय बघतोयस..

विराज : काय अवतार केलाय तु स्वतःचा ते बघतोय... म्हणुन माझे व्हिडीओ कॉल उचलायचा नाहीस वाटत.. आणि केस काप आधी ते किती वाढलेत बघ.. 

शौर्य : अजिबात नाही हा.. मी केस वैगेरे कापणार नाही.. 

विराज : तु नाही कापणार??

शौर्य : नाही..

विराज : ठिक आहे.. तु रात्री झोपलास की मीच कापुन टाकेल.. तस पण एकदा झोपलास की तुला जाग कुठे असते..

शौर्य : मी दरवाजा लॉक करून झोपत जाईल..

विराज : माझ्याकडे ड्युब्लिकेट किल्ली आहे तुझ्या रूमची..

शौर्य : विर this is not fair हा.. मम्मा बघ ना ह्याला.. आता माझ्या केसांवरून पण प्रॉब्लेम आहे ह्याला..

अनिता : विर त्याला आवडत तर असु दे ना.. छान वाटतात त्याला..

(अनिता आज पहिल्यांदा शौर्यच्या बाजुने काही तरी बोलली असते..)

अनिता अस बोलताच शौर्य आपल्या भुवया उडवतच विराजला चिडवु लागतो..

शौर्य : बघ तर.. विरला ना फेशन कळतच नाही.. बाय दि वे माझा ब्रुनो कुठेय.. अजुन मला भेटायला कसा नाही आला..

विराज : मी त्याला तुझ्याच रूममध्ये ठेवलय..

विराज अस बोलताच शौर्य धावतच स्वतःच्या रूममध्ये जातो.. आणि ब्रूनोला जाऊन भेटतो. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात.. ब्रुनोसोबत असच गप्पा मारत तो गेलरीत बसतो..

तोच विराज त्याच्या रूममध्ये येतो..

विराज : शौर्य उद्या सकाळी लवकर रेडी होऊन बस.. आपण मेरिएज हॉल बघायला जातोय.. 

शौर्य : विर मुंबईत नको ना लग्न.. लोणावळ्याला ठेवुयात ना...

विराज : शौर्य आपण अनघाच्या फेमिलीचा पण विचार करायला हवा ना.. त्या लोकांना नाही पटणार..

शौर्य शांत बसतो..

शौर्य : मग माझी एक अट आहे तु श्रीला पत्रिका नाही देणार तुझ्या लग्नाची.. 

विराज : ए शौर्य मी अस कस करू यार... खास मित्र आहे तो माझा.. त्याला वाईट वाटेल..

शौर्य : तु मुंबई बाहेर लग्न नाही करू शकत.. श्री ला पत्रिका नको देऊ म्हटलं तर तु ते करू शकत नाही. मला USA वरून लोणावळा जाऊ दे तर ते पण नाही जाऊ दिलस तु.. जबरदस्ती मुंबईत घेऊन आलास.. एक तरी गोष्ट कर माझ्यासाठी.. सगळंच तु तुला हवं तसं का करतोस.. माझा पण विचार कर ना...

विराज : तु किती दिवस त्या लोकांपासून असं लपुन रहाणार. बस कर ना आता... आणि आज ना उद्या ती लोक तुला भेटतीलच शौर्य.. रोज इथे फोन येतात त्यांचे.. तुझ्याबद्दल विचारत असतात ते.. एक दिवस असा जात नाही की त्यांचा फोन येत नाही.. नको ना अजुन तानुस.. तुला ते तुझ्या आयुष्यात नको आहेत पण त्या लोकांना तु अजुनही त्यांच्या आयुष्यात हवा आहेस.. आय नो ते चुकलेत.. पण इट्स ओके शौर्य. दोन वर्षे झाली त्या गोष्टीला.. आणि लग्न हे मुंबईतच होईल.. कळतंय तुला.. तु थोडं स्ट्रॉंग हो.. आणि बस झालं आता.. उद्या आपण हॉल बघायला जातोय.. सकाळी 8 वाजता तैयार होऊन बस.. अनघा पण येणार आहे आपल्या सोबत.. आणि रात्री लवकर घरी ये जास्त उशीर नको करुस.

विराज शौर्यशी बोलुन सरळ त्याच्या रूममध्ये निघुन गेला.. 

शौर्य रागातच अनिताच्या रूममध्ये जातो..

शौर्य : मम्मा मला USA परत जायचय.. आत्ताच्या आत्ता..

अनिता लॅपटॉप बाजुला ठेवतच त्याच्याकडे बघते..

अनिता : काय झालं शौर्य. तु आजच आलायस आणि अचानक..

शौर्य : मम्मा नाही रहायच इथे. सगळंच विर ने त्याच्या मर्जीने करायच ठरवलं मग मला कश्याला बोलवलं इथे. मला नाही रहायच इथे.. माझं आज रात्रीचच तिकीट बुक कर. I want to go back..

अनिता : काय झालंय शौर्य??

शौर्य : मला नाही माहीत पण मला नाही अटेंड करायच हे लग्न.. त्याला द्यायचीय ना श्री ला पत्रिका देऊ दे.. माझ्यापेक्षा तो इंपोर्टन्ट आहे त्याला तर ते करू देत. मी पण ह्या पुढे विरच काही ऐकणार नाही..

शौर्य रागातच तिथुन निघुन आपल्या रुममध्ये जातो..

अनिताला खर तर काहीच कळत नसत की शौर्य अस का वागतो.. ती लॅपटॉप तसाच ठेवत विराजच्या रूममध्ये जाते.

विराजसुद्धा लॅपटॉपवर काम करत बसला असतो.

अनिता : शौर्यला परत USA ला जायचय.. त्याच तिकीट बुक कर.

(अनिता थोडं रुडलीच बोलते विराजशी)

विराज : काय??? आत्ताच तर त्याच्याशी बोलुन आलो मी.. आता परत काय झालं त्याला??

अनिता : प्रत्येक गोष्ट तो तुझी ऐकतो ना विर.. मग एक गोष्ट तर तु त्याची ऐकुच शकतोस ना. नाही दिलीस त्या श्री ला पत्रिका तर काय होणार सांग.. शौर्यपेक्षा तुला तो इंपोर्टन्ट आहे का?? आणि तुला ज्याला इनविटेशन द्यायच ते दे.. पण शौर्यच तिकीट बुक करून टाक.. त्याला जाऊ दे इथुन..

विराज : अग पण मम्मा.. तु पण..

तिकीट बुक झाली की त्याला सांग..अनिता मध्येच विराजला थांबवत बोलते आणि आपल्या रूममध्ये निघुन जाते..

विराज रागातच शौर्यच्या रूममध्ये जातो.. शौर्य फोनवर USAच्या मित्र मंडळींसोबत बोलत असतो.. 

विराज तिथेच थांबून तो कधी फोन ठेवतो ह्याची वाट बघत असतो.. 

फोन ठेवुन होताच शौर्य मागे वळून बघतो तर विराज

शौर्य : केलंस बुक तिकीट??

विराज रागातच शौर्यकडे बघतो..

शौर्य : तिकिट बुक केलंस??

विराज : नाही देत श्री ला पत्रिका.. तु इंपोर्टन्ट आहेस माझ्यासाठी.. अजून काही असेल तर सांग.. ते पण करतो. पण एक बोलु.. तुझा लुकच नाही तु पण बदलायस शौर्य.. 

शौर्य शांतच बसतो.. 

विराज रागातच शौर्यकडे बघत तिथुन निघुन सरळ आपल्या रूममध्ये येतो..


क्रमशः

(खरच विराज बोलतो तस वागेल...? शौर्यची संध्याकाळची पार्टी कशी असेल?? बघुया पुढील भागात आणि भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all