अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 54

In marathi

एक्सामच टाईम टेबल नोटिसबोर्डवर बघुन सगळ्यांच्याच पोटात गोळा आलेला असतो..

राज : बोलता बोलता 2nd सेमिस्टर पण आली यार..

शौर्य आपल्या मोबाईलमध्ये टाईम टेबलचा पिक काढत असतो..

समीरा : आपण डान्समध्ये करूयात पार्टीसिपेंट??

सीमा : बरी आहेस ना?? डान्समध्ये पार्टीसिपेंट केलंस तर प्रॅक्टिसला जावं लागेल रोज.. आणि मग अभ्यास कधी करणार..

समीरा : प्रॅक्टिस झाल्यावर.. आणि दिवसभर थोडी ना आपण हातात पुस्तक घेऊन बसणार..

सीमा : ते पण आहेच..

मनवी : मला पण करायचंय डान्समध्ये पार्टीसिपेंट.. पण मला अभ्यासाच टेन्शन आलंय खुप.. सगळ्यात जास्त तर अकाउंटच..

रोहन : शौर्य असताना मला टेन्शनच नाही कसल.. काय शौर्य??

शौर्य : रोहन.. गेल्या एक्सामला सिटिंग अरेंजमेंट होती तशी सेम ह्या वेळेला पण असेल अस नाही ना.

रोहन : ते पण आहेच म्हणा.. तस मी पासिंग पुरत तरी करून येईल अभ्यास.. पण तु आलास ना बाजुला तर टेन्शनच नाही मला कसलं..

मनवी : मी फर्स्ट इयर क्लीअर होईल ना...

(मनवी नाराज होतच बोलली)

रोहन : होशील ग...

मनवी : कशी होईल..?? माझा काहीच अभ्यास नाही झालाय.. त्यात अकाउंटचा तर A पण येत नाही..

वृषभ : तु लेक्चर तर अटेंड केलेस ना..

मनवी : आधीचे मिस पण झालेत ना..

वृषभ : मग शौर्य आहे ना त्याला विचार..आपल्या ग्रुपमध्ये तोच तर टोपर्स आहे.. 

राज : तुला आपल्या कॉलेजमध्ये बोलायच का??

वृषभ : तेच रे...

रोहन : हा यार गुड आयडिया.. शौर्य आहेना.. शौर्य शिकवेल तुला अकाउंट..

शौर्य : अजिबात नाही हा.. सगळ्यात कमी लेक्चर तर मी अटेंड केलेत.. मी माझा अभ्यास करू का हिला शिकवु.. मला नाही जमणार..

रोहन : मनवी डोन्ट वरी वृषभ शिकवेल तुला..

वृषभ : आर यु मेड.. माझे मार्क्स बघितलेस अकाउंटमधले..

रोहन : मग समीरा??

समीरा : मी डान्समध्ये पार्टीसिपेंट करतेय.. मी कधी शिकवू हिला.. हि सीमा शिकवेल तुला.. 

सीमा : मी पण डान्समध्ये पार्टीसिपेंट करायचा विचार करतेय..

मनवी : तुम्ही कोणीच मदत करत नाही यार मला... कसले मित्र मैत्रिणी भेटलेत मला..

सीमा : लेक्चर चालु असताना लेक्चरमध्येच लक्ष द्यायच ना.. नको तिथे का देतेस..

मनवी : पण नाही ना कळत सर शिकवतात ते..

शौर्य : आज लेक्चर नाहीत का??

वृषभ : सगळे लोक आत्ता एन्युअल डेच्या तैयारीला लागले असतील ना..आणि तस पण इको आणि एफ सी सोडलं तर सगळ्याच सब्जेक्टचा पोर्शन पूर्णपणे शिकवुन झालाय..

समीरा : मनवी तु डान्समध्ये करणार आहेस का पार्टीसिपेंट??

मनवी : मला नाही वाटत मी करेल..

समीरा : शौर्य तु पण चल ना.. डान्ससाठी... फक्त शौर्यच नाही आपण सगळेच करूयात...

समीरा अस बोलताच सगळे शौर्यकडे बघु लागतात.. पण शौर्य मात्र एक टक एक्सामच टाईम टेबल बघत बसला असतो.. 

वृषभ : एवढं काय बघत बसलायस..?? फोटो काढलास ना??

शौर्य : लास्ट पेपरमध्ये एवढा गेप का ठेवला.. चार दिवस सुट्टी..? त्यापेक्षा लवकर घ्यायचा ना पेपर..

राज : ए माझ्या आईंस्टीन ती सुट्टी आमच्यासाठी आहे रे.. तु एक काम कर त्या चार दिवसात मस्त पैकी दिल्ली फिरून घे..

टॉनी : होणं...

शौर्य : पुर्ण वर्ष टाईमपास केलात आणि चार दिवसात सिरियसली अभ्यास करणार तुम्ही..

समीरा : शौर्य मी तुला काही तरी विचारत होती...

शौर्य : सॉरी माझं लक्ष नव्हतं.. काय झालं??

समीरा : म्हणजे तुलाच नाही तुम्हां सगळ्यांनाच विचारत होती.. तुम्ही सगळे करणार का डान्समध्ये पार्टीसिपेंट??

शौर्य :  करूयात ना.. त्यात काय एवढं.. पण प्रॅक्टिस कधी आणि किती वेळ असेल??

समीरा : मी आणि सीमा आम्ही दोघी जाऊन विचारून येतो सगळी इन्फॉर्मेशन..

शौर्य : आपण सगळेच करूयात ना.. 

रोहन : हो... मला पण चालेल..

राज : आधी प्रॅक्टिस टाईमिंग बघुयात किती आहे.. 

समीरा : एक काम करते मी जाऊन विचारून येते... तुम्ही केंटींगमध्ये वेट करा माझा.. 

इथे समीरा आणि सीमा नोटिसबोर्डवर लिहिल्या प्रमाणे 3rd फ्लॉरवर जाऊन डान्सच्या प्रॅक्टिसचे टायमिंग वैगेरे विचारायला जातात आणि बाकीची मंडळी केंटिंगमध्ये बसुन एक्साम बद्दलच डिस्कशन करू लागले..

आणि नेमका फैयाज देखील 3rd फ्लोर्वरून आपल्या मित्रांसोबत मज्जा मस्ती करतच खाली येत होता..

समीराला अस 3rd फ्लॉरवरच्या दिशेने येताना बघुन तो खुप खुश होतो...

समीरा सीमाचा हात घट्ट पकडतच उजवीकडून जाऊ लागली तस तो तिची वाट अडवत उजवीकडे सरकला.. त्या दोघी जश्या डावीकडे झाल्या तस तो डावीकडे..

समीरा : फैयाज प्लिज स्टॉप दिस...

फैयाज : समीरा आय रिअली रिअली लव्ह यु.. आप क्यु नही समझ रहे हो मेरे प्यार को... ऐसा क्या हे जो उसमें हे और मुझमे नही..

समीरा : अभी मेंने बताना चालू किया तो रात हो जायेगी..

फैयाज : ओहहह.. इतनी सारी कमीया हे ऊस शौर्य में तो उसे छोड क्यु नही देती...

(फैयाज अस बोलताच त्याची इतर मित्रमंडळी समीराकडे बघुन हसु लागतात)

समीरा : Excuse Me I am talking about you.. And let me go please.. 

फैयाज : अरे इतना भी जलदी क्या हे.. थोडा शांतीसे बात करते हे ना.. गुस्सा बहोत जलदी होते हो आप...

समीरा : तुझं जैसे ड्रग्स एडिक्ट पर्सन से बात ही नही करनी मुझे.. और अभि ज्यादा कुछ बोलाना तो सिधा प्रिंसिपल सर के पास लेकर जाऊंगी...

फैयाज : हात पकड कर लेकरं जाओगे तो अभि चलने के लिये तैयार हे हम.. सिर्फ आपके लिये..

समीराला जास्त तिथे थांबन आत्ता अशक्य वाटत होतं.. 

समीरा : सीमा चल इथून...

सीमाचा हात पकडत ती रागातच तिथुन निघाली..

फैयाज : अरे समीरा रुको तो.. 

फैयाज मित्रांना घेऊन तिथेच बसला.. 

समीरा केंटींगमध्ये येऊन बसली..

शौर्य सगळ्यांपासून थोडं लांब उभं रहात फोनवर कोणाशी तरी बोलत होता.. समीरा आली ह्याकडे त्याच लक्षच नव्हतं..

रोहन : ए समीरा काय टायमिंग आहे ग प्रॅक्टिसचा.. ?? आणि कधीपासून प्रॅक्टिस चालु होणार..

समीरा डोक्याला हात लावुन शांतच बसते..

राज : काय झालं?? तु अशी शांत का आहेस.. मला अस वाटत सीमाचा डान्स बघून दोघींना रिजेक्ट केलं..

सीमा : शट आप राज... तो फैयाज त्रास देतोय हिला.. 3rd फ्लॉरवर बसुन काहीही बोलत होता... म्हणुन आम्ही परत आलो

सीमा मगाशी काय घडलं ते सगळ्यांना सांगु लागली..

रोहन शौर्यकडे बघतो.. शौर्य अजुनही फोनवरच बोलत असतो..

रोहन : चल मी येतो सोबत.. आपण जाऊन विचारून येऊयात.. आणि मला वाटत देऊन टाकुयात नाव.. तुम्ही सगळेच करणार ना पार्टीसिपेंट??

सगळे एकमेकांकडे बघत होकारार्थी माना हलवतात..

रोहन : चल समीरा...

समीरा : थोड्या वेळाने जाऊयात.. तो तिथेच बसला असेल..

रोहन : मी आहे ना.. काही नाही करणार तो चल तु..

रोहन अस बोलताच समीरा त्याच्यासोबत जाऊ लागली..

वृषभ : थांबा मी पण येतो..

मनवी : रोहन.. मारामारी नको हा. प्लिज..

रोहन : नाही करत.. तुम्ही लोक बसा इथेच मी आलो..

समीरा, रोहन आणि वृषभला घेऊन पुन्हा 3rd फ्लॉरवर जायला निघाली.. 

फैयाज तिथेच मस्ती करत बसलेला..

रोहन : ए फैयाज तेरा प्रॉब्लेम क्या हे?? क्यु छेड रहा हे इसे..

रोहन फैयाजची कॉलर पकडतच बोलला.

वृषभ : रोहन प्लिज.. मारामारी नको.. 

फैयाज : मेरा प्रॉब्लेम तेरेसे अच्छा कोई नही जाणता..

रोहन : समीरा तु आपल्या सगळ्यांची नाव देऊन ये.. मी इथेच आहे. 

समीरा : नाही नको.. तुम्ही माझ्यामुळे मारामारी कराल.. तु चल इथुन..

रोहन : नाही करत.. प्लिज जा इथुन.. आणि नाव देऊन ये..

रोहन अस बोलताच समीरा वृषभकडे बघते..

वृषभ : तु नाव देऊन ये.. मी रोहनसोबत आहे इथे..

समीरा रोहन आणि वृषभकडे बघतच तिथुन निघुन जाते..

समीरा गेली हे बघताच रोहन फैयाजची कॉलर सोडतो..

रोहन : देख फैयाज तेरे को ये टाईम में थोडा और ज्यादा प्यार से समजा रहा हुं.. (फैयाजची कॉलर नीट करतच तो बोलतो) समीरा शौर्य से प्यार करती हे तेरेसे नही.. येह बात तु तेरे दिमाग में अब अच्छेसे फिट करके रख.. और उसको छेडना बंद कर ओके और एक बात.. आज के बाद शौर्य को अगर उसके माँ से लेकर कुछ भी उलटा सीधा तु बोला. तो तेरी पुरी जनम कुंडली में उसको बताउंगा.. फालतु में क्यु पंगा ले रहा हे उसे... सुधर जा..लास्ट टाईम भी तुझे यही बोला था में... 15 दिन केलीय तुझे सस्पेंड किया था उसने.. भुल मत जा इतना जलदी.. अब ज्यादा कुछ करेगा तो कॉलेजसे हि आऊट हो जायेगा.. दोस्त हे इसिलीये समजा रहा हुं.. समझ जा ।

फैयाज : तुझे क्या लग रहा हे में इतनी आसानी से भुल जाऊंगा.. तेरे उस शौर्य को इस कॉलेजसे नही निकलवाया ना तो मेरा नाम फैयाज नही.. रही बात समीरा की.. उसको तो में पटाके ही रहुंगा। तु इन सबके बीच में मत पड यही तेरे लिये अच्छा होग. दोस्त हे इसिलीये तुझे प्यार से समजा रहा हुं...।

रोहन : तेरे को शांती से बोली हुई बात समझमें नही आती हे क्या??

फैयाज : में भी शांतीसे ही तो बोल रहा हुं.. नही तो तु भी अच्छेसे जानता हे ये फैयाज क्या कर सकता हे वो..

रोहन : तु..

रोहन काही बोलणार तोच समीरा येते तिथे.. आणि तो बोलायच थांबतो..

वृषभ : दिलीस नाव??

समीरा मानेनेच हो बोलते..

वृषभ : रोहन चल निघुयात इथुन..

फैयाज : ए रोहन... संभाल के लेकर जा अपनी भाभी को.. समीरा बाय...

रोहन काही बोलणार पण तोच  वृषभ त्याचा हात पकडत त्याला घेऊन केंटिंगमध्ये असतो.. शौर्य अजुनही फोनवरच असतो..

समीरा डोक्याला हात लावुन शांत रहाते.. फैयाजच्या बोलण्याचा तिला राग येत असतो.. एक प्रकारे चिडचिड होत असते तिची..

पाणी धर.. सीमा पाण्याने भरलेला ग्लास तिच्या पुढ्यात देतच तिला बोलली..

शौर्य फोनवरच बोलणं आटोपून आपल्या जागेवर येऊन बसतो..

शौर्य : काय टायमिंग आहे ग डान्स रियसलचा???

समीरा रागातच शौर्यकडे बघते..

शौर्य : काय झालं?? तु अस रागात का बघतेस??

समीरा : फोन बघु जरा तुझा...

(सगळेच समीराच वागणं आज बघतच रहातात)

शौर्य : का काय झालं?(समीराच्या हातात फोन देतच शौर्य बोलला..)

समीरा शौर्यची कॉल हिस्ट्री बघते तर त्यात तो विर सोबत बोललेला अस दिसत.. ती त्याच्याकडे एक नजर फिरवतच त्याच व्हाट्सए ऑपन करून बघते तर त्यावर तो ज्योसलीन सोबत व्हिडीओ कॉलवर बोललेला असही तिला दिसत... 

समीरा : मला वाटलंच होत.. तु त्या तुझ्या ज्यो सोबतच बोलत असणार.. धर तुझा फोन..

(समीरा रागातच शौर्यचा फोन टेबलवर ठेवते आणि तिथुन निघुन जाते)

शौर्य : हिला एवढ भडकायला काय झालं??

वृषभ : तुच बघ आत्ता.. 

राज : बेस्ट ऑफ लक शौर्य..

शौर्य : कश्यासाठी??

राज : आज पहिल्यांदाच WWE खेळायला जातोयस मित्रा... नंतर आम्हांला पण सांग मला कोण जिंकल ते.. का आम्हीपण येऊ बघायला..

शौर्य : नुसतं बघतोस काय?? तु थांब तुझ्यासोबतच खेळतो मी WWE.. आधी हिला बघुन येतो काय झालं ते...

वृषभ राजच्या खांद्यावर हात ठेवतच त्याला हसु लागतो..

समीरा नेहमी प्रमाणे प्ले हाऊसच्या पायरीवर हाताची घडी घालून रागातच शौर्यकडे बघत बसली होती..

शौर्य : तुला अस अचानक रागवायला काय झालं??

(शौर्य तिच्या बाजुला बसतच बोलला)

समीरा : मला तुझी तिथे गरज असताना तु त्या ज्योसलीनसोबत मस्त पैकी व्हिडीओ कॉलवर गप्पा मारत बसलेलास... आणि तुला काय एवढ सारख सारख त्या ज्योसलीन सोबत बोलायच असत शौर्य.. मला नाही आवडत तु तिच्याशी बोललेलं ही माझ्या मनातली गोष्ट कशी कळत नाही तुला...

शौर्य : तु अस का बोलतेयस.. फ्रेंड आहे ग ती.. आणि काल बोललो ना.. गोव्याला जातोय त्याच प्लॅनिंग करतोय.. काल रात्री उशीर झाला ना.. म्हणुन नाही जमलं त्या लोकांना फोन करायला.. आणि आत्ता तिथे रिसेस पण झाली असेल.. सगळेच भेटतील म्हणुन फोन केला. पण तु का एवढ भडकलीस.. आणि काय झालं सांग बघु ..

समीरा शौर्यला काय झालं ते सांगु लागली..

शौर्य : त्याला एवढ घाबरण्यासारखं काय आहे समीरा.. जो पर्यंत तु घाबरणार तो पर्यंत तो तुला त्रास देणार.. थोडी भीती त्याला पण दाखवना जशी आत्ता मला दाखवत होतीस..

समीरा : तु घाबरतोस मला..??

शौर्य : हा म्हणजे.. सोडुन गेलीस तर..

समीरा : आणि खरच गेली सोडुन तर..

शौर्य : मग काय...मी दुसरी बघेल.. एवढं काय त्यात.. 

समीरा रागातच शौर्यच्या दंडावर मारू लागते..

शौर्य : आ समीरा.. लागतो यार तुझा हात..आणि आपल्या होणाऱ्या नवऱ्याला कोणी अस मारत काय समीरा..??

समीरा : मग का अस बोलतोस..

शौर्य : सोडुन जाईल म्हणुन कोण बोललं आधी???

समीरा : गेली तर नाही ना..

शौर्य : मग मी पण कुठे दुसरी बघितली..

शौर्य हसतच तिला बोलु लागला.. तशी समीराला पण थोडं हसु येत.

समीरा : खरच बघशील तु.. तुझा काय भरोसा नाही..

शौर्य : नको ना अस बोलुस.. आणि अस सोडून जाण्याच्या गोष्टी तर अजिबात नको करुस.. मला त्रास होतो..

समीरा : शौर्य मला तुझा थोडा राग येतोय..

शौर्य : आत्ता परत काय केलं मी??

समीरा : म्हणजे मला नाही माहीत मला काय होतय.. पण मला तु त्या ज्योसलीनसोबत बोललेलं नाही आवडत.. 

(समीरा अस बोलताच शौर्यला हसु येत..)

शौर्य मी सिरियसली बोलतेय.. तु हसु नकोस ना.. 

शौर्य : हसु नाही तर काय करू.. तु ज्योसलीनला घेऊन पजेसिव्ह होतेयस.. 

समीरा : पण मला नाही आवडत तीने तुला फोन वैगेरे केलेला..

शौर्य : तिने फोन केलेला नाही आवडत मग ठिक आहे...मी तिला फोन करत जाईल मग तर झालं..

समीरा : राज ने हात फिरवला वाटत तुझ्यावर.. त्याच्यासारखेच जोक्स मारतोयस.. 

शौर्य : मित्र आहे.. आत्ता थोडे गुण नको का घ्यायला त्याचे.. मुंबईत गेल्यावर माझ्या मित्रमंडळींवर असे जोक्स मी नक्की ट्राय करेल निदान बोलतील तरी दिल्लीत जाऊन काही तरी नवीन शिकुन आलास..

समीरा : तु मुंबईला खरच जाणार??

शौर्य : हो..

समीरा तोंड पाडतच शौर्यकडे बघते...

समीरा : तुला जर मी बोलली नको जाऊस तर???

शौर्य : तर मग मी... तुला थोडं मनवेल..

समीरा : तरीही मी नाहीच बोलली तर..

शौर्य : तर मग तुला एक अस किस करेल(समीराच्या गालावर आपले ओठ टेकवतच तो बोलतो) आणि रिक्वेस्ट करत बोलेल प्लिज मला जाऊ दे.. प्लिज..

समीरा : तरीही मी नाही बोलली तर...

शौर्य : तर मग मी एकच करू शकतो...

समीरा : काय??

शौर्य : हा असा फोन हातात घेईल... विरला फोन लावेल आणि तुझ्याकडे देईल.. मग तुच बोल त्याच्याशी..

समीरा : नाही नको.. तु जा मुंबईला. 

शौर्य : तु नाही येणार???

समीरा : मला नाही यायच मुंबईला..

शौर्य : विचार कर.. मग तिथे ज्योसलीन आहे.

(शौर्य आपल्या भुवया उडवतच तिला बोलला)

समीरा : मग तु पण विचार कर इथे फैयाज आहे..

(समीरा आपल्या भुवया उडवत शौर्यला बोलते)

शौर्य : फैयाज??? आवडतो तुला?? आवडत पण असेल म्हणा.. तसा दिसायला स्मार्ट आहे तो पण.. 

समीरा : जरा पण सिरीयसनेस नाही शौर्य तुला.. तस पण तुला आहेत मित्र मंडळी तु एन्जॉय करशील तिथे.. जा तु मुंबईला..

शौर्य समीराकडे बघतच रहातो..

शौर्य : नक्की ना.. 

शौर्य अस बोलताच समीरा रागात त्याच्याकडे बघु लागते...

शौर्य : रागात पण खुप छान दिसतेस समीरा तु.. अस वाटत तुझ्याकडे बघतच रहावं..  एक फोटो काढुयात..??

शौर्य अस बोलताच समीराच्या गालावर थोडस हसु येत..

समीरा : कस जमत तुला माझी समजुत काढायला.. मी नाही जास्त वेळ तुझ्यावर रागवु शकत...

शौर्य : पण थोडा वेळ पण नको ना रागवत जाऊस.. 

तेवढ्यात बाकीची मित्र मंडळी प्ले हाऊसच्या दिशेने येऊ लागतात..

राज : ए शौर्य WWE झाली का?? आम्ही उशिरा आलो वाटत.. तरी मी ह्यांना बोलत होतो चला लवकर.. पण ऐकतच नव्हते..

शौर्य : तु खरच उशिरा आलास.. कधी पासुन तुझी वाट बघतोय ??

राज : कश्यासाठी??

शौर्य : तु नाही तर WWE कस खेळणार???

शौर्य पळतच राज जवळ जाऊ लागला.. 

ए रोहन वाचव मला... अस बोलत राज रोहनच्या भोवती पळु लागला..

शौर्य : खुप हौस आहे ना WWE खेळायची.. थांब खेळूयाच आत्ता.. रोहन तु बाजुला हो..शौर्य राजला पकडण्यासाठी रोहन भोवती फिरू लागला..

राज पळ इथुन... अस बोलत टॉनीने  मागुन शौर्यला घट्ट पकडतो..

राज : थेंक्स टॉनी...आणि बाय गाईज.. 

सगळ्यांना बाय करत राज हॉस्टेलच्या दिशेने पळाला...

रोहन : टॉनी तुला तुझ्या गर्लफ्रेंडची खुप काळजी आहे.. हे आज तु प्रूफ केलंस..

शौर्य : हो ना.. त्याला काही करायला गेलं तर ह्याला खुप त्रास होतो..

वृषभ : मला अस वाटत आपण ह्यालाच धुवुया...

टॉनी : ए नाही हा..

तिघेही मस्तीत टॉनीजवळ येऊ लागले.. टॉनी तिघांपासून स्वतःला वाचवण्यासाठी इथे तिथे पळु लागला..

नुसती दंगा मस्ती चालु होती सगळ्यांची..

मनवी : गाईज बस ना.. उशीर होतोय.. अभ्यासाला लागलं पाहिजे ना.. उद्या पासून डान्स प्रॅक्टिस पण चालु होईल..

शौर्य : टायमिंग काय आहे पण??

समीरा : 2 ते 3.30..

शौर्य : ओके.. ग्रेट..

वृषभ : अभ्यासाला पण लागलं पाहिजे.. आम्ही निघतो आत्ता..

रोहन : आम्ही पण निघतो.. 

मनवी : बाय गाईज.. 

रोहन आणि मनवी तिथुन जाऊ लागले..

शौर्य रोहनशी बोलतच गेटजवळ जाऊ लागला..

शौर्य : रोहन थेंक्स यार.. ते मगाशी काय घडलं ते समीराने सांगितलं मला.

रोहन : बस काय शौर्य तुझ्यासाठी एवढं तर करूच शकतो ना मी.. आणि टेन्शन नको घेऊस त्या फैयाजच.. आत्ता तुला काही बोलणार नाही तो.. 

शौर्य : हम्मम चल मग बाय.. अभ्यासात लक्ष दे जरा.. आणि ड्रग्स वैगेरे पक्का बंद केलंस ना तु??

रोहन : तुझी शप्पथ घेतली यार.. तुला वाटत मी मोडेल तुझी शप्पथ..

शौर्य : हम्म ते पण आहे म्हणा.. चल मग जा सांभाळुन..

मनवी : तु ह्याच्या गर्लफ्रेंडसाठी एवढं करतोस पण हा माझ्यासाठी काहीच करु शकत नाही..

मनवी अस बोलताच शौर्य तिच्याकडे बघु लागतो..

म्हणजे.. साधं अकाऊंट शिकवायला सांगते.. ते तु करत नाहीस अस बोलायचय मला..

शौर्य : तुला अकाऊंटमध्ये काही डाऊट असतील तर नेक्स्ट डे कॉलेजमध्ये येऊन मला विचारत जा.. मला जमलं तर मी तुझे डाऊट सोल्व्ह करायला मदत करत जाईल..

मनवी : नक्की..

शौर्य : हम्मम

रोहन : थेंक्स यार शौर्य.. चल बाय.. बाय गाईज..

★★★★★

रात्री सगळेच शौर्यच्या रूममध्ये बसुन एकदम सिरियसली अभ्यास करत असतात..

शौर्य मात्र मोबाईलमध्ये काही तरी करण्यात बिजी असतो..

वृषभ : तुझा अभ्यास झाला वाटत..

शौर्य : नाही रे.. करेल थोड्या वेळाने..

टॉनी : तु ते दुपारी एवढा वेळ ज्योसलीन सोबत काय बोलत होतास??

शौर्य : अरे ते आम्ही गोव्याला चाललोय ना.. त्याच प्लॅनिंग करत होतो..

राज : काय तु आणि ज्योसलीन गोव्याला चाललेत.. आणि समीराने परमिशन दिली का??

शौर्य : तुझं डोकं खरच विचित्र आहे यार.. आम्ही म्हणजे.. माझे मुंबईचे फ्रेंड्स पण आहेत.. आम्ही सगळे मिळुन चाललोय.. वेकेशन एन्जॉय करायला..

वृषभ : आणि आपल्या वेकेशनच काय??

शौर्य : आपलं कुठे काय ठरलेलं??

वृषभ : ए शौर्य मी तुला त्यादिवशीच सांगितलेलं आपण दोन विक इथे राहुन मग घरी जातोय..

शौर्य : पण आपल कुठे जायच ठरलं तर नाही ना..

टॉनी : एवढ्या लवकर थोडीना ठरवणार.. पण आपण जाणार होतोच..

वृषभ : शौर्य नेहमी असच करतोस तु..

शौर्य : ए नेहमी कुठे.. पहिल्यांदाच अस केलं..

राज : पहिल्यांदा कुठे.. त्यादिवशी पण डिनर केन्सल केलस आमच..

वृषभ : आपण पण जातोय फिरायला..

शौर्य : वृषभ.. तिकीटी बुक झाल्यात यार.. हे बघ तेच बघतोय मी..

राज : एक महिना आधी तुम्ही तिकीट बुक करताय??

शौर्य : ते जाताना आम्ही ट्रेन ने जातोय म्हणजे मस्त मज्जा मस्ती करता येईल तिथुन येताना फ्लाईट ने येऊ.. 

वृषभ : मग जाच तु.. आम्हांला नाही बोलायच तुझ्याशी..

वृषभ रागातच रूममधुन बाहेर पडला..

राज : आम्हां दोघांना पण..

शौर्यला आत्ता त्यांना कस समजवायच कळत नाही..

(आत्ता बघु कशी समजुत काढतो आपल्या मित्रांची ते...आणि हा भाग कसा वाटला?? ते सांगायला विसरू नका.. धन्यवाद)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all