अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 46

In marathi

शौर्य वृषभने सांगितलेल्या प्लॅनचा विचार करू लागतो..

राज : कसला एवढा विचार करतोयस??

शौर्य : मला भीती वाटते..म्हणजे हे अस काही करायला नको वाटत.. अजून दुसर काही मार्ग निघतो का बघुयात ना. 

टॉनी : आत्ता तो काही ऐकत नाही आणि त्यात तु समाजसुधारक तुझा हट्ट सोडत नाही म्हटलं तर काय करायच सांग.. 

वृषभ : जर हा प्लॅन नाही मग आपण आत्ता एकच करू शकतो.. सरळ जाऊन मनवीला सांगुयात.. ती त्याला समजवेल.. मनवीच्या शब्दाबाहेर तो जाईल अस नाही वाटत मला..

राज : सकाळ सकाळी जास्त बदाम खाल्लेलेस वाटत.. कस सुचत कस यार तुला..

शौर्य : आर यु मॅड वृषभ.. जर रोहनला कळलं तर आपण अस काही केलंय ते?? आणि मनवीला नकोच सांगायला..

राज : रोहनला कळलं तर कळू दे.. त्याच्या भल्यासाठीच तर करतोय आपण..

वृषभ : हो ना.. 

टॉनी : मी एक काम करतो.. मीच मनवीला फोन करून सांगतो रोहनला समजवायला.. आणि तिला सांगतो की आम्ही सांगितलं हे सांगु नको.. तुला बाहेरून कळलं अस सांग..

शौर्य : तरी नकोच..

सगळेच शौर्यकडे रागात बघत बसतात..

शौर्य : अस का बघताय तुम्ही लोक.. 

वृषभ : मग कस बघु अजुन.. मनवीला सांगितलं तर ती....

शौर्य काही बोलणार तोच त्याचा फोन वाजतो.. आणि शौर्यच बोलणं अर्धवटच रहात.. विराजचा फोन तो टाळू शकत नव्हता.. आलोच मी.. अस बोलत शौर्य विराजसोबत बोलायला गेलरीत येतो..

शौर्य गेलरीत जाताच राज आपल्या फोनवरून मनवीला फोन लावतो.

मनवी : हा बोल राज..

राज : कुठेस तु??

मनवी : जस्ट इंग्लडला आलीय..

राज : काय?? खरंच??

(राज थोडं चकित होत बोलतो)

मनवी : काय खरच.. घरी आहे मी.. तसही ह्या वेळेला घरीच असणार ना..?

राज : बर थोडं सिरीयस होऊन ऐकणार असशील तर आम्ही बोलतो..

मनवी : आम्ही?? म्हणजे अजुन कोण आहे तिथे..

राज : आम्ही म्हणजे वृषभ आणि टॉनी पण इथेच आहे..

मनवी : काय झालं??

राज : तु रोहनला आमच नाव सांगणार नाहीस आधी प्रॉमिज कर बघु..

मनवी : काय झालं?? तु अस का बोलतोयस??

टॉनी : ए मनवी.. तु कर बघु प्रॉमिज आधी..

मनवी : बर प्रॉमिज.. मी नाही सांगत त्याला.. बोल काय झालं??

दोघेही वृषभला इशारा करतात.. की तु सांग..

वृषभ : मनवी.. ते रोहनला ह्या वेळेला तुझी गरज आहे.. म्हणजे तुला माहिती की तो आधी ज्या मित्र मंडळीत रहायचा ती चांगली नाहीत.. म्हणजे त्यांना ड्रिंक्स करणं.. स्मोकिंग करणं आणि ड्रग्स वैगेरे घेण..  ह्या सगळ्या सवयी आहेत.. त्यांच्या सोबत राहुन रोहनला पण त्या सवयी लागल्यात.

मनवी : तु काय बोलतोस ते कळत का तुला वृषभ..? रोहन आणि ड्रग्स वैगेरे?? तो फक्त बिअर घेतो ते ही माझी परमिशन घेऊन.. त्या व्यतिरिक्त त्याला कसलच व्यसन नाही..

वृषभ : मग त्यादिवशी कॅक वर केंडल पेटवायला त्याच्याकडे लायटर कस आलं.. आणि त्याने शौर्यला सांगितलं की तो ड्रग्स पण घेतो. हे बघ आम्हाला अस वाटत की ह्या सवयी त्याच्या सुटतील. जर तु त्याला सांगितलंस तर.. तो तुझ्या प्रत्येक गोष्टी ऐकतो..

(वृषभच बोलणं ऐकुन मनवी शांतच होते.. काही बोलतच नाही)

राज : तु ऐकतेस ना??

वृषभ : हॅलो मनवी..

मनवी : वृषभ मी कस रिएक्ट होऊ हेच मला कळत नाही.. कारण एवढी मोठी गोष्ट तो माझ्यापासुन कस काय लपवु शकतो..?? अश्या एडिक्ट मुलासोबत मी.. डीसगस्टींग..

वृषभ राज आणि टॉनीकडे बघु लागतो..

राज : ए मनवी.. ह्या वेळेला त्याला तुझी गरज असणार यार आणि तु थोडं विचार कर ना.

टॉनी : हो ना.. ही सवय पण सुटेल त्याची.. आपण सगळे त्याला बाहेर काढु ह्यातुन..

मनवी : रोहन ड्रग्स एडिक्ट आहे यार.. एवढी मोठी गोष्ट कस काय तो माझ्यापासुन लपवु शकतो.. एकदा तरी त्याने मला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतंना..

वृषभ : तु त्याला सोडून जाशील ह्या भीतीने नाही सांगितलं असणार त्याने..

मनवी : मग तुम्हांला काय वाटत मी हे सगळं ऐकुन राहील त्याच्यासोबत??.. मी नाही राहु शकत असल्या मुलासोबत..

मनवी रागातच फोन कट करते..

आता तिघेही घाबरून जातात.. आपण उगाचच हिला फोन केला अस तिघांना वाटु लागत..

राज : करायला गेलो एक आणि झालं एक.. काय करायच आत्ता??

(शौर्य आपला फोन ठेवतच गेलरी बाहेर येतो)

वृषभ : शौर्य येतोय शांत बस आत्ता..

शौर्य : काय करूयात आपण??

राज : तूच ठरव..आम्ही ट्राय केलं सगळं भलतंच होऊन बसल.

शौर्य : काय??

राज : कुठे काय?? तु डिसीजन घे. आम्ही तुझ्यासोबत आहोत.. हो ना रे..

हो.. (वृषभ आणि टॉनी एकत्रच बोलतात.

टॉनी : तु काय करायच ठरवलंस??

शौर्य : मला काय वाटत बोलु.. मनवीला फोन नको करूयात.. म्हणजे तुम्हाला पटलं तर बघा.. तिला मी जेवढं ओळखतो.. त्यावरून मला अस वाटत.. she don't care about Rohan.. तिला नाही काही फरक पडणार.. उगाच ती त्याच्या ह्या सवयीमुळे उलट सुलट डिसीजन घेईल.. परत रोहन लास्ट टाईम सारख सुसाईड वैगेरे करायला जाईल.. मनवी हा टॉपिक नको..

तिघेही एकमेकांकडे बघु लागतात..

शौर्य : तुम्ही असे एकमेकांकडे काय बघतायत?? 

वृषभ : आम्ही थोडं विचार करतो आणि येतो.. 

तिघेही तिथुन निघुन वृषभच्या रूममध्ये जाऊन मनवीला फोन लावत बसतात.. पण मनवी काही फोन उचलत नाही.. 

राज : ह्या नंतर मी प्रत्येक गोष्ट शौर्यला विचारून करेल. 

टॉनी : बट मनवी एवढी सेल्फीश सारखी कस काय वागु शकते यार.. 

राज : हो ना.. आत्ता आपण काय करायच वृषभ??

वृषभ : मला काही सुचत नाही यार.. 

तिघेही मनवीला कँटीन्युअस फोन लावत रहातात.. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही..

इथे मनवी रोहनबद्दल ऐकुन खुप चिडचिड करत असते.. रागातच ती फोन हातात घेत रोहनला लावते..

हॅलो स्वीट हार्ट... रोहन नेहमीप्रमाणे मनवीशी बोलतो..

मनवी : रोहन तु ड्रग्स घेतोस??

रोहन : तुला कोण बोलल???

मनवी : हो की नाही.. 

रोहन शांतच बसतो..

मनवी : एवढी मोठी गोष्ट तु माझ्यापासुन कशी काय लपवु शकतोस रोहन..?? 

रोहन : हे बघ मनु.. मी तुला सांगणार होतो.. पण मला नव्हतं कळत की कस सांगु.. आणि मला भीती वाटत होती ग तु मला सोडुन जाशील ह्याची.. प्लिज रागवु नकोस माझ्यावर..

मनवी : रोहन जर तु स्वतः येऊन मला विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगितली असतीस तर कदाचित मी माझ्या मनाला समजावल असत आणि तुझ्यासोबत असती.. तुला ह्यातुन बाहेर काढायला मदत पण केली असती. पण अस इतरांकडुन तुझे असले कारनामे कळल्यामुळे खुप हर्ट झालीय मी रोहन..

रोहन : मनु आय एम सॉरी.. प्लिज..

मनवी : सॉरी फॉर व्हॉट रोहन.. मी नाही राहू शकत यार तुझ्या सारख्या ड्रग्स एडिक्ट मुलासोबत.. 

रोहन : प्लिज अस नको ना बोलुस... मला नाही जमणार ग तुझ्याशिवाय रहायला..

मनवी : सॉरी रोहन मला पण नाही जमणार तुझ्यासारख्या ड्रग्स एडिक्ट मुलासोबत रहायला आणि हे रिलेशन पुढे न्यायला.. 

रोहन : मनवी प्लिज.. 

मनवी रोहनच काहीही ऐकुन न घेता फोन कट करून टाकते..

रोहन पुन्हा तिला फोन लावतो पण ती फोन काही उचलत नाही..

त्याच डोकं काही काम करत नसत.. रूममध्ये इथुन तिथुन फेऱ्या मारतच तो मनवीला वारंवार फोन लावत रहातो.. 

शेवटी त्याला पण कळुन चुकत की ही काही आपल्याला परत फोन करणार नाही.. पुर्ण अंग त्याच थरथरू लागत.. थरथरत्या हातानेच तो बेडच्या कोपऱ्यात लपवुन ठेवलेले सिरिन्ज काढत हातात घेतो.. आपल्या डाव्या हातावर सुई टोचतच तो त्याला लागलेली ड्रग्सची तहान भागवतो.. पंधरा विस मिनिटं बेडवर आपलं डोकं ठेवत तसाच पडुन रहातो.. डोळ्यांतुन पाणी येत असत त्याच्या आणि त्याच सोबत मनवीसोबत घालवलेले क्षण त्याला आठवत असतात.. 

कपाटातून बिअरची बॉटल काढतच त्याच्या रूमच्या गेलरीत जाऊन बसतो.. खिश्यातुन सिगारेट काढत लायटरने पेटवत.. बिअरच्या प्रत्येक घोटासोबत सिगारेटचा धूर उडवत असतो..

इथे संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली तरी अजुन मित्र मंडळी आली नाहीत.. म्हणून शौर्य स्वतः त्यांना बघायला गेला.. 

तिघेही वृषभच्या रूममध्ये बसुन काही तरी विचार करण्यात हरवुन गेलेली..

शौर्य : काय झालं?? चला जेवायला..

वृषभ : आत्ता येतच होतो.. 

सगळेच जेवण आटोपुन येऊन शौर्यच्या रूममध्ये येतात..

वृषभ : शौर्य.. एक विचारू...??

शौर्य : तु कधीपासून माझ्याकडे परमिशन मागायला लागलास??

वृषभ : विचारू की नको ते सांग..??

शौर्य : विचार..

वृषभ राज आणि टॉनीकडे बघतो.

राज नकारार्थी मान हलवुन त्याला शौर्यला काही सांगु नको अस सांगतो..

वृषभ : जर समज आपण मनवीला फोन केला.. आणि तिला सांगितलं रोहनबद्दल.. आणि तीने रोहनला सोडुन जायची धमकी दिली तर.. रोहन काय करेल??

शौर्य : तु वेडा आहे का..म्हणुन तर मी मगाशी बोललो.. आपण दुसर काही तरी मार्ग काढुयात..

वृषभ : पण ह्याच उत्तर तर दे..

शौर्य : तुम्ही लोकांनी मनवीला फोन केला का??

(शौर्य थोडं सिरीयस होतच बोलतो)

वृषभ : आधी माझ्या प्रश्नाच उत्तर दे.. 

शौर्य : मला कस माहिती असणार रोहन काय करेल ते.. मी अस्ट्रोलॉजर थोडीना आहे.. आता तु का अस विचारतोयस ते सांग..

राज : आम्ही मगाशी कॉल करायचा विचार करत होतो मनवीला..

शौर्य : अजिबात नाही हा.. तिला नको कॉल करुस तिला.. रोहन ड्रग्स घेतो ही गोष्ट खर तर आपल्या आधी तिला माहिती पडली असती.. जर तीच खरच त्याच्यावर प्रेम असत तर..  वृषभ हा प्लॅन नको.. मला अस वाटत तो पहिला वाला प्लॅन मे बी काम करेल...

वृषभ : हम्मम... बघुयात.. ऐकणं मला आत्ता खुप झोप येतेय.. आपण उद्या बघुयात कॉलेजमध्ये गेल्यावर..

शौर्य : बर ठिक आहे.. गुड नाईट..

तिघेही आपापल्या रूममध्ये जातात.. 

★★★★★


दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे सगळे कॉलेजला जाऊन रोहनची वाट पाहु लागले.. सर देखील वर्गात आले पण रोहनचा अजुन काही पत्ता नव्हता..

राज : आज येणार नाही वाटत हा??

वृषभ : तो नाही आला तर आपण त्याच्या इकडे जाऊयात.. 

राज : तुला घर माहिती त्याच??

वृषभ : काल रात्री तु टेन्शनमध्ये येऊन ड्रिंक केलीस का??

राज : अस का बोलतोस.. नीट बोल ना यार..

वृषभ : मग तुला त्याच घर कस नाही माहीत..

राज : आत्ता नाही माहीत तर नाही माहीत..

वृषभ : त्याच्या बर्थडे ला आपण आफ्रिकेत गेलेलो का?

राज : अरे हा.. मी विसरलोच.. आय मिन मी विचारच नाही केला

वृषभ : विचार करण्यासाठी काही तरी लागत.. ते नाही तुझ्याकडे.. I know that. पण आता प्लिज माझ्याशी बोलु नकोस.. सर बघतायत इथे आपल्या दोघांकडे.

वृषभ अस बोलताच राज तोंड वाकड करतच त्याला चिडवत त्याच्याकडे बघतो.

वृषभ त्याच्या हनुवटीला पकडत त्याच तोंड समोर करतो.. तस त्याच लक्ष त्याच्या समोर उभ्या असलेल्या सरांकडे जात..  सर त्याच्याकडे रागातच बघत असतात..

सर : If you are not interested in this lecture please leave this class.. 

राज : सॉरी सर..

( अस नेहमी माझ्यासोबतच का होत?? राज थोडं रडक तोंड करत स्वतःला बोलला)

वृषभ तोंडावर हात ठेवतच त्याला हसतो..

सर ब्लॅकबोर्डवर काही तरी लिहायला वळतात तस राज रागातच वृषभच्या पायाला चिमटा काढतो..

आह... राज काय करतोस??? वृषभ जोरातच ओरडतो.. सरांसकट संपुर्ण क्लासरूम वृषभकडे बघु लागतात..

सर : both of you leave my class now..

वृषभ : Sorry Sir..please sir..

सर : last chance... I don't want to hear any noise now..

सर रागातच वृषभ आणि राज ला बोलतात.. आणि पुन्हा ब्लॅकबोर्ड वर काही तरी लिहु लागले..

शौर्य पाठी वळून दोघांना काय झालं म्हणुन विचारतो..

वृषभ : त्रास देतोय हा.. 

शौर्य : आत्ता परत त्रास दिलाना मग मला सांग.. त्याला बरोबर बाहेर पळवतो मी इथुन..

शौर्य राजकडे रागात बघतच पुढे बघतो..

शौर्य काहीही करू शकतो हे राजला माहिती असत तस तो शांत बसतो.. 

लेक्चर संपताच सर बाहेर जातात. तस वृषभ राजचा गळ्या भोवती पकडतच त्याच्या डोक्यावर मारू लागतो..

राज : टॉनी हा बघ ना..

टॉनी : ए वृषभ सोड ना. काय चालेल तुम्हा दोघांच मागासपासून..??

वृषभ : तुझ्या गर्लफ्रेंडला बोल ना.. जोर जोरात चिमटे काढत बसतोय.. मुलींसारखे.. तेही लेक्चर चालु असताना..

शौर्य : हा रोहन आलाच नाही यार..

(दोघांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतच शौर्य बोलला)

राज : तेच मी ह्याला बोलत होतो तर हा मला उलट सुलट बोलायला लागला..

वृषभ : बस ना.. राज.. किती रडणार तु.. रडु बाई कुठचा..

राज : तूच आहेस..

टॉनी : दोघांनी शांत व्हा यार.. प्लिज.. 

शौर्य : मनवीला माहीत असेलना तो का नाही आला ते.. तिला विचार ना तु...

शौर्य अस बोलताच टॉनी वृषभ आणि राजकडे बघतो.. 

शौर्य : काय झालं?? विचार तिला..

टॉनी : अ..हो.. विचारतो.. 

टॉनी मनवीला विचारणारच तोच अकाउंटचे सर क्लासरूम मध्ये येतात..

शौर्य : काय यार तु पण..

टॉनी : कॉलेज सुटल्यावर विचारुयात.. 

चौघांनाही कधी कॉलेज सुटत अस झालेलं.. आणि फायनली बेल वाजते..

तस राज आणि वृषभ मनवीच्या डेस्कवर जातात..

राज : तु आमचा फोन का नाही उचलला काल..

मनवी : मला नव्हतं बोलायच होत. नाही उचलला..

वृषभ :काय झालं मनवी..??आणि रोहन का नाही आला?

मनवी : मला कस माहीत असणार तो का नाही आला ते.. तुझ्याकडे नंबर असेल तु कॉल कर आणि विचार त्याला..

समीरा : मनवी काय झालं?? तु अस रागात का बोलतेयस..

मनवी : चिडचिड होतेय ग समीरा माझी.. मी काय करू??

शौर्य मनवीच बोलणं ऐकायला तिथे थांबत नाही..तो रोहनला फोन लावतच क्लासरूम बाहेर पडतो.. 

रोहन कुठेस तु?? रोहन फोन उचलताच शौर्य बोलतो..

रोहन : कॉलेजमध्ये आणि कुठे असणार..?

शौर्य : मग लेक्चरला का नाही आलास??

रोहन : माझी मर्जी नाही आलो..

शौर्य : तु अस का बोलतोयस? तु कुठेस सांग मी येतो तिथे..

कॉलेजच्या गेट बाहेर..

बाकीची मंडळी सुद्धा तिथे येतात..

वृषभ : कुठेय तो??

शौर्य : कॉलेजच्या गेट बाहेर..

सगळेच गेट बाहेर जाऊन बघतात..

रोहन त्याच्या पहिल्या मित्रमंडळीसोबत आपल्या बाईकवर बसुन असतो.. त्याला अस बघुन सगळ्यांनाच आश्चर्य वाटत..

सगळे त्याच्या जवळ जातात..

वृषभ : रोहन तु लेक्चरला का नाही आलास??

रोहन : माझी मर्जी..

वृषभ शौर्यकडे बघतो.. शौर्य रोहनच्या मागे बसलेल्या फैयाजकडे रागात बघत असतो..

वृषभ: रोहन चल बघु इथुन..आपण केंटिंगमध्ये जाऊन बोलूयात..

रोहन : तुम्ही लोक जावा इथुन...मला नाही यायच तुमच्यासोबत..

शौर्य : तुला काय झालं अचानक कळेल का मला?? 

रोहन : मनवी यु आर राईट.. ह्याला गोष्टी करून न केल्याचा खोटा आव चेहऱ्यावर आणायला खुप छान जमत.. ह्यानेच तुला काल फोन करून सांगितलं ना माझ्याबद्दल??

वृषभ : एक मिनिट.. मनवीला शौर्यने नाही सांगितलं.. आम्ही तिघांनी सांगितलं.. शौर्यला माहीत पण नाही ह्या गोष्टीबद्दल काही.. 

रोहन : तु तर बोलूच नकोस.. तु तर वकील आहेस ह्याचा.. आणि शौर्य तूच बोललास ना तु जा तुझ्या फैयाज सोबत.. बघ लगेच ऐकलं मी तुझं..

शौर्य : त्याआधी पण मी काहीतरी बोललेलो रोहन तुला. तु ते नाही ऐकलस.. ही गोष्ट पटकन ऐकली तु.

रोहन : कोण आहेस कोण तु माझा. जे मी तुझं ऐकायला.. आणि माझ्या लाईफमध्ये इंटरफेर करायचा अधिकार तुला कोणी दिलाय शौर्य..? स्वतःची लाईफ बघ आधी किती कॉम्प्लिकेटेड आहे ते.. मग दुसयाच्या लाईफमध्ये डोकावुन बघ.. 

शौर्य रोहनकडे बघतच रहातो..

समीरा : रोहन तु खुप जास्त बोलतोयस शौर्यला.. 

रोहन : तसा हा पण अतीच वागला ना. काय गरज होती मनवीला फोन करायची..

शौर्य : रोहन मी नाही केला यार मनवीला फोन आणि ह्या लोकांनी तिला फोन केला हे पण मला आत्ता तुझ्या पुढ्यात कळलं.. मनवी पण इथेच आहे.. तु विचारु शकतोस तिला..

फैयाज : ए रोहन यार लेट हो रहा हे। क्यु फालतु में इन लोगोंके मूह लग रहा हे। तेरेको पेहले ही समज जाना चाहीये था ये कैसा हे करके..

शौर्य : रोहन तु कुठेही जाणार नाहीस.. तु चल बघु माझ्यासोबत..

रोहन बाईकला किक मारत रागातच शौर्यकडे बघतो..

फैयाज : ए शौर्य अपुन का भी हिसाब बाकी हे.. 

शौर्य : मन तो कर रहा हे तेरा हिसाब यहा पे ही कर दु।

रोहन : हाथ तरी लावुन दाखव त्याला..

शौर्य : त्याला हाथ लावुन मला माझे हात नाही खराब करायचेत.. आणि तसही भावाला शब्द दिलाय मी.. मारामारी नाही करणार म्हणुन.. तुझ्यासारखा नाही ना मी आणि तुझ्यासारख मला बनायचं पण नाही.. मी ज्याला जीव लावतो त्याचा प्रत्येक शब्द पाळतो.. त्याच्या प्रत्येक शब्दाची रिस्पेक्ट ठेवतो.. आज खरच लाज वाटते यार मी तुझ्या सारख्याला आपला मित्र बनवला ह्याची.. तुला सुधारायचंच नाही तर नको सुधारुस.. गेट लॉस..   

रोहनकडे रागात बघत शौर्य  तिथुन निघुन केंटिंगमध्ये येतो.. सोबत बाकीची मंडळी सुद्धा.. केंटिंगमध्ये भलतीच शांतता असतें..

शौर्य दोन्ही हात डोक्याला लावुन असतो..

वृषभ : शौर्य सॉरी.. आमच्यामुळे झालं हे सगळं..

शौर्य : एकदा काल सांगायच तरी होत वृषभ तुम्ही लोकांनी अस काही केलात ते.. आपण रात्री त्याच्या घरी जाऊन त्याला समजवल असत..

राज : घाबरलो यार.. तु ओरडशील आम्हाला म्हणुन..

शौर्य : आणि मनवी तु.. त्याच्या सोबत राहुन तु त्याला ह्यातुन बाहेर काढु शकत होतीस.. तुला पण माहिती तो तुझ्या शब्दाबाहेर नाही आहे.. त्याला नाही जमलं व्यक्त व्हायला तुझ्यापुढे..खर प्रेम करतो ग तो तुझ्यावर.. कदाचित तुझ्यासाठी त्याने नक्कीच ड्रग्स सोडले असते..

समीरा : शौर्य तिच्या जागी मी असती ना तर मी सुद्धा अशीच रिएक्ट झाली असती.. मुळात नात्यात पारदर्शकता हवी असते.. 

शौर्य : I excepted Samira.. but we all are knows to Rohan.. how's he.. एक संधी द्यावी ग माणसाला सुधारायला..

राज : आत्ता काय करायच..?

शौर्य : मला नाही वाटत मी रोहनसोबत परत बोलेल.. तो आज जे वागला मला खुप हर्ट झालय.. तुम्ही लोक ठरवा तुम्हाला काय करायच ते.. मी रूमवर जातोय.. बाय गाईज.. 

शौर्य तिथुन निघुन जातो..

मनवी : मी काय करू??? मला राग नाही कंट्रोल होत.. तुम्हाला माहिती ना.. आणि हे अस पहिल्यांदाच झालंय अस ही नाही. ह्या आधी पण खुपदा आमची भांडण झालीत... तेव्हा हा असा नाही वागला मग कालच का??

वृषभ : तु त्याला फोन करून बघ काय बोलतो ते.. 

समीरा : हो म्हणजे तुझं ऐकेल तो.. एकदा समजवुन बघ त्याला काय बोलतो ते..

मनवी मोबाईल हातात घेत रोहनला फोन लावते..

मनवी : नाही उचलत तो..

राज : एकदा परत ट्राय कर ना..

राजच्या सांगण्यावरून मनवी परत रोहनला फोन लावते मग रोहन काही तिचा फोन उचलत नाही..

सगळेच डोक्याला हात लावुन आत्ता काय करायच हा विचार करू लागतात..

रोहन मात्र आज खुप दिवसांनी त्याला हवी तशी लाईफ एन्जॉय करत असतो..

बार मध्ये बसुन आपल्या मित्रांसोबत बिअरची मज्जा घेत तो बसला होता..

फैयाज : आखीर तुझे भी पता चल गया.. शौर्य कैसा हे करके... उस दिन तुने उसके साथ मिलके मेरे पे हाथ उठाया रोहन.. मेरेको कॉलेजसे सस्पेंड करवाया..

रोहन : तुझे मेने कल सॉरी बोला ना.. ओर क्या करू में बोल..?.

फैयाज : में जो बोलूंगा वो तु करेगा??

रोहन : तु बोल के तो देख..

फैयाज : छोड तेरेसे नही होगा..

रोहन : क्या नही होगा..??

फैयाज : जाने दे यार.. बादमे बात करते हे उस टॉपिकपर.. आज सिर्फ सेलिब्रेशन करेंगे हम लोग ।

चिअर्स.. आपला ग्लास एकमेकांच्या ग्लासला अलगत आपटत.. फैयाज आणि रोहन दोघेही पुन्हा नव्याने झालेल्या मैत्री बद्दल सेलिब्रेशन करतात..

क्रमशः

(पुढे काय?? त्यासाठी पुढील भागाची प्रतीक्षा करा.. हा भाग कसा वाटला ते ही कळवा..)

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all