अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 39

In marathi

सगळी जण रात्री शौर्यच्या लॅपटॉपमध्ये मुव्ही बघत असतात.. 

शौर्य मात्र समीरा सोबत चॅटींग करण्यात बिजी असतो.. तोच शौर्यला एका इंटरनेशनल नंबर वरून फोन येतो.. शौर्य नंबर बघून फोन उचलु की नको विचार करत राहतो.

राज : ए शौर्य फोन उचलायचा नाही तर सायलेंट तरी कर ना.. 

टॉनी : बघ तर.. एक तर मगासपासून तुझ्या Smsच्या ट्युन ने आम्ही इरिटेट झालोय.. 

शौर्य राज आणि टॉनीच बोलणं इग्नोर करतो.. आलेला फोन कट करतच पुन्हा मोबाईलमध्ये चॅटिंग करण्यात गुंतला..

आणि तोच पुन्हा त्याचा फोन वाजला.. तस तिघेही त्याच्याकडे रागात बघतात.

शौर्य : तुम्ही लोक अस का बघताय माझ्याकडे?? आता फोन वाजतोय तर मी काय करू..?

(शौर्य फोन कट करतच बोलतो)

राज : That's the reason I told you keep your phone silent mode..

टॉनी : इसिलीये हम लोग ने फोन सायलेंट पे रेखने के लिये कहा।

वृषभ : आता बघ तुला मराठीत कळत नसेल म्हणुन आम्ही हिंदी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत सांगितलं.. आता जर फोन वाजला ना मग बघ..

आणि तोच पुन्हा शौर्यचा फोन वाजला..

राज : घ्या रे ह्याचा फोन..

टॉनी आणि वृषभ दोघेही शौर्यचा फोन घ्यायला त्याच्याकडे जातात

शौर्य : ए नाही हा.. मी करतो फोन सायलेंट वर.. आत्ता नाही वाजणार

वृषभ : नक्की

शौर्य : हा नक्की.. हे बघ केला.. खुश...

टॉनी : सोड वृषभ एक चान्स देऊयात ह्याला.. राज परत तो मुव्ही थोडा मागे घे जरा.. आणि शौर्य उठलाच आहेस तर फेन जरा फास्ट कर.. 

वृषभ : हो ना यार.. गरम होतय..

शौर्य : नुसती ऑर्डर सोडतायत.. ते पण माझ्या रूममध्ये येऊन माझ्यावरच..

तु आम्हाला काही तरी बोललास.. तिघेही एकत्रच त्याला बोलतात..

शौर्य : नाही कुठे काय? तसही तुम्हांला बोलुन काही फरक पडणार काय?? मी तर फोन वर बोलायला म्हणुन गेलरीत जात होतो.. अजुन काही हवंय का सर तुम्हांला ते विचारत होतो..

राज : हो काही खायला असेल तर दे ना..

शौर्य : ड्रॉवरमध्ये बघ काही तरी असेल ते घे आणि खा..

राज : प्लिज देना शौर्य..

शौर्य : हाताने खाशील ना??का ते पण भरवु??

(शौर्य ड्रॉवर मधील बिस्कीटचा पुडा राजला देत बोलला..)

राज : गोड नको यार

शौर्य : तुला डायबिटीस वैगेरे झाला की काय?? गोड नको बोलतोस ते..

राज : ए शौर्य काहीही काय.. दुसर काही असेल तर दे.. बिस्किटमी फक्त चहा सोबतच खातो ते ही मुड असेल ते..

शौर्य : वेफर्स चालतील का??

राज : त्यांना पाय कुठंत चालायला...

राज हसतच टॉनीला टाळी देतो..

शौर्य : हवं तर धर..उगाच फालतु जॉक नकोयत..

राज : बर दे..

शौर्य राजला वेफर्सच पॅकेट देत.. गेलेरीच्या दिशेने जाऊ लागला..

शौर्य : आणि खाऊन झालं ना.. तर व्रेपर्स इथे तिथे टाकत बसू नका..डस्टबिन मध्ये टाका.. 

शौर्यच्या बोलण्याकडे कोणी लक्षच देत नाही..

मी तुम्हां तिघांना सांगतोय... (शौर्य मोठ्याने ओरडत बोलला)

शहहह... तिघे पण तोंडावर हात बोट ठेवत शौर्यला बोलले..

आज अस वागतायत जस थेटर मध्येच मूव्ही बघायला बसलेत... शौर्य स्वतःशीच बोलत गेलेरीत आला..

आणि पुन्हा फोन त्याचा वायब्रेट झाला..

हॅलो.... शौर्य पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलतच बोलला..

विर : फोन का कट करतोयस तु सारख सारख?? कधीच फोन करतोय तुला?? आता जर फोन कट केला असतास ना तर मी परत करणार नव्हतो..

शौर्य : विर तु...! किती दिवस झाले मी फोन लावतोय यार तुला.. तुझा फोन लागतच नाही.. तुला जरा पण माझी आठवण येत नाही काय?? आणि आहेस कुठे तु?? हा कोणाचा नंबर आहे?? तु...

विराज : अरे हो हो.. मला बोलायला देशील का नाही??

शौर्य : आहेस कुठे तु ते सांग..

विराज : तुला नंबर बघुन कळलं नाही का..USA.. ला आहे मी.. आणि तुला फोन करत होतो मी.. पण तुझा फोनच लागत नव्हता.. 

शौर्य : USA ला काय करतोयस??

विराज : ते मम्माने तुझ्या एडमिशनसाठी पाठवलंय मला इथे..

शौर्य : व्हॉट??? आर यु किडींग मी??

विराज : नो..

शौर्य : विर मी तुला आधीच सांगितलंना मला नाही जायचय रे USA ला.. आणि तु मला न सांगता जाऊच कस शकतोस तिथे ते पण माझ्या एडमिशन साठी.. तुम्ही कितीही काही करा मी कुठेही जाणार नाही..

विराज : ए शौर्य शांत हो.. (विराज थोडं हसतच बोलतो) ते मी बिजीनेस मिटिंगसाठी आलेलो.. तु तर डायरेक्ट रडायलाच लागलास.. एक काम कर ना..एक सेल्फी काढुन मला पाठव.. बघु कसा झालाय चेहरा तुझा ते..

शौर्य : काय यार तु.. नुसतं त्रास देतोस मला.. किती घाबरलो माहितीय मी..

विराज : त्यात घाबरण्यासारखं काय आहे?? आणि मम्माने तीच माईंड चेंज केलंय हे तुला सांगितलं ना मी मग..

शौर्य : आता परत चेंज पण झालं असेल ना म्हणुन बोललो..

विराज : म्हणजे तु परत काही केलंस काय??

शौर्य : सोड ना तु पण कोणती गोष्ट घेऊन बसलास?? USA ला जाऊन अनघाला भेटलास की नाही??

विराज : एवढ्या लांब येऊन तिला भेटणार नाही अस कधी होऊ शकत का..? तसही तिच्याच फोन वरून बोलतोय मी तुझ्याशी..

शौर्य : एवढ्या रात्री.. तु तिच्या सोबत आहेस..??

विराज : आर यु मॅड.. नाईट इंडियामध्ये आहे आणि इथे मॉर्निंग आहे..

शौर्य : ओहह हा... यार.. बाय दि वे विर तु इथे कधी येणार??

विराज : आजच बसतोय.. 

शौर्य : तुला मिस करतोय मी खुप..  खूप म्हणजे खुप यार..

विराज : मी पण मिस करतोय तुला...  मम्माला फोन केलेलास की नाही.. कशी आहे ती.. म्हणजे मी तुला करण्याआधी तिलाच फोन करत होतो.. पण ती रिसिव्ह नव्हती करत..

शौर्य : आत्ता सोबत अनघा असताना तु उगाच मम्माला आणि मला मिस नको करत बसुस.. एन्जॉय कर.. लव्ह यु.. मिस यु.. आणि बाय..

विराज सुद्धा शौर्य ला बाय करून फोन ठेवुन देतो..

बाकीची मंडळी अजुन पण मुव्ही बघण्यात गुंतलेली असतात..

शौर्य गेलरीतच बसुन काही तरी विचार करू लागतो.. खर तर दोन दिवस झाले तो मम्माशी बोलला नव्हता.. विर मुंबईला येईपर्यंत तरी तो तिच्याशी बोलणं टाळायचं हा विचार करत होता..

वृषभ : चल शौर्य आम्ही निघतो.. थेंक्स फॉर मूव्ही.

राज : उद्या चांगलं काही तरी आण खायला..आज वेफर्सवर आम्ही एडजस्ट केलं.. उद्या अस नको व्हायला..

टॉनी : आणि स्पीकर वैगेरे असतील तर बघ ना.. म्हणजे कस थिएटर मध्ये मूव्ही बघत असल्याचा फील येईल.. 

शौर्य : हो का सर.. अजुन काही??

राज : बाकीचे सजेशन आम्ही उद्याच देऊ काय रे टॉनी..

राज टॉनीकडे बघत बोलला.. तोच शौर्यने जवळ पडलेली उशी फेकुन त्याला मारली.. 

ए राज पळ लवकर.. नाही तर काही खर नाही.. अस बोलत तीघांनीही त्याच्या रूममधुन धुम ठोकली..

तिघे जाताच शौर्य डॉर बंद करत बेडवर आडवा झाला.. 

★★★★★★

दोन दिवस आराम करून शौर्य आज कॉलेजमध्ये आला.. पण लेक्चरला बसायच सोडुन रोहनच्या मदतीने समीराला सरप्राईज द्यायच्या तैयारीला तो लागला होता..

हातात बॉक्स घेऊन फोर्थ फ्लोरच्या दिशेने जाऊ लागला.. सोबत रोहन होताच त्याच्या मदतीला..

शौर्य : तु बघतच राहशील रोहन.. तु काय सगळेच बघतच रहातील.. समीरासाठी एवढ सुंदर सरप्राईज आहे ना ह्या बॉक्स मध्ये.. तु विचारूच नकोस..

रोहन : काय आहे काय बॉक्समध्ये..

शौर्य : ते कळेलच तुला.. फोर्थ फ्लॉरवर गेल्यावर..

शौर्य आणि रोहन दोघेही बोलत गप्पा मारत एक एक पायरी चढत होते.. दोघांचंही बोलणं फैयाजचा मित्र ऐकतो आणि पळत जाऊन फैयाजला सांगतो.. फैयाज पुन्हा शौर्यला त्रास द्यायचा असा विचार करत फोर्थ फ्लॉरवर येतो.. 

शौर्य आणि रोहन दोघेही फोर्थ फ्लोरवरच्या एका रूममधुन बाहेर पडतात..

रोहन आणि शौर्यला बघुन फैयाज आणि त्याचे मित्र लपुन बसतात.. आणि त्यांचं बोलणं ऐकतात..

रोहन : केवढं भारी प्लॅनिंग केलस यार तु.. मी पण मनवीसाठी असच काही तरी प्लॅन करेल..

शौर्य : फक्त हार्ट शेप वाले बलून नाही ना मिळाले..  नाही तर अजूनच भारी झालं असत..

रोहन : सोड ना पण.. त्या बॉक्स मधलं गिफ्ट बघुन ती एवढी खुश होईल ना की तु विचारूच नकोस..

शौर्य : एक काम कर तु इथेच थांब.. लेक्चर संपेलच आता मी समीराला येतो घेऊन.. प्लिज इथुन कुठेही जाऊ नकोस.. तुला माहिती ना खुप महाग गिफ्ट आहे ते.. 

रोहन : नाही जात आहे इथेच..

शौर्य समीराला आणायला म्हणुन खाली जातो.. रोहन तिथेच उभं राहुन बाकीच्यांची वाट बघतो..

फैयाज : ऐसा हे क्या वो रूम मे??

मेने उन दोन्हो को बडा सा बॉक्स लेकर उपर आते हुवे देखा। (एक जण फैयाजला सांगु लागला)

फैयाज : अच्छा.. अभी तो हम देखके ही रहेंगे ऐसा क्या गिफ्ट दे रहा हे ये समीरा को...

पर वो रोहन..

फैयाज : उसको...

तोच रोहनचा फोन वाजतो..

रोहन : हा मनवी बोल... आता.. अग ते मी फोर्थ फ्लॉरवर आहे ग.. अग पण लगेच कस येऊ.. ए हे बघ तु रागवु नकोस मी आलोच..

रोहन फोन ठेवुन शौर्यला लावतो..

रोहन : शौर्य ती मनवी माझ्यावर भडकली यार.. तस पण फोर्थ फ्लॉरवर कोणी नाही आणि कोणी आपल्याला बघितल पण नाही ना..सॉरी ना शौर्य.. मी मनवीला भेटायला जातोय..बाय बाय..बाय..मी ठेवतो फोन..

रोहन फोन ठेवुन तिथुन मनवीला भेटायला जायला निघाला.

फैयाज : देखा.. आज भी नसीब मेरे साथ हे..। चलो समीरा का गिफ्ट हम ही देख लेते हे। और शौर्य को हमारे तरफ से सरप्राईज गिफ्ट देते हे...

फैयाज शौर्य आणि रोहनने ज्या रूममध्ये गिफ्ट ठेवलेलं त्यारूममध्ये शिरला..सोबत त्याचे मित्रमंडळी सुद्धा..

रूम तो बहोत अच्छेसे सजाया हे इसने तो.. बट हम लोग थोडा और अच्छेसे सजाते हे.. अस बोलत... फैयाज आणि त्याचे मित्र रूमला लावलेल डेकोरेशनच सामान काढून शौर्यने एवढं मेहनतीने केलेलं डेकोरेशन खराब करू लागले..

समोरच एका बेंचवर लाल रंगाच्या व्रेपर्समध्ये गिफ्ट गुंडाळुन ठेवलेलं.. 

फैयाज : जरा ओपन तो कर इसे.. 

फैयाजने आदेश सोडताच त्याचा मित्र बॉक्स उघडु लागला..

बॉक्स उघडुन फैयाजचा मित्र त्याच्याकडे बघु लागला..

बॉक्समध्ये सहा बिअरच्या बाटल्या होत्या.. 

फैयाज : समीरा को बिअर गिफ्ट दे ने वाला था ये..?

(फैयाज बॉटल हातात घेतच बोलला)

और ये...??? येह तो हम लोग का ही लग रहा हे मुझे...

हातात रिकामी इंजेक्शनची सिरिन्ज पकडत तो बोलला..

Whats going on there???

प्रिंसिपलचा धारदार आवाज ऐकताच फैयाजच्या हातातुन बॉटल खालीच पडते...

घाबरतच मागे वळुन बघतो तर प्रिंसिपल सर असतात..  

प्रिंसिपल सर आत येत बॉक्समध्ये ठेवलेल्या बियरच्या बाटल्या आणि इंजेक्शन बघत फैयाज आणि त्याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या सगळ्याच मित्रांना ओरडतात.. आणि त्यांना आत्ताच्या आत्ता आपल्या केबिनमध्ये यायला सांगतात..

सर पुढे आणि त्यांच्या मागुन सगळे मान खाली घालुन जावु लागतात..

संपूर्ण कॉलेज त्यांच्याकडे बघु लागत.. 

फैयाज आपलं तोंड लपवतच जिने उतरत असतो... तोच त्याच लक्ष शौर्यकडे जात.. 

शौर्य आपली भुवई उडतच त्याला चिडवत होता.. जस ती लोक त्याला त्यादिवशी चिडवत होती..

फैयाज फक्त रागाने वेडापिसा होत होता.. त्याने त्या वेळेला शांत रहाणंच पसंत केलं.. आणि गप्प तो प्रिंसिपल सरांच्या केबिनमध्ये घुसला..

थोड्या वेळाने सगळीच मंडळी प्रिंसिपल सरांच्या पियुन सोबत बाहेर आली.. 

ये लोग दो हफ्ते कॉलेजमें दिखने नही चाहीये.. ऐसें प्रिंसिपल सर का ऑर्डर हे..। 
(वॉचमनला सूचना देऊन पियुन आत निघुन गेला..)

शौर्य आणि बाकीची मंडळी गेटजवळच उभी होती..

रोहन : शौर्य तुला किती दिवस सस्पेंड केलेलं रे..??

शौर्य : 2 डेस ओन्ली.. आणि रोहन ह्या लोकांना रे??

रोहन : मी तर 2 विक ऐकलं..

आम्ही पण.. बाकीची मंडळी एकत्रच बोलली..

फैयाज : ज्यादा उड रहा हे ना शौर्य तु.. और तो और रोहन तु भी इसके साथ..। तुम लोग इधर ही रुको..आज फैसला हो ही जायेगा..

शौर्यला धमकी देतच फैयाज त्याच्या मित्रमंडळींना घेऊन तिथुन रागात निघुन गेला..

शौर्य फक्त त्याच्याकडे बघतच राहिला..

रोहन : ए शौर्य... त्याच्या धमक्यांना घाबरू नकोस..

शौर्य : मी माझ्यासाठी नाही घाबरत.. तो तुम्हाला काही करेल तर..?

राज : मला तर नाही वाटत तो काही करेल...

समीरा : बाय दि वे प्रिंसिपल सर फोर्थ फ्लोरवर आले कसे??

रोहन : कसे म्हणजे शौर्यनेच फोन केला प्रिंचिपल सरांच्या केबिनमध्ये.. त्यानेच फोन करून सरांना पार्टीमध्ये इनवाईट केलंल.. पण सरांना पार्टी जरा जास्तच आवडली..

रोहन हसतच शौर्यला टाळी देत बोलला.

टॉनी : बट थोडं जास्तच झालं यार.. ती नशिली लोक काहीही करतील..

रोहन : गप्प रे टॉनी.. आणि जर त्यांनी काही केलं तर आपण मिळुन बघु त्यांना..

 तेवढ्यात प्रिंसिपल सर कॉलेजमधुन बाहेर पडतात.. आणि गाडीत बसुन निघुन जातात..

सीमा : नशीब सरांनी काही ऐकलं नाही..

रोहन : चल मी पण निघतो.. 

मनवी : आणि मी पण..

अस बोलत दोघेही तिथुन निघु लागले.. 

रोहन बाईकला किक मारत मनवीला बसायला बोलणार..

तोच राज (रोहन....) म्हणुन जोरात ओरडला..

फैयाज हातात हॉकी स्टिक घेऊन रोहनच्या डोक्यावर मारणार.. तोच रोहनने खाली वाकत त्याचा तो वार चुकवला..

टॉनी : ज्याची भीती होती तेच झालं..

सगळे कॉलेजच्या गेटजवळ जमले..

शौर्यसुद्धा धावतच रोहनजवळ गेला..

रोहन तु ठिक आहेस ना?? शौर्य रोहनला विचारत बोलला..

रोहन मानेनेच हो बोलला..

शौर्य : ए फैयाज तेरी दुष्मनी मेरेसे हे.. तु फालतु में रोहन को बीच मे मत ले। और देख मे कोई झगडा नही चाहता अब.. तुने मुझे सस्पेंड करवाया तो मेने तुझे करावया.. हिसाब बराबर..

हिसाब तब बराबर होगा जब में तुम दोन्हो को इस कॉलेजसे बहार करवाउंगा..

(अस बोलत फैयाज हॉकी स्टिक घेऊन जोरातच शौर्यवर वार करू लागला)

शौर्य.... समीरा कानावर हात ठेवतच डोळे बंद करून मोठ्याने किंचाळते..

शौर्यने हॉकी स्टिक हातात पकडत त्याच्या पोटात जोरात लाथ मारत.. हॉकी स्टिक सोडतच फैयाज खाली पडतो..

रोहन : वेरी गुड शौर्य.. 

तोच एक जण रोहनला हॉकी स्टिकने मारणार पण शौर्यने आपल्या हॉकी स्टिकवर त्याचा वार झेलत.. त्याची हॉकी स्टिक हवेत उडवतच आपल्या हॉकी स्टिकने त्याला मारलं..

शौर्य आणि रोहन मिळुन सगळ्यांना मिळुन मारू लागले..

कॉलेजभोवती खुप गर्दी जमली..

फैयाजची अर्धी मित्र मंडळी शौर्यचा मार खाऊन तिथुन पळ काढु लागली.

फैयाज उठुन उभं राहतं अजुनही शौर्यकडे रागात बघत होता..

शौर्य : मजाक सेह नही सकता तो कर भी मत.. 

अस बोलत शौर्य हॉकी स्टिक रागातच फैयाजच्या हातावर मारतो.. तस फैयाज हात धरतच घुडग्यावर बसतो..

तोच शौर्यच लक्ष फैयाजच्या  पाठी उभ्या असलेल्या त्याच्या मम्माकडे आणि तिच्या सोबत असणाऱ्या त्याच्या विरकडे जात..

मेलो... अस बोलत शौर्य हातातली हॉकी स्टिक खाली फेकतो..

क्रमशः

(आता पुढे काय??? प्रतिक्षा करा पुढील भागाची... आणि हा भाग कसा वाटला ते ही कळवा)

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all