अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 27

In marathi

पहाटे विराजला जाग आली... शौर्य झोपायलाच आला नाही का?? विराज स्वतःलाच प्रश्न विचारू लागला.. मोबाईल मध्ये बघितलं तर चार वाजुन गेलेले.. डोळे चोळतच तो उठला.. गेलरीत बघितलं तर शौर्य तिथेच डोकं टेकुन झोपलेला.. मोबाईल त्याच्या बाजुलाच पडलेला..विराजने मोबाईल उचलुन नीट ठेवला.. आतुन उशी आणि चादर आणली.. शौर्यच डोकं उशीवर ठेवत अंगावर चादर घालून तो आत निघुन आला.. 

जवळपास आठ साडे आठ वाजता शौर्यला जाग आली.. स्वतःला अस गेलेरीत झोपलेला बघुन त्यालाच नवल वाटलं.. 

विर... शौर्य विराजला आवाज देत होता..

विर कानात इयरफोन घालुन कोणाशी तरी फोन वर बोलत होता.. त्यामुळे शौर्यचा आवाज त्याला आला नाही..

शौर्य उठून सरळ आत आला.. विरला फोन वर बोलताना पाहुन त्याने हातातील घड्याळाकडे बघितलं.. शौर्य सरळ जाऊन विराजच्या समोर जाऊन बसला.. शौर्य अस अचानक समोर येऊन बसल्यामुळे विराजला थोडं अनकम्फोर्टेबल फील होत असत..

विराज : ऐकणं मी तुला नंतर करू का फोन... हम्मम..बाय.. आणि काळजी घे..

एवढं बोलुन विराजने फोन ठेवला..

शौर्य :  बोलणा. एवढं काय लाजतोस.. 

विराज : तु कधी उठलास??

शौर्य : ते महत्वाचं नाही.. तु कुणाशी बोलत होतास ते महत्वाचं आहे..

विराज : ते मी.. 

शौर्य : कंपनीचा फोन..

विराज : हो.. कंपनीचाच फोन होता.

शौर्यने विराजच्या हातातला फोन खेचुन घेतला...

कंपनीचा फोन कसा असतो... बघु तर दे....

विराजची आता शौर्यकडुन मोबाईल घेण्यासाठी धडपड सुरू झाली.. 

मोबाईल दे ना शौर्य.. (विराज शौर्यकडे त्याचा मोबाईल मागत होता..)

मग आधी सांग कुणाशी बोलत होतास ते.. नाही तर मी चेक करेल बघ.

विराज : सांगतो बाबा.. तो मोबाईल दे इथे..

शौर्य : आधी सांग मगच देईल..

विराज : अनघाशी बोलत होतो.. माझी फ्रेंड आहे.. तिचा फोन होता.. 

शौर्य : ओहहह.. फक्त फ्रेंड का??

विराज : गर्लफ्रेंड.. 

शौर्य : मग खोटं का बोललास काल..

विराज : तुला खर सांगितलं असत तर मग चिडवत राहिला असतास..

शौर्य : ते तर मी आता पण करणार..

विराज : म्हणूनच तुला काही सांगत नाही मी.. आण तो मोबाईल इथे..

शौर्य विराजचा मोबाईल त्याला परत देतो..

शौर्य : ए ब्रो तुझ आणि समीराच्या भावाच एज सेम असेल ना.. तुम्ही क्लासमेट होतात अस म्हटलं तर.. मग तु पण लग्न करणा.. तस पण तु सेटल आहेस..  मग मी परत तुझ्या लग्नासाठी मुंबईत येईल.. मला खुप एन्जॉय करायच तुझं लग्न.. 

विराज : अजून दोन तीन वर्षे तर मी लग्न करणार नाही..कारण ती अजून शिकतेय.. सो तीच शिक्षण कम्प्लिट व्हायला निदान दोन वर्षे तर सहज लागतील.. मग आम्ही करू लग्न.. 

शौर्य : हम्मम... 

विराज : तु करू शकतोस लग्न.. तस बघायला गेलं तर तु पण सेटल आहेस.. (विराज हसतच शौर्य बोलतो)

शौर्य : आता बघ कोण कोणाला चिडवत ते.. आणि तस पण आधी मोठ्या भावाच लग्न मग छोट्या भावाच..

विराज : अस काही नसतं.. तुला करायचं असेल तर तु कर लग्न आधी.. पण त्या आधी तु फ्रेश हो आपण नाश्ता करूयात आणि मग ह्या विषयावर बोलूयात.. मला भूक लागलीय

शौर्य : तु चार्जर आणलायंस का?? 

विराज : नाही

शौर्य : माझा फोन स्विच ऑफ झाला यार काय करू मी..

विराज : ठेव तो फोन.. आणि आधी फ्रेश हो बघु.. आपण बाहेर गेल्यावर बघुयात दुसरा चार्जेर मिळतो का ते..

शौर्य : हम्म मी आलोच फ्रेश होऊन

शौर्य फ्रेश व्हायला निघतो.. विराज त्याची वाट बघत असतो..

★★★★★ 


इथे सगळे पुन्हा दिल्लीला जाण्याच्या तैयारीला लागलेले असतात..

समीराला रात्रभर झोप नसते.. शौर्य अस चुकीचं काही वागणार नाही हे तिच मन तिला सांगत होत.. पण रोहनने नक्की कोणत्या अवस्थेत त्या दोघांना बघितलस असेल ?? ह्या गोष्टीचा विचार करून ती अस्वस्थ होत होती.. तिने मनवीला विचारायच ठरवलं..

मनवी आपल्या रूममध्ये पेकिंग करत बसली असते..

समीरा : मनवी ऐकना.. मला थोडं बोलायचं होत तुझ्याशी..

मनवी : जर तु शौर्यबद्दल काही विचारणार असशील तर आता नको विचारुस.. त्याच्या अश्या वागण्यामुळे मी माझ्या रोहनला गमावलं असत.. पण रोहन खरच खुप समजूतदार आहे त्यामुळे आमचं रिलेशनशिप अजुन टिकुन आहे.. आणि प्लिज त्याने फोन केला तर त्याला फक्त एवढं सांग की ह्यापुढे मला फोन करू नकोस.. कारण मी सांगुन सुद्धा तो फोन करणार हे नक्की.. 

समीराला काय बोलावं तेच कळत नव्हत.. समीरा काहीही न बोलता मनवीच्या रूममधुन बाहेर निघते.. तडक आपल्या रूममध्ये जाते.. स्विच ऑफ केलेला फोन तिने चालु केला.. फोन जसा चालु होतो तस शौर्यचे मेसेजेस, त्याने केलेल्या कॉल्सचे नोटिफिकेशन तिला येऊ लागतात..

पण ती त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत शौर्यला फोन लावते..

आता शौर्यचा फोन स्विच ऑफ येत असतो..

ती फोन तसाच ठेवते आणि पेकिंग करायला घेते.. 

फायनली सगळे समीराच्या घरच्यांना निरोप देत मुंबईला बाय बाय करत दिल्लीला परततात.

वृषभ, राज आणि टॉनी हॉस्टेलमध्ये आल्या आल्या शौर्यच्या रूममध्ये जायला निघतात.. त्यांना अस वाटत असते की शौर्य आपल्या आधी आला असेल.. पण त्याची रूम लॉक असते.. 

वृषभ : शौर्य अजुन आला नाही मग गेला कुठे??

राज : फोन पण स्विच ऑफ आहे त्याचा..

वृषभ : एवढ्यात तर यायला हवा होता तो.. पण मी काल बोललो त्याच्यासोबत.. बरा आहे असं तो बोलला..

टॉनी : मला अस वाटत की तो संध्याकाळ पर्यंत येईल.. मे बी फ्लाईट वैगेरे बुक झाली नसेल तर..

वृषभ : हम्म तस पण असेल..

संध्याकाळ ही उलटुन जाते पण शौर्यचा काही पत्ता नसतो आणि त्याचा फोन अजुनही स्विच ऑफ येत असतो..

समीरा रूमवर आल्या पासुन शांतच होती.. 

सीमा : काय झालं समीरा?? आल्या पासुन एक शब्द बोलली नाहीस तु..

समीरा : शौर्यचा फोन स्विच ऑफ येतोय.. 

सीमा : वृषभच्या फोनवर ट्राय कर ना..

समीरा : केला ना.. पण शौर्य होस्टेलवर आलाच नाही..

सीमा : काय?? मग गेला कुठे..

समीरा : तेच तर कळत नाही ना.

सीमा : तु टेन्शन नको घेऊस.. तो असेल ठिक.. त्याचा भाऊ होता त्याच्या सोबत.. घाबरायचं तस काही कारण नाही आहे.. तुझे डोळे बघ कसे झालेत आधी ते..किती दिवस झोपली नाहीस नीट तु..

समीरा : एकदा शौर्यशी बोलली असती तर झोप लागली असती ग नीट..

सीमा : प्रयत्न कर लागेल झोप..

समीरा : तु झोप मी आहे इथे गेलेरित..

अस बोलत समीरा गेलेरित जाते..थोड्या थोड्या वेळाने ती शौर्यला फोन लावून बघत असते.. पण शौर्यचा फोन स्विच ऑफ येत असतो.. संपूर्ण रात्र तिची तशीच निघुन जाते..

 दुसऱ्या दिवशी गेटजवळ सगळे उभे असतात.. समीरा वृषभला शौर्य विषयी विचारते..पण शौर्य काही आला नसतो.. 

समीरा : कुठे गेला असेल हा?? एक फोन करायची पद्धत आहे का नाही..

राज : नंबर पाठ हवेत ना.. नाही तर त्याने pco वरून तरी कॉल करून कळवलं असत आपल्याला..

वृषभ : मे बी असच असेल..

समीराला ही राजच बोलणं पटत पण शौर्य दिसत नाही म्हणुन समीरा थोडी जास्तच चलबीचल होत असते.. 

टॉनी : नोटीस बोर्डवर मार्कलिस्ट लागली वाटत.. 

टॉनीने अस बोलताच सगळे नोटीस बोर्ड जवळ धावत जातात आणि आपापले मार्क्स बघायला.

राज : मी सगळ्यात पास.. येहहहह..

वृषभ : मी पण..

समीरा : मी पण..

सीमा : माझा इको गेला..

टॉनी : माझा पण... टॉनी आणि सीमा नाराज होतच बोलले..

समीरा : एकच गेला ना.. पुढच्या सेमिस्टरला अभ्यास करा नीट.. 

ते तर करावाच लागेल.. टॉनी तोंड पाडतच बोलला..

रोहन : येहहह मी पण सगळ्यात पास.. थँक्स टु शौर्य.. 

रोहनने अस बोलताच मनवी त्याच्याकडे बघते आणि रागातच तिथुन क्लासरूममध्ये येऊन बसते..
 
रोहन तिला समजवायच म्हणुन तिच्या मागे जातो..

रोहन : तु अशी नाराज होत का आलीस..

मनवी : अकाउंट आणि इको.. दोन सब्जेक्ट गेले माझे

(मनवी रडतच रोहनला सांगु लागली)

रोहन : आता पुढची सेमिस्टर आहे ना अजून.. त्यात रिकव्हर करू..

तेवढ्यात बाकी लोक सुद्धा क्लासरूममध्ये आले..

राज : मनवी तु रडते का अशी??

मनवी : मला आवडत रडायला म्हणुन..

समीरा : काय झालं??

रोहन इशाऱ्यानेच सांगतो की तिचे दोन सब्जेक्ट गेलेत म्हणुन..

तेवढ्यात सर देखील क्लासरूममध्ये येतात.. आणि प्रेसेंटी घ्यायला सुरुवात करतात..

मनवी अजुनही रडतच असते..

समीरा : अग अजुन एक सेमिस्टर आहे त्यात होशील ना पास.. एवढं काय टेन्शन घेतेस..

समीरा आणि सीमा तिला समजवत बोलु लागले..

टॉनी : शौर्यचे मार्क्स बघितलेच नाही आपण..

राज : मी बघितले..

रोहन : तो पण पास असणार त्याच्या पेपर मधलं लिहुन तर मी पास झालोय...

राज : नुसतं पास नाही टोपर्स आहे.. 

वृषभ : अभ्यास करायचा कधी हा?? बघावं तेव्हा लॅपटॉप मध्ये असायचा..

टॉनी : तो आला ना की त्याच्याकडेच मी क्लासेस लावेल मी..

keep silent.. सर मोठ्यानेच ओरडले तसे सगळे शांत बसले.

★★★★★

दुसऱ्या दिवशी सकाळचे अकरा वाजेल असतात.. विराज गेलरीत उभा असतो.. कसल्या तरी विचारात हरवुन गेलेला..

शौर्य : डॅडच टेन्शन येतंय ना तुला पण..

विराज मानेनेच नाही बोलतो.. 

शौर्य : मग?? 

विराज : परत तुला कधी भेटता येईल का ह्याचा विचार करतोय...

शौर्य : अस का बोलतोयस यार.. तु येत जा ना दिल्लीला..

विराज : हम्म बघु.. तु पेकिंग केलीस ना?? आणि तुझं ते गिटार आठवणीने घे..

शौर्य : हम्मम.. विर डॅड तुला काही करणार नाही ना.. मला खुप भीती वाटतेयरे.. 

विराज : तु माझी काळजी घेणं सोड.. तुझी काळजी घे.. आणि थोडं मोठं हो.. लाईफला थोडं सिरियसली घे..

शौर्य विराजला मिठी मारतो.. 

तुझी काळजी वाटतेय विर मला.. तु पण चल ना दिल्लीला.. आपण दोघ राहू तिथे..

विराज : मला काही नाही होणार.. आणि मॉम आहे माझी काळजी करायला तिथे..तु चल आता नाही तर ही पण फ्लाईट आपली मिस होईल..

विराज आणि शौर्य हॉटेलमधून चेकआउट करतात.. विराज शौर्यला एयरपोर्टवर सोडायला जातो..

विराजला बाय करताना शौर्यला खुप भरून येत.. विराजला रडतच मिठी मारून तो त्याचा निरोप घेत तो फ्लाईटमध्ये बसुन दिल्लीला यायला निघतो..

विराज शौर्यच्या समोर तर नाही रडला पण तो गेल्यावर मात्र त्याला रडु आलं.. 

स्वतःसाठी केब बुक करत तो तिथुन मुंबईला यायला निघाला..

डॅडला कस हँडल करायच हे विराजला कळत नव्हतं..

विराजची गाडी घरी येऊन थांबली.. आत येताच संपुर्ण घर भर तो नजर फिरवतो.. त्याचा डॅड त्याला कुठे दिसत नसतो असा विचार करत तो पटापट जिने चढत आपल्या रूममध्ये शिरतो. रूममध्ये शिरताच तो पटकन आतुन रूम लॉक करतो.. आजचा दिवस तरी डॅड पासुन वाचलो अस त्याला वाटत.. पण तो त्याचा भ्रम असतो.. 

कारण सुरज आधीपासूनच त्याच्याच रूममध्ये त्याची वाट बघत बसलेला असतो..

आलात पराक्रम करून या तुमचीच वाट बघत होतो...( सुरजच्या आवाजाने विराजच हृदय धडधडू लागत.)

विराज मागे वळुन बघतो तर डॅड बेडवरच बसलेला असतो..

सुरज : चांगला गेम खेळता येतो तुला.. 

विराज : डॅड तु... इथे माझ्या रूममध्ये..

डॅड बोलायचं नाही हा मला.. माझा मुलगा असतास तर अस वागलाच नसतास.. सुरज विराजचे ओठ जोरात पकडत त्याला बोलतो

विराज : डॅड सोड.. 

विराज सुद्धा रागात त्याच्या वडिलांना ढकलतो..

विराज : डॅड बस हा.. एक तर तु जे करतो हे चुकीचं आहे हे तुला पण चांगलं माहिती.. काय मिळणार तुला शौर्यचा जीव घेऊन.. प्रॉपर्टीसाठी हे करतोस ना... नुसतं बघावं तेव्हा प्रोपर्टी आणि पैसा त्या पलीकडे काही येत का तुला.. तुझ्या सारखा बाप आहे मला म्हणजे माझं दुर्भाग्य समजतो मी.. तु कोण मला सांगणारा मला डॅड नको बोलुस मलाच तुला डॅड बोलायला लाज वाटते.. दुसऱ्याच्या मुलाला त्याच्या आई पासुन तोडायला निघालेला तु.. तु माझाच काय कोणाचाच बाप होऊ शकत नाही.. गेट आउट फ्रॉम माय रूम..

विराज दरवाज्याकडे बोट दाखवतच सुरजला बोलला..

विराजच बोलणं सुरजच्या मनाला खुप भिडल होत.. तो एक टक त्याच्याकडे बघत राहिला.. विराजच्या तोंडुन पडलेल्या प्रत्येक शब्दाने सुरजच्या हृदयावर घाव केले असतात..

आय सेड गेट आऊट.. विराज पुन्हा मोठ्याने ओरडला..

सुरज तिथुन काहीही न बोलता बाहेर पडला आणि थेट आपल्या रूममध्ये आला.. रूम आतुन लॉक केली.. 

रूममध्येच तो फेऱ्या मारू लागलो.. आज पर्यंत कधीच उलटा न बोलणारा विराज त्याला एवढं काही बोलून गेला हे सुरजला सहनच होत नव्हतं.. 

रूममध्ये एसी असून सुद्धा तो घामाघूम होत होता.. विराजचे शब्द अजूनही त्याच्या भोवतीच फिरत होते.. आणि तो तसाच खाली कोसळला..

सुरजच्या रूममध्ये त्याला विचारल्या शिवायला कोणालाच आत यायला परमिशन नसते त्यामुळे कोणालाही त्याच्या रूममध्ये काय घडलय ह्याची साधी कल्पना देखील नव्हती..
★★★★★

शौर्य हॉस्टेलवर पोहचला.. पोहचल्या पोहचल्या त्याने मोबाईल चार्जिंगला लावला..  मोबाईल स्विच ऑन करत त्याने लगेच विराजला फोन केला..,

फोन चार्जिंगला लावतच तो विराजशी बोलत होता..

विराजने तिथे सगळं ठिक आहे असे शौर्यला सांगितलं. मी मग फोन करतो एवढं बोलुन फोन ठेवुन दिला..

विराज ठीक आहे हे कळल्यावर शौर्यला बर वाटत.. तो फोन तसाच चार्जिंगला ठेवतो आणि शॉपिंग केलेलं सामान आपल्या रूममध्ये लावायला घेतो.. 

बाकीची मंडळी नुकतच लेक्चर संपवुन केंटिंगमध्ये बसलेली असतात.. 

वृषभ : शौर्यच काही कळत नाही यार.. कुठे गेलाय.. 

फोन रिंग होतोय रे त्याच्या.. टॉनी अस बोलताच सगळे एकदम सिरीयसली होत त्याच्याकडे बघु लागले..

टॉनीने फोन तसाच स्पीकरवर ठेवला..

शौर्य आहेस कुठे तु?? शौर्यने फोन उचलल्या उचलल्या टॉनी बोलला..

शौर्य : रूमवर.. जस्ट आलोय..

त्याला आत्ताच्या आत्ता इथे बोलावं... समीरा हळुच बोलली..

टॉनी : ऐकना केंटिंगमध्ये ये...आम्ही वाट बघतोय तुझी..

शौर्य : हा येतो बोलत शौर्यने फोन ठेवला..

शौर्य रूम लॉक करून केंटिंगमध्ये जायला निघाला.. 

शौर्य : हॅलो गाईज...

वृषभ : होतास कुठे तु.. काही कळवायची पद्धत आहे का नाही.

शौर्य : अरे फोन स्विच ऑफ झालेला.. सोबत चार्जर पण नव्हतं.. आणि तुमचे नंबर माझ्या लक्षात पण नव्हते..

राज : पण होतास कुठे ते तरी सांग

शौर्य : पुणे.. 

शौर्य : तुम्ही लोकांनी एन्जॉय केलं का लग्न??

वृषभ : तु गेलास मग काय एन्जॉय करणार..

राज : ए शौर्य तु अभ्यास कधी करायचास.. सगळ्या सबजेक्ट मध्ये टॉप केलंस.. अकाउंटमध्ये तर आउट ऑफ..

शौर्य : मार्क लिस्ट लागली का?? मी बघुन येतो..

वृषभ : कुठे चाललास.. बस इथेच.. मी फोटो काढलाय.. तुला वॉट्सए करतो मग.. 

शौर्य : नक्की पाठव..

समीरा : तुमच चालु द्या मी येते.. एवढं बोलुन समीरा निघते तिथुन

शौर्य : मी पण आलोच अस बोलत शौर्य सुद्धा तिच्या मागुन निघतो

समीरा बाहेर येताच शौर्य तिला आवाज देतो.. पण समीरा न ऐकल्यासारखं करतच तिथुन जाऊ लागते..

शौर्य तिच्या मागे धावत जात तिचा हात पकडतच तिला थांबवतो.. आणि जिथे कोणी त्यांचं बोलणं ऐकणार नाही तिथे घेऊन जातो..

शौर्य : तुला काय झालंय समीरा मला कळेल काय??त्यादिवशी पण तु माझं काही ऐकून न घेताच फोन स्विच ऑफ केलास..

समीरा काहीही न बोलता तिची चैन शौर्यला दाखवते..

शौर्य : ही तुझ्याकडे कशी आली.. ही चैन तर..

समीरा : मनवीकडे होती.. बरोबर ना..

शौर्य : हो.. 

समीरा : शौर्य मी तुला एवढ्या प्रेमाने दिलेलं गिफ्ट तु तिला देऊन टाकलस.. (समीराच्या डोळ्यांत शौर्यला पाणी दिसु लागलं)

शौर्य : अग समीरा तुझा गैरसमज झालाय. त्यादिवशी तु मला चैन दिलीस त्यानंतर मी ती बेगेत ठेवली कारण तूच बोललीस की इथे दिल्लीत आल्यावर घाल.. आणि मग मनवीनेच मला फोन करून सांगितलं की ती चैन तिला भेटली.. ती बोलत होती की तिला ती चैन तुझ्याच घरी कुठे तरी पडलेली भेटली..

समीरा : खर बोलतोयस...

शौर्य : तुझी शप्पथ.. मी खोटं का बोलेल.. 

समीरा : खर प्रेम करते रे तुझ्यावर शौर्य.. माझ्यापासुन प्लिज काही लपवू नकोस.. 

शौर्य : तुझ्याशी खोट बोलून मला काय मिळणार सांग.. आणि प्लिज माझ्यासमोर अस रडत नको जाऊस.. माझ्यामुळे तुझ्या डोळ्यांत पाणी आलेलं मला नाही आवडणार..

शौर्य समीराच्या डोळ्यांतील पाणी पुसतच बोलला..

समीरा : आय एम सॉरी.. माझं मन खुप चिडचिड झालेलरे..मला नाही माहीत मी काय विचार करत होते तुझ्याबद्दल ते.. त्यात तुझा फोन पण नाही लागत होता.. खुप घाबरून गेलेली मी.. तुला काही झालं असत तर मी जगूच नाही शकत शौर्य.. 

अस बोलत समीरा शौर्यला मिठी मारून रडते..

शौर्यला नक्की समीराला काय झालेलं कळत नाही.. पण तोही तिच्या केसांवरून हात फिरवत तिला शांत करतो.. 

समीरा हातातील चैन स्वतःच्या हाताने शौर्यच्या गळ्यात घालते.. 

मनवी लांबुनच त्या दोघांना पुन्हा एकत्र आलेलं बघते आणि अजुन चिडचिडी होते..

ती घरी येताच स्वतःच्या रूममध्ये जाते... तिच्या मागोमाग तिचे वडील सुद्धा तिच्या रूममध्ये जातात..

जोर जोरात श्वास घेत ती बेड वर बसते. रागाने अगदी लालबुंद झालेली असते..  

काय झालं बेटा.. कोण काही बोलल का तुला?? रोहन काही बोलला का?? तीचे वडील काळजी पोटी विचारतात..

मनवी काहीच उत्तर देत नाही..

तिचे वडील तिच्या केसांवरून हात फिरवत तिला पुन्हा विचारतात..

 शौर्यच माझ्यावर प्रेम आहे.. तो मला फसवतोय डॅड.. त्याने मला गोल्ड चैन दिलेली त्याला हार्ट शेपच पेंडल होत.. पण सगळ्यांसमोर तो समीरावर प्रेम आहे असच दाखवतो..

तुझं रोहनवर प्रेम आहे ना..

मनवी तिच्या वडिलांकडे बघते..

मनवी : हा... माझं रोहनवर प्रेम आहे.. पण शौर्यच माझ्यावर आहे ना.. मग तो समीराकडे का जातो.. मला शौर्य हवाय डॅड.. हातातील मोबाईल जोरात भिंतीवर आपटत ती बोलते.. 

मनवीची झालेली अवस्था बघून तिचे वडील त्यांच्या फेमिली डॉक्टरांना फोन करतात.. 

हॅलो डॉक्टर मी मनवीचा डॅड बोलतोय.. मनवी पुन्हा पहिल्यासारखीच करू लागलीय.. 

डॉक्टर : एक काम करा तुम्ही संध्याकाळी तिला घेऊन थेट हॉस्पिटल मध्येच या.. आपण भेटुन बोलुच..

(नक्की मनवीला काय प्रॉब्लेम असतो?? ती अस का वागते?? आणि पूढे काय?? त्यासाठी प्रतीक्षा करा पुढील भागाची. हा भाग कसा वाटला ते ही कळवा..)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all