अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 21

क्रमशः

(समीरा शौर्यकडे बघत होती तो काय बोलेल ते.. आणि शौर्य मुंबईत न येण्यासाठी कारण शोधत होता)
राज : अरे बोल तरी.. कधीच ती विचारतेय...

शौर्य : समीरा..ते माझा पाय...

समीरा : दोन दिवस आधीच बोललासना बरा झालाय म्हणून आता....

शौर्य : हो तेच सांगतोय.. आता पाय बरा झालाय.. पण.. मुंबईला..

मनवी : आता काही कारण नको हा.. आपण सगळेच जाणार आहोत..

रोहन : अग पण त्याला काही पर्सनल प्रॉब्लेम असतील ना..

मनवी : तुला काय माहीत त्याला प्रॉब्लेम आहे ते आणि आता तर तयार झालेला तो..

वृषभ : तेव्हा मुंबईला लग्न आहे हे कुठे माहीत होतं..

समीरा : पण आता माहीत आहेना.. तस पण शौर्य तु तर मुंबईचाच आहेस ना मग तुला काय प्रॉब्लेम मुंबईपासून..??

(मी मुंबईचा आहे हाच तर प्रॉब्लेम आहे ना.. शौर्य मनातच बोलला..)

समीरा : शौर्य मी तुला काही तरी विचारतेय..

मनवी : शौर्य नाही तर आम्ही पण नाही..

हो हो.. आम्ही पण नाही..(सगळेच शौर्यला ब्लॅकमेल करू लागले)

शौर्य : गाईज एक मिनिट तुम्ही अस तडका फडकी निर्णय घेऊ नका.. समीराला वाईट वाटेल..

सीमा : तु नाही आलास तर तस पण तिला वाईट वाटणारच आहे..

शौर्य : एक काम करतो मी घरी विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो.. मग तर चालेल..

राज : आताच्या आता..

मनवी : हो आत्ताच काय ते फायनल होऊ दे..

शौर्य : मी नंतर रूममध्ये गेल्यावर करतोना फोन. आणि तुम्हांला कळवतो..

टॉनी : रूममध्ये गेल्यावर काय नाय इथेच बोल.. आमच्या समोर..

मनवी : हो..

वृषभ : मला अस वाटत शौर्य की एकदा तु तुझ्या मॉमला विचारायला काय हरकत आहे..

रोहन : आपण सगळे मिळुन कन्विन्स करुयात.. 

शौर्य : तुम्हांला खरंच वाटत मॉम ऐकेल..

वृषभ : पुढच पुढे आधी फोन लावंतर खर..

सगळेच शौर्यला फोन लावायला मजबूर करतात..

शौर्य फोन लावायला जातो..

मनवी : अस काय करतोस.. व्हिडीओ कॉल लाव.. आम्ही कन्विन्स कस करणार मग..

शौर्य : ओके... गॉड ब्लेस मी...

एक दिर्घ श्वास घेत शौर्य व्हिडिओ फोन लावतो..

अनिता फोन उचलते..

शौर्य : हॅलो मम्मा..!

अनिता : काय मग पेपर झाले का सगळे.. कशी झाली एक्साम..

शौर्य : मम्मा माझ्या फ्रँड्स लोकांना तुझ्याशी काही तरी बोलायचंय..

(आधी तु विचार तर मग आम्ही बोलतो.. राज हळुच पुटपुटला..)

अनिता : माझ्याशी काय बोलायचं?? (अनिता थोडं हसतच बोलली)

शौर्य : इथे दिल्लीत एक फ्रँड आहे ना माझी.. तिच्या भावाच लग्न आहे तर  आम्ही सगळेच जायचं म्हणत होतो.. मी पण जाऊ??

अनिता : मग जा ना एवढे काय तु परमिशन काढत बसतोयस..

शौर्य : अग पण ते लग्न...

तोच रोहनने शौर्यच्या हातातला मोबाईल घेतला.. तसे सगळे ग्रुप करून मोबाईल समोर उभे राहिले.. आणि हॅलो आंटी म्हणुन ओरडतात..

अनिता ओठांवर गोड हसु देत मोबाईल मधुनच हात दाखवत सगळ्यांना हॅलो करते..

समीरा : आंटी थेंक्स.. फॉर युअर परमिशन..

खुप खुप थेंक्स..

अनिता : थेंक्स कश्याबद्दल.. तेवढच शौर्य देखील रमेल.. आणि हो दिल्लीला थंडी पण खुप आहे.. जास्त बाहेर फिरू नका..

हो हो.. आम्ही घेऊ काळजी आमची पण आणि शौर्यची तर जास्तच घेऊ... मग तर चालेल..

अनिता : मला काहीच हरकत नाही..

शौर्यच्या मॉमला रोहन आणि इतर सगळे मिळुन बाय करतात.. 

येहहहह..सगळे टेबल वाजवच जल्लोष करू लागले.. शौर्य हातात मोबाईल घेत रोहनकडे बघु लागला..

मनवी : मग निघुयात.. तैयारी करावी लागेल..

राज : एवढं काय तैयारी करायची.. पर्वा जायचय आपल्याला उद्या नाही..

मनवी : तरी पण.. मी तर फर्स्ट टाईम मुंबईला चाललीय.. थोडं जास्तच एक्साईटमेंट आहे मुंबईला जायचय म्हणुन..

समीरा : मी ही निघते.. मला सुद्धा घरी फोन करायचाय..

अग समीरा एक ना मला काही तरी महत्वाचं बोलायचंय म्हणजे ड्रेसिंग बद्दल.. अस बोलत सीमा, समीरा आणि मनवी बाजूलाच बोलत उभे रहातात..

सगळेच जायला निघाले. शौर्य मात्र तिथेच काही तरी विचार करत बसू लागला..

वृषभ : आता मॉमने दिली ना परमिशन मग काय एवढं विचार करतोयस??

शौर्य : मॉमने परमिशन नाही दिलीय.. तिला आपण सांगितलं का की लग्न मुंबईत आहे ते.??नाहीना जर ते तिला कळलं असतना तर तिने मला परमिशन दिलीच नसती..

रोहन : तु किती टेन्शन घेतोस यार.. तिला काही कळणार नाही.. आणि आम्ही आहोत ना तुझ्यासोबत मग का टेन्शन घेतो तु. आपण नाही कळु द्यायचं तुझ्या मॉमला की तु मुंबईत आहे..

शौर्य : मी मुंबईत आहे हे मॉमला कळणार नाही... इट्स इम्पोसीबल..

वृषभ : इम्पोसीबल असकाही नाही ह्या जगात. आणि आता प्लिज.. प्लिज आणि अजुन एकदा प्लिज.. प्लिज चल मुंबईला..

शौर्य : मॉमला कळलं ना तर तीचा माझ्यावरचा विश्वासच उडून जाईल.. 

वृषभ : अस काहीही होणार नाही.. प्लिज शौर्य आमच्यासाठी..

रोहन : शौर्य प्लिज.. 

टॉनी आणि राजला तिघांचं काय चालल हे कळतच नसत.. 

टॉनी : तुमच काय चाललंय ना मला काहीच कळत नाही.. बट शौर्य प्लिज आता नाही नको बोलुस..

ओके.. (शौर्य नाराज होतच बोलला पण मनातुन खुप घाबरलेला)

वृषभ : चला मग समीराला तिने सांगितलेले डॉक्युमेंट सुद्धा पाठवायचे आहेत..

सगळेच रूममध्ये जाऊन समीराला आपापले डॉक्युमेंट पाठवु लागले.

डॉक्युमेंट पाठवताना शौर्यच मन खुप घाबर घुबर झालं होतं.. शौर्यच्या मनात खुप विचार येऊ लागतात. शेवटी जे होईल ते होईल अस तो ठरवतो... समीरासाठी एवढी छोटीशी रिस्क तर मी घेऊच शकतो ना.. मी नाही गेलो तर ती नाराज होईल आणि तिने माझ्यामुळे नाराज झालेलं मला नाही आवडणार.. जास्त वेळ वाया न घालवता तो डॉक्युमेंट सेंट करतो.. एक स्माईली असलेला सिम्बॉल समीरा सेंट करते. समीराने पाठवलेला तो स्माईलीचा सिम्बॉल बघातच शौर्य स्वतःचा मोबाईल हृदयाशी कवटाळत डोळे बंद करून समीराचा हसरा चेहरा अनुभवत एक मस्त झोप काढतो. 

(दोन दिवसानंतर)

★★★★★

मुंबई ऐरपोर्टवर सगळे येऊन हजर झाले.. लांबुनच कोणी तरी आपल्या माणसानंपैकी हात दाखवतय अस समीराला दिसत होतं.. थोडी जवळ येताच.. स्वतःच्या वडिलांना तिला ऐरपोर्टवर बघुन खुप आश्चर्य वाटलं.. सोबत तिचा दादा आणि काका..ही होता. ते बघा तिथे.. (समीरा सगळ्यांना तिच्या फेमिलिकडे बोट दाखवत त्या दिशेने नेऊ लागली) फेमिलीकडे जाताच गळा भेटी, ओळखी वैगेरे झाल्या.. 

ह्यांच्यामुळे मला तुम्ही लोक मिळालात.. वडिलांची आपल्या मित्र मैत्रिणींना स्पेसिअल ओळख करून देत समीरा बोलली.. 

वडिलांना थोडं वाईट वाटलं.. पण चेहऱ्यावर जराही हाव भाव न दाखवता त्यांनी लगेच सगळ्यांना घरी चला..गप्पा गोष्टी घरी जाऊन होतीलच..

काका : हो चला चला.. द्या मी बेग घेतो तुमच्या तुम्ही गाडीत जाऊन बसा.. 

शौर्य : ओहह काका अस काय करताय...आम्ही आमच्या बेग घेतो.. तुम्ही अस आमच्या बेग उचललेल्या आम्हाला नाही आवडणार..

हो.. आणि एवढं पण काही जड नाहीत.. वृषभ सावरतच बोलला..

सगळे गाडीत बसुन समीराच्या घरी जायला निघाले..

समीराचा दादा गाडी ड्राइव्ह करत होता..

समीरा : दादा हा शौर्यसुद्धा मुंबईचाच आहे..

समीराचा दादा : अरे वाह.. मुंबईत कुठे??

शौर्य : इथेच... बांद्रामध्ये..

दादा : आमची कंपनीसुद्धा तिथेच आहे.. बांद्रा वेस्ट की ईस्ट..??

शौर्य : बॅंडस्टेनजवळ..

दादा : ओके..

ए राज आमची गाडी जिंकलीरे... टॉनी दुसऱ्या गाडीच्या खिडकीतुन समीराच्या गाडीला हात दाखवतच त्या लोकांना चिडवु लागला..

राज : काय यार... दादा तु थोडं फास्ट चालव ना गाडी

दादा : तु आधी सांगितलं असत तर फास्ट चालवली असती मी..

वृषभ : तु हळुच चालवरे दादा.. ह्याच कुठे ऐकतोय.. आणि राज ही मुंबई आहे.. रस्ते बघ जरा...

राज : दादा तु ह्याच ऐकु नकोस.. तु फास्ट चालव..

समीरा : ए राज असल्या गोष्टी मी आणि दादा लहानपाणी खूप करायचो.. तेव्हा मज्जा पण यायची.. बाजुची कार भले ओळखीची नसेल ना तरी तिच्यासोबत रेस लावायचो.. पण आम्ही आता मोठे झालो पण तु अजुनही लहानच राहिलास.. (समीरा हसतच बोलली)

राज : हो मी लहानच आहे अजुन.. माझ्या आईसाठी तरी मी लहानच आहे.. आणि तुम्ही काहीही म्हणा मला ही रेस जिंकायची आहे..

दादा : बर.. मी ट्राय करतो.. पुढे हाय वे लागेल ना तेव्हा बघुयात.. तस पण  आमच्या काकांचा स्पिड हाय वे ला थोडा कमी होतो..

सीमा : नशीब नाही तर हा रडु बाबा रडत बसला असता..

वृषभ : नाही तर काय.. आलोय कश्यासाठी आणि ह्यांच काही तरी वेगळंच.. सर्वात आधी तर ना त्या टॉनी ला बघायला हवं..

राज : आणि रोहनला पण..

वृषभ : रोहनवर पण टॉनी ने हात फिरवला वाटतय..

गाडीत गप्पा गोष्टी चालुच होत्या.. समीराचा दादा बोलल्याप्रमाणे हाय वे वर पोहचताच काकांच्या गाडी स्पिड थोडा कमी झाला.. आणि दादाने आपल्या गाडीचा स्पिड थोडा वाढवत आघाडी घेतली..

तस राज खिडकीतून टॉनीला उलटा ठेंगा दाखवतच चिडवु लागला.

सीमा : राज ह्यापुढे शहाण्या मुलासारखं वागायचं हा. आता मोठा झालयास तु.. 

सीमाने राजला चिडवताच सगळे हसु लागले..

गाडी येऊन समीराच्या घराबाहेर थांबली.. पाठूनच टॉनी आणि इतर लोकांची गाडी देखील आली..

राज : ए टॉनी बघ आम्ही जिंकलो.. चल कधी पाचशे रुपये.

सीमा : ए राज तु किती चिप आहेस रे.. पाचशे रुपयांसाठी तु हे सगळं केलं..

वृषभ : टॉनी हे काय आहे सगळं??

टॉनी : आता एअरपोर्टवरून इथे येण्यासाठी काही टाईम पास नको का?? म्हणुन हा..

राज : आता मॅच हरल्यावर टाईमपासचं बोलणार रे तु??

टॉनी : "तुला ही मॅच टाय झाल्यावर.." अस म्हणायचं का??

राज : एक मिनिट, तुम्हीच बोलला होतात की ज्याची गाडी सर्वात आधी समीराच्या घरी पोहचेल तो जिंकेल.. बरोबर??

रोहन : हो मग...??

राज : बस काय रडायला चालु का मग...? 

टॉनी : एक मिनिट आम्ही रडत नाही आहोत..तूच रडतोयस..

ही तुझी गाडी??? बरोबर?? आणि ती आमची?? (दोन्ही गाडी दाखवतच टॉनी बोलत होता)

राज : मग??

रोहन : दोन्ही गाड्या घराबाहेर तर आहेत??

राज : पण माझी गाडी पहिली आली..

रोहन : आपल काय ठरलेलं?? ज्याची गाडी पहिली... बर का राज.. ज्याची गाडी पहिली... समीराच्या घरी पोहचेल तो जिंकेल. आणि जो हरेल तो पाचशे रुपये देईल..

राज : हा मग.. माझी पहिली आली मी जिंकलो..

रोहन : अस काय करतोयस राज... दोघांच्याही गाड्या समीराच्या घराबाहेर आहेत.. घरात एकही गाडी गेली नाही.. म्हणजे मॅच टाय..

आता सगळे राजवर अगदी पोट धरून हसु लागतात..

तुम्हा दोघांना तर मी बघतोच.. अस बोलत राज दोघांना मारायला जातो.. 

समीरा : गाईज घरी पण चला ना.. इथे बाहेरच काय.. 

समीरा सगळ्यांना घेऊन घरात येते.. 

समीराच घर देखील एखाद्या बंगल्यापेक्षा काही कमी नसत.. घरी सगळेच समीराची वाट पहात हॉल मध्येच उभे असतात..

समीराची आई, काकी तिच्या दोन मुली आणि एक दोन नातेवाईक..

समीरा सगळ्यांची ओळख करून देते..

समीराच्या आईने सगळ्यांसाठी नाष्टा तैयार केलेला असतो..  प्रत्येकाला आधी त्यांच्या रूम दाखवुन थोडं फ्रेश होऊन मग खाली यायला ती सांगते.. त्याप्रमाणे सगळे थोडं फ्रेश होऊन खाली येतात..

सगळे मोठ्या अश्या डायनिंग टेबलवर नाश्ता करायला बसतात..

आई ती लिस्ट दे मी सामान घेऊन येतो.. समीराचा भाऊ आईला आवाज देत बोलला..

समीरा : ए दादा तु कुठे चाललास?? तुझं लग्न आहे तु जास्त नाचा नाच नाही हा करायची.. आई मला लिस्ट दे मी घेऊन येते सामान..

दादा : अग.. तुम्ही लोक दमलात थोडा आराम करा.. मी गाडी ने जातोय नि गाडीने येतो..

शौर्य : दोन तासांच्या प्रवासात कोण दमतय. 

वृषभ : तु आराम कर आम्ही घेऊन येतो. तेवढं आम्हाला मुंबई फिरायला मिळेल..

समीरा : आणि प्लिज दादा तु आता आराम कर.. नवरा आहेस तू..मी असताना तुला बर मी काम करू देईल..

दादाच समीरा आणि तिच्या मित्र मंडळींपुढे काही चालणार नव्हतं..

बर बाई धर.. अस बोलत दादाने सामनाची लिस्ट तिच्या हातात गेली..

समीरा : गाडीची चावी??

दादा : तुला नीट ड्राइव्ह करता येत नाही.. हे पैसे घे आणि टेक्सीने जा..

टॉनी : ह्या शौर्यला येते ना.. 

दादा : नक्की??

शौर्य : हो..

दादा : बर मग नीट जावा.. 

आई : आणि जास्त लांब जावु नका..

शौर्य : काकू पोहे खुप छान झालेले.. आणि तुमच्या हातचे लाडु तर लाजवाब..

आई : अजुन घे ना मग...

शौर्य : पोटात जागा असती ना तर खरंच सगळे संपवले असते मी.. आणि सगळ्यात जास्त मीच खाल्ले.. दडपे पोहे मला खुप आवडतात.. 

आई : बर मग अजुन काही लागलं तर सांगा.. तुम्ही सगळ्यांनीच.. आणि लवकर घरी या..

दादा : समीरा अजून एक काम होत.. सूट पण शिवायला टाकलाय तो सुद्धा घेऊन ये.. मॉल मध्ये जालच ना शॉपिंगसाठी मग तिथे आहे तो शॉप..

समीरा : बर बिल दे..

समीरा : ए काका तुझ्या गाडीची किल्ली दे ना. दादाच्या गाडीत आम्ही आठ जण कस काय बसतील..

काकांनीही लगेच किल्ली दिली.. तसे सगळे मुंबई सफर करायला निघाले..

शौर्यसाठी मात्र काही नवीन नव्हतं.. 

मनवी : मला पण शॉपिंग करायचीय.. आपण आधी मॉलमध्येच जाऊयात..

रोहन आज तर तु गरीब होऊनच दिल्लीला जाणार बघ.. मला पाचशे रुपयांसाठी फसवलं ना आता तुझे पाच हजार जातात की नाही बघ.. (राज हळुच रोहनला बोलला)

रोहन राज कडे बघत तोंड वाकड करत स्माईल देतो..

समीरा शौर्यच्या बाजूच्या सीटवरच बसली असते..

टॉनी : ए शौर्य गाणं होऊन जाऊ दे ना.. आपण तुमच्या शहरात आलोय..

वृषभ : आपण समीरा आणि शौर्यच्या शहरात आलोय मग एक ड्युअल सोंग तर झालंच पाहिजे..

समीरा : गाईज ड्युअल नको.. म्हणजे त्याला येणार गाणं मला येतच असेल असं नाहीना.. आम्ही सिंगल सिंगल बोलतो.. मग तर चालेल

आम्हाला तर काहीही चालेल..

वृषभ : पहिलं समीरा तु.. 

समीरा ही लगेच गायला तैयार होते.. तिरकी नजर ती बाजूला कार ड्राइव्ह करणाऱ्या शौर्यकडे फिरवत गाणं गायला सुरुवात करते..

मिले हो तुम हमको बड़े नसीबों से
चुराया है मैंने क़िस्मत की लकीरों से

मिले हो तुम हमको बड़े नसीबों से
चुराया है मैंने क़िस्मत की लकीरों से
तेरी मोहब्बत से साँसें मिली है
सदा रहना दिल में क़रीब रह होके
(मिले हो तुम हमको बड़े नसीबों से
चुराया है मैंने क़िस्मत की लकीरों से)

सगळेच टाळ्या वाजवतात.. 

शौर्य समोर असणाऱ्या मिरर कडे बघत तिला स्माईल देतो.. आणि ती सुद्धा..

मनवी : आता शौर्य...

शौर्य : समीरा स्पेसिअल तुझ्यासाठी हा. हळूच समीरालाच ऐकू जाईल अस बोलतो..

वृषभ : आम्ही पण ऐकलं..

शौर्य : तुला तर माहितीच आहे वृषभ.. त्यात काय??

वृषभ : बर चल गाणं गा..

शौर्य : समीरा नक्की गाऊ??

समीरा : हम्म..

समीराने हम्मम्म बोलताच शौर्यने गाणं गायला सुरुवात केली..

दिल का ये क्या राज़ है
जाने क्या कर गये
जैसे अंधेरो में तुम चाँदनी भर गये

करे चाँद तारों को मशहूर इतना क्यूँ
कमबख्त इन से भी खूबसूरत है तू
आइ लव यू तू रु रु येह
आइ लव यु..


ओहहहहहह....वृषभ मोठ्यानेच ओरडत शौर्यला चिरअप करतो आणि सोबत त्याचे इतर मित्र मंडळी देखील.. मनवी व्यतिरिक्त सगळ्यांना काय चालू आहे ते कळत होतं.

समीरा तर लाजुन अगदी चुरररर झाली असते... समोरं असलेल्या मिरर मध्ये दिसणाऱ्या शौर्यकडे बघायची तिची तर हिंमतच होत नव्हती.

शौर्य इथेच गाडी थांबव.. ह्याच मॉलमध्ये जायचय आपल्याला.. समीरा शौर्यला काही सूचना देतच गाडी थांबवायला सांगते.

शौर्य : बर गाडी करतो पार्क इथे.. 

शौर्यला हा मॉल काही वेगळं नव्हता.. गाडी पार्क करून सगळेच मॉलमध्ये शिरले...

सगळेच आता शॉपिंगमध्ये गुंतून गेले..

★★★★★

विराज खुप दिवस रूम मधुन बाहेर आला नाही त्यामुळे सुरज त्याच्या रूम मध्ये बसुन त्याची समजुत काढत असतो.. पण विराजच त्याच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नसत.. 

तोच सुरजचा फोन वाजतो..

सुरज : हॅलो...
(सुरज समोरच्याच बोलणं ऐकत होता)

काय??  (जागेवर उठुनच उभा राहिला).. तो मुंबईतच आहे... शिकार स्वतःच चालत आलीय.. त्याच्यावर लक्ष ठेवा.. कुठल्या मॉलमध्ये आहे त्याचा एड्रेस पाठव मी लगेच माणस पाठवतो.. ही संधी सोडायची नाही मला.. आधीच दोन दा गेम फसलाय..

सुरज बोलत बोलतच विराजच्या रूम मधुन निघतो..

विराज सुरजच बोलणं ऐकतो.. 

विराज वेळ न वाया घालवता शौर्यला फोन लावतो..

(शौर्यच्या फोनची रिंग होत असते..)

उचल.. उचल.. लवकर फोन उचल...

शौर्य : हॅलो वीर बोल..

विराज : तु कुठेस?? तु मुंबईत आलायस??

शौर्यच हृदय जोरात धडधडू लागलं.. घाबरून अंग गरम पडत असत त्याला झालं..

विराज : शौर्य डोन्ट वेस्ट माय टाईम.. तु कुठेस सांग..

शौर्य : ते मी... मी... चेन्नईलाच आहे..

विराज : नक्की..

शौर्य : तु अस का बोलतोयस??

विराज : काही नाही ठेव फोन मी मग बोलतो..

डॅड कोणाबद्दल बोलत होता?? विराज फोन ठेवताच विचार करू लागला...

विराज बाहेर येऊन सुरजच्या रूमचा कानोसा घेत होता.. पण सुरजच्या रूममधुन काही आवाज येत नव्हता..

साहेब काही हवंय का??? पाठून आलेल्या नोकराच्या आवाजाने तो घाबरला..

विराज : तु आहेस होय... ते डॅड कुठे??

नोकर : मोठे साहेब तर आत्ताच कुठे तरी गेले..

नक्कीच काही तरी मोठा प्रॉब्लेम आहे.. विराजला काय करावं ते कळत नव्हतं..

तो पुन्हा शौर्यला फोन लावतो..

विराज : शौर्य तु खरच नाही आलायस ना मुंबईला..

शौर्य : हो... तु अस का विचारतोस पण..

विराज : तु जर मुंबईत असशील तर खुप मोठा प्रॉब्लेम मध्ये आहेस एवढं समज.. प्लिज खोट बोलु नकोस..

शौर्य विराजशी बोलत असताना.. त्याच लक्ष एका माणसाकडे जात.. जणु तो त्याच्यावर नजर रोखुन आहे असं त्याला वाटत.. 


विर मी तुझ्याशी मग बोलतो मी थोडं बिजी आहे.. अस बोलून शौर्य फोन कट करतो आणि समोर त्या माणसाला बघणार पण तो तिथुन गायब असतो.. 

मलाच काही तरी भास झाला असेल असं बोलत शौर्य दुर्लक्ष करतो..

शौर्य तुला हे ट्राय कर ना छान दिसेल.. समीरा हातात शर्ट घेत दुसरा शर्ट शोधत असते.. खुप वेळ हातातच शर्ट असल्याने ती शौर्य कडे बघते..

समीरा : शौर्य काय झालं??

शौर्य : नाही ग कुठे काय?? 

(विराजला फोन करून संशय आल्याने.. शौर्यला आता खुप टेन्शन आलं.. तो त्याच विचारात असताना समीराने दिलेला शर्ट हातात पकडत तसाच उभा रहातो)

समीरा : ट्राय कर ना.. इथे का उभा आहेस..तु.

शौर्य : तु घेतलायस मग ट्राय करायची काय गरज..

समीरा : तरी ही ट्राय कर..

शौर्य : समीरा.. तुला बोलल्याप्रमाणे मी प्रपोज केलं तिला ते ही माझ्या स्टाईलने.. पण तिने उत्तरच नाही दिल मला.. अस का??

समीरा : कारण.. कारण.. तिला थोडी अजुन वेगळी स्टाईल हवी असेल.. म्हणजे थोडी वेगळी.. यु नो.. जराशी हटके टाइप.. मागसच्या स्टाईलमध्ये एवढी मज्जा नाही आली असणार तिला..

शौर्य : हम्मम..

समीरा : तोंड पाडुन बसु नकोस हे शर्ट ट्राय करून ये मी इथेच आहे.. आणि हे दोन्ही सुद्धा ट्राय कर..

शौर्य शर्ट चेंज करायला जातो.. 

वृषभ : भारी जोडी वाटते दोघांची..

समीरा : हो का..? तु आलास का चिडवायला??

वृषभ : चिडवत नाही ग.. पण खरंच.. शौर्य सारखा मुलगा मिळणार नाही तुला.. 

समीरा : हम्म तु काही शॉपिंग केली का नाही.. मी हेल्प करू तुला..

वृषभ : मला आवडेल..

शौर्य आत जातो तेव्हा शौर्य वर पाळख ठेवून असणारा फोन वर बोलत असतो आणि इथेच त्याच्यावर पाळख ठेवुन असणाऱ्याची शौर्यवरून नजर हटते..

तो पूर्ण मॉल मध्ये त्याला शोधत असतो.. पण शौर्य त्याला कुठे दिसत नाही..

सुरजसुद्धा तेवढ्यात मॉलमध्ये येतो.. 

सॉरीपण तो निसटला हातुन.. म्हणजे मी लक्ष ठेवूनच होतो पण तुमचा फोन आला आणि तेवढ्यातच तो गेला.. पाळख ठेवुन असणारा माफी मागतच बोलला..

सुरज : शट... पण तुझी खात्री आहे की तो शौर्यच होता..

तुमच्याशी खोटं बोलुन काय मिळणार आहे मला..

हॅलो अंकल.... ज्योसलीन शौर्यची आणि विराजची लहानपणापासूनची मैत्रीण नेमकी त्याच वेळेला तिच्या फ्रेंड्ससोबत शॉपिंगला येते. सुरज ला बघताच ती त्यांना भेटते..

सुरज : हॅलो बेटा..

ज्योसलीन : अंकल मी स्वप्न तर नाही ना बघत आहे.. तुम्ही आणि शॉपिंग??

सुरज : हो आज.. मुड झाला म्हटलं करूयात शॉपिंग.. अ.. ज्योसलीन बेटा तुला शौर्य भेटतो का आता??

ज्योसलीन : काय अंकल तो चेन्नईला आणि मी इथे कस भेटणार.. बाय दि वे येणार कधी तो इथे..?

सुरज : काही माहीत नाही..बट आला तर नक्की कळवेल तुला..

ज्योसलीन : ओके.. विराजला हॅलो म्हणून सांगा..

सुरज : हो नक्की..

अंकल मी निघते.. अजून शॉपिंग बाकी आहे.. फ्रँड्स वाट बघतायत माझी..

सुरज : हम्म बाय..

म्हणजे शौर्य नाही इथे.. सुरजही तिथुन निघाला..

इथे शौर्य एक एक शर्ट ट्राय करून समीरा आणि इतर तिच्यासोबत असणाऱ्यांना मित्र मैत्रिणींना दाखवत होता..

समीरा प्रत्येक वेळेला तोंड वाकड करत त्याला पुन्हा चेंज करण्यासाठी आत पाठवत होती..

ज्योसलीन ही नेमकी शॉपिंग करत तिथे येते.. आणि त्याच वेळेला शौर्य बाहेर येतो..

आता हा लास्ट मी पुन्हा नाही जाणार हा चेंज करायला जाणार.. शौर्य दोन्ही हात बाजूला करत त्याने घातलेला शर्ट समीराला दाखवत होता.. 

ज्योसलीन शौर्यला अस बघुन ती समीराला बाजूला करतच धावत शौर्य जवळ जाते..

ज्योसलीनला अस समोर बघुन शौर्यही घाबरून जातो.. हिला कळलं मी मुंबईला आहे म्हणजे मम्माला कळेल ह्या भीतीने..

ए... हॅलो... दिसत नाही तुला??ज्योसलीन ने अस धक्का मारून गेली म्हणून समीरा तिला ओरडली..

पण ज्योसलीन ने पाठी न बघताच शौर्यला प्रेमाने मिठीच मारली..

तिला शौर्यला अस मिठी मारताना बघुन समीराला अजुन राग येतो..


क्रमशः 

©भावना विनेश भुतल


(आता पुढे काय?? त्यासाठी पुढील भागाची प्रतीक्षा करा.. आणि हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा)

🎭 Series Post

View all