अतरंगीरे एक प्रेमकथा १४३

In marathi

रोहन आर्यन सोबत त्याच्या घरी जातो.. घरात आल्या आल्या रोहनच लक्ष पिऊकडे जात.. पिऊ डायनिंग टेबलवर अभ्यास करत बसली असते.. 

आर्यन : हा प्रतीक आणि महेश असला ना की घरी यायला असाच उशीर होतो मला.. नशीब ह्या टाईमला माझी मम्मी झोपली असते.. नाही तर माझं काही खर नसत..

रोहन काहीही न बोलता त्याच बोलणं ऐकत असतो.. आर्यनचा आवाज ऐकुन पिऊच लक्ष त्याच्याकडे जात..

ए दादा कुठे होतास एवढा वेळ तु?? वाजले किती?? हातातील पेन आपल्या बुक वर तसच ठेवत पिऊ आर्यनजवळ जात त्याला विचारते..

आर्यन : मम्मी??

पिऊ : आहे आत.. पण तु होतास कुठे??

आर्यन : प्रश्न नको ना ग करुस मला भुक लागलीय.. जेवायला वाढ.. मला लगेच बाहेर जायच..

रोहनला आपल्यासोबत डायनिंग टेबलवर बसवतच आर्यन बोलतो..

परत अजुन जायचंच आहे का बाहेर?? आतुन आर्यनची आई आर्यनवर ओरडतच बाहेर येते..

मम्मी झोपली नाही??? आर्यन हळु आवाजातच पिऊला विचारतो...

पिऊ आपली मान नकारार्थी हलवत नाही म्हणुन बोलते..

आत जाऊन शांत कर ना तिला.. माझ्या मित्राच्या समोर ओरडत बसेल नाही तर मला.. पिऊच्या जवळ जात तिला मस्का पॉलिश करतच आर्यन बोलतो..

हे अस मस्का पॉलिश करून काहीच फायदा नाही.. मम्मी खुप भडकली आहे तुझ्याव.. मी आज तुझी काहीही मदत नाही करू शकणार.. आर्यनने खांद्यावर ठेवलेलं हात बाजुला करतच पिऊ त्याला बोलते..

आपल्या भावासाठी एवढ नाही करू शकत तु.. मित्रासमोर इन्सल्ट होईल ग माझा.. प्लिज ना.. आर्यन पुन्हा रिक्वेस्ट करतच पिऊला बोलतो..

तो पर्यंत आर्यनची मम्मी किचनबाहेर येते..

सॉरी.. अँड बेस्ट ऑफ लक.. पिऊ थोडा इनोसेन्ट असा चेहरा करत ओठांवर थोडस हसु आणत आपल्या भावाचे गाल खेचतच आपला मोर्चा सरळ किचनमध्ये वळवते.

आर्यनची आई : काळ वेळ आहे की नाही आर्यन तुला?? पप्पा घरी नसले की तुझं उठ सूट बाहेर मिरवण चालु होत हा आर्यन.. पहाटे पाच वाजता घरातुन बाहेर पडलायस तु.. आत्ता साडे तीन वाजत... 

मम्मी हा रोहन.. माझा खास मित्र.. दिल्ली वरून आलाय.. आर्यन रोहन जवळ जात मध्येच आपल्या आईला थांबवतो..

(आर्यनची आई रोहनकडे बघत मध्येच थांबते आणि थोडी शांत होते..)

हा.. ??? रोहनकडे बघतच आर्यनची आई काही तरी आठवण्याचा प्रयत्न करत असते..

आर्यन : रोहन ग मम्मी.. लास्ट टाईम आलेला ना.. आपल्या वृषभ सोबत.. वृषभला बघायला आलाय.. दिल्ली गॅंग होती बघ.. लास्ट टाईम जेवायला होती बघ.. (आर्यन आईला आठवण करून देतच बोलला..)

आर्यनची मम्मी : अरे हो आठवलं.. तेच म्हटल चेहरा ओळखीचा वाटतोय.. आत्ता वर्ष तरी झालं असेल म्हणुन आठवणीत नाही... कसा आहेस??

रोहन : मी एकदम मस्त.. तुम्ही कसे आहात??

आर्यनची मम्मी : मी पण मस्त.. वृषभला भेटायला आलास??

रोहन : हो..

आर्यनची मम्मी : भेटलास मग त्याला??

रोहन : आत्ता जेवुन झाल्यावर जाऊन भेटेल मी त्याला..

आर्यन : मम्मी जेवून झाल्यावर मी पण वृषभला भेटायला जातोय.. आय मीन मी जाऊ ना..?? 

आर्यनची मम्मी : म्हणजे 10 शिवाय काही घरी नाही येणार तु??

आर्यन : सात वाजेपर्यंत पक्का घरी येतो ग.. ह्या रोहनला सोबत म्हणुन जातोय.. त्याला कळणार नाही ना कस जायच ते म्हणुन.. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पक्का म्हणजे एकदम पक्का घरी येतो.. मग बाहेर कुठेच जात नाही.. मी आणि माझा अभ्यास.. प्लिज जाऊ...??

आर्यनची मम्मी : हम्मम.. जा.. आणि जेवुन घ्या.. चार वाजत आलेत.. हि तुझी दुपारच्या जेवणाची वेळ.. वेळेच भानच नसत ह्या मुलाला..

पिऊ.. लवकर जेवण आण ग.. रोहनला भुक लागलीय.. हो ना रोहन.. आपली मम्मी अजुन जास्त ओरडु नये म्हणुन आर्यन विषय बदलतो..

आर्यनची मम्मी : रोहन लाजायच नाही हा अजिबात.. 

रोहन मानेनेच हो बोलतो..

आर्यन : मी असताना कस लाजेल ग मम्मी तो.. तु आराम कर जा बघु.. मी आणि पिऊ मॅनेज करू.. तु जेवलास ना??

आर्यनची मम्मी : मला औषध घ्यायची असतात म्हणुन वेळेवर जेवाव लागत.. पिऊ जेवायची बाकी आहे.. ती पण मगाशीच कॉलेजमधुन आलीय.. तु जेवायचा बाकी आहेस हे कळलं म्हणुन थांबली तुझ्यासाठी..

पिऊ जेवण गरम करून आणत डायनिंग टेबलवर ठेवत असते..

आर्यन : पिऊ तु पण आमच्यासोबतच बस मग जेवायला..

पिऊ : हम्मम.. जेवण गरम करत ठेवलय.. आलीच मी.. अस बोलत पिऊ आत किचनमध्ये निघुन जाते..

रोहन थेंक्स यार.. तुझ्यामुळे मी वाचलो आज... आपली मम्मी आणि पिऊ आत गेलीय हे दिसताच आर्यन रोहनला बोलतो.

रोहन : तु पाच वाजल्यापासून करत काय होतास..??

आर्यन : मिशन मॉगेम्बो रे.. SD ला स्पाय कॅमेरा हवा होता.. कॅमेरा वैगेरे मॅनेज करत होतो.. कॅमेरा मॅन माझ्या ओळखीचा होता ना.. आणि नेमकं तो पुण्याला गेलेला.. प्रतीक आणि मी सकाळीच पुण्याला जाऊन त्याच्याकडुन कॅमेरा वैगेरे घेऊन आलो..

रोहन : एवढं पुण्याला जात बसण्यापेक्षा न्यु कॅमेरा घ्यायचा ना..

आर्यन : न्यु कॅमेऱ्या सोबत रिस्क कोण घेणार.. न्यु कॅमेरा ऐन टाईमला चालला नाही मग..?? म्हणजे अस SD बोलला रे.. मग काय करू..??

रोहन : हम्मम.. बाकी अभ्यास कसा चालु आहे तुझा..??

आर्यन : एकदम मस्त.. अभ्यासाच टेन्शन मी कधी घेतच नाही रे.. 

रोहन : शौर्यचा मित्र म्हणजे त्याच्यासारखाच हुशारच असशील.. त्यातल्या त्यात मुंबईकर म्हणजे जास्तच हुशार असशील.. होणं??

आर्यन : हा म्हणजे तस बोलु शकतो.. आम्ही मुंबईकर तुम्हां दिल्लीवाल्यांपेक्षा प्रत्येक गोष्टीत थोडं जास्तच हुशारच असतो रे.. यु नॉ देट.. 

रोहन : तुझं मुंबईकरवरून डायलॉग मारण चालु झालं का?? तुला मी दिसल्यावरच असे डायलॉग सुचतात का??

आर्यन : हा म्हणजे तु असल्यावर मला असले डायलॉग मारायला आवडत रे.. 

रोहन : अच्छा??

आर्यन : हम्मम..

रोहन : बाय दि वे तु पण CA करतोयस ना??

आर्यन : तु पण म्हणजे?? तु सुद्धा CA करतोयस का?? पण वृषभ आम्हांला बोललेला कि तु पुढे काही शिकत नाही आहेस म्हणुन.. हॉटेल काढतोयस ना स्वतःच..

रोहन : तो जे बोलला ते बरोबरच बोलला.. मला शिक्षणात इंटरेस्ट सुरुवातीपासूनच नाही आहे.. TY कसं क्लिअर केली हे माझं मलाच माहिती.. आणि मी नाही CA करत आहे.. माझी गार्गी CA करतेय.. गार्गी म्हणजे माझी फियांसी.. 

आर्यन : ओहह हो.. क्या बात हे ड्युड.. कुठे भेटली??

रोहन : अशी भेटली वैगेरे नाही रे.. मी अरेंज मेरिएज करतोय.. आफ्टर थ्री इयर्स..

आर्यन : काँग्रेच्युलेशन मित्रा.. लग्नाला बोलवशील ना आम्हांला.??

रोहन : तुला विसरून कस चालेल..?? 

आर्यन : बट तु जास्तच लवकर लग्न करतोयस अस वाटत नाही का??

रोहन : मला तर अस वाटतय की मी खुप उशीर करतोय लग्नासाठी.. थ्री इयर्स पण जास्त वाटतायत मला..

आर्यन : अच्छा... मग कठिण आहे बाबा तुझं.. 

रोहन : अस का बोलतोयस??

आर्यन : बेचलर लाईफ मस्त पैकी एन्जॉय करायची सोडून नको त्या गोष्टी साठी घाई करतोयस म्हणुन बोलतोय रे.. 23 इयर्स हे काय वय आहे का लग्नाच??

रोहन : मित्रा एकदा का प्रेमात पडशील ना तेव्हा दुसऱ्यादिवशीच हातात वरमाला घेऊन लग्नासाठी तैयार रहाशील..

आर्यन : मग तर मी असल्या नको त्या गोष्टीत पडणारच नाही.. मी मस्त पैकी माझी बेचलर लाईफ माझ्या मित्र मंडळींसोबत एन्जॉय करणार.. एकदा का लग्न झालं की नंतरची लाईफ आपल्याला बायको सोबतच तर स्पेन्ड करायची असते.. उगाच लग्नाची घाई मी तर करणार नाही.. आणि माझं ऐकशील तर तु पण नको करुस..

रोहन : विचार चांगले आहेत तुझे.. म्हणजे तुझे मित्रमंडळी इथे जवळ आहेत ना.. दिल्लीत गार्गी सोडली तर माझं अस कोणीच नाही रे.. डॅड घरी कमी आणि बाहेर जास्त.. आई काय असते हे मला माहितीच नाही.. म्हणजे मी तिला कधी बघितलंच नाही.. तुमच्यासारखी मित्र मंडळी अशी लांब.. बेचलर लाईफ तु बोलतोस तस एन्जॉय करण्याचा प्रश्नच येत नाही.. घरी सोबत कोण तरी रहावं म्हणुन लवकर लग्न करायचं बोलतो.. म्हणजे एकटेपणा कमी होईल रे.. 

रोहन अस बोलताच आर्यन त्याच्याकडे बघतच रहातो..

रोहन : अस का बघतोयस?

आर्यन : तु पण मुंबईत शिफ्ट हो ना..

रोहन : अजिबात नको.. तुझ्या ह्या मुंबईपेक्षा मला माझी दिल्लीच आवडते.. 

आर्यन : दिल्लीत आहेस म्हणुन एकटा आहेस मित्रा.. आमच्या मुंबईत आम्ही कोणालाच एकट सोडत नाही.. काहीही झालं तरी मुंबईकर आहोत आम्ही..

रोहनला एटीट्युड दाखवतच आर्यन बोलतो..

रोहन काही बोलणार तोच पिऊ किचन मधुन जेवण गरम करून घेऊन येते..

आर्यन : बाय दि वे रोहन.. तु एवढे दिवस होतास कुठे..?? म्हणजे वृषभच एक्सिडेंट होऊन तर दोन आठवडे झालेत.. तु आज अचानक कुठुन उगवलास..? 

रोहन : ते वृषभ आणि माझं थोडं भांडण झालंय रे.. मी बोलत नव्हतो त्याच्याशी.. तो तर अजुन माझ्याशी बोलत नाही आहे.. खुप रागवलाय माझ्यावर.. मला भेटेल की नाही माहिती नाही.. 

आर्यन : काय झालं एवढ?

आर्यन अस काही बोलताच पिऊ रोहनकडे बघु लागते आणि रोहन अपराधी नजरेने तिच्याकडे..

नाही सांगु शकत.. आपली नजर खाली झुकवत नकारार्थी मान हलवतच तो बोलतो..

आर्यन : का?? म्हणजे तुला सांगायच नसेल तर इट्स ओके.. बट वृषभला रागावता पण येत?? हे तर मला आज तुझ्याकडुन कळलं.. म्हणजे रागात मी तरी आतापर्यंत त्याला कधी बघितलंच नाही आहे.. 

पिऊ : वृषभला कुणावर रागवता येतच नाही.. 

रोहन : बट माझ्यावर खरच रागवलाय तो.. खुप म्हणजे खुप.. तो बोलेल ते करेल मी त्याच्यासाठी.. बट त्याचा माझ्यावरचा राग जाऊ दे.. मला नाही जमत अजुन त्याच्याशी न बोलता रहायला.. म्हणजे जरा जराश्या गोष्टींसाठी त्याला आणि शौर्यला फोन करायची सवय लागलीय मला.. एवढे दिवस तो बोलला नाही तर मला खुप त्रास होतोय.. त्याला नाही फरक पडणार कारण तुम्ही लोक त्याच्यासोबत आहात.. बट मला खुप फरक पडतोय.. आय नॉ मी चुकलो बट आत्ता काय करू मी.. त्याला पण माहिती मी चुका खुप करतो लाईफमध्ये.. बट काय करू??

आर्यन : एवढं झालं काय पण??

रोहन : नाही ना सांगु शकत.. ह्या वेळेला फक्त एवढच सांगेल की वृषभचा माझ्यावरचा राग जाऊदे..

नक्की जाईल राग.. नाही गेला तर मी समजवेल त्याला.. पिऊ गोड अशी स्माईल देत रोहनला बोलते..

रोहन : थेंक्स.. बट आत्ता बरा आहे ना तो..

आर्यन : बरा आहे.. बट डोकं दुखत असत.. आणि डॉक्टर बोललेत की जास्त स्ट्रेस त्याने घेतला नाही पाहिजे.. कारण ब्रेन वर सर्जेरी झालीय ना त्याच्या.. म्हणजे त्याच्या घरचे तसे घेतात काळजी आणि टेन्शन तस त्याला आम्ही कोणी देतच नाही.. 

रोहन : मला बघुन त्याला त्रास झाला तर???

(आपल्या ताटात बघतच रोहन बोलतो)

आर्यन : नक्की काय झालंय रोहन?? 

रोहन : खुप काही..

आर्यन : रोहन जर खुप सिरीयस अस असेल तर तु खरच नको भेटुस त्याला.. म्हणजे हॉस्पिटलमधुन घरी गेला की भेट हवं तर.. तस आठवड्या भरात तो त्याच्या घरी असेल.. मग ये हवं तर परत..

रोहन काहीही न बोलता शांत बसुन असतो.. ताटात घेतलेलं जेवण सुद्धा त्याला जात नसत..

पिऊ : भाजी वाढु?? (पिऊ रोहनला विचारते..)

रोहन नकारार्थी मान हलवत नाही म्हणुन सांगतो..

जेवना मित्रा.. लाजतोयस कसला तु.. अस बोलत पिऊच्या हातातुन भाजीचा टॉप घेत आर्यन स्वतः रोहनला वाढतो..

रोहन : अरे बस यार..

आर्यन : डायटिंग वर आहेस का काय?? 

रोहन : नाही रे..

पिऊ : वृषभ बोलेलं कि नाही ह्याच टेन्शन आलय.. हो ना??

रोहन पिऊकडे बघत आर्यनकडे आपली नजर फिरवतो आणि आपली मान होकारार्थी हलवतो..

आर्यन : मला तर वाटलं मगासच 2000 रुपयांच टेन्शन घेऊन बसलायस तु..

रोहन : पैस्यांच टेन्शन आम्ही दिल्लीकर घेत नाही रे.. ते तुम्ही मुंबईकरच घेत बसता..

आर्यन : अच्छा.. मग काढ बघु 2000 रुपये..

रोहन : अजिबात नाही.. आर्यन तुम्ही मुंबईकर चिटिंग करतायत.. ती चुकीची पध्द्त होती शौर्यला घाबरवायची.. 

आर्यन : रॉबिन आणि नैतिक थोड्या वेळात पोहचतीलच.. मग सगळे मिळुन बघतोच तुझ्याकडे..

रोहन : आर्यन असल्या धमकीला मी नाही घाबरत रे मित्रा.. मॅन म्हणजे मी तुझ्यासारखा घाबरा नाही आहे..

आर्यन : डायलॉग मारून घे मित्रा.. मग तु आहेस आणि आम्ही मुंबईकर आहोत.. 

पिऊ दोघांच काय चालु असत ते बघत असते..

पिऊ : दादा मी पण येऊ हॉस्पिटलमध्ये??

आर्यन : खर तर मीच तुला चल बोलणार होतो.. म्हणजे तु सोबत असलीस तर मी 7 पर्यंत घरी येईल नाही तर प्रतीक आणि रॉबिन मला काही सोडायचा नाही आज.. त्यात पप्पा आज घरी येतायत.. 7 नंतर घरी आलो तर पप्पा मला आज काही सोडायचे नाहीत..

रोहन : तु राहु दे यायच.. माझं मी जातो.. 

आर्यन : तस नाही रे.. एकदा आपली गेंग भेटली की घड्याळकडे लक्षच नाही जात माझं.. माझी बहिण माझ्या सोबत असली तर निदान टाईममध्ये घरी येईल.. म्हणजे ती मला वेळेवर घरी आणेल रे.. आणि तस पण दोन दिवस झाले असतील मी सुद्धा वृषभला नाही भेटलो.. 

तिघेही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत जेवत असतात..

जेवण होताच शौर्यच्या फोनची वाट बघत हॉलमध्येच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतात.. 

इथे पिऊ मात्र तीच जेवण होताच वृषभसाठी त्याच्या आवडीचे कटलेट्स बनवते सोबत फ्रुटस कट करून एका डब्यात भरते.. मस्त पैकी तैयार होऊन हातात मोठी अशी बेग घेऊन ती आर्यन आणि रोहनच्या पुढ्यात हजर रहाते..

आर्यन : हे काय आहे??

पिऊ : ते वृषभ साठी फ्रुटस कट करून घेतलेत.. त्याला कटलेट आवडतात ना.. ते बनवलेत त्याच्यासाठी मी.. आणि जास्त काही नाही आहे.. रात्री एकटा बॉर होतो तो म्हणुन एक दोन बुक्स मी त्याच्यासाठी आज कॉलेजमधुन येताना विकत घेतलेली.. रात्री वाचेल.. नाही तर मोबाईल मध्येच असतो तो.. परत जास्त त्रास नको त्याला म्हणुन.. बाकी काही नाही.. 

रोहन आर्यनचे एक्सप्रेशन बघतो..

आर्यन : जास्त काही नाही.. जास्त काही नाही म्हणुन खुपच जास्त घेतलंस तु.. अस नाही वाटत का तुला??

(आर्यन थोडा सिरीयस असा चेहरा करत पिऊकडे बघतो)

पिऊ पुन्हा इनोसेंट असा चेहरा करत आर्यनकडे बघते..

आर्यन : ए पिऊ आत्ता तु रडशील वैगेरे.. तुला मस्ती वैगेरे पण नाही कळत ग.. चल निघुयात आपण..?? SD आणि बाकीची मंडळी आली असतील.. अजुन काही राहील असेल तर इथेच बघ.. 

सगळं घेतलं मी.. आत्ता निघुयात आपण.. पिऊ ओठांवर गोड अशी स्माईल देतच आपल्या भावाला बोलते..

आर्यन : चला मग.. 

इथे शौर्य सुद्धा आपली गाडी घेऊन ठरलेल्या ठिकाणी येतो... सगळी मित्र मंडळी आधीपासूनच गाडी बसले असतात..

अरे वाहह.. पिऊ पण आपल्यासोबत येतेय आज.. शौर्य पिऊकडे बघतच बोलतो..

पिऊ : हम्मम..

शौर्य : बसा मग लवकर.. 

रोहन शौर्यच्या बाजुलाच बसतो..

आर्यन : रॉबिन आणि नैतिक राहिले कुठे..??

प्रतीक : हॉस्पिटलमध्ये पोहचले सुद्धा.. 

आर्यन : ओहह शट.. अरे SD ती ज्यो आणि रितु पण येणार होती..

महेश : ए हा यार.. दुपारी आम्हाला बोलली.. बट आम्ही तुला सांगायला विसरलो.. 

शौर्य : आत्ता मी परत गाडी नाही हा वळवणार.. एक तर मला झोप येतेय खुप.. हा रोहन नसता तर मी मस्त पैकी झोपुन नंतर वृषभला भेटायला हॉस्पिटलमध्ये आलो असतो..

आर्यन : SD यार अस काय करतोयस.. परत ती भडकेल रे.. वळव ना गाडी..

शौर्य : अजीबात नाही.. ज्यो कडे तिची स्कुटी आहे.. तिला बोल रितुला पिक अप कर आणि ये..

आर्यन ज्योसलीनला फोन करून तस कळवतो..

शौर्य शांतपणे गाडी चालवत असतो.. पाठी इतर मित्र मंडळींची मज्जा मस्ती चालु असते.. रोहन मात्र गाडीत शांत बसून असतो..

शौर्य : रोहन.. मला कठीण वाटतंय रे हे सगळं.. तुला बघितल्यावर उगाच जास्त स्ट्रेस घेतलं त्याने तर?? 

(रोहन शौर्यच्या बोलण्यावर काहीच रिएक्ट होत नाही.. तो अजुनही गाडीत शांतच बसुन असतो..)

ए मॅड तुझ्याशी बोलतोय मी.. गाडी ड्राईव्ह करता करता रोहनकडे बघतच तो त्याला बोलतो.. 

रोहन : नाही भेटत मी त्याला.. फक्त बाहेरुन बघतो नि गप्प जातो.. त्याला नाही कळणार मी तिथे आलोय ते.. 

रोहन अस बोलताच शौर्य त्याच्यावर एक नजर फिरवत शांतपणे गाडी ड्राईव्ह करतो..

महेश : एवढ्या लांब येऊन तु त्याला न भेटताच जाणार..

रोहन : हम्मम.. त्याला त्रास होईल मग राहु दे.. परत काही झालं तर शौर्य मलाच ओरडेल..

खिडकी बाहेर बघत सगळ्यांच्या नकळत डोळ्यांतुन येणार पाणी तो पुसतो... पिऊच्या नजरेतुन ते काही सुटत नाही.. फ्रँट मिरर मधुन ती सगळं बघत असते.. शौर्यला सुद्धा तो आतुन खुप दुःखी आहे हे कळत असत पण वृषभला ह्या गोष्टीत जबरदस्ती करणं त्याला योग्य वाटत नाही.. म्हणुन तो शांत बसुन असतो.. त्या क्षणाला काय करायचं हे त्याला सुचत नसत..

इथे विराज रूममध्ये अनघाची वाट बघत असतो.. अनघा येताच दोन्ही हात आपले लांब करत इशाऱ्यानेच तिला आपल्या मिठीत ये अस तो बोलत असतो.. अनघाला सुद्धा ती कधी त्याच्या मिठीत शिरते अस काहीस होत असत.. विराजच्या जवळ जात त्याला घट्ट अशी मिठी ती मारते.. काही क्षण दोघेही एकमेकांना तसेच बिलगुन असतात.. सुरुवात कशी आणि कुठुन करावी हेच दोघांना कळत नसत..

विराज : आज काल खुप काही गोष्टी लपवु लागलीस तु माझ्यापासून..

अनघा : तुला सगळ काही सांगितलं असत तर आजचं चित्र थोडं वेगळं असतना विराज.. 

विराज : तु आई बाबांकडे गेलेलीस ना??

अनघा नकारार्थी मान हलवत नाही म्हणुन सांगते. आत्तापर्यंतचा संपुर्ण शौर्यचा प्लॅन ती विराजला सांगते..

विराज : एवढं सगळं डोकं शौर्यच होत??

अनघा : हो.. त्याला कोणत्या क्षणाला कोण कस रिएक्ट होईल हे सगळं कळतं विराज.. प्रत्येक गोष्ट त्याने स्मूथली हँडल केलीय.. 

(विराज शांत बसुन असतो..)

मोठे मम्मी पप्पा जेलमध्ये गेले म्हणुन वाईट वाटतंय का??

विराज : अनु तु शौर्यची जागा नको ग चालवु आत्ता.. मला आत्ता खरच काही नाही वाटत त्यांच्या बद्दल. शौर्यच्या बाबासोबत अस कस वागु शकतात ते ह्याचा विचार पण मला नाही करवत.. म्हणजे मी मोठ्या मम्मी पप्पांचा विचार नाही ग करत.. मम्मा माझ्यावर नाराज आहे म्हणुन वाईट वाटतंय मला.. बट आत्ता झालं ना सगळं सोल्व्ह तरी ती का अशी नाराज आहे माझ्यावर.. मला मम्मा माझ्यावर नाराज राहिली तर त्रास होतो.. 

अनघा : फक्त मम्मीच नाही घरातील सगळ्यांनाच खुप हर्ट केलंस तु आणि सगळेच तुझ्यावर नाराज आहेत विराज.. पण तु परत त्रास करून घेशील म्हणुन सगळे तुझ्याशी अगदी पहिल्या सारख बोलतायत..  शौर्य पण आतुन खुप दुःखी आहे.. काका, काकी आणि आत्या पण थोडे फार नाराज आहेत तुझ्यावर.. पण त्यांना जास्त रागावता नाही येत.. 

विराज : बट मी त्यांनाच विचारून मोठ्या मम्मी पप्पांना घरात ठेवलेलं ना?? तरी अस..

अनघा : लग्न तोंडावर आहे उगाच जास्त वाद नको म्हणुन लास्ट टाईम तु मोठ्या मम्मी पप्पांवर पोलिस कम्प्लेन्ट नाही केलीस अस मम्मीना जस वाटत होत तसच मला सुद्धा वाटत होतं.. पण आम्हां सगळ्यांना अचानक अस कळलं की तुझे मोठे मम्मी पप्पा आहेत त्यांच्याबद्दल तुला काही तरी वाटत म्हणुन तु पोलिस कम्प्लेन्ट नाही केलीस आणि मम्मीना सुद्धा करू नाही दिलीस?? बरोबर ना??

विराज : तुला... को...ण बोललं?? (विराज थोड घाबरतच अनघाला विचारतो)

अनघा : त्यादिवशी तु ह्या रुम मध्ये तुझ्या मोठ्या मम्मी पप्पांसोबत जे काही बोलत होतास ते सगळं शौर्यच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालंय.. सगळं म्हणजे सगळ.. तु त्याला पण मारून टाकायचा प्रयत्न करत होतास एन्ड ऑल.. मला ह्या घरातील माणसांपेक्षा तुम्ही इंपोर्टटंट आहात हे तु तुझ्या मोठ्या मम्मी पप्पांना सांगत होतास ते सुद्धा आम्ही ऐकलय. सगळं काही सोडून अलिबागला जायला सुध्दा तैयार होतास..

विराज : एक मिनिट.. तेव्हा शौर्य खाली तुमच्या सोबत होता.. त्याचा मोबाईल पण माझ्याकडे नव्हता. मग आम्ही रूममध्ये जे काही बोलत होतो त्याच रेकॉर्डिंग त्याच्या मोबाईलमध्ये आलं कुठुन ?? 

अनघा : ते तोच सांगेल तुला.. म्हणजे मी ते नाही विचारलं त्याला..

विराज : इथे कॅमेरा वैगेरे तर नाही ना लावलाय त्याने..

अनघा : विराज कॅमेरा वैगेरे त्याने आजच लावलाय.. ते सुद्धा.. "वहिनी मी तुझ्या रूममध्ये कॅमेरा लावु का??" म्हणुन मला आधी त्याने विचारलं.. मी परमिशन दिली तेव्हाच त्याने कॅमेरा लावलाय.. आणि तु बोलतोस तस आपल्या रूम मध्ये कॅमेरा लावायला तो घरी होता का?? USA वरून आल्यापासुन घरात कमी आणि बाहेरच जास्त आहे तो..

विराज : मग रेकॉर्डिंग कुठून आलं त्याच्याकडे??

अनघा : आलं कुठुन तरी.. आणि रेकॉर्डिंग कुठून आलं हे महत्वाच नाही.. तु सगळ्यांना परक समजुन तुझ्या मोठ्या मम्मी पप्पांना इम्पोर्टटंट जास्त देत होतास हे महत्वाच आहे..

सॉरी ना.. चुकलो मी.. विराज आपले कान धरतच अनघाला बोलतो.. 

अनघा :  विराज मी बायको आहे तुझी.. मी समजून घेईल.. मम्मी?? किती हर्ट झाल्यात त्या आतुन?? विचार कर..

विराज : मी रात्री बोलतो तिच्याशी.. ती नाही जास्त वेळ माझ्यावर रागवत..

अनघा : म्हणुन फायदा नको ना घेऊस.. कळलं?? (अनघा थोडा दम देतच विराजला बोलते)

विराज : तुम्ही दोघ मला जास्तच दम द्यायला लागलेत हा.. शौर्यकडे पण बघणार आहेच मी.. पण त्या आधी तुझ्याकडे बघतो..

अनघाला परत आपल्या मिठीत घेतच विराज बोलतो..

अनघा : विराज साक्षी आली..

(विराजने आपल्याला सोडाव म्हणुन अनघा बोलते..)

विराज : अनु हि टेकनिक जुनी झाली ग.. 

(अनघाला अजुन आपल्या मिठीत घट्ट पकडतच तो बोलतो..)

अनघा : अच्छा??

हम्मम.. विराज तिच्या नजरेत बघतच तिला बोलतो..

दोघेही खुप दिवसांनी एकमेकांकडे अश्या प्रेम भऱ्या नजरेने बघण्यात हरवुन गेले असतात..

दरवाजा उघडाच आहे विराज.. अनघा आपले दोन्ही हात विराजच्या खांद्यावर ठेवत त्याला बोलते.

विराज : ओहहह.. हो.. आमच्या मॅडम आज छान मुड मध्ये आहेत..

(अनघाच्या केसांची बट तिच्या कानामागे टाकतच विराज तिला बोलतो..)

अनघा : एवढ्या दिवसांनी माझ्या नवऱ्याला अस रोमँटिक मुड मध्ये बघितल्यावर मी सुद्धा मुडमध्येच असणार ना विराज..

विराज जास्त काही न बोलता तिच्याकडे बघतच तिच्या गालावर आपले ओठ टेकवतो.. आणि तिला आपल्या हातावर उचलुन घेतो..

काय करतोयस.. अनघा थोडी लाजतच त्याला विचारते.

जे एवढे दिवस करायला नाही मिळालं ते. तिच्या गालावर पुन्हा आपले ओठ टेकवतच तो तिला बोलतो..

विराज दरवाजा उघडा आहे.. कोणीही येईल..  तु खाली उतरव बघु मला.. अनघा विराजला रिक्वेस्ट करतच बोलते.

विराज तिला तसच उचलुन घेत दरवाजा जवळ जातो.. नजरेतील इशाऱ्याने तिला तु दरवाजा बंद कर अस बोलतो.. 

अनघाने दरवाजा बंद करताच तिला अलगद अस बेडवर ठेवतो.. 

दोघेही एकमेकांच्या मधुर क्षणांत हरवुन जातात.. 

इथे शौर्य आणि बाकीची मित्र मंडळी हॉस्पिटलजवळ पोहचताच..

रोहन शौर्यला थांबायला सांगुन हॉस्पिटलजवळ असलेल्या दुकानातून वृषभसाठी नारळपाणी आणि काही फ्रुटस वैगेरे घेतो..

आर्यन : जास्त फॉर्मल आहे रे हा..

(लांबुनच रोहनकडे बघत आर्यन शौर्यला बोलतो)

शौर्य : हम्मम..

आर्यन : वृषभ आणि रोहनच नक्की काय झालंय रे?

शौर्य : जे व्हायला नाही पाहिजे ते झालंय??

आर्यन : म्हणजे??

शौर्य : म्हणजे जे झालंय ते..

आर्यन : तुझ्या अंगात रॉबिन घुसलाय का?? नीट सांग ना.. रोहन थोडा सॅड वाटतोय  म्हणुन विचारतोय..

शौर्य : तो तसाच आहे.. म्हणजे थोडा वेगळाच आहे रे.. थोडा नाही खुप जास्त वेगळाच आहे.. तस वेळ आली ना मित्रांसाठी जीव पण देईल असा आहे.. सकाळी बघितलस ना.. बट वेळ आली की मित्राचा जीवपण घेईल इतका डेंजर आहे तो.. पुढचा मागचा विचार कधीच करत नाही तो.. मग नको ती चुक करतो.. 

आर्यन : पण केलं काय??

शौर्य : जे करायला नको हवं ते.. 

प्रतीक : ए आर्यन राहु दे.. आपण वृषभलाच विचारू.. हा SD आपल्याला काही सांगेल अस वाटत नाही..

रोहन फ्रुटस आणि नारळपाणी घेऊन तिथे येतो.. हातातील केरिबेग शौर्यच्या हातात देतो..

रोहन : हे तु वृषभला दे... मी आणलंय म्हणुन नको बोलुस.. आणि मी आलोय हे पण नको बोलुस.. मी लांबुन बघेल आणि निघेल..

शौर्य जास्त काही न बोलता रोहनच्या हातातुन बेग घेतो..

सगळेच वृषभला भेटायला त्याच्या रूममध्ये जाऊ लागतात.. रॉबिन आणि नैतिक त्याच्यासोबत गप्पा मारत बसले असतात..

आर्यन : ए गाईज.. मिशन मॉगेम्बो सक्सेस झालं आपलं.. कॉंग्रेच्युलेशन..

रॉबिन : आर्यन.. मित्रा नेटपॅक टाक यार मोबाईलमध्ये तु.. 

आर्यन : नेटपॅक टाकलच आहे मी.

रॉबिन : तरी शिळ्या बातम्या देतोस तु.. शेम ऑन यु..

आर्यन : PJ कसले मारतोस यार.. सोड मी पण मुर्ख जे तुझ्याशी वाद घालतोय.. वृषभ तु कसा आहेस??

रॉबिन : आत्ता तु पिऊला घेऊन आलाय मग बराच असणार ना तो.. नको तो प्रश्न वृषभला करून तु खरच किती मुर्ख आहेस हे तु प्रूफ केलंस मित्रा..

आर्यन : थेंक्स..

रॉबिन : यु आर वेलकम..

शौर्य : वृषभ हे नारळ पाणी पिऊन घे..

वृषभ : आत्ता नको रे.. नंतर पितो..

नंतर कधी पिणार.. गप्प पी बघू.. ज्याने आणलंय तुझ्यासाठी त्याला तुला नारळ पाणी पिताना बघुन बर वाटेल.. अस बोलत शौर्य वृषभला नारळ पाणी काढुन त्याच्या हातात देतो..

नैतिक : SD घर पे सब ठिक हे ना??

शौर्य : हम्मम.. आणि तुम्ही दोघांनी खुप छान साथ दिली त्याबद्दल दोघांना थेंक्स वैगेरे मी काही बोलणार नाही.. कारण तुम्हांला ते शब्द आवडत नाही आय नॉ..

रॉबिन : क्या बात हे शौर्य.. माझ्यासोबत राहुन शिकतोय काही तरी..

वृषभ : तु USA कधी जातोयस??

ज्युनिअर विर.. शौर्य वृषभला खुन्नस देतच बोलतो..

वृषभ : माझ्यासाठी आलायस ना म्हणुन विचारतोय रे.. म्हणजे तुझे लेक्चर मिस होतायत ना.. आणि अस रागात नको ना बघुस..

सगळ्यांची मज्जा मस्ती चालु असते.. रोहन सगळं काही लांबुन बघत असतो.. आणि कोणालाही न सांगता तो तिथुन निघुन जातो..

जवळ पास अर्ध्या तासाने वृषभची बहिण तिथे येते..

ताई : अरे वाहह. मित्र मंडळी जमलेली दिसतायत..

वृषभ : एकटीच आलीस??

ताई : आत्ता कळतंय की यायला मला.. आणि डोकं काय म्हणतय तुझं??

थोडं... बर आहे... वृषभ पिऊकडे बघतच आपल्या बहिणीला बोलतो..

ताई : औषध घेतलंस ना?

वृषभ : हम्मम.. 

ताई : रोहन एकटाच आलेला का??

आपली ताई अस बोलताच वृषभ प्रश्नार्थी चेहरा करत शौर्यकडे बघतो..

वृषभ : कोण बोललीस??

रॉबिन : कोणता रोहन.. आमच्या सोबत असतो तो का??

ताई : तो नाही.. आमच्याकडे आलेला ना तो.. दिल्लीत राहतो तो.. वृश्या तुला भेटला नाही का??

वृषभ एकटक आपल्या बहिणीकडे बघत रहातो..

वृषभ : तुला कुठे भेटला तो??

आत्ता हॉस्पिटलबाहेर भेटला.. मला तर बोलला की वृषभला भेटलो म्हणुन.. उशीर होतोय माझी फ्लाईट आहे.. अस बोलुन निघाला..

शौर्य : निघाला?? म्हणजे मला पण न सांगता गेला..??

वृषभ : शौर्य रोहन आलेला इथे..??

शौर्य : गाईज जाऊन थांबवा त्याला.. मी येतो.. (शौर्य आर्यनकडे बघत त्याला काही तरी इशारा करतच बोलतो)..जास्त लांब नसेल गेला तो..

शौर्यची सगळी मंडळी तिथुन पळतच रोहनला शोधायला निघुन जातात.. 

वृषभ : नाही भेटायचं बोललो ना मी त्याला.. तरी आला तो इथे??

शौर्य : तुझ्या समोर आला का वृषभ तो?? नाही ना आला.. सकाळ पासुन इथे हॉस्पिटल बाहेर येऊन बसलेला तो.. मग मिच त्याला माझ्यासोबत घरी नेल.. माझं काम होत म्हणुन.. जस काम झालं तस त्याला घेऊन इथे हॉस्पिटलमध्ये आलोय.. तु दिसलास तर वृषभला त्रास होईल अस बोललो मी त्याला.. मी नाही त्याला दिसणार अस बोलला मला.. फक्त ते फ्रुटस आणि नारळपाणी तुझ्यासाठी त्याने मला दिल.. मी लांबुनच त्याला बघुन निघुन जाईल.. अस पण बोलला.. पिऊ पण होती गाडीत.. विचार तिला.. बट मला पण न सांगता निघुन जाईल अस नाही बोलला तो..

वृषभ पिऊकडे बघतो पिऊ मानेनेच हो बोलते..

वृषभ डोकं धरून तसच बसुन रहातो..

ताई : काय होतंय?? परत डोकं दुखतंय का??

वृषभ मानेनेच हो बोलतो.. 

शौर्य : ए वृषभ यार तुला नाही भेटायचं तर नको भेटुस पण प्लिज स्ट्रेस नको ना घेऊस.. तो नाही ना आला तुझ्यासमोर.. गेला तो निघुन.. कधीच नाही येणार तो तुझ्यासमोर.. तु का त्रास करून घेतोयस..

पिऊ : वृषभ मला नाही माहिती तुमच्या दोघांत काय झालं?? पण खुप काळजी करतो तो तुझी.. तु त्याच्याशी कधीच बोलणार नाहीस म्हणुन टेन्शन घेत जेवत सुद्धा नव्हता तो.. दादा आमच्याकडे जेवायला घेऊन आलेला ना त्याला.. तेव्हा बोलता बोलता बोलला तो.. झाली असेल चुक त्याच्याकडुन पण त्याला त्याची चुक कळली ना.. आणि तु त्रास का करू घेतोयस.. तो तुला न भेटता गेला म्हणुन त्रास होतोय की तो तुला भेटायला आला ह्याचा त्रास होतोय.. नक्की कसला त्रास होतोय तुला??

वृषभ : कसलाच नाही..

पिऊ : मग डोकं का दुखतंय??

वृषभ : माझं सकाळपासुनच डोकं खुप म्हणजे खुप दुखतंय..

शौर्य : रोहन आल्यामुळे त्रास नाही ना होत आहे तुला??

वृषभ मानेनेच नाही बोलतो..

शौर्य : ओके.. मग मी निघतो.. मी उद्याच येईल.. तस पण तुझीताई आणि पिऊ आहे तुझ्यासोबत.. रोहनला एअरपोर्टवर सोडुन येतो.. बाय..

शौर्य तिथुन जाऊ लागतो.. वृषभ खाली मान करून कसला तरी विचार करत असतो..

खुप दिवसांपासुन मला पण त्याची आठवण येतेय.. मला भेटायचंय त्याला.. डोळ्यांतुन पडणारे अश्रु पुसतच वृषभ हसतच शौर्यकडे बघत त्याला बोलतो..

येहह हुई ना दोस्ती वाली बात... शौर्य परत वृषभ जवळ येत त्याला घट्ट मिठी मारतच बोलतो..

वृषभ : लवकर घेऊन ये त्याला..

आलोच अस बोलत शौर्य रुम बाहेर पडतो..

बाहेर जाऊन लिफ्टच बटण दाबुन लिफ्ट कधी येतेय ह्याची वाट बघत तो तिथेच उभं रहातो.. आपल्या मित्र मंडळींना फोन लावणं त्याच चालु असत.. पण कोणाचे फोन लागतच नसतात.. तोच लिफ्ट ऑपन होते.. आणि त्यातुन त्याचे मित्र मंडळी बाहेर पडतात.. सगळ्यांच्या मागे रोहन मान खाली घालुन उभा असतो..

ए रोहन.. मी तुला उचलुन घेईल अशी स्वप्न तु बघु नकोस हा मित्रा.. तुझं तु बाहेर ये बघु लिफ्ट मधुन.. रॉबिन मस्तीच्या सुरातच त्याला बोलतो..

रोहन गप्प लिफ्ट मधुन बाहेर पडतो..

मला न सांगता आणि न भेटता अस पळुन दिल्लीला परत जाणार होतास?? आपल्या हाताची घडी घालत रागातच त्याच्याकडे बघत त्याला विचारतो..

रोहन : तुला न सांगता जाईल अस वाटत का तुला?

रॉबिन : कसला खोटारडा आहे रे तु.. ए शौर्य एअरपोर्टवर जाण्यासाठी टेक्सी शोधत होता.. आणि भेटली पण होती ह्याला पण आपल्या ह्या पी टी उश्याने पळत जातच त्याला अडवलं.. (नैतिकच्या गळ्यात हात टाकतच रॉबिन बोलतो)

नैतिक : ए रॉबिन पी टी उश्या काय? 

शौर्य : नैतिक एक मिनिट शांती घे ना.. रोहन एअरपोर्टसाठी टेक्सी बुक केली आणि मला बोलतोयस मला न सांगता नव्हता जाणार..

रोहन : अजुन तिथे थांबलो असतो तर वृषभला भेटण्यापासून स्वतःला थांबवु शकलो नसतो ना रे.. अश्या अवस्थेत त्याला मी बघितलं नाही ना यार.. आणि तो दिसला आणि मी मिठी न मारताच भेटलो अस पण कधी झालं नाही ना.. परत चुक नको म्हणुन निघुन गेलो..साडे नऊ ची फ्लाईट आहे.. हे बघ.. तुझ त्याच्यासोबत बोलुन झालं असत तर तुला एअरपोर्टवर भेटायला बोलवलं असत मी.. तुला न भेटता नव्हतो जाणार.. 

शौर्य : वृषभ वाट बघतोय तुझी.. चल आत..

रोहन एकटक त्याच्याकडे बघु लागतो.. त्याला शौर्यच्या बोलण्यावर विश्वासच होत नसतो..

शौर्य : त्याच्या पिऊने समजवलय त्याला.. आणि तो पण तुला मिस करतोय.. अजुन जास्त नाही रागवत येत त्याला तुझ्यावर..  आत्ता भेटुन घे त्याला..

रोहन पळतच वृषभच्या वॉर्ड मध्ये जातो..

खुप दिवसांनी त्याची आणि वृषभची नजरा नजर होते.. रडतच दोन्ही हात कानाला लावुन सगळ्यांसमोर तो घुडघ्यावर बसतो..

रोहन बस झालं यार.. ये बघु इथे... आपले दोन्ही हात लांब करत वृषभ रोहनला आपल्या जवळ बोलवतो..

रोहन त्याच्याजवळ जात त्याला घट्ट अशी मिठी मारतो..

आहह रोहन मान दुखतेय रे.. वृषभ थोडं कळवळतच रोहनला भेटतो.

रोहन हळु.. त्याला स्टिचेस आहेत तिथे.. पिऊ थोडं काळजीच्या सुरातच रोहनला बोलते..

सॉरी.. आपली मिठी सोडवतच तो वृषभला बोलतो.

रोहन : जास्त दुखलं का??

वृषभ मानेनेच नाही बोलतो...

रोहन : काय ही हालत करून घेतलीस तु?? मला नाही बघायला होत आहे तुला अस.. 

रॉबिन : तेव्हा कस बघितलस असतस मग.. जेव्हा तो चिकागो, ओमन, मलेशिया अँड अल्जेरिया ला गेला होता..

रोहन : व्हॉट?? वृषभ तु मलेशिया पण गेलेलास?? म्हणजे सीमाच्या लग्नात जाऊन आलास तु??

आर्यन : कधी??

वृषभ : ते रॉबिनलाच माहिती.. रॉबिन तु ज्या कंट्रीची नाव संगीतलीस तिथे मी कधी गेलेलो.??

रॉबिन : मी कुठे बोललो तु तिथे गेलेलास.. मला अस बोलायच होत तु COMA मध्ये गेलेलास..  C for चिकागो, O for ओमन, M for मलेशिया अँड A अल्जेरिया.. ते कॉमा ऐकायला आणि बोलायला बर नाही ना वाटत.. अस काही ऐकलं तर थोडं वेगळं वाटत रे..

प्रतीक : गाईज आज काल रॉबिन वेगळं बोलु लागलाय.. अस काही ऐकुन वेगळंच वाटतंय रे..

प्रतीक अस बोलताच सगळेच हसु लागतात..

तोच शौर्यला गाथाचा फोन येतो... पण गाथा काय बोलते हे त्याला ऐकायला जात नसत..

हॅलो.. हॅलो करत तो तिथेच उभा असतो..

रॉबिन : शौर्य तुला थोडं जास्तच पर्सनल बोलायच असेल तर बाहेर जाऊन बोलु शकतोस मित्रा.. 

आर्यन : हो ना.. we don't mind SD..

शौर्य : अरे खरच नेटवर्क इस्यु आहे.. तिला माझा आवाज ऐकु नाही जात आहे..

रॉबिन : आमच्या पासुन दोन पाऊल लांब झालास तर आपणच नेटवर्क येईल तुझ्या मोबाईल मध्ये..

शौर्य : झालं तुमचं??

रॉबिन : आमचं तर कधीच झालंय रे मित्रा.. म्हणुन आमचे मोबाईल रेंज मध्ये आहेत.. तुझं आत्ता नवीन नवीन आहेरे.. म्हणुन मे बी नेटवर्क इस्यु आहे..

तुला तर ना.. शौर्य रॉबिनला थोडं घाबरतच बोलतो..

शौर्य यार गाथा वाट बघतेय तुझी.. रेंज मध्ये जाऊन बोल जा.. आर्यनच्या मागे स्वतःला लपवतच रॉबिन बोलतो

मग बघतोच तुझ्याकडे.. अस बोलत शौर्य बाहेर निघुन जातो..

रोहन : जास्तच त्रास होतोय का?

वृषभ : आत्ता नाही एवढा होत..

रोहन : माफ केलंस ना??

वृषभ : हम्मम.. 

रोहन : थेंक्स पिऊ..

पिऊ : मला कश्या बद्दल??

रोहन : शौर्य बोलला तु त्याला समजवलस म्हणुन...

पिऊ : मी नसत समजवल तरी तो बोललाच असता.. मित्र मंडळींमध्ये अशी छोटी मोठी भांडण होतच रहातात.. जास्त राग धरून कस चालेल..

(पिऊ वृषभकडे बघत आपल्या भुवया उडवतच त्याला बोलते.. वृषभ गोड अशी स्माईल तिला देतो)

प्रतीक : पिऊ तु हे आर्यनला नाही शिकवलस काय?? सगळ्यात जास्त गरज तर आर्यन ला आहे..

रॉबिन : आत्ता मी पण हेच बोलणार होतो.. आर्यन तुझ्या लहान बहिणीकडून काही तरी शिक मित्रा..

आर्यन : मी कधी रागवतो अस.. उगाच काही तरी.. 

नैतिक : तु कधी, कुठे आणि कस रागवतोस हे मी तुला बाहेर गेल्यावर सांगतो.. थोडं रोहन आणि वृषभला बोलायला देऊयात..

आर्यन : हम्मम.. तस पण आपल्याला बघुन 2000 च टेन्शन येत त्याला..

रोहन : ए आर्यन तु सारख सारख 2000 चा विषय का काढतोयस..

आर्यन : दिल्लीला जाई पर्यँत 2000 वेळा बोलुन दाखवणार मी तुला.. 

प्रतीक : ए हां यार.. वृषभ ह्याला आमचे 2000 द्यायला सांग हा.. 

रॉबिन : कसले 2000??

आर्यन रॉबिन आणि नैतिकला जे घडलं ते सांगतो.. तस सगळेच रोहन भोवती घोळका करत थोडा राग दाखवत आपल्या हाताची घडी घालुन उभे असतात.. 

वृषभ : बट ही खरच चिटिंग आहे ना.. रोहन बोलतो ते बरोबर आहे.. अस नको ते करून घाबरवण वेगळंच आहे..

रॉबिन : डोक्यावर पडलेल्या लोकांसोबत मी बोलत नाही.. गाईज तुम्हांला बोलायच तर बोला..

आर्यन : वृषभ तु डोक्यावर पडल्यामुळे खरच मेंदूवर परिणाम झालाय.. जरा शांती घे.. आणि शांत बस..

रोहन : डोक्यावर तो पडलाय बट मेंदूवर तुमच्या परिणाम झालाय.. 

वृषभ : हे अगदी बरोबर बोललास तु.. नेहमी नेहमी डोक्यावर पडलोय.. डोक्यावर पडलोय असच बोलुन दाखवतायत मला ही लोक.. 

नैतिक : आत्ता तु डोक्यावर पडलायस मग आम्ही तसच बोलणार ना..

रोहन : तुमच्याकडे बघुन तुम्ही लोक पण डोक्यावर पडल्यासारखेच वाटतात मला..

थेंक्स यार.. सगळेच रोहनला बोलतात..

रॉबिन : गाईज ते सगळं जाऊ द्या.. रोहन आत्ताच्या आत्ता तुझ्या शौर्यला तु बोलतोस तस घाबरवुन दाखवल तर चार हजार काढायचे.. 

रोहन : मला तुम्हां लोकांसोबत बिट वैगेरे नाही लावायची.. परत चिटिंग कराल तुम्ही.. 

आर्यन : म्हणजे तुएक्सेप्ट करतोयस कि दिल्लीकर घाबरे आणि धोकेबाज असतात..

रोहन : अजिबात नाही.. 

नैतिक : मग लाव बिट..

रोहन वृषभकडे बघत काय करू म्हणुन विचारतो.. 

सगळे रोहनला चॅलेंज उकसवत असतात.. 

इथे शौर्य बाहेर असलेल्या एका खिडकीजवळ जात गाथाला फोन लावतो..

गाथा : शौर्य तुझ्या फोनची वाट बघत होती मी.. अजुन रहावल नाही म्हणुन की फोन केला.. दि पण फोन उचलत नाही ना म्हणुन थोडी जास्तच काळजी वाटु लागली तुझी..

(शौर्यचा फोन उचलल्या उचलल्या गाथा बोलायला चालु करते..

शौर्य : तु कॉलेजमध्ये असशील म्हणुन नाही ग डिस्टरब केलं.. आणि आज थोडं बिझी होतो.. जस्ट वृषभला भेटायला हॉस्पिटलमध्ये आलोय मी.. तुला व्हाट्सएपवर मॅसेज केलेला ना मी.. 

गाथा : मला नाही ना आला..

शौर्य : मोबाईल डेटा बंद आहे तुझा.. म्हणुन माझे मॅसेज तुझ्यापर्यंत पोहचलेच नाहीत..

शौर्य अस बोलताच गाथा कानावरचा मोबाईल काढुन आपल्या हातात घेऊन बघते तर मोबाईल डेटा बंद असतो.. डोक्यावर हात मारत परत ती फोन कानाला लावते..

गाथा : सॉरी.. बंद आहे..

शौर्य : म्हणुन तर मी फोन नाही ना केला तुला.. तुझं एक्स्ट्रा लेक्चर असेल तर..?? तस पण तु कॉलेजमध्ये मोबाईल डेटा बंद करून ठेवतेस ना..

गाथा : हम्मम.. घरी कस आहे सगळं..

शौर्य : सगळं ठिक..

गाथा : जिजु??

शौर्य : अजुन तरी ठिक आहे.. 

गाथा : म्हणजे..??

शौर्य : मी अजुन तरी त्याला ठिक ठाक ठेवलय ग.. तुला नाही कळणार ते.. ते आम्हां भावा भावांच थोडं पर्सनल आहे ना.. ब्रॉदर्स लव्ह बोलु शकतेस तु... 

गाथा : अच्छा.

शौर्य : तु सुटलीस कॉलेजमधुन..??

गाथा : हम्मम.. घरी सुद्धा आली..

शौर्य : हॉस्पिटलमध्ये यायचस ना मग..

गाथा : तु तिथे आहेस हे माहिती असत तर मी आलेच असती ना शौर्य.. 

तोच प्रतीक शौर्यला आवाज देतो.. शौर्य फोन तसाच कानाला लावत मागे वळतो.. आणि त्याला इशाऱ्यानेच काय झालं म्हणुन विचारतो.. तस खाली घुडघ्यावर लपुन असेल रॉबिन अचानक उभ राहुन मोठ्याने त्याच्या अंगावर भो....म्हणुन मोठ्याने ओरडतो.. अचानक तो समोर आल्याने शौर्य घाबरतो.. इतका घाबरतो कि त्याचा मोबाईल खिडकीतून डायरेक्ट खालीच पडतो..

ओहहह शट.. अस बोलत शौर्य खिडकीतून खाली डोकावतो.. बट एवढ्या उंचावरून मोबाईल पडल्यावर नीट राहील अस त्याला वाटत नसत..

रॉबिन... शौर्य थोडा रडवा चेहरा करत रागातच त्याच्यावर ओरडतो..

सॉरी.. अस बोलत रॉबिन तिथुन पळत प्रतीकच्या मागे लपतो..

प्रतीक तु बाजूला हो हा.. शौर्य रागातच प्रतीकला बोलतो.

तो का बाजुला होणार तो पण प्लॅन मध्ये आहे.. रॉबिन प्रतिकला पुढे धकलतच शौर्यला बोलतो..

बट प्लॅन नैतिकचा होता.. रॉबिनला पुढे करत प्रतीक बोलतो.

शौर्य : मला माझा मोबाईल जसा होता तसाच हवाय..

तुझा मोबाईल सॅफ आहे रे.. आपला एम एस धोनी आणि विराट कोहली म्हणजे आर्यन आणि महेश खाली उभे आहेत.. कॅच केला असेल त्याने. हे बघ लिफ्ट पण 7th फ्लोरवर येईल आत्ता... रॉबिन लिफ्ट कडे बोट दाखवतच शौर्यला बोलतो..

प्रतीक : तु घाबरलास ना??

शौर्य रागातच हाताची घडी घालत प्रतीककडे बघतो..

रॉबिन : मोबाईल खाली टाकला त्याने इतका तो घाबरला आणि तु कसले प्रश्न करतोय त्याला.. ए रोहन 4000 काढायचे हा आत्ता.. जर नको ती कारण देत बसलास तर तर इंटरेस्ट चार्ज करेल मी त्यावर..

शौर्य : रोहन तु काय ह्या मॅड लोकांच्या नादी लागतोयस..??

रोहन : जबरदस्ती करत होतेरे.. हे असे नको ते उद्योग करतात हे आजच कळलं मला.. तरी वृषभ नको बोललेला मला.. मी मुर्ख..

आत्ता रडायचं नाही हा.. 4000 रेडी ठेव.. नैतिक पाठी येतच त्याला बोलतो..

शौर्य : माझ्या मोबाईलला काही झालं ना मग बघतोच तुमच्याकडे..

तोच लिफ्ट ऑपन होते.. त्यातून आर्यन आणि महेश बाहेर येतो..

मोबाईल प्लिज.. रॉबिन दोघांच्या पुढ्यात हात पसरत आपली नजर शौर्यवर रोखुन धरत एक वेगळाच एटीट्युड त्याला दाखवतच बोलतो..

आर्यन आणि महेश आपली घाबरलेली नजर एकमेकांवर फिरवत रॉबिनच्या हातात शौर्यचा मोबाईल देतात.. रॉबिन मोबाईलकडे न बघताच शौर्यसमोर मोबाईल धरतो.. 

शौर्य तु पण ना उगाचच एवढं टेन्शन घेतोस.. आपल्याकडे एवढे आघाडीचे क्रिकेटर असताना ह्या मोबाईलच... टे.. न्श... न.... तर.. अस बोलत मोबाइलकडे बघत रॉबिन घाबरतच आर्यन आणि महेशकडे आपली नजर फिरवतात..


(परत काय झालं असेल शौर्यच्या मोबाईल सोबत?? पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)


कर्मश :

© भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all