अतरंगीरे एक प्रेमकथा १३८

In marathi

शौर्य इथे राहिला की परत मोठे पप्पा आणि शौर्यमध्ये नक्कीच काही तरी वाद होतील.. जर मोठ्या पप्पांना इथुन जायला सांगितलं तर ते पुन्हा मला लेक्चर देत बसतील.. आणि मलाच इथुन अलिबागला नेतील.. आधीच वृषभमुळे खुप काम पेंडिंग राहिलय माझं.. त्यापेक्षा शौर्यलाच रिक्वेस्ट करत इथुन उद्याच USA जायला सांगतो.. तो माझं ऐकेल आणि मला समजुन सुद्धा घेईल असा विचार करत विराज नेहमी प्रमाणे शौर्यची समजुत काढायला त्याच्या रुममध्ये येतो..

शौर्य... विराज शौर्यला आवाज देतच त्याच्या बाजुला बसतो..

विराज रूममध्ये येताच शौर्य आपले डोळे पुसुन नीट बसतो.. बट डोळ्यांतुन अजुनही पाणी येतच असत त्याच्या..

रडतोयस का तु?? काय झालं?? शौर्यचे डोळे पुसायला म्हणुन विराज आपला हात त्याच्या जवळ करणार तस शौर्य थोडं घाबरतच त्याच्यापासुन लांब होतो..

विराज : काय झालं??

शौर्य : हातात चाकु वैगेरे घेऊन तर नाही ना आलायस..?? आला असशील तर लांबच रहा माझ्यापासुन..

विराज : अस नको ते काय बोलतोयस तु..?? काय झालं??

शौर्य : माझं एक्सिडेंट तुच घडवुन आणलेलस ना?? मला मारून टाकायला बघत होतास तु?? 

विराज : तुला कोण बोललं हे सगळं??

शौर्य : तु अस विचारतोयस म्हणजे तुझे मोठे पप्पा मला जे बोलत होते ते खरं होत तर..

विराज : मोठ्या पप्पांनी तुला हे सगळं..??

शौर्य : हो त्यांनीच हे सगळं सांगितलंय मला.. तु इथे येण्याआधी जस्ट माझ्या रूममधुन बाहेर पडलेत.. दिसले असतीलच तुला?? मला तर वाटत तुच पाठवलं असशील त्यांना माझ्या रूममध्ये.. हो ना..(शौर्य थोडं एकटिंग करतच विराजला बोलतो)..

विराज : मोठे पप्पा इथे आलेले??

(शौर्य हाताची घडी घालत रागातच विराजकडे बघत असतो तो..)

अस का बघतोयस?? 

शौर्य : एकटिंग किती मस्त करता येते तुला तेच बघतोय.. आणि त्याच बरोबर तुझ्या मोठ्या पप्पांकडुन कळालेलं तुझं खर रूप किती भयानक आहे ते पण बघतोय.. सुरज कुलकर्णीचा मुलगा शोभुन दिसतोय यार तु.. अगदी तसाच निघालास जसा तुझा डॅड होता.. मला तर प्रश्नच पडलाय.. तुझे मोठे पप्पा बोलले तस खरच तु वागु शकतोस माझ्यासोबत?? का तुझे मोठे पप्पा मला तुझ्यापासुन लांब करायसाठी हे अस नको ते तुझ्याबद्दल सांगुन भडकवत होते मला.. बट ते जे बोलत होते ते खरं असेल तर सगळ्यात आधी माझा मलाच प्रश्न पडतोय की मी काय केलेलं तुझं आणि काय नाही केलं तुझ्यासाठी जे तु पण तुझ्या डॅड सारखच माझा जीव घ्यायला निघालेलास?? 

(विराज शांत बसुन असतो.. )

तुझी ही शांतता खुप काही बोलुन जातेय मला.. आणि अस शांत बसु नकोस.. का अस वागलास माझ्यासोबत ते सांग.. एवढं वाईट कोण वागत??

विराज : शौर्य तु चुकीच नको समजुस मला.. तु समजतोस तस नाही आहे..

(विराज शौर्यच्या जवळ जातच बोलतो...)

शौर्य : तु लांबुनच बोल माझ्याशी.. माझ्या जवळ अजिबात नाही यायचस तु.. आत्ता पण माझा जीव वैगेरेच घ्यायला आला असशील इथे आय नॉ.. तस पण तुझे मोठे पप्पा मला आत्ता धमकीच देऊन गेलेत. त्यांनीच तुला मला मारायला पाठवलं असणार आय नॉ.. ते काहीही करू शकतात.. तस पण तु त्यांच सगळं ऐकतोस.. मी मेलो काय आणि जगलो काय तुला थोडी ना फरक पडणार आहे.. 

शौर्य विराज पासुन लांब होतच त्याला बोलतो..

विराज : शौर्य जर मला तुला मारून टाकायच असत मग मी तुला श्री च्या लग्नात डॅड पासुन का वाचवलं असत..?? जरा विचार कर.. आणि मी तुझ्यापासुन हे सगळं लपवणार नव्हतो.. तुला एकदा हे सगळं सांगायचा प्रयत्न केलेला दिल्लीला होतास तेव्हा तु.. आठव जरा.. बट अचानक डॅड आल्यामुळे सगळं राहुन गेलं सांगायच.. जर मी त्या वेळेला तुला काही सांगितलं असत तर त्याने मला पण मारून टाकल असत इतका तो माझ्यावर भडकलेला.. तुझ्यासाठी मरायला पण तैयार पण त्यानंतर सुद्धा तु जिवंत रहाशील ह्याची खात्री नव्हती म्हणुन त्यावेळेला शांत बसलो मी.. मग अचानक डॅडची डेथ झाली आणि मग मी सुद्धा विसरून गेलेलो रे. डॅड तुला मारून टाकायला बघत होता.. आणि मी तुला मारून नव्हतं टाकणार डॅडला फक्त अस भासवुन देत होतो की मी खरच तुला मारून टाकायला बघतोय.. जर मी तस नसत केलं तर डॅडने दुसऱ्या कुणाला तरी सांगुन तुला कधीच संपवुन टाकल असत.. तु डॅड पासुन नेहमी सॅफ असावा म्हणुन तुझ्या मागे तुझ्या नकळत मी बॉडी गार्ड ठेवलेला.. तु कॉलेजमध्ये काय करायचास काय नाही करायचास हे सगळं मला त्याच्याकडुन कळायचं.. म्हणुनच तर मी नेहमी तुझी बाजु घेऊन मम्मासोबत भांडायचो.. कारण तु चुकीच काही करायचा नाहीस हे मला त्याच्याकडुन कळायच आणि एक्सिडेंट वैगेरे घडवून आणताना तुला काही होणार नाही ह्याची मी काळजी घेतलेली.. मॉलमध्ये तुला वाचवणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसुन तो बॉडीगार्डच होता.. मी जे काही केलं ते तुझ्यासाठीच केलंय शौर्य..

शौर्य : स्टोरी अजुन वेगळी असती तर ऐकायला मज्जा आली असती.. 

विराज : शौर्य मी स्टोरी नाही सांगत आहे.. मी खर तेच सांगतोय.. प्लिज बिलिव्ह मी.. 

शौर्य : रिझन काहीही असेल पण तुझ्या जागी मी असतो तर ज्याने मला अस नको ते करायला सांगितलंना त्याचाच जीव घेतला असता मी.. नाही तर त्यालाच पोलिसांकडे दिलं असत.. भले मला हे अस नको ते सांगणारा माझा बाबा असला असता तरीही.. कारण जे चुक आहे ते माझ्या नजरेत चुकच आहे आणि थेंक्स टु युअर मोठे पप्पा.. त्यांच्यामुळे कळलं मला तु कसा आहेस ते.. त्यांनी सांगितलं नसत तर मला तु माझ्यासोबत अस काही केलयस हे कळलंच नसत.. बाय दि वे तुझ्या नावावर त्यांनी त्यांची सगळी प्रोपर्टी केलीय.. कॉंग्रेच्युलेशन.. 

(विराज संशयी नजरेने त्याच्याकडे बघु लागतो..)

अस काय बघतोयस.. खोट बोलत होते का तुझे मोठे पप्पा?? म्हणजे नाही केली का?? आय नॉ ते सगळंच खर बोलतील अस नाही ना.. काही गोष्टी खोट्या पण बोलले असतील.. एवढे दान शूर ते असुच शकणार नाहीत.. 

विराज : ते खरच बोलत होते बट ते हे सगळं तुला सांगुन काय प्रूफ करतायत??

शौर्य : ते तर तुला तुझे मोठे पप्पाच सांगु शकतात ना.. पण काहीही बोल प्रोपर्टीच्या बाबतीत तु खुप लकी आहेस.. मला प्रोपर्टीत काही इंटरेस्ट नाही अस बोलुन खुप सारी प्रोपर्टी तु तुझ्या नावावर करून घेतलीयस.. खरा बिझिनेस मॅन शोभुन दिसतोय तु अगदी तुझ्या डॅड सारखाच.. म्हणजे कुलकर्णी घराण्यातील होती नव्हती ती सगळी प्रॉपर्टी तु मिळवलीसच म्हणजे त्यासाठीच तर तु तुझ्या मोठ्या पप्पांना इथे ठेवुन घेतलस अस तुझ्या मोठ्या पप्पांच मत आहे आणि ते मला पण पटलं... आणि त्या सोबत माझ्या मम्माकडुन तिने तिच्या लाईफमध्ये कमावलेली प्रॉपर्टी सुद्धा मिळवुन दाखवलीस..

विराज : what you mean?? तुला अस वाटतंय का मी प्रोपर्टीसाठी त्यांना इथे ठेवुन घेतलंय??

शौर्य : मला नाही त्यांना. म्हणजे तुझ्या मोठ्या पप्पांना अस वाटतंय रे.. मम्मा सोबत गोड बोलून तु तिची प्रोपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतलीस हे मला वाटतंय.. 

विराज : तु असले नको ते आरोप काय करतोयस यार माझ्यावर.?? मी मम्माला बोललो का सगळं मला द्यायला..?? काहीही काय बोलतोयस??

शौर्य : पण दिलेलं घेतलंसच ना?? 

विराज : शौर्य मला प्रोपर्टीमध्ये खरच काही इंटरेस्ट नाहीय.. उगाच नको ते आरोप माझ्यावर करू नकोस.. 

शौर्य : तुझं खर रूप तसच आहेरे हे तुझे स्वतःचे मोठे पप्पाच मला बोललेत. एवढं सगळं ते खरं बोलले मग हे कसं खोट बोलतील हे तुच सांग आणि तुला आत्ता हा बंगला पण हवा आहेना..??(विराज प्रश्नार्थी चेहरा करत शौर्यकडे बघत असतो.. त्याला शौर्य काय बोलतोय हेच कळत नसत) बट हा बंगला माझ्या काकाच्या नावावर आहे आणि लास्ट टाईमसारख हा बंगला लगेच तुझ्या नावावर करायचा वेडेपणा मी अजिबात करणार नाही हि गोष्ट तुला आत्ताच सांगतोय मी.. आणि आत्ता तुझ्यासोबत बोलायच्या मुडमध्ये मी अजिबात म्हणजे अजिबात नाही आहे.. उतरून गेलायस तु माझ्या मनातुन.. तुझं तोंड बघायची पण इच्छा नाही मला.. आणि जमल्यास तुझं तोंड दाखवायला माझ्या समोर पण येऊ नकोस तु.. तुझ खोट प्रेम पण नकोय मला आणि तु पण.. 

विराज : शौर्य.. पहिली गोष्ट म्हणजे मी तुझा जीव वैगेरे घेणार नव्हतो.. तुला काही झालं की मला खुप त्रास होतो हे तुला पण माहितीय.. आणि मला हा बंगला वैगेरे पण नकोय यार. मी खरच अस काही मोठ्या पप्पांना बोललोच नाही.. 

शौर्य : तुझे मोठे पप्पा खोटं बोलत होते का??

विराज : मला नाही माहीत ते तुला काय बोलले ते.. बट मी खरच अस काही नाही बोललोय त्यांना.. 

(विराज शौर्यच्या जवळ जातच त्याला बोलतो..)

शौर्य : तु लांब रहायच हा माझ्यापासुन.. गाथाच्या मोठ्या बहिणीचा नवरा आहेस म्हणुन तुझ्याशी सभ्य भाषेत बोलतोय मी.. नाही तर मला अजून कसली भाषा येते हे लास्ट टाईम बघितलंच आहेस तु.. आणि आत्ता बोलुन दाखवलेले डायलॉग ज्या माणसाकडुन शिकलास त्यालाच बोलून दाखव.. तसही आम्हांला सोडुन अलिबागला जायला तैयार आहेसच तु.. (विराज स्तब्ध होतच शौर्यकडे बघतो) अस नको बघुस.. तुझ्या मोठ्या पप्पांकडुनच कळलय.. आत्ता बोल हे पण खोटं बोलत होते ते.. आय नॉ तु असच बोलशील..

विराज : तुला इथे कोणताही त्रास होऊ नये म्हणुन जाणार होतो.. 

शौर्य : ते तर मला वेगळंच काही तरी बोलले.. 

विराज : काय बोलले..??

शौर्य : खुप काही बोलुन गेलेत ते तुझ्याबद्दल.. पण मला ना तुझ्यात आणि तुझ्या मोठ्या पप्पांमध्ये भांडण लावुन द्यायचा मुड जरासुद्धा नाही आहे.. आणि यु नॉ असलं नको ते काही करायला मला नाही आवडत.. जे काही विचारायचय ते तुझ्या त्या मोठ्या पप्पांना विचार.. सांगितलंच ते तुला..  

विराज : शौर्य मला नाही माहिती मोठे पप्पा तुला काय बोललेत ते.. बट मी तुझा जीव वैगेरे नव्हतो रे घेणार आणि हे असलं काही तुझ्यापासुन आणि मम्मापासून लपवुन सुद्धा नव्हतो ठेवणार.. मी खरच एकदा सांगायचा प्रयत्न केलेला तुला बट डॅडला कळलं.. त्यावेळेला मला त्याने किती टॉर्चर केलं असेल हे माझं मलाच माहितीय.. प्लिज मला समजुन घे ना.. मला तु पण हवा आहेस आणि ती लोक पण हवी आहेत रे.. बट मोठे पप्पा तुझ्यासोबत असे का वागतायत हेच नाही कळतं आहे मला.. तरी मी त्यांना बोललो तुला त्रास नका देऊ.. जर तुला त्यांचा त्रास होणार असेल तर मी अनुला घेऊन हे घर सोडुन त्यांच्यासोबत कायमचा निघुन जातो.. 

शौर्य : ओके.. जा मग.. (विराजला शौर्य कडुन हे अपेक्षित नव्हतं.., नेहमी प्रमाणे हे घर नको सोडुन जाऊस अशी रिक्वेस्ट शौर्य आपल्याला करेल अस विराजला वाटतात.. बट शौर्यचा राग बघुन विराज त्याच्याकडे एक टक बघतच रहातो)

अस बघु नकोस.. जायचय तर जा... जमल्यास आत्ताच जा.. तसही तुझी स्वतःची माणस आल्यावर तुझं हे अस धमकी देणं चालुच होत... ह्या वेळेला तुझ्या ह्या धमकीच मला काहीच वाटत नाही आहे कारण माझ्या सोबत माझे काका काकी आहेत.. आणि ते माझ्या सोबत असताना तु ह्या घरात असलास काय आणि नसलास काय आय डोन्ट केअर नाव्ह.. तुझ्यापेक्षा पण जास्त इंपोर्टटंट माझ्यासाठी माझा काका आहे.. माझ्या काका पुढे मला कोणीच इंपोर्टटंट नाही.. तु सुद्धा नाहीस.. माझा काका ह्या घरात नसला तर मला फरक पडेल.. तुझ्या असण्याने आणि नसण्याने मला ह्या वेळेला काहीच फरक नाही पडणार आहे.. सॉ असली धमकी देणं बंद करायचं.. जायच असेल तर बेग घे आणि निघ इथुन.. तसही तुमच्यासारखी माणस इथे असताना मिच इथुन माझ्या फॅमिलीसोबत निघुन जाण्याचा विचार करतोय..

शौर्य अस बोलताच विराज डोळ्यांत पाणी आणतच त्याच्याकडे बघु लागतो..

विराज : शौर्य अस बोलुन खुप हर्ट करतोयस तु मला.. 

शौर्य : ओहह रिअली.. तु माझ्या बोलण्याने हर्ट होतोस तर.. एकटिंग तर नाही ना करत आहेस.. तसही एकटिंग करण्यात तु तुझ्या मोठया मम्मीवर गेलायस.. काय मेलोड्रामा क्रिएट करते यार ती.. 

विराज : शौर्य उगाच माझ्या मोठ्या मम्मीबद्दल नको ते बोलु नकोस.. मी लवकरच हे घर सोडुन निघुन जातो.. अजून काही अपेक्षा असतील तर ते पण सांग.. त्या सुद्धा पुर्ण करतो मी..

शौर्य : ह्या पुढे तुझं तोंड नको दाखवुस मला.. ही एक अपेक्षा.. ही गोष्ट माझ्यासाठी केलीस तर मला खुप बर वाटेल.. तसही ह्या पुढे मी तुला दिसणार नाही ह्याची मी काळजी घेतलीय डोन्ट व्हरी.. बट प्लिज तुझ्या मोठ्या पप्पांना माझ्याकडुन मनापासून थेंक्स बोल.. तुझी पुर्ण हिस्ट्री जोग्रोफी त्यांच्यामुळेच तर मला कळली.. 

विराज शौर्यच्या अश्या बोलण्याने खुप दुखावला होता.. त्याला जेवढ वाईट वाटत होतं त्याहून जास्त त्याला शौर्यचा राग येत होता..

विराज शौर्यसोबत काहीही न बोलता सरळ आपल्या रूममध्ये येतो..

अनघा गेलरीत उभी राहुन कसला तरी विचार करत असते..

विराज तिच्यासोबत काहीही न बोलता कपाटातून बेग काढत रागातच आपले कपडे भरायला घेतो..

विराज काय करतोयस??? अनघा त्याच्याजवळ येतच त्याला विचारते..

विराज : आपण हे घर सोडुन जातोय.. ते ही कायमच..

अनघा : का??

विराज : ह्या घरी माझे मोठे मम्मी पप्पा राहिले की शौर्यला त्रास होतोय म्हणुन.. आपण मोठ्या मम्मी पप्पांसोबत अलिबागला रहायला जातोय..

अनघा : विराज मी अलिबाग वैगेरे येणार नाही.. 

विराज : अनु आपण उद्याच हे घर सोडुन इथुन निघतोय.. आणि तु माझ्यासोबत अलिबागला येतेयस.. आणि मॅन म्हणजे मी तुला सांगतोय विचारत नाही आहे.. तु तुझी बेग भरायला घे.. 

अनघा काहीही न बोलता आपला मोबाईल हातात घेते आणि कोणाला तरी फोन लावत फोन स्पिकरवर ठेवते.. फोन रिंग होत असतो...

विराज : एवढ्या रात्री तु कोणाला फोन करतेयस..??

तोच समोरून फोन उचलला जातो.. 

दि.. एवढ्या रात्री फोन केलास.. सगळं ठिक आहे ना तिथे.. अनघाच्या वडिलांचा आवाज ऐकुन विराज घाबरून जातो..

अनघा : काहीही ठिक नाही.. तुम्ही उद्या मला न्यायला घरी या.. मी तुमच्यासोबत येऊन रहाणार आहे.. ते ही कायमच..

पप्पा : काय झालं?? विराजराव काही बोललेत का??

अनघा : उद्या घरी याल तेव्हा कळेलच.. 

अनु काय करतेयस अस.?? विराज तिच्या हातातुन फोन खेचुन घेतच बोलतो..

अनघाचे वडिल तिथुन हॅलो हॅलो करत असतात..

प्लिज.. तु बोलशील तस करतो.. तुझ्या घरी अस नको ते सांगु नकोस.. प्लिज.. विराज अनघाला रिक्वेस्ट करतच बोलतो..

अनघा रागातच पण इशाऱ्यानेच त्याच्याजवळ आपला मोबाईल मागते.. 

अनु प्लिज.. एक हात कानाला लावत विराज इनोसेंट असा चेहरा करत अनघाकडे बघत तिचा मोबाईल देतो..

अनघा : पप्पा आत्ता मी थोड कामात आहे.. उद्या सकाळी तुम्हांला फोन करते आणि सगळं काही सांगते.. तुम्ही टेन्शन नका घेऊ.. तुम्ही झोपा बघु..

पप्पा : एवढ्या रात्री अचानक फोन करून अस काही सांगतेस म्हटलं तर कसली झोप लागतेय मला.. मी आत्ताच तिथे यायला निघतोय..

अनघा : पप्पा मी उद्या सकाळी कॉल करते अस म्हटलं ना तुम्हांला.. तुम्ही टेन्शन नका घेऊ.. तुम्ही गाथा सोबत बोला. ती सांगेल तुम्हांला सगळं काही.. 

पप्पा : बर.. काळजी घे.. पण खरंच घाबरण्यासारखं काही नाही ना.. कोणी तिथे त्रास देत असेल तर सांग तस .

अनघा : पप्पा तुम्ही गाथा सोबत बोला बघु.. मग कळेल.. आत्ता मी ठेवते.. बाय.

अनघा रागातच विराजकडे बघत फोन कट करते..

विराज : अलिबागला यायला काय प्रॉब्लेम आहे तुला?? माझ्यासाठी तु एवढं नाही करू शकत का??

अनघा विराजकडे रागात बघत परत आपला मोबाईल हातात घेते आणि आपल्या वडिलांना परत फोन लावायला जाते तस विराज तिच्या हातातुन मोबाईल काढुन घेतो..

विराज : अनु का त्रास देतेयस.. तुला घरी जाऊन रहावस वाटतंय तर रहा.. पण अस इस्यु करून नको जाऊस.. प्लिज.. 

अनघा : इस्यु मी करतेय का तु करतोयस?? तुला जायच अलिबागला तर तु जा.. मला अजिबात फोर्स करणार नाहीस तु.. मी हे घर सोडुन, इकडच्या माणसांना दुखवुन तुझ्यासोबत कुठेच येणार नाही.. तु जर मला जबरदस्ती किंवा इमोशनल ब्लॅकमेल करून आपल्या माणसांना सोडुन तुझ्या सोबत ये बोललास तर मी थोड्या वेळेपूर्वी जे केलं तेच करेल.. 

विराज : शौर्यला अस वाटतंय की आपण ह्या घरातुन निघावं..

अनघा : शौर्य स्वतःहुन तुला जा बोलला??

विराज शांत बसुन असतो.. अनघा काहीही न बोलता तिथुन रागातच उठुन रूम बाहेर जाऊ लागली.

कुठे चाललीस?? विराज तिचा हात पकडत तिला अडवतच विचारतो..

अनघा : शौर्यला विचारायला.. अस कस तो तुला इथुन जा बोलतोय.. मला नको का कळायला.??

विराज : तो नाही काही बोलला.. 

अनघा : नक्की??

विराज : हम्मम.. 

अनघा : मग अचानक इथुन निघुन जायच का बोलतोयस??

विराज : ते मी उद्या मोठ्या पप्पांसोबत बोलुन सांगतो तुला.. मला आत्ता ह्या टॉपिकवर बोलायचा मुड अजिबात नाही.. आत्ता मला खुप झोप आलीय.. तु पण झोप.. गुड नाईट..

विराज झोपलाय हे बघुन अनघा शौर्यने सांगितल्या प्रमाणे प्रोपर्टीची फाईल कुठे दिसते का बघते..

विराज : काय करतेयस ??

अनघा : हा पसारा करून बसलायस तो कोण आवरणार..??

विराज : उद्या जयरामला आवरेल ते.. तु नको त्रास करून घेऊस.. झोप..

अनघा : हा पसारा इथे बघुन मला झोप येईल अस नाही वाटत.. तु झोप हे सगळं आवरून माझं मी झोपते..

विराज काहीही न बोलता डोळे मिटुन तसाच झोपतो.. इथे अनघा शौर्यने सांगितल्याप्रमाणे हळुच कपाटातून प्रोपर्टीची फाईल काढते.. विराज अगदी गाढ झोपलाय ह्याची खात्री होताच अनघा चोर पावलाने आपल्या रूम बाहेर पडते आणि शौर्यच्या रूममध्ये जाते.. 

शौर्य रूममध्ये आपली बेग भरून जायच्या तैयारीतच असतो..

अनघा : हि फाईल.. 

थेंक्स... अस बोलत अनघाच्या हातातुन फाईल घेत आपली बेग पुन्हा ऑपन करत त्यात तो ती फाईल भरतो..

अनघा : शौर्य तु काय करणार आहेस??

शौर्य : सगळं उद्या सांगेल मी तुला.. तुझ्यासोबत कोणी नाही ह्याची खात्री असेल तेव्हाच मला कॉल कर.. आणि ह्या पुढे तुला काय करायचय हे पण मी तुला सांगेल.. करशील ना??

अनघा : ते मी तुझ्यासोबत उद्या बोलल्यावरच ठरवेल.. तु हे सगळं का करतोयस हे मला आधी कळलं पाहिजे.. तु उगाच काहीही करणार नाही हे मला माहितीय पण तरीही मला कळलं पाहिजेच..

शौर्य : उद्या सांगतो मी तुला.. तुला वेळ मिळेल तेव्हा मलाफोन कर.. आत्ता फक्त एवढंच सांगेल.. ती लोक चांगली नाहीत.. माझ्या बाबाला माझ्यापासुन लांब केलंय त्यांनी.. 

अनघा : कोणी??

शौर्य : विरच्या मोठ्या पप्पांनी.. 

अनघा : व्हॉट??

शौर्य दादा आय एम रेडी.. साक्षी शौर्यचा दरवाजा ऑपन करून आत येतच बोलते..

शहहहह.. अनघा आणि शौर्य आपली चाफेकळी ओठांवर ठेवतच तिला शांत रहायला सांगतात..

साक्षी मानेनेच हो बोलते..

साक्षी : चल निघुयात.. सगळे आपली वाट बघतायत खाली..

(साक्षी हळुच शौर्यला बोलते.. )

शौर्य : हो निघुयात.. काळजी घे तुझी.. (शौर्य अनघाकडे बघतच बोलतो) शक्य होईल तेवढं तुझ्या नवऱ्याला त्यांच्यापासुन लांब ठेव.. नाही तर ती लोक त्याला तुझ्यापासुन सुद्धा लांब करतील.. खुप विचित्र लोक आहेत ती.. आज तुझ्या नवऱ्याच्या वागण्यातून थोडं फार तु अनुभवलच असशील.. 

अनघा : हम्मम.. तु आतुन खुप दुखावला आहेस हे माहिती मला.. 

शौर्य : सकाळ पासुन मला एकच प्रश्न पडलाय ग.. जे लास्ट टाईम माझ्या बाबतीत झालेलं तेच जर स्वराजच्या बाबतीत झालं असत तरी तो असाच वागला असता का?? 

अनघा : शौर्य ह्या वेळेला मी एवढंच बोलेल की विराज माझ्यापेक्षा सुद्धा जास्त तुला महत्व देतो.. तो खरच खुप पजेसिव्ह आणि केरिंग आहे तुझ्या बाबतीत.. बट तु येण्याआधी त्याला भरपुर सार प्रेम त्याच्या मोठ्या मम्मी पप्पांनी दिलंय.. म्हणजे स्वराज झाल्यानंतर विराज आपल्या मम्मी डॅड सोबत कमी आणि त्याच्या मोठ्या मम्मी पप्पांकडे जास्त होता. त्याच्या डॅडच्या रागामुळे तो त्यांचा कमी आणि मोठ्या पप्पांकडे जास्त आकर्षित होता कारण जास्त हट्ट त्याचे त्यांनी पुरवलेत.. जस तु तुझ्या मम्माकडे कमी आणि विराजकडे जास्त ओढला जातोस अगदी तसच.. त्यांनतर त्याच्या मम्मी आणि स्वराजची डेथ झाली त्यानंतर पण थोडे महिने त्याच्या मोठ्या मम्मी पप्पांनीच सांभाळलय त्याला.. म्हणजे एक प्रकारे उपकारात अडकलाय तो त्यांच्या अस बोललास तरी चालेल.. त्यामुळे त्याला वाईट वागायला नाही जमत आहे त्यांच्याशी.. लास्ट टाईम त्याचे मोठे मम्मी पप्पा तुझ्यासोबत वाईट वागले म्हणुन त्याने मोठ्या मम्मी पप्पांना स्वतःपासून लांब केलेलं.. आणि तो त्यांच्याशिवाय नीट रहात सुद्धा होता आणि रोजच्या सारख जीवन जगत सुद्धा होता.. पण एक गोष्ट लक्ष्यात ठेव तु रागाच्या भरात त्याला तुझ्यापासुन कायमच लांब केलंस तो नाही जगणार.. तुझ्या शिवाय विराज खरच नाही जगणार शौर्य.. त्याच्या दिवसाची सुरुवात ही तुझ्या नावा पासुन होते.. रात्री झोपताना पण तुझाच विषय असतो त्याचा.. शौर्य तिथे नीट असेल ना.. काय करत असेल.. परत मारामारी वैगेरे तर नाही ना, का बाईक स्टंट करत असेल.. प्रत्येक क्षणाला तुझी काळजी आणि तुझाच विचार त्याच्या डोक्यात असतो.. लास्ट टाईम USA ला तुला भेटायला आलेला तेव्हा श्री ला बोलला तो.. माझ्यासाठी माझी प्रोपर्टी फक्त नि फक्त शौर्यच आहे.. जगात अशी प्रोपर्टी कोणाकडेच नाही.. तो ह्या क्षणाला खरच चुकीच वागतोय.. बट नको त्या माणसांमुळे तु तुझ्या भावाला तुझ्यापासुन कायमच लांब नको करुस अस मी सांगेल.. शेवटी डिसीजन तुझा असेल.. हा म्हणजे त्याला तुला जी पाहिजे ती शिक्षा दे.. मी पण तुला मदत करेल.. पण अशी शिक्षा नको देऊस जी त्याला जिवंतच ठेवणार नाही.. मला काय बोलायचं हे तुला कळलंच असेल.. 

आपली मान हॉकारार्थी हलवत अनघाला हो म्हणुन बोलतो.. साक्षी चल.. उशीर होतोय.. अस बोलत तो आपली बेग घेऊन रूमबाहेर पडतो..

वहिनी बाय.. साक्षी अनघाला मिठी मारतच बोलते..

अनघा साक्षी सोबत बोलत सगळ्या फॅमिलीला सोडायला गेटपर्यंत जाते.. सगळ्यांमध्ये आपण नाही हे बघुन तिला खुप वाईट वाटत असत.. तरीही गोड हसु ओठांवर आणत ती सगळ्यांना बाय करते.. सगळे निघुन जाताच आपल्या रूममध्ये येते.. विराज अगदी गाढ झोपला असतो.. अनघाला मात्र झोप येत नसते.. आपली कुस बदलत ती झोपण्याचा प्रयत्न करते.. पण झोप काही तिला येत नसते.. इथे शौर्य सुद्धा गाडीत आपल्या काकाला घट्ट अशी मिठी मारून झोपला असतो.. काका त्याच्या केसांवरून हात फिरवत ह्याला काय झालं असेल ह्याचा विचार करत असतो.. 

गाडीत साक्षी आणि आत्याची बडबड चालु असते..

काकी : साक्षी आवाज नको करुस बघु.. शौर्य दादा झोपलायना तुझा..

अनिता : त्याला नाही काही फरक पडत ग.. शेखर सारखीच झोप आहे त्याची.. 

काका : वहिनी तु बोललीस विराजला न सांगता निघायला म्हणुन आम्ही त्याला न सांगता निघालो.. पण आत्ता तरी कळेल का आम्हाला तु अस का बोललीस ते..?

अनिता : शौर्यला अस वाटत होतं म्हणुन मी तस बोलली.. शौर्य काही तरी लपवतोय आपल्या पासुन.. नाशिकला गेल्यावर तुला जर सांगावस वाटलं तर सांगेल नाही तर नाही.. अस बोलला तो मला. 

काका : काही तरी नक्कीच झालंय.. विराजचे मोठे पप्पा आल्यापासुन मी त्याला नोटीस करतोय.. तो खुप वेगळाच वाटतोय मला..

आत्या : नाशिकला पोहचल्यावर बघुयात काय करायच ते..

दुसऱ्या दिवशी..

विराज नेहमी प्रमाणे उठतो.. घड्याळात बघतो तर 8 वाजले असतात.. अनघा अजुनही झोपुन असते.. झोपेत दिसणारा तिचा गोड असा चेहरा विराज बघतच रहातो.. तिच्या अंगावरील चादर नीट करत तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवत विराज फ्रेश व्हायला निघतो.. रात्रभर झालेल्या जागरणाने अनघाला पहाटेच झोप लागली असते.. विराज फ्रेश होऊन बाहेर येऊन बघतो तर अनघा अजुनही गाढ झोपली असते.. 

विराजला आत्ता मात्र थोडं टेन्शन येत.. नेहमी आपल्या आधी उठुन गेलरीत आई पप्पांसोबत फोनवर बोलणारी अनघा आज अशी झोपुन दिसतेय म्हणुन तो तिच्या जवळ जात तिच्या कपाळावर हात लावुन तिला ताप आहे का बघतो.. ताप वैगेरे नसतो.. थोडा वेळ झोपु देत अस विचार करून विराज नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट करण्यासाठी रूम बाहेर पडतो.. 

आज साक्षी पण गुड मॉर्निंग करायला नाही आली रूममध्ये? तिची सकाळ आमच्या रूमपासुनच होते.. हि पण आज उठली नाही?? विराज साक्षीला आवाज देत तिच्या रूममध्ये जातो.. 

साक्षी... साक्षी...

विराज तिला आवाज देत असतो बट त्याच्या आवाजावर हो नाही बोलायला साक्षी घरात नसते. 

मे बी आज गुड मॉर्निंग करायचं विसरूनच डायरेक्ट खालीच गेली असेल.. असा विचार करत तो खाली जायला निघतो.. तोच शौर्यची रूम त्याला दिसते.. आणि कालच त्याच बोलणं त्याला आठवत.. जास्त काही विचार न करता तो खाली डायनिंग टेबलवर येऊन बसतो.. 

त्याचे मोठे पप्पा डायनिंग टेबलवर पेपर वाचतच बसले असतात.. 

विराज त्यांच्याकडे बघुन न बघितल्या सारख करत मोबाईलमध्ये काही तरी करत बसतो.. शौर्यला आपल्याबद्दल भडकवल्यामुळे त्याला त्यांचा राग येत असतो.. पण मोठ्या पप्पांसोबत त्या विषयावर बोलायची त्याची हिंमत होत नसते.. कस विचारू मोठ्या पप्पांना ह्याचा विचात तो करत असतो.. तोच मोठी मम्मी नेहमी प्रमाणे विराजसाठी गरमा गरम नाश्ता बनवुन घेऊन येते..

मोठी मम्मी : सून बाई कुठेय??

विराज : झोपलीय..

मोठे पप्पा : अजुन??

विराज : हम्मम.. 

मोठी मम्मी : आई वडिलांनी काही शिस्त वैगेरे लावलेली दिसत नाही मग.. तु पण काहीच बोलत नाहीस का??  

विराज : आजच तिला उठायला उशीर झालाय ग.. आणि तसही आज सँडे आहे.. लवकर उठुन काय करणार आहे ती.. झोपु देत थोडं..

मोठी मम्मी : बर बाबा.. तुला पटतंय मग झोपु देत..

मोठे पप्पा : काय झोपु देत..?? आपले मोठे सासु सासरे आलेत घरी.. ह्याच जरा तरी भान आहे की नाही तुझ्या बायकोला.. इथे सासु सासरे हिच्या आधी उठुन हजर.. कस व्हायच विराज तुझं..

विराज नाश्त्याची प्लॅट पुढे ढकलत डोक्याला हात लावुन बसतो.. कुठुन दुर्बुद्धी सुचली आणि ह्यांना इथे रहा बोललोय अस काहीस त्याच झालं..

मोठी मम्मी : विराज नको ना लक्ष देऊस त्यांच्याकडे.. त्यांना अस उशिरा उठण वैगेरे नाही रे आवडत.. नाश्ता करून घे बघु..

नाष्ट्याची प्लॅट विराजच्या पुढ्यात करत त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतच मोठी मम्मी त्याला बोलते..

मोठी मम्मी : बाकीचे कुठेयत..??

विराज : रूम मध्ये असतील.. येतीलच थोड्या वेळाने..

ह्या घरी सगळ्यांनाच उशीरा उठायची सवय झालीय वाटत.. मोठे पप्पा पुन्हा तणतणत बोलले..

विराज त्यांना काही बोलणार तोच शौर्यला आवाज देत आर्यन, नैतिक आणि रॉबिन घरी येतात..

रॉबिन : गुड मॉर्निंग विर..

विराज : आज सकाळ सकाळी ??

रॉबिन : गाईज चला परत.. विरला आत्ता आपण इथे आलेल नाही आवडत..

विराज : तुझं नको ते बोलुन झालं असेल तर ब्रेकफास्ट करायला ये..

(तिघेही एकमेकांकडे काही तरी इशारा करतात..)

एवढा काय विचार करतायत.. या बघु..

आर्यन : नाही नको.. राहू दे.. आमच्या घरून आम्ही खाऊन पिऊनच बाहेर पडलोय..

विराज : चहा, कॉफी नाही तर ज्युस तरी घ्या.. नेहमी नेहमी काय नाही नाही बोलत असता..

रॉबिन : अस बोलतोयस मग मी ज्युस घेतो..

आर्यन : मी पण ज्युस

नैतिक : आणि मी पण ज्युसच घेतो..

गुड.. अस बोलत विराज काकांना तिघांसाठी ज्युस घेऊन यायला सांगतो..

विराज : इथे येऊन बसा ना..

आर्यन : नाही नको.. आम्ही इथेच ठिक आहोत.. 

(लांबुनच विराजच्या मोठ्या पप्पांकडे बघतच आर्यन बोलतो. विराजचे मोठे पप्पा एका वेगळ्याच नजरेने तिघांकडे बघत असतात..)

विराज : मोठे पप्पा.. शौर्यचे मित्र आहेत ते.. अस रागात का बघतायत त्यांच्याकडे..??

(विराज मोठ्या पप्पांची समजुत काढतच बोलतो)

रॉबिन : ए गाईज मला ह्या मॉगेम्बोची मस्ती करावीशी वाटतेय यार.. हिटलर ला पण मागे टाकेल असा लुक आहे ह्याचा.. 

आर्यन : रॉबिन आपण शौर्य ने सांगितलेली मस्ती करणार आहोत आणि गप्प इथुन निघणार आहोत.. तु अजुन इस्यु नको करुस..

नैतिक : हो ना.. कसा बघतोय बघ तो.. खुनी कुठला..

इथे हि तिघ एकमेकांना ऐकु जाईल असच बोलतात..

विराज नाश्ता करत नाही हे बघुन विराजची मोठी मम्मी त्याला भरवायला घेते..

विराज : अग मोठी मम्मी मी खातो.. तु राहु देत..

मोठी मम्मी : कधीच प्लॅट अशी समोरच घेऊन बसलायस. थंड करून खाणार का..??

विराज : ते काका काकी येतीलना म्हणुन त्यांची वाट बघत थांबलेलो..

मोठी मम्मी : ते येतील तेव्हा येतील.. तु खाऊन घे बघु..

विराज : माझं मी खातो बोललो ना.. तु दे बघु स्पुन इथे..

मोठे पप्पा : आत्ता तिला तिच्या हाताने तुला भरवावस वाटतंय तर भरवु देत ना..

त्याला हात नाहीत का पण?? रॉबिन सोफ्यावर बसुन आर्यन आणि नैतिककडे बघत मोठ्यानेच ओरडतो..

तस विराज सोबत त्याचे मोठे मम्मी पण त्याच्याकडे बघतात.. आर्यन आणि नैतिकची सुद्धा सॅमच रिएक्शन असते..

रॉबिन : तुम्ही दोघ अस काय बघतायत माझ्याकडे.. चुकीच बोलतोस का मी.. (रॉबिन आर्यन आणि नैतिककडे बघत आपला एक डोळा मिटत त्यांना काही तरी इशारा करतच बोलतो).. नको तिथे मोठेपणा करायची घाणेरडी सवय असते.. त्याला कोण चांगल आणि कोण वाईट कळतच नाही का?? बाटलीने दूध पितो का?? आज हॉस्पिटलमध्ये भेटेलच मला तो.. मग बघतोच त्याच्याकडे..परत माझ्या समोर रोहनचा विषय तुम्हां दोघांपैकी कोणीच नाही काढणार.. कळलं??

रॉबिनच पुढील बोलन ऐकुन विराजला आणि त्याच्या मोठ्या मम्मी पप्पांना अस वाटत कि रॉबिन खरच रोहन बद्दल बोलतोय..

तिघेही एकमेकांकडे बघत तोंडावर हात ठेवुन हसु लागतात..

विराज थोड्या वेळापुर्ती का होईना पुर्ण पणे ब्लँक झालेला असतो..

तुला रवा आवडतो ना म्हणुन तुझ्यासाठी केलाय अगदी तुला जसा आवडतो तसा.. केळ वैगेरे टाकुन..कसा झालाय??? मोठी मम्मी विराजकडे बघतच त्याला विचारते..

एकदम बकवास.. एकदम म्हणजे एकदमच बकवास.. रॉबिन परत लांबुनच मोठ्यानेच ओरडतो..

रॉबिन अस काही बोलताच विराजला ठचकाच लागतो.. 

विराज : रॉबिन काय चाललंय तुझं??

रॉबिन : विर तुच सांग ह्या नैतिकला.. हा मला विचारतोय.. माझ्यावर बिअर्ड लुक कसा दिसेल?? एकतर गुलाबजाम सारखा चेहरा त्यावर नुडल्स लावले तर कसा दिसेल हा?? मला तर शेजवान नुडल्स विथ गुलाबजाम खातोय अस वाटेल.. त्याला तेच सांगतोय मी.. एकदम बकवास दिसशील एकदम म्हणजे एकदम बकवास.. 

आर्यन : बिअर्ड लुक साठी तसा फेस पण हवा रे नैतिक.. आपल्या विरचा फेस बघ..त्यालाच छान वाटतो फ्रेंच लुक.. नैतिक तु रॉबिन बोलतोस तस खरच बकवास दिसशील रे.. 

मोठे पप्पा : तुम्ही त्या शौर्यला भेटायला आलेत ना.. भेटुन निघा बघु इथुन.. फालतु बडबड लावलीय मगासपासून..

विराज : मोठे पप्पा.. थोडं शांत बसा ना.. अस इन्सल्ट का करतायत त्यांचा.. त्यांचं ते बोलतायत ना.. तुम्ही लक्ष नका देऊ..

मोठे पप्पा : मगापासून नको ते बोलतायत ते...

शट युअर माऊथ.. यु इडियट.. रॉबिन रागातच आर्यनकडे बघत बोलतो..

विराज डोक्याला हाथ लावत परत रॉबिनकडे बघतो..

आर्यन : जास्त बोलतोयस हा तु..

रॉबिन : मी फालतु लोकांच जास्त ऐकुन नाही हा घेत..

आर्यन :  फालतु कोणाला बोलतोयस तु?? 

रॉबिन : जो फालतु आहे त्याला.. मी का तुझ्याशी बोलतोय बट.. मी विरसोबत जाऊन बसतो.. शौर्यने बोलवलय म्हणुन आलोय. नाही तर तुझं तोंड बघायची पण इच्छा नाही आहे मला..

नैतिक : ए गाईज शांत बसा ना.. सकाळपासुन तुम्हा दोघांची भांडणच सोल्व्ह करतोय मी.. रॉबिन तु वृषभवरून सारख सारख त्याला चिडवत नाही हा बसणार..

(नैतिक पण थोडी एकटिंग करत बोलतो)

रॉबिन : ए विर शौर्य कुठेय यार?? इथे फालतु लोकांकडुन फालतु बडबड ऐकुन घ्यावी लागतेय मला.. (मोठया पप्पांकडे बघतच रॉबिन विराजजवळ येत विराजला बोलतो)

आर्यन : तु सारख सारख फालतु कोणाला बोलतोयस?? (आर्यन रॉबिन जवळ येतच त्याला बोलतो)

रॉबिन : जो खरच फालतु आहे त्याला.. परत परत तेच तेच विचारलस तरी मी तेच तेच बोलेल..

विराज : का उगाच भांडतायत दोघ.. शांत बसा बघु..

रॉबिन : ह्याला सांग ना मग..

मोठे पप्पा रागातच विराजकडे बघत असतात.. तोच जेवण बनवणारे काका तिघांसाठी ज्युस घेऊन येतात..

नैतिक : शौर्य गाढ झोपलाय वाटत.. फोनच उचलत नाही..

आर्यन : नक्की घरीच आहे ना??

विराज : अजुन कुठे जाणार आहे.. रूममध्येच असेल.. रूममध्ये जाऊन भेटा..

आर्यन : ज्युस संपवतो आणि जाऊन भेटुन येतो.. 

रॉबिन : तुम्हांला कुठे तरी बघितल्या सारख वाटतंय मी??

(रॉबिन मोठ्या पप्पांकडे एकदम सिरीयस चेहरा करतच बोलतो..)

कुठे बघितलं बर..  (रॉबिन थोडा आपल्या डोक्यावर जोर देत काही तरी आठवण्याचा प्रयत्न करतो)

विराज सकट सगळेच आत्ता त्याच्याकडे एकदम सिरीयस चेहरा करत बघु लागतात..

हा आठवलं?? रॉबिन स्वतःशीच पुटपुटतो..

विराज : कुठे बघितलस??

रॉबिन : काल संध्याकाळी आलेलो ना मी.. तेव्हा तुमच्याच घरी बघितलेलं मी ह्यांना.. आय थिंक तुझ्याच बाजुला बसलेले.. हो ना..

रॉबिनच्या ह्या विनोदावर हसावं की रडावं हेच विराजला कळत नसत.. विराजचे मोठे पप्पा विराजकडे रागात बघत तिथुन उठुन सोफ्यावर जाऊन बसतात..

विराज : रॉबिन हात जोडतो.. प्लिज शांत बस.. तो ज्युस संपव आणि शौर्य सोबत त्याच्या रूममध्ये जाऊन बस.. आणि तुम्ही दोघ पण शौर्यसोबत त्याच्या रूममध्ये जाऊन बसा बघु.. 

तिघेही गालातल्या गालात हसत आपली मान होकारार्थी हलवतात.. विराज डायनिंग टेबलवरचा उठुन सरळ आपल्या रूममध्ये जायला निघतो..

मोठी मम्मी : एवढा संपवुन तरी जा..

विराज : नंतर बाकीची लोक आली की त्यांच्या सोबत करतो ब्रेकफास्ट.. आत्ता भूक नाही.. मला काम पण आहे खुप..

विराज तिथुन आपल्या रूम मध्ये निघुन जातो..

विराज रूममध्ये निघुन जाताच रॉबिन शौर्यला फोन लावतो..

रॉबिन : हे बघा शौर्यने फोन उचलला..

नैतिक : स्पिकरवर फोन ठेव..

शौर्य : हॅलो..

नैतिक : ए SD किधर हे यार तु??

शौर्य : मी माझ्या फेमिलीसोबत मस्त पैकी आऊटिंगला आलोय..

आर्यन : आम्हांला इथे लॉन्च पापड लाटायला बोलवलेलंस का??

रॉबिन : व्हॉट?? तुमच्यात लॉन्च पण लाटतात??

आर्यन : ते तुमच्यात लाटतात म्हणुन बोललो..

रॉबिन : असले नको ते उपद्व्याप आम्ही करत नाही रे.. तसही आम्ही लॉंच आणि पापड दोन्हीही रेडीमॅडच आणतो आणि फालतु बडबड बंद कर मॅन पॉइंटवर ये.. इथे नको ते बोलायला आलायस का तु?? 

आर्यन : हे तु मला सांगतोयस??

रॉबिन : आर्यन नाव्ह आय इन सिरीयस मॉड.. स्टॉप किडींग मी.. शौर्य तुझ्या फॅमिली वकिलांकडे जायच होत ना?? हा बंगला विरच्या नावावर करायला.. तु आम्हांला इथे बोलवुन फॅमिली आऊटिंगला कस काय जाऊ शकतोस?? आमच्या वेलयुएबल टाईमची तुला किंमत आहे की नाही??

शौर्य : सॉरी.. मी तुम्हांला सांगायलाच विसरलो.. तुम्ही एक काम करा.. लास्ट टाईम ज्या वकिलांकडे आपण गेलेलो त्यांच्याकडे जावा.. त्यांनी पेपर्स वैगेरे रेडी करून ठेवले आहेत.. ते घेऊन या. आणि आर्यन ते पेपर्स तुझ्याकडे ठेव.. घरी विरला कळलं नाही पाहिजे मी अस काही तरी करतोय.. म्हणजे विर ने स्वतःहुन माझ्याकडे हा बंगलो मागायला पाहिजे ना.. तरच मी हा बंगलो आणि माझा बिझिनेस त्याच्या नावावर करेल.. अदर व्हाईज नॉ.. आत्ता ते दोन बेगर लोक माझ्या घरी रहायला आले म्हटलं तर ती लोक आज ना उद्या विरला हा बंगला त्याच्या नावावर करायला सांगतील ना.. ते लोक जसे बोलतील तस विर रडतच माझ्याजवळ येईल.. आणि त्यात ह्या सेटरडे मी USA जातोय.. उगाच घाई नको म्हणुन मी तुम्हांला बोललो.. 

आर्यन : कोण बेगर..??

शौर्य : विरचे मोठे मम्मी पप्पा रे..

आर्यन : तु अस बेगर का बोलतोय त्यांना..

शौर्य : विरनेच शिकवलय रे.. विर त्यांच्या मागे त्यांना बेगरच बोलतो.. काल तर मी त्यांना त्यांच्या तोंडावर बोललोय. विरला बोललो सुद्धा तुझ्या मोठ्या पप्पांना मी भिकारी बोललोय.. 

रॉबिन : मग??

शौर्य : मग काय?? विर ने ऐकुन न ऐकल्यासारखं केलं आणि गप्प आपल्या रूम मध्ये गेला. त्याला पण आत्ता हा बंगला हवाय रे.. मग तो माझ्याशी नीटच बोलेल..

नैतिक : आहेस कुठे तु?? म्हणजे तु अचानक गायब कुठे झालायस??

शौर्य : मी कुठे गायब झालोय.. ते बेगर लोक झोपल्यावर विरनेच आम्हांला त्याच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर पाठवलंय.. मस्त एन्जॉय करतोय मी इथे.

रॉबिन : ए शौर्य मला पण यायच तिथे..

शौर्य : ये ना मग.. तुम्ही सगळेच या.. मज्जा करू आपण इथे.. पण वकिलांकडे बनवलेले पेपर्स घेऊन मगच इथे या.. जर अचानक विरचा फोन आला आणि त्याला बंगला त्याच्या नावावर करून घ्यावासा वाटला तर उगाच घाई नको.. तस पण विर अस काही मागणार नाही अस पण वाटतंय.. कारण माझ्या बाबाला त्याच्या मोठ्या पप्पांनी मारलंय हे त्याला कळलंय.. तो त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करायला मला मदतच करतोय.. 

आर्यन : ग्रेट.. 

शौर्य : ग्रेट काय ग्रेट..विर आहे तो.. पार्टी कधीही बदलतो.. बाय दि वे तुम्ही लोक आहात कुठे??

रॉबिन : तुझ्या घरी..

शौर्य : व्हॉट?? कोणी ऐकेल ना तिथे...

इथे कोणीच नाही.....रॉबिन आपली मान आजु बाजूला फिरवतच बोलतो.. तोच त्याच लक्ष मोठ्या पप्पांकडे जात.. त्यांनी हातात पकडलेल्या पेपराचा अगदी चुरघळा झाला असतो.. तसाच पेपर टीपॉय वर ठेवत ते रागातच आपल्या रूममध्ये निघुन जातात.. मोठी मम्मी सुद्धा त्यांच्यासोबत रूममध्ये निघुन जाते..

नैतिक : SD.. प्लॅन नंबर टु इज सक्सेस..

रॉबिन : ते दोन बेगर आत्ताच इथुन जिने चढत, नाक मुरडत इथुन गेले..

आर्यन : आत्ता वहिनीला प्लॅन थ्री च्या तैयारीला लागायला सांग.. सोबत तुझी गाथा तिला सपोर्ट करायला असेलच.. आम्ही तोपर्यन्त अलिबागला यायची तैयारी करतो..

शौर्य : आपल्या ठरलेल्या लोकेशनवर मी भेटेलच तुम्हांला.. आणि मम्माची गाडी पाठवलीय मी तुमच्यासाठी.. आर्यन तुझ्या घराजवळ येईल.. 

आर्यन : ओके.. चल बाय...

आपल्या मित्र मंडळींचा फोन कट करून शौर्य लगेचच गाथाला फोन लावतो.. आणि ठरलेला प्लॅन अनघाला समजवायला सांगतो.. फोन ठेवुन देत पुढे काय करायचं ह्याचा विचार करत तो रूममध्ये तसाच बसुन विचार करत असतो..

शौर्य दादा.. तुला बाबा बाहेर बोलवतोय.. साक्षी शौर्यजवळ येतच त्याला बोलते..

शौर्य जास्त काहीही न बोलता हॉलमध्ये जायला निघतो.. बाहेर जाऊन बघतो तर आजी, काका, काकी, आत्या आणि त्याची मम्मा सुद्धा असते..

शौर्य : काय झालं??

काका : इथे माझ्या बाजुला येऊन बस.. 

(शौर्य जास्त काही न बोलता आपल्या काकाच्या बाजुला जाऊन बसतो..)

आत्ता काय झालंय ते आम्हां सगळ्यांना अगदी खरं खर सांगायच..  अगदी खरं.. आमच्यापासून काहीच लपवायच नाही.. तुझं आम्ही ऐकलं.. तु बोललास म्हणुन रातोरात आम्ही इथे यायला निघालो.. फक्त नि फक्त तुझ्यासाठीच.. मग तु पण आमचं ऐकायचं.. 

शौर्य : बाबाला त्या माणसाने मारलंय.. बाबाचा तो एक्सिडेंट नव्हता.. मर्डर होता तो.. (शौर्य रडतच आपल्या काकाला सांगु लागतो.) 

काका : हे अस काय बोलतोयस?? 

शौर्य : आणि मला पण माझ्या बाबाकडे पोहचवणार अशी धमकी देतोय तो.. 

आत्या जागेवरची उठुन लगेच शौर्यच्या बाजुला येऊन बसते.. 

ए बच्चा कोण धमकी देतय तुला?? शौर्यचे डोळे पुसतच त्याची आत्या त्याला विचारू लागते..

काका : शौर्य सांग बघु..

शौर्य जास्त काही न बोलता मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालु करून तो आपला मोबाईल टीपॉयवर ठेवतो..

विराजच असलं बोलण ऐकुन सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलतात.. सगळेच प्रश्नार्थी चेहरा करत एकमेकांकडे बघु लागतात.. त्यानंतर शेवटी त्याच्या मोठ्या पप्पांच बोलणं ऐकुन सगळेच आपला हात आपल्या तोंडाजवळ नेतात..

काका : हे रेकॉर्डिंग कुठे मिळालं तुला??

शौर्य : त्यादिवशी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ऑन करून जयरामकडे दिलेला मी.. तोच चहा नाश्ता घेऊन त्यांच्या रूममध्ये घेऊन गेलेला ना.. 

आत्या : दादाचा एक्सिडेंट त्या माणसाने घडवुन आणलेला.. आणि आत्ता तुला.. ?? तु मला कालच का नाही ऐकवलास हा ऑडिओ..??

अनिता : विरने तुझा एक्सिडेंट घडवुन आणलेला??

शौर्य : मम्मा त्याने मला ते सगळं सांगुन घडवुन आणलेलं.. (आपल्या विरचा कोणी राग करू नये म्हणुन त्याची बाजु घेतच शौर्य बोलतो) म्हणजे डॅड ला अस वाटायला की तो मला मारून टाकतोय.. एक्सिडेंट वैगेरे नाटक होत.. प्लिज विरला काही बोलु नकोस.. म्हणजे तो जे काही वागला ते माझ्यासाठीच.. आणि मॅन म्हणजे आम्ही दोघांनी मिळुन तो प्लॅन केलेला तो?? तस नसत केलं असत तर विरच्या डॅडने कधीच मारून टाकल असत ग मला.. 

अनिता : एकदा मला नाही सांगावस वाटलं तुला??

शौर्य :  तुला वेळ होता माझ्यासाठी..?? आणि नंतर तुला कळलं तेव्हा तु काय केलंस?? मलाच जबरदस्ती दिल्लीला पाठवलसना?? माझी समजूत काढत काय बोललीस तु मला..?? पोलिस पुरावे मागतात.. मी पुरावे कुठुन आणुन देऊ? तुला सांगितलं असत तर काय केलं असतस तु?? काहीच करू नसती शकली?? विरने खुप वेळा मला त्याच्या डॅड पासुन वाचवलय.. (शौर्य समीराच्या भावाच्या लग्नातील किस्सा सुद्धा सगळ्यांना सांगतो)..

आत्या : मला तरी सांगायचस ना फोन करून.. दिल्लीला जाऊन राहण्यापेक्षा माझ्याकडे येऊन राहुच शकत होता ना??

आत्या अस बोलताच शौर्य अनिताकडे बघतो..

अनिता : रोज बोलायचा.. मला आत्याकडे जायचय.. मला माझा काका हवाय.. मी रागवायची मग नंतर नंतर त्याने तस बोलणंच सोडुन दिलं.. कारण मला पण त्याच्याशिवाय लांब रहायला जमत नव्हतं.. आणि ह्याने कधी माझ्याकडे सुरज बद्दल तक्रार केलीच नाही ना. 

शौर्य : मॅन म्हणजे नाशिकला गेलो की तुझ्याकडे रहायच सोडुन काकाकडे राहील ह्या विचाराने खर तर मम्माने मला तुझ्याकडे येऊ नाही दिलं.. आणि इट्स ओके.. मला माझ्या मम्मा बद्दल कसलीच तक्रार नाही आहे.. मला माझी फॅमिली सॅफ करायची होती म्हणुन मी रातोरात इथे नाशिकला चला बोललो तुम्हांला.. तो माणुस खुप पोहचलेला आहे..

काका : वहिनी आत्ता करायचं काय त्या माणसाच?? माझ्या दादाचा जीव घेऊन पोट भरल नाही जे माझ्या शौर्यच्या जीवावर उठलाय.. हिंमत कशी झाली त्याची शौर्यला धमकवायची..

शौर्य : काका हिंमत तर त्याची खुप काही करायची होतेय.. बट तो आत्ता काही करूच नाही शकणार.. त्याला लवकरच रस्त्यावर कस उतरवतो मी हे फक्त तु बघच..

आत्या : काय करणार आहेस तू?? 

शौर्य : करणार नाही.. जे काही करणार आहे ते करायला सुरुवात सुद्धा केली आहे मी.. फक्त तुम्हां लोकांना मी सांगेल तस करायचय. विरसोबत कस बोलायचंय कस वागायचंय हे मी सांगणार तुम्हांला.. 

काका : करणार काय आहेस ते तरी सांग..

शौर्य त्याने जो काही प्लॅन केलाय तो सगळ्यांना सांगतो..

सगळेच एकमेकांकडे बघू लागतात..

काका : क्या बात हे.. (शौर्यची पाठ थोपटतच काका बोलतो) माझ्या दादाचा मुलगा शोभुन दिसतोस..

शौर्य : सध्या तरी एवढाच प्लॅन केलाय मी. ह्या पुढे सुद्धा खुप काही करायचय.. बट आत्ता मी अलिबागला निघतोय.. प्लॅन नंबर फाईव्हच्या तैयारीसाठी.. आणि आपण आजचा दिवसच इथे रहाणार आहोत.. त्यानंतर मात्र लोणावळा जातोय.. माझ्या लाडक्या वहिनी सोबत थोडा टाईम स्पेन्ड करायला..

अनिता : तु बोलशील तसच आम्ही करू..

इथे विराजचे मोठे पप्पा आपल्याच रूममध्ये रागातच इथुन तिथे फेऱ्या मारत असतात..  मोठी मम्मी त्यांना शांत करत असते..

मोठे पप्पा : तरी सुरज बोलायचा मला ह्याच्यात सगळे गुण त्या विनिताचे आहेत.. मिच मुर्ख जे त्याच ऐकलं नाही.. आपल्या मोठ्या पप्पाला भिकारी बोलतो हा मुलगा?? येऊच दे बघतो त्याच्याकडे..

मोठी मम्मी : कोणाच ऐकुन काहीही बोलु नका त्याला.. तो अस काही बोलणार नाही..

मोठे पप्पा : तुच ऐकायला होतीस ना??

मोठी मम्मी : हो पण.. मला नाही वाटत विराजआपल्याला अस काही बोलेल.. त्याच्या मनात काय आहे ते बघुयात तरी.. उगाच कोणाच ऐकुन काहीही बोलु नका त्याला..

मोठे पप्पा : कोणाच ऐकुन काहीही बोलत नाही आहे.. काल सुद्धा तो मुलगा नको ते बोलत होता मला.. आणि विराजने काय केलं?? उलट येऊन मलाच समजवत होता.. 

मोठी मम्मी : तुम्ही का एवढा राग करतायत.. शांत व्हा बघु.. आपण विराजसोबत बोलूयात.. तो आपला आहे आणि आपलंच ऐकेल..

मोठी मम्मी कस बस विराजच्या मोठ्या पप्पांची समजुत काढत त्यांना शांत करते..

दुपारचा एक वाजला असतो.. तस जेवणासाठी सगळे खाली डायनिंग टेबलवर जमतात..

मोठी मम्मी : अनघा... तब्येत वॆगेरे ठीक आहे ना तुझी??

अनघा : हम्मम..

मोठी मम्मी : सकाळी लवकर उठाव ग माणसाने.. 

हम्मम.. अनघा विराजकडे बघतच बोलते..

मोठे पप्पा : घरी कोणीच नाही का?? सकाळी नाश्ता करायला सुद्धा कोणी नव्हत म्हणुन विचारलं.. विराज तुला माहितीय का कुठे आहेत ते सगळे??

विराज : मला काही बोलले नाहीत.. (विराज खिश्यातुन फोन काढतच मोठ्या पप्पांना बोलतो..)

फोन सुद्धा उचलत नाही आहेत कोणी.. अनु तुला काही बोललेत का??

अनघा नकारार्थी मान हलवत नाही म्हणुन बोलते.. 

अनघा : थांब मी फोन लावुन बघते.. 

विराज : फोन नाही उचलत आहे ग कोणी..

हा काका.. कुठे आहात तुम्ही लोक?? अच्छा.. अस अचानक??? हम्मम्म..(अनघा विराजकडे बघतच काकासोबत बोलत असते...) ओके.. बाय..

अनघा : नाशिकला गेलेत..

विराज : अचानक?? 

मोठे पप्पा : नक्की नाशिकलाच गेलेत ना ती लोक.. सुनबाई??

अ.. हो.. अनघा विराजकडे बघतच मोठ्या पप्पांना बोलते..

विराज : काका माझा फोन का नाही उचलत होता..?

अनघा : ते मी मी नाही विचारलं.. 

विराज परत आपल्या मोबाईलवरून काकाला फोन लावतो.. पण काका त्याचा फोन नाही उचलत.. 

कोणी आपला फोन उचलत नाही हे बघुन विराजला खुप टेन्शन येत.. 

मोठी मम्मी : अस डोक्याला हात लावुन का बसलायस?? जेव बघु..,

मोठ्या मम्मीच्या आवाजाने तो भानावर येतो.. डायनिंग टेबलवर सगळ्यां सोबत मज्जा मस्ती करत जेवायची सवय त्याला झाली असते.. एक एक घास खास प्रत्येकाच्या ठरलेल्या ठरलेल्या चेअरवर तो नजर फिरवत असतो.. आपण मोठ्या मम्मी पप्पांपेक्षा ह्या फेमिलीसोबत खुप अटेच आहोत ह्याची थोडी फार जाणीव विराजला होते.. मोठ्या पप्पांच सकाळच वागणं आणि काकाच रॉबिन सोबत मज्जा मस्ती करत वागणं ह्यात त्याला खुप फरक वाटत होता.. 

अनघा : विराज.. कसला एवढा विचार करतोयस??

विराज : काका कधी येतोय बोलला??

अनघा : एक आठवडा तरी नाही येणार तो..  ह्या विषयावर आपण नंतर बोलुयात??

हम्मम.. विराज मोठ्या मम्मी पप्पांकडे नजर फिरवतच बोलतो..

क्रमशः..

(ह्या भागात जास्त सस्पेन्स नाही ठेवत.. कारण पुढील भाग पोस्ट व्हायला माझ्याकडुन थोडा उशीर होईल.. सोमवारी दुपार पर्यँत भाग पोस्ट करण्याचा नक्की प्रयत्न करेल.. तुम्ही सहकार्य नक्कीच कराल त्याबाबत शंकाच नाही.. पण हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा)

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all