अतरंगीरे एक प्रेमकथा १३२

In marathi

रॉबिन : ए वृषभ बस कर ना यार.. डोळे उघडे बघु.. किती दिवस अस झोपणार आहेस.. आई पप्पा आलेत तुझे इथे.. त्यांना बघ तरी.. तुझी पिऊ पण येईल बघ थोड्या वेळाने.. तुला काही झालं तर तुझी पिऊ नाही जगणार यार.. रोज कॉलेज सोडुन इथे येऊन बसते ती.. रोज रडत असतेरे तुझ्याकडे बघुन.. प्लिज एकदा उठुन बोल तरी तिच्याशी.. प्लिज उठ..  (रॉबिन वृषभला हलवतच बोलतो.. बट वृषभ डोळे काही उघडत नसतो.. ) तु ना नेहमी तुला हवं तेच करतोस यार. जरा पण पिऊचा विचार नाही तुला. अस नाही वागु शकत यार तु तिच्यासोबत.. वृषभ प्लिज डोळे उघडना यार.. मला तुला अस बघायला नाही होत आहे यार.. प्लिज उठ..

कधी न रडणारा रॉबिन पण वृषभचा हात आपल्या हातात पकडत रडु लागतो.. वृषभकडे बघत तिथेच बसुन रहातो... रात्रभर जागरण झाल्यामुळे तो त्याच्याजवळच डोकं ठेवुन झोपतो.. 

जवळपास दिड एक तासाने नैतिकच्या आवाजाने त्याला जाग येते..

नैतिक : इथे का बसलायस?? आणि बाकी गॅंग कुठेय??

रॉबिन : दुपारी येतील बाकीची लोक.. नाही तर संध्याकाळी.. आणि मी तुला 9 वाजता ये बोललो होतो ना?? साडे दहा वाजले.. मला लेक्चरला जायच असत माहिती ना..

नैतिक : सॉरी ना.. एवढ्या लांब बाईकने यायला घरून परमिशन नाही ना.. त्यामुळे ट्रेनने आलोय.. दोन तीन ट्रेन चँज करून यावं लागलं इथे.. आणि 1 वाजता जायचय ना तुला..?? आत्ताशी साडे दहा वाजले..

रॉबिन : तु नको येत जाऊस.. मी ज्यो ला सांगतो यायला.. 

नैतिक : ए रॉबिन मला ट्रेनचा अंदाज नव्हता रे म्हणुन एवढा लेट झाला. उद्या पासून टाईमात येतो..

रॉबिन : तु लेट आलास म्हणुन नाही बोलत आहेरे तुला त्रास होतोयना म्हणुन बोलतोय.. नाही तर एक काम कर तु माझ्याच घरी रहा ना.. 

नैतिक : कॉलेज असत रे माझं..

रॉबिन : कॉलेजमध्ये जाऊन काय दिवे लावतोस ते माहिती मला.. गप्प इथेच रहा.. थोडे दिवस..

नैतिक : हम्म बघतो.. तु आधी इथुन बाहेर चल बघु.. ह्याच्या जवळ एवढ मोठं मोठ्याने नको बोलुस..

रॉबिन : विर ह्याच्या जवळ बस बोललाय.. म्हणजे डॉक्टर तसे बोललेत..

नैतिक : हा शुद्धीवर कधी येईल.?? 

काल पर्यंत यायला.... रॉबिनच लक्ष वृषभकडे जात आणि रॉबिन बोलता बोलता मध्येच थांबतो.. वृषभने डोळे उघडले असतात..

ए नैतिक ह्याने डोळे उघडलेत.. ए वृषभ तु उठलास मग मला आवाज का नाही दिलास यार.. ए नैतिक आपला वृषभ बरा झाला यार.. रॉबिन खुश होतच नैतिकला बोलतो..

वृषभला डाव्या हातावर झोपवल्यामुळे नैतिकला त्याचा चेहरा दिसत नसतो.. तो रॉबिनजवळ येतो आणि बघतो तर खरच वृषभने डोळे उघडले असतात.. 

हा यार.. नैतिक खुश होतच रॉबिनला मिठी मारत बोलतो.. दोघेही खुश होतात पण काही वेळाने रॉबिनचा हसणार चेहरा मात्र गंभीर होतो.. नैतिकला बाजुला ढकलत तो परत चेअरवर बसतो..

रॉबिन : वृषभ..

रॉबिन वृषभच्या डोळ्यांसमोरून हात फिरवतो.. त्याच्या डोळ्यांची पापणी काही मिटत नसते..

दोघेही घाबरत एकमेकांकडे बघतात.. नैतिक पळतच डॉक्टरांना बोलवायला निघुन जातो..

ए वृषभ.. बोल ना माझ्याशी.. वृषभ... रॉबिन जोरातच त्याच्यावर ओरडत त्याच्या गालावर मारतच त्याला बोलतो.. पण वृषभ फक्त एकटक कुठे तरी बघत असतो... तो काहीच रिस्पॉन्स करत नसतो..

तीन डॉक्टर वृषभच्या रूममध्ये येतात.. रॉबिनला बाहेर जायला सांगता.. रॉबिन काही बाहेर जात नाही हे बघुन नैतिक जबरदस्ती त्याला पकडत बाहेर घेऊन जातो.. रॉबिन रडतच वृषभकडे बघत असतो आणि तसाच बाहेर पडतो..

नैतिक लगेच विराजला फोन लावुन वृषभ बद्दल कळवतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये बोलवुन घेतो..

रॉबिन आपले हात जोडुन घुडघ्यावर बसतो.. डोळे मिटुन तो त्याच्या गॉडकडे वृषभसाठी प्रार्थना करू लागतो.. डोळ्यांतुन पाणी येतच असत त्याच्या..

Oh Jesus please Heal my friend who is ill, Request You to comfort him from his sick bed and ease his suffering. I beg front of You as no healing is too hard or impossible for U God. Therefore I pray to U to bless my friend with your loving care, blessings and give him strength God forgive him for his any misbehave actions.. amin

त्याच अस वागणं नैतिक बघतच रहातो.. रॉबिनला अस रडताना वैगेरे त्याने कधी बघितलंच नसत..

प्रार्थना करून होताच तो ICU रूमच्या दरवाजाला असलेल्या काचेतून डॉक्टरांच काय चालु असत ते बघत असतो..

नैतिक : रॉबिन.. तु अस रडु नको ना यार. आपल्या ग्रुपमध्ये तुच एक स्ट्रॉंग आहेस यार.. तुला अस रडताना बघुन माझ्यातला कॉन्फिडेंट निघुन जातोय रे.. प्लिज तु रडणं थांबव.. पॉझिटिव्ह रहा बघु.. 

रॉबिन : काय पॉझिटिव्ह राहु.. तो कोमात गेलाय.. आत्ता डॉक्टर बाहेर येऊन तेच सांगतील. माझा ग्रॅंडप्पा कोमात गेलेला तेव्हा असाच एकटक बघत होता यार.. हा वृषभ पण असाच बघतोय.. मगाशी डोळे उघडे बोललो ना त्याला तर माझ्यासाठी डोळे उघडले यार त्याने बट त्यानंतर माझ्याशी बोल बोललो तर बोलतच नाही.. त्याची प्रत्येक गोष्ट मी ऐकली.. तुला पण माहितीना माझं लाईफमध्ये काहीच ठरत नव्हतं.. हा मला बोलला तु RJ बनु शकतोस.. छान एंकर होऊ शकतोस..  तु आमच्यासोबत असलास की आमचं मस्त एंटरटेनमेंट करतोस.. तुझं टेलेंट तु सगळ्या जगाला दाखव.. DRPM एडमिशनसाठी माझ्या घरी येऊन जबरदस्ती मला घेऊन गेला हा मुलगा.. मी काही सिरीयसली घेत नाही म्हटलं तर स्वतः फिस भरली ह्याने माझी.. ऐकतच नव्हता.. जास्तच दादागिरी करत होता यार.. मला नव्हतं अस काही करायचं आणि मॅन म्हणजे अस काही असत हे मला माहिती पण नव्हतं.. बट हळुहळु इंटरेस्ट येऊ लागला मला. आज ना उद्या मला RJ बनुन दाखव अस नेहमी बोलायचा तो. मला पण RJ बनावस वाटु लागलं.. मी स्वतःहुन काही तरी करतोय म्हटलं तर घरचे पण खुप खुश होते माझ्यावर.. ज्यो तर स्वप्नच बघतेय मी कधी RJ बनतोय त्याची.. वृषभच ऐकलं म्हणुन करिअर सेट होईल माझं अस वाटु लागलं मला.. साईड बाय साईड  PGDRBM (Post Graduation Diploma in Radio and Broadcast Management)  पण कर बोलला.. बट तो त्याच्या घराच्या गोंधळात बिझी झाला.. मग मी ज्यो सोबत जाऊन त्यात पण एडमिशन घेतलं.. म्हणजे मी त्याच सगळं ऐकलंना.. लाईफचा सगळयात मोठा असा डिसीजन मी त्याच्या मर्जी नुसार घेतलाय.  मग त्याने पण माझं ऐकायला पाहिजे आत्ता.. 

नैतिक : तुझं काही ऐकायला तो शुद्धीत आहे का रॉबिन?? काय वेड्यासारखं बोलतोयस??

रॉबिन : मी वेडाच आहे.. आणि मी असाच रहाणार आणि असच वागणार आणि असच बोलणार.. डॉक्टर जर बोलले ना तो कोमात गेलाय मग आज पासुन मी त्याने मला जे करायला सांगितलेल ते मी नाही करणार.. तो माझं ऐकणार नाही मी त्याच ऐकणार नाही. त्याला मला RJ झालेलं बघायच.. आणि मला त्याला बर झालेलं बघायचंय. 

नैतिक : तो बरा होईल.. तु निगेटीव्ह बोलु नकोस.. तुला निगेटीव्ह काही बोलायच असेल तर घरी जा.. तस पण लेक्चरला जायचय ना तुला जा बघु..

रॉबिन : हा बरा होणार नाही तोपर्यंत मी लेक्चर वैगेरे अटेंड करणार नाही.

रॉबिन आपलं काही ऐकणार नाही म्हणुन नैतिकसुद्धा रॉबिनला समजवायच्या भानगडीत पडत नाही.. डॉक्टर वृषभच्या रूममधुन ये जा करत असतात.. रॉबिन आणि कार्तिक एका बाकड्यावर बसुन डॉक्टरांच काय चालु आहे ते बघत असतात..

थोड्याच वेळात विराज पण तिथे येतो.. 

विराज : काय बोलले डॉक्टर??

नैतिक : अजुन काहीच नाही बोलले.. 

विराज : रॉबिन तु अस रडतोस का??

रॉबिन : वृषभ कोमामध्ये गेलाय.. 

विराज : व्हॉट ! (रॉबिन अस बोलताच विराज घाबरून जातो)

नैतिक : अस हा बोलतोयस.. डॉक्टर अजुन काहीच बोलले नाहीत.. रॉबिन प्लिज गप्प बस ना.. उगाच नको ते का बोलतोयस..

रॉबिन : विर तो कोमामध्येच गेलाय.. मी हे सगळं ह्या आधी पण पाहिलय.. डॉक्टर त्याला एक्सामाईन करतायत तो पर्मनंट कोमा मध्ये आहे की टेम्परेरी कोमामध्ये.. आणि त्या आधी ते ब्रेन एक्सामाईन करतील.. ब्रेन प्रॉपरली वर्किंग करतोय का?? जर टेम्पररी कोमामध्ये असेल तर तो आपलं बोलणं ऐकु शकतो बट रिएक्ट नाही होऊ शकत.. पर्मनंट कोमा मध्ये असता तर असे डोळे उघडलेच नसते.. डॉक्टर बोललेले होते माझे ग्रॅण्डप्पा कोमातून येतील बाहेर बट मॉर देन फॉर इयर्स झाले ते काही बाहेर आलेच नाहीत.. 

(रॉबिनच अस बोलणं ऐकुन विराज आणि नैतिक दोघेही घाबरून जातात...)

दोघेही शांत बसुन असतात.. जवळपास अर्ध्या तासाने डॉक्टर विराजला त्यांच्या केबिनमध्ये बोलवुन घेतात..

डॉक्टर : ज्याची भीती होती तेच झालंय.. पेशन्ट कोमामध्ये आहे.. बट घाबरण्यासारख काही नाही अस सध्या मी बोलेल.. मुळात एवढी मोठी सर्जेरी त्याच्या ब्रेन वर होऊन त्याचा मेंदू पूर्णपणे सक्षम आहे.. तो वर्क करतोय.. म्हणजे पेशन्ट ब्रेन डॅड नाही ही एक पॉझिटीव्ह बाब आहे अस म्हणायला काही हरकत नाही.. त्याचे कोमामधून बाहेर येण्याचे चान्सेस 30% आहेत अस मी ह्या क्षणाला म्हणेल त्याने आत्ता फक्त त्याचे डोळे उघडलेत.. आपण जे काही बोलतोय ते तो ऐकतोय.. बट त्याला रिस्पॉन्स करायला जमत नाही हे.. ह्याला कोमा म्हणतात.. ह्यातुन बाहेर यायला त्याला किती टाईम, किती दिवस, किती महिने किंवा किती इयर्स लागतील हे मी नाही सांगु शकत.. कारण सर्जरी होऊन 72 तास झालेत.. आपला मेंदू एक प्रकारे सॉकेट असतो.. तोच आपल्या सगळ्या ऑर्गन्सला इन्स्ट्रक्शन देत असतो.. आणि आपले ऑर्गन्स ते फॉलो करत असतात. The brain is one of the largest and most complex organs in the human body. तोच 72 तास बंद होता.. एवढी मोठी सर्जरी होऊन पुन्हा सगळं नॉर्मल व्हायला खूप वेळ लागेल.. आपण ह्या क्षणाला अजुन पेशन्ट मध्ये काय काय सुधारणा आपल्याला दिसतायत ते बघुयात.. त्यानुसार आपण त्यावर ट्रिटमेंट करू.. डॉक्टर के आर वैद्य म्हणुन खुप मोठे न्यूरॉलॉजिस्ट आहेत.. मी ह्या केज साठी त्यांना खास अपॉइंट केलय.. ते सध्या UK ला आहेत.. म्हणजे आज रात्रीच ते इंडियात येतील.. आणि माझे खास मित्र असल्यामुळे माझ्या एका शब्दा खातर ते उद्याच इथे यायला तैयार झालेत.. ते सुद्धा पेशन्टला एक्सामाईन करतील.  ही केज मी त्यांच्याकडे मुव्ह करतो.. कारण त्यांनी ह्या आधी अशी केज हँडल केलीय.. 

विराज : तुम्हांला जे योग्य वाटत ते करा.. बट तो बरा होईलना??

डॉक्टर : मी ह्या वेळेला फक्त एवढंच सांगेल कि आपण पॉझिटिव्ह राहुयात.. डॉक्टर वैद्य आणि मी पुन्हा एकदा पेशन्टच्या काही टेस्ट करु आणि मग आमचा फायनल डिसीजन तुला सांगु.. पेशन्ट रिस्पॉन्स तर करतोय.. बट कोमा मधुन बाहेर येणं आणि पहिल्यासारखी लाईफ स्टाईल जगणं हे खुप डीफिकल्ट असत.. 

विराजला डॉक्टरांना काय बोलावं ते कळत नसत.. तो ओके बोलुन डॉक्टरांच्या केबिन बाहेर पडतो.. विराज आल्या आल्या रॉबिन आणि नैतिक त्याला डॉक्टर काय बोलले ते विचारतात..,

विराज : रॉबिन तु बोलतोस तस काहीच नाही आहे.. उगाच नको ते बोलु नकोस.. आणि रडु तर अजिबात नकोस.. मोठी सर्जेरी झालीय म्हणुन थोडं उशिरा रिस्पॉन्स करेल तो..

रॉबिन : नक्की ना??(रॉबिन आपले डोळे पुसतच विराजला विचारतो)

विराज : हम्मम.. (विराजला खोट बोलायला खर तर होत नसत बट रॉबिन अस रडतोय म्हटलं तर त्याचा पण नाईलाज होतो.. )

मी आलोच अस बोलत विराज वृषभच्या रूममध्ये शिरतो..

वृषभला आत्ता सरळ झोपवलं असत.. पण एकटक कुठे तरी तो बघत असतो.. डोळ्यांत प्राणच नाहीत असे त्याचे डोळे दिसत असतात.. चेहऱ्यावर कसलेच हाव भाव नसतात. ऑक्सिजन मास्क अजूनही तसच नाकावर लावलं असत त्याच्या..

विराज : वृषभ स्वराज सारख तु पण मला सोडुन नको जाऊस.. प्लिज.. wake up.. तुझ्या आई पप्पांना काय सांगु मी?? मला खोट बोलायला नाही आवडत रे.. रोज खोटं बोलतोय मी त्यांच्यासोबत आणि तुझ्या मित्रांसोबत सुद्धा.. अजुन खोटं नाही बोलता येत आहे मला.. प्लिज तु बरा हो.. तु खुप स्ट्रॉंग आहेस.. आय नॉ.. थोडी हिंमत कर.. आई पप्पांना घेऊन तुला तुझ्या घरी राहायचय ना?? 

विराज डोळ्यांवर हात ठेवत रडु लागतो..

विर... (कोणी तरी आवाज देत.. विराजला वाटत की वृषभनेच त्याला आवाज दिला.. डोळ्यांवरचा हात काढुन वृषभकडे बघतो तर तो एकटक कुठे तरी बघतच असतो..)

ए विर... रॉबिन वृषभच्या रुममध्ये येत पुन्हा विराजला आवाज देतो.. 

रॉबिन आलाय हे बघुन विराज लगेच आपले डोळे पुसतो..

विराज : काय झालं..??

रॉबिन : बाहेर ये ना.. ते ती पिऊ आलीय.. तिला भेटायचंय त्याला.. 

विराज काहीही न बोलता रुम बाहेर पडतो.. 

रॉबिन पिऊला आत जायला सांगतो..

पिऊ चेअर घेऊन वृषभच्या बाजुला बसते... खुप वेळ ती त्याच्याकडे बघत रहाते.. आपली नजर त्याच्यावर फिरवते.. अजुन कुठे कुठे लागलंय हे ती बघत असते. सलाईन लावुन हात अगदी सुजुन गेलेला त्याचा.. त्याचा हात आपल्या नाजुक अश्या हातात ती पकडते.. तिला रडु आवरत नसत..

पियुषी : मी तुला फोन नाही केला म्हणुन रागवलास ना माझ्यावर?? I Am Sorry.. पण तुच बोलला होतास ना घरी असताना फोन नको करत जाऊस.. जास्त रिस्क नको घेऊस.. 31स्टच्या रात्री दादा घरी होता रे अभ्यास करत.. आणि माझा मोबाईल पण त्याच्या जवळच होता.. मला पण तुला न्यु इयर वीश करायला फोन करायचा होता.. दादाकडुन मोबाईल मागितला तर ओरडायला लागला. एवढ्या रात्री फोन कश्याला हवाय म्हणुन विचारू लागला.. रात्री साडे तीन वाजता तो झोपला.. तो झोपला ह्याची खात्री झाली तस त्याच्या जवळचा माझा मोबाईल मी हळुच काढुन घेतला आणि तुला लगेच कॉल पण केला मी वृषभ बट तु उचलला नाहीस माझा फोन.. त्यानंतर दोन दिवस तुला सॉरी बोलायसाठी फोन करतेय मी.. तुला घरची परिस्थिती सगळी माहिती असताना तु एवढं राग करतो माझा.. तुला बोलली ना मी तु माझ्यापासुन लांब राहिलास तर मला त्रास होतो खुप.. दोन दिवसांनी तुझा मॅसेज वाचुन मी किती खुश झालेली तुला नाही सांगु शकत.. तुझा मॅसेज वाचला ना तेव्हा क्लासरूममध्येच होती मी.. लेक्चर चालु होत. शेवटचे पाच मिनिटं शिल्लक होती.. तरी मी लेक्चरमधुन उठुन तुला कॉल लावला.. बट तु उचलतच नव्हतास.. मला वाटलं परत मला फोन करायला उशीर झाला म्हणुन तु माझे फोन नाही उचलत. रात्री कळलं मला तुला अस काही झालंय.. वृषभ तु माझ्यापासुन लांब गेलास तर मी पण त्याच क्षणाला स्वतःला संपवुन टाकेल एवढं तु लक्ष्यात ठेव. आणि माझं हे बोलणं तु सगळं ऐकतोयस मला माहितीय.. तेवढं तर मी तुला ओळखतेय.. 

एवढं बोलेपर्यंत पिऊचा कंठ दाटुन येतो.. पिऊ खुप रडु लागते.. रॉबिन बाहेरून पिऊच काय चालु आहे ते बघत असतो.. तिला अस रडताना बघुन तो आपल्या बहिणीला आत पाठवतो..

जेनी आत येताच पिऊ तिला मिठी मारत रडते..

जेनी : पिऊ शांत हो बघु..

पिऊ : न्यु इयरला आपल्या नात्याची नव्याने सुरुवात करू अस प्रॉमिज ह्याने मला केलेलं ग.. नात्याची काही सुरुवात करायला माझ्याशी बोलायला तरी पाहिजे ना. किती दिवस झाले ह्याचा सादा आवाज पण नाही मी ऐकलाय.. हा पण दादा सारखच वागतोय माझ्याशी.. तो पण स्वतःचाच विचार करतो आणि आत्ता हा पण.. ह्याला काही झालं तर मी नाही जगणार.. मी नाही ह्याला अस बघु शकत.. ह्याला सांग ना उठायला. वृषभ कुठे बघतोयस तु.. एकदा माझ्याकडे बघुन बोल तरी प्लिज.. 

जेनी : पिऊ तु चल इथुन तुझा दादा येईल आत्ता.. प्लिज तो यायच्या आत चल..

पिऊ : वृषभ प्लिज उठ.. तु खुप काही प्रॉमिजेस केलेस मला.. तु अस नाही वागु शकत माझ्याशी.

पिऊ चल इथुन.. जेनी जबरदस्ती पिऊला तिथुन घेऊन जाते.. 

रॉबिन : पिऊ डॉक्टरांनी वृषभसमोर रडायला नाही सांगितलंय.. आणि तु त्याच्या समोर रडत होतीस.. त्याला त्रास होईल आत्ता.. नैतिक डॉक्टरांना सांगाव लागेल ना पेशन्टचे नातेवाईक त्याच्या समोर रडले म्हणुन..

रॉबिन अस बोलताच पिऊ घाबरतच नैतिककडे बघते.

नैतिक : सांगाव तर लागेलच.. बट तिला माहिती नव्हत का?? 

रॉबिन : पिऊ आर्यन तुला अस काही बोलला नाही का??

पिऊ आपले डोळे पुसतच नकारार्थी मान हलवत रॉबिनला नाही म्हणुन बोलते..

रॉबिन : अस कस नाही बोलला तो.. एवढी इंपोर्टन्ट गोष्ट तुला सांगायला कस काय तो विसरू शकतो.. येऊ दे त्याला बघतोच मी.. तुला अस रडताना बघुन वृषभला काही झालं मग.. कोण जबाबदार राहील त्याला.. नैतिक आज ह्या आर्यनकडे बघुयाच जरा..

पिऊ : दादाला माहिती नाही मी इथे येतेय ते.. प्लिज त्याला बोलु नकोस अस.. आत्ता नाही रडणार मी त्याच्या समोर.. त्याला अस बघुन मला त्रास होत होता म्हणुन ते..

रॉबिन : नक्की परत नाही ना रडणार??

पिऊ : हम्मम..

रॉबिन : उद्या येणार आहेस त्याला भेटायला??

पिऊ : मी रोज येणार.

रॉबिन : परत सांगतोय जर अस रडणार असशील तर येऊ नकोस.. वृषभला त्रास होईल..

पिऊ : नाही रडणार बोलली ना मी.. मला नव्हतं माहिती डॉक्टर अस काही बोललेत ते.. आणि मी मुद्दामुन नाही रडली.. i am sorry. (पिऊ रडतच रॉबिनला बालते)

नैतिक : ए रॉबिन आत्ता तु का रडवतोयस तिला.. ती बोलली ना आत्ता नाही रडणार.. बस ना.. का तेच तेच लावलयस तु..?

रॉबिन : ए पिऊ.. तु रडणं थांबव बघु.. मी फक्त कन्फर्म करत होतो ग.. आणि तो हिटलर यायच्या आत आपण निघुयात इथुन..

(विराज रॉबिनला पिऊची अशी समजुत काढताना बघतच रहातो..)

विर तो आर्यन इथे यायच्या आत मी हिला घरी सोडतो.. आणि मी रात्री येतो.. चालेल ना??

विराज : हो चालेल.. नैतिक तु पण जा.. मी आहे इथे..

नैतिक : नाही नको.. मी थांबतो इथे.. 

रॉबिन : चल ना नैतिक.. उद्या सेटरडे आहे तस पण.. आत्ता आर्यन आणि महेश पण येतील..

रॉबिन जबरदस्ती करत नैतिकला आपल्यासोबत घेऊन जातो.. चौघेही गेट बाहेर पडायला आणि समोर आर्यन आणि महेश हजर रहायला..

आर्यनला बघुन पिऊ खुप घाबरून जाते.. हात सुद्धा तिचे थरथर कापु लागतात..

आर्यन : तु इथे काय करतेयस??

(पिऊ खुप वेळ त्याच्याकडे बघतच रहाते..)

इथे काय करतेयस तु पिऊ?? आर्यन तिच्याजवळ येतच तिला विचारतो..

पिऊ : वृषभला बघायला आलेली.. जेनी होती ना सोबत.. तिला पण बघायच होत.. आणि लेक्चर पण होत नव्हते ना.. मग घरी येता येता हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊयात अस ठरलं आमच..

आर्यन : कॉलेजमधून निघाल्यावर मला मॅसेज का नाही केलास तु??

विसरली.. सॉरी.. (पिऊ आधीच वृषभला अस बघुन आतुन हळवी झाली असते.. त्यात आर्यनला बघुन तिला तीच रडु आवरता येत नाही.. ती रडतच आर्यनला बोलते..)

आर्यन : रडायला काय झालं??

पिऊ डोळे पुसत मानेनेच काही नाही बोलते..

रॉबिन : आर्यन शेम ऑन यु यार.. बहिणीला अस कोण रडवत का?? 

नैतिक : बघ तर..

आर्यन : मी काय केलं.. पिऊ तु कॉलेज मधुन निघाल्यावर नेहमी मला मॅसेज करतेस ना.. म्हणुन मी विचारलं.. (पिऊचे डोळे पुसतच आर्यन तिला बोलतो)

पिऊ : तु मला आणायला येतोस मग तुला त्रास होतो ना.. त्यात तुला हॉस्पिटलमध्ये पण थांबायचं असत.. अभ्यास पण असतो.. तुझं कॉलेज पण असत.. म्हणुन मी विचार केला थोडे दिवस माझं मी घरी येईल.. म्हणजे माझा तुला त्रास नको ना..

आर्यन : एक अशी देईल ना मी तुला परत अस काही बोललीस तर... तु माझ्यासाठी माझं छोटस पिल्लु.. मला तुझा त्रास कधीच नाही होणार.. फक्त तु मला त्रास होईल अस कधी वागु नकोस आणि परत एकदा सांगतोय कॉलेज सुटल्यावर सरळ घरी यायच.. इथे तिथे मला न सांगता तु फिरत नको बसुस.. मला टेन्शन येत.. 

पिऊ : सॉरी.. 

आर्यन : सॉरी बोलतेस आणि परत तसच वागतेस तु.. आत्ता काही बोललो की अजुन रडायला लागशील तु.. आणि हे लोक मलाच बोलतील..

रॉबिन : आर्यन तो वृषभ तुझी वाट बघतोय रे..
(विषय बदलावा म्हणुन रॉबिन बोलतो)

आर्यन : डोळे उघडलेत ना त्याने. नैतिक बोलला मला.

रॉबिन : हम्मम.. आत्ता आम्ही निघु?? मला खुप झोप येतेय यार.. रात्री येतो मी..

महेश : नऊ वाजता ये..

रॉबिन : ओके बॉस.. बाय बोथ ऑफ यु..

महेश : ए मॅन गोष्ट तर राहिली.. उद्या SD येतोय.. त्याला कस काय हँडल करायचं??

आर्यन : ते उद्याच उद्या बघु.. आणि नको ते टेन्शन नको घेऊस..  गाईज बाय.. पिऊ घरी पोहचली की मला मॅसेज कर.. 

पिऊ : हम्मम.. बाय..

सकाळचे 9 वाजले असतात.. शौर्यच विमान फायनली इंडियात लॅंड होत.. घरच्यांपासुन शौर्यने लपवल असत बट गाथापासुन त्याने काहीच लपवल नसत.. शौर्य इंडियात येणार म्हटलं तर सकाळी 8 वाजल्यापासूनच ती एअरपोर्टवर शौर्यची वाट बघत बसली असते.. सोबत रॉबिन आणि ज्योसलीन पण असतात.. आणि फायनली शौर्य आणि गाथा एकमेकांसमोर येतात.. एकमेकांना अस समोरा समोर बघुन गोड अस हसु येत त्यांच्या चेहऱ्यावर.. गाथाजवळ जात शौर्य तिला घट्ट अशी मिठी मारतो.. गाथासुद्धा आपले दोन्ही हात त्याच्या पाठी भोवती नेत त्याने मारलेली मिठी घट्ट करते..

गाथा : I miss you lot..

शौर्य : Me too..

गाथा : खुप रडलायस ना??

शौर्य मानेनेच नाही बोलतो बट गाथाने अजुन काही विचारलं तर परत रडु येईल म्हणुन तो बाजुलाच उभ्या असलेल्या रॉबिनला मिठी मारत भेटतो..

शौर्य :  वृषभ कसा आहे??

गाथा : शौर्य डोन्ट वरी.. तो ठिक आहे.. तु आलायस ना आत्ता मग तो अजुन ठिक होईल.. आणि मॅन म्हणजे त्याच स्कोरिंग मॉर देन 8 आहे.. तो थोडा फार रिस्पॉन्स करतोय.. त्याला आपण जे काही बोलतो ते ऐकायला जातंय.. तो कोमात आहे बट तो जस रिस्पॉन्स करतोय त्यामुळे तो लवकरच बरा होईल

(गाथा अस बोलताच रॉबिन आणि ज्योसलीन तिच्याकडे बघु लागतात)

रॉबिन : विर खोटं बोलला ना मला.. विरला बघतोच मी आत्ता..

ज्योसलीन : रॉब प्लिज.. 

शौर्य : नक्की काय झालंय त्याला??

गाथा : नक्की काय झालंय हे  मला तुला एक्सप्लॅन करायला खुप वेळ जाईलरे.. ती एक प्रकारे डॉक्टर लॅंग्वेज आहे.. तु हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळेल तुला.. आणि रॉबिन प्लिज जिजूंना काही बोलु नकोस.. तुम्ही सगळे टेन्शन घ्याल.. आणि शौर्यला कळवाल म्हणुन मे बी त्यांनी काही तरी खोटं सांगितलं असेल तुम्हाला.. प्लिज अश्या परिस्थितीत एकमेकांवर चिडुन काहीच भेटणार नाही ना..

रॉबिन : हम्मम नाही चिडत. शौर्य आधी फ्रेश हो बघु तु.. ट्रेव्हेलिंग करून दमला असशील ना..

शौर्य : मी आधी वृषभला भेटेल मगच फ्रेश वैगेरे होईल..

रॉबिन : चल मग हॉस्पिटलमध्ये.. वृषभ सोबत तुझ्या विरला पण भेट.. मग इंडियात त्याला न सांगता आलायस म्हणुन तुला स्पेसिअल अस गिफ्ट पण तो देईल.. 

शौर्य : विर हॉस्पिटलमध्ये आहे..??

ज्योसलीन : आज सेटरडे आहे ना शौर्य.. तो दिवसभर तिथेच रहाणार बोललाय..

रॉबिन : तु घरी तरी चल.. विरला हॉस्पिटलमधुन घरी कस पाठवायच ते आपली गॅंग बघेल रे.. डोन्ट वरी..

सगळे मिळुन रॉबिनच्या घरी जातात..

शनिवार असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये विराज आणि काकापण आलेले असतात.. शौर्यला वृषभला भेटायला कस आणायच ह्याचाच विचार नैतिक आणि प्रतीक करत असतात.. 

नैतिक : विर तु आणि काका घरी जाऊन आराम करा ना.. संध्याकाळी या ना तुम्ही दोघ.. आत्ता आर्यन आणि महेश पण येतील म्हणुन बोलतोय.. सगळेच इथे थांबुन काय करणार..

विराज : डॉक्टर वैद्य येणार आहेत ना आज. 

नैतिक : ते आले की आम्ही तुला बोलवुन घेऊ.. आणि एवढ्या लवकर डॉक्टर येतील अस मला नाही वाटत..

प्रतीक : हो ना मला पण असच वाटत. विर तु आराम कर बघु.. काल पण रात्री उशिरा पर्यंत तु इथे होतास अस रॉबिन बोलला आम्हांला..

विराजला पण त्याच म्हणणं पटत.. तो काकाला घेऊन घरी जायला निघतो..

प्रतीक : विर तु इथे यायला निघालास की मला फोन कर..

विराज : कश्यासाठी??

प्रतीक : कश्यासाठी नैतिक?? 

नैतिक : ते तु जस इथे यायला निघशील तस आर्यन घरी जाईल.. एक्साम चालु आहे ना त्याची.. म्हणून बोलतोय तो..

प्रतीक : हो ना. 

विराज : मग मी इथेच थांबतो.. त्याला सांग अभ्यास करायला..

नैतिक : आजचा दिवस येऊ दे त्याला.. नाही तर त्याच अभ्यासात लक्ष लागणार नाही.. 

अच्छा?? विराज संशयी नजरेने त्यांच्याकडे बघतच बोलतो..

प्रतीक : अस का बघतोयस??

विराज : तुम्ही दोघ काय बोलतायत ते तुमच तुम्हांला तरी कळतंय का??

नैतिक : तुला कळलं मग बस झाल.. तु जा बघु इथुन.. बट घरुन निघताना आम्हाला फोन कर..

विराज : हम्मम..

विराज काकाला घेऊन तिथुन निघुन जातो.. 

नैतिक लगेच रॉबिनला कॉल करून शौर्यला हॉस्पिटलमध्ये घेऊन यायला सांगतो..

काका शौर्यने कॉल उचलला का तुझा?? म्हणजे त्याला फोन लागतोय का?? मी सकाळपासुन त्याला फोन लावलाच नाही.. विराज गाडीत बसल्या बसल्या काका विचारतो..

काका : आत्ता लागतोय बट उचलत नाही तो.. म्हणजे तीन दिवसांपासुन तो आमचे कोणाचेच फोन उचलत नाही.. फक्त तुझेच उचलतोय.. मी वहिनीच्या पुढ्यात त्याला बोललो की मोबाईलसाठी पैसे नाही देणार. बट नंतर त्याला पैसे द्यायसाठी कॉल करत होतो तर उचलतच नव्हता. 

विराज : दोन दिवसांपुर्वी माझ्याकडे 85000 मगितलेले.. मी वृषभच्या गडबडीत त्याला कश्याला हवे ते न विचारता पैसे पाठवले.. मला अस वाटतय हा बहुतेक इंडियात आला असणार.. त्यासाठी पैसे मागत होता तो..

काका : इंडियात येण्यासाठी पैसे नको होते त्याला.. न्यु मोबाईल हवा होता.. त्यासाठी पैसे हवे होते.. त्यादिवशी वहिनीच्या आणि माझ्या मागे लागलेला.. बट वहिनीने त्याच्या पुढ्यातच पैसे द्यायचे नाहीत अशी वोर्निंग दिलेली..

विराज : पक्का मोबाईलसाठीच हवे होते ना पैसे.

काका : हो.. बट आत्ता तुझ्या मम्माला कळलं की तु त्याला मोबाईलसाठी पैसे दिलेस तर तुझं काही खर नाही.. 

विराज : तस पण शौर्यला जास्तच लाडवून ठेवलंय म्हणुन मम्मा वरच्यावर ओरडत असतेच मला.. तु सांग मी त्याचे लाड नाही करणार तर कोण करणार.. मम्माला कळतच नाही ते.. 
 
काका : शौर्य तुला त्याचा बाबा बोलतो ते काही चुकीच नाही हा विराज.. दादा पण तो जे बोलेल ते त्याच्यासाठी हजर करायचा.. तु पण तसाच आहेस.. 

काका अस बोलताच विराजच्या ओठांवर गोड अस हसु येत. विराज आपली गाडी घराच्या दिशेने वळवतो..

इथे पिऊ पण नेहमीच्या वेळेत वृषभला भेटायला येते.. कालच्या सारख चेअर घेऊन त्याच्या बाजुला बसते.. नेहमी प्रमाणे त्याचा हात आपल्या हातात पकडुन एकटीच त्याच्यासोबत गप्पा मारत असते..

जेनी बाहेरच उभी राहुन मोबाईलमध्ये काही तरी करत असते..

ओहहह शट... प्रतीक अस बोलताच.. सगळे त्याच्याकडे बघु लागतात..

जेनीच्या हातातुन मोबाईलच खाली पडतो.. कारण लांबुन आर्यन महेशसोबत बोलत येताना त्याला दिसतो.. 

नैतिक : हा आज एवढ्या लवकर का आला?? ह्या महेशला पण अक्कल नाही.. एक फोन करू शकत होताना.. 

जेनी : आज पिऊच काही खर नाही..

नैतिक : मला पण तेच वाटतंय.. प्रतीक हँडल हिम.. त्याला तिथेच थांबव.. जेनी तु पिऊला घेऊन पळ बघु इथुन..

प्रतीक पळतच आर्यन आणि महेश जवळ जातो.. तो आर्यनला आपल्यासोबत परत बाहेर घेऊन जायला निघणार तोच आर्यनच लक्ष जेनीवर जात.. जेनी आपला खाली पडलेला मोबाईल उचलत असते.. आर्यन प्रतीकला बाजूला करत पटापट आपली पाऊल वृषभच्या रूमच्या दिशेने वळवतो.. प्रतीक आणि नैतिक दोघेही मिळुन त्याला अडवत असतात बट तो ऐकत नसतो.. तो दोघांनाही बाजुला करत ICU रूमच्या बाहेरूनच आत नजर फिरवतो.. आतमध्ये पिऊ वृषभचा हात आपल्या हातात पकडुन त्याच्याशी बोलत असताना त्याला दिसते..

तो आपल्या मित्र मंडळींना रागातच बाजुला ढकलत आत जातो..

पिऊ.. जोरातच तो ओरडतो.. 

पिऊ चेअरवरची उठुन उभी रहात आर्यनकडे बघु लागते..

आर्यन : काय चाललंय तुझं??

वृषभचा पकडलेला हात ती अलगद खाली ठेवते.. आर्यन समोर मान खाली घालुन बसते..

नैतिक : आर्यन प्लिज शांत हो..

आर्यन : नैतिक don't touch me.. stay far.. 

आर्यन अस बोलताच नैतिक लांब उभं राहतो.. 

पिऊ तु इथे काय करतेयस.. (पिऊ शांत बसुन असते) मी शांत पणे विचारतोय.. अन्सर मी फास्ट..

पिऊ : वृषभला बघायला आलेली मी..

आर्यन : काल बघुन गेलेलीस ना?? गेलेलीस की नाही..?? मग आज परत काय तुझं इथे??

पिऊ : सॉरी.. (पिऊ रडु लागते)

आर्यन : अजुन मी तुला काही केलं नाही आहे हा. उगाच रडुन नको दाखवुस मला.. जर उगाच रडुन दाखवलस तर मी खरच काही तरी करेल..

पिऊ घाबरतच डोळे पुसुन शांत उभी रहाते.. 

काल समजवलना मी तुला मला न सांगता कॉलेज बाहेर फिरू नकोस.. समजवलेलं की नाही..??

नैतिक : आर्यन हळु यार आणि बाहेर चल बघु इथुन.. बाहेर शांतपणे बोल तिच्याशी..

आर्यन : ए नैतिक तु मध्ये नाही हा बोलायच.. आणि मी इथेच बोलणार. पिऊ अस हातात हात पकडुन तु त्याला भेटणार??

पिऊ : सॉरी..

आर्यन : काय चाललं होत तुझं?? (पिऊ शांत बसते तस आर्यन परत ओरडतो तिच्यावर) मी काही तरी विचारतोय तुला.. काय चाललंय तुझं??

पिऊ : काही नाही.. 

आर्यन : कॉलेजमध्ये गेलेलीस?? (आर्यन हातातील घड्याळात बघतच पिऊला विचारतो)

पिऊ : हम्मम.. लेक्चर नव्हते होत..

आत्ता 11 वाजलेत.. तु किती वाजता कॉलेजला गेलेलीस?? खोटं बोलतेस तु माझ्याशी.. इथे ह्याचा हात पकडायला येतेस तु.. अस बोलत आर्यन पिऊच्या गालावर हात उचलतच तिला बोलतो..

दादा सॉरी.. पिऊ रडतच आर्यनला बोलते.. पण आर्यन ऐकत नसतो.. आर्यन पुन्हा तुला मारायला जाणार तस नैतिक आर्यनला पकडत शांत करत असतो.. पण आर्यन नैतिकला लांब ढकलतो आणि पुन्हा पिऊजवळ जातो.. नैतिकच लक्ष वृषभकडे जात.. वृषभच्या डोळ्यांतुन पाणी येत असत.. जोर जोरात श्वास घेण चालु होत त्याच.. ECG मॉनिटर वर त्याच्या ह्रदयाचे दिसणारे ठोके कमी कमी होत असतात..

ए आर्यन स्टॉप यार.. वृषभला त्रास होतोय.. इथे बघ.. ECG मॉनिटर कडे बोट दाखवतच नैतिक आर्यनला बोलतो. डॉक्टरांना बोलवायला पाहिजे अस बोलत नैतिक पळतच डॉक्टरांना बोलवायला जातो..

आर्यन घाबरतच ECG मशिनकडे बघतो.. उतरत्या क्रमाची आकडेवारी दिसत असते त्यावर.. 60.. 59..58...

पिऊ : वृषभ काय होतंय तुला.. (पिऊ वृषभचे डोळे पुसतच त्याला बोलते). मी नाही रडत आहे बघ.. आय एम सॉरी.. परत नाही रडत.. वृषभ प्लिज मला अस घाबरवु नकोस.. मी नाही जगु शकणार तुझ्याशिवाय.. प्लिजना वृषभ.. दादा सारख नको वागुस माझ्यासोबत. तु तरी माझ्या मनाचा विचार कर ना वृषभ. मी खरच नाही जगु शकणार तुझ्याशिवाय.. मला दादाने मारलं म्हणुन तुला त्रास झाला ना.. मला नाही लागलं वृषभ.. प्लिज शांत हो तु.. प्लिज शांत हो.. प्लिज वृषभ.. (पिऊ वृषभचा हात आपल्या हातात पकडतच त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती..) 

वृषभला अस बघुन आर्यन पण घाबरतो.. पिऊ वृषभसोबत एकटीच बोलत असते.. आर्यन वृषभकडे बघत पुन्हा ECG मशीनवर आपली नजर फिरवतो.. आकडेवारी आत्ता चढत्या क्रमाने जात होती.. आर्यन ते बघुन काहीही न बोलता ICU रूम मधुन गप्प बाहेर निघतो.. आणि बाहेर बाकड्यावर येऊन एकटाच कसला तरी विचार करत शांत बसतो.. 

नैतिक डॉक्टरांना घेऊन येतो.  डॉक्टर आत येताच पिऊ ICU रूम बाहेर निघुन येते.. आणि आर्यनच्या बाजुला जाऊन बसते.. आर्यन तिच्याशी बोलत नसतो..

शौर्य, गाथा रॉबिन आणि ज्योसलीन पण तिथे येतात..

रॉबिन : काय झालं?? 

रॉबिन पिऊकडे बघत नैतिकला विचारतो.. नैतिक इशाऱ्यानेच त्याला काही तरी सांगतो..

शौर्य : आर्यन..

(आर्यन शांत बसुन असतो)

पिऊ : दादा सॉरी..

पिऊ आर्यनचा हात पकडतच त्याला बोलते..  

आर्यन : मला दादा वैगेरे बोलायच नाही हा तु.. (पिऊचा हात झटकतच तो तिला बोलतो).. मी तुझा विचार नाही करत का?? काय बोलत होतीस आतमध्ये तु? तुझ्या जागी देवाने मला भाऊ दिला असता तर बर झालं असत अस आत्तापर्यंत नेहमीच मला वाटत आलंय.. कुठे गेल कि तुझं टेन्शन असत.. नीट असशील की नाही.. कोणी काही करणार तर ना तुला.. रात्री डोकं शांत रहावं म्हणुन झोपायला गेलो तरी तुच डोक्यात असतेस.. सादी आहेस तु त्याहुन जास्त भोळी.. कोणी काहीही बोललं लगेच पटत तुला.. अजुन नीट काही तुला कळत नाही.. तुझ्या ह्याच स्वभावाचा कोणीही गैरफायदा घेईल म्हणुन तुझ्या मागे मागे रहावं लागतय मला.. तुला कधी कसलाच त्रास होऊ नये ह्याचा विचार करत असतो मी आणि आज तु मला बोलुन दाखवतेस की मी तुझा विचार करत नाही.. शेवटी तु तेच केलंस जे मला तुझ्याकडुन एक्सेप्ट नव्हतं.. देवाने का मला हि असली बहिण दिली हेच कळत नाही मला.. जा इथुन मला नाही बोलायच तुझ्याशी.. माझ्या नजरेसमोर तर तु अजिबात यायच नाहीस. यु हर्ट मी.. प्लिज जा इथुन.. 

पिऊ : माझ्या आयुष्यातले आत्तापर्यंतचे सगळे डिसीजन तुच घेत आलायस.. मला काय पाहिजे काही नको ह्याचा विचार करतोस का तु कधी.. आत्ता पण नाही करत आहेस तु.. प्रत्येक वेळेला तुझ्या मर्जी नुसार मला जगवतोयस.. मला जशी लाईफ पाहिजे तशी तु आत्तापर्यंत जगुच दिलीस नाहीस.. बट मी आत्तापर्यंत कधीच असा विचार नाही केला की तुझ्या जागी देवाने मला मोठी बहिण द्यायला हवी होती निदान एवढे रुल एन्ड रेग्युलेशन मला फॉलो करत बसावे लागले नसते ना.. प्रत्येक गोष्ट तुझी ऐकली ना मी.. फक्त हा डिसीजन मला माझा घेऊ दे प्लिज..

आर्यन : ओके.. तु घेतला आहेसच डिसीजन मग आत्ता घेतलेला डिसीजन पप्पांसमोर बोलुन दाखव.. चल घरी..

पिऊचा हात पकडतच आर्यन तिला तिथुन घेऊन जाऊ लागतो..
 
प्रतीक : आर्यन प्लिज शांत हो यार..

प्रतीक आणि महेश आर्यनला जबरदस्ती एका बाजुला बसवतच बोलतात..

रॉबिन : आर्यन वृषभ पेक्षा चांगला मुलगा पिऊसाठी तुला शोधुन पण मिळणार नाही यार.. खुप प्रेम करतो तो तिच्यावर..

नैतिक : आर्यन वृषभ पिऊ शिवाय नाही जगणार.. आत बघितलस ना काय झालं ते.. तु पिऊला मारत होतास तर त्याला त्रास झाला.. तो कोमात आहे बट त्याला पिऊच्या फिलींग कळतायत आर्यन.. नको ना अस वागुस.. निदान ह्या सिच्युएशनला तरी नीट रहा..

आर्यन मान खाली घालुन शांत बसुन असतो..

शौर्य : आर्यन.. इथे बघ माझ्याकडे.. (शौर्य आर्यन समोर घुडघ्यावर बसतो.. आणि त्याला आपल्याकडे बघायला सांगतो.. आर्यनच्या डोळ्यांतुन पाणी येत असत..) रडण्यासारखं काहीच नाही आहे त्यात.. 

आर्यन : तुला पण पिऊ आणि वृषभबद्दल माहिती होत ना SD..?

शौर्य : ज्या दिवशी वृषभच एक्सिडेंट झालं त्या दिवशी मला तो बोलला.. वृषभ कोणाच्या तरी प्रेमात आहे हे मला कळलं होतं बट ती मुलगी पिऊ आहे हे मला चार दिवसांपूर्वीच कळलंय.. आणि वृषभ कसा आहे हे तुला पण माहिती.. तुच सांग त्याच्यापेक्षा कोणी चांगला मुलगा पिऊसाठी भेटेल का?? तु त्याचा खास मित्र आहेस ना आर्यन हा विचार करून तो पिऊपासुन लांब पळत होता रे.. (शौर्य आर्यनला वृषभ जे काही त्याला बोलला ते समजवुन सांगतो).. पिऊच्या जागी माझी साक्षी असती तर वृषभ सारख्या मुलासाठी मी लगेच हो बोललो असतो.. कारण वृषभ सारखा मुलगा मिळण खरच मुश्किल आहे आर्यन.. आपली पिऊ खुश राहील त्याच्यासोबत. मित्राला काही झालं तर त्याला त्रास होतो मग तुझ्या पिऊला जरा जरी काही झालं तर पुर्ण जग डोक्यावर घेईल तो..

आर्यन शांत बसुन असतो.. 

गाथा : आर्यन पिऊ आधीच खुप टेन्शन मध्ये आहे.. तिचा वृषभ तिच्यापासून लांब जाईल ह्या भीतीने आधीच घाबरलीय रे ती.. आत्ता तु पण तिला एवढं हर्ट करून बोलतोय.. मला बहिण नको अस तु बोललास तिला.. कस वाटलं असेल तिला सांग.. प्लिज एकदा तिच्या मनाचा विचार कर.. अशी बहीण मिळण खुप मुश्किल आहे.. 

रॉबिन : आणि त्याहुन मुश्किल तुझ्या बहिणीने स्वतःसाठी निवडलेला मुलगा.. खुप प्रेम करतो यार तो तिच्यावर.. मी स्वतः बघितलंय ते..

आर्यन पिऊकडे बघतो..

प्लिज... पिऊ त्याच्याकडे रडतच बघत त्याला बोलते.. 

ओके.. एन्ड सॉरी... तो तिला सगळ्यांसमोर घट्ट मिठी मारून बोलतो..

वृषभ आणि पिऊच्या रिलेशनशिप ला आर्यनकडून होकार मिळताच सगळे खुश होतात..

शौर्य : वृषभ कुठेय??

रॉबिन इशाऱ्यानेच शौर्यला ICU रूम दाखवतो.. आत डॉक्टर असतात.. ते वृषभला चॅक करत असतात. शौर्य बाहेर बसुन डॉक्टर कधी निघुन जातायत ह्याची वाट बघत असतो.. वृषभला स्ट्रेचर वरून कुठे तरी घेऊन जात असतात..

शौर्य : कुठे घेऊन चाललेत ह्याला??

डॉक्टर : तु शौर्यना.. खुप वेगळा दिसतोस आत्ता.. साधारण तीन चार वर्षा पुर्वी विराजसोबत आलेलास हॉस्पिटलमध्ये.. सुरजला बघायला.. आठवतय ना??(फॅमिली डॉक्टर असल्यामुळे शौर्यला ते ओळखत असतात).. 

शौर्य : अ हो.. बट तुम्ही वृषभला कुठे घेऊन चाललेत??

डॉक्टर : CT स्कॅन करावा लागेल.. त्यासाठी घेऊन चाललोय.. आणि मी विराजला बोललो होतो डॉक्टर वैद्य खुप मोठे न्यूरॉलॉजिस्ट आहेत.. काल ईव्हीनींगलाच ते UK वरून आलेत. तसही विराजला बोलवुन घेतलंय मी.. येईलच तो इतक्यात.. 

शौर्य : अच्छा.. (शौर्य घाबरतच डॉक्टरांना बोलतो आणि आपल्या फ्रेंड्सकडे बघतो)

सर... अस बोलत एक सिस्टर डॉक्टरांकडे फाईल घेऊन येते.. शौर्य आपण नंतर बोलुच..अस बोलुन डॉक्टर निघुन जातात..

सगळेच आत्ता घाबरत शौर्यकडे बघतात.. 

शौर्य : आज वृषभला भेटता येईल अस नाही वाटत मला..

रॉबिन : मला पण नाही वाटत.. ते बघ विर आला..

आज माझ काही खर नाही.. अस बोलत शौर्य तिथुन पळतच एका दरवाजा आड जाऊन लपतो..  

विराज फोनवर बोलतच शौर्यच्या मित्र मंडळींकडे येत असतो..

नैतिक : तुला आम्ही फोन करून ये बोललो ना.. 

विराज : विसरलो.. बट तुम्ही अस घाबरले का?? 

सगळे एकमेकांकडे बघतच रॉबिनकडे बघतात.. जेणेकरून तो काही सांगतो का ते बघतात..

रॉबिन : वृषभला डॉक्टर घेऊन गेलेत ना म्हणुन..

विराज : CT स्कॅन करणार आहेत फक्त.. मी आत्ता डॉक्टरांसोबतच बोलत होतो.. एवढं घाबरण्यासारख काहीच नाही त्यात.. गाथा तु कधी आलीस?? 

गाथा : जस्ट आलीय मी.. 

विराज : घरी सगळे ठिक आहेत ना??

गाथा : हो..

आर्यन : तु डॉक्टरांसोबत बोलुन घरी जाणार ना??

विराज : बघु..

रॉबिन : घरी आवडत नाही का तुला??

आर्यन : म्हणजे तु घरी रहा आणि वृषभच्या आई पप्पांकडे लक्ष दे. इथे वृषभकडे बघायला आम्ही आहोतच ना.. अस बोलायच होत त्याला.. 

विराज : काका काकी आहेत त्यांच्याकडे बघायला.. सोबत अनु पण आहे.. 

ज्योसलीन : तरी पण तु घरीच रहा.. आम्ही आहोत ना इथे..

विराज : घरी राहिलो तर अनु मला हॉस्पिटलमध्ये जा बोलते.. आणि हॉस्पिटलमध्ये आलो की तुम्ही मला घरी जा बोलतायत. मी ऎकु तर कोणाच ऐकु??

आमच.. सगळे एकत्रच बोलतात..

विराज : डॉक्टर काय बोलतायत ते बघुन येतो मी.. आणि मग जातो घरी..

नक्की ना?? (सगळेच एकत्र विचारतात आणि एकमकांकडे बघु लागतात.. म्हणेज आपण हे पण अस एकत्र बोलु अस त्यांना वाटलं नव्हत..)

विराज : हो.. (विराजला आत्ता त्यांच्या अश्या वागण्याचा संशय आला असतो.. बट विराज त्यांना तस न दाखवता शांतपणे डॉक्टरांना भेटायला निघून जातो..)

विराज तिथुन जाताच शौर्य बाहेर येतो.. थोड्याच वेळात वृषभच CT स्कॅन करून त्याला पुन्हा रुममध्ये शिफ्ट करतात..

नैतिक : ए SD तु आत्ता नको ना भेटुस त्याला.. विर यायला झालाय आत्ता.. रात्री ये तु इथे आणि हवं तेवढा वेळ भेट.. विर रात्री इथे नसतो.

शौर्य : मी रात्रीच येतो भेटायला.. बट आत्ता फक्त दोन मिनिट भेटतो आणि लगेच निघतो.. प्लिज..

शौर्य कोणाच काहीच न ऐकता वृषभला भेटायला रूममध्ये शिरतो..

वृषभला अस बघून शौर्यला रडुच येत.. 

शौर्य : वृषभ तुला मला भेटायच होत ना.. बघ मी आलो तुला भेटायला.. (शौर्यचा आवाज ऐकुन वृषभच्या डोळ्यांतुन पाणी येऊ लागत) ए वृषभ खुप त्रास होतोय का तुला?? रडु नको ना अस.. (वृषभचे डोळे पुसतच शौर्य बोलतो) मी आलोय ना आत्ता.. तु पुर्णपणे बरा झालाशिवाय USA जाणार नाही.. सगळं ठिक होणार आहे वृषभ.. मला खुप काही बोलायचंय तुझ्याशी.. बट मला आत्ता इथे जास्त थांबता नाही येणार.. घरी कोणाला न सांगता आलोयरे मी इंडियात फक्त नी फक्त तुझ्यासाठी. विर पण इथेच आहे. विरला कळलं ना मी इथे आहे मग मला सोडणार नाही तो.. मी रात्री तुला भेटायला येतो.. तु प्लिज टेन्शन नको घेऊस.. स्ट्रॉंग रहा.. बाय..

शौर्य वृषभला बाय करून तिथुन निघुन जातो..

वृषभला बोलल्याप्रमाणे रात्री विराज घरी निघुन जाताच शौर्य वृषभला भेटायला येतो.. पण वृषभच्या चेहऱ्यावर कसलेच हाव भाव नसतात.

शौर्य : वृषभ.. (शौर्य वृषभचा हात आपल्या हातात पकडतच त्याला बोलतो).. बघ मी आलोय.. तुला बोललो होतो ना रात्री येतो म्हणुन.. मला तुला मिठी मारून भेटावस वाटतंय यार.. बट तुला अस वायरी वैगेरे लावल्यात त्यामुळे तुला मिठी मारून नाही भेटता येत आहे मला.. आणि वृषभ तु गोव्याला जाऊन काहीच चुकीच नाही केलयस.. समीरा आणि तुझ्यात तु समजतोस ना तस काहीच नाही झालंय.. सगळं रोहन ने केलंय रे. त्याला तु आणि समीरा एकत्र याव अस वाटत होतं.. वेडा आहे रे तो माहिती ना तुला.. अस नको ते नेहमीच करत असतो तो. त्याला चुक आणि बरोबर नाही कळत रे.. चुकीच काही केलं की नंतर त्याला कळत की त्याने खुप मोठी चुक केलीय.. तुला अस काही झालंय हे कळल्यावर खुप ओरडलोय मी त्याला.. बट वृषभ समीराची ह्यात काहीच चुकी नाही.. अस काही रोहनने केलय हे पण तिला अजुन नाही माहितीरे.. आणि ज्या गोष्टीची खात्री नाही तुला तु त्या गोष्टीच टेन्शन घेऊन दोन दिवस रडत होतास आणि नको ते बोलत होतास.. (शौर्यच्या बोलण्यावर वृषभ काहीच रिस्पॉन्स देत नव्हता..) ए वृषभ इथे माझ्याकडे बघना यार.. तुझ्यासाठी मी एवढी मोठी रिस्क घेऊन आलोय इथे. ह्यावेळेला विर मला सोडणार नाहीरे.. इंडियात यायच नाही अशी वोर्निंग दिलीय त्याने मला.. प्लिज मी हे अस काही केलंय हे माझ्या घरी कळायच्या आत तु बरा हो यार.. आणि मला इथुन USA जाऊ दे.. तुला आवडेल का विरने मला मारलेल.. कस मारतो ते लास्ट टाईम बघितलस ना तु.. मग उठ बघु.. एटलिस्ट तु ट्राय तरी करना.. तु तुझ्या माईंडवर कन्ट्रोल करायचा प्रयत्न कर वृषभ.. बी स्ट्रॉग.. गाथा बोलली मला थोडा टाईम लागेल वृषभला बट वृषभ नक्की बरा होईल.. त्याने त्याच माईंड स्ट्रॉंग केलं पाहिजे.. हळूहळू तु तुझ्या शरीरावर कन्ट्रोल करायचा प्रयत्न कर.. प्लिज वृषभ.. 

(वृषभ काहीच रिस्पॉन्स करत नाही हे बघुन शौर्य त्याचा हात हातात पकडुन रडु लागतो.. )

रॉबिनसुद्धा आत येतो..

रॉबिन : ए वृषभ काय यार हे.. तु आम्हां सगळ्यांना रडवतोयस.. आज आम्ही लोक तुझ्यासाठी खुप खुश आहोत रे.. आर्यनने तुझ्या आणि पिऊच्या रिलेशनशिपला होकार दिलाय यार.. तुला आत्ता घाबरत पिऊला भेटायची गरज पण नाही.. 

शौर्य : सगळे प्रॉब्लम तुझ्या लाईफमधले सोल्व्ह झालेत वृषभ तर तु हा नवीन प्रॉब्लेम क्रिएट करून बसलायस.. काय बोलु यार मी तुला.. उठ ना यार..

वृषभच्या डोळ्यांतुन पुन्हा पाणी येऊ लागत.. 

रॉबिन : ए वृषभ रडु नकोस.. हळूहळू होशील तु बरा. आम्ही आहोत तुझ्यासोबत.. डोन्ट वरी.

शौर्य : माझ्या घरचे तुझ्या आई पप्पांची काळजी घेतायत.. तु कसलच टेन्शन नको घेऊस.. प्लिज रडु नकोस अस.. तु फक्त प्रयत्न कर.. डॉक्टर बोललेलंत तु नक्की बरा होणार.. आणि मी तुला बर केल्याशिवाय इथुन काही जाणार नाही.

रॉबिन आणि शौर्य वृषभसोबत गप्पा मारत असतात.. रात्री अडीच वाजता दोघे त्याच्याच बाजुला चेअर घेऊन झोपुन जातात. शौर्य वृषभचा हात आपल्या हातात घट्ट पकडत झोपुन जातो..

सकाळी साडे सहाच्या दरम्यान रॉबिन शौर्यला उठवतो.. शौर्य एका हाताने डोळे चोळतच उठतो..

रॉबिन : विर 7 वाजेपर्यंत इथे येतो. हि माझ्या कारची किल्ली तु जाऊन गाडीत बस.. विर आला की मी लगेच येतो.. प्लिज निघ लवकर इथुन..

शौर्य उठुन उभं रहाणार तस त्याला जाणवत की वृषभने त्याचा उजवा हात आपल्या हातात अगदी घट्ट पकडला असतो.. थोडी फार त्याच्या बोटांची हालचाल सुद्धा होत असते..

रॉबिन.. शौर्य रॉबिनला वृषभने आपला हात पकडलाय हे दाखवतो..

(पुढे काय?? वृषभ खरच होईल बरा..?? विराजला काही कळायच्या आत शौर्य USA निघुन जाईल?? पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा..)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all