Aug 09, 2022
प्रेम

अतरंगीरे एक प्रेमकथा 129

Read Later
अतरंगीरे एक प्रेमकथा 129

पिऊला आर्यनचा फोन येतो.. 

पिऊ आत्ता घाबरतच वृषभकडे बघते.. आणि थरथरत्या हाताने त्याचा फोन उचलते..

आर्यन : कुठेस तु??

पिऊ : मॉलमध्ये..

आर्यन : घरी कळवलंस??

पिऊ : मम्मीला फोन लावलेला.. मम्मीने उचलला नाही..

आर्यन : माझा नंबर सेव्ह नाही का?? 

पिऊ : तु हॉस्पिटलमध्ये असशील ना आणि पप्पा पण तुझ्यासोबत असतील ना म्हणुन तुम्हां दोघांना फोन नाही केला..

आर्यन : मग घरी कोणालाच न विचारता अस बाहेर फिरणार तु?? 

पिऊ : दादा मी फोन केलेला रे घरी.. मम्मीने उचलला नाही ना.

आर्यन : मम्मीने फोन नाही उचलला मग गप्प घरी यायचना.. घरी यायच सोडुन मॉलमध्ये फिरणार का तु?? 

पिऊ : सॉरी.

आर्यन : सोबत कोण आहे??

पिऊ : मैत्रिणी..

आर्यन : नक्की??

पिऊ : व्हिडीओ कॉल केला असता बट नेट पॅक संपलाय मोबाईलमधला.. 

आर्यन : राहू दे.. तस मला माहिती माझी पिऊ नको ते काही करणार नाही.. तु वेळेवर घरी आली नाहीस तर मला टेन्शन येत.. आणि ह्या पुढे मला विचारल्याशिवाय फ्रेंड्ससोबत अस बाहेर फिरत बसायच नाहीस.. कळलं?? 

पिऊ : हम्मम.. तुला काही आणु का?? शर्टस वैगेरे??

आर्यन : नको.. आणि आत्ता तीन वाजत आलेत.. 4 पर्यंत घरी ये..  जास्त उशीर नकोय.. मम्मी पप्पा आत्याकडे चाललेत.. आहेना लक्ष्यात??

पिऊ : हम्मम.. येते.. ठेवु??

आर्यन : बाय..

मोबाईल बाजुला ठेवत इनोसेन्ट असा फेस करत पिऊ वृषभकडे बघते..

वृषभ : तु काल घरी काही सांगितलं नव्हतंस??

पिऊ : सांगितलं असत तर परमिशन नसती ना दिली.. आणि आज दादा डॉक्टरकडे जाणार होता.. पप्पा काल रात्री आपण जेवत असताना बोलले ना त्यांना डॉक्टरकडे दोन तरी वाजुन जातील.. म्हणुन कॉलेज सुटल्यावर मम्मीला फोन करून विचारेलं अस ठरवलं मी कारण मम्मी पप्पा लगेच हो बोलतात.. दादाच्या पुढ्यात फ्रेंडसोबत मॉलमध्ये जाते अस काही विचारलं तर काहीही ऐकुन न घेता नाहीच बोलतो तो.. म्हणुन कॉलेज सुटल्यावर मम्मीला फोन केला.. बट तिने फोनच नाही उचलला.. आणि दादाला मी वेळेवर घरी नाही दिसली की घर डोक्यावर घेतो तो.

वृषभ : तुला त्याच्या अश्या वागण्याचा त्रास नाही का होत??

पियुषी : आत्ता तो प्रेमपण करतो आणि तेवढी काळजी पण करतो मग त्याच्या अश्या वागण्याचा त्रास करून कस चालेल..?? 

वृषभ : म्हणजे तुला त्रास होतो ना??

पियुषी : हा म्हणजे कधी कधी दादाच्या वागण्याचा मी जास्त विचार केला की थोडा फार होतो त्रास.. थोडा फार नाही जास्तच.. पहिलं मला अस वाटायच की सगळे भाऊ असेच असतात.. बट नंतर नंतर कळलं की माझा दादाच असा आहे.. तु नाही ना असा.. म्हणजे तु तुझ्या सिस्टर सोबत..??

वृषभ मानेनेच नाही बोलतो..

पियुषी : खरच ना?? आणि जरी असशील तर एवढं पण स्ट्रिक्ट नको वागुस.. थोडं फ्रिडम द्यावं बहिणीला.. 

वृषभ : पिऊ माझी सिस्टर माझ्यापेक्षा मोठी आहे ग.. आणि तीच लग्न पण झालंय.. आणि जरी मला लहान बहिण असती तरी मी आर्यनसारखं अजिबात वागलो नसतो.. तो तुझ्यासोबत जे वागतो ना ते मला स्वतःलाच नाही आवडत ग.. तो तुला कधी कधी ओरडतो ना किंवा तुझा मोबाईल वैगेरे चॅक करतो आणि तो अस काही करतोय हे दिसत असुन सुद्धा काका काकु पण त्याला काहीच बोलत नाहीत तेव्हा मला अस वाटत कि त्या क्षणाला तुझा हात पकडावा आणि सरळ तुला त्या घरातुन घेऊन सगळ्यांपासुन लांब निघुन जावं.. जिथे तु फक्त माझी असशील.. आणि तु माझी जबाबदारी असशील.. तुला आर्यनकडे किंवा काका काकूंकडे कोणत्याच गोष्टीसाठी परमिशन मागत बसावी लागणार नाही.. आणि जरी तुझ्या स्वभावानुसार तु माझ्याकडे परमिशन मगितलीस.. तर तु जे बोलशील त्यासाठी मी होच बोलेल.. मला ना तुला हवी तशी लाईफ जगायला द्यायचीय.. कॉलेज पिकनिक, फ्रेंड्ससोबत शॉपिंग, मुव्हीला जाण, आऊटिंगला जाण, पार्टीमध्ये मित्र मैत्रिणींसोबत डान्स करणं.. सगळं म्हणजे सगळं.. म्हणजे जे तु आत्तापर्यंत मिस करत आलीस ते सगळं मला तुला करायला द्यायचय..

पियुषी : तुला कस माहीती.. मी हे सगळं खुप मिस करते..

वृषभ : तुझ्याकडे बघुन तुझ्या मनात काय चालल असत ते कळत मला.. न बोलता एकमेकांची भाषा आपल्याला कळते म्हटलं तर हे लपुन कस राहील..?? आत्तापर्यंत आई पप्पांची स्वप्न पुर्ण करायच्या मागे आहे मी.. बट मला तुझी स्वप्न सुद्धा पुर्ण करायचीत पिऊ.. तुला अस घाबरत जगताना नाही बघु शकत मी.. माझ्यामुळे सुद्धा तु अस घाबरत जगु नये अस वाटत मला.. आणि म्हणुनच थोडे महिने आपल्या रिलेशनला मी मैत्रीच नाव दिलंय.. थोड्या महिन्यांनी एक वेगळंच नात असेल आपल्यात..

पियुषी : नक्की किती महिन्यांनी वृषभ??

वृषभ : येणाऱ्या नवीन वर्षांपासुन आपण आपल्यातील नात्याची नव्याने सुरुवात करूयात.. 

पियुषी : प्रॉमिज??

(पियुषी हात पुढे करतच वृषभला विचारते)

पक्का प्रॉमिज.. वृषभ तिच्या हातात आपला हात देतच बोलतो
.
वृषभ : तुला छानसा असा ड्रेस घेऊयात.. कॉलेजमध्ये जाताना घालायला? माझ्याकडुन? प्लिज..

पियुषी : हम्मम.. 4 वाजेपर्यंत घरी यायला सांगितलय मला...

वृषभ आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर हनुवटी ठेवत पियुषीकडे बघतच रहातो..

पियुषी : काय झालं??

वृषभ : आर्यनचा विचार करतोय ग.. ह्यापुढे आपल्याला अस कधी भेटता येईल अस वाटत नाही मला..

पियुषी : तुला भेटावस वाटलं तर सांग मला.. जशी आज आली तशीच येत जाईल..

वृषभ : एवढी मोठी रिस्क घेऊन?? 

पियुषी : फ्रेंड्सला भेटायला येणं ह्यात रिस्क आहे का वृषभ?? रिस्क तर न्यु इयर नंतर जेव्हा तुला भेटायला येईल त्याच्यात असेल.. 

पिऊ तु खरच खुप गोड आहेस ग.. वृषभ हसतच पिऊला बोलतो..

पियुषी : आणि तु कसा आहेस माहिती??

(वृषभ हलकीच आपली मान वर करत पिऊला कसा म्हणुन विचारतो.)

खुप म्हणजे खुप जास्त गोड...

पिऊच्या अश्या बोलण्यावर दोघेही हसु लागतात..

वृषभ : पिऊ मी मंडे पासुन घरी नाही.. डायरेक्ट सेटरडे रात्री येईल..

कुठे चाललास? पियुषी छोटस तोंड करतच वृषभला विचारते..

वृषभ : स्विझरलेंड.. कंपनी थ्रू चाललोय..

कॉंग्रेच्युलेशन अस बोलत पियुषी वृषभला मिळवायला आपला हात पुढे करणार असते तस दोघांच्या लक्षात येत की मगाशी प्रॉमिज घेण्यासाठी एकमेकांचे पकडलेले हात अजुन तसेच आहेत.. 

सॉरी.. अस बोलत वृषभ पटकन पिऊचा हात सोडतो..

वृषभ : आपण शॉपिंग करूयात ना??

हम्मम.. पियुषी चेअरवरून उठतच वृषभला बोलते..

दोघेही मस्तपैकी शॉपिंग करतात आणि घरी जायला निघतात..

वृषभ : तुला वेळ मिळेल तेव्हा फोन कर मला..

पियुषी :  हम्मम.. सांभाळुन जा स्विझरलेंडला.. आणि सांभाळुन ये..

वृषभ : हम्मम.. आणि अजुन थोडे महिने.

पियुषी : मी न्यू इयरची खुप आतुरतेने वाट बघतेय..

दोघेही एकमेकांसोबत बोलत एकत्रच घरी जातात.. 

आर्यन हॉल मध्येच बसुन अभ्यास करण्यात गुंतला असतो.. पिऊ एक नजर त्याच्यावर फिरवत आत निघुन जाते.. थोडं फ्रेश होऊन ती त्याच्याजवळ येऊन बसते..

पियुषी : डॉक्टर काय बोलले??

आर्यन : थोडं इन्फेक्शन झालंय.. मंडेला परत बोलवलय.. 

पियुषी : घाबरण्यासारख काही नाही ना

आर्यन : अजुन अंगावर काढलं असत मग थोडं फार घाबरण्यासारख असत.. 

वृषभ सुद्धा फ्रेश होऊन आर्यनला भेटायला येतो..

वृषभ : डॉक्टर काय बोलले??

घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या आर्यनला तो प्रश्न करतो..

आर्यनने जे पिऊला सांगितलं तेच तो त्याला सांगतो..

वृषभ : मंडेला काकांना सुट्टी घ्यावी लागेलना मग.. 

आर्यन : हम्मम..

वृषभ : काका काकु नाहीत का घरी..??

आर्यन : आत्याकडे गेलेत..

वृषभ : जास्त अभ्यास आहे का तुला??

आर्यन : तुम्ही दोघ आल्या आल्या किती प्रश्न करतायत यार.. मला खुप म्हणजे खुप अभ्यास आहे.. आणि पिऊ मला भूक लागलीय.. मला काही तरी खायला हवंय.. 

वृषभ : आर्यन पिझ्झा मागवु..? तु खाणार??

(पिऊ आपल्यासारखच दमुन आलीय.. तिला त्रास नको म्हणुन वृषभ बोलतो)

आर्यन : कश्याबद्दल पार्टी देतोयस??

वृषभ : स्विझरलेंडला जातोय मंडेला त्याबद्दल..

आर्यन : रॉबिन अंगात आला काय तुझ्या..

वृषभ : खरच स्विझरलेंडला चाललोय मी.. डायरेक्ट सेटरडेला येईल मी.. कंपनी थ्रू चाललोय.. तु पिझ्झा खाणार का बोल.. उगाच पिऊला काहीही बनवायला नको सांगुस.. ती पण आत्ताच दमुन आलीयना.. (पिऊ डोळे मोठे करत थोडी घाबरतच वृषभकडे बघत आपल्या दादाकडे बघते.. वृषभसुद्धा आपण नको ते बोललो हे कळत.. आर्यन थोडं संशयी नजरेने वृषभकडे बघतो) 

आर्यन : तुला कस माहीती ती आत्ताच आली??

वृषभ : ते मी माझ्या फ्रेंड सोबत मॉलमध्ये गेलेलो आज.. स्विझरलेंडला जातोय मग थोडी शॉपिंग नको का करायला.. तिथे मला जेनीने आवाज दिला.. सोबत पिऊ पण होती आणि अजुन दोन तीन मुली होत्या.. बाय दि वे पिऊ तु कधी आलीस घरी..??

पियुषी : थोडा वेळ झाला असेल.. आणि तु??

आर्यन : तो कधी पण येईल घरी.. तुला कश्याला हवंय.. तु मला खायला दे काहीतरी.. खायला नको.. जेवायलाच वाढ..

पियुषी : जेवला नाहीस तु??

आर्यन : मम्मी वाढत होती पण मला भुक नव्हती मगाशी.. आणि आत्ता प्रश्न नको करुस.. मला खरच खुप अभ्यास आहे ग..

आर्यन पुस्तकात डोकं घालतच बोलतो.. पिऊ आर्यनसाठी जेवण आणायला निघुन जाते..

आर्यन : वृषभ पिऊ नक्की मैत्रिणींसोबतच होती ना??

पिऊ किचनमध्ये जाताच आर्यन पुस्तकातून नजर हटवतच वृषभकडे बघत त्याला विचारतो.. आर्यनच्या अश्या प्रश्नाने वृषभ थोडं घाबरतच एकटक त्याच्याकडे बघत रहातो.. 

आर्यन : अस का बघतोयस?? मुलं वैगेरे पण होती का??

वृषभ : मला फक्त मुलीचं दिसल्या.. (वृषभ तिथुन उठुन जाऊ लागला)

आर्यन : बस ना इथेच.. कुठे चाललास??

वृषभ : ऑफिसच काम आहे थोड.. आणि तुला अभ्यास पण खुप आहे ना.. मी फक्त डॉक्टर काय बोलले तुला ते विचारायला आलेलो..

आर्यन : ओके.. तु जेवणार तर जेव.. भूक लागली असेलना तुला पण??

वृषभ : मी जेवुन आलोय.. रात्री भेटुयात.. आत्ता मला खरच काम आहे..

आर्यन : वृषभ पिझ्झा उद्या मागवूयात.?? सँडे पार्टी..

वृषभ : तु बोलशील तस... बाय..

वृषभ तिथून निघुन सरळ आपल्या रूममध्ये येतो..

इथे समीरा घरी आली असते पण मानव बद्दल काहीच माहिती नसताना आपण नको ते बोललो म्हणुन तिला स्वतःचाच राग येत असतो..

सॉरी म्हणुन तिने त्याला मॅसेज केला असतो बट मानव ने मॅसेज बघुन सुद्धा त्यावर काहीच रिप्लाय केला नसतो.. त्यामुळे तिला जास्तच वाईट वाटत असत.. हा जास्तच रागवला आहे वाटत अस स्वतःशीच ती पुटपुटते.. शेवटी न राहवुन ती त्याला फोन करते.. पण तो तिचा कॉल काही उचलत नाही.. ती पुन्हा त्याला फोन लावते.. बट तो ह्यावेळेला सुद्धा तिचा फोन काही उचलत नाही.. ती पण आत्ता जास्त विचार न करता मोबाईल ठेवुन देते आणि अभ्यासाला लागते..

इथे शौर्यची सकाळ गाथाचा सुंदर असा चेहरा बघुन झाल्यामुळे होते म्हणुन तो सुद्धा खुप खुश असतो.. 

गाथा : आज उशीर झाला तुला उठायला..

शौर्य : रात्री मस्त पैकी लॉंग ड्राईव्हला गेलेलो ग.. 

गाथा : म्हणुन तु फोन नाही उचललास का माझा??

शौर्य : हम्मम.. 

गाथा : आणि मी समजत होते की तु झोपला असशील..

शौर्य : हा म्हणजे तसच काहीस ग.. म्हणजे.. बाहेर मस्त असा पाऊस पडत होता.. मी रूम मध्ये अभ्यास करतच बसलो होतो.. आणि ती मला अचानक भेटायला आली इथे.

गाथा : कोण??

शौर्य : तिच ग.. जिच्या मी परत नव्याने प्रेमात पडलोय. आणि परत परत पडत रहातो म्हणजे सलग तीन दिवस आम्ही भेटतोय म्हणुन मी थोडं जास्तच तिच्या प्रेमात पडलोय.. बट काल चक्क मी तिला घेऊन लॉंग ड्राईव्हला गेलेलो..

गाथा : रात्रीच??

शौर्य : हा.. मग ती रात्रीची भेटायला आली तर रात्रीच जाणार ना.. अस काय करतेस तु गाथा.. आणि मी बाईक ड्राईव्ह करत होतो म्हणुन तुझा फोन नाही उचलला.. रिअली सॉरी फॉर देट.. 

गाथा : बाईक?? ती बाईक पण चालवते??

शौर्य : तिची नाही ग माझ्या फ्रेंडची.. म्हणजे आदल्या दिवशी आमच लॉंग ड्राईव्हला जायच ठरलं होतं ग. दिवसभर प्रॅक्टिस आणि त्यानंतर तुझ्यासोबत बोलण्यात मी ते सगळं विसरून गेलो.. त्यात ती काल खुप म्हणजे खुप छान दिसत होती.. माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती.. तिला थांब बोललो आणि लगेच रॉनला फोन लावला.. तो लगेच त्याची बाईक घेऊन आला. मग रॉनची बाईक घेऊन आम्ही दोघे मस्तपैकी लॉंग ड्राईव्हला गेलो.. आणि तुला सांगु ती मला अगदी घट्ट अशी मिठी मारून बसलेली.. मला एकदम भारी फिल होत होतं.. तीने असच मला मिठी मारून बसावं म्हणुन मी सुद्धा बाईक अगदी हळुहळु चालवत होतो..  तिथुन आम्ही छानसा डिनर केला.. तिने तिच्या हातानेच मला जेवण भरवल.. आणि जेवण होताच परत आम्ही मस्त पैकी समुद्रकाठी बसुन एकमकांच्या हातात हात पकडत गप्पा मारत होतो.. मला तिला सोडुन कुठे जावसच वाटत नव्हतं.. आणि तिला सुद्धा.. 

गाथा : शौर्य काल कोणता मुव्ही बघितलास तु..?? 

शौर्य : ओहह नॉ..

गाथा : काय झालं??

शौर्य : तिला मुव्हीला घेऊन जायच कस सुचलं नाही यार मला.. काय गाथा तु पण आत्ता सांगतेस मला.. 

गाथा : तु काल माझा फोन उचलला असतास तर मी तुला सजेशन दिलं असत.. 

शौर्य : बाईक ड्राईव्ह करत होतो ना ग.. मग कस फोन उचलणार?? बट जाऊ दे आज रात्री पण ती नक्की येईल मला भेटायला.. आज तिला घेऊन मुव्ही बघायला जातो..

गाथा : ओके..

शौर्य : गाथा मी आज तिला घेऊन मुव्ही बघायला जाणार आहे..

गाथा : ओके शौर्य.. मला ऐकायला आलं.. 

शौर्य : तुला काहीच प्रॉब्लेम नाही ना..

गाथा : अजिबात नाही.. बट मला एक सांग.. बाहेर मुसळधार असा पाऊस असताना तु तुझ्या मित्राची बाईक घेऊन लॉंग ड्राईव्हला गेलास.. कार ने गेला असतास तर ते जास्त कम्फर्टेबल असत रे.. मित्राकडे बाईक मागण्यापेक्षा कार मागायची शौर्य. तु खरच माझा फोन ऊचलायला हवा होतास मग मी तुला हे पण सजेशन दिलं असत.. आणि पाऊस पडत असताना तु समुद्रकिनारी बसलेलास.? आय मीन चिक्खलात बसुन गप्पा मारत होतात तुम्ही.. ते ही हातात हात पकडुन..

शौर्य : आत्ता स्वप्नात जस दिसलं तस सांगितलं मी तुला.. चिक्खल वैगेरे नाही दिसला ग मला.. 

गाथा : तुझ्या बोलण्यावरून मला अंदाज आलाच होता की तु मला तुला पडलेल्या स्वप्नाबद्दलच बोलत असशील..

शौर्य : तशी तु हुशार आहेस.. आय नॉ देट.. बट खरच तु आज काल रोज माझ्या स्वप्नात येत असतेस.. सलग तीन दिवस मी जिमला नाही गेलोय.. ते ही तुझ्यामुळे.. 

गाथा : माझ्या मुळे का??

शौर्य : तु अशीच स्वप्नात दिसत राहिलीस तर मी कसा लवकर उठेल गाथा.. आणि तु रोज स्वप्नात येतेय म्हणुन मी फ्रेंड्स लोकांना पण सांगुन ठेवलय मला उठवायला अजिबात यायच नाही..

गाथा : अच्छा??

शौर्य : हम्मम..

गाथा : शौर्य स्वप्नात मी तुला कॉल करत होती हे कळत होतं तरी उचलला नाहीस तु.. 

शौर्य : तुला सोडुन कुणाचा कॉल इंपोर्टन्ट नाही ना माझ्यासाठी.. म्हणजे तु माझ्यासोबत बाईकवर होतीस.. त्यात आपण दोघेही रोमँटिक अश्या मुड मध्ये होतो.. I don't want to spoil our mood.. 

गाथा : अच्छा??

शौर्य : हो ग माय स्वीट जान.. आणि काल किती वेळ तुझ्या फोनची वाट बघत होतो मी.. दिड वाजेपर्यंत तरी जागा होतो मी.. मग अभ्यास करता करता कधी झोपलो हे माझं मलाच नाही माहिती.. 

गाथा : मी पहाटे 4 वाजता झोपली.. अभ्यास करायच्या नादात एवढे कधी वाजले हे माझं मलाच कळलं नाही.. मग सकाळी उठायला उशीर झाला.. उठल्या उठल्या तुला फोन लावला मी बट तु उचलला नाहीस..

शौर्य : तुझ्या फोनची वाट बघुन मी कधी लॉंग ड्राईव्ह ला निघुन गेलो हे माझं मलाच नाही कळलं.. बट गाथा तुझा हा वाला स्वभाव मला खुप आवडतो.. तु कोणत्याही गोष्टीला घेऊन चिडत नाहीस माझ्यावर आणि रागवत तर नाहीच नाही.. तुझ्याजागी जर दुसरी कोणी असती तर खुप चिडली असती माझ्यावर...

गाथा : तु समीराबद्दल बोलतोयस ना??

शौर्य : तिच्याबद्दल खरच नव्हतो बोलत ग मी.. माझे इकडचे फ्रेंड्स आहेत ना त्यांच त्यांच्या फियांसी सोबत बोलणं कमी आणि भांडण जास्त असतात.. त्या जरा जराश्या कारणाने रागवत बसतात त्यांच्यावर.. तस आपल्यात नाही कारण तु खुप समजुन घेतेस मला.. म्हणुन बोललो मी.. बट तु बोलतेस तस समीरा असती तर जशी माझी मगासची पुर्ण स्टोरी तु ऐकुन घेतलीस तशी तिने ऐकुणच नसती घेतली.. फोन कट करुन रुसून बसली असती कुठे तरी.. मग मला तिच्या मागे पळत तिला समजवाव लागलं असत जस माझ्या इकडच्या फ्रेंड्सचं चालु असत अगदी तस..

गाथा : शौर्य त्याच कस व्हायच मग??

शौर्य : कोणाच??

गाथा : वृषभच..

शौर्य : इथे वृषभचा काय संबंध आहे??

गाथा : मी तुला सांगणार नव्हते बट आत्ता समीराचा विषय निघालाच आहे म्हणुन तुला सांगते.. लास्ट टाईम आम्ही कॉलेज कलीग सगळे मुव्ही बघायला गेलो होतो हे तुला बोलली ना मी.. आम्हाला एवढ्या जणांना तिकीट नाही मिळालं मग आम्ही मॉलमध्येच इथे तिथे फिरत टाईम पास केला..

शौर्य : बोलली तर होतीस.. मग..

गाथा : त्याच मॉलमधल्या एका दुकानात मला वृषभ दिसला.. म्हणजे एकटाच आहे म्हटल तर मी त्याच्या जवळ जात त्याला हाय हॅलो करणार होते बट थोडं पुढे गेली तस मला समीरा पण दिसली.. मग मी पुढे नाही गेली.. ती त्याच्या हाताला पकडत त्याच्याकडे बघतच त्याला काही तरी बोलत होती.. मला त्या दोघांना डिस्टरब करावंसं नाही वाटलं म्हणुन मी तिथुन निघुन गेली.. त्यांनतर थोड्या वेळाने परत दुसऱ्या दुकानात ते दोघ दिसले.. वृषभ आणि तिची मस्ती चालली होती.. ती त्याच्या खांद्यावर वैगेरे मारत होती.. इव्हन मी वृषभ आणि समीराच्या अगदी समोर उभी होती तरी दोघांचही लक्ष नव्हतं म्हणजे इतके ते एकमेकांमध्ये हरवुन गेलेले.. जस तु आणि मी एकत्र असताना एकमेकांत हरवुन जातो अगदी तस म्हणजे ते सगळं बघुन ती दोघ फक्त मित्र मैत्रिणी आहेत अस नव्हतं वाटत मला.. आय नॉ अस काही नसेलही बट मला अस वाटत की ती मुलगी समीराच आहे जिच्या प्रेमात वृषभ आहे.. आणि त्याच्या खास मित्राची एक्स आहे म्हटलं तर त्याला तुला सांगायला ओकवर्ड फिल वाटत असेल..

शौर्य : असेलही.. बट रोहन बोलला होता की ती समीरा नाही जिच्या प्रेमात वृषभ आहे. पण समीरा वृषभच्या प्रेमात आहे अस रोहनला वाटत.. जर ती त्याच्या प्रेमात असेल मग वृषभ पण तिच्या प्रेमात पडेल हे मी त्याला बोललो होतो.. मे बी तस झालं सुद्धा असेल.. जर तस असेल तर तिने फक्त त्याला समजुन घ्यावं.. वृषभ समजूतदार आहे आणि मॅच्युअर सुद्धा.. 

गाथा : तुला वाटत ती त्याला समजुन घेईल?? 

शौर्य : मला घेतलं नाही तर त्याला कशी घेईल ती.. बट ते वृषभला कळायला हवं.. माझ्यापेक्षा जास्त चांगलं तो तिला ओळखतो ग.. आणि वृषभची लाईफ वृषभ बघुन घेईल.. त्याला जर पटत असेल तर आपण काय करू शकतो तुच सांग.. आणि प्लिज आपल्या दोघांत परत समीराच नाव नको काढुस..

गाथा : हम्मम.. सॉरी..

शौर्य : सॉरी नको बोलुस.. मी जस्ट सांगतोय ग तुला.. 

गाथा : आत्ता उठ आणि मस्त पैकी फ्रेश हो.. मला खुप म्हणजे खुप अभ्यास आहे..

शौर्य : हम्मम.. तु खुप म्हणजे खुप म्हणजे खुपच अभ्यास कर.. मी पण फ्रेंड्स सोबत आज शॉपिंगला चाललोय.. बाय.. टेक केअर.. एन्ड लव्ह यु लॉट..

(नेहमी प्रमाणे एकमेकांना बाय करत दोघेही फोन ठेवुन देतात..) 

रात्री शौर्यच्या घरी सगळीच फॅमिली नेहमी प्रमाणे एकत्रच बसुन गप्पा गोष्टी करत जेवत असतात..

काका : वहिनी.. मी आणि सायली अस विचार करत होतो की.. ख्रिसमस व्हेकेशनला आपण सगळे मिळुन नाशिकला जाऊयात का?? म्हणजे साक्षीला पण सुट्टी आहे ना.. तिला नाशिकला जावस वाटतंय.. आत्ता स्कुल चालु असल्यामुळे जाता नाही येणार.. आपण सगळे मिळुन गेलो तर फॅमिली ट्रिप पण झाली असतीना..

अनिता : सगळेच तैयार असतील तर जाऊयात.. माझी काहीच हरकत नाही..

काका : विराज तुझं आणि अनघाच काय मत आहे.. म्हणजे तुम्हां दोघांच इतर काही प्लॅन असतील तर इट्स ओके..

विराज : अजुन आमचं काही ठरलच नाही.

अनघा : आणि ठरलं असत तर आम्ही ते केन्सल केलं असत.. 

विराज : होना.. म्हणजे मी आणि अनु सुद्धा फॅमिली आऊटिंगसाठी प्लॅन करत होतो.. बट साक्षीची स्कुल असते त्यामुळे समर व्हेकेशनमध्ये ट्राय करत होतो.

काका : म्हणजे तुम्ही पण येतायत ना??

विराज : हो..

काकी : नाशिक चालेल ना तुम्हांला??

विराज : मला तर खुप आवडलेलं नाशिकला.. 

अनघा : मला पण..

काका : मग नाशिक डन करूयात..

अनघा : 31st च सेलिब्रेशन नाशिकला केलं तर कस राहील.. म्हणजे त्या हिशोबाने सुट्टी अरेंज केली तर...

अनिता : विरचा वाढदिवस पण नाशिकलाच करूयात?? 

काकी : कधी आहे वाढदिवस??

अनघा : फस्ट जानेवारी..

काका : अरे वाहह न्यु इयरलाच.. म्हणजे ख्रिसमस व्हेकेशन सोबत आपण थर्टी फस्ट, न्यु इयर आणि विराजचा बर्थ डे पण सेलिब्रेट करून येऊ.. 

आत्या : काय मग साक्षी मॅडम खुश का??

साक्षी : खुप म्हणजे खुप खुश..

शौर्य नेहमीच्या वेळेवर त्याच्या काकाच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल करतो..

साक्षी : हॅलो दादा.. 

शौर्य : हॅलो सिसॉ.. आज फोन तुझ्या हातात म्हणजे काही तरी स्पेसिअल चालु आहे तिथे..

साक्षी : आम्ही ख्रिसमस व्हेकेशनला नाशिकला जातोय... आणि ख्रिसमस व्हेकेशन सोबत आम्ही थर्टी फस्ट, न्यु इयर आणि विराज दादाचा बर्थ डे पण सेलिब्रेट करणार आहोत.. खुप मज्जा येणार व्हेकेशनमध्ये..

शौर्य : आम्ही म्हणजे सगळेच चाललेत का??

साक्षी : हो..

शौर्य : मम्मा पण येतेय??

अनिता : हो.. मी पण जातेय..

शौर्य : मला पण यायचय मग.. तस पण इथे व्हेकेशन असत... मम्मा माझं तिकीट बुक कर.. मी पण येणार..

अनिता : विरला विचार आणि काय ते कर.. (अनिता मोबाईल विराजच्या पुढ्यात करतच बोलते)

विराज : शौर्य फक्त चार दिवसांसाठी तु USA वरून इंडियात येणार का??

शौर्य : हा मग..

विराज : ख्रिसमस व्हेकेशनला येण्यापेक्षा समर व्हेकेशनमध्ये येना.. म्हणजे दिड दोन महिने तरी तुला आमच्यासोबत रहायला मिळेल.. तस पण आम्ही थोडे दिवसच नाशिकला रहाणार आहोत ना.. म्हणुन बोलतोय..

शौर्य : तुम्ही सगळे तिथे एन्जॉय करणार आणि मी एकटा इथुन व्हिडीओ कॉल मधुन फक्त बघत राहु का.. मला ख्रिसमस व्हेकेशनलाच यायचय.. आणि कॉलेजला सुट्टी असते मग तुला काय प्रॉब्लेम आहे. माझं तिकीट बुक कर..

विराज : शौर्य.. तु परत हट्टी पणा करणार आणि घरी नवीन प्रॉब्लेम क्रिएट करणार.. 

शौर्य : मला पण नाशिकला यायचय, मला माझ्या फॅमिलीसोबत व्हेकेशन एन्जोय करायचय ह्यात हट्टीपणा आहे का.?

विराज : हो.. हट्टीपणाच आहे हा.. पैस्यांची किंमत आहे का नाही तुला?? फक्त चार दिवसांसाठी दिड एक लाख रुपये वेस्ट करणार का तु?? तेवढ्याच पैस्यांत समर व्हेकेशनमध्ये येऊन मस्त पैकी एक दीड महिना आमच्यासोबत राहु शकतोस ना..

शौर्य : तरी पण.. 

विराज : म्हणजे तुला यायचंच आहे..

शौर्य : हम्मम..

विराज : ओके ये... काका मी आणि अनु नाशिकला नाही येत.. तुम्ही सगळे जावा.. शौर्य तुझं कोणत्या दिवशीच तिकीट बुक करू ती डेट मला व्हाट्सए कर तुझं त्यादिवशीच तिकीट बुक करतो मी.. ओके.. 

(विराजच बोलुन होताच तो मोबाईल काकाकडे देऊन टाकतो)

साक्षी : विराज दादा प्लिज ना.. आत्ता प्लॅन नको ना अस स्पोईल करुस.. तु आणि वहिनी पण येतायत नाशिकला.. आणि शौर्य दादाला यायच तर येऊ दे ना.. आपल्याला मज्जा येईल तेवढी..

काका : साक्षी शांत बस बघु.. तुला नाही कळत काही..

शौर्य : काका मला ख्रिसमसला पण नाही यायच आणि समर व्हेकेशनमध्ये तर अजिबात नाही यायच.. हे तु विरला सांग.. एन्जॉय करा तुम्ही सगळे.. आणि मी फोन पण नाही करणार आत्ता.. बाय..

शौर्य रागातच फोन कट करतो.. काका परत शौर्यला फोन लावतो.. 

शौर्य : काय झालं??

काका : किती राग करतोयस तु??

शौर्य : विर नेहमी असच वागतो माझ्याशी.. 

काका : शौर्य तो का अस बोलतो त्याचा विचार कर ना.. चार दिवसांसाठी येण्यापेक्षा दिड दोन महिन्यांसाठी रहायला ये.. अस त्याला वाटत म्हणुन बोलतोय तो.. 

शौर्य : मला आत्ता पण नाही यायच आणि नंतर पण नाही यायच.. तुम्ही सगळे तिथे एन्जॉय करा.. 

काका खुप वेळ शांत बसुन शौर्यकडे बघतच रहातात..

काका : आपण कोणीच नाशिकला नाही जाणार.. शौर्य दोन वर्षांनी जेव्हा इंडियात येईल तेव्हाच आपण अस फॅमिली ट्रिपला जाऊ.. ते ही नाशिकला..

काका अस बोलताच सगळेच त्याच्याकडे बघु लागतात..

शौर्य : माझ्यामुळे तुमच प्लॅन केन्सल करायची काहीही गरज नाही.. मी नाही येत आहे.. तस पण विर आणि मम्माला मी नकोय तिथे.. म्हणुन जबरदस्ती एवढ्या लांब ठेवलय मला...

विराज : परत बोल जरा. (विराज काकाच्या हातातुन फोन घेतच शौर्यला बोलतो)

शौर्य : मग तुच तिकीट बुक केलेलस ना माझ.. ते ही रातोरात.. आणि  मला नव्हतं यायच USA ला..

विराज : काकाला सांगु का आत्ता USA का गेलेलास ते.. दिल्लीवरून आल्या आल्या इथे काय करून आलेलास ते..

शौर्य : तु काकाच्या पुढ्यात दिल्लीचा विषय का काढतोयस.. 

विराज : आत्ता काकाला कोण सांगत होत तुला जबरदस्ती USA पाठवलंय म्हणुन.. तुच ना..?? मग काकाला पण कळु दे ना तुला USA का पाठवलं ते.. काका तु आज ऐकच शौर्य USA का आणि कसा गेला ते..

शौर्य : विर.. आय टेक माय वर्ड बॅक.. प्लिज काकाला नको सांगुस काही..

विराज : अस कस.. काकाला पण माहिती पाहिजे ना शौर्य..

शौर्य : विर नको बोललो ना मी.. 

विराज : मग सारख सारख नाही बोलुन दाखवायचं की मी जबरदस्ती केलीय म्हणुन.. तु शिक्षण अर्धवट सोडु नये म्हणुन मी जबरदस्ती केलीय तुला.. USA जाण्यासाठी नाही.. USA ला तु तुझ्या मर्जीने गेलायस.. आणि आत्ता तु मला डेट सांग त्यादिवशीच तुझं इकडच तिकीट मी बुक करतो.. नाही तर परत अजुन नवीन डायलॉग बोलुन दाखवशील..

शौर्य : तुम्ही तुमच एन्जॉय करा.. मला नाही यायच तुमच्यात.. माझं मी इथे सगळ्यांपासुन लांब आणि एकटा राहुन एन्जॉय करेल.. बाय... मी बिझी आहे..

शौर्य फोन कट करून टाकतो..

काका : शौर्य नाही तर आपण पण नकोच जायला.. दोन वर्षानी तो इथे आला तर आपण जाऊयात.. साक्षी तुला नाशिकला जायच मग मी घेऊन जातो तुला.. आपण दोन दोन दिवसासाठी जाऊन येऊयात.. कारण आपण अस एन्जॉयमेंट करतो मग त्याला पण आपल्यासोबत यावं अस वाटणारच ना..

विराज : आपण शौर्यमुळे नाशिकला जायच केन्सल केलं तर शौर्यला वाईट वाटेल.. म्हणजे आज तो अस बोलतोय.. दोन दिवसांनी डोकं शांत झाल तर तो काही तरी वेगळ बोलेल.. आपलं जस ठरलंय तस आपण करुयात.. आणि आपल्यापेक्षा भारी सेलिब्रेशन तर तो करेल तिथे.. पुर्ण महिनाभर इतका बिझी असेल ना तो आपल्यासोबत फोन वर बोलायला पण त्याच्याकडे वेळ नसेल.. 

अनघा : आणि आपण साक्षीचा पण विचार करायला हवाय.. तिला पण आपण सगळे मिळुन नाशिकला जावं अस वाटतंय..

काका : तरी एकदा त्याच्याशी बोलुन बघतो मी.. 

अनिता : आणि त्याला यावस वाटत असेल तर येऊ देत.. 

आत्या : मला पण असच वाटत..

काका : मी बोलतो त्याच्याशी.. 

विराज : जस तुला योग्य वाटत तस कर..

सगळेच एकमेकांसोबत चर्चा करत जेवुन घेतात..

दुसऱ्यादिवशी

लेक्चर अटेंड करून झाल्यावर समीराची नजर गेटबाहेर मानवला शोधत असते..

वृषभ : आज पण बोलवलस का तु त्याला?? बट नाही दिसत आहे ग तो.. म्हणजे गाडी इथे गेटबाहेरच उभी करून असतो ना तो.. म्हणुन बोलतोय..

(वृषभ आजु बाजुला आपली नजर फिरवतच समीराला बोलतो.)

समीरा : ह्या पुढे तो इथे दिसणार हि नाही..

वृषभ : भांडण वैगेरे झालं की काय दोघांत.. 

समीरा : वृषभ तु मला मानव वरून चिडवायच कधी बंद करणार ते आज सांगच तु मला.. तुझ्या अश्या चिडवण्याने मी त्याला काल हवं नको ते बोललीय.. तुला का नाही कळत मला नाही आवडत आहे तु त्याच्यावरून मला चिडवतोस ते.. 

वृषभ : आत्ता मी चिडवलं कुठे तुला?? 

समीरा : मग काय बोलत होतास तु आत्ता??

वृषभ : मग बाहेर आल्या आल्या तु कोणाला शोधत होतीस?? 

समीरा : मानवलाच शोधत होती.. बट तु समजतोस त्या करणाने नाही शोधत होती.. ते तो रोज इथे येत असतो हे मला नाही आवडत.. म्हणजे नुसत मागे मागे करत असतो माझ्या म्हणुन काल मी त्याला खुप ओरडली.. (समीरा काल घडलेला प्रकार वृषभला सांगते)

वृषभ : बापरे.. तु अस बोललीस त्याला तरी त्याने तुला घरी ड्रॉप केलं??

समीरा : हम्मम.. बट नंतर मी सॉरी बोलायला कॉल केला तर तो उचलतच नाही..

तो कॉल उचलत नाही म्हणुन त्रास होतोय का तुला... वृषभ एकदम सिरीयस असा चेहरा करतच समीराला विचारतो.. वृषभ अस बोलताच समीरा आत्ता रागातच त्याच्याकडे बघते..

वृषभ : अस बघतेस म्हणजे त्रास होतोय तर.. 

समीरा : सीमाच लग्न जमलं म्हणुन तुला जसा त्रास होत होता तसा त्रास मला नाही होत आहे..
(समीरा हाताची घडी घालत एक वेगळाच एटिट्युड वृषभला दाखवतच बोलते)

वृषभ : ए हॅलो...तु बरी आहेस ना?? सीमाच लग्न जमलं म्हणुन मला का त्रास होईल.. काहीही काय असत ग तुझं..

समीरा : आत्ता ते तुलाच माहिती.. बाय दि वे मी उद्या गावी चाललीय ते ही टु विक्स साठी.. 

वृषभ : मानव सोबत??

समीरा : आई बाबांसोबत.. गावी मोठा आसा बंगला बांधलाय आम्ही.. श्रावण महिना म्हणुन पुजा घालणार आहोत तिथे.... 

वृषभ : अरे वाहह.. 

समीरा : मी तुला हे सगळं ह्यासाठी सांगतेय कारण सीमा पण येणार आहे तिथे.. तुला हवं तर तु पण येऊ शकतोस.. त्या निमित्ताने तरी ती भेटेल तुला..

वृषभ : सीमा खरच येतेय..??

समीरा : हो.. आत्ता ती येतेय म्हटलं तर तुला पण यायच असेल ना..

वृषभ : आलो असतो बट..

वृषभ काही बोलणार तोच पिऊचा फोन वृषभला येतो.. वृषभने काल पासुन पिऊचा नंबर लाईफलाईन ह्या नावाने सेव्ह केला होता..

समीरा : बट काय?

बट माझी हि इथे आहेना.. जिच्या मी प्रेमात आहे. See... my Lifeline is calling me.. Just a minute.. समीराला आपल्या मोबाईलवर पियुषीचा आलेला फोन दाखवत वृषभ थोडं बाजुला जाऊन पिऊचा फोन उचलतो..

( वृषभच्या मोबाईलवर लाईफलाईन हे नाव वाचुन कोणीतरी आपल्यापासुन आपल प्रेमच हिरावुन घेतलंय अस समीराच झालं असत.. ती तिथेच उभी राहुन वृषभकडे बघत असते)

वृषभ : तु घरी आहेसना??

पिऊ : हो.. बट दादा झोपलाय.. डोन्ट वरी.. 

वृषभ : पिऊ नको ना अशी रिस्क घेऊस.. थोडे महिने एडजस्ट कर ना ग राणी.. प्लिज.. (वृषभ अगदी प्रेमाने पिऊला समजवत बोलतो.. आपल्याला प्रेमाने अस राणी वैगेरे बोलतोय हे ऐकुन पिऊला खुप छान वाटत असत..)

पिऊ : ओके.. नाही करत..

वृषभ : रागवलीस??

पिऊ : नाही.. 

वृषभ : नक्की ना..

पिऊ : हम्मम.. तु जेवायला घरी ये..

वृषभ : हम्मम.. आलोच.. बट प्लिज थोडे महिने तरी घरी असताना मला फोन वैगेरे नाही करणार तु.. ऐकशील ना माझं??

पिऊ : हम्मम्म.. ठेवु फोन??

वृषभ : हो.. एन्ड मिस यु.. 

पिऊ : मि टु.. (पिऊ हसतच वृषभला बोलते)

वृषभ : असच हसु मी घरी आल्यावर मला दिसु दे..

पिऊ : हम्मम.. बाय..

समीराला वृषभला अस मनसोक्त फोनवर बोलताना बघुन खुप त्रास होत असतो.. नकळत डोळ्यांतुन अश्रु सुद्धा आले असतात.. ती लांबुनच खुप वेळ त्याच फोनवरच बोलणं न्याहाळत असते.. कितीही मनावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरी तस होत नसत.. लांबुनच तिला वृषभ तिच्याजवळ येतोय हे दिसत.. ती पटकन आपले डोळे पुसते.. पण डोळ्यांतुन येणार पाणी आज काही थांबत नसत.. 

काय झालं?? रडतेयस का अशी अचानक?? वृषभ तिच्याजवळ येतच तिला विचारतो..

समीरा आपल्या मोबाईलमध्ये बघत नकारार्थी मान हलवत काही नाही बोलते..

वृषभ : समीरा काय झालं?? सांग बघु..

समीरा : तो पण मला सोडुन जातोय.

वृषभ : कोण??

समीरा : ज्याच्या मी प्रेमात होती तो.. मला आत्ता खरच त्याच्याशिवाय नाही जमणार रहायला.. मी काय करू वृषभ??

वृषभ : तु कोणाबद्दल बोलतेयस?? कोणी आलेलं का इथे??

(वृषभ आजु बाजुला आपली नजर फिरवतच विचारतो. पण त्याला कोणी ओळखीच अस दिसत नव्हतं.. तो परत समीराकडे बघतो.. समीरा आपली मान खाली घालुन रडत असते)

समीरा तु कोणाबद्दल बोलतेयस??

आणि डोळे पुस बघु..  (वृषभ आपल्या खिश्यातुन रुमाल काढतच तिच्या हातात देतच तिला बोलतो..)

समीरा : थेंक्स..

वृषभ : कोण सोडुन जातंय तुला..

समीरा : ज्याच्या मी प्रेमात आहे तो..

वृषभ : मानव???

समीरा : वृषभ मला मानव नाही आवडत रे.. तु का मला त्याच्यावरून नेहमी नेहमी चिडवतोयस.. प्लिज नको ना चिडवत जाऊस.. मला आज खरच खुप त्रास होतोय.. आपलं प्रेम आपल्या पासुन लांब गेल्यावर काय त्रास होतो हे तुला नाही कळणार.. तुझ्यावर तशी वेळ आली नाही ना कधी आणि देव करो येऊ पण नये.. खुप त्रास होतो वृषभ.. खुप म्हणजे खुप.. 

वृषभ : समीरा आय एम सॉरी.. एन्ड आय प्रॉमिज यु आत्ता पासुन मी मानव वरून तुला चिडवणार नाही.. बट आत्ता इथे त्याच्याशिवाय अजुन कोण येणार नाही ना ग.. म्हणुन मी त्याच नाव घेतलं.. तु सांगत पण नाहीस तु कोणाबद्दल बोलतेस ते मग मला कस कळणार..

समीरा : मला उशीर होतोय.. बाय.. 

समीरा.. मला जो पर्यंत तु सांगत नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही.. वृषभ समीराचा हात पकडतच तिला थांबवत बोलतो..

वृषभच्या हाताचा स्पर्श तिला हवा हवासा वाटत असतो. त्याच्या स्पर्शाने हृदय अगदी धडधडु लागलं असत.. त्याच्या हाताकडे बघतच कसल्या तरी विचारात ती हरवुन जाते..

वृषभ : ए समीरा.. सांग ना लवकर.. मला उशीर होतोय ग.. 

समीरा : जस तु मला सांगत नाहीस तु कोणाच्या प्रेमात आहेस तस मी पण तुला नाही सांगणार.. आणि तुला ते सांगुन सुद्धा नाही कळणार.. कारण तु पहिल्यांदाच कुणाच्या तरी प्रेमात पडलायस.. 

वृषभ : मला ते कळेल का माहिती नाही बट तु आत्ता काय बोलतेस ते खरच कळत नाही आहे ग.. मला कळेल अस बोल..

समीरा : योग्य वेळ आली की तुला कळेल असच बोलेल मी.. आणि त्याच नाव सुद्धा सांगेल ज्याच्या मी प्रेमात..

वृषभ : ओके बाबा.. तुला जेव्हा सांगावस वाटेल तेव्हा सांग.. नसेल सांगावस वाटत तर नको सांगुस बट तु रडणं थांबव बघु.. इथे सगळे माझ्याकडे असे बघतायत जस काय मिच तुला काही तरी केलंय..

समीरा : मी घरी जाते..

वृषभ : Are you ok?? तुला नक्की बर वाटतंय ना.. म्हणजे मी सोडु का घरी तुला?? हवं तर तुला घरी सोडुन मग जातो मी..

समीरा : नाही.. नको.. मी जाईल..

वृषभ : नक्की ना??

समीरा : हम्ममम..

वृषभ : ओके.. बट घरी पोहचलीस की मला टेक्स्ट कर.. आणि अस रडत नको राहुस ग.. तुझ्या लाईफमध्ये कोणी तरी चांगलं नक्की येईल ग..

समीरा : मला माझ्या लाईफमध्ये तोच हवाय ज्याच्या मी प्रेमात आहे.. नाही तर कोणीच नको.. भेटेल का तो मला..??

वृषभ : मनापासुन प्रेम करत असशील तर नक्की भेटेल ग.. बट तु अशी रडत राहिलीस तर अजिबात नाही भेटणार.. 

वृषभ एका टेक्सीला हात दाखवत थांबवतो.. समीराला टेक्सीत बसवतो आणि बाय करतो.

समीरा घरी आली तर असते बट आज तिच कश्यातच लक्ष लागत नव्हत.. नेक्स्ट डे आई बाबांसोबत गावी जायच म्हणुन आपली बेग भरत होती.. तोच मानवचा दोन तिला येतो..

मानव : सॉरी थोडं बिझी होतो म्हणुन तुझा फोन उचलु नाही शकलो मी.." तु फोन का करत होतीस.. 

समीरा : मॅसेज वाचलास ना व्हाट्सएवर त्यासाठी.. आणि आत्ता मी बिझी आहे.. बाय..

मानव : ओके.. बाय.

समीरा : मानव.. 

मानव फोन कट करणार तोच समीरा त्याला बोलते..

मानव : येस..

समीरा : उद्या पासुन मी मुंबईत नाही.. गावी चाललीय.. तुझं जे काही काम असेल त्यासाठी तु दादाला नाही तर काकांना कॉल कर..

मानव : ओके.. डोन्ट व्हरी..

समीरा : फॉर व्हॉट.

मानव : तुझ्या गावी येऊन युला फॉलो नाही करणार मी.. हॅप्पी जर्णी.. बाय..

मानवच्या अश्या बोलण्याने समीराच्या ओठांवर हलकेच अस हसु येत.. हसतच ती त्याला बाय बोलते आणि फोन कट करून टाकते..

पाच महिन्यांनी...

दिल्ली गँगसोबत 31स्ट च सेलिएब्रेशन करून वृषभ कामावर जॉईंट झालेला.. पण पहिल्या सारख कामावर लक्षच लागत नसत त्याच.. दहा वाजुन गेले असतात तरी एकटक तो PC मध्ये बघत कसल्या तरी विचारांत हरवुन गेला असतो.. डोळे अगदी निस्तेज असे झाले असतात.. मोबाईलवर पिऊचा फोन येतो.. मोबाईल सायलेंटवर मॉडवर करत तो ड्रॉव्हरमध्ये ठेवुन देतो..

(काय झालं असेल वृषभला?? पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

©भावना विनेश भुतल

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now