अतरंगीरे एक प्रेमकथा १२५

In marathi

गाथा आणि सर्वेश मॉलमध्ये शॉपिंग करायला आले असतात.. तिला काय घ्यावं हे कळतच नसत.. शेवटी कंटाळुन ती शौर्यला फोन लावते..

शौर्य : घेतलंस गिफ्ट??

गाथा : आम्हां दोघांना वृषभला काय घेऊ हे कळतच नाही आहे..

सर्वेश : मी तर बोलतोय एखादं छानस ब्रेसलेट घेऊयात बट माई ऐकत नाही आहे.. (गाथाच्या हातातुन मोबाईल घेतच सर्वेश बोलतो)

शौर्य : सर्वेश... ते मीच गाथाला ब्रेसलेट नको घेऊ बोललोय.. कारण आमची मुंबई गॅंग तेच देणार आहे..

सर्वेश : मग वॉच तर घेऊच शकतो ना.. एखाद ब्रँडेड अस??

शौर्य : ते दिल्ली गॅंग देणार आहे..

सर्वेश : मग हॅडफोन अदरवाईज, ब्ल्यु टुथ??

शौर्य : नको.. माझ्या बर्थडे ला त्या लोकांनी तेच दिलेलं..

सर्वेश : ए माई पकड तु ह्या शौर्यचा फोन.. हे नको ते नको.. घरून निघताना तुला ठरवता नाही का येत?? मी आत्ता अजुन नाही हा फिरणार तुझ्यासोबत.. 

शौर्य काय घेऊ आम्ही?? आत्ता तुच सांग.. मला शॉ पिस वैगेरे पण नाही आवडत आहे रे.. सर्वेशच्या हातातुन फोन घेतच गाथा शौर्यला बोलते..

शौर्य : जॅकेट घे आणि एखादं छानस किचैन.. म्हणजे किचैन ला छानस घराच पेंडल असु दे.. अस काहीस घे.. आज ना उद्या त्याला त्याच घर घ्यायचय हे ते किचैन बघुन त्याला आठवत राहील.. आणि एखादं छानस पॉकेट पण घे.. बिल किती होईलं ते सांग मला मी पैसे ट्रान्सफर करतो.

गाथा : पैसे आहेत माझ्याकडे.. तु अजिबात ट्रान्सफर वैगेरे करणार नाहीस..

शौर्य : गाथा माझ्याकडुन आहे ना हे गिफ्ट.. मी देतो तुला पैसे..

गाथा : मी कोणी वेगळी आहे का?? तु दिलंस काय किंवा मी दिलंस काय एकच आहे..

शौर्य : तरी पण ग...

गाथा : आत्ता तु अस हट्टी पणा करणार आहेस की मला शॉपिंग पण करायला देणार आहेस ते सांग बघु??

शौर्य : अर्धे पैसे तरी घे..

गाथा : शौर्य...

शौर्य : माय स्वीट स्वीट जान.. प्लिज अस नकोना करुस.. मी खर तर विरला सांगणार होतो हे सगळं करायला.. मी बोललो ना तुला.. वृषभ प्रोबेशन पिरियडवर असताना बर्थडेसाठी त्याच्याकडे सुट्टी मागत होता हे त्याला कळलं तर विर परत वृषभवर भडकेलं ग.. नाही तर मी तुला अस त्रास दिलाच नसता.. आणि मी पुर्ण पैसे घे अस पण नाही ना बोलत आहे.. अर्धे तरी पैसे घे.. प्लिज

गाथा : जो पर्यंत मी हो बोलत नाही तो पर्यंत तु काही ऐकणार नाही.. 

शौर्य : म्हणजे तु पैसे घेतेयसना??

गाथा : नाही बोलली तर तु ऐकणार आहेस का?? 

शौर्य : ते तर आहेच..

गाथा : डेरिमिल्क वैगेरे पण घेऊ का??

शौर्य : तस त्याला गोड नाही आवडत.. बट घेणार असशील तर घे.. 

गाथा : अजुन काही??

शौर्य : अजुन म्हणजे हे सगळं घेऊन तुला पर्वा आर्यनच्या घरी जायचय.. बरोबर 7 वाजता.. जाशील? 

गाथा : हम्मम.. जाईल.. तुझा बेस्ट फ्रेंड म्हटलं तर मला तुम्हा दोघांसाठी तेवढं करावच लागेल ना.. आर्यनच्या घरचा एड्रेस टेक्स्ट करून ठेव मला.. 

शौर्य : थेंक्स गाथा एन्ड आय लव्ह यु सॉ मच.. 

गाथा : आय...(गाथा शौर्यला काही बोलणार तोच ती सर्वेशकडे बघत मध्येच थांबते.. सर्वेश एकटक गाथाकडेच बघत असतो) आय एम बिझी नाव्ह.. बाय..

शौर्य : सर्वेश ऐकतोय का??

गाथा : हम्मम.. मी घरी गेल्यावर करते फोन.. ओके.. टेक केअर.. 

शौर्य : हम्मम.. मिस यु.. एन्ड बाय.. एन्ड थेंक्स अ लॉट.. 

गाथा : हम्मम बाय..

गाथा शौर्यचा फोन ठेवत शौर्यने सांगितल्याप्रमाणे शॉपिंग करण्यात बिझी होते.. सर्वेशसुद्धा मदतीला असतोच तिच्या..

इथे विराज, अनघा आणि वृषभ दुसऱ्या दिवशी असलेल्या कलाईन्ट मिटिंगबद्दल डिस्कस करत असतात.

तु बनवतोस त्या प्रेझेंटेशनचा प्रश्नच नसतो.. बट ह्या वेळेला खुप क्रिएटिव्ह अस PPT केलयस.. यु आर एक्सलेंट.. बट न घाबरता तु ते कलाईन्ट समोर प्रेझेंट कर.. कलाईन्टच मन आपल्याकडे कस वळवायच हे तु आणि अनु तुम्ही दोघ बघणार आहात.. वृषभने बनवलेले PPT बघतच विराज बोलतो..

अनघा : ह्या वेळेला हे PPT फक्त नि फक्त वृषभच प्रेझेंट करणार आहे.. आणि विराज मला अस वाटत की लास्ट टाईम सारख मी वृषभला हेल्प केली नाही तरी चालणार आहे. हो ना वृषभ..??

वृषभ : तस मी मॅनेज करेल ग.. बट थोडी भीती ही वाटतेच ना.. कोणी तरी सिनियर्स सोबत असलं की मला थोडं रिलीफ वाटेल..

विराज : डोन्ट वरी.. अनु सोबतच असेल तुझ्या.. उद्या 8 वाजेपर्यंत तु ऑफिसमध्ये येणार आहेस.. ब्लेझर घालुन ये.. ओके..??

वृषभ : ओके.. 

विराज : तुला जे रिपोर्ट मी सांगितले ते बनवुन रेडी आहेत??

वृषभ : सॉरी टु से बट अजुन नाही झाले बनवुन.. आत्ता लगेच करायला घेतो मी..

विराज : डोन्ट वरी.. आय नॉ तु अनु सोबत बिझी होतास.. मी निखीलला सांगतो.. 

अनघा : तस पण त्याच्याशी आपल्याला बोलायचंच आहे.. 

विराज : आज नको.. मंडेला बघुयात.. हा विक जाऊ देत.. 

अनघा : वृषभ मी जे रिपोर्ट तुला बनवायला सांगितले ते तु बनव.. आपल्याला मे बी उद्या गरज लागेल..

वृषभ : हम्मम.. घेतो लगेच बनवायला..

विराजच्या ऑफिसमध्ये सगळेच दुसऱ्यादिवशी असणाऱ्या मिटिंगच्या तैयारीला लागले..

वृषभ घरी येऊन पण समोर लॅपटॉप घेऊनच बसलेला.. अजुन काही वेगळं करता येईल का किंवा अजुन कोणते नवीन पॉईंट PPT मध्ये एड करता येईल आणि मला प्रेझेंट करता येईल ह्याचा विचार तो करत असतो. 

तोच जेवायला ये म्हणुन आर्यनचा फोन त्याला येतो.. येतो अस बोलतो बट तो पुन्हा आपल्या कामात गुंतून जातो.. खाली सगळेच त्याची जेवणासाठी वाट बघत असतात.. पुन्हा आर्यन त्याला फोन करतो.. आलोच अस बोलत तो लॅपटॉप तसाच बाजुला ठेवत पळतच खाली जातो..

सॉरी.. माझ्यामुळे लेट झाला तुम्हांला.. बट खुप काम आहे आज.. डायनिंग टेबलवर बसतच तो सगळ्यांना बोलतो..

आर्यन : आज काल जास्तच कामात असतोस तु..

वृषभ : उद्या स्विझरलेंडवरून क्लाईन्ट येणार आहेत.. त्यांच्यासोबत मला डिल करायचीय.. त्यासाठीच उद्या ऑफिसला पण लवकर जावं लागेल.. आजची रात्र माझी पुर्ण कामातच जाणार आहे.. खुप म्हणजे खुप काम आहे.

आर्यनचे पप्पा : एवढं काम करतोस.. बट त्या मानाने पेयमेंट खुप कमी आहे.. काम वाढवल तस पेयमेंट पण वाढवल पाहिजे.. 

आर्यन : हो ना बघावं तेव्हा लॅपटॉप घेऊन कामच करत असतोस..

वृषभ : पेयमेंट वाढवलना माझं.. आत्ता सत्तर हजार आहे मला..

आर्यन : अरे वाहह.. मला बोलला नाहीस तु..

वृषभ : ट्वेन्टी लॅक्स मिळाले बोललो ना मी.. तेव्हाच तर पेयमेंट वाढलाय माझा.. 

आर्यनची आई : मला बोलला तो..

आर्यन : हे बर आहे वृषभ तुझं.. मला नाही सांगितलं तु.

वृषभ : काकूंना सांगितलं म्हणजे मी तुला पण सांगितलंच असेल.. तुझ्यापासुन का लपवु मी..

आर्यन : मला तर आजच कळतंय अस काही झालंय.. मला 20 लाख बद्दल पण नाही माहिती..

आर्यनची आई : तु नैतिककडे गेलेलास तेव्हा..

वृषभ : अरे हा.. तेव्हा तु नव्हतास.. काका पण नव्हते.. काकी आणि पिऊच होती.. त्यानंतर तु हॉस्पिटलमध्ये होतो.. मग राहुनच गेलं सांगायच..

(सगळेच गप्पा गोष्टी करत असतात)

मम्मी तु हे किचनमध्येच विसरलीस.. पिऊ हातामध्ये एक प्लॅट घेऊन येतच त्याला बोलते.. एवढ्या दिवसांनी पिऊला बघुन वृषभच हृदय अगदी धडधडु लागलं असत.. थोडीशी तब्येत उतरली होती बट बाकी आहे तशीच होती.. डोळ्यांखाली आलेले काळे वर्तुळ आत्ता काही दिसत नव्हते.

आर्यन : काय आहे??

पिऊ : कटलेट.. (वृषभ आणि आर्यनच्या समोर प्लॅट ठेवतच ती बोलते.. )

प्लॅटमधले कटलेट्स बघुन वृषभच हृदय अगदी नाचु लागलेलं.. खुप दिवसांनी त्याला तिच्या हातच अस काही खायला मिळणार होत.

आर्यनच्या बाजुला चेअर घेऊन पिऊसुद्धा आज त्यांच्यासोबत जेवायला बसते.. एवढ्या दिवसांनी वृषभ आज पिऊला बघत तर होता पण ती काही त्याच्याकडे बघत नसते..

पिऊ तुला जास्त रागवताच येत नाही.. दोन दिवस गेले की आहे तो राग पण निघुन जाईल तुझा.. मनातल्या मनात हसत तो स्वतःशीच बोलत असतो..

आर्यन : सॉस पण आणायचास ना.. कटलेट सॉस बरोबर खायला छान लागतात..

आणते.. अस बोलत पिऊ उठुन आत गेली.. 

एवढ्या दिवसांनी तिचा नाजुक असा आवाज ऐकुन वृषभ आतल्या आत सुखावत होता..

हम्मम.. आर्यनच्या पुढे सॉसची बॉटल धरतच पिऊ बोलते..

वृषभ डायनिंग टेबलवर दिसणाऱ्या पिऊच्या प्रतिबिंबाकडे बघतच जेवत असतो. पिऊला ते सगळं कळत असत.. 

आर्यनचे पप्पा : आई पप्पा कसे आहेत तुझे.. मी खुप दिवस झाले विचारलं नाही..

वृषभ : मी इथे त्यांच्यापासून लांब आहे म्हटलं तर ते कसे असणार..?

आर्यनची आई : त्यांना बोलवं ना इथे थोडे दिवस रहायला..

वृषभ : थोडे दिवस नाही कायमचंच बोलवणार आहे.. म्हणजे मी घर घेतोय स्वतःच.. मग आई पप्पांना कायमच इथे मुंबईतच आणणार मी माझ्यासोबत रहायला.. 

आर्यन : नैतिक बोलला मला.. तु त्याच्या इथे रुम बघतोय ना??

वृषभ : हम्मम.. थोडे महिने मग तुम्हा कुणालाच माझा त्रास नाही.. मी जाईल इथुन निघुन.. (वृषभ पिऊकडे बघतच बोलतो)

(वृषभकडे बघायच नाही अस मनात अगदी पक्क करून आलेली पिऊ वृषभच्या अश्या बोलण्याने मात्र त्याच्याकडे बघु लागते. वृषभ परत लांब जाईल ह्या विचाराने तिचा नाजुकसा चेहरा लगेच कोमेजून जातो.. हातातील घास तसाच हातात पकडत ती त्याच्याकडे बघत रहाते..)

आर्यनची आई : वृषभ आज बोललायस परत बोलायच नाही हा अस.. जस तुझ्या आईला तु तिच्यापासून लांब आहेस म्हणुन त्रास होतो तसच माझं आहे..

आर्यनचे पप्पा : तु असच खुप मोठा हो, पुढे खुप प्रगती कर.. पण आम्हाला तुझा त्रास होतोय अस कधी बोलु नकोस.. तुझ्या अश्या बोलण्याने आम्हांला त्रास होईल आत्ता.

आर्यन : बघा तर.. जास्तच मोठा झालायस तु.. (वृषभच्या डोक्यात मारतच आर्यन त्याला बोलतो)

वृषभ : सॉरी.. (वृषभ पिऊच्या नजरेत बघत एका हाताने आपलं डोकं चोळत बोलतो..) कटलेट खुप छान झालेत.. पिऊ सारखे कटलेट कुणालाच बनवता नाही येणार..

आर्यन : पिऊला मीच बनवायला शिकवलंय.. हो ना पिऊ??

पिऊ : हो..

वृषभ : खरच??

पिऊ : जर नाही म्हटलं की दादा परत रडायला चालु करेल.. हो ना दादा??

(पिऊ पहिल्यासारखी आर्यनसोबत मस्ती करतेय हे बघुन वृषभला थोडं हायस वाटत..)

आर्यन : एवढे दिवस कोण रडत होत ते दिसत होत.. इंजेक्शनला बघुन अजुन पण लहान मुलांसारखं रडतेस तु.. 

पिऊ थोडा नकट्या रागातच आत्ता आर्यनकडे बघत असते.. आर्यन अस बोलताच वृषभ गालातल्या गालात हसतच तिच्याकडे बघतो..

आर्यन : अस का बघतेयस?? तु नव्हती का रडत??  (आर्यन आपल्या भुवया उडवतच पिऊला बोलतो)

आर्यनचे पप्पा : आर्यन.. का त्रास देतोयस तिला?? जेव बघु गप्प..

पिऊ : पप्पातुम्ही का सांगितलं त्याला मी रडत होती म्हणुन??

आर्यन : ए रडु बाई.. तस पण ब्लड चॅक करायला जायच म्हणुन तु इथुनच रडत होतीस हे माहिती नाही का मला.. पप्पांनी कश्याला सांगायला हवं.. 

पिऊ : पप्पा सांगणा ह्याला..

आर्यन : हा पप्पा सांगाणा मला.. डॉक्टरांनी सुई टोचल्यावर ही कशी रडत होती ते.. 

(वृषभला आर्यनची आणि पिऊची मस्ती बघुन हसत असतो..)

पिऊ : जस तु हॉस्पिटलमध्ये हुंदके देऊन रडत होतास तस की नव्हती रडत..

आर्यन : तु माझ्या जागी असतीसना पिऊ मग तु तर मोठा भोंगाच पसरला असतास.. मग पप्पांना कोच्चीवरून  बोलवावं लागलं असत मला.. मग पप्पांना तुला कडेवर उचलुन घेऊन हॉस्पिटलमध्ये फिरवाव लागलं असत. तेव्हा कुठे तु रडायची शांत झाली असतीस..

पिऊ : पप्पा सांगणा दादाला..

आर्यनचे पप्पा : आर्यन का त्रास देतोयस तिला.. जेव बघु गप्प.. आणि अभ्यासाला सुरुवात कर जरा.. CA आणि MCOM दोन्ही एकत्र करण खाऊ नाही आहे.. लहान मुलासारखं टीव्हीवर कार्टुन बघणं बंद कर.. 

पिऊ : कळलं दादा.. लहान मुलासारखं टीव्हीवर कार्टुन बघणं बंद कर बोलतायत पप्पा तुला.. 

आर्यन : पप्पा आत्ता तिला पण बोला.. तिला नाही काही बोलणार.. मी जरा काही बोलायला गेलो तर लगेच मला बोलता..

पिऊ : पप्पा दादा खरच रडायला लागेल आत्ता.. तुम्ही तो रडु नये म्हणुन थोडं खोटं खोटं तरी ओरडा मला..

सगळेच आर्यनकडे हसतच बघत असतात.. तोच पिऊच्या मोबाईलमध्ये SMS ची ट्युन वाजते.

आर्यन : पिऊ मोबाईल बघुना इथे तुझा.. 

पिऊ जेवता जेवता डाव्या हाताने आपला मोबाईल अनलोक करत कोणी मॅसेज केलाय हे बघणार होती तोच आर्यन आपला हात लांब करतच तिच्याकडे मोबाईल मागतो.. पिऊ काहीही न बोलता गप्प पणे आपला मोबाईल आर्यनकडे देते.. 

वृषभला आर्यनच्या अश्या वागण्याचा खुप राग येत असतो. पण हे काही नवीन नसत.. तो जेव्हापासून आर्यनच्या घरी रहायला आलेला असतो तेव्हा पासुन आर्यनच हे अस वरच्यावर चालुच असत.. ताटातील जेवण पटापट संपवत तो आपल्या रुममध्ये जात कामाला लागतो.. रात्रीचे साडे तीन वाजतात त्याला झोपायला.. सकाळी आठ वाजता विराजने ऑफिसमध्ये बोलवलय म्हटलं तर सकाळी साडे सहा वाजताच तो आपले डोळे चोळत उठतो.. पावणे आठ पर्यंत तो ऑफिसमध्ये पोहचला असतो.. विराज आणि अनघा सुद्धा ऑफिसमध्ये हजर असतात. 

वृषभ अनघाला त्याने PPT मध्ये थोडे फार केलेलं चँजेस दाखवत असतो..

गुड.. अनघा टाळ्या वाजवत त्याच कौतुक करतच बोलली..

दोघेही कोणकोणत्या पॉईंटवर डिस्कशन करणारे हे ठरवत होते.. हळूहळू ऑफिसमध्ये एकएक स्टाफ जमु लागला.. 

सकाळी तिघेही लवकर आल्यामुळे विराज आणि अनघा वृषभला आपल्यासोबतच घेऊन केंटींगमध्ये ब्रेकफास्ट करायला घेऊन जातात कारण एकदा मिटिंग सुरू झाली की लंच करायला मिळणार नाही हे तिघांना माहिती होत..

विराज आणि अनघा वृषभला एवढी स्पेसिअल ट्रिटमेंट देतायत हे बघुन निखील रागाने लालबुंद होत असतो.. मी डिपार्टमेंट हॅड असुन सर ह्याला का एवढं इंपोर्टन्ट देतायत.. मला पण ही मिटिंग हँडल करायला देऊच शकत होते ना अस त्याच झालं असत.. तो रागातच तिथुन उठत वर टेरेसवर येऊन उभ राहतो.. तो अस रागात निघुन गेलाय हे बघुन रिया सुद्धा त्याची समजुत काढायला त्याच्या मागे येते.. बाहेर तिला तो कुठेच दिसत नाही.. नेहमीच्या जागेवर गेला असेल अस बोलत ती टेरेसवर त्याला शोधायला त्याच्या मागे येते..

रिया : निखील तु तुझ्या चेहऱ्यावर त्याच्यावरचा राग का दाखवुन देतोयस.. लास्ट टाईम त्याने कोन्ट्रॅक्ट मिळवुन दिलं ह्याचा अर्थ असा नाही की हे कॉन्ट्रॅक्ट पण तो मिळवुन देईल.. तु थोडी वाट का नाही बघत.. 

निखील : बट नेहमी नेहमी तोच का?? माझी काम पण त्यालाच देतायत सर. 

रिया :  तुझी काम दुसऱ्याकडे जातील अशी वेळ नको आणुस तु हे मी तुला बोलली होती.. बट तु ऐकतच नाहीस माझं.. 

निखील : मला खरच आत्ता काही तरी करावं लागेल.. 

रिया : नको ते करण्यापेक्षा काम सिरियसली कर म्हणजे झालं.. सरांना आपली गरज लागेल खाली. दोघेही डेस्कवर दिसलो नाही तर पुन्हा ओरडा पडेल. नको ते विचार करत बसु नकोस.. जास्त मेहनत करून जशी तु डिपार्टमेंट हॅडची पोझिशन मिळवलीस.. तशीच मेहनत करून ती टिकव.. आणि आत्ता चल बघु..

(रिया निखिलची समजुत काढतच त्याला आपल्यासोबत घेऊन जाते)

साधारण साडे तीनच्या दरम्यान वृषभ कलाईन्ट सोबत आपली मिटिंग आटोपुन, अनघासोबत त्यांना ऑफिसच्या मॅन गेटजवळ सोडुन आपल्या डेस्कवर येऊन डोकं धरून बसतो.. अनघाला ही मिटिंग होताच विराजने त्याच्या कॉन्फरेन्समध्ये बोलवलं असत.. त्यामुळे मिटिंग होताच ती विराजच्या काँफेरेन्सरूम मध्ये जाते.. 

वृषभला अस डोकं धरून बसलेलं बघुन निखीलला खुप हसु येत असत.. हि डिल झाली नाही हे त्याला वृषभकडे बघुन कळत असत.. 

काय झालं?? कार्तिक वृषभच्या जवळ येतच त्याला विचारतो..

निखील : कार्तिक काही वेळेस माणस विसरतात की आपल्याला पंखच नाही ते.. उडण्याचा अनुभव नाही हे माहीत असुन सुद्धा उडायला जातात आणि तोंडावर पडतात.. 

कार्तिक : हा तु तुझा अनुभव सांगतोयस का??

निखील : नाही रे मित्रा.. ज्याला अनुभव आलाय त्याचा अनुभव मी सांगतोय.

(वृषभकडे बघतच निखील बोलतो)

कार्तिक : काय झालं वृषभ..

वृषभ : डोकं खुप दुखतंय..

कार्तिक : चल बघु इथुन.. आपण केंटींगमध्ये जाऊयात.. भुक लागलीय मला..

कार्तिक जबरदस्ती करत वृषभला केंटींगमध्ये घेऊन जातो.. जाता जाता रिसेप्शनीस्ट कडुन पेनकिलर सुद्धा घेतो..

वृषभ : तु का जेवला नाहीस..

कार्तिक : तुझ्यासोबत जेवायची सवय झालीय ना.. 

वृषभ : काय तु पण.. भूक लागली की जेवुन घेत जा अस थांबत नको जाऊस.. 

कार्तिक : झाली का डिल??

(वृषभ थोडा गंभीर असा चेहरा करत कार्तिककडे बघत असतो..)

अस का बघतोयस?? नाही झाली का?? कार्तिक पण आत्ता गंभीर चेहरा करत वृषभकडे बघत त्याला विचारतो..

वृषभ : नाही झाली...

काय?? कार्तिक तोंड पाडतच वृषभला बोलतो..

अस कसं होईल?? वृषभ थोडं हसतच कार्तिकला बोलतो..

कार्तिक : म्हणजे???

म्हणजे?? वृषभ आपल्या भुवया उडवत, गोड अशी स्माईल देतच कार्तिकला बोलतो..

येहहहह.. कार्तिक वृषभला हाय फाय देतच बोलतो..

कार्तिक : तो निखील अस बोलत होता मग तु त्याला काही बोलला का नाहीस.. त्याच्या तोंडावर बोलायच ना मग तोच तोंडावर पडला असता.. 

वृषभ : मॅमने कोणाला काही सांगु नको अस सांगितलंय.. म्हणजे सर एकदा कलाईन्ट सोबत बोलतील.. कॉन्ट्रॅक्ट पेपर बनवतील.. ते सगळं झालं की तेच आनऊन्समेंट करतील म्हणुन.. पण तु माझा खास मित्र आहेस म्हणुन तुला सांगितलं मी. आणि निखिलच्या बोलण्याने मी तो बोलतो तसा थोडी ना होणार.. त्यात माझं डोकं पण खुप दुःखतय.. 

पोटभर जेव आणि हि पेनकिलर घे.. बर वाटेल तुला.. कार्तिक वृषभच्या हातात पेनकिलर देतच त्याला बोलतो..

वृषभ : थँक्स यार.. 

दोघेही जेवण आटोपुन आपापल्या डेस्कवर येऊन बसतात.. आणि कामाला लागतात..

साधारण साडे पाचच्या दरम्यान विराज आणि अनघा वृषभच्या डेस्कजवळ येतात..

विराज अस बाहेर आलाय हे बघुन सगळेच उठुन उभं रहातात..

गुड जॉब वृषभ.. वृषभला हात मिळवत त्याची पाठ थोपटतच विराज त्याला बोलतो..

थेंक्यु सर.. वृषभ खुश होतच विराजला बोलतो..

निखीलसोबत सगळेच थोडं चकित होत वृषभकडे बघत रहातात..

विराज आपल्या सगळ्या स्टाफ समोर वृषभच कौतुक करतो.. कार्तिकने टाळ्या वाजवायला सुरुवात करताच सगळेच वृषभसाठी टाळ्या वाजवु लागतात.. एक एक करून सगळेच त्याच्या डेस्कवर येत त्याला कॉंग्रेच्युलेशन करत असतात..

वृषभच अभिनंदन करून होताच विराज आत केबिनमध्ये येतो.. विराजसुद्धा खुप म्हणजे खुप खुश असतो तो.. अनघासोबत लग्न झाल्यापासून असे मोठं मोठे कॉन्ट्रॅक्ट त्याला सहज मिळत चालले असतात..

आय एम सॉ सॉ हॅप्पी अनु.. यु आर लकी फॉर मी..अनघाला घट्ट मिठी मारतच तो तिला बोलतो..

अनघा : विराज काय चाललंय तुझं?? साक्षीने हात फिरवला वाटत तुझ्यावर..

विराज : तस समजु शकतेस तु हवं तर.. बट थेंक्स टु यु.. लास्ट टाईम तु वृषभवर ओव्हर कॉन्फिडेंट होऊन त्याला एक संधी दिलीस त्याबद्दल.. नाही तर खरच त्याच्यातील हे टेलेंट आपल्यापासुन लपुन राहील असत..

अनघा : मग आज फॅमिली डिनर होऊन जाऊ दे..

विराज : नॉट बॅड आयडिया.. बट सगळ्यात आधी शौर्यला कळवतो.. 

अनघा : आपण डिनरला जाऊ तेव्हाच फोन करूयात त्याला.. परत लेक्चर मिस झालं की लास्ट टाईम सारख भडकेल तुझ्यावर..

विराज : अरे हो.. सहा वाजत आलेत ना.. डिनरला जाऊ तेव्हाच करतो मी त्याला फोन.. मी काकाला फोन करून कळवतो.. म्हणजे काकी उगाच जेवण बनवत बसेल सगळ्यांसाठी.. 

अनघा : ओके..

विराज : तु आई बाबांना पण फोन कर.. त्यांना पण बोलव म्हणजे सोबत गाथा आणि सर्वेशला पण घेऊन यायला बोल.. सगळे एकत्रच सेलिब्रेशन करूयात.. म्हणजे संपुर्ण फॅमिली सोबत सेलिब्रेशन केल्यासारखं होईल..

विराज त्याच्या फॅमिली सोबत माझ्या फॅमिलीला पण आपलं म्हणतोय म्हणुन अनघाला खुप आनंद होतो.. त्याला थेंक्यु म्हणत एक घट्ट अशी प्रेमाने मिठी मारते..

विराज : आत्ता तुझ्यावर कोणी हात फिरवला?? (विराज गंमतीच्या सुरात अनघाला बोलतो)

अनघा : माझ्या ह्या नवऱ्याने.. (विराजच नाक दाबतच ती त्याला बोलते) आणि माझ्या छोट्याश्या नंदेने..

अनघा अस बोलताच विराजला हसु यायला लागत.. दोघेही एकमेकांना मिठी मारत हसु लागतात..

संध्याकाळी 9 च्या सुमारास विराजची फॅमिली हॉटेलमध्ये आली असते.. गाथाची फॅमिली मात्र ट्राफिकमध्ये अडकली असते.. सगळेच त्यांची वाट बघत स्टेटर्स ऑर्डर करायला घेतात..

स्टेटर्स येईपर्यंत काका शौर्यला फोन लावतो.. शौर्यसुद्धा आपल्या मित्र मंडळींसोबत लंच करत असतो..

शौर्य : हॅलो काका.. मी थोड्यावेळाने फोन लावणारच होतो तुला..

काका : बिझी आहेस का??

शौर्य : नाही रे लंच करतोय..

साक्षी : आम्ही डिनर करतोय.. दादा आम्हांला रेस्टोरेन्ट मध्ये घेऊन आलाय.. दादाकडून पार्टी आहे आम्हांला आज..

शौर्य : कुठेय तो??

विराज : आहे इथेच..

शौर्य : उद्या बिझी आहेस का तु?? जे आज डिनरला घेऊन आलायस सगळ्यांना..

विराज : आज डिल झालीय मग आजच घेऊन येणार ना मी.. उद्या का घेऊन येऊ..

शौर्य : कसली डिल..?

विराज : वृषभने मला स्विझरलेंडच कॉन्ट्रॅक्ट मिळवुन दिलं.. 

शौर्य : तरी पण उद्याच घ्यायचीस ना.. मग स्वराजची आठवण म्हणुन छोटस बर्थ डे सेलिब्रेशन पण केलं असतस आणि कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाल त्याच सेलिब्रेशन सुद्धा केलं असतस तु..

शौर्य अस बोलताच विराज थोडं गंभीर होतच त्याच्याकडे बघतो.. तोच गाथा आणि तिची फॅमिली पण तिथे येते.. सर्वेश नेहमीप्रमाणे पळतच आपल्या दि च्या बाजुला येत सगळ्यांना हाय हॅलो करतो.. 

शौर्य : हेय ड्युड.. व्हाट्सएप..

सर्वेश : अरे वाहह शौर्य.. तु पण ह्या डिनरमध्ये आमच्यासोबत आहेस.

शौर्य : तस समजु शकतोस तु.. बट फरक एवढा आहे की तु डिनर करतोयस एन्ड मी लंच.. तु फॅमिली सोबत आहेस आणि मी इथे एकटा..

सर्वेश : डोन्ट वरी ड्युड.. नेक्स्ट इयर मी असेल तुझ्यासोबत.. मग एकत्रच डिनर एन्ड ऑल करूयात..

शौर्य : मी वाट बघतोय तुझी.. आई बाबा कसे आहेत..

शौर्य सगळ्यांची विचारपुस करत असतो.. सगळेच गप्पा गोष्टी करत डिनर एन्जॉय करत असतात.. शौर्य आपल्या फॅमिलीला अस एकत्र आणि   आनंदी बघुन खुप खुश असतो.. विराज मात्र अस्वस्थ असतो.. स्वराजचा बर्थ दे तो विसरला नसतो.. बट खरच शौर्य बोलतो तस उद्याच जर मी पार्टी द्यायच ठरवलं असत तर किती बर झालं असत ह्याचा विचार तो करत असतो.. स्वराजची आठवण सुद्धा येत असते त्याला.. त्याच्या आठवणीने जेवण सुद्धा आत्ता त्याला जात नसत.. अनघाच त्याच्याकडे लक्ष असत बट आपल्या आई पप्पांसमोर नको तो विषय निघेल म्हणुन ती शांत रहाते.. एकंदरीत विराज सोडुन सगळेच डिनर एन्जॉय करतात..

दुसऱ्यादिवशी...

आपल्याला वृषभचा बर्थ डे माहिती आहे हे त्याला कळु द्यायच नाही अस मुंबई गॅंगच ठरलेलं त्यानुसार सगळे तैयारीला लागले असतात.. सगळ्यांच ठरलं असल्यामुळे शौर्यसुद्धा वृषभला फोन करून बर्थ डे विश काही करत नाही.. दिल्ली गॅंग मात्र रात्री 12 वाजता एकत्रच व्हिडीओ कॉल करत वृषभला विश करते.. 

सकाळी उठुन नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला तो निघतो तर ऑफिस गेटजवळ समीरा त्याला दिसते.. समीराला आपल्या ऑफिसजवळ बघुन वृषभला आश्चर्य वाटत..

कस वाटलं सरप्राईज?? वृषभ जवळ येताच ती त्याला विचारते..

वृषभ : तु इथे काय करतेयस??

this is your birthday gift.. वृषभ समोर तिने त्याच्यासाठी घेतलेल्या गिफ्टची केरिबेग धरतच समीरा त्याला बोलते..

वृषभ : समीरा तु पण ना... ह्याची काय गरज आहे.??

समीरा : गरज आहे म्हणुनच तर इथे आलीय ना.. हे बघ हे गिफ्ट आपल्या दिल्ली गॅंगकडुन आहे.. (एक छोटासा बॉक्स ती वृषभला दाखवत बोलली..) ते सोडुन बाकी जे आहे ते माझ्याकडुन. आणि पकड बघु लवकर.. 

वृषभ : थेंक्स.. (वृषभ तिच्या हातातली केरिबेग पकडतच बोलतो)

वन्स अगेन हॅप्पी बर्थडे.. वृषभच्या समोर आपला उजवा हात धरतच ती त्याला बोलते..

थेंक्स.. वृषभ आपला उजवा हात तिच्या हातात देतच तिला बोलतो..

समीरा : मग आज काय स्पेसिअल प्लॅन?? 

वृषभ : काहीच नाही.. ऑफिस आणि घर..

समीरा : ओहह.. मी इथे असती तर आपण मस्त पैकी कुठे तरी फिरायला गेलो असतो एन्ड तिथुन डिनरला.. 

वृषभ : तु कुठे चाललीस??

समीरा : अरे दादाने मला नको त्या कामात अडकवलय.. आज पुण्याला कॉन्फरन्स मिटिंग आहे.. हे बघ.. ह्याचा फोन पण आला.. हा माझ्याआधी पोहचला वाटत ऑफिसमध्ये.. (आपल्या मोबाईल स्क्रिनवर दिसणार मानवच नाव वृषभला दाखवतच ती त्याला बोलते) साडे नऊ वाजता बोलली तर 9 वाजताच येऊन बसतो हा मुलगा..

वृषभ : अरे वाह.. मानव पण येतोय सोबत??

समीरा : हम्मम..

वृषभ : बट मानलं पाहिजे मानवला.. आत्तापासूनच किती टाईम देतो तो तुला.. खुप जास्तच एक्साईट असतो तुला भेटायला.. चक्क अर्धा तास आधी येऊन तुझी वाट बघत असतो तो.. How romantic he is..

समीरा : वृषभ.. आज बर्थ डे आहे तुझा म्हणुन तुला सगळं माफ.. नाही तर मी त्यादिवशीच सगळं लक्ष्यात ठेवलं आहे तुझं.. आजच सुद्धा त्यात एड करून एकदा बघतेच तुझ्याकडे मी..

वृषभ : समीरा प्लिज.. माझ्याकडे बघत बसण्यापेक्षा तुझ्या मानवकडे बघत बस.. आय मीन त्याचा फोन उचल ग. बिचारा सारख सारख फोन करतोय तुला..

समीरा : ऑफिसमध्ये जाऊन बोलतेरे मी त्या बिचाऱ्याशी.. आत्ता बाय.. मला उशीर होतोय..

वृषभ : आय नॉ तो खडूस वाट बघत असेल तुझी.. (वृषभ परत गंमतीच्या सुरातच समीराला बोलतो)

समीरा : मानव खडूस नाही.. म्हणजे तस तो दाखवतो बट मनाने खुप चांगला आहे.. त्याच्यासोबत काम करते म्हणुन मला माहिती..

वृषभ : आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती चांगलीच वाटते ग आपल्याला.. 

समीरा : हो का?? बाय दि वे तुझ्या तिने तुला बर्थ डे विश केलं की नाही..

वृषभ : नाही ना.. (वृषभ नाराज होतच बोलतो) तिला माहितीच नाही ना माझा बर्थ डे आहे ते.. आणि माहिती असत तरी नसत केलं तिने..

समीरा : तुझा बर्थ डे तिला माहिती असायला हवा ना??

वृषभ : तिला कस माहिती असणार समीरा..? मुंबईतील कोणत्याच फ्रेंडला मी सांगितलं नाही आणि सांगणार पण नाही. आत्ता तुला उशीर होईल.. पुण्याला जाणार आहेस ना तुझ्या मानवसोबत??

समीरा : मी, माझे काका आणि मानव चाललोय.. आणि मानवच्या हाताखाली काम करणारे एक दोन एम्प्लॉयीज सुद्धा आहेत.. फक्त मानव सोबतच नाही जात आहे मी.. कळलं तुला??

वृषभ : ओहहह.. म्हणुन तु अशी नाराज आहेस??

वृषभ.. समीरा थोडी रागातच पण मस्तीतच नेहमीप्रमाणे वृषभची मान पकडते..

सॉरी.. सॉरी.. (वृषभ आपल्या माने भोवतालचा समीराचा हात सोडवतच तिला बोलतो)

समीरा : तु परत मला मानववरुन चिडवलस तर मी कधीच बोलणार नाही हा तुझ्याशी.. बघ.. मी विसरून जाईल तु माझा मित्र आहेस ते.

वृषभ : तस पण प्रेमात पडल्यावर माणस विसरभोळीच होतात ग.. मी समजु शकतो तुझ्या फिलींग..

समीरा : वृषभ आज काल खुपच त्रास देतोस तु मला.. 

वृषभ : दिल्लीला गेलेलो तेव्हा तु आणि आपली दिल्ली गॅंग मिळुन मला ह्यापेक्षाही जास्त त्रास देत होते.. ते पण माझ्या घरी राहुन तुम्हा लोकांच नुसतं मिनाक्षी मिनाक्षी चालु होत.. आठवतय ना??

समीरा : त्यानंतर तर मी तुला नाही ना त्रास दिला.. तु एकच गोष्ट धरून बसतोस.. मी बघतेच तुला नंतर.. बट आत्ता बाय.. मला उशीर होतोय..

वृषभ :  मला पण उशीर होतोय.. इथे विर माझी वाट बघत असेल आणि तिथे मानव तुझी.. (तोच समीराच्या हातातला फोन वाजतो) बघ एक मिनिट सुद्धा त्याला तुझ्याशिवाय रहावत नाही.. 

समीरा : आत्ता ह्याच्याकडे बघते आणि सेटरडे ला भेटणारच आहेस मला..  हे विसरू नकोस..

वृषभ : नाही ग विसरत... बट थेंक्स फॉर दिस गिफ्ट.. आणि माझ्यासाठी इथे येऊन अस छानस सरप्राईज दिलस त्याबद्दल पण खुप खुप थेंक्स.. सांभाळुन जा.. ओके??

समीरा : हम्मम. एन्जॉय युअर डे.. बाय..

समीराला बाय करत वृषभ ऑफिसमध्ये येतो.. समीराने दिलेली बेग आपल्या डेस्कच्या ड्रॉव्हरमध्ये तशीच ठेवत तो कामाला लागणार तोच कार्तिक त्याच्या डेस्कजवळ येते त्याला सगळ्यांसमोर मिठी मारत त्याच्यासाठी आणलेले गिफ्ट त्याच्या हातात देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.. कार्तिक बर्थ डे विश करतोय म्हटलं तर आजुबाजूचा स्टाफला सुद्धा वृषभचा बर्थ डे आहे हे कळत.. त्याचे इतर कलीग सुद्धा एक एक करून त्याला बर्थडे विश करू लागतात.. सगळ्यांच बर्थ डे विश करून होताच वृषभ फायनली आपल्या कामाला लागतो..

विराज आज आपल्या केबिनमध्ये अगदी शांत बसला असतो.. डोळे मिटुन स्वराजच्या आठवणीत तो घुसला असतो..

अनघा : विराज.. प्लिज ब्रेकफास्ट तरी करून घे..

विराज : नकोय ग.. मला भुक लागली की माझं मी घेतो खाऊन,..

अनघा : काल रात्री पण तु नीट जेवला नाहीस.. आज सुट्टी घेऊन आराम कर म्हटलं तर ते ही नाही केलंस तु.. 

विराज : सुट्टी घेऊन काय झालं असत?? आठवण येण मी थांबल असत का?? उलट घरी एकटा राहुन त्रास झाला असता.. आणि आज काम पण खुप आहेत ऑफिसमध्ये.. तुला पण माहितीय.. 

अनघा : मग काय करूयात सांग..

विराज : आज खुप त्रास होतोय ग. स्वराजची आठवण येतेय बट मम्मीची पण येतेय.. 

अनघा : आपण घरी छोटस सेलिब्रेशन करूयात.. म्हणजे स्वराजला जे आवडायच ना ते काकींना बनवायला सांगुयात.. काकी तुझ्या मम्मीसारखच थोडं फार जेवण बनवतेना म्हणुन बोलतेय.. तु आणि मी मदत करूयात काकीला जेवण बनवायला चालेल??

विराज : हम्मम्म.. घरी जाताना पाइन-एप्पल कॅक पण घेऊन जाऊयात. माझ्या स्वराजला खुप आवडायचा.. 

अनघा : ओके.. कॅक तु आणि साक्षी मिळुन कट करा.. शौर्य असता तर त्यालाच सांगितलं असत आपण कॅक कट करायला.. 

विराज : आत्ता जर तो असता तर शौर्यसारखाच असताना.. म्हणजे लहानपणी तर शौर्यसारखाच होता अतरंगी.. मोठा तर झालाच नाही ना तो.. बरोबर सहा वर्षाचाच राहिला.. 

(डोळ्यांतुन येणार पाणी पुसतच विराज बोलतो)

अनघा : विराज.. नको ना अस रडुस..

विराज : आठवण येतेय ग त्याची.. का मम्मी त्याच्या आयुष्यासोबत खेळली अस वाटतंय ग मला.. खुप राग येतोय तिचा.. खुप त्रास झालेला ग त्याला.. ते सगळं आठवतय मला परत.. 

अनघा : विराज.. त्यांना तुमच्यासोबत अस वागताना किती त्रास झाला असेल ह्याचा विचार कर.. आई होती रे ती तुझी.. आणि आत्ता डोळे पूस बघु.. खुप काम आहेत ना आपल्याला.. पटापट आवरून घरी पण जायचय आपल्याला.. आपल्या स्वराजच बर्थ डे सेलिब्रेशन नको का करायला..(विराजची समजुत काढतच अनघा बोलते)

विराज : हम्मम.. (खोल श्वास घेत तो बोलतो..) वृषभ आलाय ना?? नाही म्हणजे मगाशी आपण आलो तेव्हा डेस्कवर नव्हता तो.. खुप काम आहेत त्याच्याकडे.. 

अनघा : मला कस माहिती असणार.. मी आल्यापासुन तर तुझ्यासमोरच बसुन आहे..

विराज : अरे हो.. एक मिनिट..

विराज लेंडलाईनवरून वृषभला कॉल करतो.. पण वृषभ डेस्कवर नसतो.. जास्त वेळ वाया न घालवता विराज लगेच निखीलला फोन लावुन आत बोलवतो..

निखील : येस सर..

विराज : वृषभ नाही आलाय का??

निखील : आलाय ना.. बट सकाळपासुन डेस्कवर नाही तो.. म्हणजे फोनवर बोलण्यात बिझी आहे तो..

विराज : स्विझरलेंड सोबत डिल झालीय आपली मी काल बोललोच तुम्हाला.. खुप म्हणजे खुप काम आहेत.. मी ट्रेड डिपार्टमेंट सोबत मिटिंग घेतोय.. लंच नंतर तुझ्या डिपार्टमेंटसोबत मिटिंग असेल.. विथ नॉटपॅड मला सगळे काँफेरेन्समध्ये हजर हवेत.. बरोबर 2 वाजता मिटिंग चालु होईल.. सगळ्यांना सांगुन ठेव..ओके..

निखील : ओके सर..

विराज : आज अर्जेन्ट बेसिसवर जे रिपोर्ट लागतील ते अनघा तुला सांगेल.. ते बनवायला घे. सगळे रिपोर्ट मला आजच्या आज बनवुन हवेत.. लास्ट टाईम सारखा कामचुकार पणा मला अजिबात नकोय.. कस मॅनेज करायचं हे तुझं तु बघुन घे.. मला कोणतंही एक्सप्लॅनेशन नकोय.. आणि अजुन एक.. तु जो Prodcut wise Efficiency wise Report बनवतोस तो वाला रिपोर्ट ह्यापुढे वृषभच बनवेल.. 

निखील : का सर??

विराज : तुला तो रिपोर्ट बनवायला एक दिवस लागतो.. वृषभ मात्र दोन तासात बनवुन देतो म्हणुन.. 

निखील : सर मला इतर एम्प्लॉईसकडे पण लक्ष द्याव लागत ना.. अधुन मधुन त्यांना डाउट असले की रिपोर्ट तसाच सोडुन त्यांच्याकडे बघावं लागत.. इतर ब्रांच मधुन कॉल येतात. त्यांना पण हँडल कराव लागतं.. वृषभला अजुन इतर जबाबदारी तुम्ही दिलीच नाहीत. माझ्यासारख त्याच असत तर त्याला पण मला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ लागेल..

विराज : ह्या विषयी मी नंतर बोलतोच तुझ्याशी.. नाही म्हणजे मला पण कळलंच पाहिजे ब्रांच मधुन तुला किती कॉल येतात ते.. आणि कोण कोण तुला डाउट विचारत असत ते.. मंडेला मी तुझ्यासोबत बसुन ह्या विषयी बोलतोच.. तस पण तु डेस्कवर बसून काय करत असतोस हे मला कळत नाही अस नाही आहे.. तुला डिपार्टमेंट हॅड वरून डिपार्टमेंट हॅडच्या अंडर काम करायला लावायला मला वेळ नाही लागणार ही एक गोष्ट लक्षात ठेवुन तु इथे काम कर.. कळलं तुला?? (विराज रागातच त्याच्यावर ओरडतो)

हम्मम.. निखील मान खाली घालुन बोलतो..

विराज : product wise  efficiency report मला चार वाजेपर्यंत हवाय अस वृषभला सांग.. स्विझरलेंडचे क्लाइन्ट जे काल इथे आलेले त्यांना पाठवायचाय मला आणि अनघा ह्याला इतर जे छोटे मोठे रिपोर्ट आपल्याला हवेत ते सांग.. मी मिटिंगसाठी जातोय.. ह्याला काम सांगुन झाली की तु पण काँफेरेन्समध्ये मिटिंग अटेंड करायला ये..

अनघा निखीलला जे काही रिपोर्ट हवेत ते सर्व सांगते.. आणि विराज सोबत मिटिंग अटेंड करायला निघुन जाते..

निखील आपल्या डेस्कवर येऊन एक नजर वृषभच्या डेस्कवर फिरवतो.. वृषभ अजुनही आपल्या डेस्कवर आला नसतो.. कार्तिक सुद्धा त्याला डेस्कवर दिसत नाही.. 

टी ब्रेक ला गेला असेल.. (तो मनातच बोलतो..)

निखील : गाईज.. सरांनी खुप सारी काम दिली आहेत ती मी तुम्हांला सांगेलच.. बट वन मॉर इंपोर्टन्ट आनऊन्समेंट.. 2 वाजता काँफेरेन्स मध्ये सरांसोबत आपली मिटिंग आहे.. का आहे?? कश्यासाठी आहे ?? हे सर सांगतील.. बट कोणीही ह्या मिटिंग बद्दल आपापसात डिस्कस करणार नाहीत.. (निखील सगळ्यांमध्ये काम डिस्ट्रीब्युट करतो) आणि कामाला लागतो..

रिया : कश्याबद्दल मिटिंग आहे??

(रिया हळुच निखीलला विचारते)

निखील : ते काल डिल झाली त्या संदर्भात.. बर्थ डे बॉय अजुन नाही आला का?? त्याला आज स्पेसिअल अस गिफ्ट द्यायचा विचार करतोय मी..

रिया : सिरियसली??

निखील : सरांकडुन ग.. बट तु थोडी मदत कर म्हणजे झालं...

रिया : काय??

(निखील रियाच्या कानात काही तरी पुटपुटतो..)

थोड्याच वेळात वृषभ आणि कार्तिक आपापला टी ब्रेक आवरून येतात..

निखील : रिया मला product wise efficiency report तु बनवुन देणार आहेस..

रिया : सगळी काम तु ह्याला मला सांगतोस मग तु काय करणार??

निखील : फक्त नि फक्त आराम..

रिया : मग तुझा रिपोर्ट तुच बनव..

निखील : वृषभ.. Product wise efficiency Report सरांना 4 वाजेपर्यंत हवाय.. बनवायला घे..

वृषभ : बनवला असता बट मला माझी खुप काम आहेत.. ती काम माझी 4 नंतरच होतील अस तरी मला वाटत.. मग बनवायला घेतो मी.. चालेल??

निखील : तुझी काम तु बोलतोस तस 4 नंतर कर आणि तो रिपोर्ट आधी बनवायला घे..

वृषभ : मला माझी काम नंतर करायला सांगण्यापेक्षा तुच रिपोर्ट बनवलास तर खुप बेटर होईल अस मला वाटत.. म्हणजे तस पण तु टाईमपास करत राहणार.. त्यापेक्षा टाईम पास करता करता रिपोर्ट बनव ते बेटर राहील तुझ्यासाठी.. म्हणजे तुझा रिपोर्ट बनवताना माझा टाईम पास नाही होणार.. (वृषभ अस बोलताच सगळेच निखिलकडे बघत हसु लागतात) 

निखील : गाईज सगळ्यांनी नीट ऐका वृषभ आणि ही रिया दोघेही रिपोर्ट बनवुन नाही देणार अस बोलतायत.

रिया : व्हॉट इज युअर प्रॉब्लेम?? तुझं काम तुच करना.. उगाच सगळ्यांना ओरडुन तुला तु कामचुकार आहेस अस सांगायचंय का??

निखील : तु रिपोर्ट बनवुन देणार की नाही तेवढं सांग..

रिया : नाही.. 

निखील : ओके.. वृषभ तु??

वृषभ : अजिबात नाही..

निखील : गुड.. 

कार्तिक मात्र संशयी नजरेने निखीलकडे बघत असतो.. 

निखील : तु देतोयस का बनवुन रिपोर्ट..??(निखील कार्तिककडे बघत त्याला विचारतो)

कार्तिक : एक काम कर ना. आत जाऊन सरांना सांग ना.. सर लगेच देतील तुला बनवुन..

कार्तिक अस बोलताच सगळेच निखीलला हसु लागतात.

कार्तिक मी पण आत्ता हेच ह्याला बोलणार होतो.. वृषभ देखील हसतच निखिलकडे बघत बोलतो..

निखील : बर्थ डे बॉय... आज नाही रागवत तुझ्यावर.. हसून घे तु.. 

वृषभ निखीलकडे इग्नोर करत आपल्या कामाला लागतो..

इथे पिऊ आणि जेनी कॉलेजजवळ असलेल्या गार्डनमध्ये रॉबिनची वाट बघत असतात.. थोड्याच वेळात रॉबिन येतो..

रॉबिन : काय झालं?? एवढ्या सकाळ सकाळी का बोलवलं मला??

जेनी : रॉब इट्स इट्स 1.15 अलमोस्ट.. इट्स युअर मॉर्निंग??

रॉबिन : ऑफ कोर्स येस.. मी जेव्हा उठतो माझी सकाळ तेव्हाच सुरू होते.. मला का बोलवलय ते सांग लवकर..

जेनी : पिऊला वृषभला भेटायचंय..

रॉबिन पिऊकडे बघतो.. पिऊ थोडा इनोसेन्ट असा चेहरा करत मानेनेच हो बोलते..

रॉबिन : का??

पिऊ : बर्थ डे गिफ्ट द्यायचय त्याला.. आणि मला त्याच्याशी बोलायचंय.. घरी दादामुळे मला नाही बोलता येत त्याच्याशी.. 

रॉबिन : सॉरी... ते तु उद्या भेट त्याला.. म्हणजे उद्या गिफ्ट दे.. आज नको..

पिऊ : बर्थ डे आज आहे मी उद्या का भेटु..

रॉबिन : आम्ही प्लॅनिंग तस केलंय ना. म्हणजे सकाळपासून वृषभला असच वाटतंय की आम्हांला त्याचा बर्थ डे माहिती नाही.. आम्ही कोणीच त्याला विश नाही ना केलं.. आत्ता जर तु अस नको ते माझ्याकडुन करून घेतलंस तर आम्ही केलेली सगळी मेहनत स्पोईल होईल ग.. तस पण तुझ्या दादाच्या पराक्रमामुळे तुमच्याच घरी आम्ही त्याच बर्थ डे सेलिब्रेशन करतोय.. मग तु तिथेच विश कर त्याला.. 

पिऊ : दादाच्या पुढ्यात कस विश करू मी त्याला?? आणि मला त्याच्याशी बोलायचंय.. घरी नाही भेटत बोलायला.. प्लिज..

रॉबिन : बोलायचंय मग फोन कर त्याला.

पिऊ : फोनवर नाही ना बोलु शकत मी.. बट इट्स ओके.. माझ्यामुळे तुमचं प्लॅनिंग नका स्पोईल करू.. मी उद्या भेटुन बोलते.

(पिऊ आपलं तोंड पाडतच रॉबिनला बोलते)

जेनी : तुमच्या सरप्राईज पेक्षा पिऊने त्याला बर्थ डे विश करणं हे खूप मोठं सरप्राईज असेल त्याच्यासाठी.. प्लिज घेऊन ये त्याला..

रॉबिन : बाकीची गॅंग मला मारतील यार मिळुन..

जेनी : कोणाला नाही ना कळणार.. पिऊ सांगेल वृषभला..

जेनी अस बोलताच रॉबिन पिऊकडे बघतो.. तिने नाजुक केलेलं तोंड बघुन त्याला पण थोडं वाईट वाटत. 

रॉबिन : मी घेऊन येतो त्याला इथे.. तस पण लंच टाईम असेल त्याचा.. इथेच थांबा दोघींनी.. 

रॉबिन पळतच गार्डन बाहेर पार्क केलेली आपली बाईक घेऊन विराजच्या ऑफिसच्या दिशेने जातो.. वृषभला फोन करून खाली बोलवुन घेतो..

वृषभ : काय झालं??

रॉबिन : बस लवकर.. काय झालं ते कळेल तुला.. 

वृषभ : रॉबिन मला काम आहे यार.. ऑफिस सुटल्यावर तु बोलवशील तिथे येतो.. आत्ता नको..

रॉबिन : ए हिरॉ बस ना लवकर..

वृषभ : रॉबिन विर आधीच वेगळ्या मुडमध्ये आहेरे.. मी अस ऑफिससोडुन तुझ्यासोबत फिरत बसलो हे कळलं तर ओरडेल यार मला.

तु जर माझ्यासोबत नाही आलास तर मी ओरडेल तुला.. बस बघु लवकर.. मोजुन अर्धा तास लागेल.. रॉबिन थोडं धमकी देतच वृषभला बोलतो..

वृषभ : तरी पण..

रॉबिन : तुला मी इथुन घेऊन गेल्याशिवाय काही जाणार नाही.. तु उगाच अजुन अर्धा तास वाढवतोयस.. बस ना यार..

रॉबिन काही ऐकणार नाही हे वृषभला माहिती होत.. वृषभ गप्प त्याच्या मागे बसतो. रॉबिन आपली बाईक सुसाट अश्या वेगाने पळवत गार्डनच्या दिशेने नेतो. 

गार्डनमध्ये का आणलंयस?? काही तरी बोल..वृषभ खुप सारे प्रश्न रॉबिनला करत असतो बट रॉबिन काहीच बोलत नाही.. रॉबिन त्याचा हात पकडत त्याला आपल्यासोबत पळवत जिथे पिऊ त्याची वाट बघत असते तिथे नेतो..

आत्ता तरी बोलशील काय झालं.. रॉबिनच्या हातातुन आपला हात सोडवतच तो त्याला बोलतो.. रॉबिन त्याच्या खांद्याला पकडत त्याला मागे वळवतो.. आणि तिथुन निघुन जातो..  वृषभ जस मागे वळतो तस त्याची आणि पिऊची नजरानजर होते.. दोघेही खुप वेळ एकमेकांच्या नजरेत बघण्यात हरवुन जातात.. 

(काय होईल पुढे?? पिऊ काय बोलेलं वृषबासोबत?? काय स्पेसिअल अस गिफ्ट तिने वृषभसाठी प्लॅन केलं असेल.. पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all