Jan 20, 2021
प्रेम

अतरंगीरे एक प्रेमकथा १२२

Read Later
अतरंगीरे एक प्रेमकथा १२२

वृषभ आर्यनच्या घरी जायला निघतो. पिऊ डायनिंग टेबलवर डोकं टेकुन कसला तरी विचार करत बसली असते.. वृषभ आलाय ह्याकडे तीच लक्षच नसत.. वृषभ आर्यनची आई कुठे दिसते का ते बघतो.. 

वृषभ : काकु कुठेत?? (तिच्या थोडं जवळ जातच तो तिला विचारतो)

अचानक आलेल्या वृषभच्या आवाजाने पिऊ थोडी डचकते.. 

पिऊ : वृषभ तु घाबरवलस मला..

वृषभ : आय एम सॉरी..

पिऊ : इट्स ओके.. लगेच सॉरी बोलायची गरज नाही..

वृषभ : एवढा कसला विचार करत होतीस..

पिऊ : तुला कळलं असत तर नक्की सांगितलं असत.. 

वृषभ : म्हणजे??

पिऊ : ते ही नाही कळणार तुला.. 

(त्याच्याकडे न बघताच ती तिथुन जाऊ लागली)

वृषभ : कुठे चाललीस?? 

पिऊ : तुझं मम्मीकडे काम आहेना?? तिलाच बोलवायला..

वृषभ : मी अस कुठे म्हटलंय की माझं त्यांच्याकडेच काम आहे?? ते तु ही डेरिमिल्क.. (वृषभ मध्येच थांबवत पिऊला डेरिमिल्क दाखवत बोलतो)

पिऊ : तु मला हि डेरिमिल्क देण्यासाठी आलायस??

वृषभ : नाही.. म्हणजे.. हो (वृषभ आपली मान होकारार्थी हलवतच पिऊला हो म्हणुन सांगतो.. )

पिऊ गालातल्या गालात हसत एक गोड स्माईल त्याला देत आपला उजवा हात पुढे करते.. वृषभ खुश होतच तिच्या हातात डेरिमिल्क टेकवतो..

वृषभ : थेंक्स..

पिऊ : हे मी तुला बोलायला हवं ना..

वृषभ : मगाशी तु.. ते.. माझ्याकडे न बघता. म्हणजे मी तुला ही डेरिमिल्क घ्यावी म्हणुन आवाज देत होतो बट तु माझ्याकडे न बघताच निघुन गेलीस.. मला वाटलं तु रागवलीयस माझ्यावर.. ही डेरिमिल्क नाही घेणार तु.. बट तु घेतलीस त्याबद्दल थेंक्स.. (वृषभ थोडं अडखळतच बोलतो)]

पिऊ : हम्मम. (वृषभकडे न बघताच ती त्याला बोलते)

वृषभ : छान मार्क्स मिळालेत तुला.. आत्ता पुढे काय करणार?? 

पिऊ : दादा नाही तर पप्पा बोलतील ते..

वृषभ : तुझं स्वतःच काही ठरलं नाही का.??

(पिऊ खुप वेळ शांत बसते.. )

वृषभ : काय झालं??

पिऊ खाली बघतच आपली मान नकारार्थी हलवत काही नाही म्हणुन बोलते..

(वृषभ आज तिच्याकडे बघतच बोलत असतो.. पण पिऊ मात्र जाणुन बुजुन त्याच्याकडे न बघताच आपली नजर खाली ठेवुन बोलत असते.. नेहमी आपल्यासोबत हसतच आणि मनमोकळे पणाने बोलणारी पिऊ आज आपल्याकडे साद बघतच नाही म्हटलं तर वृषभला थोडं फार वाईट वाटत असत. पण अस वागुण तिला काय सांगायच हे त्याला कळत असत..)

अरे वृषभ तु कधी आलास?? आर्यनची आई हॉलमध्ये येतच वृषभला विचारते..

वृषभ : आत्ताच आलोय. (तिच्यावरून नजर हटवत तो आर्यनच्या आईला बोलतो). काकु ते मी तुम्हांला सांगायला आलेलो की आर्यन पर्वा घरी येतोय ना.. मग मी पर्वा डायरेक्ट कामावरून त्याला आणायला हॉस्पिटलमध्ये जाईल.. तुम्ही एवढ्या लांब नका जाऊ..

आर्यनची आई : पर्वा आर्यनचे पप्पा पण येतील.. तु नको त्रास करून घेऊस.. तु तुझ्या कामातच लक्ष दे बघु..

वृषभ : त्रास कसला त्यात.. काका पण प्रवासाने दमतील.. त्यांना आराम करू द्या.. मी जातो त्याला आणायला.. तस पण बाकीची मंडळी आहेतच..

आर्यनची आई : तुम्ही सगळेच खुप काही करतायत माझ्या आर्यनसाठी.. 

वृषभ : तुमचा आर्यन पण खुप काही करत असतो आमच्यासाठी.. फक्त तुम्हांला कळु देत नाही तो एवढंच.. आणि आर्यनने केलेला पराक्रम काकांना कळल्यावर ते खुप भडकतील त्याच्यावर.. म्हणजे ते त्यांच्या जागी बरोबर असतील बट काकांना त्याला जास्त ओरडायला नका ना सांगु.. परत अस काही नाही करणार तो त्याने मला तस प्रॉमिज पण केलंय.. 

आर्यनची आई : हम्मम.. ते आर्यनचे पप्पा आल्यावरच बघुयात...

वृषभ : बर मी येतो.. काही लागलं की आवाज द्या..

आर्यनची आई : आज पिऊचा रिझल्ट होता.. पिऊला 97% मिळाले..

वृषभ : हा ते कळलं मला म्हणजे पिऊला नाही सांगावस वाटलं मला बट आर्यनने मला सांगितलं.. छान मार्क्स मिळाले..

(वृषभ अस बोलताच पिऊ हलकीच अशी एक नजर त्याच्यावर फिरवते)

आर्यनची आई : आर्यनने अभ्यासच तसा करून घेतलेला तिच्याकडुन. पिऊ वृषभला पेढा तरी दिलास की नाही??

पिऊ : हम्मम.. दिला.. (वृषभकडे न बघताच ती आपल्या आईला बोलते)

वृषभ प्रश्नार्थी चेहरा करतच पिऊकडे बघतो.. आणि काहीही न बोलता आपल्या रूममध्ये येतो.. पिऊने झाकुन ठेवलेल्या ताटावरच झाकण अलगद बाजुला काढत तो जेवायला घेतो.. ताटात एका छोट्याश्या वाटीमध्ये पिऊने दोन पेढे ठेवले असतात.. पिऊचा आजचा थोडा नकटा राग बघुन वृषभला हसु येत असत.. जेवायला घेणार तोच व्हाट्सएपवर पिऊचा मॅसेज त्याला येतो.. हृदय अगदी जोर जोरात धडधड करू लागत.. थोडं थरथरतच तो तिने केलेला मॅसेज ऑपन करतो..

पिऊ : सॉरी..

वृषभ : कश्याबद्दल ???

पिऊ : ज्याबद्दल मला बोलायला हवं त्याबद्दल... पेढा मिळाला??

वृषभ : हो.. थेंक्स..

पिऊ : डेरिमिल्कसाठी खुप खुप थेंक्स..

वृषभ : त्यादिवशी कलटलेट खुप छान झालेले.. त्यासाठी तुला खुप खुप थेंक्स..

पिऊ : हे तु अजुन दोन तीन दिवसांनी सांगायच होतंस मला.. 

वृषभ : सॉरी.. 

पिऊ : इट्स ओके.. जेवण जेवुन घे.. 

वृषभ : तु पण.. बाय.. गुड नाईट..

पिऊ : हम्मम.. गुड नाईट.. टेक केअर..

एकमेकांसोबत पुन्हा एकदा अस व्हाट्सएपवर बोलुन दोघांच्याही ओठांवर छान अस हसु आलेलं असत.. वृषभ जेवता जेवताच आपल्या एका हाताने पिऊने केलेले मॅसेज तो पुन्हा पुन्हा वाचत असतो.. पिऊच सुद्धा तसच काहीस असत..

इथे दोन दिवस शौर्यसोबत न्यूयॉर्क फिरून सगळेच ट्रेनने वॉशिंग्टनला जायला निघतात. शौर्य त्यांना स्टेशनवर सोडायला आलेला असतो.. ट्रेन यायला अजून पाऊण तास तरी असतो.. चौघेही एकमेकांसोबत हॉटेल स्टे बद्दल डिस्कस करत असतो.. शौर्य मात्र एका सिटवर बसुन एकटक विराजकडे बघत असतो.. परत विराज लांब जाणार म्हणुन खुप रडु येत असत त्याला बट तो स्वतःवर कन्ट्रोल करत असतो. बट डोळ्यांतुन आसवं पडु लागतात.. कोणाच आपल्याकडे लक्ष नाही हे बघुन खिश्यातुन मोबाईल काढत मान खाली घालुन मोबाईलमध्ये काही तरी करत बसायच म्हणुन तो बसतो.. अधुन मधुन डोळ्यांच्या कडांभोवती बोट फिरवत तो  डोळ्यांतुन येणार पाणी पुसत असतो..

अनघाच्या नजरेतुन ते काही सुटत नाही.. ती विराजला इशाऱ्यानेच शौर्यकडे बघायला सांगते.. विराज शौर्यच्या बाजुला येऊन बसतो..

विराज : शौर्य.. फक्त दोनच वर्ष ना.. आत्ता त्यातला एक महिना पण कमी झालाय..

शौर्य : हममम.. सांभाळुन जा.. सगळ्यांची काळजी घे.. सगळ्यात जास्त तुझी.. मी नाही जगु शकत तुझ्याशिवाय.. दोन वर्षांनी मला सगळं जस आत्ता आहे तसच हवंय.. 

विराज : तसच असेल रे शौर्य.. आणि तु इथे बघ बघु.. तु सारख सारख अस का बोलतोयस??

(शौर्य मान खाली घालुनच असतो..)

रडतोयस तु??

(शौर्य मानेनेच नाही बोलतो..)

विराज एक हात त्याच्या खांद्यावर टाकत त्याला आपल्या कुशीत घेत त्याला शांत करतच काय झालं म्हणुन विचारतो. अनघा, प्रीती आणि श्रीसुद्धा त्याच्याजवळ येतात.

शौर्य : फॅमिलीसोबत रहाण्याच सुख लहानपणापासूनच नशिबात नाही रे माझ्या.. तुला तर माहितीच आहे सगळं.. आत्ता पण बघ.. आत्ता मम्माकडे टाईम आहे माझ्यासाठी, आजी, काका काकी आहेत त्या घरी, आत्या आहे.. माझी बहिण आहे.. तुझ्यासारखा भाऊ आहे, वहिनीपण आहे.. सगळे म्हणजे सगळेच आहेत.. बट मीच लांब आहे यार.. मला खुप भीती वाटतेय रे.. 

विराज : कसली भीती वाटतेय??

शौर्य : नाही सांगु शकत?? मला नाही सांगायला जमत आहे??

विराज : शौर्य इथे बघ माझ्याकडे.. (शौर्यचे डोळे पुसतच तो त्याला बोलतो) काय झालंय.. कसली भीती वाटते तुला??

शौर्य : झोप नाही लागत आहे यार मला इथे.. दोन वर्षांनी काही विचित्र घडेल म्हणुन मन खुप घाबरतय माझं.. तुला नाही समजणार मला काय होतंय ते.. म्हणजे तु आत्ता पर्यंत माझ्यासारख अस फॅमिली पासुन लांब नाही राहिलास ना कधी.. लाईफची दहा वर्षे तरी तु तुझ्या मम्मीसोबत होतास.. तुला भरपूर प्रेम मिळालय तिच्यापासून.. मग तुला ही मम्मापण भेटली तिने पण तुझ्या त्या मम्मी सारखच प्रेम दिलंय.. डॅड तर तुझ्या सोबतच होता.. तो पण तुझे खुप लाड करायचा. माझ्या बाबतीत तस काहीच नाही झालंय यार.. लहानपणापासून मम्माने मला तिच्यापासून लांब ठेवलं का तर मला तिची सवय लागेल.. 6 वर्षाचा झालो तर बाबा पासुन लांब झालो ते ही कायमचा. मग आजी, काका आणि काकी पासुन लांब राहिलोय.. तुझ्या डॅडच्या भीतीने तुझ्यापासुन लांब राहिलो.. मी केलेल्या चुकांमुळे मी त्या घरापासुनच आणि तुम्हा सगळ्यांपासुनच लांब राहिलोय.. मला अजुन नाही लांब रहायच यार कोणापासून. तु आणि मम्मा नाही समजत माझ्या फिलींग.. मला माझ्या फॅमिलीसोबत रहायचय रे.. दोन वर्षांत खुप काही बद्दलल मग.. परत मी कोणापासून लांब झालो तर.. का मिच सगळ्यांपासून लांब जाईल.. मला खुप टेन्शन येतंय रे विर..

विराज : अस काहीही काय बोलतोयस तु आज.. तु चल मग इंडियात.. राहु दे तुझं शिकायचं सगळं.. तिथे काही तरी शिक..

शौर्य : आणि मम्मा?? तीच काय करू??

विराज : मी समजवतो तिला..

शौर्य : ती ह्या बाबतीत तुझं काही ऐकुन घेईल अस वाटतंय तुला.. ती समजुन नाही घेत रे मला.. परत ती तुझ्यावर भडकणार.. ती जरा तुला काही बोलली की तु माझ्यावर.. तिच्या मनासारखं केलं नाही मग ती जशी आधी होती तशीच वागेल माझ्यासोबत.. मग मला जशी फॅमिली पाहिजे तशी नाही मिळणार..

विराज : शौर्य तु नको ते विचार खुप करतोयस यार.. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना..

शौर्य : तुझ्यावर आहे पण स्वतःच्या नशिबावर नाही ना.. पहिल्या पासुन  असच होत आलंय माझ्यासोबत.. आणि पुढे पण असच होईल.. मला माझी सगळी फेमिली हवीय रे.. बट दोन वर्षांनी कोणी तरी...

अनघा : शौर्य आत्ता हे अस नको ते विचार करणं आणि नको ते बोलण आत्ताच्या आत्ता थांबव बघु.. (अनघा मध्येच शौर्यला थांबवत बोलते) शौर्य मला तुझ वागणं, बोलणं, तुझे विचार सगळंच पटत.. तु नेहमी विचार करून बोलतोस हे मी विराजला सुद्धा सांगितलय.. बट आत्ता तु जे विराजला बोलतोयस ते मला काही पटत नाही.. नको ते लॉजिक लावुन माणस कधी कधी काहीही बोलतात अगदी तस बोलतोयस तु.. पहिलं तुझ्या बाबतीत खुप काही घडल असेल बट ह्याचा अर्थ असा नाही की आत्ताही सगळं तसच घडेल.. उलट पहिलं जे तुझ्या बाबतीत नाही घडलं आत्ता ते सगळंच घडेल असपण तु बोलु शकतोस ना.. सगळंच चांगलं होणार आहे तुझ्या आयुष्यात.. सुरुवात गाथा पासुन झालीय.. त्यानंतर तुझी फॅमिली एकत्र आलीय.. आणि अस अजुन खुप काही चांगलं होणार आहे.. चांगलं होणार नाही चांगलंच होईल ह्याची मला खात्री आहे .. आम्ही सगळेच तुझी वाट बघतोय तिथे.. आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळुन रहायचय शौर्य.. तुझ्या आयुष्यातला वाईट काळ संपलाय आत्ता.. आत्ता सगळे सुखाचे दिवस असणार हे.. आणि जरी छोट मोठं संकट आलंच तर आपली एवढी मोठी फॅमिली आहे त्या संकटाचा सामना करायला.  कारण आपल्या फॅमिलीत आत्ता एकी निर्माण झालीय.. सगळेच एकमेकांची मत विचारूनच निर्णय घेतायत.. काकींनी तुझ्यासाठी जो एवढा काही खाऊ पाठवुन दिलाय ना.. तो तिला बनवायला आम्ही सगळ्यांनी मदत केलीय.. तुझ्या ह्या लाडक्या विरने सुध्दा.. आणि तुझ्या मम्माने सुद्धा.. आम्ही सगळे एकत्रच ते ही पहिल्यांदाच अस काही बनवत होतो बट खुप एन्जॉय करत होतो.. जे घर अस एकत्र असेल ना तिथे कोणतीच संकट जास्त काळ नाही टिकत शौर्य.. तु नको ते विचार नको करुस.. फक्त नि फक्त स्टडी मध्ये फॉकस कर.. तुझ्या बाबांनी तुझ्या बाबतीत बघितलेलं खुप मोठ अस स्वप्न तुला खुप म्हणजे खुप मोठ होऊन पूर्ण करायचय.. तु फक्त अभ्यासात लक्ष दे.. तुझी फॅमिली तशीच राहील जशी तुला पाहिजे होती.. आय प्रॉमिज यु.. 

शौर्य : थेंक्स..

अनघा : अस नको ते विचार का करतोयस तु?? 

शौर्य : मी नाही करत आहे ते आपणच येतायत ग डोक्यात.. म्हणजे खुप दिवसांपासुन.. 

अनघा : मी आहे ना शौर्य.. तुला परत अस काही वाटलं तर तु माझ्यासोबत बोल.. बट टेन्शन अजिबात नाही घेणार तु.. 

शौर्य : आत्ता नाही घेत..

विराज : नक्की ना??

शौर्य : हम्मम..

विराज : एन्जोय कर इथे अगदी तुला हवं ते.. तुला डान्स आवडतो तर कर डान्स बट असे मोठं मोठे स्टंट करताना काळजी घे आणि जमल्यास नाही केलेस तर मला खुप बर वाटल.. तुला जस आवडतना तस तु जग. मी तुला कोणत्याच गोष्टीसाठी फोर्स नाही करणार, ना तुझ्यावर कधी रागावणार ना ओरडणार.. ह्या दोन दिवसात मला तु खुप मोठा झालायस अस वाटलं.. आणि असाच अजुन मोठा हो.. आणि खरच नको ते विचार नको करुस.. बट माझ्यापासुन काहीच लपवु नकोस.. आणि कधीच.. मी नेहमी तुझ्या सोबत असेल.. ओके..

शौर्य : हम्मम थेंक्स... काकांकडुन वीस हजार घेतलेले.. हे 12500 असतील.. उरलेले तु ह्यात एड करून काकाला दे.. थोड्या दिवसांनी मी तुझ्या अकाउंटमध्ये पैसे पाठवतो तुझे..(शौर्य खिश्यातुन इन्व्हेलोप काढुन विराजच्या हातात देतच बोलतो)

विराज : तुझ्याकडे खर्चाला आहेत पैसे??

शौर्य : हममम.. 

श्री : तु पण चल आमच्यासोबत फिरायला.. तेवढीच आम्हांला पण मज्जा येईल..

प्रीती : हो ना. 

शौर्य : कॉलेज नसत तर खरच आलो असतो.. 

वॉशिंग्टनला जाणाऱ्या ट्रेनची आनऊन्समेंट होते.. 

तस शौर्य पुन्हा एकदा विराजला घट्ट मिठी मारत रडतो.. 

काळजी घे.. आय लव्ह यु सो मच.. विराज शौर्यचे डोळे पुसत त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवतच त्याला बोलतो..

शौर्य : वहिनी तु मला केलेलं प्रॉमिज विसरू नकोस.. 

अनघा : नाही विसरत शौर्य.. बट तु अस रडत रडत आम्हांला बाय करणार असशील तर मात्र मी विसरेल हा. तु हस बघु..

शौर्य जबरदस्तीच हसु ओठांवर अनघाला हसुन दाखवतो.. 

अनघा : गुड बॉय..

शौर्य : वहिनी माझ्या विरची काळजी घे.. आणि विर माझ्या वहिनीवर रागवु नकोस.. काळजी घे तिची.. माझ्यासाठी खुप लकी आहे माझी वहिनी..

अनघा : तु पण आमच्यासाठी खुप लकी आहेस.. आणि असच रहा एकदम हॅप्पी.. तुला हॅप्पी बघुन आम्हाला खुप बर वाटत..

(अनघा शौर्यचे गाल खेचतच बोलते)

शौर्य : दादा आणि वहिनी तुम्ही पण सांभाळुन जावा.. आणि नेहमी असेच हॅप्पी रहा.. 

श्री : तु पण..

सगळेच शौर्यला बाय करून ट्रेन मध्ये बसतात..

विराज शौर्यच्या पुढ्यात नाही रडत बट ट्रेनमध्ये बसल्यावर मात्र त्याला खुप रडु येत असत.. एक खोल श्वास घेत तो येणार रडु आतल्या आत कुठे तरी थांबवण्याचा प्रयत्न करत असतो..

पाणी.. अनघा पाण्याची बॉटल त्याच्या पुढ्यात धरतच त्याला बोलते.. 

पाणी पिल्यावर त्याला थोडं बर वाटत.. खुप वेळ तो खिडकी बाहेर तो बघत असतो.. दोन दिवस शौर्य सोबत घालवलेले क्षण त्याच्या नजरेसमोरून तरंगत असतात.. त्याच्यासोबत केलेली मस्ती आठवुन हसु सुद्धा येत असत..

अनघा : बर वाटतंय..??

विराज : हम्मम..

श्री : शौर्य तुझा सख्खा भाऊ नाही आहे..?? म्हणजे त्याच सरनेम देशमुख तुझं कुलकर्णी..

विराज : आमच्याकडे बघुन अस वाटत का तुला तो माझा सख्खा भाऊ नाही म्हणुन..

श्री : अजिबात नाही.. ते पर्वा आपण बोलता बोलता कळलं मला..

विराज : मी 11th इयर्सचा असेल तेव्हा मम्मा आणि माझ्या डॅडने एकत्र येण्याचा निर्णय घेतला.. कारण शौर्यला डॅड नव्हता आणि मला मम्मा.. 

श्री : बट खरच खुप छान आहे तुझा भाऊ.. म्हणजे तुम्हा दोघांची बॉंडिंग खुप म्हणजे खुपच छान आहे.. यु आर लकी..

विराज : ते तर मी आहेच.. म्हणजे सगळ्यात नशीबवान मी मला समजतो कारण शौर्य सारखी प्रॉपर्टी माझ्याजवळ आहे.. कधी कधी खुप त्रास देतो तो बट तेवढं प्रेम पण करतो माझ्यावर.. मला जरा काही झालं तर पूर्ण जग इकडच्या तिकडे करतो तो माझ्यासाठी.. माझ्या कोणत्याच शब्दाबाहेर नाही.. माझी फक्त आत्ता एकच इच्छा आहे मला माझ्या शौर्यला खूप हॅप्पी बघायचंय.. जस त्याला पाहिजे तस.. खुप सहन केलंय त्याने.. आत्ता अजुन नको.. आणि अनु मला आत्ता ह्या क्षणाला त्याला एकट्याला टाकुन इंडियात जावसच नाही वाटत आहे ग.. अस वाटतय बस झालं.. जेवढं शिकला तेवढं पुरे.. त्याला रहावस वाटतंय ना फॅमिलीसोबत तर राहु दे.. तो खुप हुशार आहे सगळं अगदी परफेक्टली मॅनेज करेल तो..

अनघा : म्हणजे ह्या आधी त्याने शिक्षण अर्धवट सोडलं तस हे शिक्षण पण त्याच अर्धवट राहु दे अस वाटतंय का तुला..??

विराज : त्याला नाही रहावस वाटत आहे ग इथे..

अनघा : विराज लास्ट टाईम मम्मी तुला रागात जे काही बोलल्या ना मला अस वाटत ते बरोबर बोलल्या. म्हणजे मला आत्ता ह्या क्षणाला त्यांचं बोलणं पटतंय.. तु खरच त्याचे सगळे हट्ट पुरवतोयस.. तुझ्यामुळे तो असा हट्टी झालाय.. जे हट्ट तु त्याचे पुरवायला पाहिजे ते तु पुरव.. बट शिक्षणाच्या बाबतीत लाड नको करुस त्याचे.. हातात कोणतीच डिग्री नाही उरणार त्याच्या.. आणि तु त्याला हिंमत देऊन स्ट्रॉंग बनवायच सोडुन तुच हिंमत हरतोयस.. 

विराज : आय नॉ बट मला तो अस रडलेलं नाही आवडत ग.. कस वेड्यासारखं बोलत होता तो. 
 
श्री : त्याला फॅमिलीशिवाय राहायला नाही जमत मग एवढ्या लांब पाठवलंच कश्याला.. इंडियातच ठेवायच ना त्याला.. तस पण दिल्लीत शिकत तर होताच ना तो..

विराज : दिल्लीत राहुनच तर त्याच्यावर ही नको ती वेळ आलीय.. 

श्री : म्हणजे.??

विराज : काही नाही..

अनघा : श्री.. त्याने दिल्लीत शिक्षण घेतलं किंवा USA मध्ये शिक्षण घेतलं ह्यात काय फरक आहे..? दिल्लीत राहुन पण तो फेमिलीपासुन लांबच रहाणार होता..

श्री : ते तर आहेच मग मुंबईतच ठेवायच होत ना त्याला..

अनघा : आत्ता झालेल्या गोष्टी चँज नाही ना करू शकत आपण.. आणि दोन वर्षे बोलता बोलता अशी सहज निघुन जातील..

प्रीती : बट अनु.. वहिनी म्हणुन तुझ्यासोबत सुद्धा खुप छान रिलेशन आहे त्याच.. म्हणजे एखाद्या दिर आणि वहिनीच असायला हवं अगदी तसच.. मला तर आत्ता अस वाटतंय की श्री ला एखादा शौर्य सारखा भाऊ असायला हवा होता.. 

अनघा : दिर नाही मग काय झालं?? नणंद तर आहे ना तुला.. जे मिळालं त्यात समाधान मानाव ग..

प्रीती : बट आज ना उद्या ती पण तिच्या घरी जाईल ना.. मग मला तर कंटाळाच येईल त्या घरी.. म्हणजे श्रीच्या काकांच्या मुली आहेत बट त्या सुद्धा शौर्य सारख्याच शिक्षणासाठी घराबाहेर.. श्री घरी असला की तो आणि त्याचा लॅपटॉप.. आई आणि काकी किचनमध्येच असतात..

श्री : प्रीती कधी तरीच मी लॅपटॉप मध्ये असतो हा.. म्हणजे मंथ एंडिंग असेल तेव्हाच.. 

प्रीती : अजिबात नाही.. दर दिवशी तुझा मंथ एन्ड असतो.. तु आणि तुझा लॅपटॉप..

अनघा : प्रीती.. घरोघरी मातीच्या चुली..  विराजच काही वेगळ नाही. आम्ही आमच्या लग्नाच रिसेप्शन करून घरी आलोना तेव्हा त्याच रात्री हा लॅपटॉप घेऊन बसलेला.. शौर्यने ह्याला शप्पथ घातली तस ह्याने लॅपटॉप माझ्याकडे आणुन दिला वर मला काम करायला सांगितल.. त्या मानाने श्री ने अस काही केलं असेल अस मला वाटत नाही..

विराज : अनु श्री ची कंपनी सांभाळायला त्याचे काका आहेत.. माझा प्रॉब्लेम तुला माहितीच आहे.. आणि तु अस बोलतेस जस मी तुला टाईम देतच नाही. 

श्री : वरकुल जाऊ दे रे.. किती ही काहीही केलेलं ना तरी ह्या मुलींना कमीच असत.

विराज : अगदी बरोबर बोललास.. अनुला तर कारणच लागत असत मला बोलायला. मी घरी येऊन श्री बोलतो तस कधी तरीच लॅपटॉपवर काम करत असतो नेहमी नाही. 

अनघा : अच्छा??

विराज : येस.

अनघा : आत्ता जर कंपनीचा विषय निघाला तर लगेच लॅपटॉप ऑपन करून बसशील..

विराज : अजिबात नाही.. हे दोन आठवडे मी फक्त नि फक्त तुझ्यासोबतच स्पेन्ड करणार आहे..

(प्रेमाने अनघाच्या खांद्यावर हात ठेवतच तो तिला बोलतो)

अनघा : बाय दि वे विराज.. कामावरून मला आठवल.. काल मी मॅल चॅक करत होती तर त्यात USA च्या कलाईन्टचा काल मॅल आलेला.. त्यांना TDA चा डेटा हवा होता.. अर्जेन्टली.. मी तुला सांगायलाच विसरली..

विराज : what??? (विराज मोठ्यानेच ओरडतो) अस कस विसरलीस तु.. ट्रेड डिपार्टमेंटमध्ये मिस्टर रेड्डीना नाही तर कोणाला तरी कॉल करून तु सांगुच शकली असतीस ना.. त्यानी बनवुन पाठवुनही दिला असता..

(विराज खिश्यातुन मोबाईल काढतच अनघाला बोलतो)

अनघा : बघितलसना प्रीती.. हे अस असत ह्याच. जरा कामाचा विषय निघाला तर लगेच घुसला तो त्यात.. आणि वर बोलायच हे दोन आठवडे  मी फक्त नि फक्त तुलाच टाईम देणार.. आणि विराज तो मोबाईल ठेव खिश्यात.. काही मॅल वैगेरे नाही आलेला.. तु कसा आहेस ते मला प्रीतीला आणि तुझ्या श्री ला दाखवायचं होत..

(सगळेच विराजला हसु लागतात..)

चौघेही ट्रेनमध्ये एकमेकांसोबत मज्जा मस्ती करत असतात..

विराज त्याच्या पुढील डेस्टिनेशनसाठी निघुन जातो बट शौर्य मात्र स्टेशनवरच एका सीटवर बसुन असतो.. डोळ्यांतुन अजुनही पाणी येत असत.. तोच गाथाचा व्हिडीओ कॉल येतो त्याला.. आपले डोळे पुसत तो तिचा व्हिडीओ कॉल उचलतो.

गाथा : रडलास ना??

शौर्य : विर परत लांब गेला ना.. म्हणुन थोडं.. तु झोपली नाहीस??

गाथा : तु अस रडत बसणार हे मला माहिती होत..

शौर्य : नाही ग रडत आत्ता.. 

गाथा : शौर्य हे दिवस लवकर संपतील.. मग तु कायमचा जिजूंसोबतच असणार.. त्यांना त्रास द्यायला..

शौर्य : नेहमी मिच त्रास नाही ग देत त्याला.. तो पण देतो.. बाय दि वे मी पण काही तरी स्पेसिअल अस गिफ्ट पाठवलय तुला.. गिफ्ट पोहचल की मला सांग..

गाथा : म्हणजे आत्ता मला झोप लागणार नाही..

शौर्य : tit for tat... गाथा..

गाथा : शौर्य.. (गाथा थोडा रडवा चेहरा करतच त्याला बोलते)

शौर्य : माय स्वीट स्वीट जान.. गिफ्ट वहिनी थ्रू तुला भेटेलच.. तेव्हा कळेलच.. सर्वेशसाठी पण मी काही तरी पाठवलय.. विर इथे येणार हे मला माहिती असत तर मी पण थोडं स्पेसिअल अस गिफ्ट तुला दिलं असत ग.. बट घाई घाईत काही तरी घेतलंय.. हॉप सो तुला आणि सर्वेशला आवडेल.. 

गाथा : तु घेतलंस म्हणजे नक्कीच आवडेल..

शौर्य : आत्ता झोप बघु तु.. मला खुप अभ्यास आहे आज. मी पण हॉस्टेलवर जातोय.. बाय। 

(नेहमी प्रमाणे एकमेकांना बाय करतच दोघेही फोन ठेवुन देतात)

अश्यातच दोन दिवस निघुन जातात.. 

संध्याकाळचे 7 वाजले असतात.. आर्यन हॉस्पिटलला बाय बाय करत क्रचच्या (कुबड्यांच्या) सहाय्याने आपल्या पायाचा बेलेन्स करतच गाडीत बसतो..

रॉबिन : आर्यन आज घरी मस्त स्पेसिअल अस गिफ्ट आहे तुला.. तैयार आहेस ना त्यासाठी??

आर्यन : पप्पा आलेत.. मला माहितीय. 

रॉबिन : वृषभ तुझ्या तोंडात काही रहातच नाही यार...

वृषभ : मी नाही काही सांगितलं रे..

आर्यन : माझ्या बहिणीने ने सांगितलंय मला. 

महेश : बेस्ट ऑफ लक मित्रा..

आर्यन : मला आत्ता हॉस्पिटल बर वाटतंय यार.. मी परत जातो हॉस्पिटलमध्येच..

वृषभ : आर्यन काका नाही रागावणार तुझ्यावर.. एवढ्या दिवसांनी ते आज घरी आलेत.. त्यात आजच त्यांना काकूंकडुन तुला अस काही झालय हे कळलंय.. त्यांना तर ते कधी तुला भेटतायत अस झालंय.. ओरडायच सोडुन प्रेमाने जवळच घेतील तुला.. हा म्हणजे थोडस काळजी पोटी ओरडतीलच.. ते तर तुला आम्ही सगळेच ओरडत होतो ना मग ते पण ओरडतील..

रॉबिन : ओव्हर ऑल वृषभला काय बोलायचंय माहिती का आर्यन तुझा क्लास आम्ही सगळ्यांनी मिळुन घेतलाय.. फक्त कॉलेजचे प्रिंसिपल सर अबसेन्ट होते म्हणुन त्यांचं लेक्चर तुझ अटेंड करायचं राहुन गेलं.. आज जर प्रिंसिपल सरांना तुझं एक्स्ट्रा लेक्चर घ्यावस वाटलं तर ते घेतील नाही तर लेक्चर ऑफ जाईल. बट मला काय वाटत माहिती का की त्यांनी लेक्चर घ्यावंच.. ते पण हातात छडी घेऊन.. 

आर्यन : रॉबिन पाय बरा झाला की तु एकदा येच माझ्याकडे क्लास अटेंड करायला... तु बोलतोस तस मी छडी घेऊन तुझा क्लास अटेंड करतो..

रॉबिन : बस काय तुझ्यासाठी तु बोलवशील तेव्हा नक्की येईल रे मित्रा.. म्हणजे तुझा पाय बारा व्हायला सहा सात महिने तरी आरामात लागतील रे म्हणजे तस डॉक्टर बोलले.. बट तुझा नाजुकपणा बघुन मला अस वाटत वर्ष लागेल तुला..

आर्यन : वृषभ तु माझा खरा मित्र असशील तर ह्याला आत्ताच्या आत्ता मारशील.

रॉबिन : वृषभ तु मला हात जरी लावलास तर मी गाडी कुठे पण ठोकेल हा.

आर्यन : ठोक ना मग धमकी कुणाला देतोयस.. 

रॉबिन : आर्यन तु फुल मुड मध्ये आलायस मित्रा.. घरी जाऊन अंकलसमोर पण तुला असाच कॉन्फिडेंट दाखवायचाय. कमॉन आर्यन.. कमॉन..

आर्यन : वृषभ मग ह्याला मी काही बोललो की तुला राग येतो.. तो आत्ता त्रास देतोय ते तुला नाही दिसत..

वृषभ : रॉबिन नको ना त्याला त्रास देऊस.. तु गप्प गाडी ड्राइव्ह कर बघु..

रॉबिन : ओके..

आर्यन : हेच मी बोललो असतो ना तर जास्तच केलं असत ह्याने..
(आर्यन हळुच वृषभच्या कानात बोलतो)

रॉबिन : आर्यन तु मला काही बोललास का??

वृषभ : रॉबिन.. प्लिज नको ना त्रास देऊस त्याला.. प्लिज

रॉबिन : वृषभ फक्त नि फक्त तुझ्याठी काहीपण.. आर्यन गाणी लावली तर चालतील ना?? मला माझ्या गाडीत शांतता अजिबात आवडत नाही..

आर्यन : तुझी गाडी.. तुला लावायची तर लाव नाही तर नको लावुस..

रॉबिन : अस बोलतोयस मग गाणी लावतोच मी.. बट डान्स वैगेरे करू नकोस म्हणजे झालं.. पाय अजुन बरा नाही झालायना म्हणुन बोलतो..

वृषभ हसतच आर्यनकडे बघतो.. आणि इशाऱ्यानेच त्याला तु शांत बस बोलतो..

गाडीत अशीच मज्जा मस्ती करत फायनली सगळे आर्यनच्या घरी पोहचतात.. आर्यनला अस क्रचच्या सहाय्याने घरी आलेलं बघुन त्याच्या पप्पांना थोडं भरूनच येत.. आर्यनचा एक हात आपल्या खांद्यावर ठेवतच ते त्याला बेडवर बसवतात.. वृषभ बोलल्या प्रमाणे त्याला प्रेमाने जवळ घेत त्याची विचारपुस करतात.. थोड फार ओरडतात सुद्धा.. बट ते तेवढ्या पुरतच..

रॉबिन आणि महेश घरी जायला निघतात.. बट आर्यनची आई त्यांना जबरदस्ती थांबवत जेवायला बसवते.. वृषभ सुद्धा आजणत्यांच्यासोबत जेवायला बसतो.. पिऊ आणि पिऊची आई मिळुन सगळ्यांना जेवण वाढत असतात.. वृषभ जेवताना आपल्याकडे कुणाच लक्ष नाही हे बघून पिऊवर नजर फिरवतो.. बट जेव्हा जेव्हा तो तिच्यावर नजर फिरवतो तेव्हा तेव्हा तीच लक्ष त्याच्याकडेच असत.. वृषभला अजुन त्याच्या भावनांवर कन्ट्रोल करायला जमत नसत.. तो पण आत्ता त्याच मन जे बोलेल तस वागत असतो.. पिऊ त्याला इशाऱ्यानेच त्याला काय झालं म्हणुन विचारते..

वृषभ : काकु कांदा भजी खुपच छान झालीय..

आर्यनची आई : आज पिऊने बनवलीय.. आर्यनला आवडते म्हणुन.. अजुन घे.. पिऊ त्याला अजुन दे बघु..

वृषभ : नाही बस.. म्हणजे ताटात अजुन आहेत माझ्या.. लागल की घेतो.. पण खरंच खुप म्हणजे खुपच छान झालीत भजी..

वृषभने पुन्हा एकदा आपलं कौतुक केलंय हे बघुन पिऊ गालातल्या गालात हसत थोडी लाजते.. वृषभ तीच ते लाजण बघुन अजुनच तिच्या प्रेमात पडत असतो.. तो पण तिला एक गोड अशी स्माईल देत आपल्या ताटात लक्ष घालणार तोच त्याच्या समोर बसलेल्या रॉबिनवर त्याच लक्ष जात.. रॉबिन एकदम गंभीर चेहरा करतच त्याच्याकडे बघत असतो.. त्याच्याकडे नजर फिरवुन तो आर्यनकडे बघतो.. आर्यन आपल्या पप्पांसोबत बोलण्यात व्यस्त असतो.. वृषभचा घास पकडलेला हात आत्ता थरथरू लागतो.. तो घाबरतच रॉबिनकडे बघतो.. आणि पिऊवर आपली नजर फिरवतो.. पिऊ त्याला इशाऱ्यानेच काय झालं म्हणुन विचारते.. हलकीच अशी मान नकारार्थी हलवत तो नजर आपल्या ताटात ठेवुन ताटात घेतलेलं जेवण जबदस्ती संपवत असतो.. हळुच एक नजर पुन्हा रॉबिनवर फिरवतो तर रॉबिन त्याच्याकडेच बघत असतो..

पटापट जेवण आटोपून आर्यनला बाय करतच तिघही घराबाहेर पडतात.. 

रॉबिन : महेश तु जाशील काय?? माझं वृषभकडे काम आहे थोडं.. तस पण तु इथेच रहातोस..

महेश दोघांना बाय करून तिथुन निघुन जातो..

वृषभ : काय झालं??

रूममध्ये चल मग बोलुयात.. वृषभचा हात पकडतच रॉबिन त्याला त्याच्या रूममध्ये आणतो.. आणि दरवाजा लावुन घेतो..

रॉबिन : काय चाललंय तुझं??

वृषभ : काय??

एकच अशी तुला सनसनीत गालावर देईल ना वृषभ मग काय चाललंय ते तुझ तुला कळेल..  तुझं आणि पिऊच काय चाललंय ते विचारतोय मी?? रॉबिन थोडं राग दाखवतच त्याला बोलतो..

वृषभ : काहीच नाही..

रॉबिन : वृषभ मी मस्तीच्या मुडमध्ये नाही आहे हा.. प्लिज खर बोल..

वृषभ : खरच काही नाही. तु समजतोस तस काहीच नाही आहे..

रॉबिन : अच्छा मग इशारे काय चालु होते तुझे??

(वृषभ घाबरतच रॉबिनकडे बघु लागतो.)

काय चाललंय तुझं??

वृषभ : तु समजतोस तस काहीच नाही रे..

रॉबिन : ए वृषभ माझ्या चेहऱ्यावर मी मूर्ख आहे अस कुठे लिहिलय का? 

वृषभ : तु अस भडकु नकोस ना प्लिज..

रॉबिन : नाही भडकत मी.. बट मला सांग..

वृषभ : मला पिऊ आवडते.. बट तु समजतोस तस आमच्यात काहीच नाही आहे अजुन.. शप्पथ..

रॉबिन : वृषभ तु आर्यनला अजुन नीट ओळखत नाहीस यार . तु त्याच्या घरी राहुन त्याच्या बहिणीवर प्रेम करतोस हे जर त्याला कळलं ना तर तो तुझी काय हालत करेल तु ह्याचा तु विचारच करू नकोस.. मला काहीच प्रॉब्लेम नाही तुझ तिच्यावर प्रेम आहे ह्या बाबत बट आर्यन पासुन सांभाळुन रहा.. जस मी तुला समजुन घेतोय तस तो नाही समजुन घेणार तुला.. आणि जिच्यासाठी तु एवढी मोठी रिस्क घेतोयस ती कटपुतली आहे त्याची.. ती त्याच्याच तालावर आत्तापर्यंत नाचत आलीय आणि ह्यापुढेही नाचणार.. तो बोलला ना तुला सोड तर ती तुला सोडेल अस आहे तीच.. कॉलेज पिकनिक सोड साद स्कुल पिकनिक पण हा मुलगा तिला जायला देत नव्हता.. तिच्या घरी तिला स्वतःचे निर्णय घेताना मी कधीच नाही बघितलंय.. आर्यनचे आई वडील आर्यनच्या प्रत्येक गोष्टीत त्याला सपोर्ट करतात.. अंकल आंटी चांगले आहेत बट पिऊच्या बाबतीत ते अजिबात चांगले नाही वागत.. माझी सिस्टर पिऊची बेस्ट फ्रेंड आहे.. दोघीही क्लासमेट आहेत म्हणुन मला हे सगळं माहिती.. कारण मी स्वतः त्याला एकदा समजवण्याचा प्रयत्न केलेला.. माझी बहिण आणि मी बघुन घेऊ तु तुझ्या ज्यो कडेच बघ.. हे त्याच उत्तर होत.. 

(रॉबिन अस काही बोलताच वृषभ बाजुलाच असलेल्या सोफ्यावर बसतो.)
 
ए वृषभ एवढं सिरीयस नको होऊस.. तुला पिऊ खरच आवडते का??

वृषभ : खुप आवडते रे.. (वृषभ त्याने रोहनला जे काही सांगितलं असत ते रॉबिनला सांगतो).. मी तिला खुप टाळायचा प्रयन्त करतोय बट नाही टाळता येत मला.. कारण मी तिला इग्नोर केलं तर ती हर्ट होतेय आणि मला नाही आवडत आहे ते..

रॉबिन : तुला कस माहिती ते..

वृषभ : प्रेम करतोना तिच्यावर.. तिच्या नजरेत दिसत ते..

रॉबिन : पुढे खुप प्रॉब्लेम होतील रे.. इतर कोणी असत तर मी तुला अडवलं नसत.. बट तु त्या हिटलरच्या बहिणीच्या प्रेमात कसा काय पडला यार..?? ए वृषभ म्हणजे ते फोन पिऊचे असायचे का तुला??

वृषभ : काहीही काय.. पिऊने फक्त एकदाच फोन केलेला ते ही अर्धा सेकंद बोलली असेल माझ्यासोबत.. ते पण हे सांगायला की आर्यनच एक्सिडेंट झालंय. त्यानंतर कधीच फोन नाही केलाय.. ए रॉबिन प्लिज तु कुणाला हे सांगु नकोस.. मला प्रॉमिज कर..

रॉबिन : नाही सांगत डोन्ट वरी.. बट मी जे सांगतोय ते नीट ऐक.. प्रेम अश्या मुलीवर करावं जी आपल्यासाठी आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन सर्व काही करू शकते.. म्हणजे आपल्यासाठी काहीही करू शकते ती.. आत्ता माझं बोलशील तर ज्यो माझ्यासाठी काहीही करायला तैयार असते. लकीली ज्यो च्या घरून आमच्या लग्नाला विरोध नाही बट जर असता तर ती माझ्यासाठी तीच घरदार सोडुन आली असती.. घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने माझ्यासोबत लग्न केलं असत.. पिऊ तुझ्यासाठी अस काही करेल अस मला नाही वाटत.. कारण मी तिला खुप चांगलं ओळखतो.. जर तुला पिऊबद्दल खात्री असेल तरच तु पुढे जा नाही तर इथुनच कुठे तरी जा.. कारण इथे राहुन तु तिला विसरणार नाहीस.. तिला पण त्रास आणि तुला पण त्रास.. आणि प्रॉब्लेम होतील ते वेगळेच..

वृषभ काहीही न बोलता शांत बसुन असतो.

रॉबिन : तु अस शांत नको रे बसुस.. काही तरी बोल..

वृषभ : काय बोलु..?? लाईफमध्ये पहिल्यांदाच मी हे अस प्रेमात पडलोय यार.. आत्ता पर्यंत माझ्या मित्र मंडळींचं मी बघितलं तर त्यांना त्यांच प्रेम अगदी सहज मिळालं.. माझ्या बाबतीतच अस का घडतंय.. मला नाही जमत आहे रे पिऊ शिवाय रहायला.. म्हणजे एक दिवस जरी तिच्या पासुन लांब राहिलो तर दुसऱ्या दिवशी मी जास्तच जवळ जातोय तिच्या अस होतय माझं. 

रॉबिन : तिला एकदा विचारून बघ मग.. पिऊ रिस्क घ्यायला तैयार असेल मग ठिक आहे.. म्हणजे आत्ता तुम्ही असे लांब लांब आहात म्हणुन त्रास होतोय इन्फ्युचर एकमेकांच्या रिलेशनशिप मध्ये आहात हे जर तिच्या घरी कळलं तर ह्यापेक्षा बेकार त्रास होईल.. ती सगळं सहन करायला तैयार असेल मग ठिक आहे.. बट जे करशील ते विचार करून कर.. आर्यन खरच खुप त्रास देईल यार तुला.. आणि तुझ्यापेक्षा जास्त त्रास तर तिला देईल.. उठता बसता संशय घेईल तो तिच्यावर.. सायको आहे रे तो.. म्हणुन बोलतोय.. 

वृषभ : माझ्यामुळे पिऊला नको त्रास व्हायला..

(आपला मोबाईल हातात घेतच तो रॉबिनला बोलतो..)

रॉबिन : काय करतोयस.. कोणाला फोन लावतोयस??

वृषभ : पिऊचा नंबर ब्लॉक करून टाकतोय.. आज पासुन मी नाही तिच्याजवळ जाणार.. तिचा विचार वैगेरे पण नाही करणार.. जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर मी इथुन बाहेर पडेल.. माझ्यामुळे तिला त्रास झालेला मला नकोय.. मला तिला कोणापासूनच वेगळं नाही करायच..

रॉबिन : हे नक्की झालंय तुझं??

वृषभ : हम्मम..

रॉबिन : तु पिऊ हवी अस बोललास तरी मी तुला मदत करेल नको बोललास तरी मी तुला मदत करेल.. फक्त तु ठरव..

वृषभ : नको पिऊ मला.. बट मला इथे राहुन तिला विसरायला नाही जमणार.. थोडे दिवस गावी जायचा विचार केला तर सुट्टी नाही मिळणार रे.. म्हणजे थोडे दिवस मी ह्या घरापासुन लांब राहिलो तर ती सुद्धा विसरेल मला..

रॉबिन : तु एक काम कर.. तु थोडे दिवस माझ्यासोबत माझ्या घरी चल रहायला.. इथे नको राहुस.. तस पण माझ्या घरी कोणीच नाही.. सगळे गोव्याला गेलेत.. अजुन पंधरा एक दिवसांनी येणार आहेत.. तेवढं तुलाच थोड बर वाटेल.. मस्त एन्जॉय करूयात.. तस पण मला एकट्याला बॉर होतय घरी.. 

वृषभ : उद्या पासुन येतो..

रॉबिन : उद्या पासुन नाही आत्ता पासुनच.. आर्यनला जे काही सांगायच ते मी सांगुन येतो.. तु तुझी बेग भर आणि गाडीत बस.. 

रॉबिन वृषभला आपल्या सोबत घरी घेऊन जातो..

वृषभ रॉबिनच्या घरी जाऊन बघतो तर रॉबिनच्या घरी त्याची सगळीच फॅमिली असते.. 

वृषभ : तु तर बोललास की..

(वृषभ आपली बेग तशीच हातात पकडत रॉबिनकडे बघत रहातो)

अस बोललो नसतो तर तु आला असता का इथे रहायला.. आत चल.. रॉबिन घरात शिरतच वृषभला बोलतो..

घरी यायला वेळ मिळाला तर तुला.. घरी गेल्या गेल्या रॉबिनच्या आईच रॉबिनला लेक्चर देन चालु होत..

रॉबिन : माय डिअर मम्मी.. माझा फ्रेंड आलाय..

सगळेच दरवाज्यात उभ्या असलेल्या वृषभकडे बघतात..

आत ये.. रॉबिनची आई वृषभला आत बोलवत असते..

रॉबिन : ए वृषभ ते तुम्हा लोकांमध्ये अस माप वैगेरे ओलांडतात तस तुला यायचय का.. एकच मिनिट.. जेनी ते एका ग्लास मध्ये राईस घेऊन ये.. आपण ह्याच वेलकम करूयात.. (आपल्या बहिणीला सांगतच रॉबिन बोलतो)

रॉबिनचे डॅड : हे यंग मॅन.. कम इनसाईड..

वृषभ थोडं घाबरतच त्याच्या घरी येतो. 

घाबरतोयस कसलं.. तुझंच घर समज.. अस बोलत रॉबिन आपल्या फॅमिलीसोबत त्याची ओळख करून देतो आणि त्याला घेऊन आपल्या रुममध्ये जातो..

वृषभ : मी नाही रहाणार इथे.. 

रॉबिन : माझी फॅमिली खरच गोव्याला चाललीय रे.. जेनी इथेच राहील.. जेनी म्हणजे माझी सगळ्यात लहान बहीण.. तुझ्या पिऊची बेस्ट फ्रेंड.. तिच एडमिशन करायचय म्हणुन तिला बिचारीला इथे माझ्यासोबत रहावं लागतंय.. आणि तुला माहितीय मला कोणी ना कोणी त्रास द्यायला लागतच असत.. ती सोडुन बाकी सगळेच चाललेत.. एक फॅमिली फंक्शन  आहे ना तिथे म्हणुन..

वृषभ : तरी पण..

रॉबिन : आर्यनला सांगु?? 

वृषभ : रॉबिन ब्लॅकमेल नको ना करुस.. एक तर तु अस काही सांगितलंस ते ऐकुन मी आधीच टेन्शनमध्ये आहे रे.. मी अस तुझ्या घरी निघुन आलोय म्हटलं तर तिथे ती पिऊ माझ्याबद्दल काय विचार करत असेल गॉड नॉज..

रॉबिन : ए वृषभ तु आधी नीट ठरव बघु तुला पिऊ हवी का नको ते??

(वृषभ मान खाली घालुन शांत बसुन रहातो..)

ए वृषभ मी सिरियसली विचारतोय यार. इथे माझ्याकडे बघ बघु..

वृषभ मानेनेच नाही बोलतो..

रॉबिन : ओके.. उद्या ऑफिस आहे ना तुझं मग झोप तु.. मी आलोच..

वृषभ : तु कुठे चाललायस आत्ता?

रॉबिन : जेवायला.. तु जेवणार??

वृषभ : व्हेज जेवण गेलं नसेल ना तुला..

रॉबिन : एकदम बरोबर.. तु पण चल जेवायला..

वृषभ : नाही नको.. मी पोटभर जेवलोय..

रॉबिन : ते तर तु जेवणारच रे.. कांदा भजी जास्तच चांगली झाली होती आय नॉ.. बट जस आर्यनच्या घरी लाजतोस तस माझ्या घरी लाजु नकोस हा.. स्वतःच्या हाताने घे बिनदास्त.. 

वृषभ : हम्मम.. थेंक्स..

रॉबिन : असले नको ते शब्द मला आवडत नाहीरे.. परत बोलु नकोस.. बट आत्ता मला खरच भुक लागलीय.. मी जेवुन येतो.. तु झोप.. तस पण मी माझ्या ज्यो ला भेटायला जाईल..

वृषभ : एवढ्या रात्री..?? वेडा आहेस का??

रॉबिन : व्हिडीओ कॉल वर बोलणं म्हणजे भेटल्यासारखच असतरे..

रॉबिन हसतच वृषभला बोलतो.. वृषभ सुद्धा त्याच्या अश्या बोलण्यावर हसु लागतो..

आलोच अस बोलत रॉबिन निघुन जातो.. वृषभ मात्र रात्रभर त्याने पिऊ सोबत केलेली चॅटिंग परत परत वाचत असतो..

दोन दिवस सहज उलटुन जातात.. अश्यातच शनिवारचा दिवस उजाडतो..  वृषभ इन्स्टिट्यूटच्या गेटजवळ समीराची वाट बघत उभा असतो.. थोड्याच वेळात ती येते..

समीरा : कसा आहेस??

(समीरा त्याच्या नजरेसमोरून हात फिरवत त्याला लागलेली तंद्री दूर करतच बोलते)

वृषभ : जसा दिसतोय तसाच आहे.. तु कशी आहेस??

समीरा : एकदम खुश.. फायनली पर्वा दादा येतोय.. एकदा का दादा आला की मग मला तेवढं काम करावं नाही लागणार जेवढं आत्ता करते.. मी पुढचा आठवडा सुट्टी घेऊन घरी आराम करणार.. मस्तपैकी शॉपिंगला जाणार.. तु येशील माझ्यासोबत शॉपिंगला??

(वृषभ काहीच बोलत नाही.. शांत बसुन असतो.)

तुला नाही यावस वाटत तर इट्स ओके..( समीरा थोडं नाराज वृषभकडे बघतच बोलते..)

वृषभ लक्ष कुठेय तुझं.. त्याच तोंड आपल्याकडे करतच ती बोलते..

वृषभ : काय झालं??

समीरा : तुला काय झालंय?? लक्ष कुठेय तुझं??

वृषभ नकारार्थी मान हलवत कुठे नाही बोलतो.. 

समीरा : काय झालंय वृषभ..??

वृषभ : लेक्चरला उशीर होतोय..

दोघेही लेक्चरमध्ये जाऊन बसतात.. जवळपास अडीच तासांनी लेक्चर संपत तस दोघे बाहेर येतात.. समीरा वृषभचा हात पकडतच त्याला घेऊन इन्स्टिट्यूट जवळ असलेल्या एका गार्डनमध्ये जाते.. गार्डनमध्ये असलेली एका बाकड्यावर दोघे बसतात..

समीरा : काय झालंय तुला??

वृषभ : काही नाही..

समीरा : वृषभ मला नाही सांगणार??

वृषभ : दोन दिवस झाले मी तिला बघितलं नाही ग.. तिचा आवाज नाही ऐकलाय... तिच्याशी बोललो नाही. मला तिची आठवण येतेय खुप.. 

समीरा : भांडलास का तिच्याशी??

वृषभ : तसच काहीस.. मी काय करू?? म्हणजे मी तिला विसरेल..?? 

समीरा : तु तुझं प्रेम व्यक्त केलंस का तिच्यापुढे??

वृषभ : नाही..

समीरा : वृषभ खर प्रेम सहजासहजी नाही रे मिळत.. प्रेमात थोडासा त्रास होतोच. तु तुझं प्रेम तिच्यासमोर व्यक्त कर..

वृषभ : मला नाही करावंसं वाटत ग.. मला फक्त सांग मी काय करू मग मी तिला विसरेल..

समीरा : हाच प्रश्न काही दिवस आधी मी तुला विचारलेला ना वृषभ..?? काय करू म्हणजे मी शौर्यला विसरेल.. मला तर तु पटकन उत्तर दिलंस.. स्वतःला बिझी कर.. फॅमिली सोबत बिझी रहा.. तुला टेबल टेनिस आवडत मग ते कर.. ऑफिस मध्ये लक्ष दे.. मला तर तु खुप सारे सजेशन दिलेलेस.. मी तुला ह्यापैकी कोणतं सजेशन देऊ हे तुच सांग.. तु तर प्रेमात फक्त पडलायस.. माझं तर पहिलं प्रेम पण माझ्यापासुन लांब गेलंय आणि आज ना उद्या दुसर ही लांबच जाईल.. 

वृषभ : दुसर?? तु परत प्रेमात पडलीयस हे मला कळलं होत.. तु मला स्वतःहुन कधी सांगतेस मी ह्याचीच वाट बघत होतो..

समीरा : तुला कोण बोललं..??

वृषभ : ज्याला तु बोललीस तो..

समीरा : रोहन??

वृषभ : हम्मम.. आत्ता त्याच नाव सांगुन पण टाक ज्याच्या तु प्रेमात आहेस..

समीरा : त्याने नाव नाही सांगितलं रोहन ने??

वृषभ : नाही.. बट तु मला सांगणार आहेस..

समीरा : त्याच नाव ही नाही सांगु शकत आणि ज्याच्यावर प्रेम करते त्याला सुद्धा मी तुझ्यावर प्रेम करते अस नाही सांगु शकत..

वृषभ : का??

समीरा : असच.. बाय दि वे तु रोहनचे फोन का नाही उचलत आहेस?? तो मला फोन करून तुझ्याबद्दल विचारत होता.. काही झालंय का तुम्हा दोघांत??

वृषभ : मला त्याच्यासोबत बोलुन त्रास होतो.. पहिलं तो एकटा होता मग मला काळजी वाटायची त्याची.. बट आत्ता त्याची गार्गी आहे त्याच्यासोबत.. आत्ता त्याची काळजी करायला हवी अस मला नाही वाटत..

समीरा : गार्गी बद्दल बोलला मला पण.. फोटॉ पण दाखवला तिचा. खुप क्युट आहे..

वृषभ : तु बोलतेस मग असेलच..

समीरा : तु फोटॉ नाही बघितलास का तिचा??

वृषभ : नाही..

समीरा आपल्या मोबाईलमध्ये वृषभला फोटो दाखवत असते..

समीरासोबत थोड्याश्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत वृषभ रॉबिनच्या घरी येतो.. 

रॉबिन दरवाजा उघडुन एकदम सिरीयस असा चेहरा करतच त्याच्याकडे बघत असतो..

वृषभ : काय झालं??

रॉबिन पुर्ण दरवाजा उघडतच बाजुला होतो.. तस समोर रॉबिनच्या बहिणीसोबत बसलेली पिऊ वृषभला दिसते..

रडुन तिचे लाल झालेले डोळे आणि नाक वृषभच्या नजरेतुन सुटत नाही..

रॉबिन वृषभचा हात पकडतच त्याला आत घेतो आणि दरवाजा लावुन घेतो..

Jenni leave them alone.. अस बोलत रॉबिन आपल्या बहिणीला घेऊन आत जातो.

पिऊ नजर खाली ठेवुन एकटक कुठे तरी बघत असते.. डोळ्यांतुन तिच्या पाणी येत असत.. 

वृषभ : पिऊ तु रडतेस का?? काय झालं??

पिऊ काहीच बोलत नाही.. वृषभ खिश्यातुन रुमाल काढतच तिच्या समोर धरतो.. ती त्याच्या रुमाल काही घेत नसते.. तो आपल्या थरथरत्या हातात रूमाल पकडतच तिचे डोळे पुसतो..

प्लिज रडु नकोस.. आय एम सॉरी.. वृषभ आपले दोन्ही कान पकडतच पिऊ ला बोलतो..

पिऊ : माझं काय चुकलंय वृषभ जे तु माझ्यासोबत अस वागतोयस.. मला त्रास होतोय तुझ्या वागण्याचा रे.. का नाही कळत आहे तुला.. 

वृषभ : पिऊ.. आपण एकमेकांसोबत न बोललेलं आपल्यासाठी चांगलं आहे.. 

पिऊ : तुला नाही बोलायच माझ्यासोबत??

वृषभ : तेच आपल्या दोघांसाठी चांगलं असेल.. तु समजून घे प्लिज..

पिऊ : वृषभ तुला नाही बोलायच माझ्यासोबत..?? मला फक्त हो की नाही तेवढ सांग..

वृषभ : नाही.. 

पिऊ : थेंक्स... & सॉरी.. काळजी घे.. बाय.. 

पिऊ आपले डोळे पुसते आणि तिथुन जाऊ लागते..

वृषभ : पिऊ.. 

पिऊ डॉर ऑपन करून जाणार तस वृषभ तिला आवाज देतो.. ती त्याच्याकडे न बघताच एका हाताने दरवाजा पकडत थांबते..

वृषभ : तु खुप छान आहेस ग.. मी तुझ्यासाठी परफेक्ट नाही.. तुझा दादा तुला खुप छान अस कोणी तरी नक्की शोधुन देईल.. मला माफ कर.. 

पिऊ काहीही न बोलता तिथुन निघुन जाते..

वृषभ सोफ्यावरचआपल्या दोन्ही हातावर आपलं डोकं ठेवुन रडत बसतो..

थोड्या वेळाने रॉबिन आणि जेनी येते..

रॉबिन : पिऊ कुठेय??

(वृषभ काहीच बोलत नाही..)

काय झालं रडतोयस का?? पिऊ कुठेय??

वृषभ : घरी गेली.

रॉबिन : तु काही बोललास का??

वृषभ : काय बोलु यार मी...?? मी नाही नेऊ शकत हे रिलेशन पुढे.. हेच तिला सांगितलं.. मला ती अस माझ्यामुळे रडलेलं नाही आवडत आहे यार.. मी काय करू रॉबिन.. मी बोललो ना तुला तिला त्रास होतो मी तिच्याशी अस काही वागलो तर.. 

रॉबिन : ती खर प्रेम करतेय तुझ्यावर म्हणजे तु येण्याआधी मी बोलत होतो तिच्याशी त्यावरून मला वाटलं.. आर्यनला मी समजवु का..??

वृषभ : अजीबात नाही.. तिला मी समजवलय ती समजली असेल.. परत नको.. हे सगळं इथेच थांबु दे.. प्लिज..

जेनी : एकदा पिऊचा विचार कर ना प्लिज..

रॉबिन : वृषभ थोडी रिस्क घेऊन बघ म्हणजे तुझ्यात नाही बोलण्यासारखं काहीच नाही अस मला वाटत.. अंकल आंटीला तु आवडतोस.. त्या सायकोला आपण समजवुया.. तस पण तु एवढ्यात लग्न थोडीना करणार आहे.. चार पाच वर्षे तरी थांबशील ना.. तोपर्यंत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणुन रहा.. तिच्या घरी कळणार नाही अस वागा..

जेनी आणि रॉबिन मिळुन वृषभची समजुत काढत असतात.. वृषभ शांतपणे दोघांच बोलणं ऐकत असतो.. जवळपास अर्धा एक तास तरी असाच जातो तोच आर्यनचा फोन वृषभच्या मोबाईलवर येतो.. थोडं घाबरतच तो त्याचा फोन उचलतो..

आर्यन : वृषभ आत्ताच्या आत्ता घरी ये..

(वृषभने फोन उचलल्या उचलल्या आर्यन बोलतो)

वृषभ : का?? काय झालं??

आर्यन : घरी आलास की कळेलच तुला.. आणि लवकर ये..

क्रमशः

(कश्याला बोलवल असेल आर्यन ने वृषभला?? आणि कथेत अजुन पुढे काय काय घडणार आहे.. हे सगळं पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. 

पुढील भाग हा मंगळवारी रात्री पब्लिश होईल.. पार्ट थोडं उशिराने पोस्ट होत आहेत त्याबद्दल सॉरी.. )