अतरंगीरे एक प्रेमकथा १२०

In marathi

चौघेही फायनली USA मध्ये पोहचतात. हॉटेलमध्ये पोहचताच विराज आपली बेग तशीच बेडवर ठेवत घरी फोन करून कळवतो.. अनघासुद्धा तिच्या घरी फोन करून कळते.. खुप मोठा असा प्रवास करून चौघेही दमले असतात बट USA फिरण्याचा उत्साह त्यांना ते जाणवु देत नसतो.. ब्रेकफास्ट आटोपुन आराम न करता चौघेही Philadelphia शहर फिरत असतात.. विराज सगळ्यांना घेऊन Philadelphia मधली फेमस असा म्युझिअम आणि लिबर्टी बेल दाखवायला घेऊन जातो... 

श्री : आत्ता नेक्स्ट कुठे जायच??

विराज : Now back to hotel.. मला उद्याच्या मिटिंगची थोडी तैयारी करायचीय..  बाकीच आपण फ्रायडेला फिरुयातना... फ्रायडे पुर्ण दिवस आपण ही सिटी फिरुयात.. चालेल??

श्री : ओके..

चौघेही पुन्हा हॉटेलमध्ये येतात.. विराज आणि अनघा आपल्या रूममध्ये बसुन उद्या असणाऱ्या मिटिंगच प्रेझेंटेशन बघत असतात.. 

विराज : हे वाल PPT निखिल ने बनवलय..

अनघा : काही ठराविक स्लाईडमध्ये आपल्याला चँजेस करावे लागतील..

विराज : त्याची गरज नाही.. मी सॅम PPT वृषभला बनवायला दिलेलं.. हे बघ.. मला आज काल निखीलने केलेलं कोणतच काम पटत नाही म्हणुन त्याच्या प्रत्येक कामाचा बॅकअप म्हणुन मी त्याची सगळी काम एक एक करून वृषभकडे देणार आहे. 

अनघा विराजकडे नजर फिरवतच वृषभ ने बनवलेल PPT बघते..

Its perfect... वृषभ ने  बनवलेल PPT बघुन होताच विराजकडे बघतच अनघा त्याला बोलते..

विराज : मला वृषभ फ्रेशर्स आहे की निखिल फ्रेशर्स आहे हेच कळत नाही.. निखीलला माझ्या कंपनीत जवळपास 9 वर्ष झाली.. बट आजकाल तो काम करायचं म्हणुन करतोय. सॅम काम वृषभने मला दोन तासात करून दिल आणि त्याने पुर्ण दिवस ह्या सिंपल अश्या PPT साठी घेतलाय.. 

अनघा : आपण नंतर बोलुयात त्याच्यासोबत..

विराज : बोलायच काय आहे त्यात??? मला असल्या कामचुकार एम्प्लॉयीसची माझ्या ऑफिसमध्ये अजिबात गरज नाही आहे. कामाच्या बाबतीत मी कोणाचेच लाड नाही करत.. यु नॉ देट..

अनघा : विराज रागावर खरच कन्ट्रोल ठेव हा. कोणताच निर्णय तु अस रागात अजिबात घेणार नाहीस.. तुला एम्प्लॉयीसची गरज नाही पण कदाचित त्याला ह्या जॉबची गरज असेल.. 

विराज : तसा सिरीसनेस पणा मला दिसत नाही आहे त्याच्यात.. 

अनघा : विराज आपण नंतर शांत पणे बोलूयातना ह्या विषयावर.. पण आत्ता उद्या जी मिटिंग आहे त्या रिलेटेड आपण थोडं प्रिपेर करूयात.. ओके??

विराज : हम्मम्म...

(दोघेही उद्याच्या मिंटिंगच्या तैयारीत गुंतून जातात.)

इथे आर्यनला प्रतीक सोबत जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यामुळे वृषभला सगळे जन एवढ्या लांब येऊ नको बोलतात.. त्यामुळे वृषभ कामावरून सुटल्यावर त्याच्या घरी येतो..

नेहमीप्रमाणे फ्रेश होत गावी आई पप्पांना फोन लावत त्यांची विचारपुस करतो.. त्यांचा फोन ठेवतो न ठेवतो तस त्याला समीराचा फोन येतो..

वृषभ : हॅलो..

समीरा : तुला मी डिस्टरब नाही ना केलं??

वृषभ : मी आत्ता तुला फोन लावायचा विचार करत होतो..

समीरा : खरच??

वृषभ : हो अग.. तु MBA मध्ये एडमिशन घेतलंस की नाही हे काही बोललीसच नाहीस मला. 

समीरा : सॉरी मी विसरले तुला सांगायला. बिजीनेस मॅनेजमेंट मधुनच घेतलं.. आणि तु सांगितलेल्याच इन्स्टिट्यूट मधुन..

वृषभ : ग्रेट म्हणजे  माझ्यासोबत कोणी तरी आहे अस म्हणायला हरकत नाही.

समीरा : हे खरं मला बोलायच होत बट माझा डायलॉग तु बोललास इट्स ओके... मी काय बोलते तुला सीमा ने केलेला का फोन??

वृषभ : नाही ग.. का?? काय झालं??

समीरा : मॅडम लग्न करतायत..

वृषभ : what?? (वृषभ थोडं जोरातच बोलतो)

समीरा : वृषभ तु जेवढ्या मोठ्याने what बोललास त्यावरून माझी खात्री झालीय की ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसुन सीमाच होती जिच्या तु प्रेमात होतास.. 

वृषभ : एवढ्या लवकर लग्न करतेयना म्हणुन ते मी मोठयाने बोललो ग.. बट खरच एवढ्या लवकर लग्न करतेय का ती??

समीरा : आत्ता तिला करावंसं वाटत असेल लग्न म्हणुन करत असेल.. तुला खरच जास्त त्रास होतोय का?? (समीरा थोडं चिडवतच वृषभला बोलते)

वृषभ : अजुन??

समीरा : तुझ्यासाठी हवं तर मी बोलते तिच्याशी.. माझं ऐकेल ती..

वृषभ : ए समीरा प्लिज स्टॉप यार.. तुला मी त्यादिवशी बोललो ना ती सीमा नाही तरी तुझं तेच.. त्यादिवशी तर मी तुम्हां लोकांना ती कोण आहे हे सुद्धा सांगितलं. 

समीरा : मस्ती करतेय रे वृषभ तुझी.. 

वृषभ : कधी लग्न आहे??

समीरा : जानेवारी.. बट लग्न मलेशियामध्ये आहे.. म्हणजे आफ्टर मॅरिड ती सुद्धा तिथेच सेटल होणार आहे.. सॉ मला अस वाटत की आपण परत एकदा तिच्यासाठी गेट टुगेदर करूयात.. तिच्या लग्नात आपल्या सगळ्यांनाच जायला मिळेल अस नाही ना म्हणुन बोलतेय..

वृषभ : मला लगेच सुट्टी नाही मिळणार ग.

समीरा : मी लगेच भेटुयात अस बोलत सुद्धा नाही.. आपण हा 31स्ट एकत्रच सेलिब्रेट करूयात का?? कुठे तरी छान ठिकाणी भेटुन??

वृषभ : बाकीचे रेडी असतील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही.. मॅन म्हणजे जिच्यासाठी प्लॅनिंग करतोयस तिला विचार तिच्याकडे आपल्यासाठी वेळ आहे का?? 

समीरा : ते मी तिला विचारते.. तु राज आणि टॉनीला विचार.. रोहन आणि सीमाला मी विचारते..

वृषभ : ओके मी विचारतो त्यांना.. 

समीरा : तु जेवलास??

वृषभ पूढे काही बोलणार तोच त्याच्या रुमचा दरवाजा कोणी तरी नॉक करत..

वृषभ फोन तसाच कानाला लावत दरवाजा उघडतो तर समोर पियुषी हातात जेवणाच ताट पकडुनन उभी असते..

वृषभला थोडा वेळ काय होतंय हे कळतच नव्हतं.. तो एकटक तिच्याकडे बघतच उभं रहातो आणि ती त्याच्याकडे. दोघांचीही नजरा नजर होत असते..

(वृषभ मी काही तरी विचारतेय तुला.. समीरा फोनवरूनच त्याला बोलते) फोनवरून ऐकु येणाऱ्या समीराच्या आवाजाने वृषभ थोडं भानावर येतो आणि पियुषी वरून लगेच आपली नजर हटवतो.

समीरा एक मिनिट अस बोलत तो फोन तसाच चालु ठेवतो.. पियुषीच्या हातातलं ताट घेणार तोच पियुषी थांबायला सांगते..

पियुषी : जेवण गरम आहे.. तु ताट पकडायला गेलास तर दोघांच्या हातातुन कदाचित ते निसटेल.. मी आतमध्ये येऊन ठेवलं तर चालेल का तुला??

वृषभ होकारार्थी मान हलवत तिला साईड देत तिथेच दरवाजा जवळ उभं रहातो.. वृषभ त्या रूममध्ये आल्यापासुन पियुषी पहिल्यांदाच त्या रूममध्ये आली असते.. संपुर्ण रूमवर ती आपली नजर फिरवते.. आणि परत जायला निघते..

थेंक्स.. ती जाता जाताच वृषभ तिला बोलतो..

पियुषी : काही लागलं की आवाज दे आणि कटलेट मी बनवलेत.. दादा बोलला होता तुला लास्ट टाईम मी बनवलेले कटलेट आवडले होते म्हणुन.. आज थोडे जास्तच दिलेत.. कसे झालेत ते सांग.. सांगशील ना??

वृषभ : हम्मम्म..(वृषभ हसतच तिला बोलतो)

पियुषी जिने उतरतच खाली जाऊ लागली.. वृषभ तिला जिने उतरताना तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक बघतच राहतो.. तोच पियुषी जिने उतरताना अचानक मध्येच थांबते.. आणि मागे वृषभकडे बघते.. ती अस अचानक थांबुन मागे बघते म्हटलं तर वृषभच हृदय अगदी जोर जोरात धडधडु लागत..

वृषभ ह्या वेळेला मी मीठ आठवणीने घातलय.. पियुषी हसतच त्याला बोलते.. आणि भरभर जिने उतरत आत घरात शिरते.. 

ती अस काही बोलताच वृषभला सुद्धा हसु येत.. हातात असलेला फोन चालु आहे हे त्याच्या लक्ष्यातच येत नाही. तो लगेच रूममध्ये येत पियुषीने ताटावर ठेवलेलं झाकण बाजुला काढतच तिने दिलेले कटलेट बघतो.. गेल्या वेळेला कटलेटचा आकार हा गोल होता.. ह्या वेळेला कटलेटने मात्र हार्ट शेपचा आकार घेतला असतो.. वृषभ मोबाईल हातात घेत त्यात पियुषीने पाठवलेल्या कटलेटचा फोटॉ काढायला घेणार तोच त्याला समीराचा फोन अजुन चालु आहे अस दिसत..

वृषभ : समीरा.. आय एम सॉ सॉरी. ते मी..

समीरा : बिझी आहेस का??

वृषभ : हा म्हणजे जस्ट पिऊ ने जेवण आणुन दिलंय..

समीरा : ओके गरमा गरम जेव मग.. तस आपण सेटरडे भेटु तेव्हा बोलुयात..

वृषभ : हम्मम.. गुड नाईट..

समीरा : गुड नाईट.. टेक केअर

समीराला बाय बोलत वृषभ आपल्या मोबाईलमध्ये पियुषीने त्याच्यासाठी बनवलेल्या कटलेटचा फोटॉ काढतो.. इथे पियुषी हातात मोबाईल घेऊन वृषभचा मॅसेज कधी येतो का ह्याची वाट बघत असते.. एक तास उलटुन जातो पण वृषभ तिला मॅसेज काही करत नाही.. आर्यनची आई दोघींसाठी जेवण घेते.. जेवण जेवताना पण तीच लक्ष मोबाईलवरच असत.. वृषभ आपल्याला एक मॅसेज नक्की करेल अस तीच मन तिला सांगत असत.. आणि तिचा फोन वाजतो.. चेहच्यावर लगेच हसु येत पण दुसऱ्या क्षणाला ते गायब ही होत.. कारण मोबाईलवर मॅसेजची नाही तर फोनची रिंग ट्युन वाजत असते.. आर्यनचा फोन आलेला असतो.. नेहमी हसत आपल्या भावाचा फोन उचलणारी पियुषी चेहरा पाडतच फोन आपल्या आईकडे देते..

आर्यनची आई आर्यनची विचारपूस करते.. आर्यन नेहमीप्रमाणे पियुषीला फोन द्यायला बोलतो.. पियुषी त्याची विचारपुस करत फोन तसाच बाजुला ठेवुन देते.. रात्रभर कुस बदलत ती वृषभचाच विचार करत असते.. इथे वृषभच सुद्धा काही वेगळं नसत.. पियुषी मॅसेजची वाट बघत असेल हे त्याच मन त्याला सांगत असत.. बट मनात असुन सुद्धा तो तिला मॅसेज करत नसतो.. रात्रीचे दीड वाजतात तरी त्याला झोप येत नाही.. तो जास्त काही विचार न करता रोहनला फोन लावतो..

रोहन : आज एवढ्या रात्री फोन??

वृषभ : तु झोपला नाहीस??

रोहन : गार्गीसोबत चॅटिंग करतोय रे..

वृषभ : अरे वाहह आज नाव सांगितलंस तर.
 
रोहन : त्यादिवशी तुला मी तीच नाव नाही सांगितलेलं का??

वृषभ : नाही.. मला वाटलं तुला सांगायच नसेल म्हणुन मी विचारलं ही नाही.

रोहन : आत्ता कळलं ना..??

वृषभ : हम्मम.. रोहनची गार्गी.. ऐकायला पण भारी वाटतंय..,

रोहन : थेंक्स यार.. बट तु का जागा आहेस??

वृषभ : काही नाही असच.. उद्या करतो फोन.. तु बोल तुझ्या गार्गी सोबत..

रोहन : फोन अजिबात ठेवायचा नाही हा. काय झालं बोल बघु..

(वृषभ खुप वेळ शांत बसुन असतो..)

बोलणा काय झालं??

वृषभ : रोहन.. ते मला माझ्या फिलींग अजुन नाही कन्ट्रोल करता येत आहेत रे.. जेवढं मी तिच्यापासून लांब पळतोय तेवढं जास्तच जवळ जातोय मी तिच्या.. मी तीन दिवस नीट झोपलो नाहीय.. म्हणजे हॉस्पिटलमध्ये होतो ना आर्यनसोबत.. हॉस्पिटलमध्ये झोप कुठे येतेय.. त्यात आज विर कामावर नव्हता.. मी आज नऊ वाजता घरी आलोय म्हणजे तुच विचार कर कामावर पण किती काम असेल ते.. आत्ता तर दिड वाजुन गेले तरी मला झोप येत नाही यार.. माझं मन प्रत्येक क्षणाला तिचाच विचार करतोय.. मी काय करू तेच मला कळत नाही..

रोहन : तु दुसऱ्या कश्यात तरी बिझी रहा ना..

वृषभ : तेच नाही जमत आहे मला.. जे पण काही करायला घेतलना तर ती प्रत्येक गोष्ट करताना मला तिच दिसतेय यार.. माझं माझ्या माईंडवर कन्ट्रोल नाही होत आहे..

रोहन : वृषभ तुला अस वाटत की तुझी कोणासोबत मैत्री तुटू नये तर तु हे सगळं आत्ताच्या आत्ता स्टॉप कर.. आणि काहीही करून माईंडवर कन्ट्रोल कर.. थोड्या दिवसांनी नॉर्मल होईल सगळं.. आणि आत्ता पगार पण वाढलाय ना.. तु PG मध्ये जाऊ शकतोस रहायला..

वृषभ : आर्यनच्या घरचे मला PG मध्ये जायला देतील अस मला नाही वाटत..

रोहन : मग तुला जे करायच ते कर.. मला नको विचारुस..

वृषभ : तु भडकतोस काय अस??

रोहन : मग तुला मी दिलेले सजेशन कधी पटतच नाही यार.. आणि मला पण अस वाटत की पिऊ नको.. म्हणजे तु बोलतोस तस तुझं सगळ्यांसोबत रिलेशन जर तुटणार असेल तर तु दुसरी कोणी चांगली मुलगी बघावी.. आणि तुला ती सहज मिळेल रे..

वृषभ : त्यादिवशी तर तु पिऊबद्दल काही तरी वेगळं बोलत होतास आणि आत्ता काही तरी वेगळं बोलतोयस..

रोहन : कारण मला आत्ता अस वाटतय की तु जिच्यावर प्रेम करतोस तिच्यासारखीच सुंदर आणि तुझ्यावर खुप म्हणजे खुप जास्त प्रेम करणारी मुलगी तुला तुझ्या लाईफमध्ये भेटेल.. जी प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी करेल.. तुझ्या शब्दाबाहेर कधीच नसेल ती.. आणि मला असही वाटत कि एका रिलेशनसाठी तुझी खुप सारी नाती तुटणार असतील तर असलं रिलेशनच्या भानगडीत तु पडुच नकोस.. नाही ना पडणार??

वृषभ : मी तस ठरवतो तर आहे बट मी जस ठरवतोय तस मला नाही रे वागायला जमत आहे.. ती समोर दिसली की माझं काय होत हे मला नाही कळत आहे. तिच्याकडे नाही बघायच ठरवतोय बट मी जस ठरवतोय बरोबर त्याच्या ऑपोझिट मी करतोय. मला ती माझ्या लाईफमध्ये हवीय अस वाटतंय आत्ता मला. ती भेटली की मला कोणाचीच कमी नाही जाणवणार अस वाटतंय.. म्हणजे जी नाती तुटतील म्हणुन मी घाबरतोयस त्या सगळ्या नात्यांची उणीव ती एकटी भरून काढेल अस माझं मन मला बोलतय..

रोहन : ए वृषभ असे मोठे मोठे डायलॉग ना फक्त डायलॉग म्हणुनच चांगले वाटतात.. रिलेशनला दोन तीन महिने झाले ना मग जी नाती तिच्यात तु बघायला जाणार होतास ना त्या सगळ्या नात्यांची कमी तुला नक्की जाणवेल. तरी तुझं डोकं जास्त चालतय तर तस कर.. इन्फ्युचर जास्त त्रास झाला मग मला फोन नको करुस कारण माझ्याकडे पण तुला सजेशन देण्यासारख काहीच नसेल..

वृषभ : ए रोहन मी फक्त माझ्या फिलींग तुझ्याशी शेअर करतोय यार.. तस वागलो तर नाही ना अजून.. प्लिज चिडुन नको ना बोलुस.. प्लिज..

रोहन : नाही चिडत बट आत्ताच्या आत्ता तुझ्या डोक्यात येणारे नको ते विचार थांबव.. कळलं??

वृषभ : तुला तेच तर सांगतोयना मी मला नाही जमत आहे तरी तुझं तेच..

रोहन : अस कस नाही जमत आहे तुला?? ती तुझ्या आजु बाजूला नाही अस समजुन रहा ना.. 

वृषभ : रोहन तुला कस सांगु आत्ता मलाच नाही कळत आहे यार..

रोहन : आत्ता अजुन काय सांगायचय?? 

वृषभ : काही नाही.. राहु दे.. मी झोपतो..

रोहन : वृषभ.. पिऊ वाईट आहे अस मी नाही बोलत आहे बट पिऊ नको..   आणि लवकर तिथुन निघायच बघ.. मुंबईत स्वतःच घर घे.. मग तर ते लोक तुला जाऊ देतील ना..

वृषभ : बाय.. गुड नाईट..

रोहन : रागवलायस??

वृषभ : नाही माहिती.. 

रोहन : म्हणजे रागवलायस..

वृषभ शांतच बसुन असतो..

रोहन : वृषभ नको तिच्यात गुंतुस..

वृषभ : तु नाही समजुन घेत आहे रे. नुसतं चिडुन बोलतोयस माझ्याशी.. जर मी शौर्यला हे सगळं सांगु शकत असतोना तर कदाचित त्याने मला काही तरी चांगलं सजेशन नक्की दिलं असत.. बट मी हे सगळं त्याच्याशी नाही बोलु शकत हे माझं बॅड लक.. 

रोहन : अस का बोलतोयस यार.. आणि मी चिडुन बोलत नाही आहे.. मला तु आणि पिऊ एकत्र यावे अस नाही वाटत आहे.. 

वृषभ : तु ना स्थिर नाहीस रोहन.. तु काही दिवसांपूर्वी तर पिऊ माझीच होईल अस बोलत होतास मला.. आज तुला फोन केला तर तु काही तरी वेगळं बोलतोयस.. परत दोन तीन दिवसांनी मी तुला फोन केला तर तु अजुन काही तरी वेगळं बोलशील.. यु नॉ व्हॉट.. मला माझाच राग येतोय यार मी का ह्या मुंबईत आलो.. नसतो आलो तर बरं झालं असत अस वाटतंय.. तु खरच कुणावर मनापासून प्रेम केलं असतना रोहन तर ह्या क्षणाला तुला माझ्या फिलींग कळल्या असत्या.. 

रोहन : मी खर प्रेम करून झालोय हे तुला पण माहितीय..

वृषभ : मग का नाही कळत आहे तुला मला काय बोलायचं ते.. मला तिला हर्ट करायला नाही जमत आहे यार.. माझ्यामुळे ती हर्ट होतेय हे मला नाही आवडत आहे. 

रोहन : तुझ्यामुळे ती हर्ट होतेय म्हणजे?? 

(वृषभ परत शांत बसुन राहतो)

म्हणजे काय वृषभ..??

वृषभ : मला नाही माहीत.. मी ह्या पुढे तुझ्यासोबत ह्या विषयी नाही बोलणार.. तु तुझ्या गार्गी सोबत बोल.. काळजी घे तुझी.. मला आत्ता खरच झोप येतेय.. गुड नाईट बाय..

वृषभ रोहनच काही ऐकुन न घेता सरळ फोन कट करून टाकतो..

रात्रभर तो रोहनच्या बोलण्याचा विचार करत असतो.. मोबाईलमध्ये 6 चा अलार्म वाजतो तस तो त्याच्या मनात चालु असलेल्या विचारांच्या तंद्रीतुन बाहेर येतो.. रात्रभर जाग राहुन त्याच डोकं जड झालेलं पण विराज सुट्टीवर आहे म्हटलं तर त्याच कामावर जान भाग होत.. आर्यनच्या घरचे उठायच्या आतच तो घराबाहेर पडतो.. जवळपास साडे सातच्या सुमारास तो ऑफिसमध्ये जाऊन बसतो.. संपुर्ण ऑफिस खाली असत.. आपण नकळत का होईना पियुषीला दुखवलय ह्याच त्याला खुप वाईट वाटत असत.. ती आत्ता आपल्याबद्दल काय विचार करत असेल हा एक प्रश्न त्याच डोकं खात असतो.. एक खोल श्वास घेत आपलं डोकं अगदी घट्ट धरून तिच्याबद्दल येणारे विचार तो थांबण्याचा प्रयत्न करत असतो बट ते आत्ता काही थांबत नसतात.. प्रेमाच्या पायरीवर तो चढला होता पण त्या पायरीवरून परत उतरायला त्याला जमत नव्हतं.. आपल्या जागेवरून उठत टी मशीनमधुन स्वतःसाठी चहा बनवुन घेत तो पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसतो.. आणि आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करतो.. 

इथे शौर्य सुद्धा गाथाला फोन लावतो..

शौर्य : हॅलो माय स्वीट जान.

गाथा : गुड मॉर्निंग टु माय स्वीट जान.. आज खुप खुश दिसतोयस.. मी पाठवलेलं गिफ्ट मिळालेलं दिसतंय तुला..

शौर्य : तुझं गिफ्ट अजुन तरी नाही मिळालं.. एड्रेस बरोबर लिहिलेलास ना गिफ्ट वर..??

गाथा : हो.. मे बी सेटरडे पर्यंत येईल..

शौर्य : तु आत्ता खरच खुप त्रास देतेस ग मला.. एवढ्या लेट गिफ्ट येणार होत तर तु मला का लवकर सांगितलंस..?? तुला माहितीना मला खुप एकसाईटमेंट लागते अस काही तु माझ्यासाठी केलंस तर. आत्ता इथे रात्रीचा एक वाजलाय तरी मी माझ्या गाथाने माझ्यासाठी काय स्पेसिअल गिफ्ट पाठवलय ह्याचाच विचार करतोय.. म्हणजे हे अस दोन दिवसांपासुन चालु आहे..

गाथा : सॉरी ना जान.. नेक्स्ट टाईम अस नाही करणार.. ज्या दिवशी गिफ्ट येईल त्याच दिवशी सांगेल मी तुला..

शौर्य : ते तर तुला करावाच लागेल. बट तुला आत्ता पण माझ्यासाठी काही तरी करावं लागेल.. करशील??

गाथा : काय??

शौर्य : जे स्पेसिअल गिफ्ट तु माझ्यासाठी पाठवलयस.. ते काय आहे हे तु मला सांगणार आहे.. जर ते जमत नसेल तर मला एटलिस्ट हिंट तरी दे मग माझं मी ग्येस करेल.. प्लिज.. प्लिज.. प्लिज..

गाथ : ओके.. बट मला नाही वाटत तुला ग्येस करायला जमेल. 

शौर्य : तरी पण सांग..

गाथा : टॉटल तीन गिफ्ट आहेत.. बट मी तुला फक्त दोन गिफ्टबद्दल हिंट देईल.. तिसर गिफ्ट मात्र तुझं तुच ऑपन करून बघ.. चालेल??

शौर्य : ओके चालेल.

गाथा : सो पहिलं गिफ्ट म्हणजे तु त्या गिफ्ट सोबत जास्त अटेच आहेस,  ती गोष्ट नेहमी तुझ्यासोबत रहावी अस तुला वाटत आणि अजुन सांगायच झालं तर ते गिफ्ट तुला पाहिजे होत अस तु मला काही दिवस आधी बोलता बोलता सहज बोलून गेलेलास

शौर्य : खरच??

गाथा : हो शौर्य.. तुला नाही आठवत??

शौर्य नकारार्थी मान हलवतो..

गाथा : थोडं विचार करना..

शौर्य : तु एवढं कॉम्प्लिकेटेड करून सांगते मग कस कळणार ग मला..

गाथा : नाही कळत आहे मग राहुच दे.. आणि सेटरडे पर्यंत वाट बघ..

शौर्य : ते तर बघावीच लागेल मला.. बट दुसर वाल गिफ्ट?? त्या गिफ्ट बद्दल तर तु काहीच हिंट नाही दिलीस..

गाथा : दुसर गिफ्ट तर तसच काहीस स्पेसिअल आहे.. म्हणजे त्या गिफ्ट बद्दल मला जास्त एक्सप्लॅन करायला नाही जमत आहेरे.. तु मी सांगितलेल्या पहिल्या गिफ्टचा विचार कर जर ते गिफ्ट तुला कळलं मग तुला मी पाठवलेलं दुसर गिफ्ट सुद्धा कळेल.. 

शौर्य : आजची रात्र माझी विचार करण्यातच जाणार आहे..

गाथा : जर तु आत्ता झोपलास तर मी तुला तु उठल्यावर तिसऱ्या गिफ्टची हिंट देईल..

शौर्य : गाथा तु राहूच दे ग.. सेटरडे पर्यंत मला नीट झोप येईल अस वाटतच नाही..

गाथा : आत्ता तर मी हिंट पण दिली ना तुला.. तु झोपला नाहीस तर मी पण रात्री झोपणार नाही हा.. मला त्रास झालेला चालणार असेल मग नको झोपुस..

शौर्य : झोपतो.. (आपलं तोंड पाडतच तो गाथाला बोलतो).. 

गाथा : नक्की झोपशील ना??

शौर्य : हो ग.. तु कॉलेजमध्ये संभाळुन जा.. गुड नाईट..

नेहमीप्रमाणे एकमेकांना बाय करत शौर्य गाथाचा फोन कट करतो आणि शनिवारचा दिवस कधी उजाडतो ह्याची वाट बघत तो असतो..

शौर्यची एवढ्या दिवसांची प्रतीक्षा संपते आणि फायनली शनिवारचा दिवस उजाडतो.

विराज आणि अनघा एकमेकांचा हात पकडतच शौर्यच्या कॉलेजच्या दिशेने जाऊ लागले.. सोबत श्री आणि प्रीती सुद्धा असतात..

आजु बाजुला हिरवळ अस गार्डन असत.. जवळपास चाळीस एक जण घोळका करून गार्डनमध्ये काही तरी डिस्कस करत उभे असतात... शौर्यही त्या घोळक्यात असतो.. विराज आणि अनघा त्या घोळक्याकडे हलकीच एक नजर फिरवत पुढे येतात.. एवढ्या गर्दीत शौर्य त्यांना काही दिसत नाही..

ते शौर्यच कॉलेज.. विराज लांबुनच श्री आणि प्रितीला शौर्यच कॉलेज दाखवत बोलला..

श्री : छान आहे... बट मला हे कॉलेज कमी आणि कॉर्पोरेट एरिया जास्त वाटत आहे.. म्हणजे आपण ऑफिसमध्ये जातोय अस वाटतंय मला..

अनघा : इथे सगळे कॉलेज अलमोस्ट असेच आहेत.. बट हे कॉलेज न्युयॉर्क मधलं सगळ्यात मोठा कॉलेज आहे... म्हणजे ती एक बिल्डिंग नाही त्याच्या आजु बाजुला खुप साऱ्या बल्डिंगी आहेत.. कॉलेजजवळ गेल्यावर कळेलच तुम्हांला.. 

अनु एक मिनिट.. विराज मध्येच थांबत अनघाला बोलतो..

अनघा : आत्ता काय झालं??

विराज : गाथाला फोन करून विचार की शौर्य कुठेय.. ती त्याला फोन करून विचारेल. मग आपण तिथे जाऊनच त्याला सरप्राईज देऊयात..

अनघा : गुड आयडिया..

अनघा तिघांपासुन थोडं लांब जातच गाथाला फोन लावते..

प्रीती : तिथे बघा काय चाललंय.. बहुतेक डान्स प्रॅक्टिस करतायत.. 

प्रीती मगाशी घोळका करून उभं असलेल्या ग्रुपकडे बोट दाखवतच श्री आणि विराजला बोलते..

शौर्य त्याच्या कॉलेजवळ असलेल्या गार्डनमध्ये डान्स प्रॅक्टिस करतोय अस गाथा मला बोलली.. अनघा विराजजवळ येतच त्याला बोलते....

विराज : तिथेच डान्स प्रॅक्टिस चालु आहे.. शौर्यपण तिथेच असेल.. 

चौघेही त्या गार्डन मॅन गेटजवळ जाऊन एका झाडाच्या आडोश्याला उभं रहातात.. मोठ्या आवाजात हॉलीवुड ची हिपहॉप गाणी वाजत असतात.. सगळेच शौर्य कुठे दिसतोय का ते बघत असतात..

अनघा : एवढ्या गर्दीत शौर्य दिसण म्हणजे कठीण आहे जरा..

विराज : मला पण तेच वाटतंय..

श्री : ए वरकुल मला तो शौर्यच वाटतोय.. तो बघ त्या बाईकवर..

गार्डनमध्ये दोन बाईक समोरा समोर पण एकमेकांपासून खुप लांब अंतरावर उभ्या असतात.. बाईकवर बसलेल्या दोघांनीही डोक्यावर हेल्मेट घातलं असत.. त्यातील एकाच्या मागे शौर्य बसला असतो.. श्री त्याच्याकडे बोट करतच विराजला दाखवतो..

विराज : वाटतो नाही शौर्यच आहे तो..

शौर्य बाईकवर बसुन मोबाईलमध्ये काही तरी करत बसला असतो..

तो चाळीस एक जणांचा घोळका आत्ता आपापल्या पोझिशनमध्ये उभे असतात.. आणि अचानक म्युसिक वाजयची थांबते.. गाईज ऑल ऑफ यु रेडी.. एक जण मोठयाने ओरडतच सगळ्यांना विचारू लागतो..

सगळे येस बोलताच.. शौर्य बाईकच्या मागच्या सिटवर उभं रहात आपला मोबाईल खिश्यात टाकतो.. त्याच्या समोर विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या बाईकवर त्याचाच USA मधील मित्र आर्यन उभा असतो..

आर्यन : SD गाणं चालु होऊन बरोबर 16 व्या बिट्स वर बॅकफ्लिप मार.. तु खुप आधी मारतोस.. (आर्यन मोठ्यानेच ओरडतो)

शौर्य : आत्ता बरोबर मारतो रे..

(विराज : हा बाईकवरून बॅकफ्लिप मारणार??

अनघा : मी पण तेच ऐकलं..

विराज : मी बोललो होतो ना ह्याला सरप्राईज द्यायच सोडून आपल्यालाच ह्याच्याकडुन सरप्राईज मिळेल.. तूच बघ

अनघा : हम्मम्म

अनघा आणि विराज एकमेकांचे हात अगदी घट्ट पकडत शौर्य पुढे काय करतोय ते बघतात)

hey SD and R both of you ready? एक जण मोठ्या आवाजात शौर्य आणि आर्यनला विचारतो..

शौर्य आणि आर्यन दोघेही आपला अंगठा दाखवतच रेडी म्हणुन बोलतात.. मोठ्या आवाजात काही बिट्स वाजु लागतात.. दोन्ही बाईक स्पीडनेच एकमेकांसमोर येत असतात.. एका बाईकवर आर्यन आणि एका बाईकवर शौर्य उभा असतो.. जस बाईक एकमेकांच्या बाजुने जाऊ लागल्या तस शौर्य आणि आर्यन चालत्या बाईकवरून एक उंच अशी डबल बॅकफ्लिप मारतात.. स्वतःच्या शरीराचा बेलेन्स करत एकमेकांच्या समोर उभ रहात रागातच एकमेकांकडे बघत असतात.. कारण डान्सचा थीम त्या लोकांनी बेटल हिप हॉप असा काहीसा ठेवला असतो. दोन ग्रुपमध्ये एकप्रकारे बेटल हिप-हॉप चालु असते.. ग्रुप मधली अर्धी मंडळी शौर्यच्या बाजुने असतात तर अर्धी मंडळी आर्यनच्या मागे असतात.. बाईकवर असणारे दोघे एक व्हीली स्टंट करत एक गोल असा राऊंड संपुर्ण गार्डनभोवती मारत बाजूला होतात.. ती लोक जाताच पुढील गाणं वाजत.. शौर्यसोबत इतर मंडळी हिपहॉप वर बिट्स पकडुन डान्स करत असतात..

शौर्यचा असा भयानक स्टंट बघुन विराज आणि अनघा दोघेही घाबरून गेले असतात.. बट समोर दिसणाऱ्या डान्सवरून त्यांची नजर काही हटत नव्हती..

(श्री : वरकुल तुझा भाऊ खरच खुप डेंजर आहे यार..

विराज : आय नॉ.. )

डान्स चालु असताना शौर्यसोबतच बाकीच्या मंडळींचे चालु असलेले नवनवीन स्टंट चौघेही बघतच रहातात.. आणि फायनली तीन थरांचा पिरॅमिड रचलेला असतो.. शौर्य त्या पिरॅमिडच्या मागे असलेल्या मंडळींचा आधार घेत एकदम वरच्या थरावर चढतो.. त्याच्या बाजुलाच अजुन एक दोन थरांचा पिरॅमिड असतो.. आर्यन नकली गन हातात घेत त्या पिरॅमिडवर उभं रहात शौर्यवर धरतो.. म्युझिक सिस्टीम मधुन मोठ्याने गोळी मारल्याचा आवाज येतो आणि शौर्य स्वतःला गोळी लागल्याची एकटिंग करत हाताची घडी घालतच त्या तीन थरांच्या पिरॅमिड वरून उजव्या बाजुने खाली पडतो.. म्युसिक सिस्टीममध्ये फक्त हार्ट बिट्स वाजत असतात.. त्याला अस उंचावरून पडताना बघुन विराज अनघाचे हार्ट बिट्स सुद्धा एकदम जोराने धकधक करत असतात.. बट खाली असलेले शौर्यची मंडळी शौर्यला पकडतात.. आणि जवळपास वीस मिनिटांपासून चाललेला तो डान्स फायनली संपतो.. सगळेच कँटीन्युअसली डान्स करून दमले असतात..  तसेच सगळे खाली बसुन एकमेकांना पाण्याच्या बॉटल पास करत पाणी वैगेरे पित असतात.

इथे विराज सुद्धा सुटकेचा श्वास सोडतो..

श्री : डान्स भारीच करतो शौर्य.. बट चालत्या बाईकवरून बॅकफ्लिप मारण आणि एवढ्या उंचावरून अस खाली पडण हे थोडं रिस्की ना वाटत का..??

प्रीती : मला तर रिस्की वाटतंय..

अनघा : ह्याचा हा डान्स बघुन माझे तर हार्ट बिट्स अचानक वाढायला लागले..

विराज : मला तर हार्ट एटेक येता येता राहिलाय अस बोललीस तरी चालेल.

अनघा : विराज काहीही का बोलतोयस तु.. 

विराज : काहीही नाही खर तेच बोलतोय मी.. अजुन धडधड होतेय इथे.. (आपल्या ह्रदयाजवळ हात नेतच तो अनघाला बोलतो) जरा बेलेन्स इकडचा तिकडे झाला मग काय झालं असत?? 

अनघा : राग अजिबात नको हा विराज.. आणि तु आत्ता अस आमच्या सोबत बोलत बसणार की त्याला फोन करून सांगणार आहेस की आपण इथे आलोय.. एक वाजत आलाय.. लंच एकत्रच करूयात ना आपण??

हम्मम..  अस बोलत विराज खिश्यातुन फोन काढतच शौर्यला फोन लावतो.. 

(विराज स्पिकरवर ठेव ना.. अनघा विराजला रिक्वेस्ट करतच बोलते.. विराज लगेच आपला फोन स्पिकरवर ठेवतो.. )

शौर्य खाली बसुनच खिश्यातुन आपला फोन काढतो.. विरच नाव मोबाईल स्क्रिनवर दिसताच त्याला खुप आनंद होतो.. एक वेगळंच हसु त्याच्या ओठांवर येत बट थोड्या वेळात लगेच राग सुद्धा येतो.. तो रागातच मित्रमंडळींमधला उठुन थोडं त्यांच्यापासून लांब जातच विराजचा फोन उचलतो..

शौर्य : तुला आज टाईम भेटला तर मला फोन करायला??

विराज : हा तस समजु शकतो तु..

शौर्य : ए विर उगाच मला अजुन राग नको हा देऊस.. तुझ्याशी ना कधीच बोलायच नाही असच ठरवलंय मी.. 

विराज : ओके मग नको बोलुस.. ठेवतो मी फोन.. बाय..

शौर्य : बाय काय बाय..?? तुला झालं काय आहे विर?? 

विराज : मला कुठे काय झालंय शौर्य?? तुला बोललो ना मी बिझी होतो.. तु थोडं समजुन घ्यायला हवं मला आत्ता लहान नाहीस..

शौर्य : तुला समजुन घेतलं असत मी. बट तु जर मम्माला पण फोन केला नसतास तर.. मम्माला तर रोज न चुकता कॉल करत होतास.. बेंगलोर पोहचलो म्हणुन तिला स्वतः फोन करून कळवलस.. मला तर तु मी बंगलोरला जातोय हे साधं सांगितलंस पण नाहीस.. सगळ्या गोष्टी तिच्यासोबत बोलायला तुला बरा टाईम भेटत होता.. फक्त मी केलेला फोन ऊचलाय तुला टाईम नव्हता.. जरा कुठे कॉल केला की कॉल कट करून.. I am busy म्हणुन तुझा मॅसेज.. तो मॅसेज टाईप करायला बरोबर टाईम होता तुझ्याकडे.. फक्त तुलाच नाही तर वहिनीला पण.. ती पण फोन उचलत नव्हती.. तिला पण सांग मी तिच्यावर पण खुप म्हणजे खुप नाराज आहे..

विराज : किती बोलतोयस यार.. बस कर.. आधीच स्टंट गिरी करून दमला असशील तु.. माझ्याशी अस भांडुण अजुन दमशील..

शौर्य आत्ता शांत बसुन असतो..

विराज : काय झालं?? अस शांत का बसलास?? स्टंटगिरीच करत होतास ना.. चालत्या बाईकवरून बॅक फ्लिप मारायला कधी शिकलास तु??

शौर्य : तुला कस कळलं??

विराज : भाऊ आहे यार मी तुझा.. तु तिथे काय करतोस हे इथे राहुन मला सगळं कळत रे.. आत्ता ह्या टाईमला तु काय करतोयस हे सुद्धा मी तुला सांगेल.. 

शौर्य :  काय करतोय मी??

विराज : आत्ता तस काही खास नाही करत आहेस.. माझ्याशी फोनवर बोलतोयस.. बट काहीही बोल हा शौर्य गाथाची चॉईज छान आहे.. तिने दिलेलं जॅकेट तुझ्यावर छानच दिसतंय..

(अस बोलत विराज सगळ्यांना सोबत परत झाडाच्या मागे लपतो)

शौर्य : तुला कस कळलं मी गाथाने दिलेलं जॅकेट घातलय ते???

(शौर्य सगळीकडे आपली नजर फिरवतच त्याला विचारतो..)

विराज : तुला बोललो ना मी.. भाऊ आहे यार मी तुझा.. सगळं कळत मला शौर्य.. आत्ता इथे तिथे कुणाला शोधतोयस तु??

(शौर्य खुप वेळ शांतच बसुन रहातो.. हृदय अगदी जोरजोरात धडधड करत असत त्याच.. )

शौर्य : विर.. तु कुठे आहेस??

विराज : तुझ्या एक दम जवळच.. इथे मागे बघ..

शौर्य मागे वळुन बघतो तर लांब एका झाडाजवळ त्याला विराज दिसतो.. विराजला बघुन ओठांवर एक वेगळंच हसु येत.. फोन तसाच हातात पकडत वाऱ्याच्या वेगाने पळतच आपल्या भावाजवळ जाऊ लागतो.. त्याला अस कुठे तरी पळत जाताना बघुन त्याचे सगळे मित्र मंडळी उठुन उभं रहातात आणि तो असा कुठे पळत जातोय ते बघतात. इथे विराज हसतच आपले दोन्ही हात लांब करत त्याला आपल्या मिठीत घेण्यासाठी सज्ज असतो.. शौर्य पळतच त्याच्याजवळ जात त्याच्या अंगावर उडी मारतच त्याला मिठी मारतो.. विराज त्याला लहान मुलासारखं उचलुन घेतच त्याने मारलेली मिठी अजुन घट्ट करतो.. आपल्या भावाला खुप दिवसांनी बघुन शौर्यच्या डोळ्यांतुन पाणी येत असत.. तो त्याला मिठी मारून रडु लागतो.. जवळपास पाच दहा मिनिटं तरी दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारून तसेच उभे असतात..

इतर सगळेच दोन भावांच प्रेम बघत असतात..

विराज : आत्ता कळलं का फोन उचलत नव्हतो ते..

(विराज शौर्यला आपल्या मिठीतुन सोडवत त्याचे डोळे पुसतच बोलतो..)

शौर्य : फोन उचलुन बोलायला काय प्रॉब्लेम होता तुला..?? 

विराज : मग अस मिठी मारून कस भेटला असतास.

शौर्य : ए विर कमॉन.. तुला मी असच भेटतो यार. चार दिवस तुझ्याशी न बोलता कसा राहिलोय हे तुला नाही कळणार.. नको तिथे खुप डोकं लावत असतोस तु.. म्हणुन मला तुझा राग येतो..

विराज : तुझा कॉल उचलल्यावर तुला कळलं नसत का मी इथे USA मध्ये आहे ते??

शौर्य : ऑडिओ कॉलवरून कस कळलं असत विर..

विराज : शौर्य जर तु ऑडिओ कॉल मला केला असता तर मी नक्की उचलला असता.. तुझे व्हीडिओ कॉल होते म्हणुन मी उचलत नव्हतो. जर मी स्वतःहुन तुला ऑडिओ कॉल केला असता तर तुला माझ्यावर डाऊट आला असता.. मग मला अस सरप्राईज द्यायला तुला भेटलं नसत..

अनघा : एक मिनिट.. (शौर्य पूढे काही बोलणार तोच अनघा बोलते..) तुम्ही दोघ आत्ता भांडु नका बघु.. शौर्य कस वाटलं आम्ही दिलेलं सरप्राईज??

शौर्य : आत्ता पर्यंतच विरकडुन मिळालेलं सगळ्यात बेस्ट सरप्राईज.. तु कशी आहेस??

अनघा : मी मस्त.. बट अजुन नाराज आहेस माझ्यावर..

शौर्य : नाही ग.. ते मी थोडं रागात बोलत असतो..

विराज : आणि माझ्यावर??

तुला माहिती ना विर.. तु तर माझी जान आहे ब्रो.. तुझ्यावर जास्त नाराज मी राहू शकतो काय.. आय लव्ह यु सो मच.. विराजच्या गालावर ओठ टेकवतच परत एक घट्ट मिठी विराजला मारतच शौर्य त्याला बोलतो..

श्री आणि प्रिती शौर्य आणि विराजच एकमेकांवरच प्रेम बघतच रहातात.. विराजसोबत बोलता बोलता शौर्यच लक्ष श्री आणि प्रीतीकडे जात..

शौर्य : अरे दादा तु पण आलायस?? कसे आहात तुम्ही दोघ..?

श्री : एकदम मस्त.. 

शौर्य : बट तुम्ही सगळे अचानक इथे काय करतायत??

विराज : तुला बोललो ना मी हा श्री बीट हरला.. मग तोच आम्हाला USA फिरवणार आहे.. काल पर्यंत आम्ही Philadelphia फिरलो.. आत्ता दोन दिवस तु आम्हांला न्युयॉर्क फिरव. आपल्या भावासाठी आहे ना वेळ तुझ्याकडे..

शौर्य : तुझ्यासाठी आणि माझ्या स्वीट स्वीट वहिनीसाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे रे ब्रो.. बट आधी माझ्या फ्रेंड्स लोकांना तरी भेट..(विराजचा हात पकडतच शौर्य त्याला जबरदस्ती ओढतच आपल्या मित्र मंडळींसोबत ओळख करून द्यायला घेऊन जात असतो.) वहिनी तु पण ये.. आणि दादा तु पण ये ना वहिनीला घेऊन.. (मागे वळुन अनघा, श्री आणि प्रितीला तो बोलतो)

आर्यन : If I am not wrong.. he is your Vir..

शौर्य : correct.. 

विराज : हा कसा ओळखतो मला?? मी तर ह्याला पहिल्यांदाच बघतोय..

आर्यन : ते ह्याच्या रूममध्ये तुमचा आणि ह्याचा फोटॉ आहे ना म्हणुन ओळखलं.. आणि तस पण SD च्या तोंडुन तुमच नाव अधुन मधुन मी ऐकतच असतो..

विराज : तु मराठी पण शिकवलस ह्याला??

शौर्य : ए विर तु खरच नको तिथे डोकं लावतोयस.. तो महाराष्ट्रीयनच आहे. दिल्लीचा आहे तो..

आर्यन : हाय आय एम आर्यन..

विराज : हॅलो..

विराज आर्यनला हात मिळवतच बोलतो.. शौर्य विर सोबतच अनघा, श्री आणि प्रीतीची पण सगळ्यांसोबत ओळख करून देतो.. शौर्यचे सगळे मित्र मंडळी एक एक करून आपलं नाव सांगत चौघांना हाय हॅलो करत असतात.. सगळ्यांसोबत ओळख होताच शौर्य आपल्या मित्रमंडळींना बाय करतच गार्डन बाहेर पडतो..

श्री : भरपूर मित्र मंडळी झालीत शौर्य तुझी..

शौर्य : ही तुला भरपुर वाटतायत??

विराज : अजुन पण आहेत का??

शौर्य : ऑफ कोर्स ब्रो. तुम्ही लोक मंडेला आले असते ना मग तुमचा अर्धा एक तास तरी माझ्या फ्रेंड्स लोकांना भेटण्यात गेला असता.. 

विराज : बरच झालं मग आम्ही आजच आलो ते..

शौर्य : ज्वेलेसी..

विराज : काय बोललास??

शौर्य : तुला मी कधी काही बोलतो का विर?? बर तुम्ही लोक इथेच थांबा मी रूमवर जाऊन माझे हे वाले कपडे चँज करून येतो.. (शौर्य पळतच तिथुन जात बोलतो)

चौघेही तिथेच उभं रहात शौर्यच्या मित्र मंडळींची बाईकसोबत चाललेली मस्ती बघत असतात.. जवळपास 15 मिनिटांनी शौर्य आपले कपडे वैगेरे चँज करून येतो..

शौर्य : निघुयात..?

विराज : शौर्य बाईकसोबत स्टंट करायचे नाही अस सांगुन पाठवलेलं ना मी तुला??

शौर्य : ए विर मी स्टंट वैगेरे नाही रे करत..

विराज : चालत्या बाईकवरून बॅक फ्लिप मारतोस ह्याला स्टंट नाही बोलत??

शौर्य : अरे वाहह.. प्रश्न पण तुच विचारतोयस आणि उत्तर पण तुच देतोयस.. नाही बोलत.

विराज : शौर्य मी नीट बोलतोय ना मग नीट उत्तर दे..

शौर्य : विर नको ना रागवूस.. खुप दिवस आधी प्रॅक्टिस करून मग ते सगळं केलंय रे.. प्रॅक्टिस टाईमला सेफ्टीची आम्ही काळजी घेतो..

विराज : असे स्टंट वाले डान्स नाही केलेस तर नाही चालणार का तुला??

शौर्य : विर आज तु लावलस काय आहे?? हा प्रश्न पण तुच विचारला आणि ह्याच उत्तर पण तुच देतोयस.. नाही चालणार मला..

शौर्य अस बोलताच सगळे विराजकडे बघत हसु लागतात..

शौर्य तु थांबच खुपच जॉक्स सुचतायय ना आज तुला?? अस बोलत विराज शौर्यचा हात पकडणार तोच शौर्य त्याला मागे ढकलत अनघाच्या खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवत तिला विराज समोर धरत तिच्या मागे लपतो.. विराज त्याला पकडायला बघत असतो बट शौर्य अनघाला पुढे करतच स्वतःला त्याच्यापासुन वाचवत असतो..

विर मस्ती करतोय यार.. लगेच काय भडकतोयस.. वहिनी ह्याला सांगना ग हा परत इथे सुरू व्हायचा.. अनघाच्या मागे स्वतःला लपवतच शौर्य विराजला बोलतो

अनघा : विराज नको ना रागवूस त्याच्यावर..(अनघा विराजला एक डोळा मारतच बोलते आणि काही तरी इशारा करते)  आपण मग शांतपणे बोलुयात त्याच्याशी.. आत्ता सगळे लंच करूयात.. प्लिज..

विराज : ओके..

श्री : अरे वाह अनघा.. विराजला तु आपल्या मुठीत ठेवलयस अस बोलायला काही हरकत नाही..

श्री अस बोलताच सगळे विराजला हसु लागतात..

शौर्य श्री आणि प्रीतीसोबत बोलतच पुढे जात असतो..

इथे विराज आणि अनघाच मात्र एकमेकांसोबत शौर्यला घेऊन डिस्कशन चालु असत..

काय चालु आहे तुमचं?? शौर्य मागे वळुन बघत विराज आणि अनघाला विचारतो..

विराज : कळेलच तुला..

(विराज गोड अशी स्माईल शौर्यला देतच बोलतो)

शौर्य : एवढं गोड हसतोयस म्हणजे नक्कीच काही तरी प्लॅन आहे तुझा..

विराज : कळेलच तुला..

शौर्य आत्ता संशयी नजरेने विराजकडे बघु लागतो..

अनघा : रेस्टोरेन्ट लांब आहे का शौर्य??

शौर्य : ते बघ समोरच आहे..

शौर्य सगळ्यांना घेऊन एका रेस्टोरेन्टमध्ये येतो.. 

शौर्य : आजची लंच ट्रीट माझ्याकडुन.. 

प्रीती : शौर्य जास्तच खुश दिसतोय आज.. 

शौर्य : ते तर मी नेहमीच असतो ग.. तुम्ही सगळे लंच ऑर्डर करा.

चौघेही मेनु कार्डमध्ये बघत एकमेकांसोबत डिस्कस करत लंच ऑर्डर करतात..

विराज आणि अनघाच मात्र काही तरी वेगळंच डिस्कशन चालू असत..

शौर्य : तुम्हा लोकांना भुक नाही का लागलीय? लंच ऑर्डर करायचं सोडुन काय चालु आहे तुम्हां दोघांच??

विराज : कळेलच तुला..

शौर्य एका संशयी नजरेने विराज आणि अनघाकडे बघतच राहतो..

(काय कळेल शौर्यला?? काय प्लॅन असेल विराज आणि अनघाचा?? पाहुया पुढील भागात आणि हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा..)

क्रमश :

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all