अतरंगीरे एक प्रेमकथा ११७

In marathi

पियुशीचा फोन कट करतच वृषभ विराजकडे बघतो.

विराज : सगळं ठिक आहे ना??

वृषभ : आर्यन..

विराज : काय झालं त्याला??

वृषभ : वाशी हाय वे वर एक्सिडेंट झालय त्याच.. तिकडच्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये त्याला एडमीट केलय.. मला जावं लागेल.. आर्यनचे पप्पा नाहीतना घरी..

विराज : अस कस झालं एक्सिडेंट..??

वृषभ : मला नाही माहिती काही म्हणजे पिऊ खुप रडतेय म्हणुन मी तिला नाही काही विचारलं.. तिथे गेल्यावर कळेलचना.. मी जाऊ का?? प्लिज.. 

विराज : जाऊ म्हणुन काय विचारतोस.?? निघ लवकर.. आणि खाली गाडी आहे माझी ती घेऊन जा सोबत.. म्हणजे ड्रायव्हर असेल तुझ्या सोबत..

वृषभ : नाही नको मी करतो मॅनेज.

विराज : वाशी कुठेय माहिती का तुला??

वृषभ : कुठेय??

विराज : म्हणुन बोलतोय गाडी घेऊन जा.. आणि हे माझं क्रेडिट कार्ड ठेव.. पिन मी तुला व्हाट्सएप करतो. गरज लागेल..

वृषभ : पैसे आहेत माझ्याकडे..

विराज : वृषभ अचानक पैस्यांची गरज लागेल. त्याचे पप्पा इथे असते तर मी नसत दिलं.. तु प्रत्येक गोष्टीत आर्ग्युमेंट नको करूस.. मी अनघाला बोलवतो इथे आणि थोड्या वेळाने येतो तिथे.

वृषभ : नाही नको.. मी करतो मॅनेज.. रॉबिन वैगेरे पण असतील तिथे.. नैतिककडे गेलेलेना सगळे. जास्तच गरज असेल तर मी तुला करतो ना कॉल.. आत्ता तु प्लिज ह्या गोष्टीवरून आर्ग्युमेंट नको ना करुस.. तुझ इथे रहाणं पण इंपोर्टन्ट आहे.. आणि कामाची काळजी नको करुस.. मी ते पण करतो..

विराज : काम नाही केलंस तरी चालेल मी करेल मॅनेज.. तु निघ लवकर.. आणि तिथे गेल्या गेल्या आधी मला फोन कर तिथुन.. गाडी गेटजवळ असेल मी ड्रायव्हरला सांगतो तुला सोडायला..

वृषभ : बर.

वृषभ पळतच विराजच्या केबिनमधुन बाहेर पडतो.. 

विराजने सांगितल्या प्रमाणे गाडी गेटजवळ उभी असते.. वृषभ गाडीत जाऊन बसतो आणि  रॉबिनला फोन लावतो..

रॉबिन : ए वृषभ यार मी तुला फोन लावणारच होतो.. आपल्या आर्यन आणि प्रतीकच एक्सिडेंट झालय.. 

वृषभ : आर्यनच तर कळलं बट प्रतीकच पण??

रॉबिन : हो प्रतीकच पण..

वृषभ : कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत दोघ..??

रॉबिन : वाशीला XXX हॉस्पिटल.. 

वृषभ : मी येतो तिथे.. बट एक्सिडेंट झालं कस??

रॉबिन : आर्यनला मी काल सकाळी निघतानाच बोललो होतो बाईक नको घेऊस.. पाऊस आहे ना बाहेर पण आर्यन आहे तो माझं कसलं ऐकतोय.. वर माझ्या कार सोबत दोघे रेसिंग लावत होते.. दोघे ऐकतच नव्हते कोणाचे.. प्रतीक बाईक चालवत होता.. बाईक स्लिप झाली.. त्यात बाईकचा स्पीड खुप होता.. प्रतीकने स्वतःला बऱ्यापैकी सावरलं आणि मॅन म्हणजे हेल्मेट घातल्यामुळे त्याच्या हाताला लागलंय.. आर्यनच्या मात्र जबरदस्त लागलंय.. 

वृषभ : घाबरण्यासारखं नाही ना..

रॉबिन : प्रतीक ओके आहे म्हणजे हाताला फ्लेक्चर आहे.. त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय.. आर्यन अजुन तरी झोपुन आहे..

वृषभ : एक्सिडेंट झालं कधी..??

रॉबिन : माझ्या घड्याळात तरी साडे पाच वाजले असतील तेव्हा..

वृषभ : आणि तु मला आत्ता फोन करणार होतंस?

रॉबिन : ए वृषभ आम्ही त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये कस आणलं हे आमचं आम्हाला माहितीय यार.. हा फॉर्म भरा तो फॉर्म भरा. त्यात पोलिस आलेले.. त्यांची बाईक तिथुन आणा.. खुप काम होती रे.. दोघांच्या घरी पण आम्ही तासा भरपुर्वी कळवलं.. अश्या वेळेला समजुन घ्यायच सोडुन माझी गर्लफ्रेंड असल्यासारख माझ्यावर रागवतोयस कसल??

वृषभ : सॉरी... बट मी निघालोय ऑफिसमधुन.. तस खरच नाही ना घाबरण्यासारखं??

रॉबिन : मी डॉक्टर असतो तर तुझ्या ह्या प्रश्नाच उत्तर तुला नक्की दिलं असत रे..

वृषभ : ए रॉबिन वेळ काय आहे यार आणि तु नको तिथे जॉक काय करतोयस??

रॉबिन : माझ्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द हा जॉक नसतो रे मित्रा.. तु सिरीयस मॉडवर ये.. मग तुला माझ्या बोलण्यातला सिरियसनेस पणा कळेल.. ए वृषभ आंटी आणि पिऊ आलेत इथे.. मी ठेवतो फोन...

अस बोलत रॉबिन फोन ठेवुन देतो..

जवळपास एक तासाने वृषभ हॉस्पिटलमध्ये पोहचतो.. रॉबिनला फोन करतच तो आर्यनला ज्या रूममध्ये ठेवल असत त्या रूममध्ये जातो..

आर्यन लहानमुलासारखं रडत असतो..

वृषभ : ए आर्यन रडतोस का?? काय होतंय?.

रॉबिन : पाय खुप दुखतोय त्याचा खुप.. इंजेक्शन दिलंय त्याला बर वाटेल.

पिऊ आपल्या भावाचे डोळे पुसत त्याच्या बाजुलाच बसुन असते...

पिऊ सोबत सगळेच त्याला धीर देत असतात..

नर्स : पेशंट जवळची गर्दी कमी करा बघु.. दोन जणांपेक्षा जास्त कुणालाही पेशंट सोबत थांबता येणार नाही. पेशंटला भेटण्याची वेळ 5 ते 8 ही आहे.. त्या वेळेतच तुम्ही येऊ शकता.. नर्स रुममध्ये येतच सगळ्यांना ओरडते.. 

रॉबिन : असा का टाईम ठेवलाय??

नर्स : ते तुम्ही डॉक्टरांना जाऊन विचारा.

रॉबिन : ते तर विचारावंच लागेल.. सकाळ सकाळी 5 वाजता कोण कस  येणार ह्याला भेटायला.. काहीही असत यार ह्या डॉक्टरांच.

नर्स : मी संध्याकाळचे 5 ते 8 बोलली..

रॉबिन : ओहहह.. मला वाटलं सकाळचे..  बोलताना माणसाने निट आणि पुर्ण वाक्यात बोललं की असले गैरसमज होत नाहीत.. प्लिज नेक्स्ट टाईम थोडं..

ए रॉबिन गप्प ना. (नैतिक मध्येच रॉबिनला थांबवत बोलतो..) 

नर्स : पेशंटच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवलय.. आणि तुम्ही (रॉबिनकडे थोडं रागात बघतच नर्स बोलते) संध्याकाळी भेटायला येऊ शकता.. इकडची गर्दी कमी करा पेशंटला त्रास होतोय..

रॉबिन : मी पण तेच बोलत होतो.. गाईज गर्दी कमी करा.. पेशंट सोबत इकडच्या नर्सला पण त्रास होतोय.. दिसत नाही का तुम्हांला.. चला बघु बाहेर..

(नर्स आत्ता रागातच रॉबिनकडे बघु लागते..)

वृषभ : काकु मी डॉक्टरांना भेटुन येतो तुम्ही आणि पिऊ इथे बसा.. 

रॉबिन : सगळ्यानी चला बघु बाहेर.. 

नैतिक : रॉबिन तु आधी चल..

नैतिक रॉबिनचा हात पकडतच त्याला बाहेर घेऊन येतो.

ज्योसलीन : रॉब प्लिज किप क्वाईट मॅन.

नैतिक : कुठे काय बोलायचं कळतच नाही यार ह्याला.. तुला शांत नाही का बसता येत..

रॉबिन : मी काय केलंय यार.. (रॉबिन एकदम भोळा चेहरा करत नैतिककडे बघतच बोलतो)

नैतिक : ए रॉबिन तु असा भोळा चेहरा करून बघु नको हा माझ्याकडे.. मी खरच मारेल तुला.. 

महेश : कसलाच सिरीयसनेस पणा नाही ह्याला.

रॉबिन : थेंक्स यार....

वृषभ : प्रतीक कुठेय?? (विषय अजुन वाढु नये म्हणुन वृषभ बोलतो)

नैतिक : जनरल वॉर्ड मध्ये.. 

वृषभ : आर्यनला का इथे ठेवलय..??

रॉबिन : ते आत्ता डॉक्टरांसोबत बोलल्यावरच कळेलना मित्रा.

नैतिक आणि वृषभ दोघे मिळुन डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातात..

जवळपास अर्ध्या तासाने दोघेही डॉक्टरांच्या केबिनमधुन बाहेर येतात..

तोच वृषभला विराजचा फोन येतो त्याला.. 

विराज : पोहचलास तु हॉस्पिटलमध्ये??

वृषभ : विर ते डाव्या आर्यनच्या पायाच हाड पुर्ण ब्रेक झालंय रे.. फ्लेक्चरने ते परत बसणार ही नाही अस डॉक्टरांच म्हणणं आहे.. ओपेरेशन करायचं बोलतायत ते.. म्हणजे ओपेरेशन करून रॉड बसवाव लागेल..

विराज : एक्सिडेंट झालं कस??

(वृषभ विराजला काय घडलं ते सांगु लागतो..)

विराज : शौर्यची सगळी मित्र मंडळी शौर्य सारखीच आहेत.. आत्ता किती महागात पडलं हे सगळ.. बट बाकी काही घाबरण्यासारखं नाही ना??

वृषभ : घाबरण्यासारखं तर काहीच नाही बट त्याला त्रास खुप होतोय.. 

विराज : आत्ता एवढा पराक्रम केला म्हटलं तर सहन तर करावच लागेल ना.. 

वृषभ : हम्मम..

विराज : मी येतो त्याला भेटायला..

वृषभ : 5 ते 8 ह्या वेळेतच यावं लागेल..

विराज : ओके मी लवकर निघतो ऑफिसमधुन..

वृषभ : हम्मम.. मी ठेवतो...

वृषभ आर्यनच्या आईसोबत बोलुन कॅश काउंटरवर जाऊन पैसे आणि फॉर्म भरतो.. आर्यनसोबत त्याची आई आणि पिऊ बसुन असतात..

अश्यातच संध्याकाळ होते.. 

आर्यनचे मित्र मंडळी पण त्याला भेटायला येतात.. विराज, अनघा आणि गाथा सुद्धा आर्यनला भेटायला येते..

आर्यन लहान मुलासारखंच रडत असतो..

गाथा : पेन रिलीफ इंजेक्शन वैगेरे नाही का दिले ह्याला?

पिऊ : तुम्ही लोक येण्याआधीच नर्स देऊन गेलीय.. 

रॉबिन : ऑपरेशन करावं लागेल बोललेत डॉक्टर.

गाथा : फेम्युर फ्रॅक्चर असेल म्हणुन डॉक्टर बोलले असतील.. बट आर्यन डोन्ट वरी.. थोडे दिवस त्रास होईल मग नॉर्मल होईल सगळं.. थोडं सहन कराव लागेल तुला.

रॉबिन : तेच मी आर्यनला सांगत होतो.. बट खुप नाजुक आहे ग हा.. सहन करतच नाही.. कितीही समजवल तरी अस लहान मुलांसारखं रडतच रहाणार.. हो ना आर्यन?? 

आर्यन : तुझ दुखत असत मग कळलं असत तुला..

रॉबिन : राहू दे रे.. आत्ता तुला दुखतंय ना मग तुझं तुच सहन कर आणि माझं बोलशील तर मी असे बाईकसोबत स्टंट वैगेरे करतच नाही बसत रे..

आर्यन : ए रॉबिन.. स्टंट करत होतो का मी?? उगाच माझ्या मम्मीच्या पुढ्यात काहीही काय बोलतोस..

(आर्यन थोडं भडकतच रॉबिनला बोलतो)

रॉबिन : ओहहह सॉरी.. रेसिंग लावत होतास.. मुसळधार पाऊस आणि त्यात बाईक रेसिंग.. ह्याला स्टंटगिरी नाही बोलत का?? मला नव्हतंरे माहित.. रिअली सॉरी.. 

अनघा : आर्यन का अस वागता तुम्ही लोक?? आत्ता लहान नाही ना तु.. तुला अस बघुन तुझ्या आईला बघ किती त्रास होतोय ते..

आर्यनची आई : कॉलेजमध्ये जाताना बस ने वैगेरे जायला नको ना म्हणुन बाईक घेऊन दिली ह्याला.. आत्ता ही मुलं बाहेर अस काही करत असतील हे कोण बघायला आहे.. 

नैतिक : रॉबिन तु का शांत नाही बसत यार.. ह्या वेळेला हे सगळं बोलायची गरज आहे का तुला??

रॉबिन : सॉरी ना यार.. अस काही बोलण्यासाठी मुहूर्त वैगेरे बघावा लागतो हे मला माहित असत तर नसतो बोललो..

नैतिक : तु मला बाहेर भेटच मुहूर्त मिच काढतो तुझा..

ज्योसलीन : बाहेर का भेटणार तु त्याला.. काही चुकीच नाही बोलत आहे तो. आंटी तुमच्या आर्यनला ना ह्यापुढे अजिबात बाईक देऊ नका... रॉबिन बोलतो तस बाईक सोबत स्टंट चालु असतात ह्याचे.. कॉलेजमध्ये तेच करतो हा..  मग व्हिडीओ बनवुन फेसबुक वर अपलोड करायचे.. दोनदा तीनदा आम्ही समजवलय ह्याला पण अजीबात ऐकत नाही.. आज पण दोघ ऐकत नव्हते.. आम्ही पहाटे नैतिकच्या घरातुन निघालो म्हणुन रस्त्यावर गाड्यांची गर्दी नव्हती.. नाही तर खुप काही घडलं असत.. आणि नशीब फक्त पायावर निभावलय म्हणुन बर. 

नैतिक : हो ना.

रॉबिन : हो ना काय हो ना?? तु पण काही कमी नाहीस. तुझं पण हेच असत.. आणि तो एक हिरॉ USA ला गेलाय तो.. ह्यांच प्रोफेशन मला सर्कस दिसतय..

विराज : रॉबिन आत्ता माझ्या भावाने हे सगळं बंद केलय..

रॉबिन : ए विर जॉक छान होता यार.. बट राहू दे.. 

विराज : काय राहू दे.. तो नाही अस काही करत..

रॉबिन : तुझ्या मनातली अंधश्रद्धा रे विर बाकी काही नाही..

(विराज अनघाकडे बघतो.. अनघा त्याला इशाऱ्यानेच शांत बसायला बोलते..)

नैतिक : रॉबिन तु सगळ्यांच्या घरी अस कम्प्लेन्ट करायचं ठरवलंयस का?? माझ्या घरी झालं, त्या प्रतीकच्या वडिलांकडे त्याची कम्प्लेन्ट करून झालं, आर्यनच्याही झालं आणि आत्ता शौर्यच्या घरी..

रॉबिन : परत हे अस नको ते बघायला नको म्हणुन करतोय. कम्प्लेन्ट नाही मित्र प्रेम बोलु शकतोस तु... तुला ह्या गोष्टीचा सिरीयसनेस पणा नाही कळणार रे कारण एक्सिडेंट होताना मी माझ्या डोळ्याने बघितलंय.. 

विराज : तुम्हा लोकांना बाईकसोबत स्टंट गिरी करून काय भेटत हेच कळत नाही..

नैतिक : आत्ता नाही रे करत तु कुठे ह्या मॅडच ऐकतोयस.. 

रॉबिन : नैतिक कधी तरी माणसाने खर बोलावं रे.. सोड तुझ्याकडुन काय अपेक्षा ठेवु मी..
 
वृषभ : रॉबिन बस ना. नंतर बोलुयात ह्या टॉपिकवर.. काकु तुम्ही आणि पिऊ आत्ता घरी जावा.. मी आहे इथे..

आर्यनची आई : ह्याला अश्या अवस्थेत सोडुन कस जाऊ मी घरी..

आर्यन : मम्मी तु पिऊला घेऊन जा बघु घरी..

पिऊ : मम्मी मी थांबते दादा सोबत..

आर्यन : तु तर अजिबात इथे थांबणार नाहीस.. तु घरी जातेयस.. आणि मम्मी परत हिला इथे पाठवु नको.. 

पिऊ : का??

आर्यन : घरी मम्मीकडे लक्ष दे.. मम्मी तु जा बघु हिला घेऊन.

पिऊ वृषभकडे बघत तोंड पाडतच परत आपल्या भावाकडे बघते..

वृषभ : मी घेईल त्याची काळजी.. आत्ता रात्र आहे ना आणि आजूबाजुला जेन्ट्स वॉर्ड आहे. तुम्ही इथे एवढ्या रात्री थांबण चांगलं नाही ना दिसणार म्हणुन तो बोलतोय.. 

नैतिक : तुला पण कामावर जायच असेल ना?? तु पण जा.. मी थांबतो..

विराज : वृषभ तु इथेच थांब ऑफिसमध्ये मी करेल मॅनेज.

वृषभ : नाही नको.. मी येईल उद्या ऑफिसमध्ये डोन्ट वरी.. नैतिक तु सकाळी लवकर ये.. मी रात्री येत जाईल.. म्हणजे ऑफिस सुटल्यावर डायरेक्ट इथेच येत जाईल..

रॉबिन : मी दुपारी येतो.. तस वृषभ तुला त्रास नसता दिला रे बट हे हॉस्पिटल एवढं लांब आहे.. त्यात तो प्रतीक दुसऱ्या वॉर्डमध्ये.. त्याच्यासोबत महेश आणि रोहन थांबतील.. तसे त्याचे पप्पा आहेत म्हणा.. बट तरीही..

वृषभ : मला नाही त्रास होणार रे.. काकु आम्ही सगळे मॅनेज करू.. तुम्ही जावा बघु घरी.. आर्यनच टेन्शन अजिबात नका घेऊ.. मी आहे त्याच्यासोबत..

आर्यनची आई : तुम्ही सगळे आहात म्हणुन टेन्शन नाही... ह्याच्या पप्पांना सुद्धा नाही कळवलं मी.

ज्योसलिन : कळवु पण नका. ते उगाच टेन्शन घेत बसतील नाही तर..

आर्यनची आई : म्हणुनच नाही कळवलं मी..

रॉबिन : विर तु गाडी आणली असशील ना??

विराज : हो मी सोडतो त्यांना घरी.. बट वृषभ तु तुझ्या जेवणाच काय करशील??

नैतिक : ए विर मी इथेच रहातो यार.. माझ्या मित्रांना अस उपाशी मी नाही रे ठेवणार.. मी घेऊन येईल दोघांसाठी डब्बा...

विराज : मग ठिक आहे.

अनघा : आर्यन काळजी घे.. आम्ही प्रतीकला पण बघुन येतो..

आर्यन : हो.. 

विराज : आणि आर्यन जास्त टेन्शन घेऊ नकोस.. पाय लवकर बरा होईल.. पण परत अस काही करू नकोस..

आर्यन : हम्मम.. थेंक्स तुम्ही दोघ माझ्यासाठी एवढ्या लांब आलात ते...

अनघा : आर्यन अस थेंक्स बोलुन परक नको ना करूस..  आणि काळजी घे.. काही गरज लागली की कळवा आम्हांला.. आम्ही आहोत..

आर्यन : हम्मम..

गाथा : वृषभ काही मेडिकल इस्यु वाटला तर लगेच मला कॉल कर.. माझा नंबर तर तुझ्याकडे आहेच..

वृषभ : हो मी कळवतो तुला तस..

रॉबिन : आर्यन मित्रा.. मला माहिती मी घरी जातोय म्हणुन तुला खुप रडु येतंय.. बट अस रडु नकोस यार.. तुझ्यासाठी मी येतो इथे परत.. डोन्ट वरी..  (आर्यनचे डोळे पुसतच रॉबिन बोलतो..)

आर्यन आत्ता हसतच रॉबिनकडे बघु लागतो.. आर्यनला अस थोडं हसताना बघुन सगळ्यांना बर वाटत..

विराज : रॉबिन मला अस वाटत तु इथेच थांब.. आर्यनचा तेवढा टाईम पास होईल..

रॉबिन : विर तु अस बोलतोयस मग मी आर्यन सोबत थांबतो.. आर्यन काय बोलतोस थांबु ना मी.??

आर्यन : रॉबिनसोबत टाईमपास करायच्या मुडमध्ये मी जरा पण नाही.. रॉबिन तु जा घरी..

रॉबिन : थांबतो रे मी..

आर्यन : अजिबात नको..

रॉबिन : अस कस नको.. मी थांबतोच..

आर्यन : नैतिक ह्याला बघना यार..

नैतिक : रॉबिन नको ना त्रास देऊस त्याला चल बघु तु.. 

अनघा : रॉबिन तु कुठेच शांत नाही ना बसत..

(अनघा हसतच रॉबिनला बोलते)

नैतिक : शांत बसेल तो आपला रॉबिन कसला.. 

गाथा : बट त्याच्यामुळे हॉस्पिटलवाली फिलींग नाही ना येत..

विराज : मी पण आत्ता तेच बोलणार होतो..

नैतिक : ए विर तु ह्याला हरभऱ्याच्या झाडावर नकोरे चढवुस.. परत त्याला खाली उतरवायला आम्हांला त्रास होतो.. कारण तो जास्तच वर्ती जाऊन बसतो..

(नैतिक अस बोलताच सगळे हसु लागतात)

रॉबिन : बस काय नैतिक.. आपल्या मित्रावर एवढं पण कोणी ज्वेलस फील करत काय??

वृषभ : रॉबिन तो खर तेच बोलतोय.. दुपारी तर हा त्या नर्सला त्रास देत होता..

विराज : रॉबिन जास्त पण मस्ती नको रे.. 

रॉबिन : ती नर्स थोडी जास्तच रुडली बोलत होती रे.. 

विराज : तरी पण हॉस्पिटल आहे हे..

रॉबिन : सिरियसली???

अनघा : विराज जाऊ दे त्याला. तुला त्रास दिल्या शिवाय रॉबिनला करमनार..

रॉबिन : वहिनी तु अगदी माझ्या मनातल बोललीस..

नैतिक : रॉबिन मज्जा मस्ती बस झाली. आर्यन मी 10 वाजेपर्यंत येतो परत.. दोघांसाठी जेवण घेऊन.. ओके??

सगळेच आर्यनला बाय करत तिथुन निघुन जातात.. आर्यनची आई वृषभला एक दोन सूचना देतच तिथुन निघुन जाते.. 

वृषभ काळजी घे.. दादाची पण आणि तुझी पण.. पिऊ वृषभजवळ येतच त्याला बोलते..

वृषभ : हम्मम..  घरी पोहचलीस की एक टेक्स्ट कर.. 

पिऊ : हम्मम..

एक नजर आर्यनवर फिरवत पिऊ आपल्या आईसोबत निघुन जाते.. 

सगळे निघुन जाताच वृषभ आर्यनच्या बाजुला चेअर घेऊन  बसतो..

वृषभ : पाय दुखायचा थांबला ना तुझा??

आर्यन : जरा कमी झालाय.. मला सहनच होत नव्हतं रे.. म्हणजे अजुनही नाही होत आहे.

वृषभ : अस नको ते का करत असतो रे तु.. आपली आई घरी आपली वाट बघत असते यार.. निदान तिच्यासाठी तरी ह्यापुढे हे अस काही करण बंद कर म्हणजे झालं.. 

आर्यन : नाही रे करत आत्ता. सकाळ पासून मम्मी आणि पिऊने खुप लेक्चर दिलंय मला आत्ता तु नको ना देऊस..

वृषभ : नाही देत.. तु झोप जरा. 

आर्यन : कसली झोप येतेय यार.. उगाच नैतिककडे गेलो अस वाटतंय मला..

वृषभ : उगाच नैतिककडे बाईक घेऊन गेलो अस वाटायला हवं तुला.

आर्यन : तेच ते..

तोच रोहनचा फोन येतो वृषभला..

आर्यन तु थोडं झोपायचा प्रयत्न कर मी आलोच अस बोलत वृषभ आर्यन पासुन थोडं लांब जातच त्याचा फोन उचलतो..

रोहन : काल फोन करत होतास का??

वृषभ : तु आत्ता बघितलंस??

रोहन : नेट बंद होत रे मोबाईलच.. नॉर्मल कॉल केला असतास तर उचलला असता मी.. तुझ काही काम नव्हतं ना??

वृषभ : ते कंपनी थ्रू मला 20 लाख मिळाले..

रोहन : ओके...

वृषभ : कश्याबद्दल मिळालं ते तरी विचार यार..

रोहन : कश्याबद्दल??

वृषभ : मी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळवुन दिलं ना म्हणुन आणि माझी सॅलरी पण डब्बल केली विरने.. मग छोटस सेलिब्रेशन आम्ही करत होतो.. म्हणुन तुला कॉल केलेला..

रोहन : आम्ही?? आम्ही म्हणजे..?

वृषभ : मी आणि समीरा.. 

रोहन : मला बोलवलं असत तर आलो असतो मी तुझ्यासाठी..

वृषभ : खरच??

रोहन : बोलवुन बघितलं असतस तर कळलं असत तुला.. 

वृषभ : नेक्स्ट टाईम नक्की बोलवतो..

रोहन : वृषभ तु समीरा पासुन लांब का नाही रहात यार??

वृषभ : ए रोहन तुला समीराच नाव ऐकताच काय होतंय यार?? तु तिच्या प्रेमात आहेस का काय.?

रोहन : मी तर तिच्या प्रेमात नाही.. बट ती तुझ्या प्रेमात आहे हे नक्की..

वृषभ : रोहन तु किती पॅक घेतलेस आज?? खर खर सांग..

रोहन : ए वृषभ मी पुर्ण पणे शुद्धीत आहे यार. समीरा खरच तुझ्या प्रेमात आहे..

वृषभ: अच्छा.. अजुन??

रोहन : अजुन म्हणजे.?? मी सिरियसली काही तरी बोलतोय.. समीरा खरच तुझ्या प्रेमात आहे वृषभ.. ही गोष्ट थोडी सिरियसली घे तु.. 

वृषभ : ओके घेतो.. ठेवु??

रोहन : वृषभ.. यार नीट बोलणा.. तुझ्याकडे माझ्यासोबत बोलायला वेळ नाही तर तस सांग तु..

वृषभ : तु अस नको ते बोलतोस ना म्हणुन नाही बोलावस वाटत तुझ्यासोबत..

रोहन : नको ते नाही खर तेच बोलतोय मी..

वृषभ : अच्छा?? तुला कधी कळलं ती माझ्या प्रेमात आहे ?? समीरा शौर्य सोबत डेट ला वैगेरे जायची तेव्हा का तो सोडून गेल्यानंतर दोन वर्षे ती आपल्यासोबत होती तेव्हा.. का आत्ता दिल्लीत बसुन तुला कळलं?? कधी कळलं कधी तुला की ती माझ्या प्रेमात आहे?? 

रोहन : जेव्हा तुला कळलंना तेव्हाच मला कळलं रे.. फरक एवढा आहे मी गोष्टी बोलुन लगेच व्यक्त होतो तु सगळ्या मनात ठेवतोस.. 

वृषभ : रोहन जे मनात होत ते तुझ्याशी बोलुन मी मोकळा झालोय यार..

रोहन : मग तेव्हाच तर तु बोललास मला समीरा पण आवडते.. 

वृषभ : रोहन आपण नंतर शांतपणे ह्या टॉपिकवर बोलुयात.. आत्ता मी ना ह्या टॉपिकवर बोलायच्या मुडमध्ये नाही आहे.. तु खरच फोन ठेव.. मला।नाही आवडत तु अस काही बोलतोस ते..

रोहन : वृषभ तु फोन नाही हा ठेवणार तुला माझी शप्पथ आहे.. 

वृषभ : रोहन तुझा हा स्वभाव नाही आवडत मला.. तुझं ऐकुन घेतोना मी तर तु जास्तच बोलतोस यार.. आणि खर सांगु पर्वा पासुन मला तुझ्याशी बोलायला नाही आवडत आहे.. भीती वाटते परत तु समीरावरून नको ते बोलशील मला. मी काल पण तुला फोन नव्हतो करणार बट समीराच्या समोर इस्यु नको म्हणुन मी केला फोन.. आणि मी पर्वा तुला सगळं एक्सप्लॅन केलंय यार तरी आज तुझं तेच.. तुला का नाही कळत आहे समीरा आणि मी फक्त चांगले मित्र आहोत.. एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले तर ते चांगले मित्र मैत्रीण पण असुच शकतात ना.. जसा तु माझा मित्र आहेस तशी ती पण आहे.. जर तु बोलतोस तस माझं प्रेम असत तिच्यावर तर शौर्यच्या आधी मी तिला प्रपॉज केलं असत.. अस तीन वर्षे थांबलो नसतो. एवढी साधी गोष्ट का नाही कळत आहे तुला.. आणि तिच प्रेम असत माझ्यावर तर तिने शौर्यसोबत रिलेशन जोडलच नसत..

रोहन : वृषभ एक मित्र म्हणुन मी तुला सांगायच काम केलं तुला पटतंय तर धर नाही तर काहीही कर.. आज पासुन.. सॉरी आत्ता पासुन माझा तुला कधीच फोन नाही येणार.. तुला नाही ना आवडत माझ्यासोबत बोलायला मग ठिक आहे.. 

वृषभ : रोहन सॉरी.. मला जस तु समजतोयस तस नव्हतं बोलायच..

रोहन : तु कश्याला सॉरी बोलतोयस मिच तुला सॉरी बोलतो.. मिच मुर्ख जे तुला समजवायला आलो.. हे माहिती असुन सुद्धा तु कसा आहेस ते.. तुला 20 लाख मिळाले हे मला पर्वाच कळलं.. तुझा पगार वाढला हे देखिल मला पर्वाच कळलं.. माझ्या लाईफमध्ये जरा काही चांगल घडलं तर मी तुला आधी सांगायला येतो.. बट तु तसा नाहीस हे तुझ्या वागण्यावरून मला कळलं.. तु खुप वेगळा आहेस वृषभ.. म्हणजे मी आत्ता पर्यंत तुला समजत होतो तसा तु अजिबात नाहीस.. MBA मध्ये तु एडमिशन घेतलंस ना?? ते पण नाही सांगितलंस तु मला.. बट समीराला तु स्वतःहुन सांगितलंस.. वर तिला तुझ्याच इन्स्टिट्यूट मध्ये एडमिशन घ्यायला पण सांगितलंस.. 

वृषभ : रोहन.. तु चुकीच सम...

रोहन : ए वृषभ तु खरच राहू दे यार.. आयुष्यात पुढे जा बट पाय ना जमिनीवर ठेव तुझे.. परत नाही येणार माझा फोन तुला. तुझी लाईफ तु बघुन घे.. गुड बाय.. 
मध्येच वृषभला थांबतच रोहन बोलतो आणि रागातच वृषभचा फोन कट करून टाकतो.. वृषभ त्याला परत परत फोन लावत असतो बट तो काही त्याचा फोन उचलत नसतो..

आर्यनजवळ येऊन डोक्याला हात लावून तो बसतो..

आर्यन : काही प्रॉब्लेम आहे का??

वृषभ : कुठे काय?? 

आर्यन : अस तोंड का पाडुन बसलायस??

वृषभ : असच.. तु झोप बघु नैतिक आला की मी तुला उठवतो..

आर्यन : हम्मम..

रात्री 10 वाजता तस नैतिक दोघांसाठी जेवण घेऊन येतो.. 

वृषभ आर्यनला उठवुन बसवतो.. नैतिकने आणलेलं जेवण तो एका प्लॅटमध्ये घेत त्याला भरवायला घेणार तोच नैतिक त्याला थांबवतो..

नैतिक : मी भरवतो त्याला.. तु जेवून घे.. 

वृषभ जेवत असतो पण जेवता जेवता रोहनला फोन लावणं त्याच चालु असत.. बट रोहन ने एकदा राग डोक्यात घालुन घेतला तर तो कोणाच कसलं ऐकतोय.. वृषभ मोबाईल बाजुला ठेवणार तोच पिऊचा त्याला ती घरो पोहचली म्हणुन मॅसेज येतो.. वृषभ तिच्या मॅसेजवर फक्त ओके म्हणुन रिप्लाय देतो.. आणि आर्यनकडे बघतो. आर्यन नैतिक सोबत बोलत जेवत असतो..

वृषभ : नैतिक जमल्यास उद्या लवकर येशील?? 9.30 ला ऑफिसमध्ये पोहचाव लागेल मला म्हणजे आर्यनच्या घरी जाऊन मग ऑफिसला जावं लागेल ना..

नैतिक : हो 6 वाजताच येतो.. चालेल??

वृषभ : थेंक्स यार..

दोघांचही जेवण आटोपुन होताच नैतिक निघुन जातो..

आर्यन : वृषभ नैतिक थांबला असता ना.. तु उगाच त्रास करून घेतोयस..

वृषभ : त्याला घरी पण काम असेल ना.. कालच शिफ्ट झालेत ती लोक इथे. मला अस वाटतंय आपण जेवण पण बाहेरूनच घेऊन जेऊयात.

आर्यन : हम्ममम. मी उद्या बोलतो नैतिक सोबत..

वृषभ : ओके..

रात्री साडे दहाच्या दरम्यान आर्यनच्या मोबाईलवर शौर्यचा व्हिडीओ कॉल येतो.. वृषभ आर्यनचा मोबाईल आपल्या हातात घेतच तो उचलतो आणि आर्यनच्या समोर धरतो..

शौर्य : आर्यन कसा आहेस??

आर्यन : कसा दिसतोय??

शौर्य : दुखत असेलना खुप??

आर्यन : हम्मम..

शौर्य : वन विक थोडं दुखेल रे..

आर्यन : थोडं नाही यार खुप भयानक दुखतय..

शौर्य : आय नॉ.. मी ह्या सगळ्यातून गेलोय रे.. वन विक लागेल तुला रिकव्हर व्हायला डोन्ट वरी.

आर्यन : हम्मम.. तु आहेसना बरा..

शौर्य : हो मी बरा आहे.. तुझ्यासोबत कोण थांबलय??

आर्यन : वृषभ..

शौर्य : अच्छा... कुठेय तो बिजिमॅन??

वृषभ : कसा आहेस शौर्य??

शौर्य : मी आहे बरा.. तु फ्रि आहेस का??

वृषभ : का?? काय झाल??

शौर्य : आज काल तु खुप म्हणजे खुपच बिजी असतोस ना.. म्हणुन सहज बोललो रे.. तुझ्याबद्दल खुप काही ऐकायला मिळतंय मला.. तु खरच खुश आहेस ना??

शौर्य अस काही बोलताच वृषभ शांतपणे त्याच्याकडे बघत रहातो.. नक्कीच रोहनने ह्याला काही तरी सांगितलं असेल असा विचार तो मनात करू लागतो.

शौर्य : काय झालं??

वृषभ : शौर्य तु समजतोस तस काही नाही आहे यार..

शौर्य : मी काय समजतोय??

वृषभ : मला माहिती तुला काय बोलायचं ते.. बट सिरियसली तस काहीच नाही आहे यार.. 

शौर्य : खरच?? मग तो अस का बोलला??

वृषभ : रोहन वेडा आहे यार तो काहीही बोलतोय.. त्याला मी आधीच सांगितलंय की तो जस समजतोय तस नाही आहे तरी त्याच तेच.. तो मला चुकीच समजतोय..

शौर्य : रोहन ने काय केलं आत्ता??

वृषभ : तु कोणाबद्दल बोलतोयस??

शौर्य : अरे ते विर मला बोलला आज काल तो तुला खुप काम देतो.. आणि मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलीय की ऑफिस टायमिंगमध्ये तुला फोन करायचा नाही म्हणुन.. प्लस आत्ता तु MBA मध्ये एडमिशन घेतलयस म्हटलं तर जास्तच बिजी असशीलना.. बट रोहनच काय बोलत होतास तु??

वृषभ : काही नाही??

शौर्य : नक्की??

वृषभ : हम्मम.. म्हणजे मी नंतर बोलतो तुझ्याशी..

शौर्य : ओके.. तस पण मी रोहनला फोन करणारच आहे आत्ता.. आर्यनची काळजी घ्या सगळ्यांनी मिळुन.. आर्यन थोडे दिवस खुप त्रास होईल.. मग होईल बर.. काळजी घे..

आर्यन : हम्मम.. बाय

शौर्य : बाय..

शौर्य फोन कट करून लगेच रोहनला लावतो..

रोहन : हा शौर्य बोल..

शौर्य : बोललास वृषभ सोबत तु??

रोहन : बोललो रे.. बट त्याला मी जे बोलतो ते पटतच नाही..  आणि मी काय करू हे मला नाही कळत.. मला नाही जमत आहे वृषभ सोबत बोलायला.. त्याची आणि माझी भांडण पण झाली.. मी पण नाही ह्या सगळ्यात पडणार.. आणि मी वृषभसोबत पण बोलणार नाही..

शौर्य : काय झालं??

(रोहन शौर्यला वृषभ काय बोलला ते सांगतो..)

शौर्य : वृषभने अस नव्हतं बोलायला हवं हे मला कळतंय.. बट इट्स ओके ना रोहन.. आपला मित्र आहे यार.. मित्र कधी तरी चुकतो रे आपला.. मोठं मन करून माफ कर.. आणि  मला आत्ता अस वाटतंय आपण उगाच त्याच्या लाईफमध्ये इंटरफेर करतोय.. जाऊ दे. त्याची लाईफ तो बघुन घेईल..

रोहन : मला ही तेच वाटतंय.. बट मी एकदा दोनदा प्रयत्न केला त्याला समजवण्याचा.. आणि तो लहान आहे का?? समोरची मुलगी आपल्याकडे कोणत्या एंगल ने बघते हे न कळण्या इतपत तो मुर्ख तर अजिबात नाही वाटत मला. त्याला समीरा पण हवी असणार आणि ती पण जिच्या तो प्रेमात आहे.. तु सांग मनवी तुझ्याकडे कोणत्या नजरेने बघायची हे तुला लगेच कळलं.. कळलं की नाही?? मग ह्याला का नाही कळत आहे?? राज आणि टॉनी आज सकाळी मला फोन करून विचारत होते की वृषभ आणि समीराच खरच काही आहे का?? म्हणजे त्यांना पण कळतंय मग ह्याला का नाही.. खरच वृषभ एवढा भोळा आहे?? ज्याला मैत्री आणि प्रेम ह्या दोघांतला फरक मला समजवुन सांगावा लागतोय.. बोलतात ना झोपेच सोंग घेऊन झोपणाऱ्याला झोपेतुन नाही उठवता येत तस वृषभच्या बाबतीत झालंय माझं.. 

शौर्य : तु बोलतोयस ते पण मला पटतंय.. बट वृषभ तसा नाही जसा तु विचार करतोयस.. मी त्याला चांगलं ओळखतो रे.. मनवी ऑपनली माझ्यासोबत तशी वागायची म्हणुन मला ते कळलं बट तुला ते कळत नव्हतं.. तस त्याच्या बाबतीत झालं असेल पण उलट झालं असेल.. समीरा सगळ्यांसमोर  दाखवत असेल की ती वृषभवर प्रेम करते बट वृषभसमोर ती तस नसेलही दाखवत.. ज्या गोष्टी आपल्याला नाही माहिती आपण नाही ना बोलु शकत..

रोहन : whatever यार..काहीही असेल.. बट मी तर आज पासुनच त्याच्याशी कधीच बोलायच नाही अस ठरवलंय..

शौर्य : हे जरा जास्त होतय रोहन.. मित्र आहे यार आपला.. आणि मी बोललो ना आपल्याला अजुन नाही ना माहिती खर काय आहे ते?? समीरा नसेलही त्याच्या प्रेमात.. आणि तो आत्ता हॉस्पिटलमध्ये आहे.. आर्यनच एक्सिडेंट झालय. त्याच्यासोबतच आहे तो.. मे बी म्हणुनच थोडा इरिटेट झाला असेल तो.. एवढ्या छोट्याश्या कारणाने आपल्या मित्राचा राग नाही रे करायचा.. तस पण तुला चांगलं ओळखतो मी.. दोन दिवसाने स्वतःहुन बोलशील त्याच्याशी.

रोहन : मला नाही वाटत तस.. बाय दि वे मला तुला काही तरी सांगायचंय.. मी अजुन कुणालाच काही सांगितलं नाही तुलाच पहिलं सांगतोय.. मी स्वतःच हॉटेल काढायच विचार करतोय.. म्हणजे विचार नाही करत आहे तर तशी प्रोसेस पण चालू करणार आहे नेक्स्ट विक पासुन..  तुला माहिती ना मला अभ्यासात इंटरेस्ट नाही रे.. म्हणुन थोडं वेगळं काही तरी करायचा विचार करतोय.. डॅड पण ओके बोललाय.. 

शौर्य : ग्रेट यार बट मी तुला सजेस्ट करू का?? 

रोहन : करू का काय विचारतोयस.. कर ना..

शौर्य : हॉटेल काढतोयस तर थोडं वेगळं काढ.. अस हॉटेल काढ जे दिल्लीतील सगळ्यात युनिक हॉटेल असेल.. तु तुझ्या हॉटेलमध्ये आर्टिफिशियल बिच तैयार कर.. सगळेच तुझ्या हॉटेलकडे एट्रेक होतील.. जे कोणी नाही केलं ते तु कर.. म्हणजे तुच बघ ना दिल्लीत बिच नाही आहे रे.. बिचारे तिकडचे कपल्स अस काहीस खुप मिस करत असतील. आणि हॉटेलमधला मेनु हा खुप म्हणजे खुप वेगळा ठेव.. मेनु कार्डची नाव पण थोडी एंटीक ठेव.. एंटीम वस्तूंकडे लोकांच एट्रेक्शन थोडं जास्त असत.. त्यासाठी खर तर तुला हॉटेल मॅनेजमेंट करायला हव होत.. बट इट्स ओके.. मोठं मोठे शेफ तु हायर करू शकतोस.. म्हणजे A1 ला तुझंच हॉटेल असेल.. 

रोहन : ए शौर्य यु आर ग्रेट मॅन. तु कसली भारी आयडिया दिलीस यार.. मला हे अस काही सुचलच नव्हतं रे.. बट तु इथे असतास तर मला किती हेल्प झाली असती तुझी.

शौर्य : इथुन करतो ना मी तुला हेल्प.. मला दोन दिवस दे मी तुला एका पेपरवर डायग्राम बनवुन दाखवतो तस हॉटेल तुला बनवता आलं तर बघ. म्हणजे तुला सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट खुप करावी लागेल त्यात बट महिन्या भरात तु केलेली सगळी इन्व्हेस्टमेंट तुला परत मिळेल.. इतका प्रॉफिट कमवशील तु.. दिल्लीत अस कोणाच हॉटेल नसेल तस हॉटेल तुझं असेल. बट त्यासाठी खुप मोठी जागा लागेल तुला..

रोहन : ती तर आहे माझ्याकडे..

शौर्य : मग तर अजुनच चांगलं आहे. बट हा मी फक्त सजेस्ट करेल पण तु मी बोलेल तसच कर अस माझं म्हणणं अजीबात नाही.. हॉटेल कस असणार हे तुझ तुच ठरवणार.. आणि काही गरज लागली तर मी आहेच.. बट आय एम रिअली हॅप्पी फॉर यु यार एटलिस्ट काही तरी वेगळं करायचा विचार केलास तु.. गुड..

रोहन : थेंक्स यार..

शौर्य : आणि वृषभच नको मनाला लावुन घेऊस.. मित्र आहे रे आपला...

रोहन : हम्मम.. मी आर्यनला उद्या कॉल करतो..

शौर्य : ए रोहन मला गाथाचा फोन येतोय रे.. मी ठेवु का..? परत मला प्रॅक्टिसला पण जायचय.. आज घरी पण फोन नाही केला मी.. तुम्हा लोकांनाच फोन लावतोय.. 

रोहन : हो ठेव.. बट मला एका पेपरवर डायग्राम बनवुन नक्की दे..

शौर्य : दोन दिवस दे मी देतो तुला बनवुन..

रोहन : ओके.. बाय.. आणि तुझ्या गाथाला मी विचारलं म्हणुन सांग.

शौर्य : हो सांगतो.. आणि काळजी घे तुझी.. 

एवढं बोलुन शौर्य रोहनचा फोन कट करतच गाथाला लावतो.. 

हॅलो माय स्वीट... (गाथाने फोन उचलल्या उचलल्या शौर्य नेहमी प्रमाणे बोलायला जातो बट समोर अनघाला बघुन तो मध्येच थांबतो..)

अनघा : पुढे काय??

शौर्य : स्वीट स्वीट वहिनी.. असच बोलणार होतो ग..

अनघा : खरच..??

शौर्य : हो ग.. कशी आहेस तु??

अनघा : मी तर खूप मस्त आहे.. 

शौर्य : घरी कधी जातेयस??

गाथा : दि चांगले दोन तीन आठवडे इथे राहुन मग घरी जाणार आहे.. काय दि??

अनघा : हो ना..

शौर्य : वहिनी माझा विर बिचारा तिथे एकटा आहे ग.. अस कस तु दोन आठवडे त्याच्या शिवाय रहायच बोलतेस.. 

अनघा : एकटा कुठेय तो.. आत्ता तर घरभर माणस आहेत रे शौर्य..

शौर्य : तु त्या घरी त्याच्यासोबत नाही म्हणजे तो एकटाच असेल ना. 

अनघा : ए शौर्य मी मस्ती करतेय. सँडेला विराज येणार आहे मला न्यायला..

शौर्य : वहिनी सँडे??? आज थर्सडे.. म्हणजे अजुन तीन दिवस?? हे पण जरा जास्तच होतायत..

अनघा : गाथा तु शौर्यशी लग्न करताना थोडं विचारच कर हा..  विराज निदान मला 4 दिवस तरी माहेरी सोडतोय. बट शौर्यच अस बोलणं ऐकुन मला नाही वाटत तो तुला 1 दिवस तरी माहेरी सोडेल..

शौर्य : तुला जस विरला सोडुन माहेरी जावस वाटत तस गाथाला मला सोडुन माहेरी जावस वाटत असेल तर मी जाऊ देईल तिला.. बट मला माहिती गाथा मला सोडुन तुझ्यासारख चार चार दिवस माहेरी राहायला जाणारच नाही.. एक दिवस पण ती माझ्याशिवाय नाही राहु शकणार.. हो ना गाथा..

गाथा : हम्मम.. (गाथा थोडं लाजतच बोलते)

अनघा : अरे वाहह.. माझ्यापेक्षा माझ्या बहिणीला तुच चांगलं ओळखायला लागलायस तर..

शौर्य : हा म्हणजे तस तु बोलु शकतेस.. बट तु खरच सँडेला जाणार?

गाथा : शौर्य.. थोडे दिवस राहु दे ना तिला आमच्यासोबत..

अनघा : बघ तर.. शौर्यला ना आपल्या भावाचीच खुप काळजी आहे पण आपल्या वहिनीची नाही. आपल्या वहिनीला तिच्या आई पप्पांची आठवण वैगेरे येत असेल त्याच काहीच नाही ह्याला..

शौर्य : ए वहिनी मी जस्ट कन्फर्म करत होतो ग की तु खरच सँडेला जाणार का?? 

गाथा : शौर्य दि सँडेलाच घरी जाईल..

शौर्य : हम्मम.. 

गाथा : तु आहेस ना बरा??

शौर्य : हो..

(गाथा अनघाकडे बघत असते.. जेणेकरून ती तिला सांगत असते की मला शौर्य सोबत बोलायच आहे..)

अनघा : गाथा मी माझ्या नवऱ्याला सोडुन तुझ्यासाठी इथे आलीय. तु माझ्यासाठी तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला नंतर फोन कर अस नाही का बोलु शकत??

शौर्य : वहिनी विर सोबत राहुन थोडी फार विर सारखी तु वागु लागलीयस तर..

अनघा : अच्छा?? 

शौर्य : हम्ममम.. तस पण मी खुप बिजी आहे आत्ता.. मी स्वतः गाथाला बोलणार होतो की तु वहिनी सोबत एन्जॉय कर.. आपण नंतर बोलुयात.. 

अनघा : शौर्य मी मस्ती करतेय.. तुम्ही दोघ बोला.. गाथा आपण नंतर बोलुयात..

शौर्य : ए वहिनी...मी सिरियसली बोलतोय ग. मी खरच बिजी.. दोघींना पण बाय.. 

गाथा : काळजी घे.. 

शौर्य : हो ग.. आणि तु तुझी आणि तुझ्याकडे फक्त नि फक्त चार दिवस रहायला आलेल्या माझ्या वहिनीची काळजी घे..

शौर्य अस बोलताच अनघा आणि गाथा दोघेही हसतच शौर्यकडे बघत त्याला बाय करतात..

दुसऱ्या दिवशी 8 च्या सुमारास वृषभ घरी येतो.. पटापट फ्रेश होतच तो आपल्या रूम बाहेर पडतो..

आर्यनची आई आवाज देत त्याला आत बोलावते..

आर्यनची आई : कसा आहे तो??

वृषभ : आहे बरा.. रात्री पाय दुखत होता बट इंजेक्शन दिलं तस तो झोपला.. मी निघालो तरी तो झोपुन होता.. नैतिक आणि नैतिकचे पप्पा पण आहे त्याच्यासोबत..

आर्यनची आई : बर.. नाश्ता करून घे आणि मग कामावर जा..

वृषभ : तुम्ही केला??

आर्यनची आई : नंतर करते.. मी थोड्या वेळाने हॉस्पिटलमध्ये जायला निघते. 

वृषभ : मी ऑफिसमधुन डायरेक्ट तिथेच जाईल..

आर्यनची : नको एवढा त्रास करून घेऊस..

वृषभ : त्रास कसला त्यात.. 

तोच पिऊ पोह्यांनी भरलेली प्लॅट वृषभच्या हातात आणुन देते.. आर्यनची आई आत निघुन जाते..

पिऊ : दादा आहे ना बरा??

वृषभ : हम्मम

पिऊ : पाय दुखत होता का त्याच्या??

वृषभ : हा म्हणजे आत्ता थोडा दुखणारच ना.. थोडे दिवस लागतील त्याला बर व्हायला..

पिऊ : हम्मम.. तु पोहे खा.. 

पिऊ वृषभच्या समोरच चेअर घेऊन बसते.. पण ती तिच्या भावाचाच विचार करत असते..

वृषभ तिच्याकडे एक नजर फिरवतच पोह्याचा एक स्पुन तोंडात टाकतो.. पोह्यांमध्ये अजिबात मीठ घातलेल नसत..

वृषभ : तु पण नाश्ता नाही का केला??

पिऊ : करेल मी थोड्या वेळाने.. आत्ता भुक नाही ना.. 

वृषभ : काकूंनी केलेत का पोहे??

पिऊ : नाही.. मी केलेत.. चांगले नाही झाले का??

वृषभ : नाही..  म्हणजे खुप छान झालेत.. 

पिऊ : तुला अजुन हवे तर घे..

वृषभ : हम्मम्म

वृषभ पटकन प्लॅटमधले पोहे संपवतो..

पिऊ : अजुन घे ना..

वृषभ : उशीर होतोय ग.. नाही तर खरच घेतलेच असते. आत्ता निघातो मी..

पिऊ : छत्री घेतलीस??

वृषभ : हो..

ओके.. बाय.. पिऊ एक गोड अशी स्माईल त्याला देतच बोलते..

वृषभ : बाय.

वृषभ कामावर निघुन जातो.

जवळपास 11 च्या सुमारास त्याला समीराचा फोन येतो.. समीराच नाव मोबाईल स्क्रिनवर दिसताच वृषभला रोहनची आठवण येते.. रोहनच बोलणं त्याच्या कानाभोवती घुमत असत..

तुझ काही काम होत का?? वृषभ समीराचा फोन उचलतच तिला बोलतो..

समीरा : आहेस कुठे तु?? काल तुझ्या फोनची वाट बघत होते मी..

वृषभ : का??

समीरा : का म्हणजे?? साडी आवडली का नाही हे कळायला नको का मला..

वृषभ : आवडली साडी.. मी आत्ता बिझी आहे.. बाय..

समीरा : काय झालंय वृषभ??

वृषभ : काही नाही.. बाय..

समीरा काही बोलणार पण वृषभ तिचा फोन कट करून टाकतो.. आणि रोहनला फोन लावतो.. बट रोहन त्याचा कॉल उचलतच नसतो.. फोन तसाच डेस्कवर ठेवत तो दोन मिनिटं डोक्याला हात लावुन बसतो.. पुन्हा त्याचा फोन वाजतो.. त्याला वाटत पुन्हा समीराने फोन केला असेल बट पिऊचा फोन बघुन चेहऱ्यावर एक वेगळंच हसु येत त्याचा..

वृषभ : हा पिऊ बोल

पिऊ : तुला पोहे खरच आवडलेले??

वृषभ : हो..

पिऊ : खरच??

वृषभ : तु आत्ता खाऊन बघितलेस का.??

पिऊ : हम्मम.. तु मला सांगितलं का नाही त्यात मिठ नाही हे. एकदा सांगु तर शकलाच असतास ना. असे कसे अळनी पोहे तु खाल्लेस??

वृषभ : तु बनवलेलेस म्हणुन आवडीने खाल्ले..

वृषभ अस बोलताच पिऊच्या ओठांवर गोड अस हसु येत.. ती दोन मिनिटं शांतच बसते.. हृदय अगदी जोर जोरात धडधड करत तिला सुद्धा ती वृषभच्या प्रेमात आहे ह्याची कबुली देत असत.. इथे वृषभच सुद्धा काही वेगळ नसत.. त्याला पण आपण नको ते बोललोय ह्याची जाणीव होते.. आपल्या डोक्यावर हात मारतच तो आत्ता हिच्यासोबत काय बोलायचं ह्याचा विचार करू लागतो..

वृषभ : आय मीन.. तु पण आर्यनच्या टेन्शनमध्ये होतीस ना.. म्हणुन मला नाही सांगावस वाटलं.. आणि आत्ता मी बिजी आहे.. बाय.. 

थोडं अडखळतच तो पिऊला बोलतो आणि घाबरतच पियुषीचा फोन कट करून टाकतो.. 

समीरा मात्र वृषभच्या तुटक अश्या बोलण्याने हर्ट झाली असते.. ती त्याला फोन लावते बट तो उचलत नसतो.. वृषभला काय झालं अचानक?? असा का वागतोय हा?? ह्याचा विचार ती करू लागते.. तिच कश्यातच लक्ष लागत नसत.. ती रोहनला फोन लावते.. 

रोहन : हॅलो..

समीरा : वृषभला काही प्रॉब्लेम आहे का??

रोहन : का?? काय झालं??

समीरा : काही तरी वेगळाच वागतोय.. मी फोन करतेय तर उचलत सुद्धा नाही तो.. म्हणजे आधी उचलला आणि बिजी आहे अस बोलुन फोन कट करून टाकला.. मी परत फोन लावते तर तो उचलत नाही आहे.

रोहन : खरच??

समीरा : खरच म्हणजे..? मी खर तेच तर सांगतेयना तुला..

रोहन : आय मीन.. तो अस कधी वागत नाही ना कितीही कामात बिझी असला तरी तो फोन उचलतोच म्हणुन बोललो मी..

समीरा : काही प्रॉब्लेम नाही ना.

रोहन : प्रॉब्लेम मला वाटत होता बट आत्ता तस वाटत नाही.. असाच वागत राहिला तर लाईफमध्ये कधीच आणि कोणतेच प्रॉब्लेम येणार नाहीत त्याच्या..

समीरा : रोहन तु मला कळेल अस बोल प्लिज..

रोहन : त्याच्यावर कर्ज होतना. आत्ता कंपनीने 20 लाख दिले त्याला म्हणजे तुच मला सांगितलंस ना.. ह्या वीस लाखांनी तो कर्ज आरामात फेडू शकतो आणि असच वागत राहिला म्हणजे असेच मोठं मोठे प्रोजेक्ट कंपनीला मिळवुन दिले तर लाईफमध्ये प्रॉब्लेम कधी येणारच नाही..

समीरा : ते तर आहेच.. बट थोडी काळजी वाटते त्याची.. म्हणजे अस कधी तो बोलला नाही माझ्यासोबत. आज त्याचा बोलण्याची पद्धत थोडी वेगळी होती रे..

रोहन : तुला अस वाटत नाही का तु वृषभचा जास्त विचार करायला लागलीयस आज काल?? आय नॉ तो तुझा तो बेस्ट फ्रेंड आहे बट तरीही.. तु मला फोन केलास तरी तुझा टॉपिक हा वृषभ रिलेटेडच असतो.. आत्ता पण बघ ना.. 

रोहनच्या अश्या बोलण्यावर समीरा एकदम शांत बसुन राहते.. 

सॉरी तुला राग आला असेल तर..

समीरा : रोहन मला तुझ्याशी काही तरी बोलायचंय.. तु जर मला समजुन घेणार असशील तर मी बोलेल.. म्हणजे खर तर मी सीमाकडे ह्या विषयी बोलणार होती बट मला नाही जमत आहे तिच्यासोबत ह्या विषयी बोलायला.. आणि खर सांगु तर मी तुला आणि वृषभला जेवढं फोन करते तेवढं तिला नाही करत.. कारण ती तिच्या लाईफमध्ये खुप बिजी आहे. तिच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही..म्हणजे मला मी कोणाकडे बोलु हे नाही कळत रे.. वहिनी आहे घरी बट तिच्यासोबत सुद्धा नाही जमत आहे बोलायला.. 

रोहन : काय बोलायचंय तुला.. म्हणजे तु माझ्यासोबत बोलु शकतेस..

(काय बोलायचं असेल समीराला ?? पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.)

निवेदन : 
कथेतील प्रत्येक पात्राला न्याय द्यायचा प्रयत्न मी करत आहे.. काहींना अस वाटत असेल की शौर्य ह्या कथेचा नायक आहे मग मध्येच वृषभच का दाखवते.. तर सगळ्यात आधी मी एक गोष्ट क्लीअर करते की मी कथेत कुठेही अस मेन्शन नाही केलं की ह्या कथेचा नायक हा शौर्य आहे.. कथेतील सगळेच केरेक्टर माझ्या मते नायक आणि नायिका तुलनेत कमी नाही.. काहींना विराज नायक म्हणुन योग्य वाटतो, काहींना शौर्य तर काहींना हार्ड वर्कर वृषभ.. तस बघायला गेलं तर रॉबिन सुद्धा काही कमी नाही.. हा पण ह्या सगळ्यात आपला शौर्य थोडा स्पेसिअल आहे अस म्हटल तरी चालेल.. बट मला ही कथा कुठे अपुर्ण ठेवायची नाही.. कथेच्या शेवटी यशाच्या शिखरावर कोण कस पोहचल हे तर कळायला हवं म्हणुन प्रत्येक पात्र त्यांच्या स्वभावानुसार लिहिण्याचा प्रयत्न मी करत आहे.. तुम्ही कथा एन्जॉय करत असाल हिच अपेक्षा. सगळ्यांना दिवाळीच्या मनापासुन खुप खुप शुभेच्छा..

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all