अतरंगीरे एक प्रेमकथा ११२

In marathi

विराज आणि अनघा एकमेकांकडे बघु लागतात.. अनघा विराजला मानेनेच नाही म्हणुन खुनवत असते..

अनघा : श्री Say frankly.. मला नाही वाटत वृषभ अस काही तुझ्या बहिणीला बोलेल.. मी खुप चांगलं ओळखते त्याला.. 

अनघा अस बोलताच विराज तिच्याकडे बघतो.

विराज : मला पण असच वाटत.. 

श्री : हे बघा जे समीरा मला बोलली ते मी तुम्हांला सांगितलं.. माझी बहिण कधीच खोट बोलत नाही..

विराज : असेल ही.. मी कुठे नाही बोलतोय.. पण जसा तुझा समीरावर विश्वास आहे तसाच माझा वृषभवर विश्वास आहे.. तो मला आणि अनुला काहीही न सांगता एवढा मोठा डिसीजन घेणारच नाही.. 

श्री : आपल्या एम्प्लॉईस वर ओव्हर कॉन्फिडेंट होऊ नये विराज.. 

विराज : मी वृषभला माझा एम्प्लॉईस मानतच नाही.. मला माझ्या लहान भावासारखाच आहे तो.. हा म्हणजे अस मी त्याला जरा पण दाखवत नाही.. कामावर जी बॉसगिरी मी इतर एम्प्लॉईस ना दाखवतो तीच मी त्याला दाखवतो. तु म्हणतोस तस मी खरच खुप ओव्हर कॉन्फिडेंट आहे त्याच्यावर.. फक्त मिच नाही तर अनघा पण.. जर तो बाहेर इतर कुठे इंटरव्हीव्हला जरी जाईल तरी तो मला सांगुनच जाईल एवढा विश्वास आहे माझा त्याच्यावर.. म्हणजे तसा विश्वास ह्या एक महिन्यात त्याने मिळवला आहे.. मला नाही वाटत तो माझी कंपनी सोडुन मला न सांगता इतर कुठेही जॉईंट करेल..

श्री : जर मी त्याला माझ्या कंपनीत घेऊन दाखवलं तर..??

विराज : तु बोलशील ते मी करेल..

श्री : बघ मी काहीही सांगेल करायला..

आत्या : विर जेवताना काय चालु आहे तुमच..?? दोघांनी जेवा बघु गप्प..

श्री आपल्या भुवया उडवतच विराजला काय करतोस म्हणुन विचारू लागला..

विराज आपला अंगठा दाखवत आय एम रेडी म्हणुन बोलतो..

आत्या : विर.. माझं लक्ष आहे तुझ्यावर..

दोघेही एकमेकांकडे बघतच जेवु लागतात. जेवुन होताच सगळे सोफ्यावर बसतात..

विराज आणि अनघा दोघांसाठी आपल्या रूममधून गिफ्ट घेऊन येतात..

प्रीती : हे काय आहे आत्ता??

अनघा : तुम्हां दोघांना कधी तरी घरी बोलवुन हे द्यायचंच होत.. आणि पहिल्यांदाच घरी आलीस.. ओटी तर भरावीच लागेल ना तुझी..

श्री : माझी कसली ओटी भरतेस..??

अनघा : ए श्री काहीही काय असत तुझं.. तुझी ओटी नाही भरत मी.. 

विराज : तु प्रितीला घेऊन पहिल्यांदाच आमच्याकडे आलास ना म्हणुन तुला तुझ्या ह्या मित्राकडून छोटस गिफ्ट..

काका : असेच येत जावा आमच्याकडे..

श्री : आत्ता तुम्ही या आमच्याकडे.. सगळ्यांनी मिळून.. ते ही जेवायला.. काय साक्षी येणार ना??

साक्षी मान हलवतच हो बोलते..

श्री : विराज घेऊन ये सगळ्यांना..

विराज : नक्की.. (विराज आपला एक अंगठा दाखवतच बोलतो)

श्री : चला मग निघु आम्ही..

अनघा : सांभाळुन जावा.. घरी पोहचलात की फोन करा मला..

प्रिती : हो तु तुझी काळजी घे.. 

सगळ्यांना बाय करत श्री आणि प्रिती घराबाहेर येतात.. अनघा आणि विराज दोघांना सोडायला त्यांच्या कार पर्यंत जातात..

अनघा : श्री ची अशी समोरच्याला चॅलेंज करायची सवय गेली नाही अजुन..

विराज : चॅलेंज करून तो नेहमी जिंकतोच ग.. बट ह्या वेळेला कठीण आहेरे श्री.. 

श्री : ते कळेलच तुला.. पण जर मी जिंकलो तर मी बोलेल ते द्यावं लागेल..

विराज : बस काय.. तेरे लिये जान भी हाजीर हे मेरे दोस्त.. 

श्री : एवढं काही नाही रे करायला सांगणार मी.. आपण चौघे मस्त पैकी निदान दोन आठवडे तरी आऊटिंगला जाऊयात.. मलेशिया, थायलंड वैगेरे ते पण तुझ्या पैस्यांनी.. जर मी हरलो तर माझ्या पैस्यांनी जाऊयात.. बोल मंजुर..??

मंजुर.. आपला हात श्री च्या हातात देतच विराज त्याला बोलतो..

विराज : पैसे तैयार ठेव मग.. नको ते चॅलेंज करून तुझा बॅंक बेलेन्स खाली करायची वेळ तु स्वतःच्या हातानेच स्वतः वर आणलीयस..

श्री : वो तो वक्त हि बतायेगा मेरे यार..

प्रिती : झालं तुम्हा दोघांच मग निघुयात..??
)
श्री : अरे विराज मला तुझ्याशी अजून काही बोलायच होत..

विराज : बोल ना मग..

श्री प्रितीकडे बघत तिला इशाऱ्यानेच काही तरी विचारतो..

अनघा : काय झालं?? असे एकमेकांकडे का बघतायत तुम्ही दोघ..

श्री : ते शौर्यबद्दल बोलायच होत थोडं..

विराज : शौर्यबद्दल काय बोलायचय तुला??

श्री : शौर्य ने पूढे काही करायचं ठरवलं आहे का??

विराज : त्याला काय ठरवायचय.. मार्केटमध्ये S S ltd जी कंपनी आहे त्याचा मालक आहे तो.. तिच सांभाळेल तो.. 

अनघा : पण तु अचानक शौर्य बद्दल का विचारतोयस..??

श्री : काही नाही असच..

विराज : मुलगी वैगेरे शोधतोस की काय माझ्या भावासाठी..

श्री : विचार तर तोच चाललाय..

विराज : मग तो विचार डोक्यातुन काढुन टाक.. 

प्रिती : त्याने कुठे बघितली का??

विराज : हो..

अनघा : माझी लहान बहीण गाथा.. जीच्यासोबत तो आमच्या लग्नात डान्स करत होता..(अनघा श्रीकडे बघत बोलते)

विराज : तिच त्याची बायको होऊन ह्या घरी येईल..

(विराज अस बोलताच श्री नाराज होत प्रिती कडे बघु लागतो..)

प्रिती : आपली गाथा लकी आहे मग...

अनघा : ते तर ती आहेच..

विराज : तु समीरासाठी विचार करत होतास ना??

श्री : शौर्य पहिल्यांदा माझ्या घरी आलेला ना तेव्हाच मला आवडलेला.. त्याच समोरच्याला रिस्पेक्ट देऊन बोलणं, मदत करणं, मोठ्यांचा आदर देऊन बोलणं सगळंच आवडलेलं.. त्यात समीरा आणि त्याची जवळीक मला दिसत होती.. म्हणजे मला अस वाटलं की तिच आणि शौर्यच काही तरी आहे..

अनघा : श्री तुझ्या बहिणीला शौर्यसारखाच किंवा त्यापेक्षा छान जोडीदार नक्की मिळेल.. बट मी माझ्या बहिणीसाठी आधीच त्याला बुक केलंय.. 

अनघा अस बोलताच सगळे हसु लागतात.. श्री थोडं नाराज होतच हसु लागतो.

विराज : आणि श्री माझा भाऊ लहान आहे यार.. आत्ता कुठे 20 कम्प्लिट झालेत त्याला.. कुठे तुम्ही लोक त्याच्या लग्नाच बोलत बसलेत.. श्री तु तरी समजून घे.. लग्न होऊन आपले जे हाल होतात ते पुरे नाही का तुला.. निदान माझ्या भावाला तरी त्याची लाईफ एन्जॉय करू.. (श्री ने त्याची नाराजी दुर करत हसावं म्हणुन विराज बोलतो)

विराज अस काही बोलताच श्री हसु लागतो..

विराज माझ्याशी लग्न करून हाल होतात तुझे... मी हाल करते तुझे.. अस बोलत अनघा विराजच्या हातावर मारू लागते..

विराज : बघ श्री हे रोजच असत हीच..

(अनघाचे दोन्ही हात पकडतच विराज श्री ला बोलतो)

श्री : माझही काही वेगळं नाही मित्रा.. तुझं तर आत्ता आत्ता लग्न झालंय.. माझं लग्न होऊन दोन वर्षे होऊन गेलीत.. तुझ्या पेक्षा माझं दुःख डोंगरा एवढं..

प्रिती : अनघा मला अस वाटतना की ह्या दोघांकडे आपण एकदा बघुयाच..

अनघा : विराजकडे तर आज मी बघतेच.

(अनघा विराजला थोडा नकटा राग दाखवतच बोलते)

विराज : अनु तु सिरीयस नको होऊस.. मी जस्ट जॉक करत होतो..

अनघा : एवढा छान जॉक केलास मग तश्या कॉम्प्लिमेंट नको का भेटायला तुला..

वरकुल मित्रा.. गॉड ब्लेस यु... श्री विराजला मिठी मारतच बोलतो..

प्रिती : विराज हे सॅम तु श्री ला पण बोल...

विराज : ए प्रिती आम्ही खरच गंमत करत होतो ग.. आणि अनघाच बोलशील ना.. अनघा इज माय लाईफलाईन नाव्ह.. माझ्या ह्या घराला एकदम घरपण दिलंय तिने.. सगळ्यांना मस्त सांभाळुन घेते.. आणि श्री शौर्य गाथाच्या प्रेमात आहे.. शौर्य गाथा ही जोडी परफेक्ट आहे.. आय नॉ आपली बहिण चांगल्या घरात जावी अस एक भाऊ म्हणून प्रत्येकाला वाटत असत तेच तुला वाटलं.. बट इट्स ओके ना यार.. कोणी छान असेल तिच्या नशिबात.. 

श्री : ते तर असेलच रे.. बट आत्ता उशिर होतोय मला.. चल मी निघतो.. मग भेटु परत.. आणि माझं चॅलेंज लक्ष्यात ठेव..

अनघा : हा आला परत त्याच टॉपिकवर.. 

प्रिती : श्री चल बघु..

श्री : विराज चॅलेंज विसरू नकोस मित्रा..

विराज : तु लक्षात ठेव म्हणजे झालं.. कार निट ड्राइव्ह कर नाही तर चॅलेंजच्या नादात घरी जायच सोडून वृषभला शोधत त्याच्या घरी जाशील. प्रिती सांभाळुन ने हा ह्याला..

श्री : झालं तुझं?? निघु मी??

विराज : हो चल बाय.. (विराज हसतच श्री ला बोलतो)

श्री आणि प्रिती दोघांचा निरोप घेऊन तिथुन जाऊ लागतात..

विराज आणि अनघा दोघांनाही बाय करून आपल्या रूममध्ये येतात..

विराज : अनु तुला काय वाटत??

अनघा : मला वाटत आपण वृषभ सोबत बोलुन घ्यावं.. 

विराज : तस पण मी तुला बोललो होतो वृषभ सोबत कंपनीची पर्सनल डिटेल्स नको शेअर करायला.. म्हणजे तो अस काही करणार नाही हे माहिती बट थोडं टेन्शन आलंय मला.. 

अनघा : विराज आपण एकदा बोलुन बघुयात त्याच्यासोबत.. आणि जर खरच त्याला मूव्ह ऑन व्हायच असेल तर होऊ दे..

विराज : थांब मी आत्ताच विचारतो त्याला...

अनघा : विराज रात्र खुप झालीय.. उद्या विचार..

विराज : माझं काम पण आहे ग त्याच्याकडे.. एक दोन डेटा बनवुन हवेत मला..

विराज जास्त वेळ वाया न घालवता वृषभला फोन लावतो.. पण फोन हा छोट्या वरदकडे असतो.. एकदा का आपल्या मामाला फोन दिला की तो परत आपल्याला मोबाईल देणार नाही म्हणुन वरद फोन कट करून टाकतो.. आणि आपला गेम खेळण्यात व्यस्त होतो. विराज परत फोन लावतो.. वरद परत फोन कट करतो..

विराज आत्ता थोडा गंभीर चेहरा करत अनघाकडे बघु लागतो..

विराज : अनु तो फोन उचलत नाही माझा. कट करतोय... 

अनघा : बिजी असेल.. थोड्या वेळाने करेल फोन. तुझा वृषभवर विश्वास आहे ना..

विराज : आहे ग.. बट मी आत्ता श्री च्या बोलण्याचा विचार करू लागलोय.. समीराला तो बोलल्याशिवाय कस कळेल की मी त्याला जास्त काम देतो ते.. तुच सांग. आणि कधी तरीच मी त्याला जास्त काम देतो ग.. ते काम तोच परफेक्ट करतो म्हणुन त्याला देतो. 

अनघा : आय नॉ.. तु नको टेन्शन घेऊस बघु.. तुझा कॉल बघुन फोन करेल तो..

विराज : हम्मम वाट बघतोय मी त्याच्या फोनची..

इथे वृषभ आणि मित्रमंडळींची मस्त पैकी मज्जा मस्ती चालु असते.. 

रोहन : उद्या कुठे जातोय आपण..??

वृषभ : इथे महालक्ष्मी टेम्पल आहे.. त्याच्या जवळच रंकाळा लेक पण आहे.. आपण संध्याकाळी जाऊयात तिथे..

राज : सकाळी काय करायच..??

वृषभ : मला पप्पांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचय रे.. एक दोन काम पण आहेत माझी.. ती सुद्धा करायचीत मला.. तुम्ही फिरा. 

सीमा : ओके डोन्ट वरी.. 

रोहन : मी पण तुझ्यासोबत डॉक्टरकडे येतो..

वृषभ : कश्याला उगाच त्रास करून घेतोस.. तु फिर मस्त पैकी.. ताई आहे सोबत.. तिला घेऊन जाईल मी.. आपण संध्याकाळी जाऊयात फिरयाला.. ओके..

सीमा : मला चालेल..

रोहन : उद्या रंकाळा लेक गेल्यावर आपण सगळे शौर्यला कॉल करूयात..

रोहन अस बोलताच समीरा रागातच तिथुन उठुन बाजुच्या रूममध्ये जाते..

सगळेच तिच्याकडे बघु लागतात.. रोहन वृषभचे एक्सप्रेशन बघु लागतो.. वृषभसुद्धा इतरांप्रमाणे समीराकडे बघत असतो.

उद्या करूयात शौर्यला कॉल. आत्ता मी पण जाते.. झोप येतेय मला पण.. गुड नाईट.. अस बोलत सीमा पण रुमबाहेर पडते..

गुड नाईट.. सगळे एकत्रच सीमाला बोलतात..

ए गाईज तुम्ही लोक आराम करा मी आलोच.. अस बोलत वृषभ रुममधुन बाहेर पडु लागला..

राज : तु कुठे जातोयस..??

वृषभ : काम आहे रे खुप.. तुम्ही झोपा.. 

रोहन : एवढ्या रात्री काय काम आहे..??

वृषभ : उद्या पुर्ण दिवस इथे तिथे फिरण्यात जाईल ना.. विर ला प्रेझेन्टेशन बनवुन द्यायचय मला.. आत्ताच बनवुन त्याला पाठवुन ठेवतो मग उद्या परत टेन्शन नको.

रोहन : मी मदत करू...??

वृषभ : मला आवडलं असत तुझी मदत घ्यायला बट कंपनीचा पर्सनल डेटा पण आहे रे त्यात मी नाही शेअर करू शकत तुझ्यासोबत.. आणि तुम्ही सगळे झोपा बघु? माझं काम झालं की मी इथेच येऊन झोपतो.. काही लागलं तर सांगा मी हॉलमध्येच आहे.. ओके .

राज : हम्मम.. जास्त जागरण नको करुस लवकर ये..

वृषभ : हो रे.. तु झोप.. गुड नाईट गाईज.. 

रूमची लाईट बंद करतच तो हॉलमध्ये येऊन बसतो..

बेगेतुन लॅपटॉप काढत आपलं काम करू लागतो.. कामाच्या नादात त्याला त्याच्या मोबाईलची आठवणच येत नाही.. काम पुर्ण व्हायला त्याला काल सारखेच 3 वाजुन जातात.. नेहमी प्रमाणे विराजला मॅल सेंट करून आपला लॅपटॉप बंद करत बाहेर हॉलमध्येच तो झोपतो.. डोळे इतके थकले असतात की पडल्या पडल्या त्याला झोपही लागते.

दुसऱ्या दिवशी सकाळी बाकीची मित्रमंडळी तैयार होऊन बाहेर येऊन हॉलमध्ये बसतात.. वृषभची आई सगळ्यांना चहा नाश्ता देत असते.. वृषभची झोपमोड नको म्हणुन सगळे शांतपणे आपापला चहा नाश्ता करत असतात.. समीरा आत्ता वृषभकडे जास्तच आकर्षित होत असते.. झोपलेल्या वृषभकडे मनभरून बघतच रहावं अस तीच झालं असत.  नाश्ता करताना ती अधुनमधुन त्याच्यावर आपली नजर फिरवत असते.. 

रोहनची आत्ता मात्र खात्री झाली असते की समीरा आणि वृषभच काही तरी नक्कीच चालू आहे..

ए वृश्या फोन वाजतोय बघ तुझा.. उठ बघु.. 9 वाजुन गेलेत.. हातात वाजणारा फोन वृषभ जवळ नेतच त्याची ताई त्याला बोलते..

कुणाचा फोन आहे?? वृषभ आपले डोळे न उघडताच तिला विचारतो..

ताई : नंबर सेव्ह नाही.. उठ बघु तु.. हॉस्पिटलमध्ये जायचय नव्ह??

अननॉन नंबर असतो.. वृषभ तसाच सोफ्यावर झोपुन डोळे मिटुन फोन उचलतो..

वृषभ : हॅलो

हॅलो वृषभ... समोरून ऐकु येणारा आवाज ऐकुन वृषभची डोळ्यांवरची झोपच उडते..

पिऊ तु... उठुन बसतच तो बोलतो..

पिऊ : माझ्या दादाचे फोन का नाही उचलत तु.. भांडलेत का तुम्ही दोघ??

वृषभ : आर्यन मला फोन करत होता..??

पिऊ : मम्मीने त्याला फोन लावायला सांगितलं..  किती फोन करत होतो आम्ही तुला.. तुला घरी पोहचलो म्हणुन सांगता नाही येत का.. मम्मीला काळजी वाटते तुझी माहिती ना..??

वृषभ : सॉरी.. बट तुला माझा नंबर कुठून भेटला..??

पिऊ : कुठुन म्हणजे...?? दादा कडुन घेतला. तो नुकताच अंघोळीला गेलाय.. तो पण खुप भडकलाय तुझ्यावर.. मम्मीला वाटलं तुझं आणि त्याच भांडण झालंय म्हणुन तु त्याचे फोन नाही उचलत.. मम्मी आहे इथे माझ्या सोबत एक मिनिट तु तिच्याशीच बोल.. आणि थोडा ओरडा सुद्धा खा.. 

आर्यनची आई : काय मग वृषभ?? लगेच विसरून जायच का अस..??

वृषभ : सॉरी ना काकु.. फोन माझ्या भाच्याकडे होता.. आत्ता ताईने आणुन दिला मला.. मी घरी आल्या आल्या फोन काढुन घेतला त्याने.. 

आर्यनची आई : तरी सुद्धा.. एक फोन करून तु मला सांगु शकत होतास ना. किती वेळ लागणार होता.. दिल्लीला पोहचलो ते पण नाही कळवलं तु.. तुला जाता जाता सांगितलेलं ना मी मला फोन करून कळव. दुपारपर्यंत तुझा फोन आला नाही म्हणुन मग आर्यनला फोन लावायला सांगितलं बट तुझा फोन स्विच ऑफ येत होता.. 

वृषभ : ते मी फ्लाईटमध्ये होतो.. पण काकु खरच सॉरी.. परत अस नाही होणार..

आर्यनची आई : बर.. बर.. कधी पोहचलास घरी??

वृषभ : संध्याकाळी 6 वाजता.. 

आर्यनची आई : आई पप्पा आहेत बरे??

वृषभ : पप्पांना बर नाही थोडं. आत्ता त्यांना मी डॉक्टरकडे नेणारच आहे.. बाकी सगळे बरे आहेत..

आर्यनची आई : बर.. जस सांभाळुन गेलास तस सांभाळुन ये.. काही लागलं की सांग. तस तु कोणाच काही घेत नाहीस हे माहिती तरीही सांगते.

वृषभ : तुमच्याकडे हक्काने मागेल.. तुम्ही तुमची काळजी घ्या.. आर्यनला सॉरी म्हणुन सांगा.. तस मी करतो मग त्याला फोन..

आर्यनची आई : बर त्याला सांगते मी. ठेवु मी फोन..??

वृषभ : हम्मम.. बाय..

वृषभ फोन कट करताच आलेला नंबर पिऊच्या नावाने सेव्ह करतो... 

तुम्ही लोक उठले सुद्धा.. आपल्या मित्र मंडळींकडे बघतच तो बोलतो..

रोहन : हो..

समीरा : गुड मॉर्निंग..

वृषभ : वेरी गुड मॉर्निंग.. मी फ्रेश होतो.. तुम्ही फिरून या मस्त पैकी..

समीरा : तु पण आला असतास तर मज्जा आली असती..

वृषभ : संध्याकाळी येतो.. आत्ता खरच बिजी आहे मी. पप्पांना डॉक्टरकडे न्यायचय ग. तुमचा नाश्ता पाणी झाला??

टॉनी : हो.. तुझी आई खरच सुग्रण आहे.. कालच जेवण तर लाजवाब होतच आणि हे पोहे तर एकदम भारी झाले होते..

राज : तेव्हाच तुला हॉस्टेलच जेवण आवडत नव्हतं ना.. नेहमी नाव ठेवुन जेवायचास..

वृषभ : हम्मम..

राज : मुंबईत काय करतोस मग..??

वृषभ : आर्यनची मम्मी पण छानच जेवण बनवतेरे.. तुम्ही जेवलात ना तिच्या हातच..

रोहन : जेवण तर छान बनवते पण स्वभावाने पण खुप छान आहे ती आणि त्याचे पप्पा सुद्धा.

तोच वरद आपले डोळे चोळत आपल्या आईला आवाज देत जिने उतरत खाली येतो..

वृषभ : ओहह वरद राव कुणीकड?? 

(वृषभचा आवाज ऐकत वरद डोळे चोळतच आपल्या मामाजवळ येत त्याच्या मांडीवर झोपतो..)

बस कर कि मर्दा अजुन किती झोपायलास.. रात्रभर मोबाईलमध्येच होतास वाटत..

वरदच लक्ष परत वृषभच्या मोबाईलवर जात.. लगेच डोळ्यांवरची झोप उडवत तो त्याचा मोबाईल घेतो..

वृषभ : चार्जिंग न्हाई त्यात.. सोड बघु माझा मोबाईल.. 

वरद : थोला वेल..

वृषभ : अजिबात नाही हा. तुझा थोडा वेळ माहिती मला.. सोड बघु..

रोहन : हा बोलतो भारी ना.. थोला वेल..

रोहन वरदची एकटिंग करत बोलताच सगळे वरदला हसु लागतात..

वृषभ : ए ताई.. ह्या टिंग्याकडे बघ ग जरा..

(आपल्या बहिणीला मोठ्याने आवाज देतच वृषभ बोलतो)

सीमा : लहान मुलांना मोबाईलच खुपच वेड असतना..

राज : हो ना तुझ्याकडे बघुन कळलं ते आम्हांला..

सीमा : मी काही बोलली की ह्याला बोलायचंच असत..

टॉनी : खर तेच बोललाय ना तो.. आल्यापासुन नुसतं मोबाईल मध्येच आहेस तु.. त्याला वाटलं असेल तु स्वतः बद्दल बोलतेस म्हणुन तो बोलला ग..

सीमा : टॉनी तु राजची बाजु घेऊन माझ्यासोबत भांडणार आय नॉ देट शेवटी लाडकी गर्लफ्रेंड आहे यार ती तुझी.. आय अंडरस्टॅन्ड युअर फिलींग..

सीमा अस बोलताच सगळे हसु लागतात..

रोहन : सीमा हे मात्र तु खर बोललीस..

वृषभ : राज तुला कस रे करमत टॉनी शिवाय?? मला तर ह्या दोघांच्या फ्युचरच टेन्शन आहे. टॉनीच लग्न झालं तर आपला राज सन्यासच घेईल.. हो ना राज..??

राज : वो तो वक्त ही बतायगा मेरे दोस्त.. टॉनीच्या लग्नाच सोड तु कधी लग्न करतोस मिनाक्षी सोबत ते सांग..

वृषभ : ए मॅड हळु बोल ना.. आपण माझ्या घरी आहोत यार.. खरोखरची मिनाक्षी तुझ्यासमोर येऊन प्रकट होईल..

टॉनी : ओहह हो.. मिनाक्षीला इकडचा एड्रेस पण दिलास तु?

वृषभ : परत तेच.. 

टॉनी : जस तु राजच टेन्शन घेतलंस तस मला तुझं टेन्शन आलंय रे.

राज : कधी प्रपॉज करतोस मग तु मिनाक्षीला??

वृषभ : ए गाईज प्लिज... सारख काय मिनाक्षी - मिनाक्षी लावलंय?? 

ताई : काय झालं?? आवाज का द्यायलास??

वृषभ : मोबाईल सोडे ना बघ.. त्याच्याकडुन मोबाईल घे नि चार्जिंगला लाव तुझं तु..

अरे माझा टिंग्या उठला का तो.. चल बघु अंघोळीला.. वृषभची ताई वरदला वृषभच्या मांडीवरून उचलुन घेतच बोलते..

राज : वृषभ मिनाक्षीचा फोन येतो का रे तुला??

(राज वृषभला चिडवतच बोलला..)

वृषभची ताई लगेच राजकडे बघु लागते.. 

ताई : वृश्या अजुन कोणती रे मिनाक्षी??

समीरा : तुम्हीपण मिनाक्षीला ओळखता?

ताई : म्हणजे??

वृषभ : ए ताई तु चल बघु इथून.. कुठे ह्या लोकांच्या नादी लागायलीस..

वृषभ आपल्या ताईला जबरदस्ती आत घेऊन जाऊ लागला..

राज : ए वृषभ आत्ता का?? मला चिडवताना मज्जा येत होती.. आत्ता थांब..

वृषभ : राज तुला ना कुठे मस्ती करायची ते कळतच नाही यार.. 

टॉनी : मग तु शिकव ना त्याला..

ताई : काय चालू आहे तूमच.. कळेल का मला..

सीमा : तुम्ही मिनाक्षीला ओळखता..?

सीमा त्याच्या बहिणीच्या पुढ्यात जातच तिला विचारते.... 

वृषभ : सीमा तु पण..??

ओळखते ना.. वृषभकडे बघतच ती बोलते.. वृषभ जास्त काही न बोलता तिथुन गप्प आत निघुन जातो..

समीरा : वृषभने तुम्हांला सांगितलं??

ताई : काय??

टॉनी : मिनाक्षी बद्दल.. 

ताई : कोणत्या मिनाक्षीबद्दल बोलताय तुम्ही लोक??

रोहन : तुम्ही कोणत्या मिनाक्षी बद्दल बोलताय??

ताई : माझंच नाव मिनाक्षी आहे..

सगळेच आत्ता एकमेकांकडे बघु लागले..

ताई : तुम्ही कोणत्या मिनाक्षी बद्दल बोलत होते??

रोहन : आमच्या कॉलेजमध्ये होती एक.. तिच्याबद्दल.. आत्ता कॉन्टॅक्ट मध्ये नाही ना.. आम्ही वृषभला तेच विचारत होतो की ती त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का..

ताई : बर.. तुम्हांला काही हवं आहे का??

रोहन : नाही आम्ही फिरून येतो..

ताई : सांभाळुन जावा.. आणि जास्त लांब जावु नका..

हो.. अस बोलत सगळेच घराबाहेर पडले..

घराबाहेर पडताच सगळे संशयी नजरेने रोहनकडे बघु लागतात..

रोहन : काय झालं तुम्ही सगळे माझ्याकडे अस का बघताय..??

राज : नक्की विर च्या ऑफीसमध्ये मिनाक्षी आहे ना??

रोहन : सॅम नावाच्या दोन मुली नसु शकतात का??

राज : ते पण आहे.. बट मग तो अस घाबरून का पळाला.?

रोहन : त्याच्या घरी असलं काही चालत नसेल मे बी.. आणि तुम्ही दोघ त्यात अति करत होते..

राज : मस्ती करत होतो रे..

रोहन : बट आपण त्याच्या घरी आहोत हे कळायला पाहिजे ना तुम्हांला..

राज : हम्मम..

टॉनी : बट तेवढी मस्ती चालते रे..

रोहन : एकदा जाऊयात रायपूरला.. तुझ्या घरी करून बघुयात अशी मस्ती..

राज : रोहन तु आत्ता खुपच जास्त मस्ती करतोयस... कुल डाऊन मॅन..

राज हसतच टॉनीला टाळी देतच बोलतो..)

रोहन : बघ ह्यात पण मस्ती तुमची..

समीरा : रोहन का एवढं भडकतोस. इट्स ओके ना.. मस्त पैकी कोल्हापुर बघून घे.. तस पण तुला बघायच होत ना..

रोहन : हम्मम..

सगळे एकमेकांसोबत मज्जा मस्ती करत कोल्हापूर फिरत असतात..

इथे विराज आणि अनघा वृषभचाच विचार करत असतात.. अकरा वाजुन गेले तरी वृषभचा फोन आलेला नसतो त्यांना..

अनघा : विराज मला पण आत्ता असच वाटतंय जस तुला वाटत होतं..

विराज : रात्री 3.13 ला त्याचा मॅल आलाय मला.. मॅल केला म्हणजे मी जे PPT त्याला बनवायला सांगितलेले ते त्याने बनवुन दिल मला.. बट कॉल का नाही उचलत हा मुलगा..??

अनघा : मलाच नाही कळत आत्ता..??

विराज : मी एकदा परत फोन लावुन बघु का??

अनघा : हम्मम्म..

इथे आपल्या वडिलांना डॉक्टरकडे दाखवुन आणुन वृषभ आपल्या बहिणी सोबत एका रूममध्ये बसला असतो.. वृषभची बहिण त्याच्यासोबत बोलत असते.. पण वृषभ शांत बसुन असतो.

ताई : पुढे काय करायच ठरवलंस तु??

वृषभ : टिंग्या फोन दे बघु इकडे.. काल पासुन कोणाचे फोन येऊन गेले असतील ते मी बघितल पण नाही..

ताई : वृश्या मी काही तरी विचारतेय.. शिकणार की नाही ते तरी सांग..

(आणि नेमकं वृषभच्या मोबाईलवर विराजचा फोन येतो.. गेम खेळता खेळता वरदकडुन उचलला जातो.. विराज तिथुन हॅलो हॅलो करत असतो)

वृषभ : टिंग्या फोन दे बघु इकडे.. कितीनंद तेच तेच सांगु मी तुला.??

वृषभची ताई पण आत्ता रागातच उठुन वरदच्या पाठीत एक धपाटा घालते.. दुसरा धपाटा घालणार तोच वृषभ पटकन त्याच्याजवळ जात त्याला उचलुन आपल्या जवळ घेतो.

वृषभ : ए ताई माझा राग त्यावर का काढायलीस.. लहान आहे ग तो.. टिंग्या काल पासुन माझा मोबाईल घेऊन बसलायस तु.. जास्त मोबाईल बरा नाही डोळे खराब होतील तुझे आणि मोठ्यांच ऐकत जा.. कधीच मोबाईल मागतोय मी तुझ्याकडे..

(आपला मोबाईल बाजुला ठेवत वरदचे डोळे पुसतच तो त्याला बोलतो.. मोबाईल उलटा ठेवल्यामुळे विराजचा फोन चालु आहे हे वृषभला कळत नाही..)

ताई : वृश्या आत्ता मोबाईल पण भेटला तुला मग सांग मला पुढे काय करायचं ठरवलंयस ते..

वृषभ शांत बसुन असतो..

(इथे अनघा विराजला काय झालं म्हणुन विचारते..

फोन उचललाय ग. पण बहुतेक त्याला माहिती नाही की फोन चालु आहे.. अस बोलत विराज फोन स्पिकरवर टाकतो)

ताई : वृश्या शिक्षणाच काय ठरवलंय तु ते सांग बघु मला.. आत्ता कितीनंद तेच तेच विचारू मी.. हॉस्पिटलमधुन आल्यापासन एकच प्रश्न करते मी तुला..

(अनघा आत्ता विराजच्या फोन जवळ येत ऐकु लागते)

वृषभ : पैसे कुठुन आणून मी?? दिड लाख फी आहे ग MBA ची..

ताई : दुसर शिक की मग.. जे आपल्याला परवडेल अस..

वृषभ : हम्मम बघु..

ताई : अस काय करायलायस.. ??

वृषभ : मी कंटाळुन गेलोय ग. मला मुंबईत गमेनास होतय.. आई पप्पांना सोडून तिथ एकट कस जगालोय माझं मला माहिती.  त्यात तु आणि आईने कर्ज काढुन माझ्या डोक्याला नसता ताप देऊन ठेवलिसा. मला ही जिंदगी नकोशी झालीय.. माझा जीव पण जाईनासा झालाय..

(वृषभच अस बोलणं ऐकुन अनघा तोंडावर हात ठेवत विराजकडे बघु लागते)

वृश्या.. त्याची बहीण जोरातच त्याच्या गालावर मारते..

ताई : काय बोलायलायस अस.. आम्ही कस जगु तुझ्याशिवाय??

वृषभ : काय करू मी?? 17 लाख?? कसे फेडू ग मी..? शिक्षणात पैसे टाकले तर त्या पाटलाचा चेहरा दिसतोय. त्याच्याकडुन कर्ज घेतले ते आठवतय. पप्पांच औषध पाणी त्याचा खर्च, आईला वरच्यावर आजारपण असत त्याचा खर्च.. आणि शिक्षण सोडायच म्हटलं तर पप्पांचा चेहरा दिसायलाय त्यांच स्वप्न पुर्ण करायचीयत. काय करू मी..?? कुठ कुठ पुर पडू?? कर्ज, कर्ज नि नुसतं कर्ज.. ताई तु शिकली आहिस तरी अस वेड्यासारखी वागली.. एक फोन करून बोलु शकली असती ना अस काही झालंय. 10% म्हणजे झाल काय?? आईच सोड.. तिला नाही कळणार केल्क्युलेशन.. पण तु.. महिन्याला 10000 कस फेडणार होतो आपण??

ताई : वृश्या.. परिस्थिती हाताबाहेर जात होती रे.. पप्पांचा जीव बघु की तु आत्ता बोलायलायस तस केल्क्युलेशन करू मी.. गरज लागली कि कोण पैसा देत नाही.. जे देत होत ते टक्केवारी शिवाय बोलत नव्हते.. आणि तु टेन्शन घेशील ना म्हणुन नाही बोललो रे.. 

वृषभ : आत्ता नाही का घेत मी टेन्शन?? रात्रीची कधी कधी झोप पण नाही लागत मला.. मी कामावर असतो तेव्हा थोडं टेन्शन फ्री वाटत मला.. घरी आलो की परत केल्क्युलेशन दिसू लागत.. आणि माझं शिक्षण नाही होणार अस मला वाटालय. मला फोर्स नको करुस.. नंतर थोडं सेटल झालो की माझं मीन बघतो.. 

ताई : तिथे मुंबईत राहून नसती उद्योग नको करुस.. इथे आम्ही तुझ्यासाठी जगालोय लक्ष्यात ठेव जरा.. 

वृषभ दोन्ही हात डोक्याला लावुन डोकं धरून शांत बसुन असतो..

वृषभ : दाजींचे किती पैसे द्यायचेत??

ताई : तुला कोण बोललं??

वृषभ : कोणी तरी बोललं.. तु किती द्यायचेत ते सांग??

ताई : त्यांचे द्यायचे राहू दे.. ते माझं मीन बघतो..

वृषभ : ताई दाजींचे किती पैसे द्यायचेत..?(वृषभ थोडं मोठ्यानेच बोलतो)

ताई : दिड लाख.. 

(वृषभ एक टक आपल्या ताईकडे बघत रहातो)

वृषभ : ए ताई.. तुम्ही लोक खरच माझा जीव घेऊन टाका यार.. 

ताई :  तुझ्या दाजींनी पैसे मगितलेत का तुझ्याकडे?? 

वृषभ : मागेपर्यंत वाट बघत बसु का मी??

ताई : हे बघ.. आत्ता जॉब आहे तुझ्याकडे.. हळुहळु सगळं नीट होईल.. दोन तीन महिने जाऊ दे..

वृषभ : हममम..

(विराज जास्त पुढे काही न ऐकता फोन कट करून टाकतो.. मोबाईल तसाच बेडवर ठेवत तो डोक्याला हात लावुन वृषभचा विचार करू लागतो..)

विराज : खुप टेन्शन आहे ग ह्याला.. म्हणुन तो समीराला बोलला असेल..

अनघा : मंडेला तो जेव्हा कामावर येईल तेव्हा आपण त्याच्यासोबत बोलुच.. आणि अजुन एक जर त्याला श्री सोबत काम करायचं असेल तर प्लिज त्याला जाऊ दे.. त्याच्यावर भडकु नकोस..

विराज : बट मी त्याला तो मागेल तेवढा पेयमेंट द्यायला तैयार आहे अनु.. He is real Gems for our company.. I don't want to loss him. 

अनघा : आपण त्याला ठरवु दे त्याला काय करायचं ते.. प्लिज.. हा एक आठवडा त्याच वागणं बघुयात.. श्री सुद्धा त्याला चांगली ऑफर देईलच.. यु नॉ श्री व्हेरी व्हेल.. जिंकण्यासाठी तो काहीही करू शकतो.. आणि ह्याचा आपल्यालाच फायदा आहे विराज.. आपल्याला वृषभची लॉयलीटी कळेल.. 

विराज : आणि तो लॉयल नाही निघाला तर??

अनघा : मग आपली कंपनी आपण डिसलोयल पर्सन पासुन वाचवली ह्याच समाधान आपल्याला मिळेल.. आणि तो जर लॉयल निघाला, त्याने श्री ने त्याला दिलेली ऑफर एक्सेप्ट न करता आपल्यासोबतच काम करायचं ठरवलं तर आपण त्याच्यासाठी खुप आधीपासून प्लॅन केलेलं गिफ्ट त्याला देऊ जेणे करून त्याचे सगळे प्रॉब्लेम सोल्व्ह होतील.. ह्यात दोन्ही बाजुने वृषभचाच फायदा असणार आहे.. श्री पण त्याला जास्त पेयमेंट देऊन ऑफर करेल.. जेणेकरून तो त्याच्या कंपनीकडे एट्रेक्ट होईल. जेवढं पेयमेंट जास्त तेवढं तो सगळं कर्जसुद्धा लवकर फेडु शकतो.. जर त्याने आपल्या सोबत काम करायचं ठरवलं मग आपण देणाऱ्या सरप्राईज गिफ्ट ने त्याच्या संपुर्ण लाईफचे प्रॉब्लेम सोल्व्ह होतील..

विराज : त्याच मगासच बोलणं ऐकुन मलाच कसतरी वाटतंय आत्ता.. एवढं सगळं कस सहन करत असेल ग तो.. 

अनघा : हेच सॅम वाक्य तो तुझा पास्ट ऐकल्यावर बोलला होता.. प्रत्येकाच असत रे काही ना काही.. आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव.. वृषभला कळता कामा नये आपल्याला त्याच्याबद्दल काही कळालं आहे आणि आपण त्याच बोलणं ऐकलं आहे..

विराज : हम्मम...

तोच वृषभचा फोन विराजला येतो..

विराज : त्याचाच फोन आहे.. 

अनघा : उचल बट समीराला तो जे काही बोलला ते आपल्याला कळलं हे त्याला कळु देऊ नकोस.

हम्मम.. अस बोलत विराज वृषभचा फोन उचलतो..

विराज : अरे वृषभ आहेस कुठे?? काल पासून फोन लावतोय मी तुला.. कामाच्या बाबतीत काही सिरीयसनेस पणा आहे का नाही तुला.?? मी तुला बोललो होतो ना मी फोन करत जाईल मग एवढं निष्काळजी पणाने कस वागतोयस तु??

वृषभ : विर सॉरी.. माझा भाचा लहान आहे रे. तो फोन घेऊन गेलेला.. मला नाही माहिती पडलं तुम्ही लोक फोन करत होते ते.. मी काल पासुन जस्ट आत्ता मोबाईल हातात घेतलाय.. तुझा फोन आलेला हे दिसलं म्हणुन लगेच तुला फोन केला मी.. 

विराज : घरी सगळं ठिक आहेना..??

वृषभ : हो सगळं ठिक आहे.. तुला मी PPT सेंट केली तु बघितलस??

विराज : ते सगळं बघितलं.. बट तु एवढ्या रात्रीच काम का करतोस..??

वृषभ : काल तेव्हाच वेळ मिळाला मला.. तुझं अजुन काही काम आहे का माझ्याकडे?? असेल तर सांग..

विराज : तु फोन उचलत नव्हतास मग मी निखिल आणि रियाला सांगितल.. इव्हन तु रात्रभर जागुन जे PPT बनवलयस त्याचा काहीही युज नाही.. तु फोन उचलत नव्हतास मला वाटलं आज PPT मिळणार नाही म्हणुन मी ते ही निखिलला सांगितलं.. त्याने मला बनवुन दिल.. त्याने बनवलेल PPT माझा चॅक पण करून झालाय.. आणि ह्यापुढे महत्वाची काम सुद्धा मी त्यालाच सांगत जाईल.. कारण मला अस वाटतंय की तुला अस वाटत असेल मी तुला खुप काम देतो.. 

वृषभ : तु अस का बोलायलायस.. आय मिन अस का बोलतोयस.. मला कधीच अस काही नाही वाटलं की तु मला जास्त काम देतोस... उलट तु दिलेलं काम करायला मला खुप आवडत.. आणि मी तु दिलेलं काम एन्जॉय करत करतो.. तु मध्यरात्री जरी मला फोन करून काम दिलंस तरी मी आवडीने करेल.. 

विराज : नक्की ना?

वृषभ : नक्की ना म्हणजे?? 

विराज : मी काल सकाळी तुला फोन करून कामातील सिरीयसनेस पणा समजवुन सांगितला होता.. सांगितला होता की नाही??

वृषभ : हम्मम..

विराज : मग काल दिवसभरात तु तुझा सिरियसनेस पणा मला नाही दाखवलास.. तु समोरून फोन करून सुद्धा मला विचारलं नाहीस की अजुन काही हवं आहे का?? आय नॉ यु आर बिजी इन युअर फॅमिली बट जॉब पण तुझी प्रयोरिटी आहे ना??  नेहमी अस नसत इथे बट मंडेला खरच इंपोर्टन्ट मिटिंग होणार आहे म्हणुन मी तुला काल फोन करत होतो..

वृषभ : आय एम सॉरी..

विराज : डोन्ट से सॉरी.. इट्स ओके.. बट नेक्स्ट टाईम मी काळजी घेईल त्याबाबत.. यु एन्जॉय युअर विकेंड.. राईट नाव्ह आय एम सिरियसली बिजी.. इतर स्टाफ सोबत मी कॉ-ओरडीनेट करून माझं काम करून घेतोय.. 

वृषभ : मला पण सांग काम मी आत्ता लगेच करून देतो तुला.. तु बोलशील तस.

विराज : नाही नको.. मला रिस्क नाही घ्यायची आत्ता.. काम देईल पण नंतर परत तु फोन उचलणार नाहीस.. पुन्हा मग मला ह्याला त्याला काम द्यावं लागेल..

वृषभ : आत्ता अस नाही होणार.. आय प्रॉमिज यु..

विराज : नक्की??

वृषभ : हो नक्की..

विराज : मंडेला किती वाजता येतोयस इथे??  किती वाजताची फ्लाईट आहे तुझी??

वृषभ : सॉरी.. ते तिकीट बुक नाही केली मी अजुन.. 

विराज : वृषभ तु आत्ता सिरियसली राहू दे.. मी तुझ्यावर कोणतीही मोठी जिम्मेदारी नाही टाकु शकत.. बाय..

वृषभ : विर मला वेळ नाही मिळाला रे.. प्लिज ट्राय टु अंडरस्टॅन्ड.. मी रात्री बुक करतो तिकीट नि तुला सांगतो.. 

विराज : बघ कस ते.. बट मला तुझ्या बाबतीत अजुन रिस्क नाही घ्यायची.. हवी तर मंडेला पण सुट्टी घेऊ शकतोस तु.. नाव्ह आय डोन्ट हेव्ह एनी प्रॉब्लेम.. ओके.. बाय.. एन्जॉय युअर विकेंड... राईट नाव्ह आय एम टु मच बिजी..

वृषभ : विर प्लिज..

विराज वृषभच काहीही बोलणं न ऐकता फोन कट करून टाकतो..

अनघा : जास्तच ओव्हर एकटिंग केली अस तुला नाही का वाटत?? किती रुडली बोललास तु त्याच्याशी. आधीच तो खुप टेन्शनमध्ये आहे तु ऐकलस ना मगाशी त्याच बोलणं.. आपल्या बहिणीसोबत तो बोलत होता ते..

विराज : अनु मला त्याच्यासोबत अस वागताना खुप वाईट वाटतंय.. बट माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही.. मी मुद्दामुन त्याला माझा राग यावा अस वागलो.. रागाच्या भरात तो श्री त्याला जी ऑफर देतो ती एक्सेप्ट करतो का ते बघुयात.. नंतर मी त्याच्यासोबत बोलुन करेल मॅनेज.. डोन्ट वरी.. मला काळजी आहे त्याची.. जर त्याने तो लॉयल आहे हे मला प्रुफ करून दाखवलं ना मग बघ मी त्याच्यासाठी काय करतो ते.. ते ही त्याचा इगॉ हर्ट न करता... बट त्याने ह्या एक्झाम मध्ये मला फक्त पास होऊन दाखवायला हवं..

मंडेला जाऊन विराजसोबत शांत पणे बोलुन त्याला समजवुया असा विचार मनात करत वृषभ आपल्या मित्रमंडळींसोबत तिकीट कशी बुक करायची त्याबद्दल डिस्कस करत असतो...

राज : तिकीट आमच आम्ही करतो बुक..

टॉनी : हो न.. तु नको टेन्शन घेऊस..

वृषभ : समीरा आपल्या दोघांच मी करतो.. फस्ट फ्लाईटने जाऊयात मुंबईला..

(वृषभ अस बोलताच रोहन त्याच्याकडे बघु लागतो)

समीरा : हम्म तु बोलशील तस..

वृषभ : ओके.. 

वृषभ लगेच आपल्या मोबाईलमध्ये समीरा आणि त्याच तिकिट बुक करतो.. समीरा तो तिकीट बुक करेपर्यंत त्याच्या बाजुला बसून असते. वृषभ तिच्याशी बोलतच दोघांच तिकीट बुक करत असतो..

वृषभची आई सगळ्यांना जेवणासाठी आवाज देत असते..

जेवुन होताच वृषभ आपल्या वडिलांच्या रूममध्ये जाऊन बसतो..

पप्पा : मुंबईत कधी जायच म्हणतोस??

वृषभ : सोमवारी सकाळी 7 ची फ्लाईट आहे.. परत येईल मी सुट्टी काढुन.. प्रोबेशन पिरियडवर आहे ना.. तुम्हांसनी माहिती सुट्टी नाही..

पप्पा : दाजींच कर्ज फेडशील नव्ह..??

वृषभ : सगळ्यांच फेडतो.. तुम्ही टेन्शन नका घेऊ.. तुम्ही बरे व्हा..

पप्पा : ताईला विचारलस किती घेतलेत त्यांच्याकडून ते??

वृषभ : हम्मम.. जास्त नाहीत घ्यायला..

पप्पा : किती घेतलेत??

वृषभ : 50 हजारच.. पुढचा पगार आला की अर्धे देऊन टाकतो.. नंतरच्या पगाराला अर्धे देतो.. तुम्ही टेन्शन नका ना घेऊ.. आय विल मॅनेज..

पप्पा : बर.. पुढे MBA तरी कर..

वृषभ : ते माझं मीन शिकेल काय शिकायचं ते.. तुम्ही तुमची काळजी घ्या.. 

पप्पा : मुंबईत गमतय??

वृषभ : तुम्ही सोबत नाही तर कस गमल.. तुम्हांसनी इथुन घेऊन जाईल मी तिथे.. थोडे महिने एडजस्ट करा.. 

तु खुप मोठा हो. तुला खुप मोठ झालेलं बघायचंय.. वृषभचे पप्पा प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत बोलतात.. वृषभ त्यांच्या मांडीवर डोकं ठेवुन झोपतो.. थोड्या वेळात त्याची आई पण तिथे.. खुप महिन्यांनी आपल्या आई वडिलांसोबत मनसोक्त गप्पा मारत तो त्यांच्या रूममध्येच बसतो..

संध्याकाळी 4 च्या सुमारास सगळे कोल्हापुर फिरायला जातात..

कोल्हापूर मधील प्रसिद्ध अस महालक्ष्मी मंदिर फिरून सगळे रंकाळा लेक जवळ येऊन बसतात..

रोहन : हा लेक एकदम भारी आहे ना.

वृषभ : आमच्या कोल्हापुरातील प्रसिद्ध असा लेक आहे हा.. रंकाळा चौपाटी पण म्हणतात ह्याला.. छत्रपती शाहु महाराजांनी ह्या तलावाच बांधकाम केलंय..

राज : ए वृषभ हिस्ट्री क्लास चालु नको रे करुस.. 

सीमा : तुला नाही ऐकायचं तर शांत बस ना..

समीरा : वृषभ तु सांग बघु..

वृषभ सगळ्यांना रंकाळा तलाव व त्याच्या बाजुला असलेल्या शालिनी पॅलेसचा इतिहास सांगु लागला..

सगळे तलावाजवळ बसुन वृषभ जे सांगत होता ते शांत पणे ऐकु लागले.. अचानक खिश्यात असणारा त्याचा फोन वाजु लागला.. मोबाईल बाहेर काढुन बघतो तर शौर्यचा फोन असतो..

वृषभ : आपण शौर्यला फोन करायला विसरलो.. हे बघा त्याचाच फोन आहे..

रोहन : उचल मग.

वृषभ : ऑडिओ कॉल आहे रे.. 

अस बोलत वृषभ फोन कट करून त्याला व्हिडीओ कॉल लावतो..

आहेस कुठे तु?? काल पासुन फोन लावतोय तुला... वृषभचा फोन उचलल्या उचलल्या शौर्य त्याला बोलतो..

रोहन : हॅलो शौर्य.. आम्ही सगळेच इथे आहोत..

शौर्य : अजुन दिल्लीतच आहात काय??

राज : ए मॅड तुला आमच्या पाठी असलेला लेक दिसतोना??

शौर्य : हा दिसतोय ना..

रोहन : मग आम्ही दिल्लीत कस असणार.. अस काही दिल्लीत नाही रे.. आठवतय ना... ताबुला बिच वरून काय घोळ घातलेलास ते..

शौर्य : हम्मम..

वृषभ : तु ह्या टाईमला कसा काय फोन केलास??

राज : ए वृषभ जॉक का करतोयस.. मोबाईल वरून फोन केलाय त्याने..

वृषभ : राज तु केलेला जॉक खरच छान होता पण जुना झालाय तो.. नवीन काही तरी येऊ दे मित्रा.. तुझ्या तोंडुन जुने जॉक ऐकुन बॉर झालो आम्ही..

राज : आत्ता मिनाक्षी भेटली मग तुला जुन कस आवडेल मित्रा..

वृषभ रागातच एक नजर राज वर फिरवतो..

टॉनी : मिनाक्षीच नाव काढताच वृषभच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात.. सोबत त्याची नजर पण..

राज : ए टॉनी समजुन घेरे मित्रा.. पेहेला नशा पेहला  खुमार.. नया प्यार हे.. मित्रा..

वृषभ : समीरा हे सगळं तुझ्यामुळे होतय..

समीरा : मी काय केलं..? 

वृषभ : काय गरज होती ह्या लोकांना सांगायची..,

शौर्य : ए वृषभ कुल डाऊन मॅन.. 

राज : आत्ता शौर्य तु बोललास मग बघ लगेच कुल होईल हा.

वृषभ : तु ह्यांच सोड तु ह्या टाईमला कॉलेजला असतोना..??

शौर्य : आज सेटरडे आहे रे.. बाय दि वे तुम्ही लोक आहात कुठे.??

कोल्हापूर... सगळे जोरातच ओरडतात..

रोहन : वृषभच्या घरी आलोय.. 

शौर्य : अरे वाहह.. एन्जॉय...

सीमा : तुला मिस करतोय आम्ही सगळे...

शौर्य : मी पण तुम्हा सगळ्यांना मिस करतोय.. आफ्टर टु इयर्स भेटुयात परत एकदा.. असेच सगळे मिळुन आऊटिंगला जाऊयात..

रोहन : गुड आयडिया..

वृषभ : तुझं काही काम होत का??

शौर्य : काम तर होत बट यु एन्जॉय.. आपण मंडेला बोलुयात.. मी पण आत्ता बाहेर चाललोय.. फ्रेंड्स लोक आवाज देतायत मला..

रोहन : ते तर ऐकायला येतंय आम्हाला.. कुठे बाहेर चाललायस का??

शौर्य : हो रे.. आज बाईक रायडिंग करायला चाललोय आम्ही सगळे...

रोहन : तु तिथे ते पण करतोस..

शौर्य : मग काय.. मज्जा येते खुप.. 

राज : ए शौर्य तुला बाईक सोबत बॅक फ्लिप मारता येते का??

शौर्य : नाही रे मित्रा.. तु बोलतोस तर आज ट्राय करून बघतोच मी.. 

राज : नक्की ट्राय कर मग..

टॉनी : आणि आम्हाला व्हिडीओ पाठव..

शौर्य : नक्की पाठवतो..

वृषभ : ए शौर्य नको ते उद्योग नको करत बसुस तिथे..

शौर्य : हे तर मी तुला बोलणार होतो रे वृषभ.. तु मला कसलं बोलतोयस..

वृषभ : मी काय केलंय??

शौर्य : ते मंडेला बोलतो ना मी तुझ्यासोबत.. मी आत्ता खरच बिजी आहे.. गाईज बाय.. तुम्ही एन्जॉय करा सगळे..

बाय शौर्य.. समीरा सोडुन सगळेच शौर्यला बाय करतात..

राज : ए गाईज चला ना काही तरी खाऊयात..

सीमा : मला पण भुक लागलीय..

वृषभ : चला मग.. इथे जवळच चाट कॉर्नर आहे..

वृषभ सगळ्यांना घेऊन एका पाणी पुरीच्या दुकानाजवळ जातो..

वृषभ : काय काय खाणार तुम्ही..??

सगळेच त्यांना पाहिजे तशी ऑर्डर देऊ लागले..

सीमा : पाणी पुरी मस्तच आहे.. गाईज तुम्ही पण ट्राय करा..

राज : दही पुरी पण छान आहे.. तु हवं तर ट्राय कर..

समीरा : वृषभ तु पण ट्राय करणा पाणी पूरी..

आपली प्लॅट वृषभ समोर धरतच समीरा बोलते.. वृषभ तिच्या प्लॅट मधली एक पुरी ट्राय करतो..

समीरा : कशी आहे??

वृषभ : छान आहे.. म्हणजे मी आधी खुपदा खाल्लीय ग. तुम्ही लोक खावा.. मी फ्रेंड्ससोबत येतच असतो इथे..

सीमा : रोहन.. तु ह्यातली ट्राय कर..

सगळेच एकमेकांसोबत आपली डिश शेअर करत होते..

वृषभ आणि समीरा एकमेकांसोबत बोलतच खात असतात.. रोहनला आत्ता वृषभच खरच टेन्शन यायला लागलं असत.. एवढं माहिती असुन सुद्धा हा मुलगा हिच्या का प्रेमात आहे अस तो मनात विचार करत एकटक वृषभकडे बघत असतो.

वृषभ : तु अस का माझ्याकडे बघतोयस.. रगडा पॅटिस ट्राय कर..

(एक स्पुन रोहनला जबरदस्ती भरवतच तो त्याला बोलतो..)

कसा आहे??

रोहन : खुप छान..

वृषभ : थांब मी अजुन एक ऑर्डर करतो तुझ्यासाठी..

रोहन : नाही नको.. 

टॉनी : ए रोहन.. खाना.. 

रोहन : नकोय मला.

वृषभ : काही खाल्लसच नाहीस तु..

रोहन : तु मस्त एन्जॉय करत खातोयस ना.. ते बघुन माझं पोट भरल.

वृषभ : काय झालं?? अस का बोलतोयस..??

रोहन : कुठे काय?? तु असच एन्जॉय करत खा.. मला एक फोन करायचाय..

अस बोलत रोहन सगळ्यांपासुन लांब जात आपल्या फोनमध्ये काही तरी करत बसतो..

समीरा : ह्याला काय झालं अचानक??

मी बघतो त्याला.. आपली प्लॅट तिथेच ठेवत वृषभ रोहनजवळ जातो..

वृषभ : ए रोहन काय झालं तुला?

रोहन : तुझं काय चाललंय ते सांग..??

वृषभ : काय चाललंय??

रोहन : मी मुंबईवरून दिल्लीला गेलो त्या दिवसापासून एक दिवसपण असा गेला नाही की आपण एकमेकांसोबत बोललो नाही.. बरोबर??

वृषभ : हम्मम..

रोहन : मग मला एवढे दिवसात तु कधी बोलला नाहीस की तु प्रेमात पडलायस.. समीराला बर सांगायला गेलास..

वृषभ : तु त्या गोष्टीला धरून नाराज आहेस..

रोहन : तु मला का बोलला नाहीस ते सांग..??

वृषभ : रोहन ते फ्लाईटमध्ये बोलता बोलता समीराला सहज बोलुन गेलो रे मी.. 

रोहन : खरच?? असेलही.. जाऊ दे ते सोड पण तु कोणाच्या प्रेमात आहेस वृषभ?? विरच्या कामावर मिनाक्षी नावाची कोणतीच मुलगी नाही.. आम्ही नाव विचारत होतो म्हणुन तु त्या वेळेला तुझ्या ताईच नाव सांगितलंस.. 

वृषभ : तु एवढं का सिरियसली घेतोयस??

रोहन : वृषभ तुझी जी घरची परिस्थिती बघतोयना मी त्यामुळे सिरीयसली घेतोय.. तुला आणि शौर्यला फक्त मित्र नाही त्याहुन जास्त मानतो मी हे तुला पण माहितीय.. शौर्य आणि माझी जी परिस्थिती झालेली ती तुझी होऊ नये म्हणुन सिरीयस घेतोय मी.. आत्ता नीट सांगणार आहेस का तु कोणाच्या प्रेमात आहेस ते..??

वृषभ : नाही सांगु शकत..

रोहन : तुझं परत तेच.. वृषभ आत्ता एक अशी देईल हा मी तुला..

वृषभ : ए रोहन.. प्लिज ना.. मी नाही ना सांगु शकत तुला..

रोहन : का नाही सांगु शकत. 

वृषभ : बस नाही सांगु शकत.. मी कोणालाच नाही सांगु शकत..

रोहन : शौर्यलाच तुझी ही सगळी नाटकी सांगतो मी.. त्याला बरोबर सांगशील तु..

वृषभ : मी तुला बोललो ना मी कोणालाच नाही सांगू शकत तर नाही सांगू शकत.. आणि शौर्यला तर अजिबात नाही.. मी जिच्या प्रेमात आहे तिचं नाव ऐकुन तो परत मला चुकीच समजेल.. आणि तोच नाही तुम्ही सगळे.. जे जे मला मदत करत आले ते सगळेच.. सगळे म्हणजे सगळेच.. मला कोणाच्या नजरेत नाही पडायचं यार आणि मी फक्त प्रेम करतोय रे.. तिला प्रपॉज वैगेरे नाही केलंय मी आणि करणार पण नाही. वन साईड लव्ह हवं तर समज तु.. 

रोहन : तुझ जे काही चाललयंना ते बघुन मला अस नाही वाटत की तुझ वन साईड लव्ह आहे.. 

वृषभ : काय चाललंय माझं??

रोहन : एवढा भोळा चेहरा नको करुस यार.. आणि शौर्यला काय वाटेल ह्याचा खरच विचार कर..

काय चाललंय तुमचं?? समीरा सीमासोबत तिथे येतच बोलले..

रोहन : वृषभलाच विचार.. लगेच सांगेल तो तुला.. तसही सगळं सांगतो तो तुला.. हे पण सांगेल.. काय वृषभ सांगशील ना??

सीमा : तुम्ही दोघ भांडलात का??

वृषभ रोहनकडे बघतच रहातो..

रोहन तिथुन निघून राज आणि टॉनी सोबत जातो..

समीरा : वृषभ काय झालं??

वृषभ : मलाच नाही कळत आहे रोहनला काय झालंय ते..

समीरा : मग तो अस रागात का निघुन गेला??

वृषभ : नाही माहिती.. आपण घरी जाऊयात चला..

सगळे वृषभच्या घरी येतात... 

रात्रीचे 10 वाजुन गेले असतात..

सगळे एका रूममध्ये बसुन होऊन गेलेल्या आठवणी आठवत एकमेकांची मज्जा मस्ती करत असतात..

रोहन मात्र वृषभकडे एकटक बघत असतो..

वृषभला कामावरून निखिलचा फोन येतो..

येस निखिल... अस बोलत तो तिथुन उठुन बाहेर हॉलमध्ये येऊन बसतो..

जवळपास पंधरा वीस मिनिट तरी तो त्याच्याशी बोलत असतो.. त्याच्याशी बोलुन होताच तो तिथेच डोक्याला हात लावुन विचार करत बसतो..

समीरा : काय झालं??

(समीराचा आवाज ऐकताच तो विचारांच्या तंद्रीतुन बाहेर येतो)

वृषभ : काही नाही.. 

समीरा : काही टेन्शन आहे का??

(वृषभ मानेनेच नाही बोलतो.)

काय झालं सांग बघु..

वृषभ : खरच काही नाही..

समीरा : मग अस एकटा का बसलायस??

वृषभ : असच.. 

समीरा : म्हणजे नक्की काही तरी झालंय??

वृषभ : तु झोप.. रात्र खुप झालीय.. 

समीरा : तु सांगत नाहीस तोपर्यंत मी जाणार नाही..

वृषभ : तुला काल सगळं काही सांगुन तु काय केलंस हे बघितलं मी..

समीरा : वृषभ जस्ट मस्ती करतायत रे तुझी..

वृषभ : समीरा तु ना कोणतीही गोष्ट करताना विचार नाही करत ग.. तुला आवडते ती गोष्ट तु करतेस.. आपल्या वागण्याने आपण कोणाला हर्ट करतोय ह्या गोष्टीचा तु खरच विचार नाही करत..

समीरा : तु माझ्यामुळे हर्ट झाला असशील तर आय एम सॉरी.. 

वृषभ : इट्स ओके.. लगेच सॉरी बोलायची काहीही गरज नाही.. मी जस्ट सांगतोय तुला.. 

समीरा : आत्ता काय झालं सांगशील??

वृषभ : कुठे काय झालं?? काही नाही झालं.. मी असच डोकं शांत ठेवुन विचार करतोय ग.. 

समीरा : कसला??

कसला नाही.. मी झोपायला जातो.. तु पण झोप जा.. अस बोलत वृषभ तिथून जाऊ लागला..

वृषभ तु इथे बस आणि माझ्याशी बोल मला तु खरच खुप टेन्स वाटतोयस.. वृषभचा हात पकडतच ती त्याला थांबवते..

बस बघु इथे.. आणि काय झालं सांग.. त्याचा हात तसाच आपल्या हातात पकडत ती त्याला विचारते..

(खुप वेळ झाला पण वृषभ आला नाही म्हणुन रोहन त्याला बघायला हॉलमध्ये येतो.. वृषभ आणि समीरा एकमेकांचा हात हातात घेऊन बोलत बसले आहेत अस त्याला दिसत..)

वृषभ समीराच्या हातातुन आपला हात काढुन घेत तिला काही सांगायला जाणार तोच रोहन त्याला आवाज देतो..

रोहन : वृषभ तुला झोपायच नाही का? कधीची वाट बघतोय मी तुझी??

वृषभ : तु झोपला नाहीस??

रोहन : तु येतोयसना..??

समीरा : रोहन आम्ही थोडं बोलतोय रे.. 

वृषभ : समीरा तुला बोललो ना मी.. काही नाही झालंय ग.. तु जाऊन झोप बघु.. मला खरच खुप झोप येतेय ग..  आपण उद्या बोलुयात..

समीरा : ओके गुड नाईट.. गुड नाईट रोहन..

रोहन : गुड नाईट..

समीरा जाताच वृषभ खुप वेळ डोक्याला हात लावुन खाली मान घालून कसला तरी विचार करत असतो. 

रोहनच लक्ष समीरावर असत. ती तिच्या रूममध्ये जाते का हे तो बघत असतो.. ती रूममध्ये गेली हे दिसताच तो वृषभच्या समोर जाऊन बसतो..

समोर रोहन बसलाय हे कळताच वृषभ त्याला घट्ट मिठी मारून रडु लागतो..

रोहन : ए वृषभ काय झालं?? रडतोयस का अस??

वृषभ काहीच बोलत नाही तो रोहनला मिठी मारून फक्त रडत असतो..

(काय झालं असेल वृषभला अस अचानक रडायला?? पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all