अतरंगीरे एक प्रेमकथा ११०

In marathi

डायनिंग टेबलवर सगळे एकमेकांसोबत बोलत जेवणाचा आनंद घेत असतात.. विराज मात्र आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर डोकं ठेवुन दुसऱ्या हातात स्पुन पकडत जेवणाच्या ताटात एकटक बघत तसाच बसुन असतो..

काका : विराज.. जेवताना अस कपाळाला हात लावुन बसु नये रे..

अनिता : काय होतंय?? जेवावस नाही वाटत का??

विराज : हम्मम..

काका : जेवण राहू दे मग.. ज्युस तरी पी थोडं बर वाटेल...

विराज : हम्मम्म..

अनघा जेवण बनवणाऱ्या काकांना विराजसाठी ज्युस घेऊन यायला सांगते..

काकी : काही दुसर खावस वाटतंय का??

विराज नकारार्थी मान हलवतो..

आत्या : थोड तरी जेवायचंना विराज.. न जेवुन कस चालेल.. तब्येत बघ कशी झालीय तुझी..

विराज आत्याला काही बोलणार तोच शौर्यचा फोन येतो त्याला...

मोबाईल मागचा स्टॅन्ड सरळ करत विराज आपला मोबाईल डायनिंग टेबलवर ठेवतच शौर्यचा फोन उचलतो..

शौर्य : गुड मॉर्निंग ब्रो...

विराज : गुड आफ्टरनुन ब्रो..

शौर्य : जेवलास??

अनघा : शौर्य एकदम करेक्ट टायमिंगवर फोन केलायस.. जेवतच नाही हा.. तुझंच ऐकेल तो..

शौर्य : ए विर अस काय करतोयस यार तु.. लहान आहेस का?? गप्प जेव बघु. नाही तर मी आज रात्रीच्या फ्लाईटने मुंबईला येईल हा.. आणि तिथे येऊन मग जबरदस्ती भरवेल तुला..

विराज : ज्युस पितोय मी.. हे बघ.. (हातातील ग्लास शौर्यला दाखवतच विराज बोलतो)

शौर्य : ज्युस तर तुला पियावाच लागेल पण सगळं जेवुन झाल्यावर.. तो ग्लास बाजूला ठेव बघु.. 

विराज : शौर्य मला खरच नको वाटतंय रे. प्लिज जबरदस्ती नको करुस..

शौर्य : तुझी अशी नाटकी बघुन मला इथे खरच नको वाटतंय आत्ता.. मी निघतो इथुन मुंबईला यायला बघच तु.

विराज : तु अस काहीही करणार नाहीस हा..

शौर्य : तुला जे हवं ते तु करतोयस.. मला जे हवं ते मी करेल..

साक्षी : शौर्य दादा तु खरच येतोयस इथे.??

शौर्य : जे मी बोलतो ते मी डेफिनेटली करतोच.. विर नॉ मी बेटर.. साक्षी
ऊद्या भेटुच आपण..

हॅलो SD... शौर्यचे मित्रमंडळी पण विराजच्या मागे येतच शौर्यला बोलतात..

रॉबिन : आम्ही अस ऐकलं की तु मुंबईत येतोयस..

शौर्य : खर तेच ऐकलं तुम्ही.. किती नाटकी करतोय हा.. बघतायत ना तुम्ही लोक. तिथे येऊन त्याला कस भरवतो ते बघाच तुम्ही.. त्याशिवाय तो जेवणार नाही..

आर्यन : त्यासाठी इथे यायची काय गरज आहे..??

ज्योसलीन : ते पण आम्ही असताना..

आर्यन : ह्याला आपल्या स्टाईलने भरवतो आम्ही.. एकदा ह्या नैतिकला तो हॉस्पिटलमध्ये एडमीट असताना कस केलेलं आपण सॅम तसच करतो ह्याला..

आत्या : मी पण मदत करते तुम्हाला..

अनघा : मी पण..

साक्षी : आणि मी पण..

रॉबिन : बघ शौर्य.. एवढे सगळे असताना तु खास USA वरून कुठे येतोयस.. वहिनी आम्ही सगळे मिळुन ह्याला पकडतो तु भरव..

ज्योसलीन : आत्या तु फक्त मध्ये मध्ये नाक दाब त्याच..

विराज : ए ज्यो नाक काय दाब?? लहान आहे का मी?? काय चालल काय तुमच? सोडा बघु मला.. माझं मी जेवतो..

शौर्य : नक्की??

विराज : हम्मम.. उगाच ह्या लोकांना मी माफ केल अस वाटतय मला..

आर्यन : विर आम्हांला काही बोललास का??

विराज : अजिबात नाही.. जेवु मी??

शौर्य : ए विर तुला जास्त नाही ना जमत खायला.. मग इट्स ओके.. थोडासा डाळ भात खा ओके.. मग तो तुझ्या बाजूला असलेला ज्युस पी.. माझ्यासाठी एवढं तर करशीलच ना तु.. प्लिज

विराज : हम्मम..

रॉबिन : विर तुला आमची मदत हवी तर सांग.. आम्ही आहोच..

विराज : माझं मी करेल मॅनेज.. आणि थेंक्स..

विराज ताटात घेतलेला डाळ भात जबरदस्ती खाऊ लागतो..

शौर्य : काका काकी कुठेयत??

इथेच आहेत अस बोलत अनघा मोबाईल काकाच्या दिशेने फिरवते..

काका : काय मग?? काय चाललंय तिथे??

शौर्य : GYM मध्ये आलोय रे.. तु माझं सोड.. एवढ्या वर्षांनी परत तुझ्या स्वतःच्या घरी येऊन तुला कस वाटतंय ते सांग..

काका : कस वाटणार?? दादाची आठवण येतेय खुप.. तो इथेच आपल्यामध्ये वावरतोय अस वाटतय मला.. सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यांसमोर येतायत.. त्यात तु एवढ्या लांब.. तुला खुप मिस करतोय..

शौर्य : तु बोलतोस तर तुझ्यासाठी लगेच येतो मी तिथे.. तस पण तुम्हां सगळ्यांना एकत्र बघुन मला तिथेच यावस वाटतयरे.

काका : शौर्य तु तुझं शिक्षण पुर्ण करूनच इथे यायच.. आणि विराजची काळजी जरा पण करू नकोस.. मी आहे इथे त्याची काळजी घ्यायला..

शौर्य : हम्मम.. काकी कुठेय??

काकी : USA गेलायास खर पण एक दिवस पण काका शिवाय करमत नाही ना तुला..

शौर्य : मग काय?? एकतर एवढ्या वर्षांनी भेटलाय मला. जर अस फोन वैगेरे केला नाही तर परत विसरून वैगेरे जायचा मला.. म्हणुन रोज त्याला आठवण करून द्यायला फोन करत असतो मी..

काका : शौर्य मी तेव्हाही नव्हतो रे विसरलो तुला आणि कधीच नाही विसरणार.. आपल्या माणसांना कस विसरेल मी..

शौर्य : काका तु लगेच सिरीयस होतोस रे.. मस्ती करतोय मी.. तुझी खरच आठवण येते म्हणुन फोन करतो तुला.. आणि काकी तुझी आणि साक्षीची पण आठवण येते खुप..  म्हणजे सगळ्यांचीच आठवण येते मला..

(अनिता फक्त शौर्यच बोलणं ऐकत असते.. आत्या तिच्याकडे बघतच काकाच्या हातातुन विराजचा मोबाईल आपल्या हातात घेते)

आत्या : माझीपण आठवण नाही ना येत??

शौर्य : बस काय आत्या?? सगळ्यांचीच आठवण येते अस बोललो ना मी..

आत्या : त्या सगळ्यात मी आहे की नाही हे कसं कळेल मला.. आणि कोण कोण सगळे मला कळु दे जरा..

शौर्य : सगळे म्हणजे सगळेच ग.. तु, मम्मा...(आपण मम्माच नाव घेतलंय हे कळताच शौर्य मध्येच थांबतो)

(शौर्यने आपलं नाव घेताच अनिता पटकन आत्याच्या हातात असणाऱ्या मोबाईलकडे बघु लागते.. आणि सगळे अनिता काय रिएक्शन देते त्याकडे)

आत्या : येतेय ना तुला मम्माची आठवण..

शौर्य : तु आर्यन ला फोन दे बघु.. माझं काम आहे त्याच्याकडे..

आत्या : मम्माची आठवण येते की नाही तेवढं सांग मला..

शौर्य : सगळ्यांची आठवण येते ग.. आत्ता प्लिज आर्यनला फोन दे बघु.. 

आत्या जास्त काही न बोलता गप्प आर्यनकडे फोन देते..

आर्यन : हा SD बोल..

शौर्य : गिफ्ट दिलं का?

आर्यन : तो जेवल्यावर देतो.. आणि विरला पैस्यांच काही बोललास नाही का?

शौर्य : ते विसरलो रे मी. विर समोर मोबाईल धर बघु..

विराज : काय झालं??

शौर्य : माझ्या कपाटात ड्रॉव्हरमध्ये एक इनवोलोप आहे.. ते आर्यन ला दे..  आणि आर्यन कॅश मोजून बघ बरोबर आहेत का?? त्यात जे एक्स्ट्रा आहेत त्या पैस्यांतुन आपल्या सगळ्या गेंग साठी सिल्क घे.. तुम्ही पास झालात त्याबद्दल माझ्याकडुन..

रॉबिन : थेंक्स ड्युड..

शौर्य : अरे mention not dude..  Where is my sister??

साक्षी : हॅलो दादा..

शौर्य : हे साक्षी नवीन घर कस वाटतंय??

साक्षी : छान वाटतंय.. 

अनघा : तिला थोडं बॉर होतय इथे.. 

शौर्य : थोडे दिवस होईलच ग.. एकदा स्कुल सुरू झाली की नाही काही एवढं वाटणार.. तुझ्या विराज दादा आणि वहिनीला घेऊन मस्त पैकी मॉलमध्ये जाऊन शॉपिंग वैगेरे कर..

साक्षी : त्याला बर तर वाटु दे.. 

शौर्य : त्याला बर वाटायला तो आजारी तरी कुठे आहे.. ते सोड तुझ्या स्कुलच काय केलं??

साक्षी प्रश्नार्थी चेहरा करत आपल्या बाबाकडे बघु लागते..

काका : ते मी उद्या जाऊन बघतो.. 

शौर्य : आपल्या ज्यो ला घेऊन जा उद्या.. ती दाखवेल तुला स्कुल. जास्त उशीर नको करुस..

काका : तु इकडची काळजी नको करुस.. तु तुझ्या अभ्यासात लक्ष दे.. 

शौर्य : हम्मम.. विरच झालं जेवुन??

विराज : हो रे.. हे बघ ज्युस पितोय आत्ता..

शौर्य : ओके.. मग सरप्राईज बघा तुमच.. मी आत्ता ठेवतो.. बिजी आहे मी.. बाय एव्हरी वन...

बाय.. सगळेच शौर्यला बाय करतात..

जेवण आटोपुन होताच सगळे सोफ्या जवळ जाऊन बसतात.. 

रॉबिन अनघा आणि विराजच्या हातात त्यांनी आणलेली बेग देतो..

दोघेही खुप वेळ त्या बेगकडे बघत एकमेकांकडे बघतात..

आर्यन : ए विर यार ऑपन इट्स.. 

नैतिक : बघ तर.. मुहूर्त काढायचा विचार आहे की काय??

अनघा : किती घाई करताय तुम्ही लोक..

आर्यन : अग वहिनी 8 वाजता घरी येतोय अस बोलून आलोय. तुम्ही असे हळुहळु उघडुन बघाल तर इथेच रहावं लागेल आम्हांला..

विराज आर्यनकडे बघत बेग उघडुन बघतो..

अरे वाहह आमच्या लग्नाचे अल्बम आले सुद्धा.. विराज खुश होतच बोलतो..

अनघा : बापरे किती जड आहे..

ज्योसलीन : ए वहिनी ते सगळे अल्बम आम्हां लोकांचा बघुन झालेत ग.. ते बेगेत तसेच ठेव बगु.. म्हणजे आम्ही घरी गेलो की तुम्ही बघा.. आम्ही तुमच्या लग्नाची व्हिडीओ शूटिंग बघायला थांबलोय.. ती CD काढ बघु लवकर..

आर्यन : होमथिएटर चालु आहे ना??

विराज : हो आहे..

ज्योसलीन : काका तु लग्नात नव्हतास ना तु बघच आम्ही आपल्या विरच्या लग्नात कसली धम्माल केली ते..

रॉबिन : लाईट वैगेरे ऑफ करा ना.. थोडं अंधार करून बघुयात.. ते थोडं थिएटर मध्ये असल्याचा फील येईल ना म्हणुन बोलतोय..

आर्यन : पॉपकॉर्न वैगेरे पण लागतील मग तुला..

रॉबिन : अरे हो बर झालं तु आठवण करून दिलीस.  ए विर आमच्यासाठी तेवढं तर तु मॅनेज करूच शकतोस ना..

विराज : रॉबिन पॉपकॉर्न वैगेरे अचानक कुठुन आणुन देऊ मी तुला..??

रॉबिन : दुकानातून आणि कुठुन.. काय विर तु पण.. जेवत नाहीस ना नीट म्हणुन अस विसरायला होतय तुला.. 

नैतिक : ए विर तु पण कुठे ह्या मॅड च्या नादी लागतो यार. तु शांत बस..

विराज : मला पण असच वाटतंय आत्ता..

रॉबिन : विर तुझ्या लग्नाच्या अल्बमच वजन तुझ्यापेक्षा खुप जास्त आहे.. मी 2 किलोमीटर चालत तेही माझ्या ह्या दोन हातात तुझ्या लग्नाचे हे जड जड अल्बम उचलुन घेऊन आलोय यार.  आणि तु..?? 

विराज : सॉरी पण मी काय केलंय तुला??

आर्यन : ए विर तु ह्याच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस.. माझ्या बाईकने घेऊन आलोय मी ह्याला.. फक्त तुझ्या घरात येईपर्यंत उचलुन धरलाय ह्याने हा अल्बम.. तोंड बघ कस करून दाखवतोय हा.. रॉबिन इथे सगळ्यांना तु बोलतोस ते खरच वाटेल.. प्लिज हा..

रॉबिन : राहू दे रे आर्यन.. भलेपण का जमाना ही नही रहा..

विराज : डायलॉग कसले मारतोयस.. तु आईस्क्रीम खाणार का सांग.. म्हणजे तुम्ही सगळेच आईस्क्रीम खाणार का? मी आईस्क्रीम मागवतो..

रॉबिन : पॉपकॉर्न की भुक अभी आईस्क्रीम पे.. 

विराज : म्हणजे रॉबिन नाही खाणार तर..

रॉबिन : अस तु विचार सुद्धा करू नकोस.. मागवतो आहेस तर आपल्या नेचर्स मधुन मागव.. टेंडर कॉकोनट.. टु स्कुप पर पर्सन.. काय गाईज

येस... सगळेच एकत्र बोलतात..

विराज : ओके.. सगळ्यांसाठी तोच फ्लेव्हर मागवतो मग..

अनिता : रॉबिन तु घरी पण एवढीच बडबड करतो का??

रॉबिन : नाही ओ आंटी.. एवढीशीच बडबड करून कस चालेलं.. ह्या पेक्षा थोडी जास्तच करतो..

आर्यन : SD नाही ना इथे म्हणुन विरला टार्गेट केलंय त्याने.. 

(प्रतीक CD प्लेयर मध्ये विराज आणि अनघाच्या लग्नाची CD लावत असतो..)

ज्योसलीन : ए प्रतीक किती वेळ.. लवकर..

प्रतीक : दोन मिनिटं.. झालंच..

रॉबिन : मला कामात अशी टंगळमंगळ केलेली जरा पण नाही आवडत हा प्रतीक.. 

प्रतीक : रॉबिन व्हिडीओ चालु करून तुझ्याजवळच येतोय मी.. तु थांबच.. तुझी बकबक ऐकुन डोकं आऊट झालंय आमचं.. 

काकी : शौर्य आणि विराजचे मित्र मंडळी मस्तच आहेतना.. वेळ कसा पटकन निघुन जातो ह्यांच्या गंमती जंमती ऐकुन..

काका : होणं.. आल्यापासुन मस्त टाईमपास होतोय.. रॉबिन तु तर खुपच मस्त आहेस..

विराज : शौर्यचे स्कुल फ्रेंड्स आहेत सगळे.. इथेच रहातात. म्हणजे अजुन खुप आहेत.. शौर्य असला की सगळे आपल्याकडेच असतात. आर्यन बाकी गँग कुठेय तुमची..

आर्यन : बाकीचे सगळे आत्ता बिजी आहेतरे.. एडमिशनच वैगेरे नको का बघायला..

गाईज इट्स स्टार्ट अस बोलत प्रतीक पळतच व्हिडीओ ऑन करून रॉबिनच्या बाजुला येऊन बसतो.. एंगेजमेंटच्या व्हिडीओ पासुन सुरुवात होते.. घरात रॉबिनने सांगितल्या प्रमाणे काळोख करून हॉलमध्ये मोठ्या अश्या होमथिएटर जवळ सोफा एडजस करत सगळे बसले असतात.. अनघा आणि विराज एकमेकांचा हात घट्ट पकडुन बसले असतात..

सुरुवात ही रिसॉर्टच्या डेकोरेशन पासुन असते..

काका : विराज डेकोरेशन अगदी सुंदरच केलेलं..

काकी : हो ना..

रॉबिन : आपल्या शौर्य गाथा ने ठरवलेल. बट काही ठिकणी आम्ही पण सजेस्ट केलेलं..

अनघा : आणि काका ह्या लोकांनी खुप म्हणजे खुप मदत केलीय.. प्रीवेडिंग शुट पासुन आमच्यासोबतच होते.. 

काका : अरे वाह..

बाबा विराज दादा.. विराजची एन्ट्री होताच... साक्षी आपल्या बाबाला सांगतच बोलली..

साक्षी : विराज दादा एकदम हँडसम दिसतोयस तु..

विराज : थेंक्स साक्षी..

थोड्या वेळाने अनघाची एन्ट्री होते..

साक्षी : वहिनी तु पण खुप म्हणजे खुपच सुंदर दिसतेयस..

काकी : हो खरच अनघा..

थेंक्यु... अनघा हसतच काकी आणि साक्षीला बोलते..

सगळेच व्हिडीओ बघत त्या गोड आठवणी एन्जॉय करत असतात.. अनघाला आपल्या हळदीचा व्हिडीओ वैगेरे बघुन थोडं भरून येत.. नकळत तिच्या डोळ्यांतुन पाणी येत असत.. अनघा रडतेय हे विराजपासून काही लपुन रहात नाही. विराज एक हात तिच्या खांद्यावर टाकत तिला थोडं धीर देत असतो.. 

थोड्या वेळात विराजने ऑर्डर केलेली आईस्क्रीम पण येते.. सगळे व्हिडीओ सोबत आईस्क्रीम पण एन्जॉय करत असतात..

काका : तुम्ही सगळे एकदम भारी नाच करता.. 

साक्षी : माझा शौर्य दादा तर एकदमच मस्त डान्स करतो..

नैतिक : त्यानेच तर डान्स कोरियोग्राफ केलेत..

अनिता : शौर्यच्या डान्सचे खुप सारे व्हिडीओ आहेत माझ्याकडे.. मी दाखवते तुम्हांला नंतर.. तुला विश्वासच बसणार नाही की आपला शौर्य आहे तो.. (अनिता शौर्यच कौतुक करत थोडं खुश होतच बोलते)

काका : मला आवडेल बघायला.. पण आठवणीने दाखव..

साक्षी : मोठी मम्मी मी तुला नंतर आठवण करून देईल.

अनिता : हम्मम चालेल..

काकी : हळद आणि सांगितचा कार्यक्रम एकदम सुरेख झाला.. तुम्हां सगळ्यांचे डान्स तर एकदम मस्तच..

आत्या : लग्न आणि रिसेप्शन तर त्याहुन भारी होत.. बघाच तुम्ही..

रॉबिन : ए विर तु लग्नात तांदुळ पण निवडत बसलेलास??

(व्हिडीओमध्ये विराजच्या हातात तांदळाने भरलेली प्लॅट बघुन रॉबिन बोलतो)

विराज : काहीही काय.. तांदुळ नव्हतो निवडत.. भटजींनी बायकोच नाव त्या तांदळावर लिहायला सांगितलं होतं.. तेच लिहित होतो मी..

आर्यन : एवढं विचार करून..?? एकच बायको आहेना..

विराज : ते इंग्लिशमध्ये लिहायचं की मराठीत ते कळत नव्हतं.. 

(विराज अस बोलताच सगळे हसु लागतात त्याला..)

मी सिरियसली बोलतोय तुम्ही हसता का??

रॉबिन : विर... सिरीयसली बोलुन तु अजुन मोठा जॉक केलास.. 

आर्यनला टाळी देतच रॉबिन बोलतो..

सगळेच व्हिडीओ शूटिंग बघत विराजवर कमेंट पास करत त्याला चिडवत असतात.. आणि एकमेकांना हसवण्याचा प्रयत्न करत असतात..

संध्याकाळचे 7 वाजतात तस सगळ्यांचा व्हिडीओ बघून होतो..

आर्यन : चला आम्ही निघतो मग.. घरी वाट बघत असतील..

अनघा : पैसे घेऊन जातोस ना..

आर्यन : अरे हो.. बर झालं तु आठवण करून दिलीस..

अनघा शौर्यच्या कपाटातील ड्रॉव्हरमधुन इन्वेलोप आणुन आर्यनच्या हातात देते.

आर्यन तिच्या पुढ्यातच पैसे काऊंट करतो..

आर्यन : 46000 आहेत... 45000 त्या कॅमेरामॅनचे शौर्यने बेलेन्स ठेवलेले.. आणि एक हजार एक्स्ट्रा आहेत.. 

विराज : ते तुम्हांला सिल्क घ्या बोलला ना तो.. 

आर्यन : ओके.. बाय एव्हरी वन.. 

सगळ्यांना बाय करत सगळे आपापल्या घरी जातात..

दुसऱ्यादिवशी सकाळीच साठे वकील घरी येतात..

सकाळ सकाळी त्यांना घरी बघुन सगळ्यांनाच नवल वाटत..

अनिता साठे वकिल आल्या आल्या त्यांच्या चहा पाण्याच बघते आणि सरळ मुद्याला हात घालते. घरातील सगळी मंडळी तिथे उपस्थित असतात..

अनिता : तुम्हांला सांगितल्याप्रमाणे पेपर रेडी आहेत??

साठे वकिल : हो..

विराज : मम्मा काय चाललंय कळेल का मला??

अनिता : कळेलच.. समीर उद्यापासून तु आपली कंपनी परत जॉईंट करतोयस.. कंपनीचे जे अधिकार माझ्याकडे आणि शौर्यकडे होते ते आत्ता पुर्ण पणे तुझेच असतील.. म्हणजे शौर्य आणि तु, तुम्ही दोघांनी मिळुन ह्यापुढे ही कंपनी सांभाळायची आहे.. मी आणि सायली आम्ही आहोतच तुझ्या मदतीला..

काका : वहिनी ह्या सगळ्याची काहीही गरज नाही ग.. अस वागुण परत परक का करतेस तु.. तु अस काही करशील हे माहिती होत मला म्हणुन मी ह्या घरी येत नव्हतं.. बघितलस अस्मिता..

अनिता : समीर तु चुकीच समजतोयस मला. मी खरच थकुन गेलीय रे हे सगळं सांभाळुन आत्ता.. आणि जे तुझं आहे जे तुला आधी मिळायला हव होत तेच मी तुला देते.. तु तुझं काम जबाबदारीने सांभाळशीलच आणि माझ्या शौर्यला पण नीट सांभाळशील ह्याची खात्री आहे मला.. आणि हे ह्या बंगल्याचे पेपर्स.. शौर्य बोलला त्याप्रमाणे ह्या घरावर शेखर नंतर तुझा अधिकार आहे.. आणि प्लिज आत्ता पुन्हा ह्यातुन चुकीचा अर्थ काढुन मला हर्ट करू नकोस..

आत्या : वहिनी ह्या सगळ्याची खरच गरज होती का?? हे घर शौर्यच्या नावावर होत ना.. मग ते त्याच्या नावावरच राहू दे..

समीर : मला पण हेच बोलायचंय.. हे घर शौर्यच आहे.. ते त्याच्याच नावावर राहील..

अनिता : शौर्यची तशी इच्छा आहे.. आणि तुझ्या नावावर काय नि शौर्यच्या नावावर काय.. दोन्ही एकच आहे.. शौर्यला अजुन व्यवहार ज्ञान नाही आहे.. तु त्याला संभाळून घेशील ह्याची खात्री आहे मला.. ह्या व्यतिरिक्त एवढ्या वर्षात मी थोडी फार इन्व्हेस्टमेंट केलीय.. ती मी माझ्या विरच्या नावावर केलीय.. विर लोणावळा फार्म हाऊसचे पेपर्स मी तुला दिलेत त्या व्यतिरिक्त सुद्धा मुंबई मी  एक फ्लॅट विकत घेतलाय.. तो मी तुझ्या नावावर केलाय.. तुझ्या लग्नात मला तुला आणि अनघाला सरप्राईज द्यायच होत.. पण नाही जमलं.. 

विराज : मम्मा तु आज हे सगळं का बोलतेयस? आणि एवढं सगळं माझ्यासाठी करायची काहीही गरज नाही ग.. 

अनिता : तुला अस नको वाटायला की मी तुझ्यासाठी काही केलच नाही..

विराज : मम्मा हे सगळं तु ह्या आधी सुद्धा बोलली आहेस.. तु अस कस बोलतेस तेच मला नाही कळत.. तु अस प्रॉपर्टी वैगेरे माझ्या नावावर केलीस म्हणजे मला अस वाटेल का तु माझ्यासाठी काही तरी केलंस..?? मला प्रॉपर्टी पेक्षा तु माझ्यासोबत हवीस.. ते पण लाईफ टाईम.. त्या पेक्षा मोठी प्रॉपर्टी माझ्यासाठी काय असु शकते..

ते तर मी असेलच ना.. अनिता प्रेमाने विराजच्या चेहऱ्यावर हात फिरवतच बोलली..

समीर : आणि वहिनी मला जर हे सगळं हवं असत तर मी हे घर सोडुन गेलोच नसतो ना.. मला तुझ वागणं तेव्हाही नाही पटलं आणि आत्ताही.. ह्याची काय गरज आहे हेच मला नाही कळत.. मी तुझ्यासोबत काम करायला तैयार आहे.. त्यासाठी कंपनीत मला पार्टनरशिप द्यायची गरज नाही..

अनिता : गरज आहे समीर.. आणि मी तुला बोलली ना जे तुझं आहे तेच मी तुला देते.. आत्ता ह्या टॉपिकवर डिस्कस नको बघु..

आणि हे कंपनीचे आणि घराचे पेपर्स.. (अनिता समीर समोर पेपर्स धरतच बोलली.. पण समीर काही पेपर्स हातात घेत नसतो..) समीर.. पकड बघु..

समीर : वहिनी तुझ्या जवळच ठेव.. 

अनिता : हे तुझं आहे समीर.. धर बघु.. साक्षी हे पेपर्स तुझ्या बाबाच्या हातात दे बघु..

(अनिता बाजुलाच बसलेल्या साक्षीच्या हातात पेपर्स देत बोलते)

सगळ्यांसोबत बोलुन अनिता आपल्या रूममध्ये निघुन येते.. तीच्या मागोमाग अनघा आणि विराजसुद्धा तिच्या रूममध्ये येतात..

मला जे आधी करायला हवं होतं ते मी आत्ता केलंय.. (विराज काही बोलायच्या आधीच अनिता बोलते..)

विराज : मम्मा तु बरी आहेस ना..

अनिता : मला काय झालंय?? तुला बर वाटतंय का ते सांग..

विराज : जरा वाटतंय बर..

अनिता : जरा बर वाटतंय म्हणुन लगेच कामावर नको जाऊस.. आराम कर..

अनघा : तो आरामाच करणार आहे घरी..  आणि मी पण सुट्टी घेतलीय.. काका काकी आलेत ना घरी त्यांच्यासोबत थोडा टाईम स्पेन्ड करता यावा म्हणून.. तुम्ही पण नाही जात का आज कामावर??

अनिता : आज घरूनच काम करेल.. 

विराज : मम्मा कोणत्याच गोष्टीच नकोना टेन्शन घेऊस मी कायम तुझ्या सोबत आहे.. 

अनिता : तुला अस आजारी बघुन टेन्शन येत रे मला.. त्यात दोन आठवड्यापासुन तुझं काही ना काही चालुच आहे.. एक झालं की दुसर.. 

विराज : आत्ता आहे मी बरा.. पण तुझ्याकडे बघुन मला तु आजारी आहेस अस वाटत..

अनघा : काय होतंय मम्मी तुम्हांला.. आणि अचानक एवढं मोठं डिसीजन का घेतलं तुम्ही..

अनिता : आत्ता बस झालं ना.. किती दिवस मी ते सगळं सांभाळुन ठेवु.. थकली ग मी.. कोणतीच जबाबदारी नको वाटते मला.. विरची काळजी वाटायची.. पण आत्ता तु त्याच्या आयुष्यात आहेस म्हटलं तर त्याच कसलच टेन्शन नाही.. शौर्यची काळजी वाटते थोडी.. खुप हुशार आहे तो.. खूप म्हणजे खूप सॅम शेखर सारखाच आहे.. पण आत्ता समीर आणि विर आहे म्हटलं तर त्याची पण काळजी नाही.. तो माझ्या पासुन खुप लांब गेलाय ह्याच खुप वाईट वाटतंय.. माझं माझ्यावरच नियंत्रण सुटत चाललंय दिवसेंदिवस.. झोपेची गोळी जो पर्यंत शरीरात जात नाही तोपर्यंत झोप येतच नाही मला.. हे अजुन किती दिवस चालेलं मला पण नाही माहिती..  शौर्यला त्याच्या बाबा सारख बिजीनेस करताना बघायच मला.. फक्त ही एक इच्छा राहिलीय त्यासाठी मी जबरदस्ती दिवस पुढे ढकलते अस मला वाटतंय.. म्हणजे शेखरची ही गोष्ट सुद्धा मी ऐकली फक्त एवढच समाधान मला भेटेल.. बाकी त्याची स्वप्न शौर्य पुर्ण करेलच ह्याची खात्री आहे मला.. आणि विर शौर्यला कधी लांब नको करुस स्वतः पासुन.. 

(विराजचा हात आपल्या हातात घेतच ती त्याला बोलते.. विराज अनिताच्या हातावर डोकं ठेवुन रडु लागतो)

अनिता : विर.. तु रडतोयस का??

विराज : मग काय करू.. तु कस बोलतेयस बघ जरा.. 

अनिता : विर तु थोडं स्ट्रॉंग हो बघु.. 

विराज : ए मम्मा.. तु एकदम शांत बस बघु.. सकाळपासुन नको तस वागतेस आणि आत्ता नको ते बोलतेयस.. 

अनघा : मम्मी तुमच्या जबाबदाऱ्या संपल्या असतील पण आमच्या नाही.. आत्ता तुम्ही आमची जबाबदारी आहात.. खुप मेहनत केलीत तुम्ही.. सगळ्यांसाठी सगळं केलात.. आत्ता तुम्ही फक्त नि फक्त आराम करा.. आणि शौर्य लांब नाही गेलाय तुमच्यापासून.. काल ऐकलात ना तुम्ही. आठवण येतेय त्याला तुमची.. फक्त थोडा राग आहे.. तो पण जाईल.. आणि आत्ता कुठे एवढा हॅप्पीनेस आहे ह्या घरात आणि तुम्ही लगेच नको ते का बोलतायत.. 

अनघा आणि विराज अनिताची समजुत काढत तिच्यासोबत गप्पा गोष्टी करत बसतात..

पण रुममध्ये आल्यावर दोघांनाही तिच्या तब्येतीच खुप टेन्शन आलं असत..

दुपारी जेवताना दोघेही अनिताकडे बघत असतात.. जेवण देखील तीच कमी झालं असत.. आपल्याला कसलंच टेन्शन नाही हे ती दाखवत आत्या आणि काकासोबत गप्पा मारत असते.. पण आतुन ती खुप दुःखी आहे हे विराज आणि अनघाला कळत असत..

जेवुन आल्यावर दोघेही आपल्या रुममध्ये आत्ता शौर्यला कस समजवायच ह्या बद्दल डिस्कस करत होते.. 

संध्याकाळचे 6 वाजुन गेले असतात.. तरीही विराज आणि अनघा आपल्या रूममध्ये शौर्य आणि अनिता विषयीच बोलत बसले असतात.. दोघेही खुप विचार करून विराजच्या मोबाईलमधून शौर्यला व्हिडीओ कॉल लावतात..

शौर्य खर तर लेक्चरला जात असतो.. पण विराजचा व्हिडिओ कॉल बघुन तो बाहेरच थांबतो.. कॉलेजमधल्या एका जिन्यावर बसून तो त्याचा व्हिडीओ कॉल उचलतो..

हाय शौर्य... शौर्यने फोन उचलल्या उचलल्या अनघा आणि विराज त्याला बोलतात..

शौर्य : काय झालं?? ह्या टाईमला फोन केलात मला..??

विराज : थोडं बोलायच होत.. तु बिजी आहेस का??

शौर्य : इंपोर्टन्ट आहे??

विराज हो म्हणुन मान हलवतो..

अनघा : तु बिजी नाहीस का??

शौर्य : वहिनी ह्या टाईमला बिजिच असतो ग मी..

अनघा : ओके. फ्री झाला की मग फोन कर आम्हांला..

विराज : अनु प्लिज आत्ताच बोलुयात.. माझ्या डोक्यात नको ते विचार येतायत ग.. शौर्य तु फ्री होशील तेव्हा होशील यार.. मला आत्ताच बोलायचय तुझ्यासोबत.. हार्डली फिफ्टीन मिनिट्स लागतील. फिफ्टीन मिनिट्स तर तु मला देऊच शकतोस ना.

शौर्य : विर यार आत्ता माझं...

शौर्य प्लिज यार.. माझ्यासाठी.. प्लिज.. (विराज मध्येच शौर्यला थांबवत रिक्वेस्ट करतच बोलतो..)

शौर्य : ओके बोल.. आत्ता वेळच वेळ आहे माझ्याकडे..

(दोघांसोबत बोलतच शौर्य परत आपल्या रुमवर जाऊ लागला)

अनघा : शांत पणे ऐकशीलना??

शौर्य : काय झालं?? तिथे सगळं ठिक आहे ना ?? तुम्हा दोघांचे चेहरे बघुन टेन्शन येऊ लागलय मला..

विराज सकाळी घडलेला सगळा प्रकार शौर्यला सांगतो..

शौर्य : जे तिने आधी करायला हवं ते आत्ता केलं.. त्यात काय एवढं?? आणि हे सांगायला तुला माझी पंधरा मिनिटं हवी होती?? आर यु मॅड विर.. आणि वहिनी तु पण ह्याच्यासोबत... (शौर्य इरिटेट होऊन बोलतो)

विराज : शौर्य.. मम्माच टेन्शन येतंयरे मला.. तु माझ्यासोबत बोलत नव्हतास तेव्हा मला खुप त्रास होत होता.. तसाच त्रास तिला होतोय. पण ती दाखवत नाही आहे.. प्लिज समजुन घे..

शौर्य : झालं तुझं??

विराज : शौर्य प्लिज ना.. सोड ना राग.. आत्ता काका पण आला ना आपल्यासोबत रहायला.. तुझ्यासाठी तिने काका काकीचे पाय धरून त्यांची माफी मागितली.. जे त्यांच होत ते तिने त्यांना परत दिलं. फक्त तुझ्यासाठी.. आणि तु बोलतोस त्यात काय एवढं?? 

शौर्य : तु खुप आधी पासुन ठरवलं आहेस का मम्मा चुकीची असली तरी तिला सपोर्ट करायचा? आणि माझ्यासोबत भांडायच.. नेहमीचच झालंय यार तुझं.. आणि हे नको ते तु नंतर बोलु शकत होता ना यार.. माझे सगळे लेक्चर मिस झाले तुझ्यामुळे.. जरा तरी कळायला हवं यार तुला.. डिसगस्टिंग यु आर..  (आपली बेग रागातच बेड वर फेकत तो बोलला)

विराज : तु बोललास का नाही लेक्चरला जातोयस..

शौर्य : ह्या टाईमला मी लेक्चरलाच असतो हे माहितीय ना तुला..

विराज आणि अनघा त्यांच्या समोरच भिंतीवरील घड्याळात बघतात..  एकदम गंभीर चेहरा करत दोघेही एकेमकांकडे बघत परत शौर्यकडे बघु लागतात..

विराज : शौर्य आय एम सॉरी.. आम्ही टाईम बघितलाच नाही रे.

अनघा : शौर्य मी पण सॉरी.. आम्ही मम्मीनबद्दलच विचार करत होतो रे.. आम्हाला खरच कळलं नाहीत की 6 वाजुन गेलेत.. प्लिज रागवु नकोस अस..

शौर्य : इट्स ओके.. 

विराज : शौर्य मम्माला एक फोन कर ना.. प्लिज..

शौर्य : झालं तुझं मग बाय.. वहिनी तुला पण बाय..

अनघा : शौर्य स्टेच्यु.. (अनघा अस बोलताच शौर्य स्टेच्यु होत शांतपणे तिच्याकडे बघत रहातो..) आम्ही दोघे आत्ता तुझ्यासोबत जे काही बोलु ना त्याबद्दल थोडा विचार कर शौर्य... आपल्याला ना आपल्या लाईफमध्ये कोणी तरी हक्काच अस हवं असत ज्याच्यावर आपण रागवु शकतो, आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करू शकतो.. जस ह्या क्षणाला तुझ्या लाईफमध्ये तुझे मित्र मंडळी आहेत.. ज्यांच्यासोबत तु मस्त एन्जोय करतोयस. तुझा मोठा भाऊ आहे ज्याच्याकडे तु तुझ्या सगळ्या फिलींग, तुझ्या पर्सनल गोष्टी तु शेअर करतोस, आत्ता गाथा आलीय तुझ्या लाईफमध्ये तु तिच्यासोबत टाईम स्पेन्ड करतोस.. मित्रांसोबत मस्त पैकी फिरतोस, वरच्यावर तुम्ही लोक आऊटिंगला जात असतात.. तस मम्मीनच्या आयुष्यात कोण आहे सांग.. तुम्ही दोघेच आहात ना शौर्य.. 

विराज : शौर्य तुला मम्मा किंवा मी तुझ्याशी बोललो किंवा नाही बोललो ह्या गोष्टीने फारसा फरक नाही पडणार कारण तु तुझी लाईफ मस्त एन्जॉय करतोयस.. आय मिन तुझी काळजी घेणारी मित्र मंडळी तुझ्या सोबत आहेत.. तुला हवं तसं जगतोयस तु शौर्य.. मम्माच तस नाहीना.. तिच्या लाईफमध्ये ऑफिस, घर, आपण दोघ आणि आपल्या जबाबदाऱ्या.. बस.. तीच जग इथेच थांबतय रे शौर्य.. आपला लाईफ पार्टनर आपल्या सोबत नाही ह्याहुन मोठं दुःख काय असू शकत तु सांग.. ते दुःख ती आयुष्यभर सोबत घेऊन फिरते रे आणि एकदा ठिक आहे.. तिच्यासोबत दोनदा अस झालंय.. दोघांनी तिची साथ अर्ध्यावर सोडून दिली.. आपण तीच ते दुःख पण समजुन घ्यायला हवं ना शौर्य.. आय नॉ ती चुकली आहे शौर्य पण फक्त ती नाही सगळेच चुकलेत रे.. माझी मम्मी आणि तुझा बाबा दोघे तर जास्त चुकलेत.. तुला वेळेवर कळलं समीरापेक्षा गाथा परफेक्ट आहे तुझ्यासाठी.. तु तिला सोडुन गाथाकडे मुव्ह ऑन झालास ना.. तस तुझ्या बाबाला कळलेलं तेव्हा त्याने पण तेच करायला हवं होतं. आणि आपला काका पण चुकलाय शौर्य.. उद्या तुला अनु आणि माझा एखादा मित्र बोलताना दिसले.. किंवा असच काहीस वाटलं जस काकाला मम्माबद्दल वाटलं.. तर तु काय करशील?? तु आधी माझ्यासोबत बोलशील का अनुसोबत बोलशील?? अनु सोबतच बोलुन गोष्टी क्लीअर करशीलना.. काकाने तेच नाही ना केलं.. एखाद्या स्त्री वर ती चुकीची नसताना असा आरोप केला तर ती नाही सहन करणार यार.. तेच मम्माच झालं रे.. त्यानंतर मम्मा खरच चुकली.. आय एक्सेप्टेड.. बट इट्स हर पास्ट शौर्य.. आणि आपण तिला दुखवुन कस चालेल तुच सांग.. शौर्य ती एकटी आहे यार.. तु जस इतरांना समजुन घेतोस तस तिला समजुन नाही घेत रे.. म्हणजे कधी समजुन घेण्याचा प्रयत्नच नाही करत तु.. पास्टमध्ये सगळेच चुकलेत शौर्य फक्त आपली मम्माच नाही..

अनघा : आणि शौर्य पास्टमध्ये केलेल्या चुका त्यांनी एक्सेप्ट केल्यात रे.. काका काकी त्यांना माफ करू शकतात.. आत्या त्यांना माफ करू शकते, आजी त्यांना माफ करू शकते मग तु का नाही.. 

विराज : तुझा राग वेळेवर शांत कर नाही तर जस बाबाला गमवलस तस आपल्या मम्माला पण गमवशील शौर्य.. मग पश्चातापा शिवाय हातात काहीच उरणार नाही.. बाकी तुझा निर्णय.. तु ठरव तुला काय करायचं ते.. आय एम नॉट फॉरसिंग यु.

अनघा : म्हणजे आम्ही खुप मेहनतीने हे घर एकत्र आणलंय रे शौर्य.. त्यात तु अस कठोर नको ना वागुस.. आपण सगळेच एकत्र राहुयात.. मस्त हसत खेळत घर राहिल आपलं.. प्लिज शौर्य.. जो निर्णय घेशील तो नीट घे.. आणि ओव्हर..

शौर्य : बाय..

विराज : थोडं बोल तरी यार.. लगेच काय बाय..

शौर्य : मम्माला कॉल केल्यावर बोलतो तुम्हा दोघांसोबत.. 

(शौर्य थोडं हसतच विराज आणि अनघाला बोलतो)

अनघा : गुड.. बट आम्ही वाट बघतोय तुझ्या फोनची..

शौर्य : हम्मम..

शौर्य आपला फोन कट करतच आपला लॅपटॉप ऑपन करतो.. आणि त्यावरून अनिताला व्हिडीओ कॉल लावतो..

शौर्यचा फोन बघुन अनिता खुप खुश होते.. ती लगेचच त्याचा फोन उचलते..

एका हाताने आपला कान पकडत ती त्याला सॉरी बोलते.. डोळ्यांतुन पाणी येत असत तिच्या...

शौर्य : तु रडु नकोस ना.. आय एम अल्सो सॉरी.. मी एअरपोर्टवर रागात थोडं जास्तच बोललो तुला.. तु कस राग आल्यावर बोलतेस तस झालं माझं.. 

अनिता : मी पण जास्तच बोलली तुला त्यादिवशी. 

शौर्य : आत्ता होऊन गेलेलं नको आठवुस.. आणि थेंक्स काकाला परत तिथे आणलंस त्याबद्दल.. 

अनिता : हम्मम्म..

शौर्य : हम्मम.. काय नुसतं??

अनिता : तु खुश आहेस ना मग मी पण खुश.. आणि शरू मी खरच थकलीय खुप आत्ता.. तुला फक्त तुझ्या काकासोबत बिजीनेस सांभाळताना बघायचय मला.. माझी एक इच्छा राहिलीय रे फक्त.. ती पुर्ण कर. आत्ता तुझा फोन येण्याआधी तेच विचार करत होती मी...

शौर्य : ए मम्मा प्लिज.. काहीही बोलु नकोस ग.. मला आणि विरला तु हवी आहेस ग.. आम्हाला सोडुन कुठेही जाणार नाहीस तु.. बाबाने माझा विचार नाही केला ग निदान तु तरी कर.. आणि माझ्या खुप ईच्छा बाकी आहेत तुझ्याकडुन त्या तु पुर्ण कर.. आत्तापर्यंत तुझ्याकडे मी तुझा वेळ मागत होतो. आत्ता तर काका आलाय.. आत्ता तरी मला पाहिजे तसा वेळ दे मला.  मी तुला आधी बोलुन दाखवलं तशी बन ना तु. माझ्यासाठी.. प्लिज.. मी USA वरून आलो की मग मला तुझ्या हाताने भरवत जा.. जस आर्यनची मम्मा भरवते त्याला तस.. भरवशील ना?? आपण एकत्रच, ब्रेकफास्ट करायला आणि जेवायला बसत जाऊ बट तु लॅपटॉप वैगेरे सोबत घेऊन बसणार नाहीस हा..

हम्मम.. अनिता डोळ्यांतुन येणार पाणी पुसतच शौर्यला बोलते..

शौर्य : आणि परत अस नको ते नाही बोलायच कळलं..??

अनिता मानेनेच हो बोलते..

शौर्य : मम्मा.. मला तुला काही तरी सांगायचय.. ऐकणार तु??

अनिता : काय ??

शौर्य : आधी तु डोळे वैगेरे पुस एक छानशी स्माईल दे मगच मी सांगेल..

अनिता आपले डोळे वैगेरे पुसत शौर्यला गोड अशी स्माईल देते.

अनिता : ओके??? आत्ता सांग बघु..

शौर्य : ते मी पण विरसारख लव्ह मेरिएज करणार आहे. 

अनिता : ते माहिती मला.. मला वाटलं काही तरी वेगळं सांगतोयस..

शौर्य : तुला कस माहिती?? विर बोलला का तुला??

अनिता : शरू आई आहे मी तुझी.. विर तुझ्याबद्दलच्या असल्या गोष्टी कश्या सांगेल मला?? आणि गाथा मला पण खुप म्हणजे खुप आवडते.. गोड आहे खुप अगदी अनघा सारखीच.. कधी करतोस मग लग्न.??

शौर्य : ते ती डॉक्टर झाल्यावरच ग.. अजुन पाच ते सहा वर्ष तरी तिला डॉक्टर व्हायला लागतील ना.. तो पर्यँत मी सिंगपोरमध्ये ब्रांच काढुन सुद्धा मोकळा झालो असेल.. मम्मा तु माझ्या लग्नात डान्स करशील ना?? मी खुप काही प्लॅन केलंय माझ्या लग्नाबद्दल पण.. 

अनिता : तु बोलशील तसच सगळं होईल.  मी आत्ता ठरवलंय जे तुम्ही चौघ बोलाल तसच वागायचं.. .

शौर्य : चौघ कोण??

अनिता : तु, विर, आपली साक्षी आणि अनघा.. अजुन गाथा आपल्या घरी एंटर नाही ना झाली मग तिला पण एड करेल मी.. ( अनिता हसत बोलते)

शौर्य : ग्रेट मम्मा..

अनिता : तु ह्या वेळेला रूमवर काय करतोयस.. लेक्चरला नाही गेलास??

शौर्य : ते तु तुझ्या लाडक्या मुलाला जाऊन विचार.. लेक्चरच्या टाईमला फोन करतो.. फोन उचलणार नव्हतो पण तो आजारी आहे म्हणुन फोन उचलावा लागला मला त्याचा. एक तर खुप इंपोर्टन्ट लेक्चर होत ग माझं.. मी उद्या पासुन 8 ते 1 ह्या टाईमला माझा मोबाईल बंद करून ठेवणार..

अनिता : शरू त्याला आठवण आली असेल रे तुझी..

शौर्य : हे बर आहे ग तुम्हां दोघांच.. तो तुझी बाजु घेतो तु त्याची बाजु घे..

अनिता : शरू तो एकटा पडतो रे.. तु का नाही समजत.. तो गोष्टी लगेच मनाला लावून घेतो. तु खुप स्ट्रॉंग आहेस शरू पण विर तुला दाखवतो तसा अजिबात नाही आहे. लास्ट आठवडा बघतोस ना, तुच मांडीवर घेऊन होतास ना त्याला.. समजुन घे थोडं.. शरीराने पण नाजुक आहे आणि मनाने सुद्धा.. तु का नाही समजत.. 

शौर्य : हम्मम.. 

अनिता : तु तुझा एक टायमिंग ठरवुन फोन करत जा.. जेव्हा आम्ही सगळे डायनींग टेबलवर जेवत असतो तेव्हा कॉल करत जा म्हणजे सगळ्यांसोबत बोलायला भेटेल तुला.. मग कोणी तुला तुझ्या इंपोर्टन्ट वेळेवर कॉल करण्याचा प्रश्नच येणार नाही..

शौर्य : उद्या पासुन तसच करतो मी.. आणि तुला कधीपण माझ्याशी बोलवस वाटलं की फोन करत जा ओके?? 

अनिता : हम्मम..

शौर्य : मम्मा मी USA वरून आल्यावर आपण फिरायला जाऊयात.. चालेल?? सगळी फॅमिली. जस बाबा असताना जायचो अगदी तसच..

अनिता : हम्मम.. चालेल.. तु आधी अभ्यास नीट कर.. 

शौर्य : हो ग.. तु तुझी काळजी घे.. बाय.. 

अनिता : बाय

एवढ्या दिवसांनी शौर्य सोबत बोलुन अनिताला खुप बर वाटत असत..

अनघा आणि विराजमुळे घर अगदी पहिल्यासारख पुन्हा एकत्र आलं होतं.. शौर्यचा सुद्धा आपल्या आई आणि भावावरचा राग कुठे तरी दूर पळुन गेलेला. दुसऱ्या दिवशीपासुनच काका आणि काकीने अनितासोबत कंपनी जॉईंट केली.. अनिताच्या कामाचा अर्धा भार कमी झाला होता.. विराजला सुद्धा बर वाटत होतं त्यामुळे तोसुद्धा अनघा सोबत पुन्हा कामावर जाऊ लागला..

उद्या आपण कामावर नाही ह्याची आठवण करून द्यायला वृषभ विराजची केबिन नॉक करतच आत जातो.. 

विराज : बर झालस तुच आलास ते.. तस पण मी तुला फोन करून बोलवुन घेणार होतो..

वृषभ : काय झालं...??

विराज : मंडेला इंपोर्टन्ट मिटिंग आहे.. मला उद्या इव्हीनिंग पर्यंत त्या रिलेटेड PPT तु बनवुन देणार आहेस.. मी डिटेल्स तुला मॅल करतो.. आणि सोबतच कंपनीचा क्वार्टरली आणि एन्युअल रिपोर्ट सुद्धा मला हवाय.. आणि केबिनमध्ये येताना नेहमी नॉटपॅड आणि पेन सोबत घेऊन यायची सवय लावुन घे.

वृषभ : ओके.. अजुन काही लागेल का??

विराज : खुप काम आहेत वृषभ.. तु कंपनीत आल्यापासुन मला इतर कोणावर काम सोपवायला नाही आवडत.. म्हणजे तुझं कामच खुप परफेक्ट असत.. तुला हाताखाली कोण लागत असेल तर तु त्यांची मदत घे.. ओके.. आणि ट्रेड डिपार्टमेंट कडुन त्यांचा पण क्वार्टरली आणि एन्युअल MIS मला येईल तो सुद्धा तुला ह्या PPT मध्ये मर्ज करावा लागेल..

वृषभ : ओके..

विराज : तुझं काही काम होत का माझ्याकडे??

वृषभ : काम तर होत बट मी तु दिलेलं काम कम्प्लिट करून मग बोलतो तुझ्यासोबत.. 

विराज : आत्ता बोलु शकतोस ना??

वृषभ : नाही नको राहू दे.. नंतर बोलतो.. मी तु जे काम सांगितलंस त्या कामाला लागतो..

विराज : वृषभ उद्या इव्हीनिंग पर्यंत दे करून.. आत्ता तु जे काम करतोयस ते कँटीन्यू कर.. तस ऑन शनिवार रविवार मी घरी बसुन PPT चॅक करेल..

विराजला ओके बोलतच वृषभ आपल्या डेस्कवर येऊन त्याने सांगितलेल्या कामाला लागतो.. काहीही करून त्याला विराजने सांगितलेलं काम आज पुर्ण करायच होत.. ऑफिसमध्ये जेवढं करता येईल तेवढं काम करून तो घरी निघतो.. घरी गेल्या गेल्या फ्रेश होत तो लगेचच कामाला लागतो.. रात्रभर जागरण करून तो विराजने दिलेलं काम पुर्ण करतो. मध्यरात्री साडे तीनच्या दरम्यान त्याच सगळं काम होत.. काम होताच तो विराजला लगेच मॅल पाठवुन देतो... प्लिज कॉल मी.. असा मॅसेज तो विराजला पाठवुन थोडं झोपतो.. 

सकाळी साडे सहाच्या दरम्यान आर्यनच्या घरच्यांना बाय करतच तो एअरपोर्टच्या दिशेने जातो.. एअरपोर्ट बाहेरच समीरा आणि तिचा भाऊ त्याला दिसतो..

वृषभ : अरे दादा तु पण येतोयस दिल्लीला??

श्री : मी फक्त हिला एअरपोर्ट पर्यंत सोडायला आलोय.. बाकी काय बोलतोस?? कसा आहेस?

वृषभ : मी मस्त.. तु कसा आहेस??

श्री : मी पण मस्त.. इथे मुंबईतच आहेस तू अजुन??

समीरा : तुला सांगायला विसरली मी तो जॉब करतोय इथे..

श्री : अरे वाह.. कुठे??

वृषभ : XXX ltd.

श्री : आपल्या वरकुल ची कंपनी आहे ही तर.. विराज सोबत काम करतोस तु..??

वृषभ : अ हो..

श्री : अरे वाहह.. कसा आहे तुझा बॉस?? लग्न झाल्यापासुन फोनच नाही त्याचा..

वृषभ काही बोलणार तोच वृषभच्या मोबाईलवर विराजचा फोन येतो..

त्याचाच फोन आहे.. एक मिनिट हा.. अस बोलत वृषभ विराजचा फोन उचलतो..

विराज : तु फोन कर म्हणुन मॅसेज केलेलास.. ते हि रात्री साडे तीन वाजता.. काय झाल??

वृषभ : ते तु सांगितलेलं सगळे रिपोर्ट आणि PPT रेडी करून तुला मॅल केलाय मी.. माझं आजच काम पण मी कालच केलंय.. त्या व्यतिरिक्त तुझं काही काम असेल तर मला मॅसेज करून ठेव.. मी आज कामावर नाही आहे..

विराज : व्हॉट?? अचानक सुट्टी का घेतोयस??

वृषभ : विर अचानक सुट्टी नाही रे घेत आहे मी.. वहिनी बोलली नाही का तुला?? मी खुप दिवस आधी तिला सांगितलेलं..

विराज : ती काही बोलली नाही.. मे बी ती विसरली असेल.. काही सिरीयस नाही ना??

वृषभ : वहिनीला सांगितलंय मी का सुट्टी घेतली ते ती सांगेल तुला बट माझ्याजवळ लॅपटॉप आहे.. मला जमेल तसं मी काम करून तुला देईल.. 

विराज : गरज तर लागणारच आहे. तु ह्या पुढे मला विचारून सुट्टी घेत जा.. अनघाला नाही ओके..

वृषभ : ओके.. आणि विर तुझा एकदम खास मित्र माझ्या समोर आहे तु बोलणार त्याच्यासोबत??

विराज : माझा खास मित्र.. कोण??

वृषभ जास्त काही न बोलता श्री कडे फोन देतो..

श्री : ए वरकुल मेरे यार.. कसा आहेस ड्युड.. 

विराज : अरे श्री.. व्हॉट सरप्राईज ड्युड..

श्री : काय मित्रा लग्न झाल्यानंतर विसरूनच गेलास.. आत्ता काय कंपनी एकदम टॉप 10 मध्ये गेलीय तुझी.. मग कस काय ह्या गरीबाची आठवण येईल..

विराज : ए श्री तु सुधारला नाहीस हा.. आहे तसाच आहेस.. फोन केल्या केल्या चिडवण चालु तुझं.. हे सगळं सोड तु कधी भेटतोस ते बोल..

श्री : मी तर फ्रि च आहेरे.. तु बोल कधी भेटायच ते..

विराज : आपण चौघे भेटुयात.. अनु प्रितीची आणि तुझी आठवण काढत असते.. नाही तर एक काम कर आज डिनरसाठी घरी ये.. तु प्रितीला आणि मी अनुसरप्राईज देतो..

श्री : घरी..?? घरी नको रे..

विराज : आज तु आणि प्रिती आमच्या घरी डिनरसाठी येतायत. मला काहीही माहीत नाही.. ओके

श्री : बर मी कळवतो तुला तस..

विराज : कळवायच काय त्यात.. मी वाट बघतोय.. आणि थोडं लवकर ये.. तेवढं गप्पा मारू..

श्री : बर.. 

विराज : मग भेटूच संध्याकाळी आपण.. वृषभला फोन दे बघु..

श्री वृषभला फोन देतो..

वृषभ : हा विर बोल..

विराज : वृषभ तु नको त्या टायमिंगला सुट्टी घेतलीस म्हणुन मी तुझ्यावर खर तर नाराज आहेच.. बट तु मी दिलेलं काम वेळे आधीच कम्प्लिट करून दिलयस त्यामुळे इट्स ओके आणि थेंक्स.  मला तुला तुझ्या सुट्टी दिवशी डिस्टरब नाही करायचय बट मी तुला कालच सांगितलंय खुप काम आहेत.. गरज लागेल तुझी..

वृषभ : मी बोललो ना तुला मी तुझं काम करायला तैयार आहे. बट मला कँटीन्युअसली लॅपटॉपवर काम करायला नाही जमणार रे.. मला जस जमेल तसं करेल मी.. पण तु दिलेलं काम मी कम्प्लिट करेल..

विराज : ओके.. सांभाळुन जा..

वृषभ : थेंक्स एन्ड बाय.. 

श्री : काय मग वृषभ.. बॉस कसा आहे तुझा??

(वृषभने फोन ठेवल्या ठेवल्या श्री त्याला बोलतो)

वृषभ : खुप म्हणजे खुप छान.. 

श्री : काम जमत ना??

वृषभ : हो..

समीरा : आत्ता तो आणि त्याचा बॉस बघुन घेईल ना दादा.. मी निघु??

श्री : हम्मम.. सांभाळुन जा..

समीरा : हो.. बाय

वृषभ : बाय दादा...

समीरा आणि वृषभ श्री ला बाय करत फ्लाईटमध्ये येऊन बसतात..

समीरा : वृषभ एक सेल्फी घेऊयात.. आपण इथुन निघालोय हे ग्रुपमध्ये टाकुयात.

वृषभ आपल्या दोन्ही हाताची दोन बोट दाखवत छानसी पॉज देतो... सोबत समीरा पण.. दोघेही एकमेकांसोबत छान असे सेल्फी घेतात.. समीरा तिने घेतलेले फोटॉ लगेचच त्यांच्या ग्रुपवर टाकते पण वृषभला टॅग करत ती FB वर सुद्धा टाकते..

मॅम प्लिज स्विच ऑफ युअर सेलफोन.. एअर हॉस्टेस तिच्या जवळ येत तिला रिक्वेस्ट करतच बोलते..

ओके.. अस बोलत आपला फोन स्विच ऑफ करत ती आपल्या बेगेत टाकते..

समीरा : मुंबईत आवडतंय तुला??

वृषभ : न आवडुन कुणाला सांगु ग.. तु माझं सोड तुझं बोल.. तुझं काय चाललंय.?

समीरा : काही खास नाही.. आहे तशीच आहे लाईफ.. जुन्या आठवणींमधुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेय मी. त्यात घरी आहे म्हणुन जास्त चिडचिड होत असते माझी.. 

वृषभ : समीरा.. थोडा वेळ लागेल बट होईल सगळं नीट..

समीरा : USA गेलाय ना तो??

वृषभ : तुला कस माहिती??

समीरा : फेसबुक पुन्हा एक्टिव्ह केलय त्याने.. त्यात एड आहे मी त्याला.. मी म्हणजे आपण सगळेच आहोत.. Back to Newyork अश्या मॅसेज सोबत स्वतःचा फोटो टाकला होता त्याने.. तेव्हा कळलं.

वृषभ : हम्मम.. 

(समीरा खिडकीबाहेर एकटक बघत असते..)

तु रडतेयस??

(समीरा काहीच बोलत नाही शांत बसून असते..  वृषभपासुन आपलं तोंड लपवत ती खिडकीबाहेर बघत असते)

समीरा look at me.. वृषभ तिचा हात पकडतच तिला बोलतो.. खिश्यातुन रुमाल काढतच तो तिच्या हातात देतो.. 

वृषभ : आरे यु ओके??

समीरा : हम्मम..

वृषभ : समीरा तुला तुझा परफेक्ट लाईफ पार्टनर मिळेल तेव्हा तु आपणच विसरशील ग त्याला.. जी गोष्ट आपली नाही त्या गोष्टीचा का विचार करायचा आपण..?? जे आपलं आहे ते आपल्याला नक्की मिळत.. आपल्या सोबत एक गोष्ट वाईट झाली ना समीरा दुसरी खुप चांगली गोष्ट आपल्यासाठी नक्कीच असते.. थोड उशिराने का होईना पण नक्की भेटते..

समीरा : बर माझं सोड.. तुला कोणी भेटली का नाही इथे मुंबईत राहुन..

वृषभ : माझे आई पप्पा बोलतील तिच्याच गळ्यात मी मंगळसूत्र घालेल.. 

समीरा : आणि त्याआधीच कुणाच्या प्रेमात पडलास तर..

वृषभ : मी प्रेमात तर पडलोय.. पण बरोबरी नाही करू शकत ग मी तिची...

समीरा : कोणाच्या प्रेमात पडलायस तु??

वृषभ : नाही सांगु शकत ग..

समीरा : ए वृषभ मी तुला बेस्ट फ्रेंड मानते. मी तुला माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करते आणि तु..

वृषभ डोळे मिटुन शांत बसुन रहातो..

वृषभ सांगणा... समीरा त्याच तोंड आपल्याकडे करतच बोलली..

वृषभ तिच्याकडे बघतो.. 

(वृषभ कोणाच्या प्रेमात पडला असेल?? तुम्ही सांगु शकाल?? पाहुया पुढील भागात.. पण त्या आधी हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all