अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 11

क्रमशः

समीराला मात्र शौर्य अस का वागला हे कळतच नाही.. 

समीरा : काय झालं त्याला?? अस रागात का निघुन गेला तो?? कोणी काही बोलल का त्याला??

मनवी : मागासपासून तर बराच होता तु आल्यावरच काही तरी होत त्याला..

मनवी समीराला चिडवतच बोलली.. सीमा ही हसु लागली..

सीमा : काय ग होतीस कुठं?? तो किती वाट बघत होता तुझी??

समीरा : कोण??

सीमा : शौर्य ग..

समीरा : आता बस हा..

सीमा : अग खरच..  पण तू होतीस कुठे??

समीरा : ते सगळं सोडा हे बघा..

समीरा हातातला डब्बा दोघींच्या पुढे करतच बोलली..

सीमा : वाव्ह.. डिंकाचे लाडू..

सीमा डब्यात हात घालुन लाडु खाणार तोच समीरा ने हातावर फटका मारला..

समीरा : आधी हात धु ते आणि मग खा.. भरपुर दिलेत आईने पाठवुन..

सीमा : तुझी आई आलेली हे लाडु घेऊन?? (सीमा थोडं चकित होतच विचारते)

समीरा : नाही ग आई कसली येतेय दादा आलेला. त्याची मिटिंग होती इथे..

मनवी : अग आत तरी आणायचंस त्याला, आम्हीही भेटलो असतो त्याला..

सीमा : होणं..

समीरा : अग मिटिंगमधुन निघायला त्याला उशीर झाला आणि त्याची फ्लाईट होती अर्ध्या तासाने.. म्हणुन घाईतच निघाला तो. नेक्स्ट टाईम आला की नक्की भेटतो बोलला.

इथे शौर्य रूममध्ये येऊन बसला..

टॉनी आणि राजसुद्धा त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये शिरले..

टॉनी : ती समीरा आल्यावर तु अस रागात का आलास..

शौर्य : ते मला झोप आली म्हणुन..

टॉनी : नक्की?? का अजुन काही..

शौर्य : अरे आज प्रॅक्टिसच तशी केलीय आम्ही तो वृषभ बघा झोपला पण असेल.

बर तु आराम कर संध्याकाळी भेटुयात अस बोलत दोघेही आपापल्या रूममध्ये निघतात..

शौर्य मात्र समीराचा विचार करत राहतो..

ह्या पुढे शक्य होईल तेवढं समीरापासुन लांब रहायच तो मनात पक्क करतो..आणि त्याचप्रमाणे तो वागायला सुरवात ही करतो..

कॉलेजमधील लेक्चर तिथुन स्पोर्ट प्रॅक्टिस आणि मग हॉस्टेल अस शौर्य स्वतःच टाईम टेबल बनवतो.. समीरा स्पोर्ट हाउसमध्ये भेटेल म्हणून शौर्य स्पोर्ट हाउसमध्ये जाण देखील टाळतो.

इथे स्पोर्ट हाऊसमध्ये समीराच्या दादाने आणलेल्या लाडूची स्तुती करत शौर्य वगळता सगळ्यांनी त्यावर ताव मारत फस्त केले. समीराने शौर्यसाठी आधीच थोडे जास्तीचे लाडु आधीच बाजूला काढुन ठेवले होते पण तो तिला दोन दिवस भेटलाच नव्हता त्यामुळे लाडुचा डब्बा तसाच तिच्या बेगेत होता.. शेवटी न राहवून तिने वृषभला शौर्यबद्दल विचारायचं ठरवले. वृषभ प्ले हाउसमधुन रूमवर परतत असताना समीरा त्याला गाठते.

समीरा : वृषभ मला थोडं बोलायचं होत तुझ्याशी..

वृषभ : अग मग बोल की, एवढी फॉर्मेलिटी कश्याला हवीय.

समीरा : वृषभ शौर्यला काही प्रॉब्लेम आहे का??

वृषभ : नाही ग.. का तु अस का विचारतेस..??

समीरा : हे लाडु द्यायचेत त्याला..

वृषभ : ते तुझ्या दादाने आणलेले का?? 

समीरा मानेनेच हो म्हणते...

वृषभ : अजुन संपले नाही का??

समीरा : संपले.. म्हणजे एवढेच उरलेत.. शौर्यने नाही खाल्ले. त्यालाच द्यायला काढलेत

वृषभ : मग तूच दे की त्याला..

समीरा : मी द्यायला तो भेटतच नाहीना. लेक्चर संपताच तो स्पोर्ट प्रॅक्टिसला पळुन जातो. पहिलं निदान हाय हॅलो करून तरी करून जायचा पण दोन दिवास झाले साधं गुडमॉर्निंग सुद्धा करत नाही. नक्की त्याला काही टेन्शन वैगेरे नाही ना??

वृषभ : अग तस काही नाही.. स्पोर्ट प्रॅक्टिसमुळे दमत असेल ग..

समीरा : बर.. ऐकणं..तु आता रूमवर चालला आहेस ना मग तूच दे ना त्याला प्लिज...

वृषभ : बर..

समीरा : तुला ही एक दोन घेऊ शकतोस त्यातले.. जास्तच आहेत..

वृषभ : थेंक्स.. ए बट उद्या मॅच बघायला ये.. 

समीरा : नक्की.. पण तु आधी लाडु दे शौर्यला नक्की..

वृषभ : हम्म बाय..

वृषभ समीराला बाय करत शौर्यच्या रूममध्ये शिरतो..

शौर्य लॅपटॉपवर मूव्ही बघत बसलेला असतो.. वृषभ लाडूने भरलेला डब्बा त्याच्या पुढे धरतो..

अचानक वृषभचा हात दिसल्याने शौर्य दचकतो..

शौर्य : वृषभ यार.. घाबरलो ना.. एक तर हॉरर मूव्ही बघतोय. त्यात तु असा भुतासारखा येऊन हात मध्ये घातलास..

(लॅपटॉप मधला मूव्ही पॉज करतच शौर्य वृषभला बोलला..)

वृषभ : हे खा मग बर वाटेल..

लाडु.. कोणी आणले.. डब्यातील लाडु खातच शौर्य वृषभला बोलला.

वृषभ : खाताना किती ते प्रश्न..

शौर्य : ए मी अजुन एक घेऊ का?? खुप भारी आहेत..

वृषभ : हे सगळे तुझ्यासाठी आहेत.. उलट मीच तुला विचारायला हवं.. मी एक घेऊ का??

शौर्य : माझ्यासाठी?? कोणी दिले..

वृषभ : समीराने..

नको मला मग. आधी सांगितलं असत तर तोही खाल्ला नसता.. शौर्यने हातात घेतलेला लाडु तसाच पुन्हा डब्यात ठेवला आणि हेडसेट कानाला लावत पुन्हा मूव्ही बघायला लागला.

वृषभ : तुला झालय काय?? ती समीरासुद्धा बोलत होती की तिला तु भेटतच नाहीस.. साधं गुड मॉर्निंग सुद्धा करत नाहीस..

शौर्य मुव्ही बघण्यात मग्न होतो...

वृषभ मुव्ही पुन्हा पॉज करत शौर्यला विचारतो.. मी तुझ्याशी बोलतोय शौर्य.  काय झालं ते सांगशील??

शौर्य : काही नाही.. मला ती नाही आवडत आणि तिने दिलेली कोणतीच गोष्ट..

वृषभ : पण का??

शौर्य : मला नाही माहीत..

वृषभ : इथे बघ काय झालं ते सांग आधी बघु..

शौर्य : तिचा बॉयफ्रेंड आहे.

वृषभ : कधीपासून?? आय मिन तुला कोण बोललं..

शौर्य : कोण कश्याला बोलायला हवं मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं..

शौर्य त्यादिवशी त्याने बघितलं ते सांगितल..

वृषभ जोरातच त्याच्या डोक्यात मारतो..

वृषभ : अरे मुर्खा तो तिचा दादा होता. तिचा सख्खा मोठा भाऊ. तोच तर लाडु घेऊन आलेला हे. कसला भारी संशयी आहेस रे तु??

शौर्य : अरे आता मला कस माहीत असणार तो तिचा भाऊ आहे. एवढं त्याला ती मिठी मारत होती मग मला असच वाटणार ना..

वृषभ : अरे मग एकदा भेटुन बोलायचं. लगेच तु भावाचा बॉयफ्रेंड केलंस. ती बिचारी रोज स्पोर्ट हाऊसमध्ये नाही तर त्या केंटींगमध्ये तुझी वाट बघत असते. स्वतःने पण कमीच लाडु खाल्ले असतील पण तुझ्यासाठी बघ तिने जास्तीचे पाठवून दिलेत. उलट ती मला विचारत होती शौर्यला कसल टेन्शन नाही ना... आणि तु.. तिला जर कळलं ना तु ह्या कारणाने तस इग्नोर करत होतास तर तिला हर्ट होईल खुप.

शौर्य : आय एम सॉरीना वृषभ. बट तु तिला हे सगळं सांगु नकोस प्लिज.

वृषभ : नाही सांगत. पण ह्यापुढे नात्यात अस गैरसमज जरासुद्धा निर्माण होऊ देऊ नकोस.

थेंक्स यार..

वृषभ : नुसतं थेंक्स बोलून नाही चालणार मी दोन लाडु घेणार त्यातले..

वृषभ भुवया उडवतच बोलु लागला..

शौर्य : एकच मिळेल. ते माझ्यासाठी आहेत..

(शौर्य डब्बा स्वतःच्या मागे लपवत म्हणाला)

वृषभ : काही मिनिटांपूर्वी तुला ते नको होते..

शौर्य : आता मला ते हवे आहेतरे पण जाऊ दे तू घेऊ शकतोस दोन. तु पण काय याद राखशील..
(शौर्य डब्बा वृषभच्या पुढे करत बोलला)

वृषभ : नकोरे मला मी असच बोललो. मला गोड नाही आवडत जास्त.. मी निघतो.. उद्याची तैयारी करतो.

शौर्य :  हम्म बाय.

★★★★★

दुसऱ्यादिवशी स्पोर्ट्स चालु होणार होते. दिल्लीतील तीन नामांकित अश्या कॉलेजनी आज इंटर कॉलेज फुटबॉल मॅचेसमध्ये आपली उपस्थिती दाखवली होती. सुरुवातीचा सामना MK college VS SK college असा होता. MK college मधून शौर्यची केप्टनमधुन निवड करण्यात आलेली.. टॉस उडवण्यासाठी दोन्ही टिमच्या केप्टनला बोलवण्यात आलं.. शौर्य ग्राऊंडवर येताच संपुर्ण ग्राउंडवर त्याच्या नावाचा जल्लोष होऊ लागला.. शौर्यने एक नजर ओडियन्स वरून फिरवली. त्याची नजर समीराला शोधत होती.. आणि तोच दुरून दोन्ही हात हलवत तिने त्याला आपण आलोय ह्याची खात्री करून दिली., शौर्यने ही क्षणाचा विलंब न करता तिला हात दाखवला.

राज : आम्ही इथे आवाज देत होतो ते राहील बाजुला.. ह्याला फक्त ही समीराच दिसली वाटत

समीरा : ए राज.. काहीही काय बोलतोस. त्याने तुम्हा सगळ्यांना हात दाखवला.

राज : राहु दे ग समीरा तुला त्याच्या भावाना समजल्याना मग झालंच..

समीरा रागातच राजकडे बघते..

राज उठुन समीरा पासून थोडस लांब.. म्हणजे टॉनी आणि मनवीच्यामध्ये जाऊन बसतो

थोड्याच वेळात मॅचला सुरुवात झाली.. 

शौर्य नेहमीप्रमाणे आपली कमाल फुटबॉलवर दाखवत होताच सोबत त्याच्या टीमची ही साथ मिळत होती.

समोरच्या टीमला चकवा देत एका मागून एक गॉल तो अगदी सहज करत असतो.

संपुर्ण ग्राउंडवर शौर्यच्या नावाचा जल्लोष होत असतो.

मनवी : नुसतं शौर्य शौर्य काय.. बाकीचे लोक सुद्धा खेळत आहेत ना का एकटा शौर्यच खेळतोय..

(मनवीला अस वाटत असते की रोहनच पण नाव घ्यावं)

टॉनी : तुला गेम कळतो ना?? नाही म्हणजे कोण चांगलं खेळतय हे दिसतच असेल..

मनवी : शौर्य येण्याआधी तर संपूर्ण ग्राउंडवर रोहनचच नाव असायच.

राज : हो का मग तेव्हा कधी का नाही बोललीस की फक्त रोहनच खेळतो का म्हणुन?? आता बोल.. बोल...

मनवी : ते मला आत्ताच सुचलं..

राज : चल झुठी..आम्हाला माहीत आहे..आम्हाला रोहन ने सांगितलंय सगळ.

मनवी : काय??

राज : वो तेरा बॉयफ्रेंड.. तु उसकी गर्लफ्रेंड.. ना ना ना ना...

मनवी : बस.. (मनवी थोडं लाजतच बोलली)

सीमा : ए तु चुकीचं गाणं बोलतोयस. ते गाणं वेगळं आहे.. मे तेरा बॉयफ्रेंड तु मेरी गर्ल फ्रेंड वो मेनु केंदी ना ना ना ना.. अस आहे.. मी तुला लिरिक्स दाखवते थांब.

राज : किती ग ते भोळ लेकरू ग ते.. (राज सीमाला चिडवतच बोलु लागला). पण कस असत सीमा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव लहान मुलांनी की नाही मोठ्यांच्या बोलण्यात पडायच नसत.. मोठी माणसं बोलताना आपले कान आणि हे तोंड बंद ठेवायाचे..

टॉनी : ए राज जरा शांत बस ना..

राज शौर्य... शौर्य... म्हणून मुद्दामुन मनवीच्या कानाजवळ ओरडत राहतो..

मनवी दोन्ही हात कानाला लावून मॅच बघते.

M K College ही मॅच अगदी सहज जिंकते आणि फायनल मध्ये जाते.. संपुर्ण टीम शौर्यला खांद्यावर घेऊन त्याच कौतुक करतात. 

सेमी फायनलसोबतच फायनलची ट्रॉफी देखील M K कॉलेज पटकवतो. आणि डिस्ट्रिक्ट लेव्हल मध्ये आपली एन्ट्री करतो. 

M K कॉलेजच्या फुटबॉल टीमच पहिल्यांदाच डिस्ट्रिक्ट लेव्हल साठी सिलेक्शन झालेलं असत त्यामुळे सरही शौर्यच भरपूर कौतुक करतात. डिस्ट्रिक्ट लेव्हलची मॅच पुढील आठवड्यात होणार ह्याची अनाऊन्समेंट सर करतात. सगळे खुप खुश असतात शिवाय मनवी.. 

मनवीला अस वाटत असते की जर शौर्य नसता तर आज रोहनमुळे ही मॅच आपण सहजच जिंकलोच असतो. तरी संपुर्ण ग्राऊंडवर कोणीही रोहनच्या नावाचा जल्लोष केलाच नाही..

राज : आपण केंटिंगमध्ये जाऊन बसूयात ही लोक येतील..

राज ने बोलताच सगळे तिघांची वाट बघत केंटींगमध्ये जाऊन बसतात..

जवळपास अर्ध्या तासाने तिघेही कपडे बदलुन कॅंटिंगमध्ये येतात.

शौर्यला तर कधी एकदाच समीराला भेटतो अस झालेलं असत..
समिराच्या जवळ पोहचताच शौर्य समिराला गोड स्माईल देतो. समीरा लगेच हात पुढे करत शौर्यला कॉंग्रेच्युलेशन करते. तिचा तो मुलायम हाताचा स्पर्श शौर्यच्या मनावर पुन्हा जादु करतो. दोघेही तसेच एकमेकांचा हात पकडुन एकमेकांकडे पहात उभे रहातात..

राज : समीरा, ए समीरा.. हात सोड ना ग त्याचा.. नाही म्हणजे आम्हाला पण त्याला कॉंग्रेच्युलेशन करायचं म्हणुन बोललो..

राजचा आवाज ऐकताच समीरा तिला लागलेल्या प्रेम धुंदीतून बाहेर येते. पटकन शौर्यच्या हातातुन आपला हात सोडवत ती पुढे आलेली केसांची बट कानामागे सरकवतच थोडीशी स्वतःला सावरते.

सगळे तिघांचही कौतुक करतात व आता पूढे असणाऱ्या डिस्ट्रिक्ट लेव्हलसाठी तिघांनाही खुप साऱ्या शुभेच्छा देतात.

समीरा : ए आईसक्रीम पार्टी करूयात.. 

शौर्य : माझ्याकडुन सगळ्यांना..

सीमा : मला चॉकलेट..

मला पण..

मला बटरस्कॉच.. अस बोलत सगळे जण आपापले चॉईज सांगु लागतात. 

शौर्य सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणायला जातो. 

समीरा : मी पण येतेच

सीमा : आता तु कुठे चाललीस??

समीरा : मला चॉकलेट फ्लेवर नकोय त्या ऐवजी स्टोबेरी फ्लेवर हवाय तेच शौर्यला सांगायला जाते.

एवढं बोलुन समीरा तिथुन निघाली

शौर्य दिसताच समीरा त्याला आवाज देते..

शौर्य : तु का आलीस?? आय मीन तुला काही हवं आहे का??

समीरा : हो म्हणजे मला चॉकलेट फ्लेवर नकोय स्टोबेरी हवंय तेच सांगायला आली.

शौर्य : बर. आणि काही हवं..

समीरा मानेनेच नाही बोलत तिथुन निघु लागली. तिला अस वाटत होतं की शौर्यने तिला थांबवावं.

दोन तीन पाऊल पुढे जाताच पुन्हा मागे वळून पहाते पण शौर्य दुकान दाराशी बोलत असतो. ती तशीच नाराज होऊन जाऊ लागते. 

समीरा.... शौर्य तिला आवाज देतो तशी ती थांबते. मागे वळुन बघते. शौर्य तिला स्वतःकडे बोलवत असतो. एक वेगळंच हसु तिच्या ओठांवर आलेलं असत. तेच हसु थोडं लपवत ती शौर्यकडे जाते.

शौर्य : अग तुझी एक वस्तु मी माझ्याकडेच ठेवलीय.

समीरा : कोणती??

शौर्य : अग तुझा डब्बा.. तु लाडु दिलेलेस ना पाठवुन..

समीरा : ओहह.. तुला आवडले??

शौर्य : हो खूप.. सुंदर झालेले.. वृषभने दिल्या दिल्या खाल्ले मी आणि थेंक्स..

समीरा : ए पण तू दोन दिवस होतास कुठे?? आणि एकटा रूमवर काय करत राहतोस. यायचं ना प्ले हाउसला. ऐकट बॉर नाही होत का तुला??

शौर्य : कसल बॉर?? मी तर लॅपटॉपवर मु..... (शौर्यमध्येच थांबतो. शट मी काय बोलुन गेलो हे..)

समीरा : तुझ्याकडे लॅपटॉप आहे?? आणि तु लॅपटॉपवर टाईमपास करायचास ना मग तु प्ले हाउसला का नाही यायचास.. 

शौर्य : टाईमपास नाही ग.. काम करायचो..

समीरा : तुला कसल काम आलंय??

शौर्य : ते... अ..(शौर्यला काय बोलावं ते सुचत नव्हतं) डेटा एन्ट्री.. हा.. डेटा एन्ट्री करत होतो. पार्ट टाईम जॉब.

शौर्य आईस्क्रीम वाल्याला पैसे देतच बोलला..

समीरा : एक मिनिट.. भैया इनके पैसे वापीस देदो.. मे देती हु पैसे..

समीराने शौर्यने दिलेलं पैसे पुन्हा त्याला देत स्वतः पैसे दिले.

शौर्य : अग समीरा राहु दे ना तु का देतेयस पैसे..

समीरा : शौर्य तु पार्ट टाईम जॉब करून पैसे कमावतोस ते असे वेस्ट नको ना करुस आणि हो मी नाही सांगत कुणाला की आईसक्रीमचे पैसे मी दिलेत ते.. ओके. चल ती लोक वाट बघत असतील आपली..Let's go before it's start to melt..

समीरा एक गोड स्माईल देत थोडे आईस्क्रीमचे कोण हातात पकडत शौर्यशी बोलतच तिथुन निघाली.

शौर्य मात्र तिच्या त्या निरागस वागण्यावर अगदी फिदा झाला. किती सहज तिला माझं बोलणं पटलं. आईस्क्रीम खाताना तो हळुच तिच्याकडे बघत होता. समीरादेखील दोन दिवसांनी का होईना शौर्य तिच्याशी बोलतोय म्हणुन खूपच खुश होती. 

 वृषभ आणि शौर्य खुप थकल्यामुळे आईस्क्रीम खाऊन होताच ते आपापल्या रूममध्ये जायला निघतात. रोहनसुद्धा मी घरी जातो अस सगळ्यांना सांगुन तिथुन निघतो. राज टॉनीकडे बघतो. 

टॉनी : आपण पण रूमवर जाऊयात.

बाय गर्ल्स करत ते ही निघतात.

मनवी : आता तुम्हीही जाणार का??

सीमा : आपण गार्डनला जाऊयात??

समीरा : चला..

समीरा शौर्यच्या विचारांत हरवुन गेलेली असते..

सीमा आणि मनवीची मात्र मस्ती चालु असते..

मनवी : ए समीरा तु कोणाच्या विचारात हरवुन गेलीस??

समीरा : अजुन कोणाच्या.. शौर्यच्या ग..

सीमा : बघा मॅडम प्रेमात पडल्यात मी तुला बोलली होती ना ग मनवी??

समीरा : अग प्रेमात नाही. तुम्हाला माहिती शौर्य पार्ट टाईम जॉब करतो. डेटा एन्ट्रीचा. म्हणजे त्याच्या घरातली परिस्थिती बहुतेक चांगली नसावी. त्याच्याच विचार करतेय एवढं असुनसुद्धा तो आज सर्वांसाठी आईस्क्रीम घेऊन आला.. म्हणजे त्याने कधी अस दाखवुन नाही दिल ना आपल्याला.

मनवी : आणि तु त्याच्या प्रेमात आहेस??

( मनवी थोड मिश्किलपणे हसतच बोलली)

समीरा : अग मनु काय बोलतेस..

मनवी : कम ऑन समीरा तु 21 सेंच्युरी मध्ये राहतेस. तुला काही सांगाव लागेल असे मला वाटत नव्हतं. तुझं सोड मी माझं सांगते. माझ्या लाईफ पार्टनर बद्दल मी तीन गोष्टी माझ्या डोक्यात ठेवल्यात.. हँडसम, रिच अँड वेल प्रॉपर्टी लाईक बंगलो, फॉर विलर अँड ब्ला ब्ला ब्ला..

सीमा : म्हणुन रोहनला पटवलस??(सीमा थोडं मस्ती करतच बोलली)

मनवी : ऑफ कोर्स..

समीरा : त्याच्या पेक्षा कोणी जास्त रिच भेटलं मग.??

मनवी : रोहनपेक्षा अजुन कोणी रिच भेटणं इम्पोसीबल..

समीरा : मला अस नाही वाटत ग. लाईफ पार्टनर बद्दलची माझी व्याख्या थोडी वेगळी आहे पण तुला सांगून ती नाही समजणार. 

मी जाते रूमवर.. एवढं बोलुन समीरा तिथुन रूमवर जायला निघाली.

इथे शौर्यला तो समीराशी खोट बोलला त्याबद्दल खुप वाईट वाटत असत. पण खरं सांगितलं असत तर समीरा नाराज झाली असती. मी तिच्या भावाला तिचा बॉयफ्रँड समजलो हे तिला जरा पण आवडलं नसत.. दोघेही खर एकमेकांच्या विचारत हरवुन जातात.

क्रमशः

(पुढे काय?? समीराला जेव्हा कळेल शौर्य आपल्याशी खोट बोलला तेव्हा काय होईल?? डिस्ट्रिक्ट लेव्हलची मॅचसुद्धा M K कॉलेज जिंकेल?? भेटूया पूढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all