Nov 30, 2020
प्रेम

अतरंगीरे एक प्रेमकथा भाग १०८

Read Later
अतरंगीरे एक प्रेमकथा भाग १०८

विराज बेडवर ठेवलेलं इन्वेलोप हातात घेतच अनघाकडे बघतो..

अनघा : शौर्यनेच ठेवलं असेल.. उघडुन बघ..

विराज इन्वेलोप उघडुन बघतो तर त्यात कॅश असते.. सोबत विराजच डेबिट कार्ड आणि अनिताच क्रेडिट कार्ड असत.. 

अनघा : कॅश??

विराज : ते त्याने माझ्या कार्डमधुन सोळा हजार घेतलेले.. मे बी तेच असतील.. अस का देऊन गेला पण हा.. किती राग करतोय ग हा?

अनघा : तु काल त्याचा राग करत होतास ते कमी होत का विराज?? त्याला न सांगता, त्याला न विचारता मुळात त्याची परमिशन न घेता तु त्याच तिकिट बुक केलंस.. हे सगळं तु आणि मम्मीनी मिळुन रागातच केलात ना?? एकदा त्याने पण असच तुला न विचारता स्वतःच तिकीट बुक केलेलं.. तेव्हा तु किती हर्ट झालेलास विराज.. हर्ट होण्यापेक्षा त्याच्यावर असच भडकलेलास.. आणि तेव्हा सुद्धा हात उचलला होतास.. त्याने तर तस काहीच केलं नाही ना विराज.. तु मला न विचारता माझं तिकिट का बुक केलंस?? असा सादा जाब सुद्धा त्याने तुझ्याकडे येऊन विचारला नाही.. तु बोलवलस तो तुझ्यासाठी इथे इंडियात आला.. तुझा कोणताच शब्द तो पडु देत नाही. ज्यादिवशी तो USA वरून इंडियात आला त्यादिवशी सुद्धा तु त्याला खुप रडवलेलंस विराज आणि आज इंडियासोडुन USA जाताना सुद्धा तु खुप रडवलस त्याला.. ह्या दोन महिन्यात तु काय आणि कसा वागलास त्याच्यासोबत ह्या गोष्टीचा विचार कर एकदा...

विराज : अनु रात्री अपरात्री घराबाहेर फिरण चांगलं दिसत का?? रात्री दिड वाजता तो मुलगा घरी आलाय.. घरात कुणाला न सांगता घराबाहेर पडु नकोस हे खुपदा बोललोय मी त्याला. रात्री अपरात्री घराबाहेर राहुन खुप पराक्रम करतो तो तुला नाही माहिती..

अनघा :  नैतिकचा बर्थडे होता विराज.. शौर्यच्या बर्थडेला रात्रभर जागे राहुन ती लोक आपल्याला मदत करत होती रे आणि आधीपासूनच खुप मदत करत आलीयत ती आपल्याला.. आपल्या प्रीवेडिंग शुट पासुन ती सगळीच आपल्या सोबत होती ते थेट आपलं रिसेप्शन होईपर्यंत.. आणि त्याचा एक पण मित्र वाईट नाही हे आपल्याला पण माहिती ना.. एकमेकांची किती काळजी आहे त्यांना हे पण तुला माहिती.. त्याच्या मित्राच्याच बर्थ डे ला गेलेला रे तो.. तु तरी समजुन घ्यायला हवं ना. श्री ने रात्री 2 वाजता तुला फोन करून बोलवलं तर तु जाशीलच ना??

विराज : पहिली गोष्ट म्हणजे तो जे नको ते उद्योग बाहेर जाऊन करतो तसले मी नाही करत.. आणि तु बोलतेस तस जर मला श्री साठी जावंच लागत असेल तर घरी तस मम्माला नाही तर तुला सांगून जाईल.. अस न सांगता जाणार नाही..

अनघा : आणि जर तुला खात्री असेल मम्मी नको जाऊ बोलतील पण श्री ला खरच गरज असेल तर??

विराज : मला नाही माहीत मी काय करेल..

अनघा : तु तेच करशील जे शौर्यने केलंय.. बट तुला ते बोलता येत नाही.. 

विराज : एक मिनिट अस काही नाही.. मम्मा नाही बोलली मग मी नाही जाणार..

अनघा विराजच्या अश्या उत्तरामुळे त्याच्याकडे बघतच रहाते..

तु अस का बघतेयस आत्ता?? मी खरच नाही जाणार.. मला माझी फॅमिली जे बोलेल तेच मी करेल..

अनघा : शौर्य तुझ्याबद्दल बोलतो ते 100% करेक्ट आहे.. यु आर रिअली मम्मास बॉय.. 

विराज : एक मिनिट ह्यात मम्मास बॉय बोलण्यासारखं काय आहे?? मित्रांपेक्षा फॅमिलीला इंपोर्टन्ट दिलं मग मम्मास बॉय झालो का मी?? आणि मला एक कळत नाही आपल्या आईची प्रत्येक गोष्ट ऐकली की तुम्ही दोघ मम्मास बॉय कस काय बोलतायत मला..??

अनघा : विराज प्लिज वाद नकोयत मला.. तुला पण माहिती तु चुकलायस.. एक्सेप्ट इट्स.. 

विराज : काय चुकलोय अनु मी..? तुला माहितीय का तो मला मी त्याच्या रूममध्ये असतांना काय बोलला ते?? नंतर नंतर तुझा डॅड पण मम्माला समजुन घेत नव्हता तेव्हा ती कोणी तिसरा शोधायला का नाही गेली?? मे बी शोधला पण असेल पण ते सुद्धा आपल्यापासून लपवल असले अस बोलला तो.. आणि अजुन सुद्धा नको ते बोलत होता.. म्हणुन मारलं मी त्याला.. तो एकदा बोलायला लागला ना वेड्यासारखं काहीही बोलतो तो.. आय नॉ मम्मा चुकलीय बट तो पास्ट होता यार तिचा.. शौर्य बोलतो तस त्याला मम्माने वेळ नाही दिला.. तिला नव्हतं जमत सगळ काही हँडल करायला पण मी तर त्याच्यासोबतच असायचो ना.. तो त्या गोष्टीचा का नाही विचार करत आहे.. सारख सारख का बोलुन दाखवायचं मम्मा टाईम नाही देत एन्ड ऑल.. यु नॉ व्हॉट त्याचे जेवढे मी लाड करतो ना तेवढे लाड तर माझे सुद्धा माझ्या डॅडने केले नाहीत.. त्याला जेवढा टाईम मी माझ्या लाईफमधला दिलाय तेवढा टाईम तर मम्मा आणि डॅड दोघांनी मिळुन मला सुद्धा नाही दिलाय.  त्याला काही झालं तर मला सिरियसली त्रास होतो.. मला त्याला मारताना आनंद होत नव्हता बट तो जे बोलत होता ते खरच चुकीच होत.. आणि अजुन नको ते बोलु नये म्हणुन मी मारलं त्याला.. तरीही ऐकतच नव्हता तो.. मी पण सॅम असच डॅड वर भडकलेलो जेव्हा त्याच्या चुकीच्या वागण्याचा त्रास होऊ लागला मला.. जसा शौर्य मम्मावर भडकत होताना अगदी सॅम तसच.. परिणाम काय झाला..?? तो नाही सहन करू शकला ग.. मम्माला अस काही होऊ नये म्हणुन मी त्याला शांत करत होतो. नाही तर मी त्याच दिवशी तिच्या मनातील काकाबद्दलचा गैरसमज दूर केला असता ना.. मला पण माहिती होत काका काय बोलला ते.. शौर्यला USA पाठवुन मी तिच्यासोबत ह्या सगळ्या विषयांवर बोलणारच होतोच ना.. तुला बोललो पण होतो मी. ट्राय टु अंडरस्टॅन्ड अनु तु तरी त्याच्यासारख नको बोलुस.. शौर्य समजतो ना तेवढा तो मोठा नाही झालाय.. आय नॉ त्याच डोकं सुपर फास्ट आहे बट नको तिथे जास्तच चालत ते.. आणि हा मुलगा रात्री अपरात्री अशीच मारामारी करत फिरतो हे ह्या आधी दोनदा तीनदा झालंय.. पोलिस कॅज होता होता राहिलीय.. समोरच्याला मारताना कसाही मारतो तो.. रागात कसल्याच गोष्टीचा विचार नाही करत तो.. हा रॉबिन येतोना त्याचेच डॅड ह्याच्यावर पोलिस कॅस करणार होते.. डोकं फुटेपर्यंत मारलेल ह्याने त्याला.. ह्याच्या अश्या मारामाऱ्या होऊ नये म्हणुन मम्मा आणि मी त्याच्यावर असे रुल्स एन्ड रेग्युलेशन लावतो आणि रात्रीच घराबाहेर नको जाऊ बोलतो.. मला हौस नाही आहे त्याच्यावर हात उचलायची बट तो खरच काल नको ते बोलत होता ग.. तुम्हा लोकांना वाटत मी चुक केली तर ठिक आहे मी केली चुक.. बट त्याच्या आजच्या वागण्याने आय रिअली हर्ट... आणि त्याच्या बाबाच नव्हतं प्रेम तर का लग्न केलं मम्मासोबत?? तिची पण लाईफ स्पोईल केलीच ना त्याने.. निदान त्याला योग्य वेळी कळलं होतं ना?? मग तेव्हाच का नाही माघार घेतली.. दुसरी गोष्ट म्हणजे काकाने आधी मम्मासोबत बोलुन गोष्टी क्लिअर करायला हव्या होत्या मग जाऊन आपल्या भावाला सांगायला हवं होतं मम्माच माझ्या डॅडसोबत अस काही आहे.. गैरसमज तर त्यांनी पण क्रिएट केलाय ना. हे बोललो मी त्याला मग मी चुकीच बोललो का??.. पास्ट काढायला गेलो ना तर सगळ्यांच्या चुका बाहेर निघतील आत्ता.. आणि आपण होऊन गेलेल्या गोष्टी डिस्कस का कराव्यात..? आपल्या आई वडिलांच्या चुका काढण्या इतपत आपण मोठे नाही आहोत.. परिस्थिती माणसाला वागायला तस मजबूर करते ग.. हे शौर्यला अजुन नाही कळत पण तुला तरी कळायला हवंना.. 

अनघाला सुद्धा विराजच म्हणणं पटत ती विराजजवळ येऊन त्याला घट्ट मिठी मारतच त्याला सॉरी बोलते..

विराज  : प्लिज मम्मास बॉय वैगेरे नको बोलत जाऊस निदान तु तरी.. 

अनघा : सॉरी.. परत नाही बोलणार.. (अनघा आपले दोन कान धरतच विराजला बोलते)

विराज : इट्स ओके..

अनघा : दमलायस ना खुप.. झोप आत्ता.. आपण उद्या बोलूयात ह्या विषयावर..

विराज : कशी झोप येईल तुच सांग.. कसा वागला तो आज..?? डोक्यात नुसतं तेच तेच येतंय.. शौर्यला काका भेटला ना तेव्हापासुन त्याच वागणं चँज झालंय. कधी टेन्शन आलं किंवा जास्त खुश असेल म्हणजे काहीही रिझन असलं तर तो सगळ्यात आधी माझ्याजवळ येऊन मला मिठी मारायचा.. आज त्याने मला मिठी मारावी म्हणुन त्याच्या मागे मागे करत होतो मी.. बट त्याला काकापुढे मी दिसतच नव्हतो ग.. खुप हर्ट केलंय त्याने.. खुप म्हणजे खुपच.. 

अनघा : विराज गैरसमज नको ना.. दोन दिवसाचा राग असतो त्याचा मग येईल विर.. विर करत बोलायला.. कारण तु त्याची जान आहे यु नॉ..

विराज : त्याने जास्त दिवस माझ्यासोबत बोलणं बंद केल तर मला त्रास होतो... आय नॉ मी मम्मामुळे त्याला ओरडतो बट मम्माच ह्या जगात आम्हां दोघांशिवाय कोण आहे तुच सांग.. माझ्या आयुष्यात तु आहेस, सोबत तुझी फॅमिली, आपला शौर्य एन्ड आपली मित्र मंडळी आहेत. मी माझ्या फिलींग तुझ्याकडे, शौर्यकडे नाही तर आपल्या मित्रमंडळींकडे शेअर करतो. शौर्यच्या लाईफमध्ये लाईफमध्ये गाथा आहे.. आणि त्याचा फॅन्सक्लब ज्यांच्या सोबत तो टाईम स्पेन्ड करतो, भांडतो, मज्जा मस्ती करतो.. बट मम्माच तस नाही ना ग.. जॉब, घर आणि आम्ही दोघ. ह्या पलीकडे तिच्या आयुष्यात काहीच नाही आहे... ती तिच्या लाईफमधला हॅप्पी नेस, सॅडनेस सगळं आम्हा दोघांसोबतच शेअर करते ना.. आम्हां दोघांसोबत बोलण्यापेक्षा माझ्यासोबत.. मिच तिला दुखवुन कस चालेल..?? शौर्य नाही विचार करत ह्या सगळ्या गोष्टींचा.. बट मला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो कारण डॅड नंतर मी जस तिची जबाबदारी होतो तस ती आत्ता माझी जबाबदारी आहे.. सगळ्यांसमोर यु आर माय रिअल मॉम अस तो आत्याला बोलला.. कस वाटलं असेल तिला?? कोणत्याच गोष्टीचा विचार नाही ह्या मुलाला.. कस समजवु त्याला तो चुकीच वागतोय तेच कळत नाही मला. 

अनघा : मी आहे ना.. मी समजवते त्याला.. तु टेन्शन नको ना घेऊस..

हम्मम.. मी मम्मा झोपली का ते बघुन येतो एकदा.. अस बोलत विराज  हातात असलेलं इंव्होलोप बेडवर फेकतच रूम बाहेर जायला निघतो... इन्वेलोप बेडवर पडताच त्याच्यातून चिट्ठी बाहेर पडते.. जी शौर्यने विराजसाठी लिहिली असते.

विराजच लक्ष चिट्ठीवर जात तस पटकन बेडवर पडलेली ती चिट्ठी उचलतो.. आणि वाचु लागतो..

"तुझा राग मला तुझ्यापासुन खुप लांब करेल अस तुला बोललो होतो मी.. आत्याच्या घरात असतानाच बोललो होतो मी.. बघ ती वेळ पण आणलीस तु.. तुझ्या रागाने तुझ्यापासुन कायमच लांब केलं मला.. 

तु बोलतोस ना स्वराज सोबत माझी बरोबरी नाही होऊ शकणार.. बघ करून दाखवली मी त्याच्यासोबत माझी बरोबरी.. तो पण तुला सोडुन लांब गेला आणि मी सुद्धा.

एक गोष्ट नोटिस कर ही चिट्ठी लिहिताना मी कुठेच तुझ्या नावाचा उल्लेख नाही केलाय.. म्हणजे मला तुझं नाव लिहायला केवढा त्रास होत असेल ह्याचा विचार तूच कर. नाही तर माझ्या दिवसाची सुरुवात ही तुझ्या नावाने व्हायची हे तुला पण माहितीच आहे.. झोपताना पण तुझाच चेहरा नजरेसमोर असायचा माझ्या... म्हणजे क्षणा क्षणाला तुझं नाव माझ्या ओठांवर असायचं..  Because you was god for me.. but now I don't know what's the relation in between you & me.. 

प्लिज मला भेटायला चुकुन सुद्धा USA येऊ नकोस.. कारण अनोळखी लोकांना मी भेटत नाही.. उगाच तिथे येऊन वेळ आणि पैसा दोन्ही वेस्ट होतील तुझे...

दिलेले पैसे मोजुन घे.. व्हीथ इंटरेस्ट दिलेत मी..

गुड बाय.."

चिट्ठी वाचुन होताच विराज एकटक त्या चिट्ठीत बघत रहातो आणि वेगळ्याच तंद्रीत हरवुन जातो..

अनघा : काय लिहिलंय चिट्ठीत??

त्याला मी नकोय आत्ता.. विराज अनघाच्या हातात चिट्ठी देतच बोलतो. अनघा विराजकडे बघत त्याच्या हातातुन चिट्ठी घेत वाचते.. चिट्ठी वाचुन होताच ती विराजकडे बघते.. 

विराज डोकं धरून मान खाली घालुन असतो.. 

अनघा : विराज नको ना मनाला लावुन घेऊस.. एक दोन दिवस जाऊ दे मग डोकं शांत होईल त्याच.. 

विराज : हम्मम्म.. लाईट बंद करशील.. झोप येतेय मला..

अनघा : मम्मीना बघुन येत होतास ना??

विराज : उद्या सकाळी जातो.. आत्ता नको..

अनघा सुद्धा त्याला जास्त प्रश्न करत नाही.. ती चिट्ठी तिथेच टेबलवर ठेवत लाईट बंद करते.. 

विराजला मात्र डोळे बंद करून सुद्धा आज झोप येत नसते.. शौर्यचा कालचा रडत असणारा चेहरा त्याच्या नजरेसमोर येत होता.. त्यात त्याच एअरपोर्टवरच वागणं आणि ह्या चिट्ठीत लिहिलेले प्रत्येक शब्द त्याच्या नजरेसमोर फिरत असतात.. कुस बदलुन झोपण्याचा प्रयत्न तो करतो..

सकाळी विराजला जाग येते.. डोळे उघडुन बघतो तर अनघा गेलरीत कोणासोबत तरी फोन वर बोलत असते... वाजले किती हे बघायला तो मोबाईल हातात घेतो तर सकाळचे अकरा वाजत आले असतात..

गुड मॉर्निंग... अनघा आपला फोन ठेवुन त्याच्याजवळ येतच त्याला बोलते..

विराज : अनु अकरा वाजले... तु मला उठवल का नाही??

अनघा : रात्रभर जागा होतास म्हणुन म्हटलं झोपु द्यावं तुला थोडं.. तसही आज सँडे आहे... लवकर उठुन काय करणार तु..?

विराज : तुला कस कळलं मी रात्रभर जागा होतो ते..??

अनघा : व्हाट्सएप वर लास्ट सिन पहाटे साडे चारचा होता.. म्हणुन म्हटलं..

विराज : काका किती उशिरा घरी जायला निघाला.. मग तो घरी नीट पोहचे पर्यँत मला झोपच येत नव्हती..

अनघा : ओके.. 

विराज : तु आत्ता कोणासोबत बोलत होतीस??

अनघा : काकासोबतच...

विराज : काय बोलला??

अनघा : तुला विचारत होते..

विराज : ते नाही ग मी विचारत.. इथे रहायला येण्याबाबत काही बोलला का तो??

अनघा : विराज थोडे दिवस जाऊ देत.. सारख सारख आपण त्यांना नको ना प्रेशराईज करायला..

विराज : तस नाही ग.. साक्षीच्या स्कुलच पण बघावं लागेल ना आपल्याला म्हणुन मी घाई करतोय.. आता थोड्या दिवसांनी स्कुल पण चालु होतील.. चांगल्या स्कुलमध्ये एडमिशन नको का व्हायला तीच??

अनघा : विराज तु प्रत्येक गोष्टीचा किती बारकाईने विचार करतोस रे.. 

विराज : करावा लागेलच ना.. काकाने काल तस बोलून देखील दाखवलं ना.. आपल्याकडून त्या लोकांना काही कमी नको पडायला..

अनघा : तरीही मला अस वाटत की दोन दिवस जाऊ देत.. आणि मला खात्री आहे की काका नक्की येतील इथे रहायला.. आपण त्यांची रूम रेडी करूयात.. आणि खास करून आपल्या साक्षी मॅडमची. 

विराज : जर एवढं करून ते नाहीच आले तर..

अनघा : निगेटिव्ह नको बोलुस.. ते येतीलच.. आणि अचानक यायच जर त्यांच ठरलं तर मग घाई नको ना व्हायला.. आपल्याकडे काका काकींचे फोटॉ असतील ना.. ते मोठ्या फ्रेममध्ये त्यांच्याच रूममध्ये लावुयात आपण आणि थोडं फार सामान घ्यावं लागेल..

विराज : हम्मम.. तु बोलशील तस..

(विराज डोकं धरतच बोलला)

अनघा : तुला बर नाही वाटत का??

विराज : आय एम फाईन..

अनघा : नक्की??

विराज : हम्मम

अनघा : मग फ्रेश हो बघु. मी आत्याकडून काका, काकीचे आणि साक्षीचे पिक्स मागुन घेते.. आणि त्यांना काकांना थोडं कनवेयन्स पण करायला सांगते..

(अनघाला काका त्यांच्यासोबत रहायला नक्की येईल ह्याची खात्री होती.. विराजच्या मदतीने ती काका काकीसोबत साक्षीच्या रूममध्ये काय काय डेकोरेशन करता येईल ते बघत असते.)

अश्यातच संध्याकाळ होते..

शौर्य फायनली USA पोहचतो.. एअरपोर्ट बाहेर पडताच शौर्य सगळ्यात आधी गाथाला फोन लावतो..

गाथा : तुझ्याच फोनची वाट बघत होती मी.. (गाथा पहिल्याच रिंगमध्ये शौर्यचा फोन उचलतच त्याला बोलते..

शौर्य : गुड मॉर्निंग टु माय स्वीट स्वीट जान..

गाथा : गुड इव्हीनिंग टु माय स्वीट स्वीट जान..

गाथा : दमला असशील ना??

शौर्य : अजिबात नाही.. उलट परत न्यूयॉर्कला येऊन एकदम फ्रेश वाटतंय.. टेन्शन फ्री.. हा बट तुझ्यापासुन खुप लांब आहे म्हणुन थोडं वाईट वाटतंय ग... 

गाथा : मला पण..

शौर्य : ऐकणं गाथा मी जस्ट एअरपोर्टबाहेर पडलोय.. रूमवर गेल्यावर फोन करु का?? तिथे काकापण माझ्या फोनची वाट बघत असेल ग.. त्याला पण फोन करतो.. चालेलं??

गाथा : तुला जमेल तसं कर.. आणि थोडा आराम कर..

शौर्य : फ्लाईटमध्ये केला ना आराम अजुन किती आराम करू.. आणि हॉस्टेलवर गेलो ना तर कोणी आराम करूच देणार नाही...

गाथा : दिवस भराच टाईम टेबल फ्लाईटमध्येच ठरलेलं दिसतंय तुझं??

शौर्य : मग काय?? आत्ता गेल्या गेल्या मस्त पैकी फ्रेश होईल.. मी फ्रेश होईपर्यंत आमची दि सनी गँग रूमवर हजर असेल..

गाथा : दि सनी म्हणजे..?

शौर्य : हॉस्टेल आणि कॉलेजच नाव तेच आहे ना ग म्हणुन. दि सनी गेंग भेटायला आली की मग त्यांच्यासोबत ब्रेकफास्टला जाईल... मग तिथुन मी फुटबॉल खेळायला जाईल.. यु नॉ दोन महिने मी फुटबॉलच नाही खेळलोय.. आज मन भरून खेळेल. 

गाथा : ग्रेट...

शौर्य : हम्मम

गाथा : असाच हॅप्पी आणि टेन्शन फ्री रहा ओके.. 

शौर्य : मित्र मंडळी सोबत असली की मी जास्तच हॅप्पी आणि थोडा टेन्शन फ्री रहातो ग.. बट मी तुला रूमवर गेल्यावर पक्का फोन करेल.. ते ही व्हिडीओ कॉल.. ओके??

गाथा : हम्मम.. मी वाट बघते तुझ्या फोनची.. पण आत्या आणि काकांना फोन करून सांग.. ती लोक आज पहाटे घरी पोहचले..

शौर्य : ते लोक घरी नाही थांबले??

गाथा : काकी तिथे एकटी असताना काका इथे कसे थांबतील शौर्य.

शौर्य : ओके मी त्यांना करतो कॉल.. बाय... काळजी घे.. लव्ह यु.. एन्ड मिस यु.. सो मच..

गाथा : आय मिस यु टु शौर्य.. 

गाथाला बाय बोलुन शौर्य फोन ठेवतो.. 

शौर्य एअरपोर्ट बाहेर येताच चेहऱ्यावर वेग वेगळ्या एक्सप्रेशन सोबतच वेग वेगळ्या पॉजमध्ये तो सेल्फी घेतो. सेल्फी घेऊन होताच कार बुक करतच तो आपल्या हॉस्टेलच्या दिशेने जातो.. कारमध्ये बसल्या बसल्या तो काकाला फोन लावतो..

आणि नुकताच USA पोहचलोय हे कळवतो. काका काकीची विचारपूस करत तो फोन ठेवुन देतो.. मोबाईलमध्ये व्हाट्सएप ऑपन करत तो विरचा लास्ट सिन बघतो.. दहा मिनिटांपुर्वी तो ऑनलाइन होता अस त्याला त्यात बघुन कळत.. जास्त विचार न करता त्याचा आणि अनिताचा नंबर तो व्हाट्सएपवर ब्लॉक करून टाकतो.. मगाशी एअरपोर्टबाहेर काढलेले स्वतःचे सेल्फी "Back To NewyorK" ह्या मॅसेज सोबत तो व्हाट्सएप प्रोफाइल सोबत व्हाट्सएप स्टेट्सलासुद्धा ठेवतो.. 

क्युट दिसतोयस.. शौर्यने स्टेटस ठेवल्या ठेवल्या गाथाचा रिप्लाय येतो..

तुझ्यापेक्षा कमीच ग.. शौर्य सुद्धा लगेच तिला रिप्लाय करतो..

गाथा : तु USA पोहचलास हे घरी कळवलंस..??

शौर्य : तुझा फोन ठेवल्या ठेवल्या लगेचच..

गाथा : जिजूंसोबत बोललास??

शौर्य : गाथा माझं घर हे आत्ता नाशिकला आहे.. मी काकाला फोन करून कळवलंय.. बाकी कोणाला मी कळवायला हवं अस मला तरी नाही वाटत आणि प्लिज मला फोर्स नको ना करुस.. प्लिज.

गाथा : ओके.. नाही करत.. बट जिजु वाट बघत असतील तिथे.. आपल्या माणसांचा राग नकोना करुस

शौर्य : बाय...

गाथा : शौर्य प्लिज एक मॅसेज करून तरी कळव..

शौर्य : प्लिज.. नको ना फोर्स करुस.. बाय..

गाथा : तु चुकीच वागतोयस.. 

शौर्य : आय नॉ..

गाथा : का अस वागतोयस??

शौर्य : आपल हृदय काय बोलत ते ऐकायला शिक आणि मनाला जे पटत तस वागायला अस तुच बोललीस ना.. मग मी तसच वागतोय.. त्याशिवाय लोकांना माझी वेल्यु कळणार नाही..

गाथा : तुला नाही कळवायच तर ठिक आहे मी कळते तुझ्या घरी..  बाय.. सांभाळुन जा..

शौर्य : जे तुझ हृदय बोलत ते तु ऐक आणि तुझ्या मनाला जे पटत तस कर.. मी तुला कोणत्याच गोष्टीत फोर्स नाही करणार.. बाय

गाथा शौर्यच्या अश्या बोलण्यावर काहीच रिव्हर्ट नाही देत..

गाथा लगेच अनघाला फोन करून शौर्य USA पोहचला हे कळते.. त्याचा व्हाट्सएपचा स्टेटस सुद्धा ती तिला चॅक करायला सांगते..

अनघा, विराज आणि अनिता संध्याकाळचा चहा नाश्ता करतच डायनिंग टेबलवर बसले असतात..

शौर्य जस्ट USA पोहचलाय.. मला आत्ता गाथाने फोन करून कळवलं.. गाथाचा फोन ठेवल्या ठेवल्या अनघा बोलते..

अनिता : गाथाला कळवलं त्याने??

अनघा : कळवलं म्हणजे ते त्याने व्हाट्सएपला स्टेटस ठेवलाय.. 

अनिता : मला तु समजतेस तस नव्हतं बोलायच.. तो घरी एक फोन करून कळवु शकत होताना.. म्हणुन मी बोलले..

विराज : मम्मा इट्स ओकेना.. आणि तो निट पोहचला तिथे हेच खुप आहेना..

अनिता : हम्ममम..

अनघा : वाव्ह शौर्यचे फोटॉ छानच आलेत ना?? USA ला गेल्यावर लगेच प्रोफाइल पिक पण बदलला साहेबांनी.. शौर्यला पण आमच्या गाथासारख सेल्फी घ्यायच क्रेज आहे ह्याला पण..

अनिता आणि विराज लगेच आपल्या मोबाईलमध्ये शौर्यचा स्टेटस बघतात.. पण दोघांना त्याचा स्टेटस काही दिसतच नाही.

विराज : तुला प्रोफाइल पिक दिसतोय त्याचा??

अनघा : का तुला नाही दिसत?? 

विराज नकारार्थी मान करतो..

अनघा : स्टेटस तरी दिसतोय??

विराज पुन्हा नकारार्थी मान हलवतो..

अनघा : मम्मी तुम्हांला दिसतोय??

अनिता : नाही..

विराज : तुझा मोबाईल बघु..

अनघाने मोबाईल देताच अनघाच्या मोबाईलमध्ये विराज शौर्यचे फोटॉ बघतो.. फोटॉ बघुन होताच तो मोबाईल आपल्या मम्माच्या हातात देत आपल्या रूममध्ये निघुन जातो..

विराज अस रूममध्ये निघुन जाताच अनघासुद्धा त्याच्या मागे रूममध्ये येते.. विराज डोक्याला हात लावुन गेलरीत बसुन असतो.. अनघा जाऊन त्याच्या बाजुला बसते..

विराज : मला आणि मम्माला ब्लॉक केलं त्याने..?? 

अनघा : विराज एक दोन दिवस जाऊ देत ना.. प्लिज.. मग मी स्वतः त्याच्याशी बोलते.. थोडे दिवस त्याला पण त्याचा राग व्यक्त करू दे..

विराज : अनु हे वेगळंच काही तरी आहे ग.. ह्या आधी खुपदा भांडण झालीत अस ब्लॉक वैगेरे नाही केलेलं त्याने मला.. आणि त्याचे मित्र पण बोलले ना तो माझ्यासोबत कधीच नाही बोलणार..

अनघा : तो स्वतः तुझ्याशी बोलेल.. आय प्रॉमिज यु.. आत्ता हस बघु..

अनघा विराजला गुदगुल्या करत बोलली..

विराज तिच्यासाठी जबरदस्ती का होईना चेहऱ्यावर हसु आणतो..

अनिता विराजच्या दरवाजा नॉक करतच आत येते..

हातात फाईली असतात तिच्या...

विराज : मम्मा काय आहे हे??

अनिता : लोणावळ्याला जे फार्म हाऊस आहेना आपलं त्याचे हे पेपर्स आहेत.. आत्ता हे तुझ्या जवळच ठेव..

विराज : मम्मा तुझ्याजवळच ठेव ते.. आणि मला नकोय काही.. जे काही आहे ते तु शौर्यच्या नावावर कर..

अनिता : त्याच्या नावावर मी इतर गोष्टी ठेवल्यात.. उद्या किती वाजता अपॉइंटमेंट आहे डॉक्टरांची??

विराज : 9 वाजता.. 

अनिता : बर.. 

अनघा : मम्मी तुम्ही इथे बसा बघु..

अनघा अनिताचा हात पकडतच तिला बेडवर बसवते..

अनघा : शौर्य बोलत नाही म्हणुन वाईट वाटतंय ना?? 

अनिता पाणावलेल्या डोळ्यांनी विराजकडे बघते..

विराज : मम्मा माझ्यासोबत पण नाही बोलत ग तो.. थोडा राग शांत झाला की बोलेल तो..

अनिता : हम्मम..

अनघा : मम्मी.. नका ना अस रडु.. आत्ता तुम्ही येण्याआधी तुमचा हा मोठा मुलगा रडत होता.. मी त्याला तेच सांगत होती त्याला त्याच मन भरेपर्यंत रागवु दे.. डोकं शांत झाला ना की बोलेल तो.. दोन दिवस तरी जाऊ दे.

अनिता : आणि तरीही नाहीच बोलला तर .??

अनघा : मग मी कश्याला आहे..? मी आहेना.. 

तु घरी आल्यापासुन तुझा खुप आधार वाटतो मला..  अनघाच्या चेहऱ्यावर हात फिरवत अनिता बोलते.. 

अनघा : आम्हांला पण तुमचाच आधार आहे ना.. आणि नुसतं रूममध्ये ऐकट नकाना बसुन राहू.. अस आमच्यासोबत गप्पा मारायला या.. 

अनिता : हो.. तसही मी आत्ता समीर ला फोन करणार होती.. ती सगळी रहायला आली की घराला खर घरपण येईल.. घर अगदी भरल्यासारखं वाटेल जस शेखर असताना असायचं अगदी तस.. 

तिघेही एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करत राहतात..

इथे शौर्य गाथाला बोलल्याप्रमाणे तिला व्हिडीओ कॉल करतो..

शौर्य : हॅलो माय स्वीट जान.. 

गाथा : कस वाटतंय पुन्हा हॉस्टेलच्या रूममध्ये..

शौर्य : एकदम मस्त.. इथे कोणाच टेन्शन नसत ग.. नॉ रुल्स एन्ड रेग्युलेशन आणि मॅन म्हणजे विरची भीती नाही.. नाही तर विर..

(आपण विरच नाव घेतलं हे कळताच तो शांत होतो)

गाथा : आली ना आठवण जिजूंची??

शौर्य : नाही.. त्याचा विषय नको..

गाथा : शौर्य नको ना रागवूस एवढं.. त्यांना तु बोलत नाही त्याचा त्रास होत होता काल.. त्याच तुझे फ्रेंड्स लोक त्यांना ओरडले.. काका सुद्धा खुप ओरडले.. 

शौर्य : काय! तरी मी त्यांना बोललो होतो विरला काही बोलायच नाही म्हणुन.. आणि काका का ओरडला??

गाथा : तुला मारलं म्हणुन.. 

शौर्य गाथाला पुढे काही बोलणार तोच त्याचे सगळे मित्र मंडळी त्याला आवाज देतच त्याच्या रूममध्ये येतात.. लॅपटॉप तसाच ऑन ठेवत तो बेड वरून उठतो.. आणि आपल्या मित्रांना भेटतो.. सगळेच एक एक करून शौर्यला भेटत असतात.. एवढ्या महिन्यांनी आपल्या मित्र मंडळींना बघुन शौर्य खुप खुश असतो.. अगदी हसत मज्जा मस्ती करत तो एक एक करून सगळ्यांच्या गळा भेटी घेत असतो.. कालपासूनच त्याच टेन्शन कुठेतरी दूर पळुन गेलं होतं.. गाथा त्याचा तो निरागस चेहरा बघतच रहाते.. काल रात्री पासुन आत्ता कुठे तो तिला एवढा खुश दिसत होता.. उगाच शौर्यला डिस्टरब नको म्हणुन त्याच्या नकळत ती व्हिडीऑ कॉल कट करायला जाते तोच शौर्य हाताची पाच बोट दाखवत गाथाला इशाऱ्यानेच थांब म्हणुन बोलतो.. गाथाला थोडं आश्चर्य वाटत.. ह्याला कस कळलं मी व्हिडीओ कॉल कट करते?? गाथा स्वतःच्या मनालाच प्रश्न करत असते.. कारण खरच हि विचार करण्यासारखी गोष्ट होती.. शौर्यचा लॅपटॉप त्याच्या बेडवर होता. त्याची नजर तर त्याच्या मित्रांकडे असते आणि मुळात तो त्यांच्याशी गप्पा मारण्यात बिजी असतो.. गाथा व्हिडीओ कॉल कट करणार तोच तिला तो हात दाखवत थांब बोलतो.. मित्रांसोबत बोलता बोलता आपली एक भुवई उडवतच तो तिच्याकडे बघतो..

गाईज मिट माय लाईफ अँड माय फ्युचर वाईफ मिस डॉक्टर गाथा.. शौर्य मोठ्यानेच ओरडत आपल्या मित्रांना आपल्या लॅपटॉपमध्ये बघायला सांगतो..

गाथा स्तब्ध होतच शौर्यकडे बघत रहाते.. तसे त्याचे मित्र सुद्धा एकदम शॉक होत त्याच्याकडे बघत लॅपटॉपमध्ये बघु लागतात..

मेसिव्ह : What...! 

रोनाल्डो : Its surprised Dude...  Hi Ron here 

शौर्य : Hows surprise??

जसविंदर : ब्युटीफुल.. Hi I am Jas..

आर्यन : Hi I am aryan..

सगळेच एक एक करून आपल नाव सांगुन गाथाला आपली ओळख करून देत होते.. गाथासुद्धा चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे हसु ठेवत हाय-हॅलो करत सगळ्यांची ओळख करून घेत होती.. 

गाथा : Its very difficult to remember your Name.. But nice to meet you every one.. 

we also.. सगळे एकत्रच गाथाला बोलतात..

जेम्स : Because of this reason you don't want to back here??

शौर्य : off course Dude.. 

शौर्य अस बोलताच सगळेच त्याला अजुन चिडवु लागतात..

गाथा त्याची मित्रांसोबतची ती मस्ती बघत असते.. शौर्य USA गेल्यावर लगेचच तिची ओळख त्याच्या मित्रांसोबत करून देईल अस तिला वाटलं नव्हतं..

Guys give me 5 minitus.. I will back to you.. (अस बोलत शौर्य गाथासोबत बोलायला लॅपटॉप समोर येतो)

गाथा : शौर्य खुप दिवसांनी तु मित्रांना भेटतोयस मग त्यांच्याशी गप्पा मार आणि आधी ब्रेकफास्ट करून घे ओके.. आणि असाच हॅप्पी रहा.. खुप छान वाटत तुला अस खुश बघुन..

शौर्य : हम्मम.. तु सुद्धा जेवुन घे. मी रात्री करतो कॉल.. मी इंडियातल्या रात्री बद्दल बोलतोय.. म्हणजे तुझं जेवुन झाल्यावर.. आपल्या नेहमीच्या वेळेवर.. मे बी तेव्हा मी जेवत असेल.. जेवताना गप्पा मारू.. अजुन फ्रेंड्स आहेत माझे त्यांच्या सोबत पण ओळख करून देतो..

गाथा : अजुन पण फ्रेंड्स आहेत तुझे..???

शौर्य : ऑफ कोर्स येस.. अजुन काही लोक उठली नाहीत.. सँडे आहेना ग आज म्हणुन.. आणि आज ज्यांना भेटशील ते फक्त हॉस्टेल फ्रेंड्स असतील माझे.. कॉलेज फ्रेंड्स तर ट्युसडे ला भेटतील.. 

गाथा : शौर्य तरी अंदाजे किती मित्र मैत्रिणी आहेत तुझे तिथे..??

(शौर्य खुप वेळ शांत बसुन राहतो..)

एवढा काय विचार करतोयस??

शौर्य : काऊंट करतोय ग.. किती आहेत.. एक काम कर माझ्या FB वर बघ.. मे बी 200+ तरी असतील..

गाथा : व्हॉट !

शौर्य : एवढं शॉक होण्यासारख काय आहे??

गाथा : काही नाही मग बोलुयात.. तु आत्ता मित्रांसोबत बोल.. ओके बाय...

शौर्य : बाय...

★★★★★

इथुनच सुरुवात झाली शौर्यच्या हसत्या खेळत्या लाईफला. मित्रांसोबत तो गाथाला ही तेवढाच टायमिंग द्यायचा.. गाथाच सुद्धा कॉलेज चालू झाल्याने तिचा पूर्ण वेळ अभ्यास करण्यात जायचा... त्यातुन उरलेला वेळ शौर्य आणि आपल्या फॅमिलीसोबत गप्पा गोष्टी करण्यात निघुन जायचा.. शौर्यच सुद्धा काही वेगळं नव्हतं.. तो गाथा सोबत काकाला सुद्धा न चुकता फोन करायचा.. विराजची पण खुप आठवण यायची त्याला पण त्याने ठरवल्याप्रमाणे तो त्याला फोन नाही करायचा.. पण वृषभकडे मात्र रोज त्याची रोज चौकशी करायचा.. 

इथे आठवडा उलटुन गेला पण शौर्यने एक फोन सुद्धा आपल्याला केला नाही ह्या विचाराने विराज अस्वस्थ होत असतो... त्याच कश्यातच लक्ष लागत नसत.. डॉक्टरांनी त्याला स्ट्रेस अजिबात घेऊ नको असे सांगितले असते.. पण शौर्यच्या ह्या कठोर वागणुकीचा त्याच्या मनावर खुप परिणाम होत असतो.. हळुहळु जेवण सुद्धा त्याला जात नसत.. ऑफिसमध्ये सुद्धा त्याच लक्ष कश्यातच लागत नसत.. 

अनघाने विराजच्या नकळत शौर्यसोबत ह्या विषयी बोलायच ठरवलं होत.. पण ती जस विराजच नाव काढायची तस तो फोन कट करून टाकायचा.. गाथा सुद्धा शौर्यला समजवत होती.. पण तिने विराजच नाव काढलं तर तो विषय बदलायचा नाही तर काही तरी कारण सांगुन फोन ठेवुन द्यायचा.. 

अश्यातच एका रात्री काकाने विराजला फोन करून ती लोक मुंबईत शिफ्ट होतायत असे सांगितले.. काका रहायला येतो हे कळताच सगळ्यांना खुप आनंद होतो.

विराज आणि अनघा गेलरीतच बोलत उभे असतात.. 

विराज आपण कामावरून दोन दिवस सुट्टी घेऊयात.. काका काकींना तेवढं बर वाटेल आपण त्यांच्यासाठी घरी राहिलो म्हटलं तर.. बर झालं ना आपण रूम आधीच रेडी करून ठेवल्या ते.. आपण फॅमिली डिनरसाठी बाहेर सुद्धा जाऊयात.. शौर्यला डिनर करताना मिस करू ना आपण.. अनघा एकटीच बोलत असते.. विराजच मात्र तिच्या बोलण्याकडे लक्षच नसत..

आणि अचानक विराज खालीच कोसळतो..

विराज... अनघा जोरातच ओरडते...

विराज काय होतंय तुला?? अंग पुर्ण तापाने फनफनत असत त्याच..

अनघा रूमबाहेर पडतच अनिताला आवाज देते.. 

नोकर मंडळी त्याला उचलुन बेडवर झोपवतात.. अनिता लगेच डॉक्टरांना फोन लावते.. 

डॉक्टर चॅक करून त्याच्या रूम बाहेर पडतात..

अनघा : तो बरा आहे ना?

डॉक्टर : BP लॉ झालाय त्याचा.. त्यात ताप सुद्धा आहे म्हणुन चक्कर आली.. औषध मी दिलीच आहेत..

अनघा : हम्मम

अनिता : घाबरण्यासारखं काहीच नाही ना??

डॉक्टर : सध्यातरी नाही.. औषध दिलीत मी लिहुन त्याने ताप काढेल. जर नाहीच काढला मग काही ब्लुड टेस्ट वैगरे करावी लागतील आपल्याला..

एवढ बोलुन डॉक्टर निघुन जातात..

अनघा : विराज काय होतंय तुला??

विराज : मलाच नाही कळलं काय झालं.. अचानक काळोख आला डोळ्यांसमोर.. तुम्ही दोघींनी प्लिज टेन्शन नका घेऊ.. आय एम ओके...

अनिता : काय ओके?? अंग बघ किती तापलय तुझं.. त्यात तु जेवतच नाहीस नीट.. 

विराज : काही खावसच नाही वाटत आहे ग.. मला नाही माहिती मला काय होतंय.. जेवणाकडे बघायल सुद्धा नको वाटतंय.

अनघा : तु नीट जेवला नाहीस तर कर कस होणार विराज.. औषध पण घ्यायचीत ना..

अनिता : तुला काही खावस वाटतंय का ते सांग.. ते बनवुयात.. 

विराज : नकोय मला काही.. 

अनिता जबरदस्ती जेवणाच ताट घेऊन येत विराजला भरवायला घेते.. विराज तिला बर वाटावं म्हणुन जेवतो खर पण दुसऱ्या क्षणाला उलटी करून सगळं जेवण तो बाहेर काढुन टाकतो..  त्याला खरच बर वाटत नसत.

आत्ता दोघींना सुद्धा त्याच खुप टेन्शन येत असत.. 

दुसऱ्या दिवशी अनघा एकटीच ऑफिसला जाते..

ऑफिसमध्ये गेल्या गेल्या अनघा वृषभला केबिनमध्ये बोलावून घेते.. एक दोन महत्वाची काम ती त्याच्यावर सोपवते.

वृषभ : विर का नाही आला आज??

अनघा : बर नाही आहे त्याला.. 

वृषभ : आज काल तो खुप स्ट्रेस वाटतो मला.. घाबरण्यासारखं काही नाही ना.

अनघा : शौर्यचा फोन येतो तुला??

वृषभ : हो रोज येतो.. म्हणजे जर त्याला फोन करायला नाही जमलं तर मॅसेज तरी करतोच.. 

अनघा : विराजबद्दल विचारतो तुला??

(वृषभ खुप वेळ शांत बसुन असतो..)

वृषभ : रोज विचारतो.. त्याच्यासाठीच खर तर फोन करतो तो.. 

अनघा : गुड.. 

वृषभ : काय झाल?

अनघा : विराजला काय होत हे मी तुला नाही सांगणार आणि शौर्यला सुद्धा.. जर शौर्यला खरच विराजची काळजी असेल तर तो स्वतः त्याला त्याच्या मोबाईलवर फोन करेल.. अजुन एक इथे खुप सारे सिनियर आहेत पण तु सोडुन आमचा कुणावर विश्वास नाही.. इकडच सगळं तु हॅन्डल कर.. विराजचा आणि माझा तुझ्यावर खुप विश्वास आहे.. खुप म्हणजे खुप... म्हणुन इंपोर्टन्ट मिटिंग आणि कंपनी रिलेटेड इंपोर्टन्ट डेटा आम्ही तुझ्यासोबतच शेअर करतोय.. सो तु..

वृषभ : वहिनी तुम्हां दोघांचा तो विश्वास मी कायम तसाच जपुन ठेवेल ग.. तु टेन्शन नको घेऊस. प्लिज विर ला काय होतंय ते सांग.. माझं पण कामात लक्ष नाही लागणार.. मी शौर्यला नाही सांगत काही गॉड प्रॉमिज.. 

(अनघा काल घडलेला प्रकार त्याला सांगते..)

अनघा : विराजला बर नाही म्हणुन तो कामावर येत नाही हे तु शौर्यला सांग.. बट त्याला काय होतय हे अजिबात सांगु नकोस.. मी सुद्धा आत्ता त्याचे फोन उचलणार नाही.. विराजला बर नाही हे कळताच तो त्याला लगेच फोन करेल अस मला वाटत.. 

वृषभ : हम्मम..

अनघा : मी घरून काम करेल.. तुला काही डाऊट असतील तर मला फोन कर विराजला अजिबात फोन करू नकोस..

वृषभ : हम्मम. विर ची काळजी घे आणि काही गरज लागली तर मला सांग..

वृषभला एक दोन महत्वाच्या सूचना देऊन आणि सोबतच आपलं पेंडिंग काम पुर्ण करून अनघा घरी येते.. घरी येऊन बघते तर काका, काकी आणि साक्षी हॉलमध्ये अनिता सोबत बोलत बसले असतात..

अनघा : काका ही चिटिंग आहे.. आम्ही तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेलं तुम्ही एक दिवस आधी येऊन आम्हांलाच सरप्राईज दिलात..

(अनघा घरी आल्या आल्या काकांना बोलते)

अनघाच्या अश्या बोलण्यावर सगळेच हसु लागतात..

साक्षी : तुला आवडलं ना..??

अनघा : मग काय?? खुप आवडलं.. कधी आलात तुम्ही..??

काकी : हे काय नुकतेच येऊन बसलोय नि तु आलीस..

अनघा : अरे वाह मग मी एकदम करेक्ट टायमिंगला आलीय.. आजी तुमची तब्येत कशी आहे?? 

आजी : थोडं बर वाटतंय आत्ता.. 

आत्या : परत आपण सगळे एकत्र येणार हे बघुन आईला आता बर वाटतंय..

काका : तु कामावर नाही गेलीस?? आणि आपला विराज कुठेय??

अनघा : जस्ट आलीय कामावरून.. खर तर जाणारंच नव्हते पण एक दोन काम पेंडिंग होती माझी म्हणुन जावं लागलं..

अनिता : विराजला बर नाही वाटत आहे तो कामावर गेलाच नाही.. 

काकी : कुठे आहे तो??

अनघा : रूममध्ये.. या दाखवते.. तुम्हांला बघुन खुप खुश होईल तो..

विराज डोळे मिटुन शांत झोपुन असतो..

काकी जाऊन त्याच्या बाजुला बसते.. आणि प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवते.. 

विराज डचकून जागा होतो..

काकी : आम्ही येणार म्हणुन आजारी पडलास कि काय??

विराज : तु उद्या येणार होती ना..??

(विराज उठून बसतच बोलला..)

काका : काय होतय तुला??

अनघा : जेवतच नाही मग काय होणार काका?? विराज ज्युस तरी पी..

विराज : नको..

अनघा : अस लहानमुलासारखं नको ना करुस.. काही तरी खा.

काकी : काही खावस वाटत तर सांग मी बनवुन देते तुला..

(विराजच्या चेहऱ्यावर हात फिरवतच ती बोलते)

विराज : नको ग.. तस काही वाटलं की सांगेल मी तुला. 

आत्या : ए बच्चा ज्यूस पी बघु थोडा मग बर वाटेल तुला..

विराज : खरच नकोय ग आत्या.. नंतर घेतो मी.. थोडं झोपल की बर वाटेल..

काका : बर तु आराम कर. 

आत्या : आणि आमच्या सोबत जेवायला खाली यायच काय??

विराज : हम्मम..

अनघा : मी तुम्हांला तुमच्या रूम दाखवते.. आम्ही तिघांनी मिळुन डेकोरेट केल्यात..

सगळेच विराजच्या रूममधुन बाहेर पडतात.. आणि अनघासोबत आपापल्या रूम बघायला जातात..

इथे शौर्य नेहमी प्रमाणे विराजबद्दल विचारायला वृषभला फोन करतो.

वृषभ : आज एवढ्या लेट का फोन केलास??

शौर्य : बिजी होतोरे.. विर आहे बरा??

वृषभ : आज वहिनी एकटीच आलेली ऑफिसमध्ये.. मला काम सांगुन परत घरी निघुन गेली..

शौर्य : आज काका जाणार होता घरी म्हणुन गेली असेल..

वृषभ : विर ला बर नाही म्हणुन गेली..

शौर्य : काय होतय त्याला..??

वृषभ : नाही सांगु शकत..

शौर्य : अस का बोलतोयस.. आणि मला का नाही सांगु शकत तु.. काही सिरीयस आहे का??

वृषभ : नाही सांगू शकत अस वहिनी मला बोलली.. आणि तुला बोललो ना मी तो दोन दिवसांपासुन मला खुप स्ट्रेस वाटतोय..

शौर्य : मग त्याला कॉल करून विचार काय होत ते..

वृषभ : शौर्य यार मला खुप काम दिलंय रे.. नंतर करून विचारतो..

शौर्य : अजिबात नाही.. आत्ता लगेच तु त्याला कॉल करून विचार.. आणि माझ्या भावापेक्षा तुला तुझं काम महत्वाच आहे.. कॉल कर बघु त्याला..

वृषभ : बर मी विचारून सांगतो तुला..??

शौर्य : मला कॉंफेरेन्समध्ये ठेव आणि कॉल लाव त्याला..

वृषभ : आत्ता??

शौर्य : येस आत्ता.. आणि त्याला सांगु नको मी कॉल वर आहे ते. माझा कॉल असाच चालु ठेव आणि लाव बघु त्याला फोन..

वृषभ : एक काम कर ना.. तुला आत्ता एवढी त्याची काळजी वाटु लागलीय तर तुच कॉल करना त्याला.. बस झाला ना राग..

शौर्य : ए वृषभ मला खुप झोप येतेय आत्ता.. रात्रीचे दोन वाजत आलेत इथे.. परत साडे पाचला उठायचंय मला... प्लिज फोन लाव त्याला.. माझ्यासाठी एवढं नाही करणार काय तु??? प्लिज.. 

वृषभच खर तर दोन्ही बाजुने मरण होत असत.. शौर्यला ओके बोलतच तो विराजला फोन लावतो.. आणि शौर्यला कॉंफेरेन्स कॉलवर घेतो.

वृषभ : हॅलो विर.. ते वहिनीकडुन कळलं तुला बर नाही.. 

विराज : हम्मम..

वृषभ : काय होतंय??

विराज : विकनेस आहे थोडा.. 

वृषभ : वहिनी बोलली की तु जेवत सुद्धा नाहीस.. जेवला नाहीस तर विकनेस येणारच ना..

(विराज काहीच बोलत नाही शांत असतो..)

हॅलो तु ऐकतोयस ना विर..,

विराज : वृषभ मला खरच बोलायला नाही...(अर्धवट बोलतच विराज थांबतो)

वृषभ : बर बर.. मी जास्त नाही बोलत.. तु काळजी घे.. मी संध्याकाळी येतो तुला भेटायला ओके.,

विराज : हम्मम.

विराज जास्त काहीच बोलत नाही.. पण विराजचा असा आवाज ऐकुन शौर्यच हृदय मात्र जोरजोरात धडधडु लागत.. 

शौर्य राग बस कर तुझा.. आणि कॉल कर त्याला.. प्लिज.. मी तुझं ऐकलं आत्ता तु माझं ऐक.. विराजचा फोन कट करताच वृषभ शौर्यला बोलतो..

शौर्य वृषभच्या बोलण्यावर काहीच रिएक्ट होत नाही.. तो काहीही न बोलता फोन कट करून टाकतो.. शौर्य खुप वेळ मोबाईल तसाच हातात धरून असतो.. जास्त विचार न करता व्हाट्सएप वरून विराजला अनब्लॉक करतो.. आणि लगेच विराजला व्हिडीओ कॉल लावतो..

(शौर्यचा व्हिडीओ कॉल आलाय हे बघुन काय असेल विराजची रिएक्शन..?? पाहुया पुढील भागात आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.)

निवेदन : कमेंट्स द्वारे तुमच कथेवर असलेलं प्रेम बघुन खुप छान वाटल.. ही कथा अपुरी ठेवुन जे खरच ह्या कथेत रमुन गेलेत त्यांच्यावर मी अन्याय करते अस मला सुद्धा कुठे तरी वाटु लागलं. तडकाफडकी घेतलेल्या त्या निर्णयाबद्दल सगळ्यांनाच सॉरी.. 

©भावना विनेश भुतल