अतरंगीरे एक प्रेमकथा १०५

In marathi

शौर्य आपली कार घेऊनच घराबाहेर पडला..

विराज रूम नॉक करत अनिताच्या रूममध्ये शिरतो..

अनिता : अजुन काही बोलायच बाकी आहे का तुला??

विराज : मम्मा.. आय एम रिअली सॉरी.. 

अनिता : त्यादिवशी मी रागात बोलली तुला, त्याबद्दल सॉरी सुद्धा बोलली मी.. आज तु तीच गोष्ट मला शौर्यच्या पुढ्यात बोलुन दाखवतोयस.. माझ्या दोन्ही मुलांनी मला त्रास द्यायचच ठरवलय वाटत..

विराज : मम्मा प्लिज.. तुम्हा दोघांच्या भांडणात माझं मरण होतय ग.. समजुन घे.. आणि तु एवढं टोकाच शौर्यला बोलायला नको होतंस.. त्याला वाईट वाटलं असणार..

अनिता : मग मी काय करू ते मला सांग.. एक तर तो समीरसोबत बोलतोय हे तुझ्याकडुन मला कळलय तेव्हापासुन तो माझ्या मनातुन उतरून गेलाय.. तु शांत बस बोललास म्हणुन मी शांत बसलीय.. कारण तुला त्रास होत होता.. नाही तर मी त्या क्षणाला त्याच काय करणार होती आय रिअली डोन्ट नॉ.. त्यात त्याला मी त्यादिवशीच नीट विचारत होते की तु रात्री दिड वाजता घरी आलायस का?? फक्त त्याच दिवशी नाही त्यानंतर ही दोनदा तीनदा विचारलं.. पण नाही म्हणुनच बोलतो.. आणि मुळात त्याने मला पटवुन सुद्धा दिलं की मी घरीच होतो.. फक्त मलाच नाही तुला पण.. त्याच हे वागणं पटलं तुला??

विराज : मी शांत होतो ह्याचा अर्थ असा नाही की त्याच वागणं मला पटतय.. मला त्याच त्याच गोष्टीवरून त्याच्यासोबत वाद घालायला नाही आवडत.. तो त्याला आवडत तेच करतो.. त्याला सगळ्या भाषेत समजवुन सांगितलं मी.. एक भाऊ म्हणुन जेवढ मी करू शकतो तेवढं मी केलंय त्याच्यासाठी आणि अजुनही करतोय..अजुन त्याच्या पाठी मी नाही ग पळु शकत हे तु समजुन घे. पहिला मी एकटा होतो. आत्ता तस नाही ना. अनघाला पण मला टाईम द्यावा लागतो, ऑफिसमध्ये पण कामाची जबाबदारी वाढलीय माझी.. अनघा अस बोलणार नाही की तु शौर्यकडे लक्ष देऊ नकोस बट मला तिच मन समजुन घेऊन वागावं लागेल ना.. आणि मी अस बोलतो ह्याचा अर्थ असा नाही की मी फक्त अनघाला इंपोर्टन्ट देता. शौर्यच्या वागण्याचा जास्त त्रास मला होतोय.. तोंडाला येईल ते बोलतो तो मला. बट USA जाईल परत दोन वर्षे दिसणार नाही म्हणुन मी सगळं सहन करतोय.. तो USA वरून आल्यापासुन घरात वाद व्हायला सुरू झालेत.. आणि मला आत्ता खरच अस वाटत की त्याला USA जाऊ दे. अजुन ह्या घरात भांडण नको.. दोन वर्षानी तो इथे येईल तेव्हा त्याच डोकं पण शांत झाल असेल.. आणि थोडा फार फरक तर त्याच्यात नक्कीच झाला असेल..

अनिता : जे तुला वाटत ते कर.. उद्याच तिकिट बुक झाल तर बरच होईल.

विराज : उद्या लगेच बुक होईल??

अनिता जास्त काही न बोलता आपला लॅपटॉप विराजकडे देते..

विराज : त्याला एकदा विचारून करूयात??

अनिता : प्लिज.. मी त्याच हे अस वागणं अजुन नाही सहन करू शकत.. 

विराज काहीही न बोलता अनिताचा लॅपटॉप हातात घेत दुसऱ्यादिवशीच शौर्यच USA च तिकीट बुक करायला घेतो.. 

विराज : मम्मा उद्या रात्री 11.30 ची वाजताची फ्लाईट आहे.. करू बुक??

अनिता : कर.. आणि त्याला जाऊन सांग.. पॅकिंग करायला घे..

विराज : तो घरी नाही.. साडे बारा वाजेपर्यंत येईल अस बोलून बाहेर गेलाय..

अनिता : आणि तु जाऊ दिलस??

विराज अनिताला ती गेल्यानंतर शौर्य काय बोलला हे तिला सांगतो..

अनिता : तु अंधेरीला शिफ्ट होतोयस??

विराज : मम्मा त्याला सगळ्या गोष्टी कश्या माहिती पडतायत हे त्याच्याकडुन जाणुन घ्यायला मी अस बोललो.. जर अस बोललो नसतो तर तो सांगायला पण तैयार झाला नसता.. मला डाऊट येत होता की त्याने हाइडन कॅमेरा वैगेरे लावले असतील.. आपण कामावर गेल्यावर हा इथे काय उद्योग करतो ते कस कळेल आपल्याला.. बट तो बोलला तो तस काही करत नाही.. साडे बारा वाजेपर्यंत खाली ये मग कळेल अस बोलुन तो घराबाहेर गेलाय..

विराज अनिता सोबत बोलुन आपल्या रूममध्ये जातो..

इथे गाथासुद्धा शौर्यच्या फोनची वाट बघत असते.. मोबाईल हातात पकडतच ती गॅलरीत फेऱ्या मारत असते.. शौर्यला तिने मॅसेज केले असतात पण तिने केलेल्या मॅसेजचा शौर्यकडुन काहीच रिप्लाय आलेला नसतो.. आणि फायनली इतका वेळ हातात पकडलेला फोन रिंग होतो.. शौर्यचाच फोन असतो..

तुझ्याच फोनची वाट बघत होती मी शौर्य.. शौर्यचा फोन उचलल्या उचलल्या गाथा बोलते..

शौर्य : म्हणुन तर तुला फोन केला मी..

गाथा : तु ऑडिओ कॉल का केलास?? ह्या वेळेला तु व्हिडीओ कॉल करतोस ना??

शौर्य : गाथा मला तुला भेटावस वाटतंय..

गाथा : उद्या भेटुयात.. चालेल??

शौर्य : तिथे घरी उद्याच तिकीट बुक झाल असेल ग.. मग नाही भेटता येणार मला.. प्लिज..

गाथा खुप वेळ फोनवर शांत बसुन रहाते.. शौर्यच्या घरी नक्कीच काही तरी मोठा इस्यु झाला असेल अस तिला वाटत..

गाथा : मी वाट बघतेय तुझी.. सांभाळुन ये..

शौर्य : मी तुझ्या घराजवळच आहे..

गाथा गेलरी बाहेर नजर फिरवते पण तिला शौर्य नाही दिसत.. ती फोन तसाच चालू ठेवत पळतच आपल्या घराबाहेर पडते.. घराबाहेर पडताच शौर्यची बाईक कुठे दिसते का ते बघते.. घरापासुन थोडं लांब तिला शौर्यची कार दिसते.. ती लगेच शौर्यच्या कारच्या दिशेने जाऊ लागते.. गाथा समोर दिसताच शौर्य डॉर ऑपन करत तिला आत बसायला बोलवतो..
 
गाथा शौर्यच्या बाजूला जाऊन बसते..

गाथा : काय झालं शौर्य?? अस अचानक का जातोयस तु USA??

(शौर्य काहीच नाही बोलत खुप वेळ शांत बसुन तो फक्त तिच्याकडे बघत असतो..)

शौर्य बोलणा काही तरी.. गाथा शौर्यचा हात पकडतच त्याला बोलते..

शौर्य : मला नाही माहीत मी उद्याच जातो का.. बट मला अस वाटत की विर माझी उद्याची तिकीट बुक करेल.. उद्या रात्री 11.30 ची फ्लाईट आहे..

गाथा : तुला अस वाटत म्हणजे??

शौर्य : रेस्टोरेन्ट मधुन निघाल्यावर मी आधी फ्लाईट चॅक केल्यात.. माझ्या भावाला माझ्यापेक्षा चांगलं कोणी नाही ओळखु शकत.. तो स्वतः मम्माकडे जाऊन मला USA पाठवुन दे बोलणार.. जमलं तर उद्याच पाठव अस मम्मा बोलणार.. विर लगेच तिच ऐकणार.. कारण त्याला स्वतःला मी त्या घरी नकोय आत्ता. मग तो उद्याच रात्री 11.30 वाजताच तिकीट बुक करेल.. मला व्हाट्सएप सुद्धा करेल थोड्या वेळाने.. बट आय विश, जे मी विरबद्दल थिंकिंग करतोय तस नसावं.. म्हणजे तसा तो माझ्याबद्दल विचार करत नसावा..

गाथा शौर्यला काही बोलणार तोच शौर्यच्या मोबाईलवर विराजचा मॅसेज येतो.. 

शौर्य मोबाईल अनलोक करत गाथाकडे देतो..

गाथा शौर्यकडे बघतच विराजने केलेला मॅसेज ऑपन करते..

come home early & pack your bag .. गाथा शौर्यला विराजने केलेला मॅसेज वाचुन दाखवते..

थोड्याच वेळात एक PDF सुद्धा येते.. गाथा PDF ऑपन करून बघते तर खरच शौर्यची उद्याची तिकीट असते.. तो बोलल्याप्रमाणे साडे अकरा वाजताची..

गाथा : शौर्य खरच तु बोलतोस तस जिजुंनी तुझ उद्याच तिकीट बुक केलीय.. उद्या रात्रीची फ्लाईट आहे..

शौर्य : अस काही तरी होणार हे माहीत होतं ग मला.. म्हणुन तर तुला भेटायला आलो ना मी.. उद्या वेळ भेटला तर उद्या पण भेटुयात.. भेटशील ना??

गाथा एकटक शौर्यकडे बघु लागते..

गाथा : घरी काय झालं??

शौर्य : काय होणार?? नेहमीप्रमाणेच थोडा फार ओरडा पडला.. आणि आज ना उद्या मला USA जावंच लागणार होतंना.. म्हणुन मला एवढं काही नाही वाटत..

गाथा : नक्की ना??

शौर्य : हो ग.. फक्त तुझी खुप काळजी वाटतेय मला.. तुझ्या पासुन एवढ्या लांब जायला खरच खुप भीती वाटतेय ग.. मला नाही ना जाणार तु सोडुन.. मला खरच खूप टेन्शन आलंय..

हे बोलताना शौर्यच्या डोळ्यांत पाणी आलं असत.. तो एकटक गाथाकडे बघत बोलतो.. गाथा खुप वेळ त्याच्याकडे बघत रहाते आणि एक घट्ट मिठी त्याला मारत ती सुद्धा रडु लागते..

गाथा : माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझीच असेल मी.. नको ना टेन्शन घेऊस अस आणि ही दोन वर्ष फक्त.. ती ही लवकर जातील..

लव्ह यु.. सो मच.. शौर्य तिने मारलेली मिठी थोडी अजुन घट्ट करत बोलतो..

गाथाला आपल्या मिठीतुन सोडवत.. तिचे डोळे पुसत तिच्या कपाळावर हलकेच आपले ओठ तो टेकवतो..

शौर्य : काळजी घे.. अभ्यास नीट कर.. मंडेला विरसोबत डॉक्टरकडे जा.. विर बरा झालाय अस मला वाटत.. काल मी सुद्धा त्याला त्याच्या मम्मी आणि भावाबद्दल तो हर्ट होईल बस बोललोय.. मे बी तो रूममध्ये जाऊन थोडं रडला असेल हे नक्की.. म्हणजे जेवढं मला त्याच्यासाठी करता आलं ते मी केलंय.. बाकी त्याच्याकडे लक्ष द्यायला वहिनी आहेच.. आणि वहिनीला मदत करायला तु.. करशील ना एवढं माझ्यासाठी??

हम्मम्म.. गाथा रडतच आपली मान होकारार्थी हलवत शौर्यला बोलते..

गाथा : तु इकडच टेन्शन नको घेऊस.. इकडच सगळं बघायला मी आहे.. तु फक्त अभ्यास कर.. आणि सोबत तुला जे आवडत ते सुद्धा कर.. जस आधी USA ची लाईफ जगत होतास अगदी तस एन्जॉय करून रहा.. पण इंडियात मी तुझी वाट बघतेय हे ह्या दोन वर्षात कधी विसरू नकोस.. जस तुला मी तुझ्यापासुन लांब जाईल ह्याची भीती वाटते तस मलासुद्धा वाटत म्हणजे तुला माझ्यापासुन कोणी तरी लांब नेईल ह्याची भीती नेहमीच वाटत असतेरे.. आणि USA मधल्या तुझ्या बिजी शेड्युलमधुन माझ्यासाठी थोडासा वेळ काढायला जमला तर नक्की काढ. क्षणा क्षणाला मला तुझी आठवण येत राहील.

शौर्य : तुझ्याशिवाय माझं कोणत्याच गोष्टीत मन रमेल अस नाही वाटत ग.. बारा वाजत आलेत तु जा घरी.. मला पण एक काम आहे.. मला निघावं लागेल.. उद्या जमल तर नक्की भेटुयात..

गाथा : एवढ्या रात्री काय काम आहे..

शौर्य : माझ्या मोबाईलमध्ये एक रेकॉर्डींग आहे मला ते ऐकायचंय.. कुठे तरी शांत ठिकाणी बसुन..

गाथा प्रश्नार्थी चेहरा करत शौर्यकडे बघते.

शौर्य : तु अस नको ना बघुस.. मला पण नाही माहीत त्यात काय आहे. तीन दिवस झालेत ती रेकॉर्डिंग अशीच मोबाईलमध्ये आहे.. बट मी आज ऐकेल..

गाथा : माझ्या पुढ्यात ऐकलं तर नाही चालणार का??

गाथा अस बोलताच शौर्य तिच्याकडे बघु लागतो.. जास्त काही न बोलता तो मोबाईलमधलं रेकॉर्डिंग चालु करतो..

दोघेही शांतपणे अनिता आणि विराज रूममध्ये काय बोलत होते ते ऐकु लागतात..

अनिताने विराजला जे काही सांगितलं ते सगळ ऐकुन शौर्यचा त्याच्या रागावर आत्ता कंट्रोल होत नसतो..

गाथा : शौर्य एकदम शांत हो बघु आणि तुला ही रेकॉर्डिंग कुठे भेटली..?

शौर्य : माझा मोबाईलमधलं रेकॉर्डिंग ऑन करून मी माझा मोबाईल विरकडे दिलेला.. विरकडे दिलेला म्हणजे त्याने जबरदस्ती काढुन घेतलेला..

गाथा : शौर्य.. हे चुकीच आहे ना??

शौर्य : मग मम्मा माझ्यापासुन हे सगळं लपवून माझ्या भावाला खोट काहीही सांगते हे पण चुकीच आहे ना.. ही गोष्ट ती मला पण सांगु शकत होती ना?? आणि आत्ता मला घरी निघावं लागेल.. 

गाथा : शौर्य तु घरी जाऊन मम्मीनवर रागावणार नाहीस.. तो त्यांचा पास्ट होता शौर्य.. आपल्याला त्यांना समजुन घ्यावं लागेल ना.. 

शौर्य : जर तिने माझ्या काका आणि बाबावर खोटे आरोप केले नसते तर मी शांत बसलो असतो.. पण आत्ता नाही.. आणि नवरा जिवंत असताना अस कस कोण वागत?? मला तर विचार पण नाही करवत..

गाथा : शौर्य तु आत्ता काय करायचा विचार करतोयस??

शौर्य : आय डोन्ट नॉ.. आणि तु नको ना टेन्शन घेऊस.. तु फक्त तुझी काळजी घे.. तु सगळ्या गोष्टींच जास्त टेन्शन घेतेस हे मला नाही आवडत.. 

गाथा : तुला नाही आवडत मग नाही टेन्शन घेत.. पण शौर्य जे काही करशील किंवा बोलशील त्याआधी खुप विचार कर.. ती तुझी आई हे विसरू नकोस..

शौर्य : आपण एका मुलाची आई आहोत हे ती विसरली होती मी नाही.. मी प्रत्येक वेळेला माझी प्रत्येक जबाबदारी पार पाडलीय.

(गाथाला शौर्यला काही बोलणार तोच त्याला विराजचा फोन येतो)

शौर्य : गाथा मला निघायला हवं.. इथेच एक वाजत आले.. घरी पोहचेपर्यंत दीड वाजतील.. 

गाथा : उद्या जमलं तर भेट.. आणि डोकं शांत ठेवुन घरच्यांसोबत बोल.. काळजी घे.. आणि शौर्य मला तुझी काळजी वाटते म्हणुन टेन्शन येत.

शौर्य : म्हणजे तु टेन्शन घेणं नाही सोडणार??

गाथा : सोडणार.. तुझ्यासाठी काहीपण..

गाथा अस बोलताच शौर्य तिच्याकडे बघत हसु लागतो..

गाथा : तु अस हसल्यावर मला कोणत्याच गोष्टीच अजिबात टेन्शन नाही येत.. लव्ह यु माय स्वीट स्वीट जान..

(गाथा शौर्यचे दोन्ही गाल खेचतच त्याला बोलते)

शौर्य : लव्ह यु टु माय स्वीट स्वीट जान.. बट आत्ता मला खरच उशीर होतोय..

गाथा कार मधुन बाहेर पडणार तोच शौर्य तिचा हात पकडत तिला थांबवतो.. सोबत आणलेली डेरिमिल्क तो तिच्या हातात देतो..

शौर्य : तुझ्यासाठी काहीतरी.. (शौर्य आपला उजवा डोळा मिटतच गाथाला बोलतो)

गाथा : थेंक्स.. (गाथा हसतच शौर्यला बोलते) आणि सांभाळुन जा.. आणि प्लिज मम्मीना त्रास होईल अस बोलु नकोस..

शौर्य : तु तुझी काळजी घे.. आणि माझ्या घरच टेन्शन अजिबात घेऊ नकोस.. आणि कोणत्याच गोष्टीच तु अजिबात टेन्शन नाही घेणार.. माझं तर नाहीच नाही.. लव्ह यु.. बाय

गाथा : लव्ह यु टु..

गाथाला बाय करतच शौर्य आपल्या घरी यायला निघतो.. शौर्य तिथुन निघाला खर पण रेकॉर्डिंग ऐकुन आपल्या आईबद्दल नको नको ते विचार त्याच्या डोक्यात घर करू लागले होते.

इथे एक वाजुन जातात तरी शौर्य अजुन काही घरी आला नसतो.. 

अनिता : एकदा फोन करून बघ कुठे राहिलाय ते..

विराज : उचलत नाही.. मगासपासून पाच सहा वेळा फोन केलाय..

अनघा : मी बघु का ट्राय करून??

विराज : हम्मम..

अनघा सुद्धा शौर्यला फोन लावते पण शौर्य तिचासुद्धा फोन उचलत नसतो..

विराज : मला अस वाटत तुम्ही दोघींनी रूममध्ये जाऊन झोपा..

अनिता : एवढा वेळ थांबलोय तर अजुन थोडा वेळ वाट बघुयात..

अनघा : मला सुद्धा असच वाटतंय.. थोडा वेळ वाट बघुयात..

अनिता आणि अनघा सोफ्यावर बसुनच शौर्यची वाट बघत असतात.. विराज हॉलमध्येच फेऱ्या मारत असतो.. पाणी पियायला म्हणुन तो डायनिंग टेबलजवळ जातो.. डायनिंग टेबकवर ठेवलेल्या जग मधुन ग्लासात पाणी घेत तो पाणी पितो.. तोच त्याच लक्ष शौर्यने घराबाहेर पडताना डायनिंग टेबलवर ठेवलेल्या नॉटबुकवर जात..

अनघासोबत बोलण्याच्या गडबडीत तो ती नोटबुक ऑपन करायच विसरूनच गेलेला असतो.. तो लगेच हातातील ग्लास डायनिंग टेबलवर ठेवतो आणि ती नॉटबुक हातात घेत त्यात शौर्यने काय लिहिलं आहे ते वाचतो..

"इथुन तु मम्माच्या रूममध्ये जाशील. गेल्या गेल्या तिला सॉरी वैगेरे बोलशील.. मम्मा तुझ्यासारखच मला सुद्धा शौर्यचा खुप त्रास होतोय अस तिला बोलुन तु तिची समजुत काढशील.. मला अस वाटत की आपण त्याला USA पाठवुन देऊयात अस बोलुन म्हणजे अगदी मम्माच्या मनातल बोलुन तु मम्माच मन परत एकदा जिंकशील.. जमलं तर उद्याच पाठव अस मम्मा तुला बोलेल.. मग मम्माचा शब्द तु कसा पडु देशील विर.. खुश होत लगेचच माझं तिकिट बुक करशील तु.. ते ही उद्याच रात्री साडे अकरा वाजताच.. तिकीट बुक केल्यावर मला लगेच व्हाट्सएप सुद्धा करशील..

आत्ता पण तुला असच वाटतंय का मी कॅमेरा लावलाय रूममध्ये??? "

शौर्यने हे सगळं आधीच कस लिहिलंय.. विराज स्वतःच्याच मनाला प्रश्न करतो.. ती बुक तशीच हातात घेऊन तो अनिताला दाखवतो.. अनिता सुद्धा त्या बुक मध्ये शौर्यने जे लिहिलंय ते वाचु लागते..

अनिता : तेव्हा शौर्य घरी होता??

विराज : माझ्या पुढ्यात तो ह्या बुकमध्ये काही तरी लिहीत होता.. मम्मासोबत बोलुन आल्यावर ही बुक ऑपन कर मग तुला कळेल मला सगळ्या गोष्टी कश्या कळतात ते.. अस बोलुन तो घराबाहेर पडलाय.. तो घराबाहेर पडल्यावर मी तुझ्या रूममध्ये आलो.. आता पाणी पिताना माझं ह्या बुककडे लक्ष गेल. मी त्याच उद्या रात्री साडे अकरा वाजताच USA च तिकीट बुक करणार हे त्याला आधीच माहिती होत..??  How's its possible मम्मा?? I can't believe it's..

अनिता : शेखर असा होता.. त्याला क्लाइन्ट कोणत्या वेळेला काय विचार करेल हे आधीच माहीत असायचं.. कधी कधी इंपोर्टन्ट मिटिंग तो केन्सल करायचा.. तो जात नाही मग मला जावं लागायच.. पण तो मला सुद्धा जाऊ द्यायचा नाही.. कंपनीच नुकसान होऊ नये म्हणुन मी सुरजला सोबत घेऊन जायची.. बट जाण्याआधीच तो मला सांगायचा.. समोरच्या पार्टीला आपल्या सोबत डिल करण्यात काहीही इंटरेस्ट नाही.. आपल्या कंपनीचा टर्न ओव्हर हे एक कारण देऊन ते हे कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट करतील.. आणि खरच तसच व्हायच.. अस एकदाच नाही भरपुरदा झालंय. आणि फक्त क्लाइन्टच्या बाबतीत नाही इथे घरच्यांच्या बाबतीत ही तो जे अंदाज करायचा ते परफेक्ट असायचे.. 

(विराज आणि अनघा एकमेकांकडे बघतच रहातात..)

तोच शौर्य डॉर ऑपन करून घरी येतो..

विराज : शौर्य दिड वाजलाय.. कुठे होतास एवढा वेळ??

शौर्य विराजच्या प्रश्नाच उत्तर न देता अनिताकडे रागात बघत असतो.. विराज शौर्यकडे बघत आत्ता घाबरतच अनिताकडे बघत असतो.. अनिता आणि अनघा दोघेही उठुन उभं रहातात..

शौर्य मी काही तरी विचारतेय तुला..

शौर्य : ह्यात जे रेकॉर्डिंग होत ते एका स्पेसिअल अश्या ठिकाणी जाऊन ऐकत होतो.. तु पण ऐक.. तु म्हणजे तुम्ही सगळेच ऐका.. आणि वहिनी तु आणि विर मला समजताय ना तेवढा पण मी खालच्या लेव्हलचा नाही. जे तुमच्या बेड रूममध्ये हाइडन कॅमेरा वैगेरे लावायला.. आपण कोणाबद्दल काय बोलतो ह्या गोष्टीचा ह्या पुढे विचार करून बोलत जावा.. USA च तिकीट माझं बुक केलंस विर त्याबद्दल थेंक्स.. दोन वर्षांनी मी इथे ह्या घरी कधीच येणार नाही.. मी माझ्या काकासोबत रहायला जाणार ते ही कायमच.. 

विराज : तुला अचानक काय झालं??

शौर्य : तुला बोललो होतो ना मी जस समजतो तस काही असेल तर मी हिला माफ नाही करणार.. आपला नवरा जिवंत असताना दुसऱ्या माणसासोबत..?? मला तर विचार पण नाही करवत.. कस जमलं हिला अस वागायला.. 

शौर्य.. विराज रागातच त्याच्यावर ओरडत एक सनसनीत कानाखाली शौर्यला मारतो..

विराज : काय बोलतोस ते कळत काय तुला??

शौर्य : चुकीच बोललो का मी?? तु माझा मोबाईल त्यादिवशी घेतलासना तेव्हा मी त्यात रेकॉर्डिंग चालु केलेलं.. मला माहिती होत तु माझा मोबाईल घेणार ते.. आणि मी जो अंदाज लावलेला तो पण करेक्ट होता माझा. तुला विचारलं सुद्धा मी तस काही आहे का?? पण तु टाळाटाळ केलीस.. एवढं सगळं हिच्याबद्दल कळुन मला तर हिच्यासोबत बोलायची इच्छा सुद्धा नाही..

अनिता : शौर्य तु जास्त बोलतोयस आता.. जसा शेखर होता अगदी तसाच तु आहेस.. त्याने सुद्धा मला समजुन नाही घेतलं कधी आणि आत्ता तु..

शौर्य : तुझं दुसर अफेअर बाबा जिवंत असताना त्याने समजुन घ्यावं अस तुला वाटत का?? आणि मॅन म्हणजे तु नेहमी समोरच्याकडुन का अपेक्षा ठेवतेस.. तु तो जिवंत असताना कशी वागलीस आणि तो गेल्यावर कस वागतेस हे तुझं तुला तरी माहिती आहे का?? नुसता पैसा आणि पैसा हवाय तुला.. वर माझ्या काकावर नको ते आरोप करतेस.. 

अनिता : काकाने जास्तच शिकवलेलं दिसतंय तुला..आणि त्याच्यासारख नको ते आरोप माझ्यावर नाही हा करायचे शौर्य.. आई आहे मी तुझी हे विसरू नकोस..

शौर्य : कोण आई??? जिने माझ्या बाबाला जिवंतपनी नरक यातना दिल्या ती..?? का ह्याच्या डॅड सोबत लग्न करून मला नरक यातना सहन करायला लावल्या ती आई..??ह्या पैकी कोणती आई आहेस ते आज सांगच तु मला?? मी त्यादिवशी एक खोटं बोललो, तुम्हा लोकांना न विचारता घराबाहेर गेलो तर एवढा मोठा सिन तु आज इथे क्रिएट केलास.. लगेच मला USA पाठवायला निघाले तुम्ही लोक?? तु ह्याच्या डॅडला भेटायला जाताना माझ्या बाबाला विचारून जायचीस?? का आजीला वैगेरे विचारून तिची परमिशन घेऊन जायचीस?? पोटात ठेवलेल्या बाळाला मारून टाकताना तु साद घरच्यांना विचारलं नाहीस.. आणि इतरांकडून अपेक्षा ठेवतेस की त्याने प्रत्येक गोष्ट करताना तुला विचारून आणि तुझ्या परमिशनने करावी.. मुळात आपण जी गोष्ट आत्तापर्यंत केली नाही ती तु दुसऱ्यांकडून का एक्सेप्ट करतेस तु..

अनिता : शौर्य तु जास्त बोलतोयस आत्ता.. 

शौर्य : ओहह रिअली?? आय डोन्ट थिंक देट.. 

विराज : शौर्य तु रूममध्ये चल बघु.. तुला नाही कळत आहे तु काय बोलतोयस ते..

(विराज शौर्यला पकडत तो त्याच्या रूममध्ये घेऊन जाऊ लागला)

शौर्य : विर मला सोड.. आणि माझ्यापासुन लांब रहायच.. (विराजला लांब ढकलतच शौर्य बोलतो) काय काय सांगत होतीस तु ह्याला?? काकाने तुझ्यावर हात टाकला.. एवढा घाणेरडा आरोप तु माझ्या काकावर कस करू शकतेस ?? तुझं लग्न झाल्यावर कधी त्याने तुझ्या जवळ यायचा प्रयत्न केला?? केला का बोलणं?? (अनिता शांत बसुन असते) मी तुला काही तरी विचारतोय.. अन्सर मी मम्मा.. (शौर्य जोरातच ओरडतो)

(अनिता नकारार्थी मान हलवते) 

शौर्य : नशीब हे तरी तु खर बोललीस.

अनिता : तुला काय बोलायचं मी जे विरला सांगितलं ते खोट आहे..??

शौर्य : ऑफकोर्स येस.. एक कॉमनसेन्स नावाचा प्रकार आहे का नाही?? तुझ्या लग्नानंतर जवळपास 8 वर्षांनी काकाच लग्न झालं.. त्या 8 वर्षात त्याने कधी तुझ्यावर तु बोलतेस तस हात टाकण्याचा प्रयत्न नाही केला.. आठ वर्षांनी त्याने काकीसोबत लग्न केलं ते ही लव्ह मेरिएज.. आपल्या लग्नाची बायको सोडुन तो तुझ्यावर हात का टाकेल?? तेही घरात इतकी माणस असताना?? जर त्याला अस काही करायच असत तर तु घरात ज्या वेळेला एकटी आहेस अशी संधी बघुन तो करेल ना.. आणि तरी तो त्यावेळेला तुला काही तरी सांगत होता.. तुला रिक्वेस्ट करत होता की तु समजतेस तस काही नाही.. पण तु त्याच काहीही ऐकुन न घेता त्याला सगळ्यांसमोर हवं नको ते बोललीस, त्याच्यावर हातसुद्धा उचललास?? तु हे सगळं विरला सांगताना अस अर्धवट का सांगितलंस?? त्यानंतर काकाने सुसाईड करायचा प्रयत्न केला, तो मरणातून वाचला हे सांगितलंस तु विरला?? त्यानंतर बाबाने आणि आत्याने तुला सांगितलेलं काका का अस वागला होता ते.. मग माझा काका का अस वागला हे तु विरला का नाही सांगितलंस.. फक्त त्याने माझ्यावर हात टाकला एवढंच कस सांगितलंस..??

अनिता : शौर्य त्या वेळेला मला जे आठवत होत ते मी सांगितलं.. आणि तु माझ्यावर अस ओरडुन बोलु नकोस.. 

शौर्य : काकावर तर अशीच ओरडुन बोलत होतीस.. तेही त्याची काही चुक नाही हे माहीत असुन सुद्धा.. आणि काकाने सुसाईड अटेम्प केली ही एवढी मोठी गोष्ट तु विसरलीस?? How's it's possible?? वर विरला सांगतेस बाबा काकाला ओरडला नाही आपल्या भावाला पाठीशी घालत होता एन्ड ऑल.. का माझ्या बाबाच नाव खराब करतेस तु??

अनिता : एक मिनिट.. तो खरच तस वागलेला म्हणुन मी त्यावेळेला तस रिएक्ट होत होती.. कारण त्याआधी ऑफिसमध्ये नजर ठेवुन असायचा तो.. वर शेखरला नको ते सांगायचा.. आमच्यात भांडण लावुन द्यायचा प्रयत्न करायचा तो..

शौर्य : आपल्या भावाचा संसार तुटू नये अस वाटायच त्याला.. म्हणुन तस वागायचा तो.. तुझं आणि ह्याच्या डॅडच जे काही चालु असायचं ते त्याला नाही बघवायच म्हणुन तस वागायचा..

अनिता : माझं आणि सुरजच तस काही नव्हतं शौर्य.. उगाच तुझ्या काकाच ऐकुन माझ्यावर नको ते आरोप करू नकोस.. कळलं.

शौर्य : ह्याच्या डॅडसोबत तु गप्पा मारत नाही बसायचीस??

अनिता : त्याच्या घरी प्रॉब्लेम चालु होते.. तो ते सांगायचा मला.. तुझा काका समजत होता तस नव्हतं काही.."

शौर्य : तो तर बाबाचा पण चांगला मित्र होता.. मग तो तुलाच का त्याचे प्रॉब्लेम  सांगायचा?? बाबाला सुद्धा सांगु शकत होता ना आणि ऑफिसमध्ये तु काम करायचं सोडुन त्याच्या घरचे प्रॉब्लेम सोल्व्ह करत बसायचीस.. आणि इथे बाबा त्याचा पूर्ण वेळ तुझ्यासारख नको त्यांना न देता आपल्या फॅमिलीला द्यायचा म्हणुन तु त्याच्याशी भांडायचीस?? विरचा डॅड कोण होता?? जे तु त्याला तुझ्यासोबत मिटिंगमध्ये घेऊन जायचीस?? आपला लहान दिर आपल्यासोबत आपण बोलवेल तिथे यायला तैयार असताना तुला ह्याच्या डॅडसोबतच जायची गरज का असायची?? ते ही तो आपल्या कंपनीचा पार्ट नसताना.. काही स्पेसिअल रिझन होत का त्या मागे??

अनिता : शौर्य प्लिज स्टॉप..

शौर्य : जर तुला विरला खर सांगायला जमत नव्हतं तर खोट सांगायच नव्हतस.. 

अनिता : शौर्य मी तुला परत एकदा सांगते मी खोटं नाही सांगितलं.

शौर्य : मग ज्या माणसामुळे आपल्या संसारात भांडण होत होती त्याला कायमच लांब करायचं सोडुन तु काकाला कंपनीतुन बाहेर केलंस..

अनिता : समीर स्वतःहुन कंपनी सोडून गेला..

शौर्य : तु त्याला तस वागायला भाग पाडलस.. तुला त्याने तुमच्या बिजीनेसमध्ये एंटर केलेलं आवडत नव्हतं कारण तु तो बिजीनेस फक्त तुझाच बिजीनेस आहे असच समजत होतीस जे तु आत्ताही समजतेस.. त्यात बाबाला सांगत होतीस की काका कंपनीत बाबाची जागा घ्यायला बघतो एन्ड ऑल.. तुझ्या अश्या बोलण्यावर बाबाने तुझ्या डोक्यात चालु असलेला गैरसमज हे बोलुन दूर केला कि हा बिजीनेस आजोबांचा आहे.. ह्यावर काकाचा पण तेवढाच अधिकार आहे जेवढा बाबाचा आहे.. एक वेळ तु तो बिजीनेस तुझा आहे अस बोलली नाहीस तरी चालेल.. आणि मला नाही वाटत बाबा त्यात काही चुकीच बोलला.. त्यावरून सुद्धा तु बाबासोबत भांडायचीस.. बाबाने अस बोलताच तु ह्याच्या डॅडची कंपनी जॉईंट करणार होतीस.. का इतर दुसरीकडे कुठे जॉब नव्हते का?? आणि तुमच्या दोघांत आपल्यामुळे भांडण नको म्हणुन काकाने बँकेत जॉब करायचं ठरवलं.. आणि बाबा तुला टाईम द्यायचा नाही..?? अस कस बोलु शकतेस तु?? खुप सारे अल्बम माझ्या कपाटात आहेत ते दाखवुन तुला मी आठवण करून देऊ का?? बाबा सोबत आपण कुठे कुठे फिरायला गेलोय ते.. का खोट काहीही सांगतेस माझ्या बाबाबद्दल.. उलट तु बाबाला आणि मला हवा तसा टाईम नाही दिलायस.. इव्हन बाबा गेल्यानंतर तर नाहीच नाही.. मला आई आहे का नाही हेच माहीत नव्हतं.. तुझी जबाबदारी फक्त नि फक्त तुझा बिजीनेस आणि हा विर आहे बाकी काही नाही.. आणि सारख माझा बिजीनेस माझा बिजीनेस करतेस ना तो बिजीनेस बाबाच्या बाबांचा होता.. माझ्या बाबानंतर त्याच्यावर फक्त नि फक्त काकाचा अधिकार होता आणि अजुनही आहे.. हे घर ज्या घरातुन त्याला जायला सांगितलंस ह्या घरावर पण काकाचा अधिकार आहे तुझा नाही..

अनिता : हे घर शेखर आणि मी आम्ही दोघांनी मिळुन घेतलय शौर्य.

शौर्य : आधी आपण ज्या घरी रहायचो ते घर विकुन अस पुर्ण वाक्यात बोल.. आधीच्या घरावर काकाचा अधिकार होता.. जर ते विकायला त्याने परमिशन दिली नसती तर हे घर तु घेऊच शकली नसतीस.. आणि बाबा नंतर काकाने तुझ्या हातातुन बिजीनेस आणि हे घर सहज काढुन घेतला असत.. बट त्याने तस नाही केलं.. तु घरातुन जा बोललीस.. तो तुला एकही शब्द न बोलता गप्प घरातुन बाहेर पडला.. वाईट ह्या गोष्टीच वाटतय तुला त्याला थांबवावस नाही वाटलं.  निदान काकी प्रेग्नेंट होती.. तिच्याकडे बघुन तरी तु त्याला थांबवु शकत होतीस ना.. बट तु तस नाही केलंस कारण तर तुला त्या वेळेला फक्त विरचा डॅड हवा होता बाकी काही नाही.. आपल्या माणसांना तुला वेळ देता आला नाही.. वर तु माझ्या बाबाला ब्लेम करतेस की त्याने तुला समजुन घेतलं नाही.. संसार सोडुन तु बिजीनेसच्या मागे लागलीस.. आणि जस तुला माझ्या बाबतीत आज वाटलं ना तसच सॅम मला तुझ्या बाबतीत वाटत बाबाचा तुझ्या बाबतीला निर्णय चुकला.. स्वतःची लाईफ तर त्याने स्पोईल केली सोबत माझी पण.. आय हॅट यु फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट..

अस बोलत शौर्य तिथुन पळतच आपल्या रूममध्ये जायला निघतो.. विराज त्याला आवाज देत असतो पण तो कोणाच काही ऐकायला तिथे थांबत नाही..

त्याच हे अस बोलणं ऐकुन अनिता खालीच बसते.. विराज आणि अनघा दोघेही पळत तिच्याजवळ जात तिला सावरतात.

मम्मा.. आर यु ओके.. विराज तिला आपल्या जवळ घेतच विचारतो.. अनिता विराजला मिठी मारत रडु लागते.. अनघा पळतच ग्लासातुन पाणी आणुन तिला देते.. पण ती तिच्या हातातुन ग्लास काही घेत नाही हे बघुन विराज अनघाच्या हातातुन पाण्याचा ग्लास घेत तिला पाणी प्यायला सांगतो..

तु रूममध्ये चल आणि आराम कर बघु.. विराज तिला हाताला पकडतच तिच्या रूममध्ये नेतो... 

विराज : मम्मा नकोना त्रास करून घेऊस स्वतःला.. मी आहे ना तुझ्यासोबत..  आणि जे झालं ते विसरून जा.. प्लिज.. मी बघतोच त्याच्याकडे..

अनिता काहीच बोलत नाही.. शांत बसुन असते..

विराज अनघाकडे बघतो..  आणि इशाऱ्यानेच तिला आपल्या मम्मासोबत बस बोलतो.. आणि शौर्यच्या रूममध्ये निघुन जातो..

मम्मी प्रत्येकाच्या लाईफचा पास्ट असतो.. तसा तुमच्यासुद्धा आहे.. (अनिताचा हात हातात घेतच ती तिला समजवत बोलते).. आपण चुकीच वागलो की बरोबर वागलो हे सगळ्यांपेक्षा जास्त आपल्याला माहीत असत.. मे बी शौर्यने त्याच्या बाजुने विचार केला.. आणि मॅन म्हणजे त्याने त्याच्या मनात काही नाही ठेवलय.. त्याच्या मनातलं आत्तापर्यंतच तो तुमच्यासमोर बोलुन व्यक्त झालाय.. जर तुम्हांला अस वाटत असेल की तो बोलतो ते सगळं चुकीच आहे.. त्याने केलेले आरोप चुकीचे आहेत तर त्याच्या समोर जाऊन तुम्ही बिनदास्त पणे त्याला एक्सप्लॅन करा.. मी त्या वेळेला अस वागली कारण माझी ही मजबुरी होती, त्यामागे हे रिझन होतं.. आणि जर शौर्य बोलतो ते तुम्हांला पटत आहे तर आपण एकच गोष्ट करू शकतो..

(अनघा अस बोलताच अनिता तिच्याकडे बघु लागते)

अनिता : काय??

अनघा : होऊन गेलेला पास्ट आपण बदलू तर नाही शकत.. शौर्यच्या बाबांना परत आणुन आपण त्यांची माफी नाही मागु शकत बट जर तुमच्या अश्या वागण्याने त्याचे काका, काकी किंवा आजी दुखावले असतील तर आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांची माफी मागुन त्यांना ह्या घरी परत आणुन जस शौर्यचे बाबा असताना हे घर एकत्र होत तस एकत्र तर नक्कीच राहू शकतो.. जस शौर्य बोलतो बिजीनेसमध्ये काकाचा अधिकार आहे.. तो अधिकार त्यांना द्यायला हवा अस मला वाटत.. आणि ह्या सगळ्यात शौर्य पण दुखावलाय. बट आपली मम्मा आपल्या काकाला सॉरी बोलुन परत ह्या घरी आणते.. आणि बिजीनेस मध्ये त्याच्या काकाचा अधिकार त्यांना परत देते हे बघून शौर्य पण तुम्हांला माफ करेल.. आणि मम्मी हा बिजीनेस शौर्यच्या आजोबांचा होता.. ते इथेच ठेवुन गेले.. मग त्याच्या बाबाने त्याला भरपुर मोठं केलं पण ते ही बिजीनेस इथेच ठेवुन गेले.. सांगण्याचा उद्देश हा की आपण जे काही कमवणार ते सगळं इथेच ठेवुन जाणार आहोत.. मग माझं आणि फक्त माझंच आहे असा हट्ट का?? माणसाने बिजीनेस करून मोठं होण्यापेक्षा आपल्या नावाने मोठं व्हावं.. जाता जाता आपलं नाव शेवटपर्यंत लोकांच्या लक्षात रहावं अस काही तरी करावं.. जस शौर्यच्या बाबाने केलं.. शौर्य अजुन तुमच्या पेक्षा त्याच्या बाबाला जास्त महत्व देतो.. ते फक्त 6 वर्ष त्याच्या सोबत होते आणि तुम्ही त्याच्या आयुष्यात 20 वर्ष आहात.. शौर्यच्या बाबांनी त्या सहा वर्षात बीजनेस मोठा केलाच पण त्याच बरोबर आपल्या फॅमिलीला भरभरून प्रेम दिलं.. तुम्ही शौर्यसाठीच बिजीनेस मोठा करत असणार आय नॉ बट शौर्यला वेळ पाहिजे होता तो तुम्ही नाही देऊ शकले त्याला.. इव्हन मी घरी आली ना तेव्हा पासुन मी जे बघितलं त्यावरून पण तुम्हांला सांगते.. तुम्ही आत्ताही तेच करतायत आणि आत्ता हे थांबवलं पाहिजे अस मला वाटत.. थोडा वेळ निघुन गेलाय पण केलेली चुक सुधारायची थोडी फार संधी देऊन गेलाय.. आणि आपण केलेल्या चुकीची सगळ्यांसमोरे माफी मागण्यात जो मोठेपणा असतो तो कश्यातच नसतो.. बाकी निर्णय तुमचा असेल.. विराज आणि मी तुम्ही घेतलेल्या तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमच्या सोबत असू.. आमचे पप्पा बोलतात.. माणसाने आपल्यातला मी पणा सोडला की माणुस मोठा होतो.. पैसा तर येऊन जाऊन असतो आपल्याकडे.. 

(अनिता अनघाच बोलणं ऐकतच रहाते..)

तुम्हांला पाणी वैगेरे हवंय?? 

(अनिता मानेनेच नाही बोलते..)

डोक्यात येणार विचार सगळे काढुन टाका.. आय नॉ ते जाणार नाहीत.. बट मी आणि विराज आम्ही आहोत तुमच्या सोबत.. मग नका कसलं टेन्शन घेऊ तुम्ही.. आणि झोपा बघु..  टेन्शन कसलच नाही घ्यायच.. सगळं काही चांगलं होईल.. जस आधी होत तस.. अनिताच्या अंगावर चादर टाकत तिच्या रूमची लाईट बंद करत अनघा तिच्या रूममधुन बाहेर पडते...

इथे विराज मात्र शौर्यवर खुप भडकला असतो.. अनघा तिथुन शौर्यच्या रूममध्ये येते.. शौर्यचे दोन्ही गाल अगदी लालबुंद झाले असतात.. त्याच्या डोळ्यांतुन येणार पाणी अनघाला खुप काही बोलुन गेलं असत..

अनघा : विराज तु त्याच्यावर हात उचललास??

विराज : तो कसा बोलतोय ते बघ आणि हे बघ बेग घेऊन घर सोडुन चाललाय.. खुप मोठा झालाय तो.. आम्हांला अक्कल शिकवतोय.. मला तर आतापर्यंत बोलत होताच आज मम्माला सुद्धा हवं नको ते बोलतोय.. तिला काय वाटेल ह्याचा जरा पण विचात नाही ह्या मुलाला

शौर्य : काय चुकीच बोललोय यार.. तु नुसतं मम्मा मम्मा नको करुस.. मम्माला आफ्टर मेरिड अफेअर करायला लाज नाही वाटली मग...

शौर्य मी लास्ट सांगतोय तु स्टॉप कर हे सगळ.. विराजचा हात पुन्हा शौर्यच्या गालावर उठतो..

अनघा : विराज काय करतोयस तु..?? (विराजला पकडतच अनघा त्याला लांब करते..)

शौर्य : तिला त्या गोष्टी करताना काही वाटलं नाही मग मी त्याच गोष्टी तिच्यासमोर रिपीट केल्यात त्या तिला ऐकायला का त्रास होईल??

अनघा : विराज तो खर तेच बोलतोय.. तु जस रिएक्ट होशील ह्याचा अर्थ असा नाही की शौर्यसुद्धा तसाच रिएक्ट होईल.

विराज : काकाने त्यादिवशी त्याची बाजु ह्याला बोलुन दाखवली म्हणुन अस रिएक्ट होतोय हा बाकी काही नाही.. आणि जर झाली असेल चुक तर आपल्या आईला कोणी एवढं बोलत का?? आणि मुळात ह्याचा बाबा तिला टाईम नाही द्यायचा. म्हणुन अस झालय..

शौर्य : एकच प्रश्न विचारतो.. इन फ्युचर तु टाईम नाही देत अस बोलुन वहिनी तुझ्यासोबत अस वागली तर??

अनघाला रागातच बाजुला करत विराज जाऊन शौर्यची कॉलर धरतो..

शौर्य : नाही ना आवडणार.. मग माझ्या बाबाबद्दल काहीही माहीत नसताना तु मगासपासून काहीही का बोलतोयस यार.. तुला मी वहिनीबद्दल अस बोलल्यावर एवढा राग आला.. माझ्या बाबाला मम्माबद्दल अस काही कळल्यावर केवढा राग आणि त्रास झाला असेल.. तु माझा विचार नाही करत आहे यार.. तुला मम्माला बोललेलं सहन नाही होत तस मला माझ्या बाबाला, काकाला आणि तुला कोणी बोललेलं नाही सहन होत.. वरून देव जरी येऊन मला बोलला की तुम्ही तिघ चुकीच काही वागलात तर मी नाही विश्वास ठेवु शकत.. कारण मला माहिती तुम्ही लोक चुकीच कधीच नाही वागणार.. तु मला कधीच समजुन नाही घेत यार.. मगाशी पण तोंडाला येईल ते बोललास मला.. माझी नसेल तुझ्या भावासोबत बरोबरी होत. बट जे मी तुझ्यासाठी करू शकतो ना ते ह्या जगात कोणताच भाऊ आपल्या भावासाठी नाही करू शकणार ही गोष्ट लक्षात ठेव तु.. तुझा राग आणि तुझा मार दोन्ही सहन करतो मी विर.. आत्ता पण माझी काही चुक नसताना हवं तसं मारतोयस तु.. अजुन हवं तर मार नाही तर मारून टाक.. बट मम्मा चुकीची आहे हे शेवंतपर्यंत मी बोलणार आणि मी नाही ह्या घरी नाही म्हणजे नाही रहाणार.. उद्या रात्रीची फ्लाईट आहे आय नॉ.. बट मी आत्तापासून एअरपोर्टवर जाऊन बसणार.. बट ह्या घरी नाही थांबणार..

अनघा : शौर्य एकदम शांत बस बघु.. आणि विराज.. तुला मी आधीच सांगितलंय त्याच्यावर तु हात वैगेरे नाही उचलणार.. का अस वागतोयस तु.. लहान आहे का तो??

विराज : खाली काय तमाशा करत होता हा ते नाही दिसत का तुला??

अनघा : त्याच्या वडिलांची आणि काकाची त्याच्या आईसमोर बाजु मांडत होता तो.. त्यात तुला तमाशा वाटतो.. आणि शौर्य तु मला अस का बोललास की मी तुमच्या बेडरूममध्ये हाइडन कॅमेरा वैगेरे लावले नाहीत.. माझ्याबद्दल विचार करून बोला. मी कधी तुला अस बोलली तु अस काही केलं असशील..

अनघा अस बोलताच शौर्य विराजकडे बघत परत अनघाकडे बघु लागतो.

शौर्य : तुच विरला तस बोललीस ना??

अनघा : मी अस काहीही नाही बोललीय.. 

शौर्य : विर तु खोटं बोललास??

विराज : तस बोललो नसतो तर तु सांगितलं नसतस मला.. 

शौर्य : तु आणि मम्मा तुम्हाला पाहिजे तेव्हा खोट बोलु शकता.. फक्त मी खोटं बोललो की प्रॉब्लेम आहे.. तुम्हा लोकांना त्रास होतो मग..

विराज : तुला आम्ही दोघे बेडरूममध्ये काय बोलत होतो ते कसं कळत होत मग शौर्य?? तेव्हा तर तुला मोबाईल नव्हता

शौर्य : जस तु मम्माच्या रूममध्ये जाऊन काय बोलणार हे आधीच कळलं तस ते कळलं.. आणि त्यादिवशी डायनिंग टेबलवर मी मोबाईल ठेवुन गेलेलो तेव्हा पण रेकॉर्डिंग चालु होत.. मला माहित होतं मम्माला मी काकासोबत बोलतो ह्याचा संशय आहे.. ती काका बद्दल विषय काढेलच ह्याची खात्री पण होती.. म्हणुन मी मोबाईल जाणुन बुजुन ठेवुन गेलो.. तेव्हा तुच वहिनीला बोलला होतास रूममध्ये गेल्यावर मम्माने तुला जे काही सांगितलं ते सांगतो.. मी फक्त अंदाजाने बोललो होतो.. आणि तुझ्या बाबतीतले माझे सगळे अंदाज खरे निघतात..

विराज : मम्मासोबत तिच्या रूममध्ये मी गेलेलो तेव्हा तर तुझा मोबाईल नव्हता तिथे.. मग ते कस कळलं तुला..

शौर्य : त्यावेळेला मी पण मम्मासोबत बोलायला तिच्या रूममध्ये जात होतो.. आणि नेमकं तु आत गेलेलास म्हणुन तु जे तिच्यासोबत बोलत होतास ते मी ऐकलं.. मी घरी CCTV वैगरे नाही लावलेत.. आणि त्यादिवशी ज्यो आणि माझी मित्र मंडळी सगळे आर्यनच्या घरी होती हे खरंच मला वृषभने सांगितलेल.. आत्ता जाऊ मी??

विराज : कुठे चाललायस??

शौर्य : बोललो ना मी ह्या घरात नाही राहणार. एकच गोष्ट तु मला रिपीट करायला का लावतोयस.??

अनघा : शौर्य आय नॉ मम्मी चुकल्यात.. बट त्यांना त्यांनी केलेली चुक सुधारायची एक संधी आपण देऊन बघुयात..

शौर्य : तुम्हां लोकांना द्यायची तर द्या.. बट मला इथुन जाऊ द्या.. मी नाही रहाणार इथे.. 

अनघा : शौर्य प्लिज.. माझ्यासाठी इथे थांब.. तसही आजचा एक दिवस ना?? मग तर तु USA जाशीलना.. प्लिज. माझ्यासाठी एवढ नाही करणार तु??

शौर्य हातातील बेग तिथेच ठेवुन आपल्या रुमच्या गॅलरीत जाऊन बसतो...

अनघा : नाही ना जाणार तु??

शौर्य : फक्त तुझ्यासाठी.. तुम्ही दोघांनी जाऊन झोपा..

अनघा आणि विराज आपल्या रूममध्ये निघुन जातात..

शौर्य मात्र ब्रुनोला मिठी मारून गेलरीत बसुन असतो..

इथे अनितासुद्धा ती आत्तापर्यंत जे काही वागली त्याचा विचार करत रात्रभर जागी होती.. 

सकाळचे साधारण 8 वाजतात.. अनघा आणि विराज अनिताच्या रूममध्ये जाऊन ती काय करते ते बघायला जातात.. अनिता विचार करत बेडवर बसुन होती..

अनिता : शौर्य??

विराज दिसल्या दिसल्या ती त्याला शौर्यबद्दल विचारते..

विराज : झोपलाय तो.. तुला बर वाटतंय??

अनिता : मी नाशिकला जातेय.. मला अस वाटत तु पण माझ्यासोबत यावं

विराज : नाशिकला का जातेयस तु??

अनिता : ते तुला नाशिकला गेल्यावर कळेलच.. तुला माझ्यासोबत नसेल यायच तर मी एकटी जाईल डोन्ट वरी..

विराज : ब्रेकफास्ट करून घे.. मग जाऊयात.

अनिता : तु ब्रेकफास्ट करून घे.. मला तसही भुक नाही.. आणि अनघा तु आलीस तर मला अजुन बर वाटेल..

अनघा विराजकडे बघत काय करू म्हणुन विचारते.. विराज मानेनेच तिला हो म्हणुन बोलतो.

तिघेही तैयार होऊन नाशिकला जायला निघतात..

क्रमशः

(नाशिकला का गेली असेल अनिता?? अनघा बोलते तस अनिता खरच शौर्यच्या काकाला परत घरी घेऊन येईल?? पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all