अतरंगीरे एक प्रेमकथा १०२

In marathi

विराज : अचानक काय काम काढलस?? मगाशी एवढा वेळ तुझ्या रूममध्ये बसलेलो तेव्हा काही बोलला नाहीस ना म्हणुन विचारतोय..

शौर्य : अचानक कळलं ना मला म्हणुन..

विराज : काय अचानक कळलं??

शौर्य : मी शॉपिंगला जातोय उद्या.. मला पैसे हवेत.. 

विराज : मला घाबरवलस शौर्य तु..

शौर्य : शॉपिंगला जातोय त्यात घाबरण्यासारखं काय आहे??

विराज : ते मला वाटलं कि तुला.. (विराज मध्येच बोलायचा थांबतो)

शौर्य : तुला काय?? (आपली भुवई उडवतच विराजला विचारतो)

विराज : काही नाही.. तुला पैसे हवेत ना.. नंतर रूममध्ये येऊन कार्ड घेऊन जा माझं.. जेवढे लागतील तेवढे घे.. आणि कार्ड तुझ्याजवळच ठेव..

शौर्य : पैसे हवेत म्हणजे लॉन हवंय.. मी USA ला गेल्यावर मी तुझ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करेल.. आणि ते तुला घ्यावे लागतील..

विराज : शौर्य तु बरा आहेस ना?? आणि ह्या पुढे एवढं मोठे डायलॉग माझ्या पुढ्यात नाही हा बोलायचे.. 

शौर्य : माझ्याकडे मम्माच क्रेडिट कार्ड आहे.. बट मला माझ्या पैस्यांनी शॉपिंग करायचीय. मला USA जाण्याआधी गाथाला काही तरी छानस गिफ्ट पण घ्यायचय.. तिला मी तुमच्या पैस्यांनी काही घेतलेलं नाही आवडत.. तु जेव्हा कमवशील तेव्हा मोठं मोठी गिफ्ट मला दे.. अस बोललीय ती मला.. आणि मला पण तिचं म्हणणं पटलं.. म्हणुन बोलतोय.

विराज : तु तिला तुझ्याच पैस्यांनी गिफ्ट घेतलंय अस बोल ना.. ती थोडी ना बघायला येणार तुला??

शौर्य : मला माझ्या प्रेमाची फसवणुक नाही करायची.. आणि तुला नंतर पैसे घ्यायला काय प्रॉब्लेम आहे.. मी माझ्यासाठी जे खर्च करेल ते नाही देत. जे गाथासाठी मी गिफ्ट घेईलना त्याचे पैसे तु घे अस बोलतोय मी तुला.. प्लिज..

विराज : ओके.. आता काय बोलु मी.. डेबिट कार्ड घेऊन जा रूममध्ये येऊन.. जेवढे लागतील तेवढे काढ.. नंतर USA ला गेल्यावर दे रिटर्न. खुश??

शौर्य : थेंक्स.. आणि औषध घेतलस??

विराज : रूममध्ये जाऊन घेईल.. उद्या ऑफिसला जाणार आहे मी.. कोणती औषध कधी घ्यायची ती सांग मला..

शौर्य विराजला डॉक्टरांची फाईल देतो आणि सोबत कोणती औषध कधी घ्यायची ते ही सांगतो..

विराज आपल्या रूममध्ये गेल्यावर जवळपास एक तासाने शौर्य विराजच डेबिट कार्ड आणायला त्याच्या रूममध्ये जायला निघतो.. रूम नॉक करतच तो आत जातो..

विराज : शौर्य बर झालस आलास ते.. मी मगाशी तुला इंपोर्टन्ट गोष्ट सांगायलाच विसरलो..

शौर्य : आय नॉ..

विराज : व्हॉट?? तुला नाही माहीत काही.. मम्मा..

शौर्य : विर मी तुला बोललो ना.. आय नॉ.. (मध्येच विराजला थांबवत शौर्य बोलतो) प्लिज तु तो टॉपिक नको काढुस.. मला कार्ड देऊन ठेव.. उद्या कामावर निघुन जाशील.. आणि वहिनी मी विरकडुन पैसे घेतोय बट USA गेल्यावर त्याचे मी रिटर्न देईल अस बोलुन घेतोय.. प्लिज तु गैरसमज नको करून घेऊस.

अनघा : विराज शौर्य खरच खुपच मोठा झालाय.. नाही म्हणजे नात्यात अस पैस्यांचा हिशोब ठेवतोय.

शौर्य : तस नाही.. बट..

अनघा : शौर्य.. विराजने तुला पैसे दिले तर मी का गैरसमज करून घेईल.. तुझा भाऊ आहे तो.. तुला जेव्हा गरज लागेल तेव्हा तु आपल्या भावाकडे हक्काने मागु शकतोस.. मी तुम्हा दोन भावांच्या मध्ये कधीच येणार नाही.. हे मी तुला स्टॅम्प पेपरवर हवं तर लिहुन देते आणि पैसे पुन्हा परत द्यायची काही गरज नाही.. 

विराज : मी पण त्याला तेच बोललो..

शौर्य : विर तुला माहिती ना मी पैसे कश्यासाठी घेतोय ते.. 

विराज : हम्मम.. हे कार्ड आणि **** हा ह्याचा पिन..

शौर्य : थेंक्स..

विराज : आणि मी तुला जे सांगतोय ना ते ऐक.. मगाशी तु

शौर्य : मला माहिती आहे बोललो ना मी तुला.. का तु तोच विषय काढतोयस..

अनघा : शौर्य विराज खरच सिरियसली काहीतरी सांगतोय तुला.. आणि तुला नाही माहीत असणार त्याबद्दल.. तु डिनर करून गेलास तेव्हा..

शौर्य : मम्मा माझा मोबाईल चॅक करत होती.. तिला मी काकासोबत बोलतोय असा संशय आहे.. काका मला तिच्यापासुन लांब करेल जस बाबाला तिच्यापासुन तो लांब करायला बघत होता अगदी तस.. अस तिला वाटत आणि अजुन एक विर ती तुला हे पण सांगत होती ना की ती जे तुझ्या डॅडच्या रूममध्ये तुला सांगत होती ते मला कळु देऊ नकोस एन्ड ऑल.. हेच सांगायच आहेना तुम्हां दोघांना..

विराज आणि अनघा आत्ता घाबरच एकमेकांकडे बघत रहातात..

विराज : तुला कस कळलं शौर्य?? तु तर नव्हतास तिथे..

शौर्य : जस कळायला हवं तसं कळलं विर.. 

शौर्य एक गोड स्माईल देत विराजकडे बघतो.. 

विराज : शौर्य तुला कसं कळल?? खाली काकांनी सांगितलं का तुला??

शौर्य : जेवण वाढायला काका होते आय नॉ बट ते मला ह्या सगळ्या गोष्टी सांगतील अस तुला वाटत असेल तर तस समज.. 

विराज आणि अनघा दोघेही एकटक शौर्यकडे बघत रहातात..

शौर्य : जास्त स्ट्रेस नको घेऊस विर.. मस्त पैकी झोप.. उद्या कामावर जायचय तुला.. गुड नाईट.. आणि वहिनी तुला पण गुड नाईट..

विराज : शौर्य इथे माझ्या समोर शांतपणे बस बघु..

विराजच समाधान व्हावं म्हणुन शौर्य गप्प विराजच्या समोर बसतो..

विराज : तुला हे काकांनी नाही सांगितलं??

शौर्य नकारार्थी मान हलवत नाही बोलतो..

विराज : तरी तुला कळलं??

शौर्य : हम्मम..

विराज : मग तुला मम्मा मला काय बोलत होती ते पण कळलंच असेल ना..?

शौर्य : ते कळायला वेळ नाही लागणार मला.. जवळपास एक तास बारा मिनिट ती तुझ्याशी बोलत होती. ती काय बोलत होती ते सगळं जाणुन घ्यायला मी खरच एक्साईट आहे.. बट ते सगळं मी जस विचार केलाय तस असेल तर मी पुढे काय करेल त्याचा विचार मी नाही ना केलाय म्हणुन मी ती गोष्ट जाणून घेत नाही..

विराज : शौर्य तुला हे सगळं कसं कळतंय ??

शौर्य : बिकॉज आय एम सन ऑफ Mr SSD.. 

विराज : डायलॉग बंद कर.. आणि कसं कळतंय ते सांग..

शौर्य : खर सांगु..

विराज : ऑफ कोर्स...

शौर्य : एकदम खर सांगु?

विराज : आता सांग बोललो ना..

शौर्य : ते मी.... तुला.... माझ्या (शौर्य खुप मोठा पॉज घेत बोलत असतो..

विराज : शौर्य लवकर सांगणा..

शौर्य : मी तुला माझ्या लाईफ मधल्या काही गोष्टी नाही सांगु शकतरे विर.. काही गोष्टी मी सिक्रेट ठेवल्यात तशी ही गोष्ट पण ठेवेल..

विराज : शौर्य आय डोन्ट नॉ तुला ते सगळं कस कळेल.. बट तु नको ना जाणुन घेऊस.. प्लिज.. 

शौर्य : ओके.. आत्ता जाऊ मी..

अनघा : शौर्य तो काही तरी सिरियसली बोलतोय..

शौर्य : वहिनी मम्माला जे काही करायच असत ते ती ठरवते.. विरला जे काही करायचं असत ते विर ठरवतो.. तस मला जे काय करायचंय ते मी ठरवेल ना.. प्लिज.. बाय दि वे मी इथे येण्याच्या काही वेळ आधी तु वहिनीला सांगत होतास ना.. मम्मा तुला काय बोलत होती ते.. 

अनघा : शौर्य तु आमच्या रूममध्ये CCTV लावलेस की काय?

शौर्य : ए वहिनी कमॉन CCTV का लावेल मी.  तु जसा विचार करतेयसना तस मी काहीही केलंल नाही. विर तु वहिनीला सांगत होतास की नाही तेवढं सांग मला..

विराज : हम्मम.. सांगत होतो..

शौर्य : मग मला का नाही सांगत तु?

विराज : मम्माने सांगितलंय तस म्हणुन.. 

शौर्य : मम्मास बॉय.. (शौर्य विराजकडे बघत थोडं रागातच त्याला बोलतो आणि त्याच्या रूमबाहेर जायला निघतो)

विराज : शौर्य स्टॉप कॉल मी देट.. आणि तुझ्या डोक्यात काय चालु आहे??

शौर्य : तु जे समजतोयस तेच चालु आहे माझ्या डोक्यात.. आता प्लिज अजुन नको प्रश्न करुस.. जस तु मला नाही सांगत तस मी पण तुला ह्यापुढे काहीच नाही सांगणार.. Tit For Tat.. तुम्हां दोघांना पण गुड नाईट.. आणि थेंक्स फॉर दिस कार्ड.. USA गेल्यावर तुझे पैसे मी तुला परत देईल..

शौर्य जास्त पूढे काही न बोलता सरळ आपल्या रूममध्ये जातो..

विराज : अनु कस कळलं असेल त्याला?? त्याला हे काकाबद्दल मम्मा जे बोलली ते कळलं म्हणजे त्याला मम्मा मला जे बोलली ते पण कळेल. बट मम्मा जे मला बोलली ते शौर्यला खरच कळायला नको ग.. खुप इस्यु होईल.. शौर्य आधीच मम्माला रिस्पेक्ट देत नाही.. मी जेवढं शौर्यला ओळखतो त्यावरून सांगतो तो हे कळल्यावर तर तिच्यापासून स्वतःला कायमचा लांब करेल.. आणि मॅन म्हणजे मम्माला अस वाटेल की मिच हे त्याला सांगितलंय.. 

अनघा : मला अस वाटत त्याला नसेल काही कळलं.. तो तुझ्याकडुन त्याला काही कळत का हे बघत होता. म्हणजे त्याच्या बोलण्यावरून तरी मला अस वाटलं.

विराज : तिथे खाली मम्मा काय बोलत होती हे त्या कळलं.. अगदी जसच्या तस त्याने बोलुन दाखवलं.. मग ते कसं कळलं त्याला??

अनघा : जस तु बोललास तस.. काकांनी सांगितल असेल तर..

विराज : देव करो तु बोलतेस तसच असू दे.. मला ह्या मुलाच खरच खुप टेन्शन येत ग.. मम्माने का पोस्टपोंड केलं त्याच तिकीट अस वाटतय मला..

अनघा : विराज तु नको ना अस टेन्शन घेऊस प्लिज.. आणि तुझ्यासाठी तो इथे थांबलाय हे विसरू नकोस..

विराज : आय नॉ बट त्याच बोलणं बघितलस ना तु?? किती चँज झालंय.. आणि मम्मा माझ्या पासुन लांब जाईल ह्याची भीती वाटते ग मला.. म्हणजे ती असच थिंकींग करेल की शौर्यला मीच हे सगळं सांगुन तिच्याबद्दल भडकवल.. आणि ती तिच्या जागी योग्य असणार.. बिकॉज त्या रूममध्ये आम्ही दोघेच होतो. शौर्य बोलला तस आम्ही जवळपास एक तास तरी त्या रूममध्ये बोलत होतो.. 

अनघा : मला अस वाटत तु एकदा मम्मीसोबत बोलुन घे.. म्हणजे काही गोष्टी आधीच क्लीअर कर.. 

विराज : मला पण असच वाटत.. मी आत्ताच मम्मासोबत बोलुन येतो..

अनघा : हम्मम..

विराज अनिताच्या रूममध्ये जातो आणि तिला शौर्य त्याला जे बोलला ते सांगतो..

अनिता : त्याला कस कळेल??

विराज : मी त्याला तेच विचारत होतो बट तो सांगतच नाही मला.. आणि त्याला आपण त्या रूममध्ये किती वेळ बोलत होतो ते सुद्धा माहिती आहे.. 

अनिता खुप वेळ शांत बसुन कसला तरी विचार करू लागते..

विराज : मम्मा मी खरच त्याला काही सांगितलं नाही आणि त्याला काय माहिती आहे हे पण मला नाही माहीत.. पण त्याच्या बोलण्यावरून मला अस वाटतंय की त्याला माहिती पडेल.. आय डोन्ट नॉ कस.. त्यानंतर तो कस रिएक्ट करेल हे मला पण नाही माहीत..

अनिता : विर मला खर सांग.. शौर्य काकासोबत बोलतो..??

(विराज खुप वेळ शांत बसुन रहातो..)

तु शांत बसलायस म्हणजे मी हो समजु??

विराज : मला नाही माहीत तो काकासोबत बोलतो का ते..

अनिता : माझ्याशी खोट नको बोलुस विर.. प्लिज सांग..

विराज : मम्मा त्याला आवडत काकासोबत बोलायला मग बोलु दे ना. तस पण तो USA जाईल ग.. आणि त्या गोष्टीला धरून वाद नको ना करुस प्लिज.. मला सिरियसली त्रास होतोय..

अनिता : शौर्य माझं काहीच ऐकत नाही विर.. ह्या गोष्टीचा मला त्रास होतोच.. पण तुला तो त्याच्या काकासोबत बोलतो हे माहीत असुन तु मला सांगितलं नाहीस ह्या गोष्टीच मला जास्त त्रास होतो.. माझी दोन्ही मुलं मला त्रास होईल असच वागतायत.. शौर्यच सोड.. तुझ्याकडुन अपेक्षा आहेत मला कारण तु मोठा आहेस तु मला समजु शकतोस.. पण तु सुद्धा शौर्य सारखच वागतोयस विर..

विराज : मम्मा तु समजतेस तस काही नाही ग.. परत घरी वाद नको म्हणुन नाही बोललो.. आणि माझी पण तब्येत ठिक नव्हती ना ग.. आणि प्लिज तु त्याला ओरडु नकोस.. निदान तो USA जाईपर्यंत घरच वातावरण प्लिज शांत ठेव.. प्लिज..

अनिता : ठिक आहे.. तु बोलतोस तस. तुझ्यासाठी मी शांत बसते.. पण तु मला सोडुन कधी जाऊ नकोस.

विराज : तु अस का बोलतेस?? मी तुला सोडुन कुठेच जाणार नाही.. आणि कधीच नाही.. 

अनिता विराजच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत त्याला आपल्या रूममध्ये जाऊन आराम करायला सांगते..

विराज : तु टेन्शन नको घेऊस ग मम्मा.. जर शौर्य ने काही गैरसमज करून घेतला तर मी समजवेल त्याला.. तस पण तो माझ्या शब्दाबाहेर नाही ग..

अनिता : हम्मम.. औषध घेतलंस??

विराज : हम्मम..

अनिता : आराम कर आणि लवकर बरा हो.. 

विराज : मला वाटतंय ग बर.. तु माझं टेन्शन नको घेऊस.. मला अस वाटत तु शौर्यला USA जाऊ दे.. 

अनिता : तस मी नेक्स्ट ट्युसडेलाच त्याला पाठवायचा विचार केलाय.. बट मंडेला आपण डॉक्टरकडे जाऊ तेव्हा डॉक्टर मला बोलु दे की तु बरा आहेस.. त्यानंतरच शौर्यच तिकीट बुक करते मी.. 

विराज : त्याला सांगितलंस हे?? तो ट्युसडे ला USA जातोय ते..

अनिता : नाही.. आधी मंडेला डॉक्टर काय बोलतात ते बघुयात. 

विराज : हम्मम.. 

अनिता : जाऊन झोप.. उद्या पासुन कामावर जातोयस ना??

विराज : हम्मम.. गुड नाईट..

अनिता : गुड नाईट..

अनितासोबत बोलुन विराजला थोडं बर वाटत असत.. 

दुसऱ्यादिवशी विराज अनघासोबत कामावर निघुन जातो.. अनितासुद्धा आपल्या कामावर निघुन जाते.. 

विराज कामावर खर तर आला असतो बट त्याच आज कामात लक्षच काही लागत नसत.. इंपोर्टन्ट काम तो अनघा आणि वृषभला करायला सांगुन शौर्यचा विचार करत केबिनमध्येच बसुन असतो. शौर्यच्या अश्या वागण्याने आणि बोलण्याने त्याला खुप मोठ्या अश्या कोड्यात टाकलं असत..

पण इथे शौर्य मात्र मस्तपैकी गाणं गुणगुणतच तैयार होत असतो.. गाथाला भेटायचं म्हणुन वेळे आधीच तैयार होऊन घराबाहेर पडतो. बाईकवर बसताच तो गाथाला मी निघालो असा मॅसेज करतो..

गाथासुद्धा शौर्यला भेटायचं म्हणुन खुश असते.. शौर्यसाठी छानस तैयार होऊन ती सुद्धा आपल्या रूमबाहेर पडते..

गाथाची आई आणि सर्वेश डायनिंग टेबलवरच बसले असतात..

सर्वेश : माई कुठे चाललीस..??

गाथाची आई : सर्वेश अस बाहेर जाताना कोणाला विचारू नये रे..

सर्वेश : दि नंतर माई ही माझी जबाबदारी आहे.. माझी बहिण कुठे जाते हे मला कळायला नको का..?

(सर्वेशच अस जबाबदारीवाल बोलणं ऐकुन गाथा आणि तिची आई एकमेकांकडे हसतच बघतात..)

गाथा : शॉपिंगला चाललीय..

सर्वेश : वाव्ह मला पण यायचय..

गाथा : अभ्यास झाला तुझा??

सर्वेश : शॉपिंग करून आल्यावर करतो ना.. 

मम्मी : सर्वेश चार वाजता ट्युशन आहे तुझं..

सर्वेश : तोपर्यंत आम्ही येऊ ग.. हो ना माई??

गाथा : हम्मम..

मम्मी : आत्ताच तर मला बोललास ना ट्युशन मधुन भरपुर अभ्यास दिलाय?? 

सर्वेश : शॉपिंग करून आल्यावर करेल ग मी.. माई येऊ ना मी तुझ्यासोबत शॉपिंगला??

गाथा : हो चल..

(गाथा अस बोलताच गाथाची आई तिच्याकडे बघु लागते.. गाथा इशाऱ्यानेच तिला शांत रहायला सांगते)

थँक्स माई.. मम्मी मी पण जातो हा माईसोबत.. अभ्यास शॉपिंग वरून आल्यावर करतो मी.. माई दोनच मिनिटांत तैयार होऊन आलो मी.. अस बोलत सर्वेश आपल्या रूममध्ये जाऊ लागला..

गाथा : सर्वेश आपण लंचपण बाहेरच करणार आहोत..

सर्वश : ग्रेट..

गाथा : साक्षी, ऋतु, मानसी, ऋचा आणि कार्तिका आम्ही मोजुन सहाजणी आहोत.. त्यात मानसीचा बर्थ डे झाला ना लास्ट टाईम.. मी तुला बोलली असेल बघ.. आजचा लंच हा तीच देणार आहे.. 

सर्वेश स्तब्ध होत गाथाकडे बघतो.. आणि आपलं तोंड पाडतच परत आपल्या जागेवर येऊन बसतो.. हातात पेन पकडतच तो परत अभ्यासाला लागतो..

गाथा : सर्वेश उशीर होतोय.. तु येतोयस ना??

सर्वेश : एवढ्या मुलींमध्ये मी कस काय येऊ.. 

गाथा : मग काय झालं?? मी असणार ना सोबत..

सर्वेश : तु जा.. मला नाही एवढ्या मुलींमधुन यायच.. तस पण ट्युशनमधुन खुप अभ्यास दिलाय मला.. 

गाथा : येऊन करशील रे तु.. अस काय करतोयस..

सर्वेश : माई खरच जास्त अभ्यास दिलाय.. येऊन पण नाही होणार.. उगाच ओरडतील सर..

गाथा : मी बोलते सरांशी.. मग तर झालं..

सर्वेश : नाही नको.. तु जा..

गाथा : नक्की ना नाही येत तु..??

सर्वेश : हो. आत्ता मला डिस्टरब नको करुस.. जा बघु..

गाथा आणि तिची आई गालातल्या गालात हसतच सर्वेशकडे बघतात..

मम्मी : जास्त उशीर नको करुस..

गाथा : तुला काल बोलली ना मी जेवुन येईल दुपारपर्यंत.

मम्मी : हम्म.

गाथा : सर्वेश तुला काही हवंय..

सर्वेश : तुला काही आवडलं तर घेऊन ये माझ्यासाठी..

गाथा : ओके.. बाय.. आणि मी येईपर्यंत अभ्यास झालेला पाहिजे हा तुझा.

सर्वेश : हम्मम..

गाथा सर्वेश आणि आपल्या आईला बाय करतच ठरलेल्या ठिकाणी येते.. शौर्य बाईकवर बसुन आधीपासुनच तिची वाट बघत असतो..

गाथा समोर दिसताच एक गोड अस हसु शौर्यच्या चेहऱ्यावर येत..

गाथा : उशीर झालाना मला??

शौर्य : मला अस वाटतय तु भेटणार म्हणुन मिच जरा जास्त लवकर निघालो.. आता कोण उशिरा आलं आणि कोण लवकर आलं हे डिस्कस करत बसण्यापेक्षा आपण निघुयात.??

गाथा मानेने हो बोलत शौर्यच्या खांद्यावर हात ठेवत त्याच्या मागे जाऊन बसते..

शौर्य त्यांनी ठरवलेल्या मॉल बाहेर आपली बाईक पार्क करतो..

गाथा : दि आणि जिजु गेले असतील ना कामावर??

शौर्य : सकाळीच गेलेत. तु घरी काय सांगितलंस??

गाथा : फ्रेंड सोबत शॉपिंगला जातेय..

शौर्य : ग्रेट..

गाथा : आणि तु??

शौर्य : मी तस काल विरला बोललो होतो की आज शॉपिंगला जाईल म्हणुन.. तस घरी कोणी नाही माझ्या.. ज्याला मी सांगुन निघेल..

दोघेही एकमेकांसोबत बोलत आत मॉलमध्ये शिरतात.. गाथा शौर्य आणि तिच्यामध्ये थोडं अंतर ठेवतच चालत असते.

गाथा : तुला पण काही घ्यायचय का??

शौर्य : काही आवडलं तरच घेईल मी.. तस काही ठरवलं नाही मी..

दोघेही कोणत्या दुकानात जाऊयात असा विचार करत असतात.. गाथा शौर्य सोबत बोलतच पुढे जात असते.. अचानक शौर्यचा हात पकडतच ती त्याला थांबवते.. गाथाने अचानक असा हात पकडल्याने शौर्यच हृदय अगदी धडधड करू लागत. 

तुला हे खुप छान दिसेल.. एका शॉ-रूम बाहेर उभ्या असलेल्या पुतळ्याने घातलेल जॅकेट ती शौर्यला दाखवतच बोलते..

शौर्य : आधीच खुप जॅकेट आहेत ग माझ्याकडे..

हे माझ्याकडुन.. अस बोलत शौर्यचा हात पकडतच ती त्याला आत नेते.. 

त्या निमित्ताने तरी गाथा आपल्या जवळ आली हे बघुन शौर्यपण ती नेत असते तिथे तिच्यासोबत जाऊ लागतो..

दुकानदाराला ती शॉ-रूम बाहेर उभ्या असलेल्या पुतळ्याकडे बोट दाखवतच शौर्यच्या मापाच जॅकेट दाखवायला सांगते.. दुकानदराने जॅकेट देताच ती शौर्यला तिथेच ट्राय करायला सांगते.. शौर्य सुध्दा आपल्या अंगावर जॅकेट चढवत गाथाला दाखवतो.. शौर्यला ते जॅकेट अगदी उठुन दिसत असत.. 

गाथा : शौर्य खरच छान दिसतंय तुला हे.. USA मध्ये थंडी असेल तेव्हा तर घालु शकतोसच.. बट नॉर्मली पण तु हे घालु शकतो.. पण तुला आवडलं हे??

खुप.. गाथाकडे बघतच तो तिला बोलतो..

गाथा हसतच शौर्यच्या हनुवटीला पकडत त्याच तोंड समोर असलेल्या आरश्याकडे फिरवते.. आणि त्याला तिथे बघायला सांगते..

शौर्य गाथाने आपल्यासाठी चॉईज केलेलं जॅकेट बघतच रहातो.  खरच गाथा बोलत असते तस ते जॅकेट त्याला खुप छान दिसत असत..

कस वाटतंय?? समोर असलेल्या आरश्यातच ती त्याच्याकडे बघत त्याला विचारते..

शौर्य : तुझी चॉईज एकदम छान आहे ग.. 

गाथा : ही कॅप अशी घालुन बघु कसा दिसतोस ते..(जॅकेटला जॉइंट असलेली कॅप शौर्यच्या डोक्यावर घालतच ती बोलते)

शौर्य आरश्या मधुनच गाथाच काय चालु असत ते बघत असतो.. खर तर तिच्या होणाऱ्या स्पर्शाने तो सुखावत असतो..

गाथा : क्युट वाटतोयस असा.. बट तुला नक्की आवडल ना हे??

शौर्य : खुप.. एक सेल्फी घेऊयात..? म्हणजे दोघे अस फस्ट टाईम शॉपिंगला आलोयना.. आफ्टर दिस न्यु रिलेशनशिप.. आणि फस्ट टाईम एकमेकांच्या चॉईजने काही तरी घेतोय म्हणुन..

गाथा हातात मोबाईल घेऊन दोघांचा सेल्फी घ्यायला तैयारच असते..

शौर्य जॅकेटची कॅप आपल्या डोक्यावरून खाली घेत आपले केस नीट करून गाथाच्या मोबाईलमध्ये बघत एक स्माईल देतो..

गाथा : तु ती कॅप पण घालणं.. तस पण एक सेल्फी घेऊयात.. 

शौर्य : नाही नको.. जास्तच ओव्हर वाटतंय अस..

तुला ती कॅप पण छान वाटतेरे शौर्य.. गाथा परत त्याला कॅप घालते.. आणि परत आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी घेते..

(मॉलमध्ये शिरताना दोघांमध्ये असलेलं अंतर आता नाहीस झालं होतं.. )

हे पॅक करा... शौर्य जॅकेट दुकानदाराला देतच बोलतो.. खिश्यातुन पॉकेट काढणार तोच गाथा त्याचा हात पकडते..

गाथा : हे माझ्याकडुन आहे.. प्लिज..

(गाथा तिने आधीपासूनच बाहेर काढुन ठेवलेलं आपलं कार्ड दुकानदाराला देते)

शौर्य : तु एवढ्या प्रेमाने प्लिज बोलतेस मग मला तुला नाही बोलायला जमत नाही ग.. 

दुकानदार जॅकेट पॅक करेपर्यंत दोघेही एकमेकांचा हात पकडुन तसेच उभं राहतात.. खर तर दोघांच्याही ते लक्षात येत नाही..

शौर्य एका हातात शॉपिंग केलेल्या जॅकेटची बॅग पकडतो तर एका हाताने गाथाचा हात पकडतो..

गाथा : USA मध्ये जातोस अस शॉपिंगला..

शौर्य : हम्म.. महिन्यातुन दोन वेळाच.. पण कधी कधी मी ते पण जाण टाळतो.. बट फ्रेंड्स जास्त फोर्स करू लागले मग मला त्यांना नाही बोलायला नाही जमत..

गाथा : तुला शॉपिंग नाही आवडत का??

शौर्य : मला शॉपिंग करायला खुप आवडत ग.. बट ही माझी आवड मी कमी केली.. कमी केली अस बोलण्यापेक्षा मी एवोईड करतोय अस बोलु शकतेस.

गाथा : का??

शौर्य : शॉपिंगमध्ये जास्त पैसे खर्च करतो मी.. मम्माचा खुप ओरडा खाल्ल्याय मी त्याबाबत.. मी मुंबईमध्ये कॉलेजला होतो तेव्हा तर विचारुच नकोस.. एक दिवस 12000 बिल आलेलं.. मग मम्माने तिच क्रेडिट कार्ड सुद्धा काढुन घेतलेलं माझ्याकडुन.. फक्त मुंबईत असतानाच नाही दिल्लीत असताना पण अस झालेलं.. 

गाथा : बापरे.. मग??

शौर्य : मग काय.. माझा विर आहे ना.. त्याने त्याच कार्ड दिलं.. बट नंतर मला पण अस वाटु लागलं मी खुप पैसे वेस्ट करतो.. मग हळुहळु मिच कंट्रोल केलं स्वतःवर.. 

गाथा : गुड.. 

शौर्य : आत्ता आपण तुझ्यासाठी काही तरी घेऊयात..

गाथा : माझ्यासाठी तर घेऊयाच बट सर्वेशला पण काही तरी घ्यावं लागेल.. तो पण शॉपिंगला येत होता..

शौर्य : मग आणायच ना त्याला पण..

गाथा : ट्युशन आहे त्याच. त्यात तुम्ही लोक घरी आलेलात त्या दिवसापासून तो गेलाच नाही ट्युशनला.. माझा अभ्यास खुप पेंडिंग आहे म्हणुन काल पासून रडत होता..

शौर्य : का नाही गेला बट??

गाथा : ट्युशन मधुन जास्त अभ्यास दिला की त्याच्या पोटात दुखायला चालु होत.. 

शौर्य : ट्युशनला का जातो तो.. घरीच करायचा ना अभ्यास एवढा हुशार तर आहे तो..

गाथा : कॉलेज सकाळी साडे सात वाजता असत त्याच.. महिन्यातुन दहा बारा दिवसच कॉलेजला जातो.. दर महिन्याच्या ब्लॅक लिस्टमध्ये नाव असत त्याच. जर कॉलेजमध्ये नीट गेला असता तर ट्युशनला नसत पाठवलं असत त्याला.. म्हणजे अकरावीच मी सांगतेय त्याच.. अकरावीला तो अस वागलाय.. मग दि बोलली.. बारावीला अशी नाटकी करेल त्यापेक्षा ट्युशनला टाकुयात. निदान तिथे लेक्चर अटेंड करेल तो..

शौर्य : कॉलेज का नाही जात पण??

गाथा : सर्वेशची झोप आणि सर्वेश.. तो सॅम तुझीच कॉपी वाटतो मला.. 

शौर्य : एक मिनिट.. मी कॉलेजमधले लेक्चर कधी मिस नाही केलेत अस मला तर नाही आठवत.. आणि अस ट्युशन वैगेरे तर मी अजिबात नाही गेलोय आणि मला अस कोणी आत्तापर्यंत बोललं पण नसेल अभ्यास कर म्हणुन..

गाथा : मी त्या बाबतीत बोलतच नाही.. तु तुला आवडत ते करतो.. तस तो.. तु सुद्धा एकदा झोपलास की तुला आजु बाजुला काय चालु असत त्याची शुद्ध जरा पण नसते.. तसच त्याच आहे. काही गुण दोघांतले मॅच होतात.. 

शौर्य : आत्ता तु एवढं बोलतेस मग असेलही.. तुला वॉच घेऊयात??

गाथा : वॉच आहे माझ्याकडे..

शौर्य : माझ्याकडे खुप सारे जॅकेट असुन सुद्धा मी घेतलं ना.. 

गाथा : शौर्य जॅकेट वेगळं आणि वॉच वेगळं.. वॉच खुप क्रॉसली असेलरे.. आणि मी तुला बोलली ना तु तुझ्या पैस्यांनी असले महागडे गिफ्ट मला दिलेस तर मला ते घ्यायला आवडेल..

शौर्य : मी माझ्याच पैस्यांनी घेतोय तुला.. म्हणजे मी विर कडुन लॉन घेतलय ग.. USA गेल्यावर त्याला रिटर्न देईल.. 

(शौर्य अस बोलताच गाथा त्याच्याकडे एकटक बघतच रहाते..)

त्याच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवल्याची रिसीप्ट पाठवतो मी तुला मग तर झालं..

गाथाचा हात पकडत शौर्य तिला जबर्डदस्ती करत वॉच च्या शॉ-रुम मध्ये घेऊन जातो.. 

दोघेही एकमेकांचा हात पकडतच वॉच बघु लागतात..

समोरच साधारण त्यांच्याच वयाचा मुलगा सेल्समॅन म्हणुन उभा असतो..

गाथा : मला तर सगळेच छान वाटतायत..

शौर्य : बट गाथा मला ते वाल जास्त छान वाटलं..

(शौर्य सेल्समॅनला त्याला आवडलेलं हँडवॉच काढुन दाखवायला सांगतो.. )

गाथा : शौर्य It's too costly.. तु प्राईज बघ..

दुकानदार : Mam'm It's smart watch. Newly launch in the market. Alarm Clock, App Alerts, Calendar Alerts, Email, Multiple Time Zones, Social Media, Text all notification available in this watch. Activity Tracker, Challenge Friends to a Workout, Control Your Music, Customizable Buttons, Heart Rate Tracking, Interchangeable Watch Band, Notifications, Personalise Your Dial, Visualized Workout Routes this all functions available in this watch and Fossil is brand Mam'm. 

सेल्समॅनने एका श्वासात एकदम फास्ट अशी घड्याळाची माहिती दोघांना दिली होती.. दोघेही डोळ्यांची पापणी न हलवता त्याच्याकडे बघतच रहातात.. तो जसा थांबतो तस एकमेकांकडे बघता.. 

गाथा : हा एवढं फास्ट बोलला मला काहीच कळल नाही..

मला पण.. वॉचचा ब्रँड तर fossil आहे बट एवढं फास्ट बोलला हा की मला अस वाटलं की ह्या वॉचचा ब्रँड Fast track आहे.. शौर्य गाथाला ऐकु जाईल असच खरतर बोलतो.. बट तो जे बोलतो ते त्या सेल्समॅनला सुद्धा ऐकु गेलं असत.

शौर्यच अस बोलणं ऐकुन गाथा आपल्या ओठांवर हात ठेवतच हसु लागते.. 

सेल्समॅन : सॉरी सर जास्तच फास्ट झालं का??

सेल्समॅन अस बोलताच शौर्य आणि गाथा परत एकमेकांकडे बघु लागतात.. 

शौर्य : हो.. जास्त म्हणजे खुपच जास्त फास्ट झालं.. आम्हाला काहीच नाही कळलं..

सल्समॅन : मी परत एक्सप्लॅन करतो..

गाथा : नाही नको.. तुमच्याकडे प्रॉडक्ट डिटेल्स असेल तर ती दाखवा. आमच आम्ही वाचु.. आणि मग ठरवु हे वॉच घ्यायच की नाही ते..

सेल्समॅन : Sure Mam'm..

अस बोलत वॉचचबद्दलची प्रोडक्ट डिटेल्स तो दोघांना दाखवतो.. दोघेही ती वाचतात..

तुला आवडलं?? शौर्य गाथाकडे बघतच तिला विचारतो..

गाथा : न आवडण्यासारख वॉचमध्ये काही नाही.. बट..

pack this watch... गाथाला मध्येच थांबवत सेल्समॅनला शौर्य बोलतो..

गाथा : शौर्य 14800 म्हणजे अलमोस्ट 15000.. तु घरी काय सांगशील??

शौर्य : मी बोललोना मी विरकडुन लॉन घेतलंय.. मी त्याला तस बोललोय.. शॉ मधुन पैसे मिळतात तुला माहीती आहे ना.. मी लगेच देईल त्याचे पैसे.. तस पण तो नाही विचारणार मला..

गाथा : नक्की ना??

शौर्य : हो ग.. आणि रोज माझी आठवण म्हणुन तुझ्या हातात सुद्धा राहील ग..

गाथा : तुझी ही आठवण आहे ना माझ्याजवळ..

(गळ्यातील चैन ती शौर्यला दाखवतच बोलली)

शौर्य : ती तर मी तुला माझं हे हृदय दिलंय ह्याची निशाणी आहे म्हणजे 12th मे.. आणि हे घड्याळ म्हणजे.. तु शांत ठिकाणी जाऊन बसलीस ना तर ह्या घड्याळाच्या काट्यांची प्रत्येक क्षणाला होणारी टिक टिक तुला माझी आठवण करून देईल.. ती टिकटिक तुला सांगेल की प्रत्येक क्षणाला तुझी आठवण काढणार तिथे USA ला आहे.. तुला जशी त्याची आठवण येते त्याहुन जास्त त्याला येते आणि जस जसे हे क्षण पुढे जातायत तस तस तो लवकरच तुला भेटेल..

गाथा : शौर्य तु किती छान बोलतोस.. मला खरच अस वाटत तु अस बोलत रहावं आणि ऐकत जावं.. जस तु मला काल बोलत होतास..

शौर्य : तुला आवडत मग अस वेड्यासारखं काही तरी बोलत जात जाईल मी..

गाथा : मला तुझं हे वेड्यासारखं बोलणं खुप म्हणजे खुप आवडत शौर्य.. आणि त्याहुन पण जास्त तु.. लव्ह यु... 

शौर्य : लव्ह यु टु माय स्वीट जान.

दोघेही एकेमकांकडे बघतच रहातात.

सेल्समॅन हातात केरिबेग पकडुन दोघांच काय चाललंय ते बघत बसतो..

शौर्य त्याच्या हातातुन बॅग घेत आपल्या कार्डने वॉचच बिल पेड करतो.

सेल्समॅन : Have a good day Sir.. and have good day to you mam'm..

शौर्य : ग्रेट.. तुला स्लो पण बोलता येत??

सेल्समॅन : आत्ता वॉच बघायला रोज शंभर लोक येतात त्यातले घेणारे तुमच्या सारख एक दोनच असतात.  ती डिटेल्स रिपीट करून आम्हांला थोडं कंटाळायला सुद्धा होत.. आणि सगळ्यांना डिटेल्स सांगुन सांगुन ती माईंडमध्ये फिट झाली ना.. म्हणुन ते थोडं फास्ट बोललो.. सॉरी फॉर देट..

शौर्य : बट त्या कामासाठी तु पैसे सुद्धा घेतोस.. आणि ज्या कामासाठी आपण पैसे घेतो ते काम अस कंटाळुन केलं तर कस चालेल.. do your duty honestly..

सेल्समॅन : सॉरी सर.. सॉरी मॅम..

शौर्य : इट्स ओके.. and have a great day you too..

शौर्य एक स्माईल त्या सेल्समॅनला देतच तिथुन बाहेर पडतो..

दोघेही वॉचच्या शॉरूममधुन बाहेर पडतात.

गाथा : मला अस वाटलं की आपण कोणत्या तरी मंदिरात आलेलो.. आणि तो मुलगा एक प्रकारे मंत्र बोलत होता..

शौर्य : सॅम मला सुद्धा तसच फिल होत होतं..

दोघेही एकमेकांच्या बोलण्यावर हसत असतात..

शौर्य : अजुन काय घेऊया तुला??

गाथा : बस.. अजुन काही नको.. 

शौर्य : दोन वर्ष मी नाही तुझ्यासोबत शॉपिंग करायला.. 

गाथा : आय नॉ.. बट अजुन खरच काही नको..

शौर्य : सर्वेशला काय घेऊयात??

गाथा : मी काही ठरवलं नाही.. तुला काही सुचलं तर तु मला सजेस्ट करू शकतोस..

शौर्य : टिशर्ट घेऊयात?? नाही तर छानसा गॉगल?? 

गाथा : गुड आयडिया.. तस पण त्याला तुझी चॉईज खुप आवडते.. 

शौर्य : मग चल..

दोघेही शौर्यसाठी छानस टीशर्ट घेतात.. आणि सोबत गॉगल पण..

शॉपिंग होताच तिथेच एका हॉटेलमध्ये शिरतात.. तसपण मॉलमध्ये फिरून दोघेही दमले असतात..

शौर्य खिश्यातुन फोन काढुन बघु लागतो... मित्रमंडळींचे 77 मिसकॉल येऊन गेले असतात.. आणि अजुनही फोन येत असतात.. पण तो उचलत नसतो.. फोनच्या वायब्रेशनच्या आवाजामुळे गाथाच लक्ष त्याच्या फोनवर जात.

गाथा : तु फोन का नाही उचलत? कोणाचा फोन आहे.?

शौर्य : अजुन कोण.. फ्रेंड्स लोक.. मे बी घरी गेले असतील माझ्या..

गाथा : अजुन नाराज आहेस त्यांच्यावर??

शौर्य : तसेच वागले ना ती लोक.. थोडा राग तर दाखवलाच पाहिजे..

गाथा : हम्मम.. तु ऑर्डर कर ना काही तरी..

शौर्य : प्लिज तु करणं..

गाथा : स्टेटर्स मी करते.. मॅनकोर्स तु कर.. मग परत डीझर्ट मी करते.. चालेल??

शौर्य : ओके.. 

दोघेही ठरल्याप्रमाणे जेवण ऑर्डर करतात.. जेवण येईपर्यंत एकमेकांकडे बघत रहातात..

शौर्य : आपण दुसर हॉटेल बघायला हवं होतं..

गाथा : का?? हे पण छानच आहे ना?

शौर्य : एकदम शांत शांत वाटतंय.. म्युसिक वैगेरे असती तर अजुन छान वाटलं असत.. म्हणजे एवढ्या छान अश्या वातावरणात गाणी ऐकत एकमेकांकडे बघत जेवण्यात खुप छान फील झालं असत..

एवढंच ना... थांब मग.. अस बोलत गाथा आपल्या हॅन्डबेगमधुन आपला मोबाईल बाहेर काढते.. सोबत हेडफोन सुद्धा.. 

गाथा : अशी गाणी ऐकु शकतो आपण.. 

(हॅडफोन आणि मोबाईल शौर्यला दाखवतच ती त्याला बोलते)

शौर्य : ग्रेट आयडिया.. बट त्यासाठी मला तुझ्या बाजुला बसावं लागेल.. कारण एक हॅडफोन तुझ्या कानाला आणि एक माझ्या कानाला असणार.. एवढ्या लांब बसुन तुझ्या हॅडफोन माझ्या पर्यंत येईल अस मला तरी नाही वाटत.. तुला चालणार असेल तर मी बसेल तुझ्या बाजुला..

गाथा ओठांवर थोडं हसु आणतच शौर्यकडे बघते..

गाथा बाजुलाच असलेली चेअर थोडी मागे घेत शौर्यला इशाऱ्यानेच त्या चेअरवर बसायला सांगते..

शौर्य खुश होतच तिच्या बाजुला बसतो..

गाथा : कोणतं गाणं ऐकावस वाटत ते तु लावु शकतोस..

आपला मोबाईल शौर्यजवळ देतच ती त्याला बोलते..

तुझ्या आवडीच.. जे तुला आत्ता ह्या क्षणाला सुचत असेल ते मला ऐकायला आवडेल.. शौर्य गाथाने त्याच्या समोर धरलेला तिचा हात पकडतच तिला बोलतो..

गाथा : मला ह्या क्षणाला म्हणजे फक्त ह्याच क्षणाला नाही तु माझ्या लाईफमध्ये आलास ना तेव्हा पासुन एक दोन गाणी सुचलीत तुझ्यासाठी..

शौर्य : मग मला आवडेल ती ऐकायला..

गाथा थोडं हसतच शौर्यकडे बघत असते..

शौर्य : काय झालं?? ऐकव..

गाथा : तु माझा हात सोडल्यावरच मी लावु शकेल ना शौर्य?

सॉरी.. अस बोलत शौर्य पटकन गाथाचा हात सोडतो..

(गाथा आपल्या मोबाईलमध्ये युट्युब ऑपन करत दुनिया सॉंग फिमेल व्हर्शनमध्ये लावते.. )

एक हॅडफोन ती शौर्यच्या कानात घालते आणि एक स्वतःच्या..

(बुलावे तुझे यार अज्ज मेरी गलियां
बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया
ना आयें कभी दोनों में ज़रा भी फासले
बस एक तू हो, एक मैं हूँ और कोई ना
है मेरा सब कुछ तेरा तू समझ ले
तू चाहे मेरे हक़ की जमीन रख ले
तू साँसों पे भी नाम तेरा लिख दे
मैं जियूं जब जब तेरा दिल धड़के)

गाथाने गाणं लावताच शौर्य एकटक तिच्याकडे बघत रहातो.. त्याने हेच गाणं एकदा समीरासाठी गायलेलं हे त्याला आठवत.. 

गाथा मानेनेच त्याला काय झालं म्हणुन विचारू लागते. 

शौर्य मान नकारार्थी हलवत काही नाही म्हणुन सांगतो..

वेटर दोघांच्या टेबलजवळ येत दोघांच्या प्लॅट मध्ये स्टेटर्स वाढून पण जातो.. पण शौर्य मात्र गाथाकडेच बघत असतो..

(जिसे मेरा ये जी नहीं भरता
कुछ भी नहीं असर अब करता
मेरी राह तुझसे मेरी, मेरी चाह तुझसे
मुझे बस यहीं रह जाना
है तू ही दिल जान है मेरी अब से
ना जिक्र तेरा ना जाए मेरे लब से
बुलावे तुझे यार अज्ज मेरी गलियां
बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया)

गाथा स्वतःच्या हाताने शौर्यला स्टेटर्स भरवायला घेते.. शौर्य एक गोड स्माईल तिला देत तिच्या हाताने खातो..

शौर्य ह्या गाण्यातील लिरिक्स आहेत त्या मी तुझ्यासाठी फिल करते.. गाणं संपताच गाथा शौर्यकडे बघत त्याला बोलते..

शौर्य : गाथा.. मी खुप लकी आहे की माझ्या आयुष्यात तु आलीस.. तु मला जस पाहिजे तस प्रेम करतेस माझ्यावर.. आणि खुप समजुन घेतेस आणि मी चुकत असेल तर खुप छान समजुन सांगतेस. तुझ्याकडे माझ्यासाठी फक्त नि फक्त प्रेमच आहे अस मला वाटत.. म्हणुन मला तुझी भीती नाही वाटत.. कारण माझी खात्री झालीय की तु माझ्यावर कधीच रागावणार नाहीस.. कारण माझ्या गाथाला माझ्यावर रागवताच येत नाही.. आणि मला तुझ्याशिवाय नाही रहायला जमत.. तुझ्यापासुन लांब तर नाहीच नाही.. भीती वाटते कोण तुला माझ्यापासुन लांब नेईल ह्याची.. मला तुला इथे सोडुन USA ला जायची सुद्धा भीती वाटते.. कारण मी तुझ्यासोबत सुद्धा खुप स्वप्न बघितलीत.. मला माहिती मी पाहिलेली सगळी स्वप्न स्पोईल होतात तरी मी बघितली.. म्हणुन आत्ता थोडी जास्तच भीती वाटते ग.. कारण तु माझ्यापासुन लांब गेलीस तर मी खरच नाही सहन करू शकणार.. 

गाथा : तुला अस अचानक काय झालं??

शौर्य : मला नाही माहीत.. पण तु मला सोडुन कधी जाऊ नकोस.. आणि माझ्यावर कधी रागवु पण नकोस.. तु जस बोलशील तस मी वागेल..

गाथा : एक मिनिट.. तस करायची काही गरज नाही.. कारण तु चुकीच कधी वागतच नाहीस.. कधी कधी छोट्या मोठ्या चुका करतोस पण त्या तुझ्या चुकांमुळे सुद्धा मी तुझ्या आणखीन प्रेमात पडते. कारण त्या मागच्या तुझ्या भावना कधीच चुकीच्या नसतात.. मुळात मी खुप लकी आहे की तु माझ्या आयुष्यात आहेस.. तु इतका छान आहेस ना शौर्य कोणीही तुझ्या प्रेमात पडू शकत.. बट मला माझ्या ह्या स्वीट अश्या जान वर पुर्ण विश्वास आहे की तो शेवटपर्यंत माझ्यासोबत माझाच बनुन राहिल.. आणि USA ला तु तुझ्या बाबाने तुझ्यासाठी पाहिलेलं स्वप्न पुर्ण करायला जातोयस हे विसरू नको.. USA वरून येऊन खुप मोठं बिजीनेस मॅन बनुन दाखवायचं आहे तुला.. 

शौर्य : ते तर मी बनुन दाखवेलच.. बट मला सुद्धा तुला खुप मोठं डॉक्टर झालेलं बघायचंय.. 

(शौर्य आपल्या स्पुनने गाथाला भरवतच बोलला)

दोघेही एकमेकांच्या आवडीची मस्त अशी गाणी ऐकत लंच एन्जॉय करत असतात.. लंच होताच दोघेही घरी जायला निघतात..

शौर्य : तु सोबत असताना एवढा वेळ कधी निघुन गेला हेच नाही कळलं मला.. 

गाथा : मला पण..

शौर्य : मंडे ला मी तुला कॉलेजमध्ये सोडायला येऊ??

गाथा : आपण जिजूंना घेऊन डॉक्टरकडे जाणार आहोत ना.?? मी सुट्टी करेल त्यादिवशी..

शौर्य : ओहह हा.. मी विसरलोच.. बट तु का सुट्टी घेतेस.. मी जाईल विरला घेऊन डॉक्टरकडे. तु जा कॉलेजमध्ये..

गाथा : मी पण येते सोबत.. तसही फस्ट डे असणार ना कॉलेजचा..

शौर्य : हम्ममम.. 

गाथा शौर्यसोबत बोलतच त्याच्या मागे बसते.. शौर्य तिला नेहमीच्या ठिकाणी सोडतो..

गाथा बाईकवरून उतरताच.. शौर्य तिच्याकडे बघत तिचा हात पकडत तिची घड्याळाची बॅग आणि सर्वेशसाठी शॉपिंग केलेली केरिबेग तिच्या हातात देतो. 

शौर्य : बाय.. अँड लव्ह यु..

गाथा : सांभाळुन बाईक चालवं.. आणि घरी पोहचल्यावर मला कॉल कर.. लव्ह यु टु.. बाय..

शौर्य गाथाकडे बघतच आपली बाईक वळवतो.. 

गाथा घरी येताच आपल्या रूममध्ये जाते.. मस्त पैकी फ्रेश होत शौर्यने तिच्या साठी घेतलेलं वॉच आपल्या हातात घालत त्या वॉचसोबत स्वतःचा सेल्फी काढत ती तो शौर्यला पाठवते.. सर्वेशसाठी घेतलेला गॉगल आणि टीशर्ट घेऊन ती त्याच्या रूममध्ये जाते. सर्वेश सुध्दा गाथाने आपल्यासाठी एवढं छानस गिफ्ट आणल्यामुळे खुश असतो..

इथे शौर्यची मित्रमंडळी शौर्यची वाट बघुन कंटाळून गेली असतात.. शेवटी आर्यन विराजला फोन लावतो.. आणि शौर्य कुठे गेलाय ते विचारतो.. विराजला सुद्धा शौर्य कुठे गेलाय हे माहिती नसत.. तो सुद्धा शौर्यला फोन लावतो पण शौर्य त्याचापण फोन उचलत नसतो.. 

शौर्य विराजचा पण फोन उचलत नाही हे बघुन त्याची मित्रमंडळी परत आपापल्या घरी निघुन जातात.. ती जशी निघुन जातात तसा शौर्य बाईक घेऊन घरी हजर होतो.. घरी आल्या आल्या जेवण बनवणारे काका त्याला त्याचे मित्र मंडळी खुप वेळ त्याची वाट बघत होते अस सांगतात..

शौर्य : जर परत आले तरी मी नाही आलोय हेच सांगा त्यांना.. आणि बाहेर वॉचमेनला पण तसच सांगायला सांगा.. मला कोणालाच नाही भेटायचंय आत्ता..

काकांना थोड्या फार सूचना देत शौर्य रूममध्ये जातो.. थोडं फ्रेश होत तो गाथाला फोन लावायला घेतो तस त्याला विराजचे मिस कॉल दिसतात.. तो गाथाला फोन करण्याआधी विराजला फोन लावतो..

विराज : आहेस कुठे तु?? आणि फोन का नाही उचलत??

शौर्य : तुला काल बोललो होतोना शॉपिंगला जातोय आज.. तु कॉल का केलास ते सांग..

विराज : आर्यन फोन करत होता तुला.. फोन का नाही उचलत तु त्याचा.

शौर्य : माझी मर्जी.. 

विराज : काय झालंय शौर्य?? 

शौर्य : विर तु मला सगळ्या गोष्टी सांगतोस का?? मग मी पण तुला सगळं सांगेल हे माझ्याकडुन एक्सेप्ट नको करुस. कामावर आहेस मग काम कर तुझं.. नको ते विचारायला मला कॉल नको करुस.. आणि मला कॉल करतोस ते पण मम्माला सांगुन कर.. प्रत्येक गोष्ट तिला सांगायची आणि विचारून करायची सवय आहेना तुला..

विराज : शौर्य जास्त बोलतोयस तु.. तुला नाही सांगयच तर नको सांगुस.. पण सारख मम्मावरून मला बोलत नको जाऊस..

शौर्य : मग तु पण मला ह्या पुढे काही विचारत नको जाऊस..

विराज : घरी आलो की बघतोच तुझ्याकडे..

शौर्य : विर पण त्याआधी सुद्धा मम्माला विचार आणि मग बघ.. बिकॉज यु नॉ ना यु आर मम्मास बॉय..  जर ती बघु नको बोलली तर?? 

विराज शौर्यला जास्त काही न बोलता रागातच फोन कट करून टाकतो.. आणि मोबाईल समोर असलेल्या टेबलवर फेकतो.

अनघा : काय झाल एवढं रागवायला??

विराज : मी शौर्यची प्रत्येक गोष्ट इग्नोर करतोय बट जास्तच बोलतोय तो. सारख सारख मम्मास बॉय बोलत रहातो.. 

अनघा गालातल्या गालात हसु लागते..

विराज : तुला तर हसायला बहाणाच भेटलाय.. आज घरी जाऊन त्याला कस करतो तु बघच..

अनघा : नको ना एवढं राग करुस.. त्यापेक्षा थोडं काम कर.. लवकर निघायचय ना??

विराज : हम्मम.. पाच वाजताच निघुयात..

अनघा : हम्मम. बट प्लिज घरी गेल्यावर लहानमुलांसारख भांडु नका तुम्ही दोघ.. 

विराज अनघाच्या बोलण्यावर काहीच न बोलता पटापट आपली काम करू लागतो..

बरोबर साडे पाचला तो आणि अनघा घरी येतात.. विराज अनघाच्या हातात लॅपटॉपची बॅग देत हळुच शौर्यच्या रूममध्ये जातो.. शौर्य बेडवर उलट झोपुन आपला मोबाईल जोर जोरात समोर असलेल्या पिलॉवर आपटत होता.. विराज हळुच त्याच्या मागे जात त्याचा डावा हात मागे जोरात पिरघळतो. 

आत्ता बोल मम्मास बॉय.. फोनवर जास्तच बोलायला येत होतं ना तुला.. अस बोलत विराज अजुन जोरात हात पिरघळतो..

पण शौर्य काहीच रिएक्ट होत नाही.. उजव्या हाताने आपला मोबाईल जोर जोरात तो पिलॉवर आपटत असतो..

विराज : तुला दुखत नाही का??

शौर्य : तुझ्यासारखा नाजुक नाही मी.. 

(शौर्य एका हाताने आपला मोबाईल जोर जोरात आपटतच विराजला बोलतो)

अस मग बघच तु.. अस बोलत विराज अजुन जोरात हात पिरघळतो..

शौर्य : तुझं झालं की सांग मला..

विराज : तुला खरच दुखत नाही??

शौर्य : तुझं झालं असेल तर जा तु इथुन.. मला नाही बोलायच तुझ्यासोबत..

विराज : का काय झालं??

शौर्य : काही नाही झालं जा तु इथुन.. आणि हे तुझं कार्ड.. काल रात्रीच देणार होतो बट नाही जमलं.. 16 हजार घेतलेत.. थोड्या वेळात ते तुझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतील.. म्हणजे आज रात्री पर्यंत होतीलच..

विराज : ए शौर्य काय झालं तुला?? तु अस का बोलतोयस माझ्याशी? उठुन बस आणि माझ्याशी बोल बघु..

क्रमशः

(काय झालं असेल शौर्यला?? पाहुया पुढील भागात... आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.)

🎭 Series Post

View all