अतरंगीरे एक प्रेमकथा भाग १००

In marathi

कोण होता तो???

शेखरने परत विनिताला विचारलं पण ती काहीच सांगत नव्हती.. 

शेखर : विनी कोण होता तो?? प्लिज सांगशील??

विनिता : विर घरी झोपलाय.. मी समोर दिसली नाही तर घर डोक्यावर घेईल.. मी तुला फोनवर सांगते.. प्लिज सुरजला काही सांगु नकोस..

शेखर : मला आत्ताच सांग..

विनिता : माझा मोठा भाऊ होता.. 

शेखर : तो बोलतो तुझ्याशी??

विनिता : शेखर आत्ता सगळं नाही सांगु शकत रे.. मला खरच उशीर होतोय.. विर उठायच्या आधी मला घरी जायला हवं.. तु घरी येतोस तर चल.. तसही सुरज आज लवकरच येणार आहे कामावरून त्याला ही भेटशील..

शेखरने पण जास्त विचार न करता तिच्यासोबत घरी गेला.. आणि खरच तु उठलेलास आणि रडत होतास.. खुप वेळ तिचा तर तुलाच शांत करण्यात गेला..

आणि मग शेखरने विचारलं तिला..

दादाला पैस्यांची गरज होती.. वहिनीच ऑपरेशन करायचय बोलत होता.. सुरजच्या नकळत मी थोडे पैसे साठवते.. तेच मी त्याला दिले.. सुरजला ह्याबद्दल काहीच माहीत नाही आणि प्लिज तु सांगु ही नकोस.. त्याला मी त्या लोकांशी बोललेलं नाही आवडत.. 

शेखर : तुझा भाऊ एवढं वाईट वागुण पण तु मदत करतेस त्याला??

विनिता : तो वागला ते वाईट होत की नाही हा मी विचार नाही करत रे.. पण मदत करणं वाईट नाहीना.. तेवढं पुण्य माझ्या मुलाला मिळेल.. प्लिज सुरजला कळु देऊ नकोस.. सुरजला मी माझ्या भावाला फोन वैगेरे केलेला सुद्धा आवडत नाही एवढा राग करतो तो त्या लोकांचा.. जर दादाला माझ्याशी बोलावस वाटलं तर तो पिसीओ तुन फोन करतो मला.. कारण सुरज फोन पण चॅक करतो..

शेखर : सुरजचा त्याच्यावर राग असंण योग्यच आहे.. तो वागलाच तसा आणि आत्ताही तसाच वागतोय.. पण तु त्याला इथे भेटायला बोलवायचं सोडुन स्वतः एवढ्या लांब का गेलीस??

विनिता : सुरज ने सोसायटीच्या वॉचमनला पण सांगितलंय की तो ह्या सोसायटीत दिसला नाही पाहिजे.. आणि सोसायटीच्या बाहेर बोलवुन जर त्याला पैसे द्यायचा मी विचार केला तर इथले आजु बाजुचे दुकानदार पण ओळखीचे आहेत सुरजच्या. अजुन इस्यु नको म्हणुन दादानेच मला तु बघितलस त्या ठिकाणी भेटायला बोलवल. 

शेखर : जस मी तुला अचानक तिथे बघितलं तस सुरजने बघितलं असत तर???

विनिता : तो कामावर आहे ह्याची खात्री करूनच गेली मी..

शेखर : अस मुलाला ऐकट टाकून?? 

विनिता : विर नुकताच झोपला होता.. नाही तर त्याला नेणारच होते मी.. झोप नीट नाही झाली की खूप किरकिर करतो.. म्हणुन त्याला इथेच ठेवुन गेली.. आणि तो उठेपर्यंत मी परत घेरी येईल अशी खात्री पण होती मला..

शेखर : तुला काय बोलुना आता तेच कळत नाही मला.. जाऊ दे मी निघतो.. 

विनिता : बस ना.. सुरज पण येईल आता.. 

शेखर : घरी बहीण आणि भाची आलीय ग.. मला तिच्यासोबत टाईम स्पेन्ड करायचाय.. दोन दिवसांनी ती घरी जाणार आहे..

दोघांनाही बाय करत तो तिथुन निघाला..

शेखरला गाडीत बसुन निघताना सुरजने बघितलं.. सुरज नुकताच त्याच्या गाडीतुन बाहेर पडत होता.. शेखरला तो आवाज देणार पण शेखर तिथुन निघाला होता.. शेखर घरी आला तेव्हा निधीला खुप ताप आलेला.. म्हणजे सकाळपासुन तिला ताप होता आणि त्यातच तिला फिट आली.. मग एडमीट करावं लागलं तिला.. त्या गडबडीत शेखरच मला तो विनिताला भेटायला तिच्या घरी गेलेला हे सांगायच राहून गेलं.. मग तर शेखर हे सगळं विसरूनच गेला..

मला सुरजने दुसऱ्यादिवशी फोन केला..

सुरज : शेखरला माझ्या घरी येऊन फक्त विनिताला भेटायला आवडत का??

अनिता : अस का बोलतोयस?? 

सुरज : काल घरी आलेला.. मला न भेटताच तो निघाला म्हणुन बोलतोय ग.. बर आत्ता फोन करतोय तर उचलत नाही.. हां.. हेरवी त्याचे फोन असतात पण ते फक्त विनितालाच.. मला तर फक्त बिजीनेस संदर्भातच तो फोन करतो..

अनिता : सुरज... निधीला म्हणजे आमच्या भाचीला एडमीट केलंय. तो तिच्यासोबत हॉस्पिटलमध्येच आहे काल पासुन म्हणुन त्याने फोन नाही ऊचलला असणार तुझा.. कारण मी सुध्दा तु फोन करण्याआधीच त्याला केलेला तर माझाही नाही उचलला आणि तु त्याच्यावर डाऊट का घेतोयस..??

सुरज : घेण्यासारखंच वागतात दोघेही..

एवढं बोलुन त्याने फोन कट केला..

मला सुरजचा खर तर राग आलेला पण मी शेखरच्या वागण्याचा विचार करू लागली.. मला कामावर बर नाही अस सांगुन तो निघाला.. मग सरळ घरी जाऊन आराम करायचा तर विनिताला भेटायला का गेला?? 

मी शेखरला काहीही न विचारायचं ठरवलं आणि शेखर मला काही सांगतो का त्याची वाट बघत मी बसली.. सुरजसोबत बोलली ना त्याच दिवशी निधी बरी होऊन घरी पण आली.. त्याच्या नेक्स्ट डे अस्मिता सुद्धा तिच्या घरी गेली तरी पण शेखरने मला तो विनिताला भेटायला तिच्या घरी गेला हे सांगितलेच नाही.. शेवटी मग मिच रागात त्याला हे सगळं विचारायचं ठरवलं..

मग त्याने मला जे काही घडल ते सांगितलं.. पण मला त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता बसत.. कोणती आई आपल्या दीड एक वर्षाच्या मुलाला अस एकट घरी झोपवुन येईल..?? बर ती आली असेलही आणि नेमक ती ह्यालाच कशी दिसली..?? जर ह्याने अस्मितासाठी तो बोलतो तस रसमालाई घेतली होती मग ती घरी का नाही आली?? खुप प्रश्न माझ्या मनात होते. शेखरला विचारले पण.. त्यातल्या फक्त एकाच प्रश्नाच उत्तर त्याने मला दिलं ते मला पटलं ते म्हणजे अस्मितासाठी घेतलेलं स्वीट त्याने विनिताकडे दिलं तिच्या बाळासाठी.. पण बाकी साऱ्या गोष्टी मला न पटण्यासारख्याच होत्या. मी सुरजला शेखर काय बोलला ते सांगु शकत नव्हती कारण विनिता तिच्या भावाला अस चोरून पैसे देते हे त्याला कळताच तो खुप भडकेल तिच्यावर आणि खुप वाद होतील दोघांत म्हणून मी त्यावेळेला शांत बसली.. 

अश्यातच विनिताला पुन्हा मुलगा झाला.. सुरजने सुद्धा त्या नंतर तो विषय काढला नाही. आणि वर्षभराने मी पण प्रेग्नेंट राहिली.. मला जसे तीन महिने पूर्ण झाले तस सुरजने मला फोन करून एका रेस्टोरेन्टमध्ये बोलवुन घेतलं..

माझ्यासोबत काही बोलायच्या आत त्याने विनिताच्या फोनची कॉल लिस्ट मला दिली.. जवळपास दिवसातुन दोनदा तीनदा तिचे शेखरला कॉल असायचे. जर तिने नाही केला तर ह्याचे तिला.. मी ती लिस्ट बघत सुरजकडे बघितलं.. त्यानंतर सुरज ने माझ्या हातात विनिताचा फोन दिला..

अनिता : हे काय??

सुरज : मला विनितावर संशय नाही घ्यायचाय.. ती शेखर सोबत बोलतेय मला काही प्रोब्लेम नाही.. बट बोलुन झाल्यावर why she delete her call history?? शेखर तुला सांगतो तो तिला भेटायला माझ्या घरी येतो एन्ड ऑल??

अनिता : व्हॉट?? तो परत तुझ्या घरी आलेला??

सुरज : माझा मोठा भाऊ आणि वहिनी अचानक घरी आलेला तेव्हा तो त्यांना दिसला?? अस एकदाच नाही खूप वेळा. मला माझ्या दुसऱ्या मुलावरून तर डाऊट येतोय तिच्यावर की तो नक्कीच माझा आहे का शेखरचा??

सुरज... मी रागातच त्याच्यावर ओरडली..

सुरज : असाच राग मला शेखरवर येतोय.. पण नेहमी चूक करून मी काहीच केलं नाही असा आव तो आणतो.. म्हणुन मला ही गोष्ट त्याला बोलुन दाखवता नाही येत.. म्हणुन तुला सांगतोय.. तु नीट समजुन घेतेस मला. जर प्रेम होतं तिच्यावर मग लग्न करायचं होतं त्याने तिच्यासोबत. बर ते जमलं नाही इट्स ओके ती आता आपल्या मित्राची बायको आहे ह्याच जरा भान ठेवायला हवं त्याने..

एवढं बोलुन तो तिथुन निघुन गेला.. तो त्याच्या ठिकाणी योग्य होता अस मला वाटलं.. मी घरी आल्यावर शेखर आणि माझी खुप भांडण झाली.. त्यात मी प्रेग्नेंट होती.. शेखर मला शांत करत होता पण माझी जास्त चिडचिड होत होती.. 

तु ऑलरेडी विनिताच्या मुलाचा बाप झालायस शेखर मग हे मुलं कश्याला हवंय तुला?? मी रागातच त्याला हवं नको ते बोलत होती.. तरीही तो मला शांतपणे समजवत होता..

थोड्या वेळाने आई आणि समीर दोघेही आमच्या रूममध्ये आले.. पण मी त्याला त्याच्या फॅमिली समोरच स्पष्ट सांगितलं की मला हे मुलं नकोय.. त्याच्या घरचे सगळेच मला समजवायला लागले.. मला त्यांना त्यांचा मुलगा बाहेर काय करतो हे सांगायला जमत नव्हतं.. सगळेच मला हात जोडुन रिक्वेस्ट करत होते.. 

शेखरने त्यांना बाहेर जायला सांगितल. ती लोक बाहेर जाताच त्याने दरवाजा लावला.. आणि विनिताला तो का फोन करत होता ते मला सांगु लागला..

शेखर : विनिच्या भावाला पैस्यांची गरज होती.. होती म्हणजे नेहमीच असते. तिच्या लहान मुलामुळे तिला त्याला पैसे द्यायला घराबाहेर पडता नाही येत. अकाऊंटमधुन जर ट्रान्सफर केले तर सुरजला माहिती पडेल.. म्हणुन ती मला सांगायची की प्लिज त्याला पैसे दे मी तुला तुझे पैसे थोड्या दिवसांनी परत देते.. आणि तिच्या भावाला तर रोजच पैसे लागायचे. वेग वेगळी कारण सांगुन तो रोजच तिच्याकडुन पैसे घ्यायचा. सुरज तिच्या मोबाईलमधली कॉल डिटेल्स चॅक करतो म्हणुन तो मला कॉल करायचा.. आणि मग मी विनिला.. मला विनीच हे वागणं पटत नव्हतं.. मी तिला नेहमी समजवायचो की तुझा भाऊ तुझा वापर करतोय फक्त. पण ती समजतच नव्हती.. मला तर तिच्या भावावर संशय होताच की हा खोटं काहीही सांगुन तिच्या कडुन पैसे घेतो.. ती सुरुवातीपासूनच भोळी आहे.. समोरच्यावर लगेच विश्वास ठेवतो.. म्हणुन तिचा भाऊ तिचा असा वापर करून घेतोय हे मला सहन नव्हतं होत.. म्हणुन मीच त्याची हिस्ट्री काढली. तिचा छोटा भाऊ माझा चांगला मित्र आहे हे तुला पण माहिती.. मी त्याला कॉल करून विनिच्या वहिनीबद्दल विचारलं.. तेव्हा ती बरी आहे कळलं.. तीच कसलच ऑपरेशन वैगेरे झालं नाही हे हि कळलं.. माझा संशय खरा ठरला होता.. हिच्याकडुन मिळणाऱ्या पैस्यांवर आपल्या बायको मुलांसोबत सोबत मस्त मज्जा मस्ती करत होता तो.. त्याचे सगळे फोटो वैगेरे काढुन मी तिला दाखवायला तिच्या घरी गेलो.. तरी तिची खात्री होत नव्हती की आपला मोठा भाऊ अस वागेल.. तेव्हा तिच्या छोट्या भावाला मी स्वतः भेटून तिच्यासोबत बोलायला लावलं तेव्हा तिची खात्री पटली..आणि इतर वेळेला विनी मला तिच्या भावाला मी जे पैसे दिले ते माझे मला परत द्यायला घरी बोलवत होती.. त्या व्यतिरिक्त तु समजतेस तस काहीच नाही आमच्यात.. माझ्या होणाऱ्या ह्या बाळाची शप्पथ.. 

माझ्या पोटावर हात ठेवतच शेखर बोलला..

अनिता : तु मला हे सगळं का नाही सांगत आधी.. दुसऱ्यांकडून कळेपर्यंत का शांत बसतोस..

शेखर : तु कामातच इतकी बिजी असतेस तर कधी सांगणार?? तुला नीट बोलायला वेळ असतो का?? तिथे सुरजला जाऊन भेटायला वेळ असतो.. मी कधी बोललो आपण फॅमिली डिनरला जाऊयात.. कधी आऊटस्टेशन जाऊयात.. बट तुला फक्त बिजीनेसच घेऊन बसायचा असतो.. मुलाच्या बर्थडेला तु तोंड वाकड करत सुट्टी घेतेस.. मग काय सांगु मी तुला. तु मला सांगतेस सुरजला कुठे कुठे भेटायला जातेस ते?? सांगतेस तु मला?? आणि जस तु माझ्यावर डाऊट घेतेस तस मी घेऊ तुझ्यावर.. तो सुरज तुला जेव्हा जेव्हा भेटायला बोलावतो तेव्हा तेव्हा तु तो बोलेल तस मला न विचारता त्याला जाऊन भेटायला जातेस. जातेस ना??तेव्हा तु सुरजला का नाही बोलत तु सुद्धा माझ्याशी बोलतो मग विनी वरून माझ्या नवऱ्यावर संशय का घेतोस?? का नाही बोललीस त्याला तु??

अनिता : शेखर मी दोनदा तीनदाच त्याला भेटायला गेली फक्त..

शेखर : तु बाहेर गेल्यावर माझ संपूर्ण लक्ष असत ग तुझ्यावर हे विसरू नकोस तु.. आणि ही लास्ट वोर्निंग जर ह्या वेळेला तु परत माझ्या बेबीच्या जिवासोबत खेळलीस तर मी खरच तुझ्यापासुन वेगळा राहील.. लास्ट टाईम सारख मी परत चान्स नाही देणार तुला..

माझं काहीही बोलणं न ऐकता तो दरवाजा जोरात आपटून निघुन आपल्या आई आणि भावासोबत जाऊन बाहेर बसला..

शेखरने अस आवाज चढवुन बोलल्यामुळे मला खुप राग येत होता. विनितामुळे आमच्यात भांडण होत होती.. मी रागातच सुरजला फोन लावला.. जस तो माझ्यावर ओरडुन हॉटेलमधुन निघुन गेला तस मी त्याच्यावर ओरडली.. शेखरने जे सांगितलं ते सगळं त्याला सांगुन त्याचा गैरसमज दूर केला. आणि शेखरला मी सरळ सांगितलं कि तु ह्यापुढे विनितासोबत बोलायच नाहीस आणि तिच्या घरी सुद्धा जायच नाहीस.. आणि त्याने माझं ऐकलंही.. आणि तसच मी विनिताला सुद्धा सांगितलं.. 

त्यानंतर आमच्या आयुष्यात शौर्य आला. आमच सगळं व्यवस्थित चालु होत. शौर्य शेखरसाठी लकी ठरलेला. शौर्य झाल्यावर आम्ही हा बंगलो बुक केला. आम्हांला मोठं मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळत होते. बट शेखर मात्र शौर्य नंतर कामात लक्षच देत नव्हता. शौर्यमुळे त्याची लाईफ बदलली तर होती बट त्याने त्याच डेली रुटीन पण बदललं.. त्यामुळे काही काँटेक्ट तर हातातुन जात होते त्याच्या बट ही डोन्ट केअर. मी आईंना आणि समीरला दोघांनाही शेखरला समजवायला सांगितलं.. त्यांनी समजवल तस तो कामावर जायचा बट परत काही दिवसांनी पुन्हा त्याच तेच.  शेवटी मिच शौर्यला घरी ठेवुन कामावर जाऊ लागली.. जे कोन्ट्रॅक्ट आमचे जायचे ते सुरज मुळे आम्हांला परत मिळायचे.. म्हणजे हे अस दर वेळेला होत होतं. हळुहळु शौर्य मोठा होत गेला.. तस शेखरमध्ये तो जास्त अडकून गेला कारण शेखरनेच त्याला त्याची सवय लावली होती.. मॅन म्हणजे शेखरला मी सुरुवातीपासून सांगत होती की सवय नको लावुस त्याला मग तो सोडणार नाही बट शेखर सॅम शौर्यची कार्बन कॉपी जे स्वतःच्या मनाला पटत तेच करणार.. आणि त्याचे परिणाम त्याला दिसत होते.. शौर्य सोडायचाच नाही त्याला.. पहिलं कामावरून येऊन सुद्धा शेखर हातात घेऊन लॅपटॉपमध्ये काम करायचा पण शौर्य नंतर ते सुद्धा बंद झालं त्याच.. घरी आल्यावर शेखरला फक्त नि फक्त शौर्य लागायचा.. आणि शौर्यला तो.. मला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम नव्हताच बट शेखर एवढा त्यात गुंतलेला की तो शौर्यसाठी जॉब सोडुन सुद्धा घरी बसु शकत होता.. आणि तो तस बोलुन सुद्धा दाखवायचा मला.. मला ते नाही पटायच.. बिजीनेस जसा उंचावर जात होता तस खाली यायला वेळ लागणार नव्हता हे सांगुन सुद्धा शेखर ऐकत नव्हताच.. त्यावरून आमचे परत वाद होत होते.. पण शेखर मात्र माझं बोलणं एका कानाने ऐकायचा आणि एका कानाने सोडून द्यायचा.. 

आणि अचानक एकदा रात्री विनिताने शेखरला फोन केला. रात्री अकराच्या सुमारास तिचा फोन आलेला.. आणि जवळपास चार पाच वर्षांनी तिने त्याला फोन केलेला..शेखरने मला विचारूनच तिचा फोन उचलला.. खुप रडत होती ती.. सुरज खुप त्रास देतोय तिला अस त्याला सांगत होती.. तुझ्या लहान भावावरून तो तिच्यावर नेहमीच संशय घ्यायचा.. हवं नको ते बोलतो.. तिला मारतो एन्ड ऑल.. अस खुप काही ती सांगत होती शेखरला.. तो त्याला त्याच्या नजरेसमोर नको होता. त्याला तो त्याच्या मोठ्या भावाला देऊन टाकायला सांगत होता.. जर ते जमत नाही तर डायवोर्स दे म्हणुन तिच्या मागे लागलेला.. आणि त्याचा मोठा भाऊ सुद्धा घरी येऊन त्रास देतो अस पण बोलत होती. शेखरला काय बोलाव तेच कळत नव्हतं.. मी बोलतो त्याच्याशी अस बोलुन त्याने फोन ठेवला..

विनिताचा फोन ठेवुन तो माझ्यासोबत बोलला त्याबाबत.. 

शेखर : सुरज अजुन एकच गोष्ट धरून बसलाय. आत्ता तर त्याचा मुलगा सहा सात वर्षांचा तरी झाला असेल ना?? तरी का तेच तेच काढतो. एवढा डाऊट आहे मग DNA टेस्ट करून घे बोल त्याला..

शेखर खुप भडकला होता.. मिच त्याला शांत केलं..आणि आपण उद्या सुरजला भेटुन बोलुयात. एकाचीच बाजु  ऐकुन काही नाही ना बोलु शकत आपण.. अस त्याला समजवुन सांगितलं..

मी रात्रीच सुरजला फोन करून दुसऱ्यादिवशी भेटायला बोलवलं..

 दुसऱ्यादिवशी ऑफिसमधुन निघेपर्यंतच आम्हांला 8 वाजेल.. सुरज ऑफिस बाहेरच आमची वाट बघत होता.. आम्ही जवळच एका रेस्टोरेन्टमध्ये गेलो तर त्यावेळेस सुरज आम्हांला काही तरी वेगळंच सांगत होता..

विनिता अनिता वरून माझ्यावर संशय घेते.. माझ्या मुलांकडे निट बघत नाही.. नेहमी फोन वर बोलत असते कोणासोबत तरी.. मी त्या नंबरवर फोन केला तर कोण तरी माणूस माझा आवाज ऐकून फोन कट करतो. मी कामावर गेल्यावर रोज एक माणुस घरी येतो अस सोसायटीचा वॉचमन मला बोलला आणि सोबत आमचे शेजारी पण. माझ्या भावाने सुद्धा तिला दोनदा तीनदा मॉलमध्ये एकासोबत फिरताना पकडलंय.. त्यावरून ती माझ्या भावावर हवे नको ते आरोप करत होती.. माझी वहिनी तिला आपल्या मुली सारख सांभाळते तर ही तिला पण हवं नको ते बोलते.. मुलांना नीट सांभाळायला नाही जमत तर माझ्या भावाकडे पाठवुन देतो बोललो तर ते सुद्धा नाही करत.. मला खर जीव द्यावासा वाटतोय.. रोजच्या भांडनांनी कंटाळा आलाय मला.. का लग्न केलं मी हिच्याशी अस मला वाटतय. नेहमीच चोरून भावाला पैसे वैगेरे द्यायची तुला तर माहिती आहे पण ही अजुनही देते.. मी माझ्या मुलांसाठी कमावतो की हिच्या भावासाठी ते सांग. माझी पण सहन करायची लिमिट आहे यार. स्वराज जन्माला आल्यापासुन ही नाटकी चालु आहेत तिची. मी नाही राहु शकत अजुन हिच्यासोबत.. 

अनिता : शेखर आपण घरी जाऊन विनितासोबत बोलूयात अस मला वाटत.. 

सुरज : नाही नको.. परत तुला बघुन मला हवं नको ते बोलेल.. माझी मुलं तिला घाबरून रहातात.. मला अजुन जास्त वेळ तुमच्यासोबत थांबायला नाही जमणार.. मी निघतो..

शेखर : आणि माझा चॅम्प पण माझी घरी वाट बघत असेल.. आधीच साडे आठ वाजलेत.. उद्या जाऊयात.. मी तसही विनिला फोन करत नाही.  पण आज हवं तर फोन करतो.. आणि फोनवर विचारुयात काय प्रॉब्लेम आहे ते.. मी जेवढं विनीला ओळखतो त्यावरून सांगतो हा जे बोलतोय तस ती वागणारच नाही.. 

सुरज : हो ना तसही माझ्यापेक्षा तुच चांगलं ओळखतोस तिला.

शेखर : सुरज तु आमच्या मैत्रीचा चुकीचा अर्थ काढतोयस.. मी तुला लास्ट सांगतोय परत जर एक शब्द बोललास तर मी विसरून जाईल की तु माझा मित्र आहेस ते.

अनिता : शेखर प्लिज शांत हो.. प्लिज.. आणि सुरज तु परत नको ते आरोप का करतोयस त्याच्यावर??

सुरज : आरोप तो माझ्यावर करतोय.. माझी मुलं सुद्धा विनिताला घाबरतात एवढा त्रास ती देते.. 

शेखर : ओहह रिअली?? तरी तु ह्या टाईमला मुलांसोबत रहायच सोडुन आमच्यासोबत आमच्याशी बोलत इथे थांबलायस..  आणि ऑफिसमधुन सुटून डायरेक्ट इथे आम्हांला भेटायला आलास?? मग सकाळपासुन विनी सोबतच तुझी मुलं होतीना?? 

सुरज : प्रत्येक तासाला घरी फोन करून विचारत होतो मी.. आणि आता येणार नव्हतोच.. काल रात्री अनिताने भेटायला बोलवलं म्हणुन मी आलोय..

शेखर : अनिता प्लिज आपण घरी जाऊयात?? शौर्य वाट बघत असेल माझी..

अनिता : शेखर प्लिज.. एक दिवस समीर सांभाळेल रे शौर्यला.. हे सगळं सॉर्ट आउट कर.. विनिता रडत होती काल.. हा एक सांगतोय ती एक सांगतेय.. काय ते नीट कळु तर दे आपल्याला नेमकं काय झालंय दोघांत ते.. 

शेखरची समजुत काढत आम्ही सुरजसोबत घरी जायला निघालो.. खुप वेळ बेल वाजवत होतो पण डॉर कोणी ऑपन करतच नव्हतं.. शेवटी सुरजने त्याच्याजवळ असलेल्या कि ने डॉर ऑपन केला.. समोरच दृश्य बघुन आम्ही सगळेच घाबरलो.. विनिता खाली पडलेली.. तुम्ही दोघ तिच्या मांडीवर होता.. शेखर आणि सुरज पळतच तुम्ही लोक नीट आहेत का बघत होते.. विनिताचा आणि तुझा श्वास फक्त चालू होता... पटकन गाडीतुन तुम्हांला हॉस्पिटलमध्ये नेलं.. एक तासाने विनिताने पण प्राण सोडले.. तु मात्र ICU मध्ये होतास..

विनिताने नकोत्या कारणाने खुप टोकाच पाऊल उचलल होतं अस मला वाटलं. शेखर आणि मी खुप रडलो विनिताच अस काही झालं म्हटलं तर.. नंतर आम्ही सावरलो ह्यातुन.. पण सुरज मात्र तुझ्या टेंशनमध्ये असायचा. त्यानंतर चार पाच महिने तरी सुरज आमच्या कंपनीत आला नाही.. विनिताच अस काही झालं ना त्यांनंतर जवळपास तो पाच एक महिन्यांनी आमच्या कंपनीत आला.. मग नेहमी तुझ्याबद्दल सांगायचा आणि आपलं मन हलकं करायचा.. अचानक मुलगा आणि बायको दोघेही सोडुन गेल्याने एकटा पडला होता तो..

पण त्यानंतर शेखर आणि माझ्यात खुप वाद व्हायचे.. त्याच्या भावाला घेऊन.

समीरने शेखरच्या मागे लागुन कंपनी जॉईंट केली.. पण त्याला ती काम करायची असायची जी शेखर करायचा.. त्याला शेखरची जागा त्या कंपनीत घ्यायची होती.. आय नॉ तो CA झाला होता.. बट एकदमच त्याला एवढी मोठी जबाबदारी मी देऊ शकत नव्हती.. पण त्याला आऊट स्टेशन मिटिंगला सुद्धा जायच असायचं म्हणजे मला शेखर सांगायचा की उद्याची मिटिंग असेल ती समीर हँडल करेल तु ऑफीसच सांभाळ.. अस खुपदा व्हायच. मी शेखरला त्याबाबत बोलली की तुझा भाऊ कंपनीत तुझी जागा घ्यायला बघतोय.. तु जास्तच विश्वास ठेवतोयस त्याच्यावर.. शेखर त्यावरून वाद करू लागलेला माझ्यावर.. मुळात शौर्य आमच्या आयुष्यात आल्या पासुन त्याच्या नजरेत माझी वेल्यु ही झिरो झालेली.. तो मला कधी समजुन घेतच नव्हता.. कधी कंपनी रिलेटेड जरी त्याला काही विचारायला गेली तर समीर ला विचार अशी उत्तर असायची त्याची.. सुरज विनिताच्या अश्या अचानक जाण्याने एकटा पडलेला.. त्याला आधाराची गरज होती.. त्याला माझ्यासोबत बोलल्यावर छान वाटायच.. हळूहळू मी पण त्याला शेखरला धरून आपले सगळे प्रॉब्लेम सांगु लागली.. म्हणजे एकंदरीत तो मला धीर देत असायचा आणि मी त्याला.. 

एकदा मी अस अचानक घरी जाऊन आमच्या रूममध्ये एंटर करणार तोच समीर आपल्या भावाला माझ्याबद्दल हवं नको ते भडकवत होता.. माझे आणि सुरजच अफेर आहे एन्ड ऑल.. पण शेखर त्याच्यावरच भडकला.. वर मी पण समीरला खुप ओरडली.. आणि आमच्या रूममधुन जायला सांगितलं.. शेखरला मी सरळ सांगितलं तुझा भाऊ मला माझ्या कंपनीत नकोय.. त्यावरून सुद्धा शेखर मलाच ओरडला.. ही तुझी कंपनी नाही आपली कंपनी आहे.. समीरचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे ह्या कंपनीवर जेवढा माझा आहे.. एकवेळ ही कंपनी तुझी नाही अस तु बोलु शकतेस.. मी त्याच्या ह्या बोलण्याने खुप हर्ट झालेली.. म्हणजे मी आज पर्यंत जे त्या कंपनीसाठी केलेलं त्याची शेखरला काहीच किंमत नव्हती. मी खर तर तेव्हाच कंपनी सोडण्याचा निर्णय घेतलेला.. सुरज ने मला त्याची कंपनी जॉईंट करायला सांगितलं.. मी पण तेच करायचं ठरवलं.. मी शेखरला तस सांगितलंही.. त्यावरून पुन्हा आमच्यात वाद होऊ लागले.. आमचा आवाज अगदी बाहेरपर्यंत गेलेला.. समीर हातात मिठाईचा बॉक्स घेऊन आमच्या रूममध्ये आला.. माझ्यावरून वाद करायची गरज नाही.. मला जॉब भेटलाय.. अस बोलत मिठाईचा बॉक्स तिथे ठेवुन निघुन गेला. त्यानंतर शेखर कंपनीत तर यायचा.. पण इंपोर्टन्ट मिटिंग कधीच अटेंड करायचा नाही तो.. रोज काही ना काही कारण असायचीच त्याची..

अश्यातच समीरच लग्न ठरलं आम्ही नाशिकला गेलो.. शौर्यला पाणी हवं होतं म्हणुन मी पाणी आणायला किचनमध्ये गेली तस समीरने माझ्यासोबत फिजिकली होण्याचा प्रयत्न केला.. वर एक्सप्लेनेशन देत होता.. मला अस वाटलं त्या वेळेला तरी शेखर आपल्या भावाला ओरडेल पण तेव्हाही काहीच नाही.. शेखरच्या ह्या अश्या वागण्याने शेखर माझ्या मनातुन उतरून गेलेला.. मला त्याच्यासोबत रहाण्याचा कंटाळा आलेला.. प्रत्येक गोष्टीत तो मलाच चुकीच समजत होता. माझं ह्या घरात तस कोणीच नव्हत.. मुलगा सुद्धा कधी आई म्हणुन माझ्याजवळ यायचाच नाही.. दिवसभर त्याला त्याचा बाबा नाही तर काका लागायचा.. नवरा होता तर त्याला त्याचा मुलगा, त्याचा भाऊ आणि त्याची आई ह्या व्यतिरिक्त काहीच नको होतं.. जर कधी फॅमिली फंक्शन असेल तर तो दोन दिवस आधी माझ्यासोबत नीट बोलायचा. मग पुन्हा त्याच तेच..  मला पाहिजे तस तो समजुन नव्हता घेत.. शौर्य आमच्या आयुष्यात येण्याआधी आमचं आयुष्य खुप वेगळं होत. एकत्र ऑफिसला जायचो. एकत्रच ऑफिसमधुन यायचो.. रात्री ऑफिस रिलेटेड एकमेकांसोबत बोलायचो.  किंवा इतर खुप गोष्टी एकमेकांशी शेअर करायचो. बट शौर्यनंतर तस काही घडत नव्हतं. शेखर घरी आला की शौर्यसोबत खेळण, त्याचा अभ्यास, मग त्याला भरवण, मग आपल्या आई नाही तर भावासोबत त्यांच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारण, परत रात्री शौर्यला घेऊन झोपण.. मी काही बोलायला किंवा सांगायला गेली तर उद्या ऑफिसमध्ये बोलूयात.. अस असायच त्याच. म्हणजे मी ह्या घरी नसली तर कुणाला काही फरकच पडणार नव्हता असे वागत होते सगळे. समीरची बायको आल्यामुळे सगळे तिच कौतुक करण्यात बिजी असायचे. इव्हन शेखर सुद्धा. कारण ती छान जेवण बनवायची.. घरात शेफ तेव्हाही होते बट तिला आवड होती कुकिंगची.  म्हणुन ती करायची.. शेखर मला तिच उदाहरण द्यायचा.. जॉब करून फॅमिलीला वेळ देते थोडं शिक काही तरी तिच्याकडुन.. त्याच्या अश्या बोलण्याने माझी खुप चिडचिड होत होती.. घरी येणंच मला नकोस वाटत होतं.. म्हणजे करिअरला जास्त महत्व देणं हे माझं चुकलं अस मला वाटायला लागलं. मी शेखरची प्रत्येक गोष्ट ऐकलेली, त्याला लवकर लग्न करायच होत का तर त्याची आई त्याच्या मागे लागली.. मी ऐकलं, त्यानंतर बिजीनेस सांभाळायला मदत कर अस बोलला ते ही मी केलं, त्यानंतर मला मूल हवं होतं.. मला एवढ्या लवकर मुलं नको होत पण शेखरसाठी मी तैयार झाली पण तरी शेखर मला इतरांसोबत कंम्पेर करून कमी लेखत होता.. मुळात तो समजुनच घेत नव्हता..

शेखरला मी त्याबाबत विचारलं देखील.. परत तो मी कशी चुकते हेच मला दाखवुन देत होता.. खुप वाद झाला दोघांत त्या गोष्टीला घेऊन.. मग मात्र मला राग अनावर झाला.. मी त्याला बोलली मला नाही जमत अस रहायला तुझ्यासोबत.. 

शेखर : सुरज वाट बघतोय तुझी जाऊ शकतेस.. 

(दरवाजाकडे बोट दाखवतच तो मला बोलला)

अनिता : भावाने परत कान भरलेत वाटत?? 

शेखर : माझ्या भावाला बोलण्यापेक्षा तु काय वागतेस ते बघ.. तुला मला काय हवंय तेच कळत नाही.. कॉलेजमध्ये ज्या अनिताच्या प्रेमात होतो लग्न झाल्यावर ती पुर्ण बदललीय अस मला वाटत.. लग्नझाल्यावर नाही लग्न करायच्या आधीच तु बदललेलीस. पहिलं तुला मला काय होत ते सगळं कळायचं अनिता बट आता तुला माझ्यापेक्षा सुरजला किती त्रास होतोय ते कळत.. आय डोन्ट नॉ व्हाय  मी विनीलासोडून तुला प्रपॉज केलं.. 

अनिता : तेच मी बोलणार होती तुला..  मला नाही कळायचं काही?? तुझ्या विनिलाच कळायचं.. तिच मला प्रश्न करत बसायची तुझ्याबद्दल.. शेखरला बर नाही का?? शेखर रडलाय का?? एन्ड ऑल.. मिच मूर्ख तुमची सगळी नाटकी माहिती असुन तुझ्या प्रेमात पडली.. आणि जर तुझ तिच्यावर प्रेम होतं तर माझ्याशी का लग्न केलंस??

शेखर : विनी बोलली ना.. दोन वर्षे तुम्ही सोबत आहात.. अनिता प्रेम करते तुझ्यावर. तिला वाईट वाटेल.. अस अर्ध्यावर नको सोडूस.. म्हणुन केलं लग्न.. 

अनिता : म्हणजे एकंदरीत सगळंच ऐकायचास तिच.. मला तर अस वाटतना सुरज बोलतो ते खरं आहे. तिच्या लहान मुलाचा बाप तुच असणार..

शेखर : माझ्या ह्या चॅम्पची शप्पथ घेऊन बोललेलो.. उगाच घाणेरडे आरोप माझ्यावर करू नकोस. विनिवर माझं प्रेम होतं.. पण ते खुप उशिरा कळलं मला. माझाच मुर्खपणा तिच्या साधे पणाला इग्नोर करत मी तुझ्यामागे लागलो.. एवढा मोठा बिजीनेस मॅन झालो पण माझ्या लाईफच्या बाबतीतला सगळ्यात मोठा निर्णय घ्यायला मी चुकलो.. विनीच्या एका पण गुणाची सर नाही तुझ्यात.. फक्त माझ्या मुलामुळे मी तुला सहन करतोय.. आणि माझ्यासाठी घर दार सोडून आलीस म्हणुन तुला ह्या घरात रहायला मी जागा दिलीय.. सुरज आणि तुझं बाहेर काय चालल असत हे न कळायला मी मूर्ख नाही.. 

अस खुप काही मला बोलुन तो शौर्यला घेऊन रूममधुन निघुन गेला. पण तेव्हा खरच सुरज आणि माझं काही नव्हतं.. बट शेखरच्या अश्या टोकाच्या बोलण्यामुळे मला कोणाच्या तरी आधाराची गरज होती.. तेव्हा सुरजने मला आधार दिला.. मला माहिती मी खुप चुकीच पाऊल टाकलं होतं.. बट लग्न झाल्यावर आई वडील माझे नव्हते राहिले.. भाऊ बोलायचा माझ्यासोबत बट त्याला हे सगळं नव्हतं सांगु शकत मी.. शेखरमुळे माझ माहेरच घर कायमच तुटल होत माझ्यासाठी. निदान पंधरा एक दिवस शेखर पासुन थोडं लांब आपल्या आई वडिलांकडे मी राहू शकेल असंही मला करता येत नव्हतं.. किंवा त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासमोर माझं मन हलकं करेल असही नव्हता करता येत मला.. मला कोणाकडे तरी व्यक्त व्हायच होत.. ते मी सुरजच्या पुढ्यात झाली. 

एकदा सुरजने मला काही तरी महत्वाच सांगायच अस सांगुन एका हॉटेलमध्ये बोलवलं..

अस अचानक का बोलवुन घेतलस?? मी त्याच्या समोरच्या चेअरवर बसतच त्याला बोलली..

सुरज : मला तुला काही तरी सांगायच आहे.. खुप वर्ष मी हे सगळं मनात ठेवलय.. आय नॉ मी काही गोष्टी चुकीच्या केल्यात बट त्यातुन काही चांगलं व्हावं ह्यासाठीच केल्या.. कॉलेजमध्ये असताना रॉज डे ला ते रॉज मी तुझ्यासाठी घेऊन आलेलो.. बट त्याआधी शेखरने तुला प्रपॉज केलं सगळ्यांसमोर माझा इन्सल्ट नको म्हणून मी ते रॉज नेक्स्ट डे विनीताला दिलं.. विनीताला मी प्रपॉज केलं कारण शेखरला जाणीव व्हावी की तो तिच्यावर प्रेम करतो तुझ्यावर नाही पण तसही काही झालं नाही.. आणि मी उगाच विनीतामध्ये अडकलो.. तो फोन मीच विनिताच्या घरी केलेला जेणेकरून विनिता माझ्यापासुन लांब जावी आणि शेखर तिच्या जवळ जावा. पण तेव्हाही उलटंच झालं सगळं.. कॅफेमध्ये तुला हेच सगळं सांगायला मी बोलवलेलं की शेखर विनितावर प्रेम करतो तुझ्यावर नाही पण तेव्हा तिथे शेखरला बघुन माझी खात्री झाली की तु पण शेखरवरच प्रेम करतेस. पण एक शेवटचा प्रयत्न म्हणुन मी मुद्दामुन शेखरला विनिता आणि माझ्या लग्नाची बोलणी करायला तिच्या भावाकडे बोल बोललो जेणेकरून त्यावेळेला त्याला येणारा राग बघुन किंवा त्याचे एक्सप्रेशन बघुन तरी तुझी खात्री पटेल की तो खरच विनिताच्या प्रेमात आहे तुझ्या नाही पण तेव्हा सुद्धा तुला नाही समजलं. त्यात विनिताची वहिनी आपल्या भावासोबत विनीताच लग्न लावुन देत होती बट तिचा भाऊ चांगल्या मार्गाचा नव्हता.. विनिताला त्या घरातुन सुटका मिळावी म्हणुन मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.. आणि मला अशी खात्री पण झाली होती की तु माझ्या लाईफमध्ये परत येणार नाहीस.. निदान माझ्यामुळे विनिताची लाईफ तरी नीट होईल अस मला वाटलं.. बट विनिताच्या प्रेमळ स्वभावाने आम्ही खरच एकत्र आलो होतो आणि तुला विसरत चाललो होतो.. बट शेखरमुळे ते सगळंच स्पोईल झालं.. आणि आता शेखर तुझी लाईफ स्पोईल करतोय, तुला तो खुप त्रास देतोय हे मला बघवत नाही.. आपण दोघे एकत्र खुप खुश राहू अस मला वाटत.. शेखर तुझ्यावर प्रेम नाही करत हे आत्ता तरी समजुन घे.. बाकी तुझा निर्णय तु घेऊ शकतेस..

मी काहीही न बोलता तिथुन घरी आली.. घरी येऊन बघते तर शेखर रागाने लालबुंद झालेला..

The Taj मधली तुझी आणि सुरजची डेट खुप छान झालेली दिसतेय.. तरी अजुन भुक लागली असेल तर आमच्यासोबत डिनर करू शकतेस.. एवढं बोलुन तो रूममधुन निघुन गेला..

मला खर तर रोजच्या भांडणाचा कंटाळा आला होता.. त्यावेळेस मी शेखरसोबत वाद नाही घालत बसली.. मी ती संपुर्ण रात्र सुरजच्या बोलण्याचा विचार करू लागली..

त्यानंतर शेखर आणि मी नॉर्मली बोलायचो.. बट पहिल्यासारख नाही. कारण मला पण सुरज बोलतो तस वाटु लागलेलं की शेखरच विनीतावर प्रेम आहे माझ्यावर नाही.. त्याला मी नकोय ह्या घरी..

हळुहळु सुरज आणि मी खुप जवळ आलेलो. त्यातच सुरज लग्न कर म्हणुन पाठी लागलेला.. पण मला शौर्य माझ्यासोबत हवा होता.. नाही बोलायला गेलं तर 9 महिने मी त्याला पोटात ठेवलेलं.. जर मी सुरज सोबत लग्न केलं तर शेखर शौर्यला माझ्याकडे देणार नाही.. मी सुरजला माझा प्रॉब्लेम बोलुन दाखवला. मला शौर्यसाठी तरी त्याच्यासोबत रहावं लागेल हे सांगितलं.. 

सुरज : जर डायवोर्स घेतला तर शौर्यची कस्टडी तुझ्याकडेच देतील..

अनिता : शेखर शिवाय एक मिनिट तो मुलगा रहात नाही.. शेखरने त्याची सवयच त्याला तेवढी लावलीय..

सुरज : एक काम कर.. आत्ता जेवढ्या मिटिंग असतील त्या शेखरला हँडल करायला दे आणि तु शौर्यसोबत टाईम स्पेन्ड करत जा.. हळुहळु सवय लागेल तुझी.. 

मला पण त्याच म्हणणं पटलं..

दोन आठवड्यांनी मिटिंग होती पुण्यात.. मी शेखरला बोलणारच होती की ही मिटिंग तु हँडल कर.. 

पण डायनिंग टेबलवर आम्ही जेवायला बसलो होतो तेव्हा तोच खुप विचित्र काहीतरी बोलत होता.. म्हणजे आपल्या भावाला सांगत होता..

माझ्या चॅम्पला एकट पाडू नकोस कधी.. मोठा बिजीनेस मॅन बनव.. 

समीर त्याला तो अस का बोलतोय ते विचारत पण होता पण तो काही सांगत नव्हता.. म्हणजे हे नेहमीचंच झालेलं त्याच.. रोज काही ना काही बोलायचाच तो.. 

रात्री रूममध्ये येऊन स्वतः माझ्याशी बोलु लागला की त्याच्या चॅम्पला त्याच्या बाबापासून ऐकट रहायची सवय लावावी लागेल.. पुण्याची मिटिंग मी हँडल करेल.. मी ओके बोलली..

 बट जेव्हा मिटिंगला जायची वेळ आली त्याच्या आदल्या रात्री मात्र तो जायला मागत नव्हता.. मीच फोर्स केलं त्याला त्या मिटिंगमध्ये जायला. कारण शेखर मिटिंगला जाणार होता म्हणुन मी प्रिपेर नव्हती. पण मिटिंगला न जाण्याचा शेखरचा तो डिसीजन खरच योग्य होता. शेवटची मिटिंग ठरली त्याची ती.. तो एक्सिडेंट झाला की करवुन आणला हे सुरजलाच माहिती.. मला तर शेवटपर्यंत त्याने मी शेखरला मारलं नाही हेच सांगितलं..

शेखर नंतर सुरज शौर्य बद्दल खुप विचारत रहायचा.. म्हणजे खुप आपुलकी दाखवायचा तो. इथे शौर्यला पण बाबा दिसत नाही म्हणुन त्रास देत होता.. तसही सुरज आणि मी लग्न करण्याचा डिसीजन आधीच घेतला होता.. त्या वेळेला समीर आमच्या लग्नाला विरोध करत होता.. जर लग्न करणार तर ह्या घरातुन मला बाहेर जा बोलला.. बट हे घर शेखरने आणि मी आम्ही दोघांनी मिळुन शौर्यसाठी घेतलेलं.. तो अस कस बोलु शकत होता..?? मला माझ्या आणि मुलाच्या बाबतीला प्रत्येक डिसीजन घेण्याचा अधिकार आहे अस मी त्याला सांगितलं.. त्या आधी तर त्याने सुरजला जाऊन माझ्याबद्दल हवं नको ते सांगुन भडकवल होत.. वर त्याच्यावर हात सुद्धा उचलला होता. मग मिच त्याला ह्या घरातुन जायला सांगितलं.. आणि मी सुरज सोबत लग्न केलं..

बट माझा डिसीजन चुकीचा होता.. शौर्यला जेव्हा मला दिल्लीला पाठवायची वेळ आली तेव्हा मला कळलं की शेखर हा माझा होता. सुरज फक्त माझ्या भावनांशी खेळत होता.. माझ्याच नाही तो विनिताच्या, शेखरच्या, माझ्या आणि माझ्यासोबत शौर्यच्या आयुष्यासोबत सुद्धा खेळला. शौर्यला तो मारून टाकणार होता का तर तो शेखरसारखा दिसतो म्हणुन.. सोबत त्याला शेखरचा बीजीनेस सुद्धा हवा होता.. मग कशावरून त्याने शेखरला मारलं नसेल?? शौर्यला दिल्लीला पाठवलं त्याच्या काही महिन्यांनी मी सुरजला जाब विचारला त्याबाबत..

का वागलास अस ते मी त्याला विचारलं..

सुरज : मला तु हवी होतीस.. त्यासाठी मला जे वाटलं ते मी केलं..

अनिता : जर विनितावर प्रेम नव्हतं तर का लग्न केलंस तिच्याशी.. का खेळलास तिच्या जिवासोबत??

सुरज : शेखर माझ्यासमोरून तुला फिरायाला घेऊन जायचा तेव्हा मला जो त्रास व्हायचा त्याच्या डब्बल त्रास त्याला व्हावा म्हणुन मी विनितासोबत लग्न केलं..  

अनिता : म्हणजे विनिता शेखरला जे सांगत होती ते खरं होतं?

सुरज : स्वराजला दिलं असत माझ्या भावाला तर काय फरक पडणार होता?? माझ्या भावाने पण आपल्या मुलासारखच सांभाळल असत त्याला.. पण ऐकत नव्हती ती.. तिला मारून बघितलं तरी एकच गोष्ट धरून बसली.. माझ्या मुलाला एक वेळ मारून टाकेल पण तुझ्या नीच भावाला देणार नाही.. जो आपल्या भावाच्या बायकोवर घाणेरडी नजर ठेवतो तो माझ्या मुलावर काय संस्कार करणार असे नको ते आरोप माझ्या भावावर करत होती ती.. माझ्या भावाला अस नको ते बोलते म्हणुन पण खुप मारलं तिला तरी पण माझ्या भावाला आणि वहिनीला पण हवं नको ते बोलायची.. मग धमकीच दिली.. डायवोर्सच देतो तुला आणि दोन्ही मुलांची कस्टडी मीच घेतो.. तस पण माझा भाऊ आणि वहिनी सांभाळतील माझ्या दोन्ही मुलांना.. मी फक्त ती घाबरावी म्हणुन बोललो जेणेकरून ती स्वराजला माझ्या मोठ्या भावाला द्यायला तैयार होईल बट ती एवढं टोकाच पाऊल उचलेल अस नव्हत वाटलं मला..

विराज : म्हणजे मोठे पप्पा पण मम्मीला त्रास देत होते..

अनिता : शौर्य त्यादिवशी मला विचारत होता.. विरच्या मम्मीने तुझ्यामुळे तर सुसाईड नाही ना केलं?? हे सगळं ऐकुन तुला पण असच वाटत का तिने माझ्यामुळे अस काही केलं??

(अनिता रडतच विराजला विचारते)

विराज : मम्मा प्लिज..  शौर्यच्या बोलण्याचा नको विचार करुस. तुझ्यामुळे मम्मीने अस नाही काही केलं. डॅड खरंच खुप वाईट होता.. त्यात मोठे पप्पा पण..

अनिता : मी पण खुप चुकली जे मी शेखरला नाही समजु शकले..

( अनिता रडु लागते )

विराज : मम्मा जे झालं ते झालं.. प्लिज नको रडुस अस.. (विराज अनिताला मिठी मारतच शांत करतच बोलला..) मला नाही आवडत तु अस रडलेलं.. आणि डॅड एवढं वाईट वागुण सुद्धा तु माझ्याशी नेहमी चांगलंच वागलीस.. माझ्या बाबतीत तु कधी आणि कुठेच कमी नाही पडलीस.. आय नॉ काही निर्णय तुझे चुकले बट तु आता ते चँज नाही ना करू शकत.. विसरून जा सगळं..

विराज अनिताची समजुत काढत तिला शांत करतो..

दोघेही सुरजच्या रूममधुन बाहेर येतात.. अनिता शौर्य नक्की झोपलाय का ह्याची खात्री करायला विराजला सोबत घेऊनच त्याच्या रूममध्ये जाते. शौर्य खरच गाढ झोपला असतो.. बाजुलाच विराजची हॉस्पिटलमधली फाईल असते त्या फाईलवर विराजची औषध आणि सोबतच एक नॉट त्याने चिकटवली असते.. Pls take after the lunch.. and don't wake me up.. शौर्यने लिहिलेली नॉट बघुन विराज आणि अनिता एकमेकांकडे बघत हसु लागतात.. 

जवळपास चारच्या सुमारास शौर्य उठतो.. तोंडावर पाणी मारतच फ्रेश होतो.. घड्याळात बघतो तर चार वाजले असतात.. चार वाजता रॉबिनने त्याला हॉटेलमध्ये बोलवलं असत जिथे ते नैतिकचा बर्थडे सेलिब्रेट करणार होते.. घाई घाईतच बेडवर आपला मोबाईल शोधतो.. बट मोबाईल कुठे दिसत नाही.. मग त्याला आठवत की आपला मोबाईल विरने घेतला आहे ते.. तसाच विराजच्या रूममध्ये जातो.. 

विराज अनितासोबत सुरजच्या रूममध्ये भेटलेला त्याच्या फॅमिली सोबतचा जुना अल्बम बघत बसला असतो.. 

विराज : तुला माझी मम्मी आणि स्वराजला बघायच होत ना?? ये इथे..

शौर्य रूममध्ये येताच विराज त्याला आपल्या बाजुला बसायला बोलवतो..

शौर्य विराज सोबत त्याच्या मम्मी आणि फॅमिलीचे फोटॉ बघत राहतो..

शौर्य : मम्मा विरची मम्मी खुप क्युट दिसायची ना.. विर थोडा फार मम्मीसारखाच आहे दिसायला.. आणि स्वराज विरच्या डॅडसारखा.. 

अनिता : हम्मम.. आता तु बस ह्याच्यासोबत मला एक काम आहे.. अस बोलुन अनिता निघते..

शौर्यच अनिताच्या बोलण्याकडे लक्ष नसत तो फोटॉ बघण्यात गुंतला असतो..

विराजला आपल्या आईसोबतचे जुने फोटॉ बघुन थोडं भरून येत असत.. त्याला जेवढं आठवत असत त्या एक एक आठवणी तो शौर्यला सांगत असतो.. विराज शौर्यच्या नकळत आपल्या डोळ्यांतुन येणार पाणी पुसत असतो..

शौर्य : आठवण येतेय ना विर??

विराज काहीच बोलत नाही...

शौर्य : तुझ्या मम्मीने का सुसाईड केलं विर??

विराज : डॅड टॉर्चर करायचा.. मोठ्या पप्पांना मुलं नव्हतं मग तो स्वराजला त्यांना द्यायला बोलत होता.. त्यावरून मारायचा वैगेरे.. त्यात डॅड डायवोर्स देणार बोलला तिला.. आणि मोठे पप्पा पण त्रास द्यायचे तिला.. डायवोर्स दिल्यावर कुठे जाणार होती ती.. आणि मी तुला बोललो ना आम्ही स्कुलमधुन आल्यावर डॅडने मारल्याचे निशाण असायचे तिच्या अंगावर एवढं मारायचा तो तिला. कंटाळलेली ती ह्या सगळ्याला..

शौर्य : हे सगळ तुला मम्मा ने सांगितल??

विराज : हो..

शौर्य : म्हणजे मम्माल माहीत होत तुझा डॅड असा आहे ते? मग का लग्न केलं त्याच्यासोबत??

(शौर्य अस बोलताच विराज एकटक त्याच्याकडे बघु लागतो)

विराज : डॅडशी लग्न केलं हा मम्माचा डिसीजन करेक्ट वाटत होताना.. मग तु अस का बोलतोयस आता??

शौर्य : मी विचारतोय रे फक्त?? एवढं माहीत असुन तिने का लग्न केलं?? 

विराज : नको ना जास्त विचार करुस.. आणि हा मोबाईल धर तुझा.. रॉबिन फोन करत होता..

शौर्य : तु मला सांग आधी.. एवढं मम्माला डॅड बद्दल माहिती असुन पण तिने का लग्न केलं??

विराज : नाही माहीत मला.

शौर्य : खोट नको बोलुस..

विराज : मी का खोटं बोलु??

शौर्य : जस मी तुला विचारलं तस तु मम्माला विचारलं असशीलच.. आणि मम्माने तुला सांगितलं असणार.. आय नॉ..

विराज : शौर्य काही गोष्टी अश्या असतात ना त्या आपल्याला न कळलेल्या चांगल्या असतात.. कारण त्या गोष्टींनी आपल्या मनावर आणि नात्यांवर परिणाम होतो.. परत हा विषय तु माझ्यापुढे काढू नकोस..

शौर्य : तु चुकीचा विचार करतोयस विर.. जर प्रत्येक गोष्ट योग्य वेळेला कळली तर कदाचित त्याचा कोणताच परिणाम होत नाही.. आणि मम्मा तुझ्यासोबत आतमध्ये काय बोलली हे मला कळेलच.. 

विराज : तुला कस कळेल??

शौर्य : Don't forgot I am SSD. Son of Mr SSD means शेखर शरद देशमुख.. जिथे तुमची विचार करण्याची शक्ती संपते तिथुन माझी विचार करायची शक्ती चालु होते.. अस हवं तर समजु शकतो.. पण त्यासाठी मी तुलाच थेंक्स बोलेल.. आता मला खुप लेट झालाय मी निघतो.. आणि मम्मा तुला काय बोलली हे मी तुला सांगेल लवकरच.. फक्त आजचा दिवस जाऊ दे.. आज खरच बिजी आहे मी..

विराज : शौर्य.. इथे बस बघु..

(विराज शौर्यला जबरदस्ती आपल्या समोर बसवतो)

शौर्य : विर मला चार वाजता तिथे हॉटेलमध्ये जायच होत आता पाच वाजले म्हणजे 6 वाजता मी पोहचेल तिथे.. आर्यन वैगैरे भडकले असतील माझ्यावर..

विराज : अजुन थोडा लेट गेलास तर काही फरक नाही पडत.  मला माझ्या प्रश्नाच उत्तर दे नि जा. तिथे मम्मा मला जे बोलत होती ते तुला कस माहिती पडणार शौर्य?? 

शौर्य : तु एवढं का घाबरतोयस..? अजुन नाही माहिती पडलंय मला.. 

विराज : मी जे विचारतो ते सांग..

शौर्य : ते मला फक्त तुझे एक्सप्रेशन बघायचे होते म्हणुन बोललो.. तु जेवढं आता घाबरलास त्यावरून नक्की की मम्मा काही तरी चुकीच वागलीय.. जे ती मला नाही सांगु शकत.. जस काका बोलला तस..

विराज : अस अजिबात नाही..

शौर्य : ते कळेलच मला.. मी आता जाऊ..??

विराज : रात्री 11 च्या आत घरी यायच..

शौर्य : एकतर एवढ्या लेट जातोय.. त्यात मी काही मदत पण नाही केली तिथे.. मला नाही माहीत मला किती वाजतील ते..

विराज : अकरा नंतर जर घरी आलास तर तु आहेस नि मी. एवढं लक्षात ठेवुन जा.. जास्त रात्री बाहेर फिरत जायच नाही हा शौर्य मी आधीच सांगतोय तुला.. 

शौर्य : तुझी औषध माझ्या रूममध्ये काढुन ठेवलीत ती घे आणि झोप.. अकराच्या आत यायचा प्रयन्त मी नक्की करेल..

विराज : बाय दि वे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज बघितल्या बघितल्या मला फोन कर..

शौर्य : काय??

विराज : ब्रो इट्स सरप्राईज.. अस कस सांगु मी तुला?? सरप्राईज बघुन फोन कर.. तस पण तुला फोन करावाच लागेल..

काय सरप्राईज असेल असा विचार करत शौर्य विराजकडे बघतच त्याच्या रूममधुन बाहेर पडतो..


क्रमशः

©भावना विनेश भुतल

(काय असेल शौर्यसाठीच सरप्राईज?? शौर्य विराजला बोलला तस त्याला खरच कळेल विराज अनिता त्या रूममध्ये काय बोलत होते ते?? पाहुया पुढील भागात)

(मनोगत

कथेचे आज 100 भाग पुर्ण होतायत त्याबद्दल खुप छान वाटतंय.. तुम्ही वाचक मित्रमंडळींनी सुद्धा खुप छान प्रतिसाद दिल्याने ही कथा 100 भागापर्यंत मी लिहु शकले.. त्याबाबद्दल तुमचे पण खुप आभार.. कथेतील प्रत्येक पात्रात तुम्ही खुप छान गुंतत चाललात हे बघुन पण छान वाटत.. असाच प्रतिसाद ह्या पुढे ही द्या हीच अपेक्षा..)

🎭 Series Post

View all