Jan 23, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 5

Read Later
आत्मसन्मान 5


हळूहळू आकाश आणि सुमनचे प्रेम खुलत गेले. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. त्यांना एकमेकांशिवाय करमतच नव्हते. एक दिवस आकाश काॅलेजलाच आला नाही, तेव्हा सुमनला दिवसभर करमले नाही. कोमेजलेल्या फुलाप्रमाणे उदास होती. तिचे मन कशातच लागेना. ती शांतच बसली होती. आता संध्याकाळ झाली, तिची घरी जायची वेळ झाली म्हणून सुमन सगळं काही आवरून बाहेर पडणार इतक्यात समोर आकाश दिसला. तिच्या डोळ्यांवर तिचा विश्वासच बसला नाही. ती डोळे चोळू लागली. तरीही तिथे आकाशच होता. अनपेक्षित पणे राजसाची वाट पाहताना तो नजरेस पडावा आणि मन प्रफुल्लित व्हावे असे तिचे झाले होते. ती धावत जाऊन आकाशच्या मिठीत विसावली. तिला आजूबाजूचे काहीच भान राहिले नाही. ती आकाशच्या मिठीत बेभान होऊन विसावली. बराच वेळ ती तशीच होती. नंतर भानावर आल्यावर लगेच बाजूला झाली आणि तिने लाजेने मान खाली घातली. लाल लाली गालावर शोभून दिसत होती. ते पाहून आकाशही सुखावला.

"सुमन, तुला एक विचारू. अगदी खरं खरं उत्तर द्यायचं." आकाश

सुमनने फक्त मानेनेच होकारार्थी मान हलवली. तेव्हा आकाश म्हणाला, "तुझं खरच माझ्यावर मनापासून प्रेम आहे? तू माझ्याशी लग्न करशील?" आकाशने त्याच्या मनातील भावनांना मुक्त वाट दिली. तो सुमनच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहू लागला.

आकाशने असे विचारल्यावर सुमनच्या छातीत धडधड वाजू लागले. तिचे हृदय अगदी जोरात वाजू लागले. तिला काय बोलावे? ते समजेना. तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्या समोर होता, त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती, पण आता या क्षणाला तिला काय बोलावे हे कळेना? ती बावरून गेली, त्या क्षणात गुंतून गेली, सुखावून गेली. आपल्या प्रेमाचं कोणीतरी आपल्याला आयुष्यभरासाठी मिळतंच यासाठी ती सुखावली होती, आता आपले आयुष्य आनंदी होणार म्हणून आनंदून गेली होती आणि आकाशने असे विचारल्यावर तिच्या डोळ्यातून पूर ओसंडून वाहू लागला. तिला काय बोलावे तेच कळेना? तिच्या या मनःस्थिती कडे पाहून आकाश थोडा भांबावला. आपण काही चुकीचे बोललो का? असे त्यांना वाटू लागले आणि तो गांगरून गेला.

"सुमन तुझ्या मनाविरुद्ध काही होणार नाही. तुझ्या मनात जे काही असेल ते सांग मला. मी तुझ्याकडे माझी पत्नी या नजरेनेच पाहत आहे आणि पाहणार आहे. तुझ्या मनात असेल तर लगेच आपण लग्न करू, असेही माझे शेवटचं वर्ष आहे आणि मला कुठेही नोकरी मिळेल. नोकरी मिळाली की आपण लग्न करू. मी तुला रीतसर आई बाबांना घेऊन मागणी घालायला येईन. सगळं काही तुझ्या मर्जीने होईल. माझी कोणतीच जबरदस्ती नाही." आकाशने सुमनला स्पष्टच सांगितले. तसा आकाश स्पष्ट बोलायचा. त्याचे मनात एक बाहेर एक असे कधी नसायचे. तसाच तो खूप समजूतदार होता, म्हणूनच त्याने सुमनच्या मनाची अवस्था समजून तिला म्हणाला.

सुमनने आकाशचे बोलणे ऐकून फक्त होकारार्थी मान हलवली आणि ती तिथून निघून घरी गेली. घरी गेल्यावर \"आकाश किती आपल्याशी बोलत होता? आणि आपण त्याच्याशी काहीच बोललो नाही. वेड्यासारखे फक्त रडतच बसलो. त्याला काय वाटले असेल?\" असे म्हणून ती सारखी कपाळ बडवून घेत होती. आता माझे स्वप्न पूर्ण होणार. ज्या प्रेमाची मी इतक्या आशेने वाट पाहत होते ते आता पूर्ण होणार म्हणून ती खूप खूश होती. सुमनच्या आयुष्यात आकाश एक आनंद घेऊन आला होता.

पण नंतर तिला एक प्रकारे भीती वाटू लागली. जर त्याच्या आईवडिलांनी नकार दिला तर आणि माझे आई-वडील या लग्नाला तयार झालेच नाहीत तर.. मग आम्ही दोघे काय करायचे? त्याच्या घरातून एखाद्या वेळेस होकार येईल पण माझे आई-बाबा या लग्नाला कधीच होणार नाहीत. त्यांनी ठरवलेल्या मुलाशीच मी लग्न करायचे असा त्यांनी अट्टाहास असणार. आजपर्यंत आमच्या घराण्यात कोणीच प्रेमविवाह गेला नाही, तर ते आमच्या लग्नाला होकार कसे बर देतील? असा विचार सुमनच्या मनात सारखा घोळत होता. आता काय बरे करावे? आकाशला तर मी हो पण म्हणाले नाही नाही पण म्हणाले नाही. उगीच खुळ्यासारखे त्याच्यासमोर रडत बसले. आता काय करायचे? त्याला तर मी नाही म्हणाले असं वाटत असेल तर.. अशा विचारांच्या गर्तेत सुमन गढून गेली. वेगवेगळ्या विचारांनी ती मनातून गोंधळून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून सुमन कॉलेजला गेली. तिथे गेल्यावर तिने पाहिले तर आकाश तिच्या आधीच आला होता. दोघांनी एकमेकांकडे बघून एक छोटीशी स्माईल दिले आणि सुमन लेक्चरला जाऊन बसली. आकाश मात्र बाहेर ग्राउंड वर त्याच्या मित्रांच्या घोळक्यात बसून होता. लेक्चरमध्ये काही केल्यास सुमनचे मन लागेना. काही केले तरी आकाशचा विचार तिच्या मनातून जात नव्हता. समोर सर काही बोलत आहेत त्याच्याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते. ती वही मध्ये फक्त गोल गोल गोल करत बसली होती. उगीचच लेक्चरला येऊन बसले बाहेर बसले असते तर बरे झाले असते असे तिला सारखे वाटत होते. तरीही ती तशीच बसून राहिली. बेल झाल्यानंतर बॅग घेऊन बाहेर गेली. कधीही लेक्चर मधून सुमन अशी गेली नाही. आज का गेली? असा प्रश्न तिच्या मैत्रिणींना पडला.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून सुमन कॉलेजला गेली. तिथे गेल्यावर तिने पाहिले तर आकाश तिच्या आधीच आला होता. दोघांनी एकमेकांकडे बघून एक छोटीशी स्माईल दिले आणि सुमन लेक्चरला जाऊन बसली. आकाश मात्र बाहेर ग्राउंड वर त्याच्या मित्रांच्या घोळक्यात बसून होता. लेक्चरमध्ये काही केल्यास सुमनचे मन लागेना. काही केले तरी आकाशचा विचार तिच्या मनातून जात नव्हता. समोर सर काही बोलत आहेत त्याच्याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते. ती वही मध्ये फक्त गोल गोल गोल करत बसली होती. उगीचच लेक्चरला येऊन बसले बाहेर बसले असते तर बरे झाले असते असे तिला सारखे वाटत होते. तरीही ती तशीच बसून राहिली. बेल झाल्यानंतर बॅग घेऊन बाहेर गेली. कधीही लेक्चर मधून सुमन अशी गेली नाही. आज का गेली? असा प्रश्न तिच्या मैत्रिणींना पडला.

सुमन बाहेर आली तेव्हा आकाश अजूनही त्याच्या मित्रांच्या घोळक्यात होता. सुमनला आकाशने डोळ्यानेच इशारा केला आणि ते दोघेही कॉलेजच्या बाहेर पडले. ते एका बागेत जाऊन बसले. बराच वेळ दोघेही शांत होते. मग आकाशनेच बोलायला सुरुवात केली.

"काय झालं? तू इतकी शांत का बसली आहेस? काही प्रॉब्लेम झालाय का?" आकाशला काहीच समजेना. सुमन अशी शांत का आहे? हिच्या मनात नक्की काय चालू आहे? अशी काॅलेजमधून मधेच का आली? त्याच्या मनात अशा असंख्य प्रश्नांनी थैमान घातले होते.

सुमन मानेनेच नाही म्हणाली.

"मग तू अशी शांत का बसली आहेस? काही तरी नक्कीच झालं आहे. तुझं माझ्यावर प्रेम नाही का? बर ठीक आहे, तसं असेल तर सांग मी जातो." असे म्हणून आकाश उठू लागला. आता आकाशच्या मनात शंकेने स्थान घेतले. तिच्या मनात जर मी नसेन तर या एकतर्फी प्रेमाचा काय उपयोग?

आकाश जात असताना आपले हृदय कुठेतरी जात आहे असे तिला वाटू लागले आणि तिने तिच्याही नकळत त्याचा हात पकडला. हात पकडल्यानंतर आकाशला आपल्या हातावरुन मोरपीस फिरत आहे की काय असे वाटले. त्याने वळून पाहिले तर सुमनने हात पकडला होता. तो गालातच हसला आणि लगेच खाली बसला.

"काय झालं? तू काही बोलतच नाहीस आणि मी काय करू?" परत आकाश म्हणाला. सुमन काहीच बोलेना म्हणून तो चलबिचल झाला होता.

"तसे काही नाही रे, माझ्या मनातले भाव तुला मी न सांगताच समजते, इतर गोष्टी समजतात तर मग ही गोष्ट का नाही समजत?" सुमन म्हणाली. तिचेही त्याच्यावर तितकेच खरे प्रेम आहे हे ती न सांगताच त्याला समजावे अशी तिची धारणा होती.

"मला समजते, पण तू तुझ्या तोंडाने सांगावेस असे मला वाटते, तू जर व्यक्त झाली नाहीस तर मी काय गृहीत धरायचे? म्हणून तुला विचारत आहे. तू बोल, व्यक्त हो, तुझ्या भावना व्यक्त कर अशी शांत बसू नकोस." आकाश तिला समजावत होता. कारण त्याला तिच्या तोंडून काय ते स्पष्ट ऐकायचे होते.

"तसे काही नाही रे आकाश. मला तू आवडतोस. पण तुझ्या घरचे माझ्या घरचे लग्नाला तयार व्हायला हवेत ना. तुझ्या घरचे एखाद्या वेळेस तयार होतील, पण माझ्या घरचे तयार होतील की नाही यात शंका आहे. ही एकच काळजी मला लागून राहिली आहे. तेव्हा काय करायचे?" सुमनने तिच्या मनातील शंका बोलून दाखवली.

"मग आपण पळून जायचं." आकाश क्षणाचाही विलंब न लावता म्हणाला.

"काय?" सुमन थोडसं घाबरतच म्हणाली. इतका मोठा निर्णय कसा घ्यायचा याची तिला भीती वाटत होती.

"हो. आपल्या सुखासाठी, आपल्या प्रेमासाठी हे करावंच लागेल. आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही, जर कारण तसं असेल तर आपल्याला पळून जाणे हा एकच मार्ग दिसतोय. यात मला घरच्यांना सोडून जावे किंवा त्यांचा आशिर्वाद न घेता जाणे हे पटत नाही. पण साध्या साध्या कारणांवरून जर त्यांना आपले प्रेम पटले नाही तर हाच एक पर्याय उरतो असे मला वाटते. जर तुझी इच्छा असेल तरच." आकाश थोडसं स्पष्टच बोलला. आकाशचे खरे प्रेम होते. सुमनमध्ये बोट ठेवण्यासारखेच काहीच नव्हते. पण जर घरच्यांनी नकार दिला तर पळून जाण्यात गैर काय? असे त्याला वाटत होते.

"मला खूप भीती वाटते. आजपर्यंत आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध कुठे गेले ही नाही आणि आता तुझ्यासोबत पळून जायचे म्हणजे खूप भीती वाटते रे. त्यांच्या आशीर्वादाने आपले लग्न झाले तर बरे होईल." सुमन थोडीशी घाबरतच म्हणाली. सुमनचेही बरोबरच आहे. आजपर्यंत ती आईवडीलांच्या इच्छेनेच जगत होती. ते म्हणतील तीच पूर्व दिशा होती. स्वतःच्या इच्छेने कधी साधा ड्रेसही घेतला नव्हता तर आता इतका मोठा लग्नाचा निर्णय कसा घ्यायचा? असे तिला वाटत होते.

"मलाही तसेच वाटते. जर का त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर आपण आपल्या आयुष्यात सुखी राहू. पण जर त्यांना हे लग्न मान्य नसेल तर आपण काय करणार? तसेही तुझ्या माझ्यामध्ये नावं ठेवायला किंवा बोट ठेवायला अशी कोणती जागा नाही. पण जर त्यांना मान्य नसेल काहीतरी कारण सबब सांगत असतील तर त्याला आपण तरी काय करायचं? तू मनाची तयारी आत्तापासूनच करून घे म्हणजे ऐन वेळी काही अडचण येणार नाही." आकाश तिला समजावत होता.

आकाश आणि सुमन खरंच पळून जाऊन लग्न करतील का? की त्यांना घरचे या लग्नासाठी संमती देतील. हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..