"तुमचीच मुलगी आहे तर मग तिच्या जन्मखुणा तुम्हाला नक्कीच माहीत असतील, त्या तुम्ही सांगा, जर बरोबर असतील तर आम्ही तुमचे म्हणणे खरे आहे असे समजू." सावंत सुद्धा तसेच म्हणाले.
"अहो, इतक्या कमी वेळात जन्म खुणा कशा लक्षात येतील आणि तसेही तिच्या अंगावर काहीच जन्म खूण नाही." ती बाई म्हणाली
"का नाही येणार? मला तर एका दिवसात समजले. जेव्हा ही मुलगी मिळाली तेव्हा बारा दिवसांची होती. बारा दिवस तुमच्या जवळ असुनही तुम्हाला कसे समजले नाही? जन्म खूण अगदी दिसण्यासारखी आहे. शिवाय मुलीला जन्म देऊन साधारण पंधरा दिवस झाले असतील, मग ओल्या अंगाने तुम्ही असे कसे फिरत आहात? डोक्याला स्कार्फ पण नाही की अंगात स्वेटर नाही. कशावरून तुमची डिलिव्हरी झाली आहे. तुम्ही साफ खोटे बोलत आहात." हे सुमन चे वाक्य ऐकून ते नवरा-बायको घाबरले. त्यांचे सत्य आता बाहेर पडले होते.
"अहो आहे ना! जन्म खूण माझ्या लक्षात आहे, तिच्या हातावर आहे बघा, मी बरोबर सांगितलं ना! आता पटली का ओळख? मी तिची आईच आहे ते." ती बाई रोखठोक बोलत होती.
"नाही. तिच्या हातावर कसलीच जन्म खून नाही. तुम्ही खोटे बोलत आहात. सावंत सर, तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. म्हणजे कोण कोठे बोलत आहे? याची तुम्हाला सत्यता पटेल." सुमनचे हे बोलणे ऐकून सावंत सरांनी लेडिज पोलिसांना त्या मुलीची जन्म कोण कोठे आहे? हे पाहण्यासाठी पाठवले. तेव्हा सुमन ने दाखवले की तिच्या उजव्या पायावर मोठी लास होती. जी स्पष्ट आणि उठून दिसत होती. कोणत्याही आईलाच काय व्यक्तीला हे सहज दिसण्यासारखे होते. मग या बाईला ती दिसले कसे नाही? याचा अर्थ ती मुलगी या बाईची नव्हतीच. मग कोण होती ती बाई?
लेडीज पोलिसांनी सावंतांना जाऊन सत्य काय आहे ते सांगितले. तेव्हा सावंत म्हणाले, "सुमनताई सॉरी, आमचं चुकलंच, सगळी पडताळणी करून आम्ही इथे यायला हवे होतो. चला, आता तुमची शाळा घेतो मी." असे म्हणून सावंत त्या जोडप्याला घेऊन पोलीस स्टेशनला गेले.
"आई, तू किती ग्रेट आहेस ग! प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुला इतकं बळ येतच कुठून? मी तर पूर्ण घाबरूनच गेले होते. पण तू अगदी व्यवस्थित परिस्थिती हाताळलीस. लव यू आई." असे म्हणून स्वरांने सुमनला मिठी मारली.
"बळ आपोआप येतंच ग, बरं ते सगळं सोड मला तू सांग, तू किती दिवसांसाठी आली आहेस? जावईबापू तुला द्यायला येणार आहेत की तुझी तू जाणार आहेस." सुमनचे हे बोलणे ऐकून स्वरा शांत झाली.
"काय ग आई? मी आत्ताच आले आहे आणि तू जायच्या गोष्टी करतेस होय! मला समाधानाने दोन दिवस राहू पण देत नाहीस, परी आल्यापासून आता मी तुझी लाडकी राहिले नाही, ठीक आहे मी आत्ताच जाते." स्वरा थोडीशी चिडक्या सुरात म्हणाली.
"बरं बाई, काही म्हणत नाही, रहा तुला हवे तितके दिवस. माझी काही हरकत नाही." सुमन लडिवाळपणे म्हणाली.
"आता कसे बोललीस?" स्वरा हसत म्हणाली
आईकडे गेल्यापासून स्वरा रोज कॉलेजला जाऊ लागली. पृथ्वी मिटींगला गेल्यापासून स्वराला दिवसातून एकदा फोन करायचा. स्वराने आईकडे आल्याचे पृथ्वीला सांगितले नाही. ती नेहमीप्रमाणे त्याच्याशी बोलायची. पण तिने ही गोष्ट त्याच्या पासून लपवून ठेवली. त्याच्या डोक्याला टेन्शन नको असा विचार तिने केला. पृथ्वीने तो घरी येणार आहे हे स्वराला सांगितले नाही. कारण तो तिला सरप्राईज देणार होता. त्याचे सगळे काम संपले होते, तो आता घरी येणार होता. त्याने ही गोष्ट फक्त आई बाबांना सांगितली, स्वरा मात्र त्याचे काम अजून असेल या विचारात होती. ती नेहमीप्रमाणे अनघासोबत बसने कॉलेजला जायची. तिचे रुटीन नेहमीसारखे चालूच होते.
स्वरा नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती. मधल्या ब्रेकमध्ये ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिला गेटपाशी पृथ्वी दिसला. आपल्याला असे का भास होत आहेत? आता तर लग्न झाले आहे तरीसुद्धा पृथ्वी दारात आला आहे असे का दिसत आहे? स्वरा मनाशीच म्हणाली आणि तिने डोळे चोळून परत पाहिले, तर तिला पृथ्वी तेथे हसत उभा असलेला दिसला. तिने स्वतःला चिमटा काढून घेतला, तरीही तिथे पृथ्वी च दिसला. त्याने येणार आहे असे काहीच सांगितले नव्हते तर मग हा कसा आला? की हे स्वप्न आहे असे ती मनात म्हणत होती. इतक्यात अनघा तिथे आली.
स्वराने तिला विचारले की, समोर गेटपाशी तुला पृथ्वी दिसतो का? ते पाहून अनघा हसून म्हणाली, "अगं वेडी झालीस का काय तू? समोर पृथ्वी तर आहे! तुला स्वप्न वाटत आहे की काय? तो खरंच आलाय भेट जा त्याला." असे म्हणून अनघाने तिला पाठवून दिले.
अनघाचे हे बोलणे ऐकून स्वरा तिथे पळत गेली. समोरच पृथ्वीला पाहून तिला खूप आनंद झाला. तिने लगेच जाऊन त्याला मिठी मारली. ते पाहून आजूबाजूचे लोक त्या दोघांकडे पाहू लागले.
"स्वरा हे कॉलेज आहे आणि इथे सगळे जण आपल्या कडे पाहत आहेत." पृथ्वी चेष्टेने म्हणाला. ते पाहून स्वरा लगेच त्याच्यापासून बाजूला झाली.
"तू येणार आहेस हे मला सांगितला का नाहीस?" स्वरा
"मग तुझ्या चेहऱ्यावरचा इतका आनंद मला दिसला असता का, हेच तर मला पाहायचं होतं म्हणूनच मी तुला सांगितलो नाही." पृथ्वीचे हे बोलणे ऐकून स्वर गालातच लाजली.
"हाय मी घायाळ झालो, तू लाजल्यावर खूप गोड दिसतेस यार." पृथ्वी
"चल काहीतरीच हं." स्वरा
"खरंच ग." पृथ्वी
"बरं." स्वरा हसतच म्हणाली.
"चल आता घरी जाऊ. उद्या ये आता काॅलेज ला. आता कॉलेज सुटायची वेळ झाली आहे, दोन तासांनी कॉलेज सुटेलच. आजच्या दिवस लवकर चल." असे पृथ्वी म्हणाला, तेव्हा स्वराच्या डोक्यात आले की आपण तर आता आईकडे राहत आहोत, हे पृथ्वीला माहीत नाही. मग आता घरी जायचे कसे? स्वरा या विचारात असतानाच पृथ्वी म्हणाला, "काय मॅडम कुठे हरवलात? चला ना! जायचं ना घरी!"
"पृथ्वी, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." स्वरा दबकतच म्हणाली.
"बोल ना." पृथ्वी
"तू इथे नव्हतास ना! तेव्हा खूप काही घडले आहे, तुझ्या आई बाबांनी मला कॉलेजला जाऊ दिले नाही. रोज मी कॉलेजला जायला निघाले की काही ना काही कारण काढून मला घरातच बसवत होते, पाच सहा दिवस असेच घडल्यानंतर मी तिथून आईकडे राहायला आले आहे. हे तुला सांगणार होते पण तू तिथे कामासाठी गेला होतास त्यामुळे तुझ्या डोक्याला टेन्शन नको म्हणून मी काही बोलले नाही." स्वराने पृथ्वीला सगळी हकीकत सांगितली.
स्वरा चे बोलणे ऐकून पृथ्वीला धक्काच बसला. त्याला काय बोलावे? ते समजेना. आपले आई-बाबा चुकलेच होते पण स्वरांने सुद्धा थोडे समजून घ्यायला हवे होते. आपण इथे येऊ पर्यंत ती घरात राहिली असती तर बिघडले काय असते? टाळी एका हाताने वाजत नाही. आता मी कोणाची बाजू घेऊ आणि कोणाची नको? या अवघड पेचा मध्ये मी अडकलो आहे. काय करावे? हे पृथ्वीला समजेना.
"बर ठीक आहे. चल बॅग घेऊन ये, मी काय करायचं बघतो?" असे पृथ्वी म्हणाला. तेव्हा स्वरा जाऊन बॅग घेऊन आली. स्वरा बॅग घेऊन आल्यानंतर पृथ्वी ने गाडी चालू केली ती डायरेक्ट सुमनच्या घरीच आले. पृथ्वीने सुमनला सगळी हकिकत सांगितली. तेव्हा सुमन दोन मिनिटं शांत बसली.
"स्वरा बाळा, तू जो काही निर्णय घेतलास तो अगदी घाईगडबडीने घेतलास. समोरच्या व्यक्तीला अगदी चांगल्या गोड शब्दात समजावून सांगायचे, जर ती व्यक्ती मानली नाही, तयार झाली नाही तर मग इतर आपली जवळची व्यक्ती असते त्यांना सांगून पाहायचे, तरिही परिस्थिती हाताबाहेर गेली तरच मग बोलायचे. तू तर डायरेक्ट वार करून आलीस! सासु-सासरे आई-वडीलां समान असतात अशी शिकवण मी तुला दिली आहे ना! मग तू असे का वागलीस? त्यांना गोड शब्दात सांगितले असतेस तर ते तयार झाले असते ना! तू येथे चुकलीच बाळा, सुरुवातीलाच त्यांनी लग्नानंतर शिक्षण घेऊ दे असे म्हणाले होते, मग तू थोडे दिवस शांत बसायला हवे होतीस. पृथ्वी आल्यानंतर मग तू कॉलेजला जायला सुरुवात केली असतीस तर ते काहीच बोलले नसते." सुमनने स्वराला समजावून सांगितले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा