"तू स्वरा ना! सुमन ची मुलगी. अगं, त्या शरयू ने तुझ्या आईवर म्हणे बांगड्या चोरल्याचा आळ घातला होता. पण हा भला माणूस तो मुलगा आहे ना! त्याने येऊन अगदी देवासारखे तुझ्या आईला वाचवले. या शरयू च्या नादी लागून आम्ही सुद्धा तुझ्या आईला नाही नाही ते बोललो. पण शेवटी सत्याचाच विजय होतो तसा तुझ्या आईचा विजय झाला आणि तिच्या मदतीला हा मुलगा देखील धावून आला. खरंच हा मुलगा खूप चांगला आहे." असे म्हणून ती बाई पृथ्वीचे कौतुक करत होती. ते पाहून स्वराला क्षणभर काही समजलेच नाही.
"खरंच पृथ्वी इतका चांगला आहे का? तो आईसाठी खरंच मदतीला आला आहे की आमच्या मनात त्याचे स्थान निर्माण करण्यासाठी आला आहे. त्याच्या आई-बाबांनी तर त्याला पाठवले नसेल ना!" असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात घोळू लागले.
ती तशीच घरी गेली. घरी आल्यानंतर ती फ्रेश होऊन त्यांची वाट पाहत थांबली. इकडे सुमनने देखील शरयूला माफ करून पृथ्वीला घेऊन ती घरी आली.
"ये पृथ्वी, तुझे आभार कसे मानावे हेच समजेना? तू तिथे देवासारखा धावून आलास. खरं तर हा आळ माझ्यावर आल्यापासून मला क्षणभर सुद्धा शांतता लाभली नाही, मला रात्री झोप सुद्धा लागली नाही. मी इतकी व्यवस्थित आणि जपून वागून सुद्धा असा आळ माझ्यावर यावा! खरंच माझ्या स्वाभिमानाला धक्का लागला. पण तू येऊन मला मदत केलास! तुझे खूप उपकार झाले बघ." असे म्हणून सुमन पृथ्वीचे आभार मानत होती.
"काकू तुम्ही आभार मागण्याची काही प्रश्न नाही. हे सत्य माहित असताना मी शांत बसणे हे माझ्या मनाविरुद्ध होते. काल रात्री माझ्या मित्राने सोहमने मला फोन केला होता आणि बोलता बोलता तो म्हणाला की सुधीर त्याच्या आईच्या बांगड्या सोनाराकडे घेऊन गेला होता. पण त्याच्या पावत्या नसल्यामुळे सोनार ने त्या बांगड्या घेतल्या नाहीत." हे ऐकून मला काल दुपारी झालेली घटना आठवली आणि तेव्हाच ठरवले कि इथे येऊन सत्य काय आहे? ते सर्वांना सांगायचे.
"मग तू इथे सत्य का बोलला नाहीस? त्या सुधीरची चूक तू का झाकून ठेवलास? त्याच्या आईला मुलगा कसा आहे? हे समजायला हवे. तो बिघडला तर.." सुमन
"नाही काकू, तो बिघडणार नाही. आता मी त्याला नक्कीच धडा शिकवेन. त्याची चूक कोठे आणि कशी आहे? हे सारं आहे मला माहित आहे. त्याने हे मुद्दामहून नाही केले. चुकून झाले. एका मित्राची महत्वाची वस्तू त्याच्या सुधीर च्या हातून हरवली. मग त्या मित्राने सुधीरला काहीही करून ती वस्तू देण्यास सांगितले. म्हणून सुधीरने हे पाऊल उचलले. जे काही झाले ते नकळत झाले. यात कुणाचीच चूक नाही. फक्त सुधीरने आईबाबांना विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगायला हवी होती. आता त्याला त्याची चूक समजली. त्यामुळे तो आता परत असे काही वागणार नाही. शिवाय तो माझी माफी मागत होता म्हणून मग मी त्याला सोडून दिले. उगीच त्याच्याबद्दल त्याच्या आईला सांगितले तर त्यांना वाईट वाटेल. म्हणून मी काही बोललो नाही." या उत्तराने सुमनला पृथ्वी बद्दल आदर वाटू लागला.
सुमनने पृथ्वी ला चहा बनवून दिला. तिला समजले होते की स्वरा सुध्दा आली आहे म्हणून तिने स्वराला सुध्दा चहा बनवला होता.
"स्वरा, तुला चहा बनवला आहे ये बाळ." सुमनने स्वराला हाक मारली. तेव्हा लगेच स्वरा बाहेर आली. जे काही घडले ते पाहून स्वराच्या मनात परिवर्तन झाले. तिला आलेला पृथ्वी चा राग कुठल्या कुठे पळून गेला. खरंच पृथ्वी चांगला मुलगा आहे असे तिला वाटू लागले. पुन्हा तिच्या मनामध्ये त्याच्याविषयीची भावना बदलली.
"स्वरा, तुला चहा बनवला आहे ये बाळ." सुमनने स्वराला हाक मारली. तेव्हा लगेच स्वरा बाहेर आली. जे काही घडले ते पाहून स्वराच्या मनात परिवर्तन झाले. तिला आलेला पृथ्वी चा राग कुठल्या कुठे पळून गेला. खरंच पृथ्वी चांगला मुलगा आहे असे तिला वाटू लागले. पुन्हा तिच्या मनामध्ये त्याच्याविषयीची भावना बदलली.
स्वरा हॉलमध्ये येऊन बसली. सुमनने त्या दोघांना चहा देऊन स्वतः ही चहा घेतला. सगळेजण हाॅल मध्ये चहा पीत बसले होते. पृथ्वीला काय बोलावे? ते समजेना स्वराचा राग शांत झाला आहे कि ती अजून चिडली आहे हे त्याला कळेना. तो तसाच शांत बसून एक एक घोट चहा पीत होता. स्वराला सुद्धा आता आपण काय बोलावे? हे समजेना. "खरंच आपण पृथ्वीला समजून घेण्यात चुकलो. त्याच्यावर मनापासून प्रेम तर होतेच पण त्याचा स्वभाव, त्याच्यात असलेले गुण हे माहीत असूनही त्याच्यावर आपण संशय घेतला. हे खूप चुकीचे होते." असे तिला सारखे वाटू लागले. "मी इतका अपमान करूनही तो माझ्या आईच्या मदतीला धावला. तिला अपमानित होण्यापासून वाचवले. यामध्ये खरंतर माझी चूक होती. त्यादिवशी पृथ्वी काहीतरी समजावून सांगत होता. पण मी ऐकूनच घेतले नाही. आईसुद्धा सारखी बोलत होती. पण मी बडबड करत बाहेर निघाले. खरंतर चूक त्याच्या बाबांची होती. याला काहीच माहित नव्हते. आता काय करावे? त्याच्याशी कसे बोलावे?" हाच विचार करत स्वरा तिथे बसली होती. चहा पिऊन झाल्यानंतर पृथ्वी घरी जायला निघाला.
"चला काकू, जातो मी आता. कधी काही वाटले तर हक्काने फोन करा." असे म्हणून पृथ्वी जाऊ लागला.
"अरे बाळ, जातो नाही तर येतो म्हणावं." असे सुमन त्याला म्हणाली
"नाही काकू, आता यावर मी कधी येईन हे सांगता येणार नाही म्हणून जातो म्हणालो. बरं ठीक आहे येतो काकू." असे म्हणून पृथ्वी जाऊ लागला. सुमन कप बशी ट्रेमध्ये घालून स्वयंपाक घरात गेली. स्वराला काही समजेना. त्याच्याशी जाऊन बोलावे, असे एक मन म्हणत होते. तर दुसरे मन अडून बसले होते. कुठल्या मनाचे ऐकू हे तिला कळेना. पृथ्वी बाहेर गेला.
"स्वरा अगं, तो चालला आहे. ही संधी आहे त्याच्याशी बोलण्याची. त्याची माफी मागण्याची. खरंतर या सगळ्यामध्ये त्याची काहीच चूक नव्हती. ही संधी तू सोडू नकोस. नाहीतर कायमची त्याला गमावून बसशील." असे स्वराच्या मनात वारंवार येत होते.
स्वरा उठली आणि तडक बाहेर गेली.
तिने "पृथ्वी थांब." अशी हाक दिली. स्वराचा आवाज आल्याबरोबर पृथ्वी थांबला. त्याचा विश्वासच बसेना की खरंच स्वराने हाक दिली की त्याला भास झाला.. स्वरा बोलायला येईल की नाही अशी त्याला शंका वाटत होती, पण ती खरंच आली होती. त्याने त्याचे डोळे चोळले आणि समोर पाहिले तर खरंच स्वरा होती. तो तसाच फक्त तिच्याकडे पाहत उभा राहिला. त्याला काय बोलावे? ते सुचेना. स्वरा त्याच्या जवळ आली.
तिने "पृथ्वी थांब." अशी हाक दिली. स्वराचा आवाज आल्याबरोबर पृथ्वी थांबला. त्याचा विश्वासच बसेना की खरंच स्वराने हाक दिली की त्याला भास झाला.. स्वरा बोलायला येईल की नाही अशी त्याला शंका वाटत होती, पण ती खरंच आली होती. त्याने त्याचे डोळे चोळले आणि समोर पाहिले तर खरंच स्वरा होती. तो तसाच फक्त तिच्याकडे पाहत उभा राहिला. त्याला काय बोलावे? ते सुचेना. स्वरा त्याच्या जवळ आली.
"पृथ्वी, मला माफ कर. मी तुझ्यावर हा असा संशय घ्यायला नको होता. पण त्या दिवशी माझ्या आईचा झालेला अपमान मला पाहावले नाही म्हणून मला त्याचा खूप राग आला होता. मी काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तुझ्या बाबांनी जे केले ते खूप चुकीचे होते. त्याचा मला राग आला होता. अरे, आपल्याच मुलीच्या लग्नात तिने त्यांच्या समोर हात जोडले आणि ती मान खाली घालून उभी होती. अगदी अपराध्यासारखं.. जणू कोणता तिने गुन्हाच केला आहे.. गुन्हा तर ते करत होते. यात आईची काहीच चूक नव्हती. म्हणून मला राग आला आणि मी रागाच्या भरात नाही नाही ते बोलले. तुला खूप बोलले ना! मला माफ कर.." स्वरा स्वतःचे कान पकडून बोलू लागली.
"स्वरा, अगं मीच चुकलो. इतकं सगळं घडलं पण यातील काहीच मला समजले नाही. मीच चौफेर बाजूने लक्ष ठेवायला हवे होते. पण मी लग्नाच्या धुंदीत होतो. मला काहीच समजले नाही ग. मला आधी कल्पना असती तर मी सगळे होऊच दिले नसते." पृथ्वी अगदी अपराध्यासारखा बोलत होता.
"अरे, मला समजलं ना! तुला यातील काहीच माहित नव्हते. तू वाईट वाटून घेऊ नकोस." असे म्हणून स्वराने त्याला मीठी मारली.. स्वराला खूपच वाईट वाटत होते. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. पृथ्वी तिच्या केसावरून हात फिरवला आणि तिच्या डोळ्यातील पाणी पुसला.
"माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे स्वरा. मी तुला फुलासारखं जपेन, तुला योग्य तो मानसन्मान देईन. आधी सुद्धा देत होतो. ही गोष्ट मला माहीत नव्हती नाहीतर मी सत्याच्या बाजूनेच बोललो असतो. म्हणजे समोरचा व्यक्ती कोणीही असो सत्य हे सत्यच असते आणि मी त्याच्या बाजूनेच उभा राहणार.. सत्य हे कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी झाकून राहत नाही, कधी ना कधी बाहेर पडतेच. माझे बाबा खरंच चुकले. त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो." पृथ्वी
"तू का सारखा माफी मागत आहेस? यामध्ये तुझी काहीच चूक नाही. आता मला लाजतोस काय तू? माझे सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, पण मी तुला समजून घेऊ शकले नाही. माझे तुझ्यावर प्रेम होते पण तुझा स्वभाव मला माहित असतानाही मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. अरे, नात्यामध्ये विश्वासच खूप महत्त्वाचा असतो.. जर त्या विश्वासालाच तडा गेला तर ते नाते ते राहत नाही.. ही गोष्ट मला माहीत होती.. तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही.. तू सांगण्याचा प्रयत्न करत होतास पण मी तुझे काहीच ऐकून घेतले नाही.. त्यावेळी चूक तुझी किंवा माझी नव्हतीच चूक तर परिस्थितीची होती.. ती परिस्थिती खूप वाईट होती.. सर्व लोकांसमोर सगळ्यांचा अपमान झाला.. त्या सगळ्यात माझी खूप मोठी चूक होती, मी तुला विश्वासात घेऊन सारं काही सांगायला हवे होते, पण मला ते जमले नाही.. माझी आई नेहमी म्हणते की बोलण्यापूर्वी विचार करून बोलावे बोलल्या नंतर विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाही आणि हे खरंच आहे.." स्वरा
"तू जास्त मनावर घेऊ नकोस. तू म्हणतेस तसे परिस्थितीच त्यावेळी तशी होती. आता बरळत बसण्यात काहीच अर्थ नाही आणि या सर्वांमध्ये माझ्या बाबांचीच खूप मोठी चूक होती. त्यांनी तुझ्या आईकडून एक प्रकारे हुंडा च मागितला होता. त्यामुळे चूक त्यांचीच होती." पृथ्वी
"पण पृथ्वी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला सुद्धा लग्न करायचे आहे ते तुझ्याशीच.. पण आता ते कसे शक्य होईल? तुझे बाबा आता आपल्या लग्नाला मान्यता देतील का? त्यांची जर ही अट असेल तर मी लग्न करायला तयार नाही.. नाहीतर मग तू विचार कर.." स्वरा स्पष्टच म्हणाली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा