Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 23

Read Later
आत्मसन्मान 23


"आई बाबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही ते ऐकून घ्या." पृथ्वी

"अरे बोल ना, तू कधीपासून परवानगी घ्यायला लागलास? काही असेल तर बोल. आम्ही काहीच बोलणार नाही. जे काही असेल ते स्पष्ट बोल." पृथ्वी ची आई

जर मी आई-बाबांना स्वरा विषयी सांगितलो आणि नंतर स्वराने जर नकार दिला तर माझी पंचाईत होईल. त्यापेक्षा आत्ता सांगायलाच नको. आधी स्वराला प्रपोज करतो मग आई-बाबांना सांगता येईल. अशा विचाराने पृथ्वी शांत बसला.

"अरे सांग ना! तुला काय बोलायचं आहे? स्पष्ट बोल हं. आम्ही तुझं म्हणणं ऐकून घेऊ." पृथ्वी ची आई

"काही नाही. मला विचार करायला थोडे दिवस हवे आहेत. आत्ताच माझे शिक्षण झालेले आहे आणि लगेच लग्नाच्या बेड्यात अडकण्याची माझी मुळीच इच्छा नाही. थोडे दिवस एन्जॉय तरी करू द्या ना. पुढे लग्न संसार सगळं काही आहेच की. एकदा संसार पाठीमागे लागला तर एॅन्जाॅय करता येणार नाही. म्हणून मला आत्ताच लग्न करायचे नाही. थोडे दिवस तरी जाऊ दे ना." पृथ्वी त्याच्या आई बाबांना समजावून सांगत होता. खरंतर त्याला स्वराला विचारण्यासाठी अवधी हवा होता. पण तो हे सांगणार कसे? म्हणून त्याने असे सांगितले.

"अरे, लगेच मुलगी बघितली की लग्न थोडीच सरकून टाकायचे आहे! तुम्ही एकमेकांना भेटा, बोला, समजून घ्या, मजा मस्ती करा, ओळखा आणि मगच लग्न करा. घाईघाईने कुठे आम्ही लग्नाला सांगतोय?" पृथ्वी चे बाबा

"पण तरीही बाबा या सगळ्या मला आत्ताच करायची अजिबात इच्छा नाही. थोडे दिवस एन्जॉय करायचे आहे. आत्ता कुठे कॉलेज झाले आहे आणि लगेच लग्नाच्या कचाट्यात मला अडकवत आहात. मला आत्ताच लग्न करायचं नाही." पृथ्वीने स्पष्टच सांगितले.

"अरे, पण तू मुलीला पाहून तरी घे. तिला पाहिलास तर तुला नक्कीच आवडेल. मग म्हणशील आत्ताच लग्न उरकून टाका म्हणून. खूप सुंदर मुलगी आहे. आम्हाला खूपच आवडली आहे." पृथ्वी ची आई

"म्हणूनच नको म्हणतोय मी. मला आत्ताच त्यात गुंतायचे नाही. थोडे दिवस जाऊ दे. मग मी तुम्हाला स्वतः सांगेन की आई बाबा मला लग्न करायचे आहे. तुम्ही तयारीला लागा." पृथ्वी स्वरासाठी हे सगळे करत होता पण त्याचे मन ती तयार होईल की नाही इकडेच होते.

शेवटी कसेबसे पृथ्वीच्या आई बाबांनी त्याला थोड्या दिवसांचा अवधी दिला. जेणेकरून तो त्याचे बॅचलर लाईफ एॅन्जाॅय करू शकेल. पृथ्वीला खूप आनंद झाला. आता त्याचे एकच ध्येय होते ते म्हणजे मिशन स्वरा... स्वराला प्रपोज करून तिला पत्नी म्हणून आयुष्यात आणणे. यासाठी तो तयारीला लागला.

स्वराने थोड्या वेळाने मोबाईल पाहिला तर त्यामध्ये पृथ्वीचा मेसेज दिसला. तो पाहून तिला खूप आनंद झाला, पण आईसमोर ती व्यक्त होऊ शकत नव्हती. म्हणून ती तशीच बसून गालातच हसत होती. तिने क्षणाचाही विलंब न लावता त्याला परत हॅलो म्हणून रिप्लाय दिला.. पण तेव्हा पृथ्वी ऑनलाइन नव्हता. अशाप्रकारे एक झाल्यावर एक असे मेसेज करू लागले. पण याला पृथ्वी वैतागला. व्यवस्थित बोलणे सुध्दा होत नव्हते म्हणून त्याने तिला एक ठराविक वेळ मागून घेतला जेणेकरून एकाच वेळी दोघांना व्यवस्थित चॅटींग करता येईल.

स्वराने सांगितल्याप्रमाणे एका ठराविक वेळी म्हणजेच रात्रीच्या वेळी त्या दोघांनी चॅटिंग करण्याचे ठरवले. एकंदरीत या दोघांची सुरुवात तरी झाली हे नशीब.. नाही तर एकत्र येऊन परत विरह हे दोघांनाही नको होते..

रोज त्यांचा दिवस गुड मॉर्निंग या मेसेज ने सुरुवात होई तर रात्री गुड नाईट या मेसेज ने संपे. एकमेकांना चॅटिंग करता करता त्या दोघांना एकमेकांची सवयच होऊन गेली होती. एक दिवसही बोलणे झाले नाही तर त्यांना करमत नसे सुट्टीचे दिवस असल्यामुळे ते दोघे चॅटिंग करूनच बोलत होते. प्रत्यक्षात त्यांनी फोन सुध्दा केला नाही.

आता सुट्टीचे दिवस संपत आले कॉलेज सुरू होण्यासाठी सज्ज झाली होती. स्वरा देखील कॉलेजला जाण्यासाठी उत्सुक होती, पण आता कॉलेजमध्ये पृथ्वी नसणार या एकाच गोष्टीने तिला त्रास होत असे. एक-दोन वेळा तसे तिने पृथ्वीला बोलून देखील दाखवले.

स्वराने पृथ्वीला विचारले, "आता कॉलेज सुरू होणार, पण तू कॉलेजमध्ये नसणार.. मी तुला खूप मिस करेन.." तेव्हा तो फक्त हसायचा काही एक बोलायचा नाही.. ते पाहून तिला खूप वाईट वाटे. याच्या मनात नक्की आहे तरी काय? असे तिला वाटे आणि ती शांत होई.

आता कॉलेजला सुरुवात झाली. स्वरा नेहमीप्रमाणे अनघा सोबत कॉलेजला निघाली. बसस्टॉपवरून बसमध्ये बसून कॉलेजच्या समोर बसमधून उतरली आणि आत मध्ये ग्राउंड वर पाऊल टाकताच तिला पृथ्वी ची आठवण झाली. नेहमी असणाऱ्या कट्ट्यावर आज तो दिसला नाही, म्हणून तिचा जीव कासावीस होत होता. त्या रिकाम्या खट्ट्या कडे पाहून तिचे डोळे भरून आले तर तिने लगेच दुसरीकडे पाहिले. दिवसभर लेक्चरला बसल्यानंतरही तिचे वर्गात काही केल्या लक्ष लागेना. नंतर मधल्या ब्रेकमध्ये ती बाहेर आली. ग्राउंड वर येताच तिला पृथ्वी दिसला ते पाहून तिला आश्चर्य वाटले. हे नक्की स्वप्न तर नाही ना! असे तिला वाटू लागले. तिने परत परत डोळे चोळले आणि ती पाहू लागली खरंच पृथ्वी आला होता. तिने स्वतःला चिमटा देखील काढला तेव्हा तिला खात्री पटली. पृथ्वी आला आहे ते पाहून ती पळत जाऊन त्याच्या पाशी थांबली.

"तू इथे कसा?" स्वराने अगदी आनंदाने विचारले. तेव्हा तिचा तो चेहरा पाहून पृथ्वी जे समजायचे ते समजला.

"मी कॉलेजला खूप मिस करत होतो आणि मित्रांना, स्पेशली तुला म्हणून भेटायला आलोय." असे पृथ्वी म्हणताच स्वरा शहारली. तिला आपले कोणीतरी हरवलेले सापडले अशी भावना झाली आणि ती पुढे बोलणार इतक्यात पृथ्वीला पाहून सगळे त्याचे ज्युनियर मित्र त्याला भेटण्यासाठी त्याच्या भोवती गोळा झाले. सगळे त्याच्याभोवती गोळा झाल्यानंतर स्वरा आपसूकच पाठीमागे गेली आणि त्या दोघांची भेट होऊनही काही उपयोग झाला नाही..

बराच वेळ स्वरा पाठीमागे उभी होती. तरी पृथ्वीचे लक्ष अधून मधून तिच्या कडे होते. तिच्याशी बोलावे असे त्याला मनापासून वाटत होते पण त्या मित्रांच्या गराड्यातून त्याला जाण्यासाठी वाटच नव्हती, त्यामुळे नाईलाजास्तव त्याला तिथेच थांबावे लागले. स्वरा मात्र बराच वेळ थांबून त्याच्याकडे फक्त पाहत होती. बोलले नाही किमान भेटणे तरी झाले हे वाटून तिला समाधान वाटले.

मित्रमंडळींना भेटल्यानंतर पृथ्वी शिक्षकांना भेटण्यासाठी गेला. त्यानंतर त्याने प्रिन्सिपल सरांची भेट घेतली. कॉलेज सुटले म्हणून सगळे जण आपापल्या घरी जाऊ लागले आता प्रत्येक जण त्याला भेटून जाऊ लागले त्यामुळे आजच्या दिवशी तो स्वराच्या वाट्याला काही आलाच नाही.

ज्या व्यक्तीला भेटायचे होते जिच्याशी बोलायचे होते तिच्याशी काही बोलणे झाले नाही त्यामुळे पृथ्वी खूप नाराज होता.

रात्री चॅटिंग करताना त्याने तसे बोलूनही दाखवले. तेव्हा स्वरा म्हणाली, "आपण एक दिवस निवांत भेटू, निवांत बोलू. काॅलेजमध्ये नको बाहेर कुठेतरी भेटू. मला सुद्धा तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. हे ऐकून पृथ्वीला बरे वाटले. किमान तिने भेटण्याची, बोलण्याची इच्छा दर्शवली. आता तिला प्रपोज केल्यानंतर तिने होकार द्यावा एवढी एकच इच्छा त्याची होती. त्यासाठी तो वाटेल ते करण्यास तयार होता.

स्वरा तिच्या आईशी बोलताना दिवसभरात घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगत होती आणि बोलण्याच्या भरात उत्सुकतेने तिने पृथ्वी देखील कॉलेजमध्ये आला होता हे सांगितले.

ते ऐकल्यानंतर तिच्या आईने बरेच प्रश्न विचारले. पण तिला योग्य अशी उत्तरे स्वराने दिले नाही. कारण जेव्हा पक्के होईल तेव्हाच आईला सांगायचे आता सांगून तिला आशा दाखवायची नाही असे तिनेही मनोमन ठरवले होते. त्यामुळे तो फक्त मित्र आहे आणि सर्वांनाच भेटण्यासाठी तो आला होता असे तिने सांगितले.

थोडे दिवस निघून गेल्यानंतर पृथ्वीच्या घरचे त्याच्या लग्नासाठी घाई करू लागले. ते पाहून पृथ्वी ने स्वराला प्रपोज करण्याचे ठरवले. आता प्रपोज केले नाही तर घरचे सगळे मिळून माझे लग्न लावून देतील अशी अनामिक भीती त्याला वाटू लागली. त्यामुळे त्याने स्वरा ला मेसेज केला की उद्या आपण बाहेर भेटू... स्वरा ने सुद्धा त्याच्या मेसेजला ओके म्हणून रिप्लाय दिला.

दुसऱ्या दिवशी स्वरा नेहमीप्रमाणे कॉलेजला जाऊ लागली. ती जाणारच इतक्यात तिच्या आईने तिला थांबवले.

"अग स्वरा, तू आज काहीतरी वेगळी दिसत आहेस. आज कॉलेजमध्ये काही आहे का?" सुमन

"नाही ग आई, मी तर नेहमीप्रमाणे जात आहे आणि कॉलेजमध्ये देखील काहीच नाही. पण तुला असे का वाटत आहे?" स्वराने परत आईला विचारले.

"नाही ग, तू आज वेगळीच दिसत आहेस. तुझा चेहरा आज खूपच खुलला आहे आणि तू खूप सुंदर दिसत आहेस. नक्कीच कॉलेजमध्ये काहीतरी असेल असे मला वाटले." सुमन

"नाही ग आई, मी नेहमीप्रमाणे चालले आहे. सोबत अनघा ही आहेच की आणि कॉलेजमध्ये काय असेल? असे अधून मधूनच... तुझ आपलं काहीही." स्वरा
खरं तर स्वरा चा चेहरा आज खूपच खुलला होता. ती खूप सुंदर दिसत होती. कारण पृथ्वी ला भेटायला जी चालली होती. पृथ्वीसाठी तिने खूप छान आवरले होते. पण हे आईला सांगायला तिचे धाडस झाले नाही.

स्वरा नेहमीप्रमाणे अनघाबरोबर कॉलेजमध्ये गेली. तिच्यासोबत असल्याचे तिने दाखवले पण मधूनच ती गायब झाली. ती थेट पृथ्वी सोबत बाहेर पडली. याचा अनघाला थांगपत्ता सुद्धा लागला नाही. बराच वेळ झाल्यानंतर अनघाला समजले की स्वरा कुठेच नाही.. बराच वेळ झाला ती गायब आहे. कॉलेजमध्ये देखील दिसेना तेव्हा तिने शोधकार्य सुरू केले. तिने सगळीकडे शोधले तरी स्वरा काही दिसली नाही. तिला फोनही केला पण फोन काही लागला नाही. मग तिने पाहिले तर स्वराचा मेसेज आला होता.

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..