Feb 26, 2024
नारीवादी

अति तिथे माती भाग 4 अंतिम

Read Later
अति तिथे माती भाग 4 अंतिम
अति तिथे माती भाग 4 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
.........

अलका ताई आल्या. नेहमी प्रमाणे त्या प्रियाच्या मागे होत्या. त्यांना जाणून घ्यायच होत काय झालं नक्की इकडे? प्रिया प्रेग्नंट आहे का? पण तिने काही सांगितल नाही. आता त्यांनी मोर्चा विवेक कडे नेला. तो ही विशेष बोलला नाही.

"माझ आजी व्हायच स्वप्नं कधि पूर्ण होईल काय माहिती." त्या रागाने रूम मधे निघून गेल्या.

प्रिया किचन मधे आवरत होती. विवेक आईच्या रूम मधे गेला. "आई थोड बोलायच होत."

"ये ना काय झालं? काही गुड न्यूज."

"आई कंट्रोल जरा. आपण नेहमी अस रहाव की दुसर्यांना आपला त्रास होणार नाही. तुला हे अस त्रासदायक वागून काय मिळत ते समजत नाही. समजत नाही का की एखाद्या जोडीला काही प्रश्न विचारू नये. त्यांना त्यांची प्रायव्हसी द्यावी. त्यांचा वेळ द्यावा. तू अस वागून प्रियाच जिवन कंटाळवाण करत आहेस. तुला चालेल का तिच्या समोर मी तुला बोलाल तर." विवेक बोलला.

" नाही चालणार."

" मग होईल आम्हाला व्हायच तेव्हा मुल. तू तुझ शांत रहा. त्रास देवू नको. अजून आमच काही वय झालं नाही. सारख नात नातू करू नकोस. "

त्या आत रुसून बसल्या. एक दोन दिवसांनी आपोआप नीट झाल्या.

आता त्या दुरून दोघांवर लक्ष देवून होत्या.

एक दिवस सकाळी सकाळी प्रियाला त्रास व्हायला लागला. अलका ताई खुश होत्या. पण तरी त्या काही म्हटल्या नाही.

पुढच्या आठवड्यात प्रिया लवकर घरी आली." आई आज फिरायला जावू नका. माझ्या सोबत डॉक्टर कडे चला."

"ठीक आहे." त्या तयार होवुन आल्या.

डॉक्टरांनी प्रियाला तपासल. "अभिनंदन तुम्ही आजी होणार आहात."

त्या खुश होत्या. " प्रिया आता काळजी घे. धावपळ करायची नाही."

"एक मिनिट प्रिया प्रेग्नंट आहे म्हणजे ती काही आजारी नाही. ती बघेल तिला काय करायच ते. सहन होणार नाही त्या गोष्टी ती करणार नाही. काही काही बायका दुसर्‍या प्रेग्नंट बायकांना अति हे करू नको ते करू नको करून अगदी नकोस करून सोडतात. प्रत्येकाचा प्रेग्नसीचा अनुभव वेगवेगळा असतो. तुम्ही यांना हव ते करू द्या. त्यांना त्यांचा अनुभव घेवू द्या. तुम्हाला अनुभव आहे हे मान्य आहे. पण तरी ही त्यांनी मागितली तर तुम्ही मदत करा. " डॉक्टर बोलले.

" बरोबर आहे तुमच डॉक्टर. मी लक्ष्यात ठेवेन. " अलका ताईंनी समजुतीने घेतल.

दोघी घरी आल्या. अलका ताई खुश होत्या.

" मी कोणाला काही सांगणार नाही प्रिया. फक्त मला तुझ करू दे. मी अति करणार नाही. " त्या बोलल्या.

" आई मला पण तुम्ही हव्या आहात. "

विवेक लवकर आला होता. तो खुश होता. अलका ताईंची धावपळ सुरू होती.

" प्रिया तू आता रिक्षाने ऑफिसला जावू नकोस. काही हव तर मला सांग." एक नाही अनेक सूचना त्या देत होत्या.

प्रिया, विवेक दोघ हसत होते.

त्या दोघांना छान वाटत होत. अलका ताई पण खुश होत्या.

त्या मधेच गप्प बसल्या. डॉक्टर काय म्हटले ते त्यांना आठवल. हिच्या जास्त मागे नको लागून जायला. तिला काही हव तर सांगेन ती. " प्रिया तू तब्येत सांभाळ आणि काही वाटल तर मला सांग. मी मदत करेन."

"हो आई."

"मी वरती खोलीत आहे. माझ्या सिरियलची वेळ झाली." त्या त्यांच्या खोलीत गेल्या.

विवेक, प्रिया कडे बघत होता. ती त्याच्या मिठीत शिरली. दोघ खूप आनंदात होते. विवेक तिची काळजी घेत होता. " आता खुश ना. "

" हो विवेक. थँक्स मला माहिती आहे तू आईंना समजवल. आई चांगल्या वागतात आता. "

" फक्त तुझ्या साठी. आणि आपल्या बाळासाठी घरात आनंदी वातावरण हवच. आता काळजी घ्यायची. "

हो.

" मी थोडा वेळ बोलतो आई शी."

हो.

विवेक आईच्या रूम मधे गेला. ती आवरायला आत गेली.

थोड्या बदलामुळे तो परिवार सुखी झाला होता.
....

घरातले जेव्हा अति मधे मधे करतात तेव्हा अगदी नको नको होत. प्रत्येक जोडीला त्यांच्या आयुष्यातले निर्णय घ्यायचा हक्क दिला पाहिजे. अलका ताईंनी स्वतः मधे वेळेत बदल केला. अस सगळ्यांनी वागायला हव.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//