Login

आठवणीतील मकर संक्रांत भाग 3

Makar Sankrant


         "कितीही तीव्र ईच्छाअसली तरी जीवन कधी कोणाला मागे नेता येत नाही"

       पण भाग 3 पूर्वी मागे जावं लागेल, सिया आणि नचिकेत यांची मैत्री आता हळू हळू खुलतेय आता पुढे ....


             हल्ली दोघे खूप खुश होते, आता तर फक्त दोघेच एकत्र जायला लागले होते अगदी नवरा बायको सारख चाललं होतं दोघांचं, एकत्र मूवी ला जायचे, फिरायला जायचे, खरेदी ला जायचे, आईस्क्रीम खायला जाणं. त्यांना बघून कोणीही म्हणेल की हे दोघे मित्र नक्कीच नाहीत हे दोघेही नवरा बायको आहेत, आणि ते एकत्र छान दिसायचे असं एकदा सिया ची मैत्रिण आणि नची ची मैत्रीण सुद्धा म्हणली, त्यावरून एकदा सिया त्याला म्हणाली देखील की नची आपण काही वेगळं वागतोय का?? आपलं नवरा बायको सारखं चाललंय का, तो यावर काहीच बोलला नाही.
       सियाचं कॉलेज संपलं होतं, ती आता नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची स्वप्नं पाहत होती, इकडे नचिकेत ला स्पर्धा  परिक्षेत वारंवार अपयश येत होतं त्यामुळे त्याने नोकरी करण्याचा निर्णय  घेतला होता.या काळात सिया आपल्या घरी गेली होती, आता त्यांच्यातलं बोलणं कमी व्हायला लागलं होतं, रोज होणारा संवाद आता हळूहळू कमी होत चालला होता, दोघे एकमेकांपासून हळूहळू लांब जात होते, तरीही सिया वेळात वेळ काढून नची ला फोन करायचीच.
       एकेदिवशी सियाचा फोन आला आणि ती खूप मोठ्या आत्मविश्वासाने  म्हणाली मला घरातून बाहेर पडायचय, मला काहीतरी करून दाखवायचं आहे, कारण शिक्षण पूर्ण करून आता साधारणतः 6 महिन्याचा काळ लोटला होता. तो तिला धीर देत होता, त्याने शांतपणे तीच ऐकून घेतलं आणि तिला सांगितलं तू तुझ्या आईशी वडिलांशी बोल, आणि तुझी भूमिका सांग, नचिकेत च्या सांगण्याप्रमाणे तिने तसं केलं आणि तिला घरच्यांची परवानगी मिळाली, तिचा आनंद गगनात मावेनासा झाला,खूप खूप खुश झाली ती, तसं तिने नचिकेत ला कळवलं त्याला ही आनंद झाला. पण सिया नचिकेत राहत असलेल्या शहरातच नोकरी करेल असं नचिकेतलाच काय, सियालाही वाटलं न्हवत, यामुळे त्या दोघांच्या चेहऱ्यावर फार आनंद होता कारण त्यांना भेटून जवळजवळ एक वर्ष होत आल होत. सुदैवाने सियाला नचिकेत राहत असलेल्या शहरातच संधी मिळाली.
          आता दोघांचंही सगळं सुरळीत चालू झालं, आठवड्यातून एकदा ते पाहिल्यासारख भेटू लागले, बोलू लागले, एकत्र फिरायला लागले, विद्यालयीन जीवनाचा तो आनंद ते परत एकदा अनुभवत होते, जगत होते.
              सिया थोडी शीघ्रकोपी होती, तिला जेवढ्या पटकन राग यायचा तितक्या लवकर तो निवळायचा देखील, यावरून बऱ्याच वेळा त्यांच्यात सुद्धा वाजलं होत पण फार काळ नाही,  सिया ला चूक कळलं की माफी पण मागायची, एकदा तर घरच्या कारणावरून ती चक्क नचिकेत च्या खांद्यावर डोकं ठेऊन धायमोकलून रडली, त्यावेळी त्याला एक वेगळीच सिया कळली, "संवेदनशील सिया" संपूर्ण स्त्री कळली असा कोणी पुरुष आहे या जगात ?? त्या सगळ्या स्त्री सुलभ भावना, तो आवेग, तो आवेश समजून घेणं फार कठीण, म्हणून स्त्रियांना "स्त्रीला" संपूर्ण समजून घेणारा पुरुष हवा असतो...
      ऑफिसमध्ये आता दोघांची कामं पाहता त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरची जबाबदारी वाढवली होती, पण दुर्दैवाने याचा परिणाम त्यांच्या मैत्रीवर होईल असं वाटलं न्हवतं. ऑफिस मध्ये ती आता रमायला लागली या काळात तिच्या सहकाऱ्यांशी घट्ट नाते संबंध निर्माण झाले त्यातला एक म्हणजे अभिमन्यू.तो फार हुशार होता, काम छान करत होता, सिया आणि त्याच्या मध्ये  कामानिमित्त  बोलणी वाढायला लागली, आणि इथे एका नव्या नात्याची सुरुवात झाली.
       अभिमन्यू ला सिया आवडत होती हे एव्हाना सियाच्या बोलण्यावरून नचिकेत च्या लक्षात यायला लागलं होतं, पण सियाचं काय ते त्याच्या लक्षात येत न्हवत , कारण सियाचं काय चाललंय काही कळेना.दिवसेंदिवस सिया बदलत चालली होती, आणि अभिमन्यू सांगतोय तसं ऐकायला लागली, नचिकेत ला फार कमी वेळा भेटत होती, पण मधेच सियाला अभिमन्यू च वागणं पटेनास झालं, म्हणजे तो नचिकेतला भेटूच नकोस असं म्हणायला लागला, आणि त्याच कारण विचारल्यावर त्यानं आपलं प्रेम व्यक्त केलं होतं असं समजलं. पण सिया  थोडी चंचल  होती तिला काय करायचं कळेना पण तिने अभिमन्यूला सुनावलं च जसा तू आहेस तसाच मला नचिकेत आहे, आणि नचिकेत माझा फार जुना मित्र आहे तुझ्या सांगण्यावरून मी त्याच्याशी बोलणं बंद करू शकत नाही, यामुळे परत एकदा सिया आणि नचिकेत च नात जे हेलकावे खात होतं ते पूर्व पदावर आलं.
        सियाला स्वछंदी जगणं आवडायचं, तिला गाडी चालवणं शिकायचं होतं, मग काय तिने नचिकेत समोर हट्ट धरला, नचिकेत ने ही लगेच तिला गाडी शिकवायची तयारी दर्शवली. आणि त्याने तिला गाडी शिकवायला सुरवात केली, इतकी हरवून गेली ती गाडी शिकण्यात की जणू तिला स्वर्गचं मिळाल्यासारखं, पण तिचं गाडी शिकणं अर्धवटच राहील कारण नंतर ती ऑफिसच्या कामात इतकी व्यस्त झाली की तिला स्वतःकडेही बघायला वेळ मिळाला नाही, आणि आता अभिमन्यूही होताच तिला वेळ द्यायला त्यामुळे परत एकदा त्यांच्या नात्यातली वीण घट्ट होण्याऐवजी कमी होत चालली होती,कारण नचिकेत ची जागा अभिमन्यू ने घेतली होती, ते दोघे फार कमी वेळा भेटत, कारण अभिमन्यूनेच तशी अट समोर ठेवली होती, की नाचिकेतला भेटायचं नाही, तरीही नचिकेत ला ती चोरून भेटायची, कारण तिला मैत्री गमवायची न्हवती कारण नचिकेत ने फार केलं होतं तिच्यासाठी, खूप आधार दिला होता तिच्या पडत्या काळात त्यामुळे आपसूकच ती नचिकेत कडे ओढली जायची, पण परमेश्वराला कदाचित हे मान्य न्हवत आणि तो दिवस दुर्दैवाने आलाच, नचिकेत आणि सिया कधीच न भेटण्याच्या अटी वर शेवटचं भेटले, त्यादिवशी दोघांच्या डोळ्यात पाणी होत आणि मनात भूतकाळात एकत्र घालवलेले दिवस, काही वेळ बोलले आणि त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला कधीच न भेटण्यासाठी.....

आयुष्यात परत भेटतील का ते ???

याचं उत्तर पुढील भागात 
क्रमशः....

🎭 Series Post

View all