Login

आठवणीतील मकर संक्रांत भाग 6 (शेवटचा)

Makar Sankrant

    14 जानेवारी मकर संक्रांतिचा तो दिवस, काहीतरी गोड असणार हे नक्की होतं, नचिकेत ऑफिस मध्ये गेला आणि त्याने थरथरत्या हाताने फोन लावला आणि पलीकडून फार कोमल, मृदू आवाज कानी पडला
सिया - हॅलो
नचिकेत - मी नचि बोलतोय
हे ऐकल्यावर काही क्षण दोघेही स्तब्ध झाले.


"शब्दांनवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले"

त्या क्षणात संपूर्ण भूतकाळ डोळ्यासमोर  उभा राहिला.  एकत्र घालवलेले दिवस, हातात हात घालून एकत्र फिरायला जाणं, movie ला जाणं, जेवायला जाणं,आनंदात घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण आताच घडल्यासारखा वाटत होता. काही वेळ दोघे बोलले दोघांच्या बोलण्यात अवघडलेपण होतं,

ती- मी तुम्हाला लग्नाचं गिफ्ट पाठवायचं ठरवलं होतं(तिला तिच्या वडिलांनी नची च्या लग्नाचा निरोप दिला होता)
तो- न झालेल्या लग्नाचं गिफ्ट??
ती- म्हणजे
तो- लग्नच झालं नाही तर ...
ती - म्हणजे तुम्ही खोट बोललात?
तो- हो, तुझ्या वडिलांशी काय बोलू हेच कळेना म्हणून नाईलाजाने बोलावं लागलं..
ती - हम्म, मग खरं लग्न कधी करताय??
तो- अजून मानसिक तयारी नाही झाली ..
ती - करा आता.
तो - हो
ती - तुम्हाला नंबर कोणी दिला माझा
तो- तुला काय वाटतंय कोणी दिला असेल??
ती - माहीत नाही
तो- कोणी दिला नाही शोधला नंबर मी बँकेतून, (त्यानं फक्त तेवढंच सांगितलं, बाकी काय काय केलं काहीच नाही सांगितलं)
तो- तू कधी करतेय लग्न
ती- चालू आहे बघायला
तो - छान, मिळेल एखादा सुंदर, राजबिंडा मुलगा, आणि सगळ्यात महत्वाचं तो नशीबवान असेल, तुझ्यासारखी मुलगी त्याचा जीवनात असणार आहे.
ती हम्मम्म.

     त्यांचं इकडचं, तिकडंच बोलणं झालं बोलता बोलता दोघांच्याही नेत्रकडा पाणावलेल्या होत्या. सियाचा नाईलाज होता, हे नचिकेतच्या लक्षात आलं होतं. तिने नाईलाजाने त्याला सांगितलं आपण परत भेटायचं नाही परत फोन पण करू नकोस त्यानंही ते तिच्यासाठी मान्य केलं, पण तो खुश होता कारण इतक्या वर्षांनी त्याला निदान तिच्याशी बोलता आलं, इतकी गोड आठवण या दिवशी त्याला मिळाली होती. त्यानं मनात धरलेली ईच्छा पूर्ण झाली... ते म्हणतात ना
     "अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है"
    
शेवटी जी वेळ नको होती तीच वेळ आली, असं म्हणतात की माणसाच्या आयुष्यातले सुखाचे क्षण लगेच जातात,निरोप घेणं दोघांनाही जड जात होतं, पण निरोप हा पटकन घ्यावा, असं  श्री कृष्ण म्हणतो  असं म्हणत जड अंतकरणाने फोन ठेवला कधीच न करण्यासाठी..
    
"जीवनाच्या वास्तव सत्यापेक्षा त्याचा आभासच काही वेळा सुंदर असतो, अतिशय जीवनदायी असतो "

  मी तुम्हाला खूप खूप मिस केलं हे "शब्द" अजूनही नचिकेतच्या कानात फोन ठेवल्यावरही गुंजत होते....
  

#समाप्त

#धन्यवाद

🎭 Series Post

View all