Dec 05, 2021
प्रेम

आठवणीतील मकर संक्रांत भाग 5

Read Later
आठवणीतील मकर संक्रांत भाग 5

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 मला माहितेय आपण फार उत्सुक आहात, की पुढे काय होणार याबद्दल , तर जास्त वेळ न घालवता भाग 5 कडे वळूयात. भाग 5 कडे वळण्याअगोदर आपण बघितलं, तिचा काही फोन msg काहीच नाही आता पुढे..

         नचिकेत नं अजूनही हार मानली न्हवती, अश्याच एका विचारात असताना त्याला असं लक्षात आलं की त्याच्याच सांगण्यावरून सियाने सेव्हिंग करण्यासाठी म्हणून पीपीएफ अकाउंट काढलं होतं,आणि ते सेव्हिंग खातेला जोडलं होत, पण समोर  प्रश्न असा होता की तिचं सेव्हिंग खाते जिथं आहे ती शाखा कोणती?? इथून पुढल्या गोष्टी या जरतर वरच्या होत्या, आणि त्या जुळुनही येत होत्या, कारण की ज्या बँकेचं खात काढलं होत त्या बँकेत नचिकेत काम करत असलेल्या संस्थेचं खात होतं, मग आता हाताला काहीतरी लागणार असं वाटत होतं, संस्थेमुळे बँकेत संबंध चांगले होते आणि नचिकेत चं कारणही त्यांना पटलं त्यामुळे माणुसकी म्हणून त्यांनी शोध सुरू केला, सुरुवात केली ते तिच्या गावाच्या शेजारच्या शाखेतून पण त्या शाखेत त्या नावाचं कोणी न्हवतं, आणि परत निराशा आली.परत तो विचारात गेला आणि त्याला एक गोष्ट लक्षात आली की विद्यापीठाच्या परिसरात त्याच बँकेची शाखा आहे, मग तसा शोध घेतला असता त्या नावाचं खाते होतं आणि अद्ययावत केलेला फोन नंबर आणि नचिकेतला खूप आनंद झाला. कारण त्याची स्वप्नपूर्ती झाली होती.....

क्रमशः ..

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now