प्रथमतः माझ्या पाहिल्याचं प्रयत्नांना आपण भरभरून प्रेम दिलंत त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो, आपले आपुलकीचे शब्द असेच कायम सोबत राहोत हीच ईच्छा,
तर आपणासमोर नवीन कथा घेऊन येतोय, आशा आहे, ही कथा आपल्यातली वाटेल, आपण जगून गेलोय, अथवा जगावी असं वाटेल .इथं थांबतो आणि मूळ कथेला सुरुवात करतो. धन्यवाद .
संक्रांतीचा तो दिवस... तब्बल 2 वर्षांनी केविलवाणी धडपड करून "इच्छा तिथे मार्ग" हा विचार खरा करून त्यानं या गोड दिवशी "सिया" ला थरथरत्या हातानेच फोन केला, आणि तिकडून फार कोमल, मृदू, शांत असा आवाज आला आणि त्याचं हृदय धडधडू लागलं आणि मन भूतकाळात गेलं ....
सायंकाळची वेळ होती, नचिकेत विद्यापीठातून घरी जात असताना बस थांब्यावर तो वाट पाहत होता.आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी चालू होती. काही वेळ गेल्यावर त्याची एक मैत्रीण,प्रिया नाव तिचं आणि तिची मैत्रीण तिथं आली , ते खूप दिवसांनी भेटले होते, ती विद्यापीठ मध्ये एम एस सी करत होती, त्यांची भांडणं व्हायची सारखी त्यामुळे त्यानं बोलणं टाळलं होत तिच्याशी, आणि ती खूप दिवसांनी समोर आली होती, दोघांच्या ही बोलण्यात अवघडलेपण जाणवत होतं, तरीही ती पुढे होत तिच्या मैत्रिणीची ओळख करुन देत म्हणली, ही "सिया"साधी होती ती, सावळी होती, थोडी कमी उंची असणारी, पण गोड होती, लाघवी होती,त्याने तिच्याकडे आणि तिने त्याच्याकडे पाहत औपचारिक स्मितहास्य करत,hiiii, hello केलं. आता मात्र प्रियाचं बडबड करणं चालू झालं, इकडं तिकडच्या गप्पा झाल्या, त्या रंगत गेल्या असताना सांगू लागली हिला तू माहिती आहेस, तुझ्याबद्दल माहिती आहे, वैगेरे वैगेरे ,अरे बापरे ,आता हिला तर शांततेचा नोबल पुरस्कार द्यायला हवा असं मिश्कील पणे नची बोलून गेला आणि त्या दोघी मनापासून हसल्या कारण ही तसच होत मुली म्हणल्या की ती त्यांची बडबड आलीच ना ????, प्रियांशी ईकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या असतानाच बस आली आणि त्यांचा प्रवास चालू झाला, क्षितिजावर गडद केशरी रंग अवतरला होता...
दिवसांमागून दिवस जात होते, नचिकेत त्याच्या अभ्यासात गुंग होता फक्त अभ्यास एके अभ्यास असं असायचं साधं 5 मिनिट पण बाहेर जायचा नाही. चहा तर लांबच ,परिक्षा जवळ येत होत्या त्यामुळे अभ्यासाचं एक दडपण होतं, पण आपण यशस्वी होणार ही आशा मनामध्ये होती, त्या पद्धतीने प्रयत्न ही चालू होते, एरव्ही ग्रंथालयात फारशी गर्दी नसायची पण विद्यापीठात ल्या डिपार्टमेंच्या परीक्षेचं वेळापत्रक आलं आणि मग मात्र त्याची धांदल उडाली कारण, रोज मोकळं असणार ग्रंथालय आणि तिथला परिसर आता काही दिवसांसाठी गजबजून जाणार होता..
क्रमशः ...
© सुहास ...
© सुहास ...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा