अश्याच एका दिवशी नचिकेत ग्रंथालयात होता,थोडा कंटाळा आला असल्यानं हेड फोन लावून छानपैकी गाणी ऐकत होता ,आणि त्या गाण्यांच्या विश्वात गेला, असतानाच मागून हळू आवाजात एक हाक आली "नचिकेत", आवाज थोडा ओळखीचा वाटला, हो ती प्रिया होती आणि सोबत तिची मैत्रीण सिया त्या दोघी जवळ आल्या आणि थोड्या गप्पा रंगल्या, गप्पांमधून कळलं की त्यांचीही परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपलीय आणि त्या अभ्यासा साठी आलेत.त्याच्या आजूबाजूला कोणीच बसलं न्हवत नचि नेहमी आशा ठिकाणी बसायचा की जिथं कोणी असणार नाही, प्रिया ने विचारलं इथं बसू का? त्याने मानेनेच होकार दर्शवला, आता त्याच्या बाजूला प्रिया आणि प्रियाच्या बाजूला सिया बसली होती.
ते सगळेच अभ्यासात व्यस्त होते तेवढ्यात बाजूने आवाज आला चहा ला येणार का ??? प्रिया विचारत होती.त्याने होकार दर्शवला तसही झोप येत होती त्यामुळे चहा ची त्यावेळेला नितांत गरज होती.चहा साठी
ते बाहेर पडले विद्यपिठाच्या उपहार गृहात आले, एक रिकामा टेबल पहिला त्या दोघींना बसायला सांगून 2 मध्ये 3 कॉफी सांगतली आणि तो त्यांना join झाला, त्या कॉफीचा आस्वाद घेत गप्पा खूप वेळ रंगल्या आणि त्या बरोबर त्याला एक नवी मैत्रीण मिळाली आणि इथेच श्री गणेशा झाला एका नव्या मैत्रीचा एका नव्या पर्वाचा....
"सिया" नावाप्रमाणेच एक वेगळेपण होत तिच्यात. मितभाषी होती, तिची smile फार छान होती. सुरुवातीला त्यांच्यातलं बोलणं नेमकच व्हायचं, हळूहळू दिवस पुढे जात होते तसे एखादी कळी खुलते तशी त्यांची मैत्री ही खुलायला सुरुवात झाली. हल्ली त्यांच्या भेटी वाढल्या होत्या दरम्यानच्या काळात नचिकेतचं प्रिया सोबत परत वाजलं होत,पण सिया आणि नचिकेत हे भेटत होते.सिया आता त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलायला लागली,पण फक्त मैत्रीचं होती ती .इतकी गोड,निखळ मैत्री फार कमी लोकांच्या आयुष्यात येते. ते म्हणतात ना, कभी एक लडका और लडकी कभी दोस्त नही होते, असं म्हणनाऱ्यांसाठी चपराक होती. त्या दोघांचं खूप छान चाललं होतं , पण मैत्रीच्या पलीकडे दोघांनाही जायचं न्हवत....

क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा