Login

आठवणतील मकर संक्रांत भाग 4

Makar Sankrant


आयुष्यात परत ते भेटतील ??? या प्रश्नांची उत्तरं  या भागात ...

              पुढे  2, 3 वर्षे लोटली दोघेही आयुष्यात खूप पुढे आले होते, दोघेही एकमेकांच्या कामात व्यस्त होते, सिया  ते शहर सोडून कधीच गेली होती पण भूतकाळातल्या आठवणी सोबत घेऊन गेली होती.
      "तू गेलीस तोडुनि ती माळ सर्व धागे , फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे, सलते ती तडफड का कधी तुझ्या उरात ??
बगळ्यांची माळ फुले अंबरात, भेट आपली स्मरशी काय तू मनात "??...
                हे भावगीत त्याच वेळेला नेमकं रेडिओ वरून त्याच्या कानी पडलं त्याच्या च्या मनी विचार येऊन गेला कुठे असेल सिया??काय करत असेल?? तिला आठवण येत असेल माझी ?? त्या विचारानं तो व्याकुळ झाला. तिचा शोध घ्यायचा असं त्याने ठरवलं पण तेवढ सोपं न्हवत कारण सिया राहत असलेलं गाव खूप खूप  लांब होत. मनात एक विचाराची ठिणगी पडली नि शोध सुरू झाला, त्यानं तिला फोन केला अपेक्षेप्रमाणे फोन नंबर बंद होता. तिच्या मित्रांकडे, मैत्रिणी कडे चौकशी केली असता कळलं की ती कोणाच्याच संपर्कात नाही आणि भ्रमनिरास झाला. पण हार मानतोय तो नचिकेत कसला, त्याने हर तऱ्हेने प्रयत्न सुरू केले.त्याने एक योजना आखली, अंदाजे तिर मारला  त्याने लागेल अशी अपेक्षा होती आणि तिर लागला , झालं असं नचिकेतच्या  मित्राचे वडील होते एका साखर कारखान्यात फोन ऑपरेटर, त्यांनी सियाच्या गावालगत असणाऱ्या कारखान्यात फोन लावला, सियाच्या गावचे तिथे कोणतरी असणार अशी खात्री होती ,आणि तिच्या वडिलांचा नंबर मिळवण्याच्या प्रयत्न केला, सुदैवानं सियाचे काका त्या कारखान्याचे संचालक होते त्यांनी मग सियाच्या वडिलांचा फोन नंबर दिला आणि कारण सांगितलं गेट टूगेदरचं पण, शोध अजून संपला न्हवता....
       कोण तू ?? काय काम आहे तुझं, परत फोन केलास तर याद राख. या विचारांनच नचिकेत भानावर आला, जो विचार मनात आला आणि तसंचं घडलं तर ??? तो घाबरला फोन करू की नको करत त्याने शेवटी केलाच, तो बोलला तिच्या वडिलांशी आणि चक्क थाप मारली त्याने की सियाला निरोप द्या की माझं लग्न झालय नि स्वागत समारंभ आहे त्यासाठी निमंत्रण देतोय, तिच्या वडिलांनी सियाला निरोप देतो म्हणलं खरं पण तिला निरोप मिळाला की नाही हे मात्र त्याला कळलं नाही कारण तिचा काही तसा फोन, मॅसेज काहीच नाही...