Jan 28, 2022
कविता

आठवण

Read Later
आठवण

दारू च्या नशेत पडणाऱ्या बापाला त्याच्या, 
केविलवाण्या मुलांची व घराची आठवण व्हावी. 
खुर्चीच्या मागे धावणाऱ्या नेत्यांना त्यांच्या, 
कर्तव्याची व जबाबदारी ची आठवण व्हावी. 
फॅशन च्या मागे धावणाऱ्या मुला-मुलींना, 
भारतीय संस्कृतीची आठवण व्हावी. 
पुढे सरकत जाणाऱ्या ढगांना इथल्या, 
रूक्ष व कोरड्या जमिनीची आठवण व्हावी. 
वृद्धाश्रमात झिजणारयांच्या मुलांना त्यांच्या, 
आईवडिलांच्या मायेची व कष्टाची आठवण व्हावी. 
जातीयतेच्या नावाने दंगा माजवणारयांना, 
राष्ट्रीय एकात्मतेची आठवण व्हावी.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now