अथांग - मराठी वेब सिरीज

Athang Is Marathi Web Series



#अथांग

मावळतीला आलेला सूर्य आणि समोर अफाट पसरलेला अथांग समुद्र, प्रभाकरच्या मनात जेवढं साचलं होतं तेवढा त्या समुद्राचा डोह खोल होता ..खरंतर प्रभाकर ने बोलायला हवं निदान मनमोकळं रडायला तरी हवं,त्याला काहीतरी सलतय,काहितरी बोचतय पण नेमकं काय हेच त्याला कळत नव्हतं ..

वाड्यावर आलेली ती तरुणी रावसाहेबाच्या अनुपस्थित समुद्र या कादंबरीच वाचन करत होती.. पुस्तक वाचण्यात ती खुप हरवून गेली होती त्यामुळे खोलीत आलेला रावसाहेब तिला दिसलाच नाही ..पण ज्याच्या सावलीला सुद्धा बाईमाणुस चालत नाही चक्क त्याच्या खोलीत एक बाई पुस्तक वाचतेय हे पाहून गावकऱ्यांनी \" रावण \" अशी उपमा दिलेला रावसाहेब भडकला आणि पूर्ण पुस्तकाचा शेल्फ खाली पाडला त्याने ..ती बिचारी घाबरली .. काय करावं ते तिला सुचेना.. वाड्यातील रावसाहेबाच्या आऊ मावशीने खुप बजावून सुद्धा ती आज रवसाहेबाच्या समोर उभी होती .. एरव्ही ती आणि तिचा नवरा वाड्याच्या मागच्या बाजूने वाड्यात ये जा करतात, रात्री काहीही आवाज न करता राहतात ..पण आज ती पकडली गेलीच..

नेमकं का रावसाहेबाला आऊसाहेब सोडून दुसरं कोणी बाईमाणुस चालत नाही वाड्यात ? काय शाप असेल या वाड्याला ज्यामुळे सगळे गावकरी नावं ठेवतात ? कोण आहे ती आत्मा जिने वाड्यावर बस्तान बसवलं आहे गेले ३० वर्षे .. १९३० आणि १९६० या काळात घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे प्लॅनेट मराठीची नवी कोरी वेब सिरीज " अथांग " .. तेजस्विनी पंडितची निर्मिती, निवेदिता सराफ,संदीप खरे, उर्मिला कोठारे,भाग्यश्री मिलिंद,ओमप्रकाश शिंदे,विक्रम गायकवाड,ऋतुजा बागवे अशी जबरदस्त स्टार कास्ट असलेल्या या सिरीजचे कालच दोन भाग प्रदर्शित झाले आहेत .. जरूर पहा.. ट्रेलर पाहूनच ही सिरीज काहीतरी वेगळी आहे हे वाटत होतं आणि तसंच आहे .. ज्यांना रहास्यपट, भयपट आवडतात त्यांनी नक्की पहा..