अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग..
© अनुप्रिया..
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग..
© अनुप्रिया..
अथांग.. भाग - ४
“ओह्ह माय गॉड! किती सुंदर, अप्रतिम! बंगला कसला हा तर भव्य राजवाडा आहे. खूपच छान.”
सान्वी डोळे विस्फारून त्या भव्य पॅलेसकडे पाहत होती. गाडी प्रवेशद्वारापाशी थांबली. ड्राईव्हरने अदबीने कारचा मागचा दरवाजा उघडून केदार आणि सान्वीला खाली उतरवलं. प्रवेशद्वारापाशी एक बुरखादारी स्त्री उभी होती. तिने त्यांना तिथेच अडवलं आणि म्हणाली,
“मॅडमजी, आप मेरे साथ आईये। आप अपने जनाबके साथ अंदर नही जा सकती। आईये मै आपको जनानखानेमे ले जाती हूँ और बादमे फिर यही आपको छोड दिया जायेगा।“
सान्वीने केदारकडे पाहिलं.
“इथले रितीरिवाज वेगळे असतील आपल्याला त्या प्रमाणेच वागावं लागेल ना!”
केदारच्या बोलण्यावर तिने मान डोलावली आणि ती त्याच्यासोबत पुढे चालू लागली. पॅलेसच्या प्रवेशद्वारापासून ते बंगल्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत अर्धा किलोमीटरचं अंतर होतं. हिरवेगार कारंजे आणि भव्य बागांनी आजूबाजूचा परिसर सुशोभित केला होता. पूर्ण पॅलेसला साधारण आठ नऊ फुटीचं वर्तुळाकार सिमेंटचं कुंपण घातलं होतं. दारात तीन चार आलिशान गाड्या उभ्या होत्या. दोघेही आश्चर्याने ते पॅलेसचं भव्य रूप न्याहाळत होते. राजवाड्याचे घुमट, कमानी आणि विस्तृत स्टुकोचे काम पर्शियन, राजस्थानी, इंडो-सारासेनिक आणि युरोपियन शैलींचे भव्य आणि सुंदर रूप अचंबित होऊन पाहत होते. ते दोघे मुख्य दारापाशी पोहचले. रजाक शेख बाहेरच त्यांची वाट पाहत उभा होता. रजाक आपल्या डाव्या हाताची बोटं एकत्र करून कपाळावर नेत सलाम करत म्हणाला,
“सलाम वालेकुम केदार साहब, भाभीजी सलाम। आईये, आईये जनाब, सफरमे कुछ परेशानी तो नही हुई? सब खैरीयत?”
हं, नही कुछ खास नही।”
केदार त्याच्या हातात हात मिळवत म्हणाला. रजाकने प्रेमाने केदारला अलिंगन दिलं. केदार आणि सान्वीने आत पॅलेसमध्ये आत डोकावलं. बेल्जियन स्फटिकाने बनवलेले झुंबर आणि मिरर-फिनिश, पांढरा संगमरवरी मजला पाहून त्या दोघांचे डोळे विस्फारून गेले होते. केदार आणि सान्वी पुढे पाऊल टाकणार इतक्यात रजाकने सान्वीला तिथेच अडवलं.
“भाभीजी आप इनके साथ अंदर जाये। हमारे यहाँ जनानीयोंके उठने बैठनेके लिए अलग और खास इंतजाम किया जाता है। आप अपने शोहरके साथ हमारे ‘दिवान ए खास’ मे नही बैठ सकती।”
असं म्हणून रजाकने त्या दासीकडे पाहिलं आणि त्या बुरखेधारी स्त्रीला फर्मान सोडलं.
“इन्हें जनानखानेमे ले जाओ।”
“जी हुजूर।”
असं म्हणून ती स्त्री सान्वीला पॅलेसच्या मागच्या बाजूने आत घेऊन जाऊ लागली. केदारने तिला तिच्यासोबत जाण्यासाठी मानेनेच खुणावलं तशी सान्वी मागे वळून केदारकडे पाहून हसली आणि त्या स्त्रीच्या मागे जाऊ लागली आणि रजाक केदारला घेऊन पाहुण्यांनी बसण्याच्या हॉलमध्ये म्हणजे ‘दिवाने ए खास’ मध्ये आला. पांढरा शुभ्र रंगाचा संगमरवरी आयताकृती हॉलमधले मेहराब सोनेरी रंगानी सजवले होते. खाली संगमरवरी जमीन, वर सोन्या चांदीनी मढवलेलं छत, भिंतीवर उर्दू भाषेत कोरलेली सजावट फारच सुंदर होती. पाळलेले ससे मधूनच पायात घुटमळत होते. लांबचौडी बैठक आणि त्यावर मऊशार लालसोनेरी रंगाच्या गालिच्यांची बिछायत. दिमतीला नोकरचाकर सारखे अधून मधून फिरत पाहुण्यांची खातीरदारी करण्यात व्यस्त होते. केदार त्या लांबचडक बैठकीवर बसला आणि बैठकीपासून थोडं उंचावर मांडलेल्या मोठ्या आरामदायी भव्य आसनावर रजाक बसला होता. दोघांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. रजाक त्याला त्याच्या बिझनेस बद्दल सांगत होता. त्यांच्या परंपरा, रितिरिवाज याबद्दल बोलत होता. टेबलवर उंची दारू आणि चांदीच्या ताटात अक्रोड, काजू बदाम ठेवलेले होते. सौम्य आवाजात अरेबीयन संगीत सुरू होतं. अरेबीयन पेहरावातल्या तलम झिरझिरीत वस्त्रातल्या काही ललना नृत्य करण्यास आल्या. त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर नकाब होता. सर्वजण नृत्याचा आणि मद्याचा आस्वाद घेत होते. काहींची पाऊले त्या संगीताच्या थिरकू लागली. रजाकही नाचगाण्यात मशगुल झाला. मद्याची धुंदी त्याच्या डोळ्यावर चढू लागली होती. हळूहळू रात्र सरू लागली होती. नाचगण्याचा कार्यक्रम संपत आला आणि त्या ललना सलाम करून तिथून निघून गेल्या. थोड्याच वेळात सर्वांना शाही भोजनासाठी ‘दावत ए खास’ मध्ये नेण्यात आलं. डायनींग टेबलवर विविध प्रकारचे पदार्थ ठेवले होते. मांसाहारी पदार्थ, मासे, रोटी नान आणि मोठ्या भांड्यात बिर्याणी ठेवली होती. सर्वजण जेवणाचा आस्वाद घेत होते. रजाक मोठ्या प्रेमाने, आदराने केदारला जेवण्याचा आग्रह करत होता. सर्वांनी यथेच्छ सुग्रास जेवणावर ताव मारला.
सर्वांची जेवणं झाली आणि हळूहळू पाहुणे मंडळी रजाकचा निरोप घेऊन आपापल्या घरी परतू लागली. आता केदारलाही घरी जाण्याचे वेध लागले होते. तो रजाकजवळ जात म्हणाला,
चलिये शेखसाहब, हम अब विदा लेते है। बहुत देर हो गयी है।”
“अच्छा, खुदा हाफिज केदार साहब, आपको मिलकर, आपके साथ बाते करके बहुत अच्छा लगा। दोबारा जरूर आईये।”
रजाक हसून म्हणाला आणि दोघे चालत चालत दारापाशी आले. केदार आजूबाजूला पाहू लागला. त्याची नजर सान्वीला शोधत होती. त्याचे पाय तिथल्या तिथे घुटमळत होते. तो सारखा बंगल्याच्या मागच्या रस्त्याकडे पाहत होता. त्याला असं अस्वस्थ झालेलं पाहून रजाकने विचारलं,
“क्या हुआ जनाब? कुछ दिक्कत है?”
“हाँ, वो सान्वी, मेरी बीवी कही दिखाई नही दे रही है। आपने उसे जनानखानेमे भेज दिया था ना?”
केदारने प्रश्न केला.
“क्या? आपकी बीवी और यहाँ? जनाब, शायद आपको कुछ ज्यादा हो गयी है। केदारसाहब आप यहाँ अकेले आये थें। दुसरा कोई आपके साथ नही था।”
रजाकचं बोलणं ऐकून केदार मोठ्याने हसला.
“शेख साहब, अच्छा मजाक कर लेते है आप। सान्वी मेरे साथ यहाँ आई थी। आपने आपके कनिजके साथ उसे जनानखानेमे भेज दिया था।”
“नही केदारसाहब, हम मजाक नही कर रहे है। यकीन किजीये आप अकेले आये थे। हम आपसे क्यूँ झूठ कहेंगे?”
रजाक काहीसा चिडून म्हणाला. आता मात्र केदारचं धाबं दणाणलं. तो जरासा आवाज चढवत म्हणाला,
“प्लिज शेख साहब, सान्वी अंदर है। आप उसे बाहर बुलाये वरना मुझे अंदर जाना पडेगा।”
“देखिये जनाब, हम बता रहे है, आप अकेले आये थें। आपकी बीवी यहाँ नही है। आप समझते क्यूँ नही? हमारे यहाँ मेहमानोंको खुदा का रूप मानते है। इसलिये हम आपके साथ बडी तमिजसे पेश आ रहे है। आपकी गलतीको नजरअंदाज कर रहे है। वरना..”
रजाकचा पारा चढू लागला होता. केदार चक्रावून गेला. तो पुन्हा पुन्हा सान्वी आत गेल्याचं सांगत होता पण रजाक मान्य करत नव्हता. इतक्यात रजाकचे काही मागे राहिलेले मेहमान, जवळपास असणारे नोकरचाकर त्यांच्याजवळ गोळा झाले. केदार रडकुंडीला आला होता. पार्टीची धुंदी, तो आनंद आता पार ओसरून गेला होता. कोणी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हतं.
“शेखसाहब, आप झूठ बोल रहे हो। मुझे पता है मेरी बीवी अंदर है। आप उसे क्यूँ छुपा रहे हो? मुझे अंदर जाकर देखना है।”
केदार निग्रहाने म्हणाला.
“देखिये केदारजी, हम वहाँ आपको लेकर जा नही सकते। हमारे यहाँ किसी भी गैर आदमी को जनानखानेमे जाने की इजाजत नही है। आप अंदर गये तो हमारे घरकी औरते नाराज होगी और कभी सामने नही आयेगी। हम आपसे कह रहे है की, आप अकेले आये थें फिर भी आप वही बात बार बार दौहरा रहे है। अब बहुत देर हुई है। आप यहाँसे निकल जाये, खुदा हाफिज।”
रजाकने केदारला जवळ जवळ बंगल्याबाहेर हाकलूनच दिलं होतं. केदार ओरडत होता. रडत होता.
“प्लिज शेखसाहब, माझ्या सान्वीला सोडा. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. प्लिज माझ्यावर उपकार करा. तिला सोडा. रजाक.. शेखसाहेब.”
तो आक्रोश करू लागला. रजाकने त्याच्या नोकराला आदेश दिला.
“यहाँसे दफा करो दो इसे।”
नोकरांनी त्याला उचलून पॅलेसच्या प्रवेशद्वाराबाहेर फेकून दिलं. केदार उठून दरवाजा वाजवू लागला. तो मोठमोठ्याने सान्वीला आवाज देऊ लागला. ते पाहून प्रवेशद्वारापाशी असलेल्या सिक्युरिटीने त्याला तिथून हाकलून दिलं.
पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© अनुप्रिया.
© अनुप्रिया.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा