Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

अथांग.. भाग १०

Read Later
अथांग.. भाग १०

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग.
© अनुप्रिया.

अथांग.. भाग - १०

इब्राहिमसुद्धा चक्रावून गेला होता. इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांनी संपूर्ण बंगला पिंजून काढला. नोकरांची, घरच्यांची कसून चौकशी केली तरी सान्वीचा तपास लागत नव्हता. सान्वी अचानक कुठे गायब झाली काहीच समजत नव्हतं. तिथून बाहेर पडल्यावर केदार अजूनच हताश झाला.

“मिस्टर केदार, आप चिंता मत किजीये। हम फिरसे अच्छेसे तहकीकात करेंगे। वैसे भी सब पुलिस स्टेशनमें हमने खबर कर दियी है। वहाँसे जरूर कुछ ना कुछ तो खबर मिलेगी। थोडा सब्र रखिये जनाब।”

इब्राहिम केदारला धीर देण्याचा प्रयत्न करत होता पण केदारचा धीर खचत चालला होता. दिवसांमागून दिवस सरत होते. एकेक क्षण त्याला एका युगासारखा भासत होता. रोज पोलीस स्टेशन आणि इंडियन एम्बेसी ऑफिसच्या वाऱ्या करून तो वैतागला होता. इब्राहिमही कसून शोध घेत होता पण कोणतीही गोष्ट हाती लागत नव्हती. युसूफमुळे अनोळखी शहरात राहण्याचा प्रश्न तर मिटला होता पण तरीही त्याच्यावर विसंबून किती दिवस राहणार? केदारचे बाबा त्याच्या अकाउंटला पैसे पाठवत होते पण ते तरी किती दिवस मदत करू शकणार होते? लवकरात लवकर सान्वीचा शोध घेणं गरजेचं होतं. सान्वी सापडण्याच्या सर्व आशा मावळत असताना इब्राहिमच्या तपासामुळे केदारला अजून एक आशेचा किरण दिसला. एक दिवस इब्राहिम खूप महत्वाची बातमी घेऊन केदारला भेटायला आला.

“जनाब, हमने आपके बीवी के मोबाईल नंबरपे आये कॉल्स को चेक किया; हमे पता चला है की, उन्हे लास्ट कॉल ओमानसे आया था और वो नंबर किसी अन्वर अन्सारी के नाम पे दर्ज है।”

इब्राहिमला मधेच थांबवत केदारने विचारलं,

“लेकिन सर, अन्वर अन्सारी का इस केससे क्या कनेक्शन?”

त्याच्या प्रश्नावर गंभीर चेहरा करत इब्राहिम म्हणाला,

“कनेक्शन है जनाब, क्यों की उस शाम आपके बीवी को आखरी कॉल अन्सारीने किया था। हमने अन्सारी के ऍड्रेसपर पडोसी लोगोंसे पूछताछ कियी। हमे ये खबर मिली है की, कुछ लोगोंने आपके बीवी को अन्सारी के साथ देखा है।”

“व्हॉट?”

केदार आश्चर्याने जवळजवळ उडालाच.

“क्या आप अन्वर अन्सारीको जानते है? आपके या आपके बीवीके दोस्त या रिश्तेदार?”

“नही सर, इस शहरमें इस नाम का मेरा कोई भी दोस्त नही है और मेरे बीवीने भी कभी मेरे सामने इस नामके किसी दोस्त का जिक्र नही किया।”

केदारच्या बोलण्यावर इब्राहिम विचार करू लागला. इतक्यात इब्राहिमला एक कॉल आला. तो कॉलवर बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले.

“हमे कलही इंडियन एम्बेसी ऑफिसरके साथ बात करनी पडेगी। ये तहकीकात कुछ अलग मोडपे आ गयी है। कल मिलते है। खुदा हाफिज।”

असं म्हणून इब्राहिम अचानक तिथून घाईघाईत निघून गेला. युसूफ आणि केदार एकमेकांकडे पाहतच राहिले. केदार विचार करत राहिला.

“इब्राहिमला अचानक काय झालं? असं का तो तडकाफडकी निघून गेला? मनाला कितीही आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी ते सैरभैर होतच. ‘मन चिंती ते वैरी न चिंती.’ अशी माझी अवस्था झालीय. कशी असेल माझी सानू? शेखने तिला कुठे गायब केली असेल? तिच्यासोबत काय झालं असेल? ती जिवंत तरी असेल का? त्याने तिला मारून तर टाकलं नसेल असे मलाच प्रश्न पडू लागलेत.”

तो स्वतःशीच पुटपुटला. काहीच कळायला काहीच मार्ग नव्हता. दुसऱ्या दिवशी केदार आणि युसूफ इंडियन एम्बेसीच्या ऑफिसला पोहचले. ऑफिसमध्ये पोहचताच रिसप्शनिस्टने त्यांना आशिष यांच्या केबिनमध्ये जाण्यास सांगितलं. दारावर टकटक केली आणि आशिष यांनी अनुमती देताच केबिनचं दार उघडून ते आत केबिनमध्ये आले. समोर पाहिलं तर ऑफिसर इब्राहिम आधीच आशिष यांच्या केबिनमध्ये बसला होता. आशिष यांनी बसायला सांगितलं. गळा साफ करून इब्राहिमने बोलायला सुरुवात केली.

“जनाब, हमने जब इस केसपर काम करना शुरू किया था, तब हमे ये किडनॅपिंग केस लग रही थी। लेकिन अब पूरी तरह तहकीकात करने के बाद हमे लग रहा है; ये किडनॅपिंग केस नही है। रजाक शेख का इस केस के साथ कोई संबंध नही है। इनकी बीवी अपनी खुशीसे ये अन्वर अन्सारीके साथ भाग गयी है।”

“व्हॉट नॉन्सेन्स! क्या बात कर रहे हो आप सर? मेरी बीवी ऐसा क्यूँ करेगी? हमारी नई नई शादी हुई थी। हम हमारे रिश्तेसे बहुत खुश थें; फिर वो क्यूँ भाग जायेगी? सर, आप झूठ बोल रहे हो। ऐसा हो ही नही सकता। क्या सबूत है आपके पास?”

केदार उद्विग्न झाला होता. ऑफिसर आशिषकडे पाहत तो म्हणाला,

“सर, इब्राहिम साहब झूठ बोल रहे है। जरूर ये किसीकी साजिश है। मेरी सान्वी ऐसा काम कभी नही कर सकती। शायद ऑफिसर इब्राहिम इस केसको बंद करना चाहते है। वो इस तहकीकात को यही रोकना चाहते है; इसलिए अब ये कोई और नई कहानी बना रहे है। सर आपही सोचिये, हम लोग इस शहर में नये है; फिर हम इस शहरके किसी अन्सारी को कैसे जानते होंगे?”

“मिस्टर केदार, माईंड युवर लँग्वेज। आप हमारे कामपर, लॉयल्टीपर बेवजह शक कर रहे हैं। हमने हमारा काम पूरी इमानदारीसे किया है। आप अन्सारीको नही जानते लेकिन आप की बीवी? शायद वो अन्सारी को जानती होंगी वरना किसी गैर आदमीके साथ वो भागती नही। देखिये जनाब, आप की बीवी किडनॅप नही हुई; वो शायद अन्सारीके साथ भाग गयी है और हमारे पास वैसे प्रूफ है। बिना सबुतोंके हम ऐसेही किसीपे इल्जाम नही लगाते।”

असं म्हणत त्याने त्याच्या बॅगेतून एक मोठं पाकिट बाहेर काढलं आणि आशिष यांच्यासमोर ठेवलं. ऑफिसर आशिष यांनी ते पाकीट उघडून पाहिलं. त्यात काही फोटोग्राफ्स होते. ते फोटोज पाहून ते एकदम आश्चर्यचकित झाले.

ऑफिसर आशिष यांनी काय पाहिलं? सान्वी कुठे असेल? तिचा शोध लागेल का? पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© अनुप्रिया.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

निशा थोरे (शिवप्रिया - शब्दस्पर्श)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.

//