अतर्क्य ( भाग ९)

अतर्क्य ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे . सत्य घटनेशी कथेचा संबंध नाही.


अतर्क्य ( भाग ९)
--------------------------
चार - पाच तासांच्या अथक प्रयत्नाने बस सुरु होते. जानकी चा प्रवास पुन्हा सुरु होतो. ती प्रवासात एकटीच व पहिल्यांदा लांबचा प्रवास एकटीने करण्याचा योग खूप वर्षांनी आला होता. बस चालक मध्येच एक धाबा पाहून बस थांबवतो. सर्व प्रवाशी फ्रेश होण्या करिता व नाश्त्या करिता उतरतात जानकी च्या शेजारी बसलेल्या काकू तिला देखील उतरण्यास सांगतात . मग दोघी एकत्रच खाली उतरतात. धाब्याच्या आवारात कुठून तरी कोणी तरी कावेरी म्हणून हाक देत असत हे जानकी च्या कानावर पडत. हे नाव ऐकताच तिच्या डोळ्यां समोर सासरच चित्र उभ राहत. कावेरी , शंभूराजे आणि त्या विचारांची गर्दी पुन्हा जमा होण्यास सुरु होते. जानकी तिथे काहीही न खाता फक्त चहा घेऊन बसमध्ये चढते. पुढे अजून २ अडीच तासांचा प्रवास तालुक्या ला पोहोचण्यास. तिथून एक तास पुढे गाव असा एकंदरीत ३ साढे तीन तासाचा प्रवास. विचार चक्र पुन्हा भूतकाळात नेऊन परत वर्तमानात आणून आदळत होत. काय नेमक हे प्रत्यक्षात गेल्या शिवाय कळणार नव्हत. बस संध्याकाळी ४ वाजेपर्यंत तालुक्याला पोहोचली होती. घरी गेल्यानंतर संपर्क साधणे अवगढ होईल या विचाराने जानकी बसस्थानकातील पी .सी .ओ ने मामा च्या घरी फोन करून आपण सुखरूप पोहोचल्याचे कळवते. फोन वर बोलण संपेपर्यंत गावी जाण्याची मुक्काम बस लागलेली असते. जानकी बस मधे बसते व सुरु होतो पुन्हा त्या काटेरी टोचणाऱ्या जगात जाण्याचा प्रवास. जो फक्त १ तासाच्या अंतरावर असतो.
कावेरी बद्दल मनात राग, तिच्या असलेल्या अनैतिक संबंधाच्या विचारांचा द्वेष एवढ असूनही मन मात्र मानत नव्हत. सासरच्या घरात जे घडत होत त्या परिस्थितीने अजाण जानकी, डोळ्यांसमोर असलेली परिस्थिती , डोक्याने लावलेले तर्क हे या अतर्क्य परिस्थितीत मनाचे काहीच ऐकण्यास तयार नसते.
गावी कावेरी चे हाल पाहण्या सारखे नव्हते. दोन्ही मुल गमावून बसलेली ती. काहीतरी अघटीत घटत आहे असे वाटत होते तिला पण काय करावे ? हे कळण्या पलीकडचे होते. सासू अशा परिस्थितीत देखील तोरा काय सोडत नव्हती. काळजी घेण तर लांब उलट या घटनांची जबाबदार फक्त कावेरी ला ठरवत असते . आजवर कावेरी ला माझी बाय म्हणणारी सासू अचानकच तिला गृहीत धरून टोचून बोलू लागते. लहान बाळ प्रतीक हा एकच आता. त्याला कावेरी चुकून देखील एकट्याला सोडत नव्हती. मनात भिती , दुःख अशी काही संमिश्र स्थिती कावेरी ची होती. एवढे मोठ डोंगर कोसळले असता तिची स्थिती अजून यापेक्षा वेगळी काय असणार होती. संध्याकाळ होत आली होती. सासूचे आपले सुरुच झाले होते रोजच्या सारख "कावेरी लागतेस का आता तरी जेवणाच्या तयारीला ? का कोणी येणार आहे तुला भरवायला ?"
कावेरी काकुळतीला येऊन उठते व स्वंयपाक घराकडे वळून जेवण बनविण्याच्या तयारीस लागते.
गावातील बस थांबा येथे मुक्काम बस येते. गावाच्या वेशीत संध्याकाळी पुरुष मंडळी जमलेली असतात तसेच त्या दिवशी ही जमलेली असतात. बस थांबताच जानकी बस मधून उतरते तशी शंभूराजे ची नजर तिच्यावर पडते. जानकी म्हणत आवाज देत तो सरसर तिच्या कडे जातो हातातील सामान घेत " अशा अचानक सांगायच तरी एकदा " इतक्यात जानकी " दे ते सामान माझ मला" जानकी च्या मनात राग होता ,चीड होती. तिला विचार येतो की जर \"आताच स्पष्ट केल तर हाती लागणार नाही काहीच \" म्हणून ती परत हसतच "अस खास काही नाही शंभू मला आठवण येत होती इथली . तसही हेच माझ घर नाही का?" अगदी सामान्य पणे दोघ बोलत घरी पोहचतात. शंभू काहीच कल्पना देत नाही जे झाल त्या बाबतीत . जानकी पूर्णपणे अजाण तिने स्वप्नातही विचार केला नसावा असे काही पुढ्यात वाढून ठेवले असेल.
जानकी दरवाज्यावर पोहोचते. खुप दिवसांनी घरी परतली होती ती. मनातील राग मात्र कोणत्याच चांगल्या आठवणींना जागा देत नव्हता. तरी ती सामान्य व्यवहार करत होती. सासूबाई घरातील मागच्या अंगणात होत्या जानकी आल्याच त्यांना कळत देखील नाही. जानकी घरात येऊन अंगणात हात पाय धुते. कावेरी स्वयंपाक घरातून बाहेर येते आवाज ऐकून. जानकी ला पाहताच तिच्या सहनशक्तीचा बांध फुटतो.
जानकी तिच्या निस्तेज , कोमजलेल्या चेहर्‍याकडे पाहातच राहते.


नियतीने अजून काय खेळ मांडला असावा ? जानकी ला घडलेली परिस्थिती कळली तर तिचे मत काय असणार ? आता जानकी कोणता पवित्रा घेणार ?
एकच उत्तर : वाचत राहा अतर्क्य .
( काही जातीय कारणास्तव भाग उशीरा येत आहे याबद्दल खंत व्यक्त करते. क्षमस्व)
================
लेखिका : शगुफ्ता ईनामदार
---------------------------

🎭 Series Post

View all