अतर्क्य ( भाग :४)

अतर्क्य ही कथा एका स्त्री च्या आयुष्यात येणाऱ्या चढउतारा वर आधारीत आहे. ही एक काल्पनिक कथा आहे.

अतर्क्य ( भाग :४)

------------------------------

जानकीचे मामा मामी शहरात स्थायिक होते. दोन वर्षापूर्वी जानकीच्या बाबांचे हृदयाच्या झटक्याने निधन झाले होते. तिची आई नंतर याच काळजीत वर्षभरात परतीच्या प्रवासाला गेली होती. जानकी चा एकच मोठा भाऊ असतो जो आई वडिलांच्या निधनानंतर परगावी स्थायिक होतो व तेथेच स्थायिक असलेल्या एका भारतीय कुटुंबातील मुलीशी लग्न करतो . मामा - मामी तसे चांगले असतात . त्यात जानकी ही कधीच कोणाकडे न जाणारी म्हणून मामा - मामी तिच्या येण्याने खुप खुश असतात . मामा ( विठ्ठल) याला २ मुलच असतात म्हणून त्याला देखील मुलीची फार हौस. जानकी येणार म्हणून मामा देखील बाजारातून तिला काय आवडत असेल याची कल्पना करून खाण्याकरिता गोड - धोड आणतात .


   जानकी संध्याकाळी ६ वाजता बसस्थानकावर पोहोचते . मामेभाऊ अमोल तिला नेण्यासाठी आधीच बसस्टॅन्ड वर आलेला असतो. बस थांबताच तो धावत जाऊन दिदी - दाजी करत आवाज देऊन बस मधून उतरताना सामान घेण्यास मदत करतो . जानकी बस मधून खाली उतरताच चोहीकडे पाहू लागते. १०-१५ वर्षापूर्वी शहरात आई- बाबा असताना आलेली जानकी शहरातील वर्दळ नजरेखालून घालत अमोल लाः

 " कसा आहेस अमोल ? किती रे ही गर्दी ?"

 " मी बरा आहे ताई . तु अन दाजी बरे आहात ना? त्रास तर नाही ना झाला प्रवासात काही ? " अमोल.

" आम्ही बरे हाव, न्हाय काय एवढ चांगलच झाला प्रवास ." विलासराव .

 " चला लवकर घरी जाऊया . आई- बाबा वाट पहात असतील . " अमोल असे बोलत त्यांच्या बॅगा वगैरे टॅक्सी जवळ नेतो. सर्व सामान टॅक्सीच्या वर ठेवून जानकी - विलासरावांस बसण्यास सांगतो . १५मि. ते घरी पोहचतात . मामी त्यांचे स्वागत करते जानकी - विलासराव घरात प्रवेश करतात. दिवस मावळतीला असतो. मामाच्या घरात सगळे जानकीच्या येण्याने खुप खुश असतात . छान गप्पा रंगतात या सर्वात रात्रीचे जेवण देखील लवकर आटपून सर्व जण झोपण्याची तयारी करतात. विलास राव जानकी ला सोडून २ दिवसात गावी परतणार असतो त्यामुळे त्याच्या हजेरीत दवाखान्याची पहिली भेट देणार असल्याने मामांनी सकाळीच दवाखान्यात अपाँईंट मेंन्ट घेतलेली असते. 

 मामा जानकीला : जानकी तुझे सर्व रिपोर्ट झोपण्यापूर्वीच एकत्र ठेव शेवटची रिपोर्ट गरजेची आहे ती आठवणीने बाजूस ठेव . कस सकाळी घाई व्हायला नको.


जानकी : हो मामा ठेवली आहे रिपोर्ट बाजूस . पिशवीच वेगळी केली आहे त्याची .


 सर्व जण झोपण्यास जातात. आज खुप दिवसांनी जानकी- विलासराव एका खोलीत असतात . दोघेही प्रवासात थकले असल्याने जास्त वेळ न दडवता झोपी जातात. 

  सकाळी लवकर उठून सर्व आवरा आवर करून मामा मामी, जानकी व विलासराव दवाखान्यात जाण्यास निघतात . दवाखान्यात डॉक्टर सर्व तपासणी करतात तर सिस्ट असल्याचे कळते पण याला ऑपरेशन शिवाय बर करता येण्याची शाश्वती मिळाल्याने जानकी स्थिरावते . तिला लगेच दवाखान्यात ऍडमिट करून घेतले जाते. आठ दिवस इलाज सुरु राहणार होता तसेच डॉक्टरानी महिनाभर आराम करण्यास सांगितलेले असते म्हणून मग विलासराव एक दिवस आणखी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी गावी जाण्यास निघतो. काही पैसे मामाकडे देतो इलाजाकरिता व जानकीला दीड महिना तेथेच आराम करण्याचे सांगून निघतो. 

    जानकी तिच्या मामी सोबत दवाखान्यात जाते असेच आठ दिवस हीच दिनचर्या सुरु असते. आता जानकीला बरे वाटू लागते. तिची मामी देखील कसलीच सर राहू देत नाही तिच्या देखरेखीत . एक दिवस मामी स्वतःहून जानकी ला म्हणतात " जानकी, अग कावेरी ला मुल झालीत. आपण जिथ तुझ्या गाठीचा इलाज केला ना त्या डॉक्टर खुप हुशार आहेत एकदा विचारून तु इथे आहे तो पर्यंत इलाज करून घेऊ . परत यायच जमणार नाही तुला इतक निवांत . आपण दोघीच जाऊया उद्या तसही फेर तपासणी करिता जाणार आहोतच ." 

    " खरच अहो मामी जाऊया आपण . मला पण आई व्हायच आहे." जानकी .

  जानकी च्या डोळ्यासमोर कावेरी ची मुल येतात , आपल्या पोटावर हात ठेवत तिला अश्रू अनावर होतात व रमाबाईचे शब्द कानात घुमत असतात .

  मामी जानकीला सावरतात " रडू नको पोरी होईल नीट सर्व . आताच्या काळात अशक्य अस नाही ग राणी काहीच . गावी सुविधा नसल्याने राहिल पण आता इथे आहेस मग उशीर नको करायला." मामी .

जानकी होकारार्थी मान डोलावून अश्रू पुसते . " मामी उद्या दुपारी जायच आहे ना परत जाऊया आपण . आता काही तरी छान जेवण बनवू आपण दिवस सरतीला आला मामा येतीलच" जानकी .


मामी व जानकी दोघी किचन कडे वळतात व जेवणाची तयारी करू लागतात . रात्री जेवण वगैरे करून जानकी झोपी जाते एका नवीन उमेदीच्या आशेवर .


सकाळी लवकर उठून जानकी व मामी दोघी मिळून घरातील कामे आटोपतात . जानकी चे मामा आज कामानिमित्त लवकर निघतात घरातून . 

मामी ( जानकी ला):

" जानकी ते रिपोर्ट तेवढे घे आठवणीने सर्व, येथे आल्यानंतर तु दिलेल्या पिशवीत तुझे काही आधीचे रिपोर्ट पण होते . ते कपाटात आहेत , ते पण घे आठवणीने . जाऊ मग आपण ही नाश्ता करून ." 


जानकीः " घेतले आहेत मामी सर्व रिपोर्ट ". 


दोघी मिळून दवाखान्यात जातात. दवाखान्यात आपल्या नंबर ची वाट पाहात बसतात . जानकी च्या मनाची घालमेल सुरु असते . आजवर केलेले तिचे उपाय व्यर्थ गेलेले असतात. अजून पर्यन्त मात्र कधी च जानकी ला डॉक्टरां जवळ जाण्याची संधा मिळालेली नसते. कधी तसा प्रसंग आलाच तर विलासराव तिचा नवरा सोबतच असायचा . कावेरी ची मुलं हिला आई म्हणत असली तरी घरातील लोकांच्या हिणवण्याने ती खुप निराश झाली होती वैतागली होती . आजचा दिवस हा तिच्याकरिता सोनीयाचा दिवस ठरेल अशी एक आशा तिच्या मनात घर करून गेली होती दवाखान्यात अशा अनेक स्त्रिया तिला दिसत होत्या ज्यांना दहा - पाच वर्षात मुल नव्हत पण आज त्या उमेदीने होत्या . जानकी हताश असली तरी नवी वाट तिला बऱ्याच वर्षात पहिल्यांदा तिला दिसत होती.

विलासराव सोबत नसल्याने त्याच्या उपस्थितीत असणारा तणाव देखील कमी होता. आज तिला जुनी स्वप्न पुन्हा नव्याने पाहायला मिळत होती . दवाखान्यात सर्वत्र तिची नजर फिरत होती. इतक्यात बेल वाजते नर्स आवाज देते जानकी तशी ती हो म्हणत उभी राहते . मामी सोबत डॉक्टरांच्या कॅबिन जवळ जाते . केसपेपर तसेच आधीचे रिपोर्ट आधीच डॉक्टरांकडे नर्स घेऊन जाते . जानकी कॅबिन च दार उघडून आत जाते . डॉक्टर एक प्रसन्न चेहर्‍याने स्मित हास्याने जानकी ला म्हणते "ये जानकी बस , सोबत कोण आहेत ?"

" मामी आल्या आहेत माझ्या" जानकी. 

 जानकी मामी ला सोबत बोलावते .


डॉक्टर : जानकी, तुझ्या रिपोर्ट वाचल्या आहेत मी . तुला एकदा चेक करते व काही प्रश्न विचारते .


जानकी फक्त होकारार्थी मान डोलावते .


डॉक्टर : ये इथे झोप . 

 म्हणत टेबलवर झोपवून तपासते . 


आता डॉक्टर जानकी ला काही प्रश्न विचारतात .

   हे प्रश्न जानकी ला हादरवून सोडतात . हे प्रश्न त्यांची उत्तर तसेच डॉक्टर ने ही केस कशी हाताळली वाचूयात पुढच्या भागात .

___ ______________

 क्रमश : 

 ==========

  ( काय बरं बदल घडणार आहेत जानकीच्या आयुष्यात ? तुम्हाला काय वाटत?)

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

लेखिका : शगुफ्ता ईनामदार

🎭 Series Post

View all