अतर्क्य भाग ३

हि कथा एका स्त्री च्या आयुष्यात तिला सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांची आहे

अतर्क्य ( भाग /३)
----------------------------------------
घरात नवीन पाहुण्याच्या येण्याने लगबग असते . सर्व आनंदी असतात . रमाबाई देखील जानकी ला टोचून बोलण्यास स्वतःला आवर घालतात . जानकी देखील प्रत्येक कामात रमाबाईची मदत करत असते.
  विलासराव दुपारी शेतातून घरी परततो . हातपाय तोंड धुवून घरात प्रवेश करतो . रमाबाई घराच्या चौकात गोधडी घेऊन बसलेल्या असतात विलासराव घरभर नजर फिरवत ; आई साहेब काय आज शांत शांत घर आाणि तु काय घेऊन बसलीस ते ? 
 " काही नाही खास , म्हणल दुपट्या बनवाव्या माझ्या नातवाला " 'रमाबाई .'
" आई अगं एक सांगायच होत ?"    विलासराव. 

" विचारायच काय त्यात बोल कि"  रमाबाई .

" मी डॉक्टरांना विचारल होत ते ऑपरेशन च . म्हणलं बास ३ पोरं". विलासराव 

"नगं आपरेशन वगैरे तस काय उगा पैसा जातुया , असच बी थांबल" रमाबाई विलासरावा वर खिन्न नजर टाकत . 

" आई यात वाईट वाटायचे काय? माझ्या इभ्रती पायी कावेरी गप असतीया" विलासराव .

रमाबाई जरा सुर चढवत "गप हाय म्हंजी ? मुकी च  हाय नव्ह ? " 
 खोलीतून बाळं रडण्याचा आवाज येत असतो रमाबाई दुपटी तशीच टाकून खोलीत जातात . कावेरी ला अजून स्वतःला उठता  येत नसत म्हणून त्या बाळाला उचलून कावेरी ला देतात .
 विलासराव जानकी ला आवाज देतो " जानके ... कुठ हाय ? ताट लाव मला " .

 " लावते ताट या बसा" जानकी .
 
 विलासराव जेवन करून परत  शेताकडे जातो . 
  कावेरीची दोन्ही मोठी मुल कार्तिक , दूर्वेश जानकी कडे येऊन खेळत असतात . जानकी देखील त्यांच्यात रमते . ती मुल जेव्हा तिला मोठी आई म्हणतात तेव्हा तिला वाटत कि देवा का मला अस केलस रे ? असो ही पण माझीच कि .
    एखाद्या वाऱ्याची हळुवार झुळूक जावी व कळू नये असे दिवस जातात . यांच आपल रोजच नित्यनियमाचे काम सुरु असतात  पण म्हणतात ना  'खेळ कुणाला देवाचा कळला' तशीच एक पहाट होते नी जानकीच सर्व जगच पालटत .
    एक दिवस सकाळी जानकीच्या पोटात अचानक कळा येऊन पोट दुखू लागत . तो त्रास तिला असह्य होतो. दवाखान्यात घेऊन जातात डॉक्टर सर्व तपासून झाल्यावर सांगतात पोटात गाठ झाली आहे . लवकरात लवकर मोठ्या दवाखान्यात दाखल करून ऑपरेशन करावे अन्यथा जीवाला धोका आहे असा सल्ला व काही औषधे देऊन घरी पाठवण्यात येते. डॉक्टर शहरातील एका डॉक्टरचा पत्ता व नंबर देतात .
   रमाबाई या काळात जानकीच्या जरा जास्तच जवळीक निर्माण झालेली असते म्हणून या वेळी रमाबाई विलास ला म्हणतात 
" तिच्या मामाकडे सोड नेऊन हे घे काही पैसे दे वेळेस लागतील, मामा ला कळव तिच्या दोन दिवसांनी येतोय म्हणून . अन तु जा पाठवायला खुप केलय तीने यावेळी घरात आखिरला मी पण बाई हाय नव्ह ".
   जानकी तिच्या मामाला फोन करून कळविते व दोन दिवसात जाण्याची पूर्ण तयारी करते . जानकी तिचे रिपोर्ट घेते त्या रिपोर्ट च्या पिशवीत चुकून एक अशी वस्तू देखील जाते जी तिच्या येणाऱ्या आयुष्याचे चित्र पालटते . 
   जानकी व विलासराव सकाळी पहिल्या बसने निघण्यास तयार होतात. रमाबाई देखील त्यांचा डबा व जानकीच्या मामा - मामी करिता  घरातील थोड्या डाळी , लोणचे , शेतातील कणस बांधून देते सोबत . जानकी ला रमाबाईचे हे रुप पाहून सुखद धक्का बसतो . जानकी सासूच्या  पाया पडते व निघते . 
रमाबाई विलास ला " सुखरूप जा अन पोहोचल्यावर आप्पा साहेबाच्या कडे फोन कर रे ." 
 त्यांच्या गेल्यावर रमाबाई स्वतःलाच प्रश्न करतात 'आज का बरं त्या जानकी साठी ऐवढ आपलस वाटल असाव बर ? बर आसुंदेत ती पोर तरी कोणाकडे जाणार बाय , माय-बाप न्हाय यात तिची सत्त्व परीक्षा मुल बी न्हायत . डॉक्टर सायबानी तर ती कवर  जिल याची बी खात्री न्हाय दिली . पोरीन लई सोसलय . कुलदेवी तुच न्याय कर बाई तिचा '. 
   जानकी विलासरावा सोबत पुढच्या प्रवासाला निघते . शंभू त्यांना सोडण्यासाठी एस टी स्टॅन्ड वर सोबत आलेला असतो . 
 जानकी कडे पाहात शंभू ला उर भरून येत . भरल्या डोळ्यांनी हात जोडून " जानकी ! माफ करशील नव्ह मला . लई त्रास दिलाय या घरात तुला . लवकर परत ये बरी होऊन ." 
 " येईन भाऊजी काळजी नका करू तुम्हा सर्वाचा आशीर्वाद हाय सोबत ." जानकी 
 १० मि. नंतर 
  बस लागते व जानकी विलासराव निघतात .
=========================
क्रमशः 
_________________
( तुम्हाला काय वाटत जानकी बद्द्ल ? ती परत येईल ना? अस काय घडणार आहे तिच्या येणाऱ्या आयुष्यात ?) नक्कीच रिप्लाय / कमेंट करा. 
_______________________
 लेखिकाः शगुफ्ता ईनामदार, मुल्ला .