अतर्क्य ( भाग १०)

अतर्क्य ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. सत्य परिस्थितीशी याचा काही संबंध नाही

अतर्क्य ( भाग १०) 
-------------------------------
  जानकी हात पाय धुवून अंगणात उभी असते कावेरी च्या निस्तेज चेहर्‍याला पाहत असताना ती काही वेळ आपला राग विसरते व कावेरी जवळ जाते. कावेरी जानकीच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडते. नकळत जानकिच्या ही डोळ्यांतून अश्रू वाहतात. जानकी  ला काही तरी झाल आहे घरात याचा अंदाज येतो . घरभर नजर फिरवते जानकी , घराच गोकुळ करणारी मुल ही आपली नाही हे जानकीला आता ठाऊक असलं तरी  ,तिला ही कोणाची याचा ठाव घ्यायचा होता. या मुलांमधे जानकी ही रमली होतीच. शंभू सामान घरात ठेवून अलगद घरातून बाजू झाला होता. पुढे काय होणार आहे ?  याची कल्पना त्याला आली होती. जानकी मुलां बद्दल विचारते , कावेरी खाली बसते तिचा तोल जातो, बसून कावेरी ईशार्‍याने गेली म्हणत जीवाच्या आकांताने रडते. सासूला कावेरीचा आवाज येतो तशी ती बडबड करत मागून ती घरात येते " ये दळीद्र , का रडतीस , सोन्यासारखी मुल गमावली अवदासनीने . तुझ्या मुळ गेली माझ्या घराची वारस " . अशी बडबड व राग करत जशी सासू स्वयंपाक घराकडे येते जानकीला पाहता तिच्या पाया खालची जमीन सरकते. पुन्हा सासूच सुरु होत " जानकी , काय ग मुल गेली आपली कायमची सोडून , ह्याच ह्याच अवदासीनी मुळे गेली गं पोर" . जानकीला धक्का बसतो हे सर्व ऐकून पाहून . तिची व विलासरावाची मुल जरी ती नसली तरी त्या निरागस मुलांमधे जानकी आपलं आईपण बघायची त्यांच्या मुळे ती आई झाली होती. जानकी समजुतदार पणे सासू व कावेरी ला शांत करते. इतक सर्व घडलेल असताना तिला कोणत्याच गोष्टीची जराशी खबर  देखील कोणी दिलेली नसते . दोन दिवसात जानकीला सर्व काही कळत जे काही घडलेल होत. आता घरात एकच मुल होत पण जानकीला त्याच्यावर इतक जीव येत नव्हता कुठे तरी तिला आतून या गोष्टीने मारा केला होता की ही मुल आपली नाहीत. जानकी शांत पणे आपल्या कामाला लागते. विलासराव दोन दिवस घरी आलेला नसतो . तिसऱ्या दिवशी विलासराव घरी येतो जानकी ला पाहताच त्याला काही सुचेनासे होते. मुल गेल्याच दुःख तो बोलून रडतो. पण ते रडण नाटकी असत हे जानकी ला कळून चुकत. 
  जानकी घरात येऊन महिना उलटत आला होता. तिच्या हाती कसलच काही सापडत नाही . कावेरी ने लिहलेल देखील नाही. एकेदिवशी कावेरी भांडी घासत असताना तिच्या तोंडून ताई म्हणून जानकी ला आवाज देते. तिची वाचा येते जानकी ही खुश होते पण तिच्या मनात रागाने घर केलेले होते. घरात आनंद व काळजी असे संमिश्र वातावरण कावेरी ची वाचा येण्याने असते. शंभूराजे यास जे कारस्थान घरात सुरु होते याची पूर्वकल्पना असते. शंभू वेळ न दडवता काहीतरी कामाच निमित्त देऊन १५-२० दिवसात घरातून कायमचा निघून जातो व या सर्वांमधून आपला काढता पाय घेतो.  
   कावेरी ला बोलण्यात थोड थोड अडखळ होत होती. जिथे कावेरी आनंदी होती त्या वेळी कोणीच आनंदी नव्हत हे मात्र खर. कावेरी ला तिची मुल गेल्याच दुःख होतेच व तिला असे काही कळले होते की यामुळे तिला धोका होता घरात. पुढे जानकीला एके दिवशी सफाई करता करता कावेरी ने लिहून ठेवलेली वही हाती लागते. यात मुलांच्या अपहरणा पासून ते पुढील घडलेल्या घटना कावेरी ने लिहलेल्या होत्या. जानकी पटकन  दरवाजा आतून बंद करते व ती वही वाचू लागते. काही निष्कर्ष ती स्वतः च लावते पण ते कितपत योग्य होते याची अजून काहीच शाश्वती नव्हती. दुसऱ्या दिवशी जानकी कावेरी व तिच्या बाळाला घेऊन बाहेर जाण्यास निघते पण विलासराव आडवा येतो. कावेरी थरथरत होती त्याला पाहून.  
" कुठे चाललीस हिला घेऊन ? दोन मुल गेलीत हे ठाव न्हाय का?" विलासराव . 

" सर्व माहिती आहे मलाही कोण काय करतय ते . पण आता जाऊ द्यात आम्हाला बाळाला बर नाहीये ".  जानकी .

विलासराव आपल्या वर ठाम असतो तो जानकीला बाहेर जाऊ देत नाही. कावेरी देखील गपगुमान खोलीत जाते. 

विलासराव धमकी वजा ताकीद देऊन निघून जातो. पाटलांच्या घरी जानकीच्या मामाकडून फोन होता. मामांना  हृदयविकाराचा  झटका आला होता. ही बातमी कळताच विलासराव खूश होतो कारण जानकीला पाठवण्याच अजून एक कारण मिळत. सोबतच त्याचा आखलेला खेळ पूर्ण होणार होता ज्याची सुरुवात जानकी नेच केली होती. 
विलाराव घरात ही बातमी देऊन दुसऱ्या दिवशी जानकीच्या पाठवणीची तयारी करतो. रात्री पुन्हा फोन येतो व मामा गेल्याच कळत. जानकीला याचा धक्का बसतो. अंतिम कार्याला घरातून जानकी व औपचारिकते साठी सोबत सासू जाते. विलासराव स्वतः जाण्यास नकार देतो. यामागे त्याचे स्वार्थ असते. सासू व जानकी दोघीच शहराकडे निघतात. सर्व कार्य झाल्यानंतर सासू जानकीला तिथेच सोडून निघते. 
    कावेरीला विलासराव बेदम मारतो. आपल तोंड बंद करून ठेवायच बजावतो. सासू देखील कावेरीला ऐकवते शहरातून आल्यावर . कावेरी आता घरात नकोशी झाली होती कारणही तसच होत विलासरावाच पितळ उघडे पडणार होते. पण कावेरी अजूनही अज्ञात होती कि विलासराव बाप बनू शकत नाही . 

क्रमश : .....
-------------------------
लेखिका : सौ .शगुफ्ता ईनामदार - मुल्ला

🎭 Series Post

View all