अतर्क्य ( भाग २ )

अतर्क्य ही काल्पनिक कथा आहे. स्त्री जीवनात येणारे चढ- उतार , प्रत्येक वेळीस तिला ज्या आव्हानांन?

अतर्क्य 
------------------
भाग ( २ रा)
___________________

 कावेरीला मार लागल्याने ३ दिवस दवाखान्यात अँडमीट करून तिला घरी आणले जाते. कावेरी दवाखान्यात असताना तीन दिवस जानकी व शंभूराजे( शंभू) घरीच असतात . शंभू शेताकडे जाऊन आला कि दुपारी घरीच असायचा , जानकी घरातील इतर कामात व्यस्त व कावेरी साठी चिंतेत असायची . दुसऱ्या दिवशी शंभू वेळ साधून जानकी सोबत बोलतो .
 जानकी बैठकीच्या जागी झाडू देत होती , शंभू तिच्या मागील झुल्यावर बसून (कुत्सित पणे) "जानकी... वहिणी पाणी मिळेल का जरा ?" 
  जानकीचे लक्ष त्याच्याकडे नसते ती होकार देऊन केर जमा करते पाणी आणण्याकरिता हात धुवून स्वयंपाक घराकडे वळते. शंभू झुल्यावरून उठून वाड्याच दार लावतो . जानकी स्वयंपाकघरात जाते तस तिला कावेरी आठवते ( ती मनात )" कावेरी बरी आहे नं ग तु ? लवकर सुखरूप परत ये बाई "  डोळे पुसत बाहेर येतच असते इतक्यात ठेच लागते व ग्लास पडतो त्याच्या आवाजाने शंभू स्वयंपाक  घराकडे धाव घेतो. "जानकी काय झाल ?"
जानकी  काही नाही म्हणत ग्लास उचलते . शंभू तिच्याकडे जात ऐकलस ना !कावेरी ला तिसर मुल झाल तेही परत मुलगा . कसयं ऐकाव बाई माणसाने जरा मोठ्याचं . 
जानकी : काय बोलत आहात तुम्ही शंभू ... राजे ? कोणी ऐकाव कुणाच ? बर असु देत तसही माझ्या रिपोर्ट जगजाहीर आहे त्यात काय कराव ? कावेरी ची मुल पण तर माझीच आहेत. कितीदा दाखवल डॉक्टरांना तरी दोष माझाच मग काय उपाय ?
 शंभू ( तिरक्या नजरेने जरा हसत): पण मला वाटतय ना कि तु पण आई व्हावी , कावेरी सारख सुख तुझ्याही वाटेला याव आणि जर तु तयार असशील मग ...
 जानकी त्याचे भाव ओळखून तो काही बोलेल इतक्यात रागाने 
" शंभू , मी इथे असण एक मजबुरीने आहे, चालता हो इथून माझ्या संसारात कशाचीच कमी नाही. तुला ,तुझ्या  घाणेरड्या विचारांना मी खत पाणी नाही देणार , निघ sss ...
 शंभू : जानकी सांग पाहू कसल सुख आहे तुला प्रेम करतो ग तुझ्यावर . नाही बगवत तुझे हाल झालेले , समजून घे ना
   जानकी एक जोरात कानशिलात लावते शंभू च्या व वाड्या बाहेर जाते रडत दार उघडते तोच कावेरीच्या  मोठ्या मुलाला गावातील आप्पा काका घराकडे घेऊन येताना दिसतात . जानकी लगेच पदराने डोळे पुसत भरभर जाऊन त्या मुलाला घेऊन येते व कावेरी ची विचारपूस करते तर कळत कि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ती परतणार आहे. हे ऐकून ती सुखावते तिच्या येण्याच्या बातमीने मन सुखाने भरतं  जानकीच . संध्याकाळी ती मुलांना गरम गरम वरणभात भाजी करून खाऊ घालते व शंभू संध्याकाळी कामानिमित्त बाहेर जाणार असतो ,रात्री  शेतावर मुक्काम म्हणून जानकी निश्चिंतपणे वाड्याच मोठ दार तसेच खोलीच दार लावून  मुलाला  आपल्या सोबत घेऊन निजते. मनोमन तिला ही वाटते कि हे मातृत्व तिनेही अनुभवाव . कावेरीची मुल जानकीला आई बोलत जरी असली तरी सासू व इतर लोकांचे बोल तिला एखादे बाण टोचावे तसे खोलवर टोचत असतात. ती विचार करते यावेळेला इथे नको इलाज करायला शहरात मामाकडे जाव काही कारणाने व परत एकदा तपासून घ्याव . याच विचारात ती गाढ झोपी जाते सकाळी कोंबड्याच्या आरवण्याने तिला जाग येते. आज कावेरी परत येणार होती मग जानकीची लगबग सुरू होते . बाळ व बाळंतीण , सासू , विलासराव, तसेच त्यांचा  २ वर्षाचा मुलगा अंश संध्याकाळ पर्यंत घरी येतात . जानकी बाळ , बाळंतीणीच स्वागत करते . 
===================

( तुम्हाला काय वाटत जानकी देखील आई होईल का? मातृत्वा करिता तिचा संघर्ष कुठ पर्यंत घेऊन जाईल ?)

---------
क्रमशः 
________________
लेखिका : शगुफ्ता ईनामदार