अतर्क्य भाग ८

अतर्क्य कथा पूर्णतः काल्पनिक आहे. स्री च्या आयुष्यात येणारे संघर्ष चढ उतार दर्शवण्याचा प्रयत??

अतर्क्य ( भाग ८) 
--------
 कावेरी कस बस करून विनवण्या करून मुलाला सोडवून घेते. कार्तिक हे पाहून खूप घाबरतो. कावेरी मुलाला छातिशी लावून रडते बोलता येत नसल तरी आईच ती तिच्या मायेची ऊब मुलाला कळते मुलगा बोबड्या बोलात " आई लडू नको, मी ढिशूम कलीन त्याला" म्हणत आईचे डोळे पुसतो. कावेरी त्या दोन्ही पोरांना अजून जवळ घेऊन डोळे पुसते स्वतःचे व मुलांचेही . विलासरावाच्या च्या येण्याची कावेरी व कार्तिक वाट पाहत बसतात. तो दुपारी ४ च्या सुमारास येतो त्याची आई शेतातून उशीरा येणार होती. विलासरावा च्या येताच कार्तिक  घडलेला प्रकार सांगतो . कावेरी रडत रडत इशाऱ्यानेच कोण होता तो? विचारते . विलासराव  ला सर्व काही कळत कोण होता , हे त्याला ठाऊक होतेच. तो तसाच उठून सरळ बाहेर जातो. शेतात आई कडे जाऊन तो काही गोष्टी बद्दल चर्चा करतो घडलेला प्रकार सांगतो. यावर रमाबाई काही तरी उपाय काढूया म्हणत १-२ आठवड्याची मुदत मागते. विलासराव तेथून थेट तालुक्याला जातो. 
      जानकीच्या शहरात जाण्याने सर्वात जास्त त्रास हा कावेरीला होत होता . कावेरीला घरातल्यांची नजर चुकवून जानकी ने थोडे फार लिहणे शिकवलेले असते याचा ती वापर करते रात्री सर्वाच्या झोपल्या नंतर व सकाळी लवकर उठून सर्व घडलेला प्रकार एका वहीत नमूद करते. नियतीचा अजून एक मोठा खेळ उरलेला असतो त्याची जणू कावेरी ने तयारी केली होती . परंतू कावेरी अजाण होती या खेळापासून. 
     विलासराव सकाळीच तालुक्याला रवाना होतो. कावेरीला काही न सांगताच तो गेला होता . ती देखील पूर्ण दिवस घरात व्यस्त च असते. रमाबाई कावेरी ची सासू त्या दिवशी ती देखील पूर्ण दिवस घरी येत नाही. कावेरी विचारणार तरी कोणाला आता आणि कशी ? चिंतेतच ती बाकी काम आटपून घेते. 
    येथे शहरात जानकी स्वतःच्या सर्व फेरतपासण्या करते व विलासरावां करिता डॉ. वृंदा कडून होमियोपॅथी औषध घेते. डॉ. वृंदा यांना जानकी ने सासरची कल्पना दिलेली असते म्हणून मग डॉ . वृंदा देखील हुशारीने जानकी ला सर्व समजावतात व काही औषध पाण्यात मिसळून पिण्याची देतात. जानकीला गावी जाण्यास अजून १५ दिवस असल्याने डॉक्टर जाण्यापूर्वी औषध घेऊन जाण्याचा सल्ला देतात . जानकी नेमक काय करणार आहे स्वतः ला ती कस बर सिद्ध करेल? हे मामींच्या लक्षात येत नव्हते. मात्र त्यांना जानकी वर विश्वास होता. हा सर्व प्रकार वेळ साधून मामींनी मामांच्या  कानावर ठेवला होता. मामा ला देखील राग अनावर होतो . मामी मामांना समजावतात व जानकी ला साथ देण्यास सांगतात. 
    या १५ दिवसांत मात्र कावेरी च्या आयुष्याला कायमची कलाटणी मिळते. मोठी दोन्ही मुल एका मागोमाग एक कोणीतरी किडनॅप करतो. कावेरी वगळता विलासराव व बाकी सदस्य कसलीच तक्रार नोंदवत नाहीत कुठेच व शोध घेत आहोत असेच कावेरीला सांगत असतात. जानकीच्या येण्याचे दिवस जवळ येतात. विलासरावांना विचारले असता ते येण्यास जमणार नाही अजून १० दिवसांनंतर येतो असे सांगतो व जानकीला तिथेच अजून राहण्यास भाग पाडतो. जानकीला काही तरी वेगळ सुरु आहे याचा संशय येतो पण आता संपर्क कोणाला करावा काहीच कळत नसते . गावी अचानक एका सकाळी दोन चिमुकल्यांची जग सोडून गेल्याची बातमी येते ते ही तालुक्याच्या रेल्वे रुळावर . ओळख पटत नसते पण कोणाची तरी दोन मुल गेल्याचा संशय हा कावेरी च्या मुलांवर येतो. जानकीला काहीच कळवले जात नाही कारण ; मुल गेलेली  असतात ती गेली फक्त कावेरी साठी. 
    एक दिवशी जानकिच्या मामाच्या घरी सकाळी सुमारे ९-१० वाजता फोन  वाजतो. फोन मामी घेतात "हॅलो" बोलताच समोरून एका पुरुषाचा आवाज ऐकू येतो. " जानकी , घरी ये पोरी" मामी ऐकताच जानकी ला आवाज देतात. जानकी फोन कानाला लावताच समोरून गावातील पाटलांच्या घरून फोन आहे ते तिला आवाजावरून कळत. " जानकी ये लवकर" इतकच म्हणून समोरून फोन कट होतो. ती पुन्हा कॉल करते तर  कोणीच फोन उचलत नाही. जानकिला संशय येतो काही तरी घडलय याची तिला खात्री होते. पण काय? 
     जानकी दुसऱ्याच दिवशी निघण्याचा विचार करते व सर्व पॅकिंग करून घेते. डॉ. वृंदा ची भेट घेते व औषध आणते सर्व. मामा संध्याकाळी घरी येताच ती लवकरात लवकर दुसऱ्या च दिवशी सकाळी गावी निघायच सांगते.  अचानक सांगितल्याने मामांना सुटी मिळत नाही. अमोल च जाण शक्य नसत परिक्षा मुळे तर या दोघांमुळे मामींना जाता येत नाही. शेवटी एकटेच जाण्याच ठरत.  दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीला निरोप देण्याकरिता सर्व जणच बस स्थानकावर येतात. जानकी निघते परत गावी जाण्यासाठी. निघाले असता रस्त्यात शहरातून लांब अंतरावर बस बंद पडते. कोणतही साधन उपलब्ध नसल्याने सर्व प्रवाशांची गैरसोय होते. चार- पाच तासानंतर बस अथक प्रयत्नाने सुरु होते. जानकीचा प्रवास पुन्हा सुरु होतो. 

हा प्रवास जानकिच्या आयुष्यात काय बदलणार ? आपली प्रतिक्रिया द्यावी. 

क्रमशः 
----------------
लेखिका : शगुफ्ता ईनामदार

🎭 Series Post

View all