रडायच नाही लढायच २
संध्याची इच्छा नसतानाही ती गेली आणि सकाळी परत आली. तिचे मन अस्वस्थ झाले होते. मुलांसमोर ती स्वाभिमानाने उभी राहू शकत नव्हती.
पाहुया पुढे...
"आपण हे काम का करतो ? हे आपल्या मुलांना कळायलाच हवं. माझ्या विषयीचे त्यांच्या मनातले असलेले गैरसमज दूर व्हायलाच हवे. दोघेही ज्या दिवशी घरी असतील. त्याच दिवशी बोलू या. पण तसा वेळ मिळाला नाही. मग तिने रविवारी बाहेर जायचा प्लॅन बनवला. त्या दोघांना गोडीगुलाबीने घेऊन ती एका हाॅटेलमध्ये गेली.
" मुलांनो, तुम्हाला माझ्या सोबत यायला आवडले की नाही मला माहिती नाही. पण निधीच्या प्रश्नांनी माझ्या मनात खूप प्रश्न निर्माण झाली आहे आणि मला हे सहन होत नाही. काहीतरी मनात सलतय. जर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली तर तुमच्या मनातला गैरसमज सुध्दा दूर होणार नाही. "
"आई, तुझी फालतुची बडबड ऐकून घ्यायला आम्हाला वेळ नाही. खूप अभ्यास आहे."
" हो, मला माहित आहे. अशी आई कोणालाच नको असते ग. त्या वेश्या तरी बऱ्या. पण मी एक चांगली आई, चांगली स्त्री होऊच शकली नाही.
माझ्या आयुष्यात खरंतर खूप संकट आली. माझ्या माहेरची परिस्थिती तर खूपच बिकट होती. गरीबीची थट्टा कशी केली जाते ना हे फक्त मलाच ठाऊक होते. माझे माहेरचे घर म्हणजे मोडकळीस आलेल्या मातीच्या भिंती, तुटके फुटके कौल असणारे छप्पर, सुरक्षितपणा काय तो नव्हताच. चुलीवरची भाकरी आणि ठेचा हेच आमच अन्न. सकाळचा कोरा चहा पिऊन आम्ही कामाला लागत होतो. घरातले खाणारे सहा तोंड. पण त्यामानाने कमाई मात्र काहीच नाही. आजची भाकरी खाल्ल्यानंतर उद्यासाठी काही शिल्लक राहील की नाही. याचा भरवसा नव्हताच. शासनाकडून मिळत असलेल्या राशनचा उपयोग होत असुनही कधी कधी उपाशी राहायची वेळ यायचीच. माझ्या पाठीवर दोन बहीणी आणि एक भाऊ होता. पण घरात मुलाचे लाड खूप व्हायचे. त्याला पोटभरून खायला मिळायचे आणि आम्ही मुली मात्र अर्धवट उपाशीच. कशीबशी मी दहावी पास झाली आणि माझ्या मायबापा ने माझ्यासाठी एक मुलगा शोधला. मी फक्त सतरा वर्षांची आणि तो मुलगा बत्तीस वर्षांचा होता. मी नको म्हणत असतांनाही माझे लग्न त्या व्यक्तीशी लावून दिले आणि हो त्या बदल्यात माझ्या आई वडीलांना भरपूर पैसा दिल्या गेला. माझ्या लग्नामुळे माझ्या कुटुंबाला दोन दिवस सुखाचे येणार होते.
लग्नानंतर मी माझ्या नवऱ्याबरोबर इथे मुंबईला आले. मी सुध्दा नव्या सुखाची स्वप्ने पाहू लागली. पण नव्या नवलाईचे दिवस संपले आणि माझ्या आयुष्याला घरघर लागली. दिवसेंदिवस माझ्या आयुष्याचे चित्र बदलत गेले. माझे मन आणि शरीर एका निष्पर्ण वृक्षासारखे झाले."

"म्हणजे ! हे आमचे खरे बाबा नाहीत." विवेक
"आई, काय बोलतेस तू?" निधी
संध्याने डोळ्यातल्या आसवांना आज वाट मोकळी करून दिली होती.
"हे तुमचेच वडील आहे. आधीचा माझा नवरा म्हणजे एक मुरलेला गुंडच होता. चोवीस तास दारू ढोसत होता आणि माझा सतत उपभोग घेऊन मला तो पैशासाठी विकत होता. अशातच सुभाषराव सोबत म्हणजेच आताचे तुमचे वडील त्यांच्या सोबत माझी ओळख झाली. कारण ते माझ्या नवऱ्याचा खास मित्र होते. त्यामुळे बरेचदा आमच्या घरी येत होते. माझ्या नवऱ्याबरोबर त्यांची सतत उठबस असायची. त्यांच्याकडे मी चोरट्या नजरेने बघत असायची. कारण त्यांचे दिसणे, बोलणे खूपच रुबाबदार वाटायचे . शिवाय वयाने सुध्दा ते फार मोठे नव्हते. मला त्यांचा सहवास आवडू लागला. ते माझी खूप काळजी घ्यायचे. मी त्यांच्या सोबत आनंदी राहू लागली. माझा नवरा घरी नसला की आम्ही खूप गप्पा मारायचो. एकमेकांशिवाय आम्हांला एक मिनिट सुध्दा करमत नव्हते. हळुहळु आम्ही जवळ येत गेलो. पण आता माझा नवरा आमच्या प्रेमाच्या आड येत होता. नेमकं अति दारू च्या सेवनाने त्याची तब्येत बिघडली. खूप दवाखाने केले. पण त्याचे लिव्हर खराब झाले आणि तो हे जग कायमच सोडून गेला."
"मग ! मग काय झाले?"
"आई, बाबा तुझ्यावर इतकं प्रेम करत होते. तरीही मग तुझ्या आयुष्याची अशी वाताहत का झाली? की तुलाच चटक लागली होती या सगळ्याची."
"निधी.... "
"आई आपण बाहेर आहोत. याचे भान ठेव. अगं तुला कुटुंब हवं होतं ना. मग आम्ही तुझ्यासोबत असतांनाही तू बाहेर का जाते? आमच्या जन्मानंतर तरी तू हे गलिच्छ काम थांबवू शकली असती. आता आम्हाला समजतंय ग सगळ. जागोजागी आमचा अपमान होतो. आमचे मित्र मैत्रिणी सतत चर्चा करत असतात ग. तुला कळत कसं नाही."
'निधी, असं म्हणतात ना. "घर फिरले की घराचे वासेही फिरतात." तसंच माझं झालं. आमचं प्रेम संपल ग. माझा नवरा गेल्यानंतर त्याचे घर माझ्या नावावर झाले. मलाही कोणाच्या तरी आधाराची गरज होतीच. त्यातच सुभानराव सतत माझ्या मागेपुढे करत होते. त्यामुळे काही महिन्यांनंतर तुझे बाबा आणि मी त्याच घरात एकत्र राहू लागले. नंतर आम्ही लग्न केले. मरा वाटल आता तरी आपला छान संसार सुरु झाला. पण माझं सौंदर्य आणि पैशाची हाव तुझ्या बाबांना स्वस्थ बसू देत नव्हती. माझ्या आयुष्याची लक्तरे त्यांनी वेशीवर टांगली. तुमच्या बाबांना कष्ट न करता आयत खायची सवय पडली. अगं सगळ कळतय पण पोटाची भूक भागविण्यासाठी आपण काहीतरी करतोच ना. तसं माझं झालं. माझं घर तर माझ्या ताब्यातून गेलंच होते. पण जेवढा काही पैसा, सोनं नाणं होत . तेही तुझ्या बापाने दारूच्या आहारी जाऊन विकल. मी कफल्लक झाले. फक्त प्रेम या शब्दामध्ये किती भावना दडलेल्या असतात ना आणि त्यासाठीच मी आसुसलेली होती. पण माझं नशीबच फुटके निघाले. वाटलं होतं आतातरी जीवनाची घडी व्यवस्थित बसेल. पण तुझ्या बापाने ही मला धंद्याला लावलं."
"आई..."
"ऐकायला खूप कठीण वाटत ना. पण सत्य हेच आहे. माझ्या आयुष्यातले आणखी एक सत्य मी लपवून ठेवले होते.
"कोणते?" विवेक आणि निधी एकमेकांकडे बघू लागले.
पाहुया पुढच्या भागात...
अष्टपैलू स्पर्धा २०२५
अश्विनी मिश्रीकोटकर
अश्विनी मिश्रीकोटकर