आसुसलेले मन...❤️ भाग 5 अंतिम

Tyachya asuslele man shant zal

आसुसलेले मन...❤️ भाग 5 अंतिम


आधीच्या भागात आपण पाहिले की,


सारंगचा मित्र गावावरून आला, बोलता बोलता तो बोलून गेला की त्याच्या लग्नाला बरीच वर्षे झालेली, मूल होतं नव्हतं म्हणून त्याने एक मुलगी दत्तक घेतली. सारंगला पटलं,त्याने सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.


एक दिवस ते अनाथाश्रम मध्ये गेले. मुलांसाठी खेळणी,पुस्तक,कपडे घेऊन गेले. तिथे एक मुलगी रुसून बसलेली पण रमाने तिला फ्रॉक देताच तिला खुप आनंद झाला आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून रमाही समाधानी झाली.

आता पुढे,

रमा आणि सारंगने मनाशी गाठ बांधली की आपण मुलगी दत्तक घ्यायची. त्यांनी सगळे प्रयत्न केले. घरच्यांना समजावलं, आई तर तयार नव्हतीच. तरीही त्यांनी निश्चय केला होताच. त्यांनी अजून एक दोन अनाथाश्रम गाठले, सगळी माहिती मिळवली. सगळे कागदपत्र तयार केले.
काही अनाथआश्रमाचे संस्थापक सारंगची आर्थिक परिस्थिती बघता त्यांना मुलगी दत्तक द्यायला तयार नव्हते. त्यासाठीही सारंगला बराच संघर्ष करावा लागला.

दिवस भरभर सरकत होते पण त्याची व्यथा काही संपत नव्हती, काम होत नव्हतं. सारंगच्या ऑफिसमध्ये ही गोष्ट माहीत झाली, त्याच्या ऑफिसचे लोक त्याची टिंगल करायला लागले. सारंगने दुर्लक्ष केलं पण तरी त्याचा त्याला त्रास होतच होता. बरेच दिवस गेले, महिने गेले, कागदपत्र तयार असूनही काम होत नव्हतं.

शेवटी एका ठिकाणी एका अनाथाश्रम मध्ये मुलगी दत्तक घेण्याचा पक्क झालं. सगळ्या प्रोसिजरमध्ये महिना गेला आणि फायनली एक तीन वर्षाची गोड मुलगी सारंग आणि रमाच्या जीवनात आली.

सारंग आणि रमा तिला घरी घेऊन आले. रमाने खूप छान तयारी करून ठेवलेली होती हे तिच्या स्वागतासाठी. कुंकवाच्या पावलांनी लक्ष्मीच्या रूपात लक्ष्मी घरात आली. त्यामुळे रमा आणि सारंगने तिचं नाव लक्ष्मी ठेवले.

ते तिला लक्ष्मी या नावाने हाक मारायचे  ज्यावेळी लक्ष्मी घरात आली सगळ्यांनी नाक तोंड मुरडले. कोणी तिच्याशी बोललं नाही त्यामुळे ती लहान तोंड करून बसली होती. रमाने तिला समजवले.


“बाळा सगळे बोलतील तुझ्याशी, तू इतकी गोड आहेस ना की कुणीही जास्त दिवस तुझ्यावर रुसून बसणार नाही.”

जेव्हा लक्ष्मीने आई आई म्हणून रमाला हाक मारली, तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिने तिला घट्ट मिठी केली आणि डोळ्यात साठवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
सारंगनेही त्या दोघींना मिठी घातली.


लक्ष्मीने सारंगलाही  मिठी दिली, त्याने तिला घट्ट पकडलं. आणि त्यानेही घट्ट डोळे मिटले. तिच्या गालाची पप्पी घेतली, तिच्या गालावरून हात फिरवला. त्याला किती प्रेम करू नी किती नाही असं झालं होतं.

आसुसलेलं मन आज शांत झालं. घरच्यांनी विरोध केला, नातेवाईकही बोलले, समाजानेही त्रास दिला. पण मनाशी असलेला निश्चय पूर्ण झाल्यामुळे दोघेही आनंदात होते. त्यांना आता कुणाचीचं पर्वा नव्हती.


आज सारंग आणि रमाचं आयुष्य पूर्णत्वास आलं होतं.

समाप्त:

आजही समाजात अशी कित्येक जोडपी आहेत, ज्यांना मुलं होत नाही. अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नाही. यामुळे समाजाकडून त्या बाईला तर त्रास होतोच पण पुरुषाला देखील होतो. फरक इतकाच आहे की तो दाखवत नाही म्हणून काही त्याच्या मनाची व्यथा कमी होत नाही.

त्यालाही वाटतं आपण बाबा व्हावं, लहानसा जीव आपल्या आयुष्यात यावं. त्यालाही समाजाकडून त्रास होतोच. मग दवाखान्यात टेस्ट साठी पैसे खर्च करण्यापेक्षा, जर मूल दत्तक घेतलं तर...?

खरच खूप छान कल्पना आहे, एका अनाथ मुलाला नवीन आयुष्य मिळत. आई बाबाच प्रेम मिळतं. 
तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिये द्वारे नक्की कळवा.

धन्यवाद

🎭 Series Post

View all