सिनेमा अस्तित्व

Astitva
झी सिनेमा वर दुपारी सिनेमा लागला.अस्तित्व ...तब्बू सचिन खेडेकर अभिनित चित्रपट .एक वेगळा विषय खूप सुंदर रीतीने हाताळला गेला.
श्रीकांत पंडित आदिती पंडित ची बायको.त्यांना एक मुलगा अनिकेत त्याची वाग्दत्त वधू रेवती.श्रीकांत चा मित्र रवी बापट आणि त्याची बायको नेहा.चित्रपट सुरू होतो एका फॅमिली gathering ने श्रीकांत च मित्र त्याच्या बायको सोबत आणि  होणारी सून रेवती आलेली असते.त्यांच्या गप्पा चालू असताना एक courier येते बायकोचे परवानगी न घेता श्री ते पाकीट फोडतो नेहा ला ते खटकते.आणि मल्हार कामत आदितीचा संगीत शिक्षक त्याची सर्व अमाप संपती मरण्याअधी तिच्या नावावर करून गेलेला असतो.प्रथम श्री खुश होतो.नंतर संशयाचा भुंगा मन पोखरताना तो शंकेने अनिकेत च्या जन्मतारीख व सर्व तारखांच्या गल्लतीतला घोळ सरळ अदितीला विचारून तीला अनिकेतमाझाच मुलगा आहे ना असा प्रश्न टाकतो.मग आदिती त्याला २४ वर्षापूर्वी तिच्या व मल्हार च्या हातून झालेल्या शनिक मोहाची कबुली देते.श्री तिच्यावर व्हाभीचाराचा आरोप करतो.सर्वांच्या उपस्थितीत तिचा अपमान करतो .मुख्य म्हणजे ज्या मुलाला तिने जन्म दिलेला असतो तो सुधा तिला नाकारतो.ती पूर्णपणे कोसळते.नेहा रेवती तिला आधार देतात.त्यांचे तिला नाकारणे ,तिला स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव करून देते.तिची एक चूक तिचे २७ वर्षाचे सुखी कुटुंब उध्वस्त करून तिला परके करते.तिला खुज्या मनोवृत्तीच्या अनिकेत ने दिलेल्या वागणुकीने रेवती दुखावते . व engagement मोडते.आदिती मनात घर सोडण्याचा एक निर्णय पक्का करते. त्यात रेवती तिची साथ देते.जाताना शेवटी ती श्री ला त्याच्या विवाहबाह्य संबंध त्याचे तिच्या प्रती असणारे आरोप यांचे खूप उत्कृष्ट रित्या प्रश्न टाकते. मल्हार कामत असो नाहीतर श्रीकांत पंडित असो  सर्व पुरुष फक्त स्वार्थी पणाने स्त्रियांचा वापर करत आले आहेत.आणि तिने जन्म दिला म्हणून अनिकेचे अस्तित्व व श्रीकांत चा पुरुष  पणं सिद्ध होतो. अगदी अनिकेत नंतर त्यांना दुसरे मुल झाले नाही याचा अर्थ  श्रीकांत पुरुष नाही का तरी सुधा ती त्याच्यावर नितांत प्रेम करत असते असे सांगते.त्यादिवशी तिच्या हातून एक चूक झाली पण म्हणून ती व्यभिचारी ठरत नाही.असे निक्षून सांगते.अनिकेत ला रेवती त्याचे विचार किती शूद्र आहेत व आदिती साठी नव्हे तर स्त्री  पुरुषाच्या समनाते बाबत त्याच्या विचारांच्या तफावतीमुळे तिने engagement मोडते असे सांगितले व आज तू ज्या आईला नाकारतो त्या आईमुळेच तुझे अस्तित्व आहे .म्हणून सांगते.स्त्री व पुरुष समान असल्याने दोघांना समान हक्क व वागणूक मिळाली पाहिजे असे तिचे प्रामाणिक मत असते. व शेवटी ती अदितीला बरोबर घेवून जाते.
चित्रपटातून एक वेगळा विषय खूप छान तऱ्हेनं हाताळला गेलाआणि तो कुठे तरी आपल्याला अंतर्मुख करून जातो .स्त्रियांचे अस्तित्व नक्की काय असते हे विचार करायला भाग पाडते.