अस्तित्व भाग ९

श्रावणी लोखंडे


(काही वेळाने शीतल तयार होऊन खाली हॉल मध्ये येते काही पेपर्स ची फाईल असते हातात. खाली येऊन ती आजीआजोबांच्या पाया पडते आणि आशीर्वाद घेते कारण ती कामाच्या शोधात निघते आजी तिला त्यांच्या ओळखीवर बँकेत चांगल्या पदावर नोकरी मिळवून देण्याबाबत बोलतात.आणि शीतल ला उगाच काम शोधत फिरू नको असं सांगतात.)आता पुढे....



शीतल आजी ने दिलेल्या पत्त्यावर जाते पण तिचे पाय जागीच थिजतात, कारण ज्यांच्या घरी आपण राहतो त्यांच्याच शिफारशीवर काम पण करायचं.......तिला कुठे तरी हे पटत नव्हतं. शिफारशीवर काम तर मिळेल पण स्वतःच्या कर्तृत्वावर एखाद्याला मिळणारा जॉब हा कुणा एका व्यक्तीच्या फक्त विनवणी मुळे आपल्याला मिळणे हे तिला रास येत नव्हते, म्हणून ती आतमध्ये जातच नाही.

शीतल आपल्या हातातली फाईल घेऊन एका कपड्याच्या फॅक्टरी मध्ये जाते........ तिथे काही तिला करण्यासारखं असेल का ते बघायला, पण तिथे जागा रिकामी नसते. काही ठिकाणी काम तर असते पण जागा चांगली नसते. कुठे कुठे तर फक्त पुरुषच असतात. अश्या सगळ्या अडचणी येतच असतात. या सगळ्यात आठ दिवस निघून जातात. शीतल अगदी हतबल होते.

एक दिवस शीतल निराश होऊन गॅलरीत बसलेली असते. रोज पहाटे पहाटे वातावरण प्रसन्न करणारी शीतल स्वतःमध्येच हरवलेली असते. आजोबा ही गोष्ट आजींना सांगतात आणि दोघे ही शीतल च्या खोलीकडे येतात.



शीतल शून्यात नजर लावून बसलेली असते आणि चेहऱ्यावर डोळ्यातल्या पाण्याचे मोती ओघळत असतात. आजी तिच्या डोळ्यातले पाणी त्यांच्या पदराने टिपतात....... तशी शीतल भानावर येते, आणि स्वतःला सावरते.

 "अगं बाळा......अस करून कसं चालेल सांग? अस हतबल होऊ नको आणि मला खूप बरं वाटल की तुला तुझ्या कर्तृत्वावर नोकरी हवी आहे. कोणाच्या विनवणीने नको. मला या गोष्टीचा फार आनंद आहे आणि तू नको काळजी करू तुला नक्की काम मिळेल आणि चांगलं मिळेल.

एवढ्यात आजोबा बोलतात....

"त्यापेक्षा तू घरातच काही करण्याचा विचार का नाही करत???? म्हणजे बघ तुझ्या हाताला चव फार छान आहे.इथे बरेच लोक परराज्यातून कामासाठी येतात कामावरून येऊन मग जेवण वैगरे बनवतात अश्या लोकांसाठी डब्बे का नाही चालू करत नाही तर आणखी एक कल्पना सुचवतो. 

आपला एरिया हा थोड्या मोठ्या लोकांचाच पडतो. इथे सगळ्यांना नवनवीन पदार्थ खाण्याची खूप हौस आहे आणि बनवण्याची सुद्धा पण त्यांना येत नाही. त्यापेक्षा तूच जेवणाचे क्लास का घेत नाही. ज्यांना नवीन नवीन पदार्थ शिकण्याची हौस आहे ती लोक येतील आणि त्यांना जर का तुझी शिकवण्याची पद्धत आवडली तर त्यांच्या ओळखीच्या लोकांना सांगतील........ बघ काय वाटतय तुला ते....आजी पण आजोबांच्या बोलण्याला दुजोरा देतात...

एवढ्या कल्पना ऐकून शीतल थोडी विचारात पडते आणि थोडा वेळ मागते विचार करायला.



संध्याकाळी शीतल आणि आजी बाहेर मंडई मध्ये जातात भाजी वैगरे आणायला तेंव्हा काही वेगळ्या भाज्या पण शीतल घेते ज्या आजींनी कधी घेतल्या नसतात.आणि एका स्टेशनरी मधून जेवणाच्या नवनवीन रेसिपीच पुस्तक घेते.घरी आल्यावर शीतल आजी आजोबांना आज सगळं जेवण तीच बनवणार अस दरडावून सांगते. दोघे ही मग तिला जे करायचं आहे ते करू देतात.

रात्रीच्या जेवणाची सगळी तयारी पूर्ण होते आणि शीतल टेबल वर जेवण वाढायला घेते.आज ताट कस अगदी उठून दिसत होतं जेवणाचं.सगळं कसं साग्रसंगीत होत.आणि त्यात स्पेशल अशी परवलीची मिठाई होती. असेच आठ दिवस शीतल रोज नवनवीन पदार्थ करून आजीआजोबांना खाऊ घालत होती आणि ती दोघेही....... खाऊन झालं की त्यात काय कमी जास्त आहे हे शीतल ला सांगत होते, आणि तस तस शीतल त्यात बदल करत होती.आजीआजोबा पण त्यांच्या मित्रमंडळी सोबत शीतल च्या जेवणाच्या क्लास बाबत सगळी कडे माहिती पसरवत होते जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही बातमी पोहोचेल .अशातच शेजारच्या मेहता आंटी आणि त्यांची मुलगी दोघींनी क्लास बाबत विचारणा केली असता शीतल ने आणखी चौघी जणी आल्या की लगेचच क्लास घेणार असल्याचे सांगितले.मेहता आंटी त्यांच्या जिम मधल्या काही मुलींना याबाबत सांगून तयार करतात.आणि शेवटी शितलचा पहिला क्लास सुरू होतो. क्लास च्या आदल्या दिवशी पासूनच आजी आजोबा आणि शीतल ची लगबग सुरू असते जसा काही सण च आहे घरात.क्लास ची सगळी पूर्वतयारी तिघे मिळून आदल्या रात्री पूर्ण करतात आणि उरलेली तयारी जी फोडण्यांची असते जसे, कांदा, टोमॅटो वैगरे चिरून ठेवणे हे क्लास च्या दिवशी सकाळीच आजोबा करायला घेतात आणि आजी बाकी तयारी करण्यासाठी शीतल ला मदत करतात. क्लास ची वेळ होते तश्या त्या सहाजणी ही एकत्रच येतात. शीतल थोडी नर्वस असते आजी ला हे लगेच समजते तश्या आजी तिला देवघरात बोलवतात आणि स्वतःला शांत करून एकाग्र व्हायला सांगतात. देवाजवळची साखर तिच्या हातावर ठेवतात तशी शीतल आजींच्या पाय पडते आणि बाहेर येऊन आजोबांना देखील नमस्कार करते आजोबा पण तिच्या डोक्यावरून हात फिरवून आता पुन्हा मागे वळून न बघण्याचा सल्ला देतात आणि अशीच पुढे जाऊन स्वतःची खूप प्रगती करण्याचा आशीर्वाद देखील देतात.



शीतल चा पहिला क्लास पूर्ण होतो तिचा अक्खा दिवस आज कामामध्ये जातो.सगळ्या जणी गेल्यावर बनवलेल्या सगळ्या पदार्थामधले थोडे थोडे पदार्थ ती त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी देते आणि उरलेले पदार्थ ती आजीआजोबांना खाऊ घालते आणि दोघे ही तीच तोंडभरून कौतुक करतात.आजीआजोबांना पण तिला कामात मदत करून खूप बरं वाटत होतं. शीतल मुळे घरातील वातावरण एकदम छान झालं होतं. असेच चार महिने जातात एक दिवस आजोआजोबा आणि शीतल खरेदीसाठी बाजारात जातात तिथे एका बाईचा अपघात झालेला असतो आणि तिच्या शेजारी एक चिमुरडी बसून रडत असते शीतल त्या बाईच्या बाजूला जाऊन बघते तर तिने तिथेच जीव सोडलेला असतो मग आजोबा त्या मुलीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आणि त्या मुलीला त्यांच्या सुपूर्द करतात सोबतच त्यांचा पत्ता सुद्धा देतात त्या मुलीच्या घरचे जर भेटले तर सगळी व्यवस्थित चौकशी करून त्यांच्या सुपूर्द करणासाठी सांगतात आणि पुन्हा घरी यायला निघतात. आजी आणि शीतल आधीच घरी आलेल्या असतात आजोबा आल्यावर दोघी पण त्या मुलीबद्दल विचारतात तर आजोबा सांगतात पोलिसांना सगळं सांगून आलो आहे. आठ दिवसांनी आजोबा पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तिची चौकशी करतात तर ते सांगतात की तिला मामा मामी घ्यायला आले होते तिची पूर्ण चौकशी करून त्या मुलीला त्यांच्या सोबत पाठवून दिल आहे. काही दिवसांनी शितलला तीच लहान मुलगी रोड वर भीक मागताना दिसते. शीतल तशीच माघारी फिरते आणि आजोबांना सांगते तसे आजोबा शीतल सोबत त्या जागी जातात आणि त्या मुलीला जवळ घेऊन सगळ्या गोष्टीं नीट विचारून घेतात तेंव्हा त्यांना फक्त एवढंच कळत की तिची मामी तिला चार दिवसांपूर्वी इथे सोडून गेली आणि लगेच येते बोलली पण ती अजून आलीच नाही. इतके दिवस कोणी कधी काही दिल तर ते खात होती अस तिने आजोबा आणि शीतल ला सांगितलं आजोबा पुन्हा तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात.



(आजोबा आणि शीतल काय करतील???तिला तिथेच ठेवतील की..... आणखी काही करतील?हे वाचण्यासाठी मला फॉलो करत राहा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे जरूर कळवा.)

क्रमशः 

(सदर कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा फॉरवर्ड करताना लेखिकेच्या नावसहित करावी.)

धन्यवाद....

श्रावणी लोखंडे.......






🎭 Series Post

View all